आजारांचं फॅशन - 3 Prashant Kedare द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आजारांचं फॅशन - 3

अनिल देखील मित्रां सोबत बाहेर पडला, बाकीचे सगळे काही ना काही एकमेकां सोबत बोलत होते पण अनिल मात्र शांत पणे चालत होता.

"गोरे साहेब काही तरी करा आता, डोकं पकडलंय, थोडी थोडी मारली पाहिजेल"

घोरणे पप्या अनिलच्या खांद्यावर हात टाकत अनिलला बोलला.

"मी का करू, लग्नाला आलायस का माझ्या"

अनिल ने पप्याचा हात खांद्यावरून झटकत तिखट टोला मारला.

"एक काम करा सगळे काढा ना थोडे थोडे पैसे, ये निक्या तुझ्या कड किती आहेत"

शार्दूल ने निखिल बहिरे कडे बघत जगातला सगळ्यात अवघड प्रश्न निखिलला विचारला.

"अरे मयताला काय पैसे घेऊन येत का कोण?"

निखिल बहिरे कडे पैसे न काढण्यासाठी प्रत्येक प्रसंगा वरती काही ना काही कारण नेहमी तयारच असायचे.

"जा मग तू घरी जा, आन्या तुझ्या कड किती हे? चल मारू एक एक अन झोपू जाऊन"

घोरणे नेहमी सारखा बेधडक बोलला.

"तुम्ही प्या यार मी नई पिणार, बंद करून टाकणार हे आता, आणि अशी पण सकाळी गोळी खाल्लीय मी"

"सकाळी खाल्लीना, आता किती वेळ झाला चार तासांनी पिल्यावर काय नई होत असं डॉक्टर स्वतः बोलतात"

काही करण्याची खरंच इच्छा असेल तर मार्ग कसे काढायचे हे घोरणे पप्या कडून शिकावं, पण फक्त काही उलट पालट करण्याची.

"हा तुझा बाप डॉक्टर हे ना"

अनिल जरासं स्मित हास्य देत बोलला. त्याच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरच्या हास्या वरून त्याचा पण दोन दोन पेग साठीचा होकार ठळक दिसत होता.

"हा माझा बाप डॉक्टर आहे असं समज अन चल, अरे पण ह्या निक्याच काय"

"तू नको माझी काळजी करू गोरे साहेब असताना निखिल बहिरेला काय टेन्शन नई"

अनिलच्या खांद्यावर हात टाकत निखिल पिण्यासाठी सगळ्यात पुढे निघाला.

“हा माझ्या बापाची खान आहेना पैश्याची, अन तुझा तर ठेकाच घेतलाय मी”

अनिलने निखिलचा हात झटकत पुढे बोलला

“माझ्या कड पाचशे आहेत बाकी मला काही माहित नई, माझी बॉटल काय दोनशेला येति बार मधी”

“चल रे गाभरा होतंय त्यात, कमी पडले तर भरतो मी”

शार्दूल निखिलचा हात पकडून अनिलला बोलला, आणि सगळ्यांचे चेहरे कशे झेंडूच्या फुलासारखे खुलले, ललित बार तसा जवळच होता पण शार्दूल साहेब काय चालत फिरणारे माणूस नव्हते,

“ये रिक्षा”

शार्दूल ने समोरून येणाऱ्या रिक्षाला हात केला आणि सगळे दाटी वाटी करून रिक्षात घुसले.

“अरे साहब सिर्फ तीन लोग”

रिक्षावाला मागे वळून बोलला.

लगेच शार्दूल ओरडला.

“ये चल रे इथंच जायचंय, कुछ हुवा तो हम है”

बिचारा रिक्षावाला शार्दूलचा खडतर आवाज ऐकून गुपचूप रिक्षा चालवायला लागला. पाचच मिनटात बार आला, सगळे रिक्षातून उतरले, सगळ्यात पहिले शार्दूल आणि घोरणे उतरले आणि घोरणे निक्याला जाता जाता टोमण्यांत बोलला,

“निक्या रिक्षाचे तरी पैसे दे”

ह्यावर निखिल बहिरेने एकही शब्द न बोलता खिशातली एकुलती एक वीस रुपयांची नोट काढून रिक्षा वाल्याला दिली आणि न विसरता दोन रुपये परत घेऊन पॅन्टच्या खिशात टाकले.

शार्दुलने आत शिरताच कॉउंटरवरच्या मालकाला हात वरकरुन विचारले

“क्या अण्णा धंदा पाणी कैसा चालू है?

“ठीक चल रहा है सेठ”

तो काउंटर वर ठेवलेला वहीत काहीतरी लिहता लिहिताच बोलला.

सगळे टेबल वर बसले आणि शार्दूलने विचारलं

“काय घेणार भाई?

त्यावर अनिल लगेच बोलला

“असा विचारतोय जसा सगळं बिल हाच देणार हे, दोन दोन पेग चे पैसे आहेत आई बी मागावं आपली, अन चकली अन चटणी”

शार्दूल ने ऑर्डर दिली आणि चार पाच मिनिटातच वेटरने दारू आणून सगळ्यांचे ग्लास भरले,

सगळ्यांनी ग्लास उचलले आणि शार्दूल ओरडला,

“चिअर्स”

“अरे तो मन्या मेलाय, स्मशानातुन आलोय अन चिअर्स काय करतोय येड्या गाभरा”

अनिल रागाने ओरडला.

सगळ्यांनी उचललेले ग्लास गुपचूप तोंडाला लावुन प्यायला सुरवात केली.