एक झोका Shivani Anil Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक झोका




त्यादिवशी सहजच वेळात वेळ काढून बायको आणि मुला सोबत खरेदीसाठी बाजारात गेलो.बर्यापैकी खरेदी झाली तेवढ्यात मुला ने ओढत-ओढत बाजूच्या एका झोक्याच्या दुकानात नेलं, "बाबा मला हा झोका हवा आहे,प्लीज घेऊया ना"
"अजिबात नाही मिळणार, गप्प घरी चल" असं म्हणत बायको ने पवनला दुकानाबाहेर नेलं.
"अहो येताय ना"
"नाही तुम्ही जा पुढे , मी येतो थोड्या वेळाने" असं म्हणून मी त्या झोक्याकडे पाहत तिथेच उभा राहिलो.
"काय साहेब झोका घ्यायला आला आहात, की नुस्ता पाहणार" असं तो दुकानदार म्हणाला.
"हो तर..!" पॅक करा लगेच असं म्हणून मी तो झोका घेऊन घरी आलो.
झोका पाहून मुलगा भलताच खुश झाला,"Thank you बाबा" असं म्हणत सबंध घरभर नाचू लागला.
तेवढ्यात बायको ची कटकट सुरू झाली,"काय गरज होती,नको तिथे खर्च करायची.
"तू जरा शांत बस"असं म्हणत मी gallery मध्ये गेलो.
"साहेब..ऽ हा बघा तुमचा झोका जोडून झाला, चला आता येतो मी काही काम असेल तर फोन करा.
"ठीक आहे"असं म्हणत मी त्या झोक्यावर डोळे मिटून शांत
बसलो.
लहान असताना एकदा मी सुद्धा आईकडे अशाच एका झोक्याचा हट्ट धरला होता,तेव्हा तिने तिला मिळणाऱ्या मजूरीतल्या साठवलेल्या पैशातून झोका घेऊन दिला,
वडील लवकर वारल्यामुळे घरचा सगळा भार तीच सांभाळायची,ती माझे खूप लाड करायची, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायची, माझ्यासाठी तिने खूप कष्ट घेतले,मला शिकवलं लहानाचं मोठं केलं.
आणि मी तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो." आज अचानक हे सर्व प्रश्र्न माझ्या डोक्यात एखाद्या चक्रासारखे फिरत होते. मी खडबडून जागा झालो.
आणि खोलीत जाऊन बॅग भरायला सुरुवात केली.
"काय हो काय झालं तुम्हाला अचानक , बॅग भरून कुठे निघालात..?" बायको ने विचारलं
"मी एकटा नाही,आपण सगळे जातोय..!"
"अहो पण कुठे..?"
"माझ्या आईकडे आपल्या गावी"
"काय..! तुमची आई..?, तुम्ही तर म्हणाला होता की तुमची आई लहानपणीच देवाघरी गेली, मग हे कसं शक्य आहे..?"

