2 Articals on emotional feelings of ours. books and stories free download online pdf in Marathi

दोन ललित

दोन ललित लेख-

१. लेखनाची अवजारे . २. आठवणींचे महाकाव्य ..आई ..!

----------------------------------------------------------------

१.

लेखनाचीअवजारे

मित्र हो -

प्रत्येक कारागीर माणूस त्याच्या कामासाठी त्याला जी अवजारे लागत असतात ते ठेवण्यासाठी

त्याची एक खास विशेष संदुक असते, पेटी असते ,बॉक्स असतो, धोपटी असते, ब्रीफकेस असते, आणि आता या नव्या

काळाची खुण म्हणता येईल अशी सॅक असते.

ही अवजारे ज्यात असतात त्या बॅग, पेट्या, ऑफिस बॅग ही त्या त्या कारागिरांची ट्रेडमार्क म्हणता येईल अशीओळख असते.

कलावन्त सुद्धा एक कारागीर मानला जातो,

लेखनास पूरक असे जे जे काही, सर्व काही ,

त्याला लेखन अवजारे असे ठळकपणे म्हणणे अधिक योग्य ठरावे.

व्यक्ती तितक्या प्रकृती " असे असल्यामुळे

साहित्यातील कारागिरांची अवजारे ही प्रत्येकाच्या आवडीची, सोयीची ,

लेखन-मुडसाठी ठीक वाटणारी असली तर ही अवजारे त्या त्या कारागिरांची लेखनकृती उत्तम, सुबक साकरून येण्यास उपयोगी ठरतात.

लेखन- बैठक ' ज्याची /त्याची" हा वेगळाच विषय आहे, हा मुद्दा लेखनात असून अडचण-नसून खोळंबा " अशा प्रकारचा आहे.

माझ्यातला कवी, लेखक कधी कधी शेफारून जातो आणि लाडाने वाया गेलेल्या लेकराला ",धपाटा न घालता जसे गोंजारून समजावतो

तसे समजावून, सांगावे लागते-

बाबा रे,

तू लिहीत बसणार आहेस की नाही इथे ?

आज तू घरी नाहीस तुझ्या,

दुसऱ्याकडे आलेला आहेस,

इथे तुला हवी तशी लेखन सोय कशी होईल?

तुझा टेबल, तुझी खुर्ची, तुझी खिडकी ,तीच जागा, जिथे तुझ्याशिवाय कुणी बसायचे नाही",

जास्त नखरे नको करू, लिहायचे तर लिही,

नाही तर मुकाट्याने "ते चिंतन -मनन" काय असते ते करीत बस.

आणि हो, दर घंट्याला चहा-कॉफी नाही मिळणार.

अलीकडे तुझा लेखन मूड फारच त्रासदायक होतोय बरे का,

हे असले तर लेखन सुचते, ते नसले तर हातच चालत नाही,

नुसती भुणभुण करीत असतो-

खुर्ची अशी पाहिजे, कानात इयर फोन पाहिजे,

त्यातून तुझ्या आवडीचे ऐकू आले पाहिजे".

तरी बर , तुझ्या टेबलावर तुझी अवजारे नाहीत असे कधीच होत नाही.

इंटरनेट- वायफायवाले, मोबाईल फुल्ल चार्ज ,,लो बॅटरी होऊन बंद पडला तर काय घ्या ?तुझा लाडका लेखन मूड तुला सोडून जायचा.

पीसी, , कोरे कागद, पूर्ण रिफिल असलेले बॉल पेन , आणि हो तुझी कविता, कथा आलेल्या पेपरची पान, मासिक ,

या सगळ्या गोष्टी "चैत्र गौरीच्या समोर असलेल्या" सजावट सारख्या कायम सजवून ठेवतो बर आम्ही.

याला 'देखावा किती छान " असे म्हणणे जास्त योग्य ,कारण इतके करून , तास न तास बसून

"काय झालं कुणास ठाऊक आज ",!

सगळ्या गोष्टी हाताशी असून, काहीच आलं नाही कागदावर.

असे म्हणून तुझ्या नाराजीचे खापर आमच्या वर फोडणार".

-यावर आम्हीच उलट काही बोलत नाही आताशा तुला ".

कंटाळून जातो रे आम्ही कधी कधी.

वाचक म्हणतात - लेखक -कवी मुडी "

असतात हे आमच्या मनावर ठसलेलेले आहे.

