कादंबरी- जिवलगा .भाग -२६ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा .भाग -२६

कादंबरी –जिवलगा..

भाग -२६ वा

-------------------------------------------------------------------------

मधुरीमाला परदेशी जाऊन दोन आठवडे झाले होते . सोनिया आणि अनिता सोबत राहण्याची

कल्पनां प्रत्यक्षात आली होती . तिघी आता सतत सोबत ..ऑफिसमध्ये आणि ऑफिस संपल्यानंतर

सुद्धा सोबत . त्यामुळे एकमेकींच्या सहवासात वेळ आणि दिवस कसा जातो आहे ते कळत नव्हते .

नेहा रोज रात्री तिच्या आई-बाबांशी बोलून सगळी खबरबात जाणून घेऊन मगच झोपायची .

इकडे आल्यापासून ती एकदाही गावाकडे गेलेली नाही ..घर सोडून ,आई-बाबंना सर्वांना सोडून

राहण्याची नेहाची ही पहिलीच वेळ ,

त्यामुळे या सगळ्यांची आठवण झाली की तिला रडू येते

हे आता सोनियाला –अनिताला माहिती झालेले होते .

त्यामुळे दोघी नेहाला चिडवत म्हणत

चला रडूबाई ..आई-बाबांना बोलून घ्या आजचे , आणि झोपी जा .

एक दिवस अनिता म्हणाली- ..

नेहा अग, तुला आता कमीत कमीत ४ दिवसाची तरी रजा मिळू शकते ,

मग, ये ना जाऊन एकदा . सगळ्यांना बरे वाटेल .

नेहा म्हण्यची ..नको नको ..अजून माझे कन्फर्मेशन ययायचे आहे ना !

मग त्या आधी मी गावी येणे “..

आजोबा –बाबा आणि मोठ्या दादाला सुद्धा आवडणार नाहीये ..

ते म्हणतात ..तू रोज व्हीडीओ कॉलवर बोलतेस , बघतेस आम्हाला .. सगळं खुशाल आहेत

हे दिसतंय तुला ..

मग, पुन्हा आठवण येते म्हणून ..इतक्या लांबचा प्रवास ..रात्रीच्या वेळी

एकटीने करीत यायचे ..एवढे काही काम बंद नाहीये ..!

ये सावकाश ..तुला नियमित रजा मंजूर केली जाईल तेव्हाच !

नेहाचा हा खुलासा ऐकून ..सोनिया आणि अनिता दोघींनी आपल्या कपाळावर हात मारून घेत

म्हटले .. धन्य आहे बाई ..!

तुझे असे घरवाले आणि तू .

.इतके कसे ग कोरड्या मनाने सांगून टाकतात तुला ,सध्या येऊ नकोस म्हणून !

तुझी आई काही म्हणत नाही का तुझ्या बाबंना ..!

अहो , नेहाला खूप पाहावे वाटते , ये म्हणावे न तिला एकदा !

यावर नेहा म्हणाली –

आमच्या आईसाहेब सुद्धा ..या लोकांच्या सोबत राहून त्यांच्या सारख्याच झाल्या आहेत .

मी गेले तर आनंद मात्र सगळ्यांना होणार हे नक्की ..

पण..हे लोक ..तोंडाने म्हणून नाही दाखवणार कधी ..की –

नेहा ,येऊन जा ग एकदा ..!

कम्माल आहे नेहा ! आम्ही तर असे घरच्या माणसांना सोडून राहू शकलो नसतो ..

पण ,आमचे नशीब तुझ्या इतके चांगले नाहीये ना !

अनिता सांगू लागली –

माझे आई –आबा माझ्या कॉलेजच्या दिवसातच गेले ..त्यानंतर ..मोठ्या भावाने दुसर्या गावी

कॉलेजला रहा तू ..मी गुपचूप पैसे तरी पाठवू शकतो ..पण, इथे तुझ्या वाहिनीला ..तुझे इथले

राहणे पसंद नाही , मग, उगीच कुरबुरी ..वाद आणि भांडणे करीत सोबत राहण्यापेक्षा ..

तू कोलेज्साठी शिकायला बाहेरगावी असतेस “ हे कारण .मलाही लोकांना सांगण्यासाठी सोपे आहे ,

निदान “लग्न झाले की ..बहिणीला दिले हाकलून “

असे कुणी बोलणार तरी नाहीत मला .