"हो..! मी असं म्हणालो होतो, पण ते सर्व खोटं आहे, खरंतर वडील गेल्यानंतर माझ्या आईनेच मला सांभाळलं, माझं शिक्षण गावीच पुर्ण झालं, एकूण सगळं ठिकठाक चालू होतं,
पण म्हणतात ना की एकदा अपेक्षा वाढायला लागल्या की माणूस त्या अपेक्षांच्या आहारी जाऊ लागतो, मग त्याला स्वताःच्या अपेक्षांपेक्षा महत्त्वाचं काहीच दिसत नाही.
माझं ही असंच झालं जसा-जसा मी मोठ्ठा होत गेलो,तश्या माझ्या अनेक अपेक्षा वाढत गेल्या, माझ्यावरच्या प्रेमापोटी आई प्रत्येक वेळी तडजोड करून माझे सर्व लाड पुरवले ,
अशातच माझं graduation पूर्ण झालं.
माझे काही मित्र पुढचं शिक्षण परदेशी जाऊन पूर्ण करणार होते. मलाही परदेशी जाऊन शिक्षण घ्यावं असं वाटू लागलं, पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हे शक्यच नव्हतं,
मी आईला म्हणालो की.., आपण आपली शेती आणि घर विकून पैसे जमवू , पण तिने साफ नकार दिला. तिचं म्हणणं होतं की मी राहीलेल शिक्षण इथेच पूर्ण करावं आणि इथेच नोकरी करावी,पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.
या सगळ्यात आमच्या दोघांत अनेक खटके उडाले, आणि शेवटी मी रागारागाने घर सोडून निघून आलो.तिने मला थांबवायचा खूप प्रयत्न केला,पण मी हट्टाला पेटलो होतो.
पुढे मी या शहरात आलो नोकरी करत-करत राहीलेल शिक्षण पूर्ण केल, पण माझ्या मनात आईविषयी खूप राग निर्माण झाला होता. त्यामुळे मी परत कधीही तिला भेटायला गावी नाही गेलो. म्हणूनच जेव्हा आपल लग्न ठरलं तेव्हा तुला मी खोटं सांगितलं.
.
पण खरं म्हणटल तर मला आता या गोष्टीचा खूप पश्र्चाताप होतोय.का कुणास ठाऊक मला आज आईची खूप आठवण येतेय, तिला भेटावसं वाटतंय.
आणि आता काही ही झालं तरी मी तिला भेटायला जाणार.
"हो.. चालेल उद्या आपण सगळेच जाऊ त्यांना भेटायला, पवन ला ही घेऊन जाऊ आपल्याबरोबर"
"हो..गं..त्याला पाहून ती खूप खुश होईल, आणि तिचा माझ्यावरचा राग सुद्धा निघून जाईल.
दुसऱ्या दिवशी पहाटे ५ ला च आम्ही तिघेही गावी जायला रवाना झालो.
गाव तसं कोकणात असल्याने बराच वेळ लागतो पोहचायला, पण आज आईच्या ओढीने मी कधी गावच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलो हे समजलंच नाही.
.
का..?कोण जाणे, पण अचानक मी जशी-जशी गावची वेस ओलांडत होतो, तसतसे हृदयाचे ठोके वाढू लागले.
शेवटी गाडी घराबाहेर येऊन थांबली.
"पवन, मेघना हे बघा समोर जे कौलारू घरं आहे ना..! तेच आपल घर"असं म्हणून मी धावत घराजवळ गेलो.
अचानक मला घराच्या दारात बरीच गर्दी दिसली.
"हे एवढे लोक इथे का जमले असतील"असं म्हणत मी गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. आणि पाहतो तर काय समोरचं दृश्य पाहून माझ्या काळजाचा ठोका च चुकला,
"माझी आई अंथरूणावर निपचित पडून होती."
"अहो काकू.... माझ्या आईला काय झालं...?"
"काल रात्रीच त्यांचा जीव गेला, तू त्यांचा मुलगा ना..?"
"हो..!"
"खूप आठवण काढत होत्या तुझी...मला माझ्या मुलाला भेटायचं आहे त्याला डोळे भरून बघायचं आहे, काही दिवसांपासून तर खाणंपिणं सुध्दा सोडल होतं त्यांनी,
मधून-मधून तर अगदीच वेड्या सारख करायच्या...,
"माझं बाळ माझ्यावर रूसलय, माझं बाळ मला भेटायला येणार आहे‌. त्याला झोक्यावर बसायला खूप आवडत त्याच्यासाठी मी झोका बांधून ठेवलाय" झोका पाहून तो माझ्यावरचा राग विसरून जाईल..!
"तो बघ त्या दाराबाहेर त्यांनी झोका बांधून ठेवलाय, काल दिवसभर त्या झोक्याकडेच एक टक पाहत होत्या....!"
"माझं बाळ आलं का..?" असं सारखं विचारत होत्या.
हे सर्व एैकून मी तिथेच आईच्या... नावाने हंबरडा भोडला.
"आई मला माफ कर गं..! मी यायला फार उशीर केला, मी तुझ्यावर रागवायला नको होतं, मी तुझा गुन्हेगार आहे, तु माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाची मी जाण नाही ठेवली,उलट तुलाच अपराधी ठरवून घर सोडून निघून गेलो."
"मी तुझा गुन्हेगार आहे आई..ऽ मी तुझी शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण नाही करू शकलो."
.
आजन्म उराशी घेऊनी
लावलीस तू माया,
कशी नाळ विसरून गेलो मी..!
माझा जन्म गेला वाया.

__shivani Patil