लावण्यवती Shivani Anil Patil द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लावण्यवती


किंकाळ्या-आरोळ्या , आरडाओरडा रोजचंच झालंय हिचं,
धड स्वत:ही जगत नाही आणि दुसर्यांना ही जगू देत नाही.
काय पोरगी पदरात पाडले देवानं ,
वाटतं होतं पोरगी हुशार आहे, दिसायला सुंदर आहे.
कोणतही स्थळ लगेच पसंत करेल.
पण नाही..! बाईसाहेबांना शिकायचंय , नोकरी करायचीये,
रात्री-अपरात्री बाहेर भटकायचंय.
घ्या आता.., घडली ना जन्मभराची अद्दल.
आता आपलही घराबाहेर पडणं सुध्दा कठीण झालंय,
लोकं सहानुभूतीच्या नावाखाली हजार प्रश्र्न विचारतात, त्यांना तोंड देता-देता नाकीनऊ येत, त्यात खोटे गैरसमज करून घेणारे लोक वेगळेच, एैकतात एक आणि पसरवतात भलतंच, या सगळ्याचा वीट आलाय मला,
जीव अगदी गुदमरून गेल्यासारखं वाटतोय. "अगं रंजना किती त्रास करून घेशील स्वत:ला ,जे झालं ते झालं, ते बदलंन आता आपल्या हातात आहे का..?
असो.., तू आत मधून जेवणाचं ताट घेऊन ये , मी नीलू ला जेवण देऊन येतो.
नीलू..ऽ बेटा दारं उघड आणि जेवून घे असं म्हणत नीलू च्या बाबांनी दार वाजवलं.
मगाशी नीलू मोठ-मोठ्याने ओरडत होती, पण आता खोलीतून आवाज ही येत नाहीये , कदाचित झोपली असेल.
असं म्हणत नीलूच्या बाबांनी दार मागे ढकलून दिलं आणि खोलीत शिरले.
आणि अचानक समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली, त्यांच्या हातातल ताट जमीनीवर पडलं.
आणि तसेच ते नीलू कडे धावले.
समोरच्या पंख्याला नीलूच लटकलेलं शरीर पाहून त्यांनी मोठमोठ्याने हंबरडा फोडायला सुरुवात केली.
त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नीलू ची आई खोलीत आली.
हा सगळा प्रकार पाहून , त्यांनी सुध्दा मोठमोठ्याने रडारड करायला सुरुवात केली.त्यांचा आवाज ऐकून चाळीतील सर्व माणसं गोळा झाली.
तेवढ्यात नीलू चा धाकटा भाऊ मंदार ही तिथे आला‌.
समोरच्या पंख्याला नीलूच लटकलेल शरीर पाहून, तो धावत नीलू जवळ गेला आणि तिच्या लटकलेल्या पायांना घट्ट मीठी मारून रडू लागला.
तेवढ्यात नीलू च्या हातातून कसलीतरी चिठ्ठी खाली पडली.
मंदार ने ती उचलली, त्यात नीलूने आत्महत्या करण्यापूर्वी होणारं दु:ख, यातना सारं काही त्या पत्रात लिहून ठेवलं होतं.
मंदार पत्र वाचू लागला..,
.
प्रिय आई-बाबा आणि मंदार , . .
.
मला माफ करा..., पण माझ्यापुढे कोणताच पर्याय नव्हता.! खरंतर मला माहित होतं , की आत्महत्या करणं पाप आहे.पण आता माझा जगून तरी काय उपयोग , माझ्या आयुष्याची वात तर त्याच दिवशी विझली ,ज्या दिवशी माझ्या आयुष्यात ते भयानक वादळ आलं...., बऱ्याच दिवसांपासून मध्यरात्री जाॅब वरून घरी परतताना, त्या समोरच्या कोपऱ्यावरच्या टपरीवरची चार-पाच मुलं मला नेहमी त्रास द्यायची, आणि त्यादिवशी तर त्यांनी कहरच केला, ते माझ्या जवळ येऊन माझी छेडछाड करू लागले ,वेगवेगळे घाणेरडे हावभाव करून मला त्रास देऊ लागले.