आता पंधरा वर्ष झालीत ..

माझा आणि दादाचा संबंध ..दरवर्षी ..राखी बंधन ,आणि भाऊबीज “

“या दोन सणांच्या येणाऱ्या मनीऑर्डर मुळेचन चुकता होते , एरव्ही नाही ..

दोन-तीन वर्षापूर्वी ..त्याच्या ऑफिसचे सेमिनार होते ..त्यावेळी तो आला ..चार दिवस होता इथे ,

रोज रात्री..तो जिथे थांबला होता ..त्या हॉटेलवर त्याच्या सोबत डिनरला गेले होते ..

त्याचा संसार , बायको-मुले ..यात मला प्रवेश नव्हता आणि या पुढे ही नसणार ..याची जाणीव

दादाच्या त्या भेटीत मला आली . त्याला कितीही अपराधी वाटले , दुक्ख होत असले तरी ..

ते मनाच्या बाहेर ,आणि ओठ्वर त्याला कधीच आणता येणार नव्हते .

दुखात एक सुख असते म्हणतात ..तसे ..

तो टूर निमित्ताने बाहेरगावी असला तर

कॉल करतो , व्हिडीओ कॉल करतो ..,

मला तेवढेच समाधान ..डोळ्याला तर दिसतो मला माझा दादा !

लेकीला माहेराची ओढ असते म्हणतात “,हे पण मी अनुभवू शकत नाही नेहा .

अनिताच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून नेहा म्हणाली ..

सोरी अनिता ..मी उगीचच माझ्या घरच्याबद्दलचे कौतुक सांगत बसले

तुझे हे दुक्ख मला माहिती नव्हते .

नो सॉरी नेहा –

उलट तुझ्यामुळे मला माझे मन पहिल्यांदा मोकळे करता आले, हे काय कमी आहे.

नेहा म्हणाली – बरोबर आहे अनिता -

असह्य दुखः कुणाजवळ सांगितले तर मन हलके होत असते .

बरं केलेंस तू मोकळेपणाने आज आमच्यासोबत तुझे दुखः शेअर केलेस.

हे ऐकून सोनिया म्हणाली ..

नेहा ..नशीब चांगले तर ..सगळे चांगले असते ,चांगले घडते ..असे म्हणतात

त्यात नक्कीच अर्थ आहे” हे मला अनेकदा माझ्याच बाबतीत घडत असलेल्या गोष्टीवरून म्हणावे वाटते.

म्हणतात ना ..आपल्या आयुष्यात माणसे चांगली यावी लागतात , आणि असे झाले नाही तर ?

काय होते ?

या प्रश्नाचे उत्तर ..माझ्या कहाणीत आहे नेहा , अनिताला थोडी थोडी माहिती आहे ..

आजच्या गप्पा ऐकून ..मला ही माझे दुखी मन हलके करावेसे वाटते आहे.

मी शाळेत असतानंची गोष्ट आहे..

आमच्या घरात सुख ,आनंद ,समाधान सारे काही होते ..आणि या सुखाला दृष्ट लागली ..

जिने आमचे घर सुखाने भरून टाकले ..त्या माझ्या आईच्या कायमचे दूर दूर

जाण्याने ..मोठेच संकट कोसळले . आईला असाध्य आजार झाला , काय झाले ? कळण्यास

उशीर झाला होता .. डोळ्या देखत ..हसतेखेळते माणूस ..माझी आई ..नजरेआड झाली .

घरावर जणू अवकळा आली ..

परिवारातील मोठ्या माणसांच्या बळजबरीने ..आम्हा मुलांची हेळसांड होऊ नये ..म्हणून

बाबांनी नाईलाजाने दुसरे लग्न केले .खरे ...पण, त्यांच्या स्वभातील एका सवयीचा -

स्त्री –आसक्ती ,स्त्री –सुख ..लालसेचा ,वासना-इच्छेचा

त्या आलेल्या स्त्रीने पुरेपूर फायदा उठवला नसता तरच नवल

. तिच्या तालावर ती माझ्या बाबांना नाचवू लागली ,

बाबांनी देखील आपल्याला “.हवे ते सुख मिळवण्यासाठी .”,

.नव्या बायकोला – तिला हव्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी करण्यास सुरुवात केली.

