Tila chafa aavadaaycha books and stories free download online pdf in Marathi

तिला चाफा आवडायचाहोय..! तिला चाफा आवडायचा आणि आजही अगदी तितकाच आवडतो.म्हणूनच तर आज सकाळी मुद्दामच लवकर उठलो.उठल्या उठल्या आम्ही दोघांनी मिळून लावलेल्या त्या अंगणातल्या चाफ्याच्या झाडाची फुलं तोडली आणि तिच्या पुढ्यात आणून ठेवली आणि मग नेहमीप्रमाणे तिच्या त्या सुंदर डोळ्यांमध्ये पुन्हा हरवून गेलो.मग नकळतचं बर्याच वर्षांपूर्वी झालेली आमची पहिली भेट आठवली....!

त्या दिवशी ऑफिसचा पहिलाच दिवस त्यात घरातून निघायलाही खूप उशीर झाला होता.आता बस ने गेलो तर अजून उशीर होईल म्हणून टॅक्सीसाठी टॅक्सी स्टँड वर गेलो.पण तिथे एक ही टॅक्सी भेटली नाही.तेवढ्यात पावसानेही चांगलाच जोर धरला.समोरून एक टॅक्सी येताना दिसली मी पळतपळत जाऊन त्या टॅक्सीला अडवलं आणि दरवाजा उघडून आत मध्ये बसलो.आतमध्ये आधीपासून बसलेली एक सुंदर तरुणी माझ्याकडे अगदी डोळे वटारून बघत होती मी एक टक तिच्या कडेच बघत बसलो. "Excuse me मिस्टर असं टॅक्सी मध्ये डायरेक्ट कसं बसला तुम्ही आणि मी इथे आधी पासून बसलेय, तुम्ही दुसरी टॅक्सी पकडा ."असं ती माझ्या तोंडासमोर हाताने चुटकी वाजवत म्हणाली.
"I am so sorry मला माहित नव्हतं बाहेर पाऊस खूप आहे त्यामुळे मी न बघताच बसलो‌, आणि दुसरी टॅक्सी ही नाही भेटत" असं मी म्हणाल्यावर ,
"it's ok बसा तुम्ही" असं म्हणून ती गप्प झाली.
पुढे बराच वेळ गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली.तेवढ्यात ती अचानक टॅक्सी बाहेर उतरली‌ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या फुलवाली कडून चाफ्याची फुलं घेऊन आली.
मी मनात म्हटलं "काय एक-एक लोकं असतात एवढ्याश्या फुलांसाठी ही गाडीतून उतरली" "तुम्ही काही म्हणालात का..?"असं तिने माझ्याकडे बघून विचारलं
"नाही नाही" असं म्हणून मी गप्प झालो.
आता जरा पावसाने आधीपेक्षा जास्त च जोर धरला होता.
"गाडी थांबवा ड्रायव्हर काका मला इथे उतारायचंय"असं म्हणून ती गाडी च्या बाहेर उतरली.
बाहेर पडणार्या मुसळधार पावसामुळे तिची अगदीच गडबड झाली आणि त्या गोंधळातच तिच्या पर्स मधली फुलांची पिशवी गाडीतच राहीली.
"अहो ड्रायव्हर काका त्या मुलीची फुलं गाडीतच राहीली"असं मी म्हणालो.
"ठेवा तुमच्याकडेच"असं ते काका म्हणाले.
"अरे यार ,एक तर आज आॅफिसचा पहिला दिवस त्यात उशीर ही झालाय आणि ही फुलं नुसती कटकट..!
असं म्हणत मी आॅफिस च्या बिल्डींग मध्ये शिरलो. तेवढ्यात ती मुलगी अचानक माझ्या समोरून lift मध्ये जाताना दिसली.मी तिला आवाज देत lift मध्ये जाणार तेवढ्यात ती lift मधून वरच्या मजल्यावर गेली.
मी पळत-पळत बाजूच्या जिन्याने वर गेलो. पण ती कुठेच दिसली नाही. तेवढ्यात मला माझ्या आॅफिस मधून call आला.
"हॅलो ऽऽ... किशोर आज तुमचा आॅफिसचा पहिला दिवस आणि अजून तुम्ही आॅफिसमध्ये आला कसे नाही.हे बघा मला आॅफिसमध्ये कोणीही उशीरा आलेलं अजिबात चालत नाही." हा कडक आवाज ऐकून माझी पुरती तंतरली
"आता पहिल आॅफिसला जातो नाहीतर पहिल्याच दिवशी नोकरी जायची."असं म्हणत मी आॅफिसमध्ये पोहचलो.
आॅफिसमध्ये पोहचल्यावर एकजण माझ्या जवळ आला आणि म्हणाला.
"अरे तुला यायला उशीर का झाला.मॅडम कधीच्या आतमध्ये येऊन बसल्या आहेत."
"हो...! मला आला होता त्यांचा call."
"हा आता त्यांच्या केबिनमध्ये जा आणि बघ काय होतंय ते." मी मॅडमच्या केबिनमध्ये गेलो.
"मॅडम आता येऊ का..?"
"हो या तुमचीच वाट पाहत होते....! लवकर आलात"असा त्यांचा फक्त आवाज ऐकू आला.मी बाजूला वळून पाहितोतर काय..! ती गाडीमध्ये भेटलेली मुलगी जिची ही चाफ्याची फुलं देण्याच्या नादात मी माझा वेळ वाया घालवला.तीच माझी office Head आहे.
तिला तिथे पाहिल्यावर मला एवढा आनंद झाला की, मी सगळं विसरून लगेच , माझ्या खिशातली तिची चाफ्याच्या फुलांची पिशवी तिच्या हातात दिली.
"अहो बरं झालं तुम्ही भेटलात.‌ तुमची ही फुलं तुम्ही गाडीतच विसरला, ती देण्यासाठी मी किती शोधलं तुम्हाला, त्यामुळेच मला उशीर झाला."
माझं हे बोलणं ऐकून ती मोठ्याने हसून म्हणाली."अहो मग ही फुलं तुमच्याकडेच ठेवायची ना...!"
"नाही नाही असं कसं तुम्हाला आवडतात म्हणून,तुम्ही घेतली होती.मग मी माझ्याकडे कशी ठेवणार."
"बरं मग आज तुमचा आॅफिसचा पहिला दिवस म्हणून, ही फुलं तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट" असं म्हणून तीने फुल माझ्या हातात दिली.
आणि तिथेच तर आमची मैत्री व्हायला खरी सुरुवात झाली. पुढे त्याचं मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर लग्नही झालं.
आणि आज आमच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली.
दुर्दैवाने आज ती हा आनंद माझ्यासोबत साजरा करायला या जगात नाही. पण तिच्या आठवणी आजही माझ्यासाठी तितक्याच तरूण आणि ताज्या आहेत.ती शरीराने माझ्या जवळ नसली तरी तिची आठवण एक क्षण ही माझ्यापासून दूर जात नाही.तिला आवडत म्हणून आम्ही लावलेलं ते चाफ्याच झाड आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून तर आज पुन्हा एकदा तिच्या या फोटो समोर फुलं ठेवताना तिच्या डोळ्यांमध्ये हरवून गेलो,आणि नकळतचं तो भूतकाळ पुन्हा जगून आलो.
.

______✍️shivani Patil.


इतर रसदार पर्याय