मी संतापले आणि जोरात एकाच्या कानशिलात वाजवली. आणि तिथून पळून निघाले.
तसे ते अजूनच आक्रमक झाले, आणि माझा पाठलाग करू लागले.
मी धावत-धावत बरेच अंतर पुढे एका सुनसान रस्त्यावर निघून आले, आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या मोटारीत जाऊन लपून बसले.
तेवढ्यात ती मुलं मला शोधत शोधत तिथपर्यंत आली.
बराच वेळ ते मला तिथे शोधत होते, तेवढ्यात त्यातला एक जण त्या मोटारीजवळ आला, आणि अचानक त्याला माझ्या साडीचा पदर मोटारी बाहेर अडकलेला दिसला.
त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातल्या सिगारेटच्या लाईटरने माझ्या पदराला आग लावली, आणि बाहेरून मोटारीचे दरवाजे बंद केले. माझ्या साडीच्या पदराने हळूहळू पेट घ्यायला सुरुवात केली,
मला काही कळेचना..!
मी मोटारीचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
हळूहळू त्या आगीच्या लाटांनी माझं संपूर्ण शरीर पेटलं, माझा चेहरा , माझे हात-पाय संपूर्ण शरीर त्या भयानक आगीच्या झळा सोसत होतं,
माझ्या त्या यातनांवर हसत-हसत ते चारही विकृत तिथून निघून गेले.
असाच बराच वेळ निघून गेला , हळूहळू मी शुध्द हरपू लागले.
त्यानंतर जेव्हा मी शुध्दीवर आले, तेव्हा मी हाॅस्पिटल मध्ये होते.
तुम्ही तिघेही माझ्या समोर अगदी ढसाढसा रडत होता.
त्या रात्री काय झालं, कसं झालं हे मला काहीच आठवत नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी सुध्दा ,
माझ्यावर जास्त प्रेशर आणलं नाही.
त्यानंतर माझ्यावर अनेक उपचार झाले, वेगवेगळ्या महागड्या टेस्ट ही झाल्या, बराच पैसा खर्च झाला,
बाबांनी बँकेतून कर्ज काढलं.
मंदारला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
ऐकून घरात खूप ताणतणावाच वातावरण निर्माण झालं.
त्यात माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे लोक वेगवेगळे तर्कवितर्क लावू लागले.
शेजारी-पाजारी , नातेवाईक सहानुभूतीच्या नावाखाली प्रश्न वजा टोमणे मारू लागले. "नक्कीच तुमच्या मुलीचीच काही तरी चूक असेल, ऐवढ्या रात्री उशिरापर्यंत ती घराबाहेर राहीलीच कशी‌‌.?" असा दोष मलाच देऊ लागले.
माझं शरीर माझा चेहेरा खूप खराब दिसू लागला, माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माझी किव येऊ लागली.
ते ही माझ्यापासून दुरावले.
खरंतर त्याचं वेळी आपलं कोण आणि परक कोण या सगळ्याची जाणीव झाली.
ऐकून मी खूप एकटी पडले होते, तुम्ही तिघेही माझ्या नेहमी सोबत होता, परंतु आता मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा.
आईला होणारा त्रास मी समजू शकते, तिचं राग वजा प्रेम ही कळतं मला, पण इथून पुढे माझ्यामुळे तिला कोणाताच त्रास नाही होऊ द्यायचा.
मंदारच अडलेल शिक्षण ही नाही थांबवायचं,
आणि बाबांच्या उतारवयात त्यांना कर्जाचं ओझ ही नाही द्यायचं.
म्हणून....
आणि फक्त म्हणूनच मी हा घातकी निर्णय घेतला, .
असो..,
माझ्या आयुष्यात जे काही झालं ते विधीलिखितच होतं, माझ्या या चूकीबद्दल मला माफ करा. .
.
तुमची लाडकी, .
.नीलू
.


✍️@शिवानी पाटील.