या मोहिमेत ..पहिला बळी ..आम्हा दोघा बहिणींचा दिला गेला .

माझ्या ताई मध्ये आणि माझ्यात पाच-सात वर्षाचे अंतर होते.

वाईट-वेळ असली तरी त्यात कधी कधी काही चांगले घडत असते . बाबांच्या बहिणीला आमच्या बद्दल

प्रेम वाटले ,माया वाटली ..

एका खेडेगावात , तिचे घर होते , घर कसले मोठा वाडा होता तो ..मोठे श्रीमंत –तालेवार घराणे ..

पाच-पन्नास माणसांचा राबता असणार्या त्या भल्या मोठ्या परिवारात आम्ही सामावून गेलो .

आत्याच्या घरची माणसे श्रीमंत होती ..त्यापेक्षा भल्या मनाची होती ,हे विशेष .त्यामुळे .आमचे

हाल ,कष्ट ,असे काही झाले नाही.

माझी ताई दिसायला खूप सुंदर ,देखणी ..आणि आईच्या तालमीत तयार झालेली सुगरण मुलगी

होती .

माझी ताई खूप नशीबवान ..आत्याने तिला आपली सून करून घेत .बाबांच्या मनाला तसा

आनंदाचा धक्काच दिला .

मोठ्या घरची सुनबाई ..धाकटी मालकीण .झालेली .ताई .तिच्या लग्नानंतर ..तिच्या संसारात

इतकी रमून गेली की ..आपल्याला एक लहान बहिण आहे , तिची जबाबदारी आपल्यावर आहे “

हेच विसरून ..स्वतःच्या सुखासीन जगण्यात रममाण होत गेली .आणि या दरम्यान मी मोठी

होत होते ,माझ्यातील होणारा आकर्षक बदल तिला जाणवू लागला ..तसे तिच्या मनात माझ्याबद्दल

संशय ,अविश्वास निर्माण झाला ..

तिला सारखे वाटायचे ..मी जीजूच्या प्रेमात पडले आहे, त्यांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात पकडले आहे.

आणि जीजुला मी खरेच जर मी आवडले तर ?

आपली ही धाकटी बहिण ..”सवत “म्हणून आयुष्यभर उरावर नाचणार ?

तिच्या अशा वागण्याने ,संशयाने सगळे हैराण होऊन गेले , जीजुंचे , आत्या बाईंचे जगणे मुश्कील

होऊन गेले .

माझ्या आत्याबाई आणि माझे जीजू..दोघेही देवमाणसे ..त्यांच्याही लक्षात माझ्या ताईचे माझ्याशी

बदलून गेलेले वागणे लक्षात आले होते .

एक दिवस त्यांनी मला समजावून सांगत म्हटले ..

तुझ्या ताईचे भयंकर वागणे सहन करणे यापुढे सर्वांना अशक्य आहे ..त्यामुळे तू आता इथून

निघून जाण्यात सगळ्यांचे भले असणार आहे .

सोनिया ..तुला आता तुझ्या पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे

..,आम्ही तुझ्या पाठीशी कायम असुत –अडचणीत –संकटात तू एकटी आहेस

असे तुला ,आम्ही कधीच वाटू देणार नाही.

त्यांनी वर्षभर पुरेल इतके पैसे ,बरोबर सामान-सुमान देत त्यांच्या विश्वासू माणूस देऊन ,मला इथे

आणून सोडले .

आणि अशा रीतीने या महानगरीत आले ..

शिकले , नोकरी केली .ऑफिसमधल्या ..मित्राच्या –शैलेशच्या

प्रेमात पडले ..

लगेच लग्न-..एक मुलगा असा संसार सुरु झाला . माझी गाडी रुळावर

आलेली आहे हे पाहून ..माझ्या आत्याबाईंनी समाधाने एके वर्षी कायमचे डोळे मिटले .

आता जीजू ,माझी ताई ..हे मला विसरले नसले तरी .

.त्यांच्या लिस्ट मध्ये मी नाहीये ..हे हळू हळू मला कळाले ,

कारण ,काही झाले तरी ताईच्या संशयाच्या जगात मला पुन्हा प्रवेश नव्हता .

काही दिवस वाईट वाटले .नतर सवय झाली .काही वाटेनासे झाले.

आणि एक दिवस ..असा ही दिवस उजाडला ..जो कधी उजाडू नये असे वाटत असते ..

तो दिवस ..पती- पत्नीत बेबनाव , विसंवाद ,संशय आणि अविश्वास ..

कारण ..पती –पत्नी और वो ..

असे घडले ..

माझ्या नवर्याला मी क्षमा वगेरे करण्याचा प्रश्नच नाही आला

..आम्ही वेगळे झालो ..

पण .आम्हाला एक मुल पण आहे ..त्याचे काय ?

याचा विचार पण मीच करायचा ,माघार घेत ..त्याचे लफडे स्वीकारायचे “ ही त्याची अपेक्षा ..

मग,मात्र मी ठरवले ..आपण रीतसर घटस्फोट घायचा , आणि मुलाला घेऊन राहायचे .

पण, इथे ही त्याने पाचर ठोकली ..

म्हणाला .. मुलगा माझ्याच म्हणजे पतीच्या - त्याब्यात राहील असे लिहून देत असशील तरच मी

तुला घटस्फोट देण्यास तयार आहे. तुझ्या तुटपुंज्या पगारात तुझे जेमतेम भागवले

तरी पुष्कळ झाले ,

त्यात माझ्या मुलाचे कसे होईल ?

त्याचा श्रीमंत बाप .त्याला सांभाळण्यास समर्थ आहे. आणि त्याची नवी आई ..अगदी आनंदाने

माझ्या मुलाची जबाबदारी घेण्यास तयार आहे.

मग,तुला भाव देण्याचा प्रश्नच येत नाही.

गेल्या वर्षा पासून आमचे हे कोर्ट प्रकरण ,चालू आहे..या वर्षी त्याच्या इच्छेप्रमाणे होईल सगळे.

नेहा आणि अनिता –

आता तरी पटले ना तुम्हाला .ही सोनिया आणि तिचे नशीब किती दुर्दैवी

आहे ते ..

नेहा म्हणाली – सोनिया ..तू आत्ताच म्हणालीस ..ऑफिस मधल्या मित्राच्या प्रेमात पडलीस

त्याच्याशी लग्न केलेस ..मग , तुझा नवरा .शैलेश ..

आपल्या ऑफिसात आहे .हे मला माहिती नाही, आणि तू

त्याला कधी भेटल्याचे ,समोर समोर आल्याचे मी पाहिले नाही .

अनिता – म्हणाली .

.आग, ते सोनियाचे सुरुवातीचे ऑफिस होते ..आता नाहीये , तो मात्र आता

त्या ऑफिसमध्ये सिनियर पोस्टवर आहे. आणि त्याची होणारी बायको .त्याच बिल्डींग मधल्या

एका दुसर्या ऑफिसमध्ये आहे .

सोनिया सध्याच्या कंपनीत आली आणि आम्ही एकमेकीच्या कहाण्या ऐकवून ..सम-दुख्ही

मैत्रिणी आहोत हे जाणवले आणि एकमेकींना आधार देत आम्ही सोबत राहतो आहोत.

आता आमच्यात ..तू आलीस ..नेहा ..लिंबू –टिंबू मेम्बर म्हणून.

नेहाला अनिताच्या बोलण्याचे हसू आले .आणि वातावरणात थोडा हलकेपणा आलाय असे वाटावे

म्हणून ती दोघींना म्हणाली ..

अनिता –सोनिया ..तुमच्या मनाने मला तर माझ्या आयुष्यात काही अनुभव आले नाहीत ,

इथे आले तर ..मावशी –काका आणि मधुरिमा यांच्या सहवासात , आणि एकटी राहण्याची

वेळ येते की काय ? या भीतीत होते ..तो ..तुमच्या सावलीत आले..

आता मी बिनधास्त झाले ..

अनिता –सोनिया दोघी एकाच वेळी म्हणाल्या ..

नेहा ..म्हणूनच आम्ही तुला नेहमी म्हणतो ..

आमचे नशीब तुझ्यासारखे नाहीये .......

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी—पुढच्या भागात ..

भाग -२७ वा –लवकरच येत आहे .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------