मग, आम्ही त्यांच्या मताचा आदर करीत ,

तुला सहन करीत असतो.

मित्र हो- या नाट्यछटेवरून तुम्हाला

लेखनाच्या नेपथ्याची कल्पना आलीच असेल.

आता थोडं ,सिरियसली होऊन सांगतो-

माझ्या मते लेखनाचे मुख्य अवजार आहे-

आपले भावनिक, संवेदनशील, हळवे, आणि

कलावन्त असलेले "मन ",

हे जर नसेल तर ..लेखन रुक्ष, कोरडे, यांत्रिक,बेजान " होईल,

'मन नावाचे सूक्ष्मतम " अवजार ज्याला लाभले तो

साहित्यिक प्रतिभावान कलावन्त, कारागीर "असतो.

आपल्या बुद्धी "नावाच्या अनेक कप्पे असलेल्या जादुई पेटी मध्ये-

डोळ्यांचे कॅमेरे, कानांचे रेकॉर्डर आणि,

मनाचा सेन्सेटिव्ह रिसिव्हर असतो,

या अवजार-वापरासाठी काय लागते आपल्याला,

समोरचे वास्तव, त्यातला माणूस, भवतलीचा

परिसर, निसर्ग, चराचर सृष्टी '

आणि कल्पना, प्रतिभा " " .

लेखन अवजारात - शब्द" हे महत्वाचे अवजार,

बारीक खिळे, मोठे खिळे, स्क्रू ," सारखे शब्द

फिट करायचे, अचूक बसवायचे, आणि लेखन-चित्र, शब्द-शिल्प " करायचे.

हीच तर लेखन कारागिरी करतो ना आपण

या लेखन- अवजारांच्या मदतीने.

मित्र हो-

माझ्या लेखनासाठी ही अवजारे मी नेहमी

तेल-पाणी करून" तयार ठेवत असतो. या सर्वांच्या सक्रिय वापराने मन हे

मुख्य अवजार पण कधी गंजत नाही",

कुठेही जाओ, कुठेही बसो , बस, लिहावे वाटले,की लगेच-

मन नावाच्या संदुक मधली अवजारे

घेऊन काम सुरू करायचे.

मित्रांनो, या मन-पेटीतील सदा सतेज अवजारांनी मी गेली 35 वर्ष

सुबक -साध्या, वाचकांना भावेल आशा साहित्य कृती करतो आहे.

याची प्रचिती वाचकांच्या प्रतिसादाने येत असते.

लेखन शुभेच्छा

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२.

लेख -

आठवणींचे महाकाव्य ..आई ..!

---------------------------------------------------------------------------------------------

पुरुष आणि स्त्री - या दोन व्यक्तींच्या रुपात निसर्गतः फरक आहे . तसाच तो त्यांच्या मनासिकतेत देखील आहे.

स्त्रीच्या हृदयात वात्सल्य , प्रेम , माया ,जिव्हाळा , क्षमा आणि मूर्तिमंत त्याग , आणि समर्पण " , या सर्व

भावना एकाच वेळी असतात ,आणि स्त्रीच्या रोमारोमात .असते एक "आई - माता ",

या तिच्या रुपात जणू परमेश्वराने स्त्रीचे मंगलमय स्वरूप दर्शन या जगताला घडवलेले आहे.

स्त्रीच्या - आई -स्वरूपातील व्यक्तिमत्वाचे गोडवे , आईची महती , मातृ-प्रेमाचे गौरव -गीत ",

लेखक-कवींनी आपल्या शब्दातून -मुक्तकंठाने वर्णिले आहे ", जे आपण वाचतो, पहातो आणि ऐकत असतो.

आईच्या आठवणी " मनात कायम टवटवीत असतात , त्या कोमेजून जातील ,असे होणार नाही.

मला जाणवले ते असे – की -

स्त्री - आई झाली की अमुलाग्र बदलून जाते , स्वतःच्या अस्तित्वाला तिलांजली देणे "आणि

कायम इतरांसाठी जगणे " हे अवघड कार्य फक्त एक स्त्री आणि आईच " करू शकते .

"आईच्या मायेचा स्पर्श ..एक वैश्विक अद्भुत असा भावनिक अनुभव आहे असे मी म्हणेन ",

राज महालातील आई असो ,

की फुटपाथवरच्या खोपटात चिल्ल्या-पिल्ल्यांना घेऊन राहणारी दगड फोडीत पोट भरणारी श्रमिक आई असो ,

पदर ..जरतारी असो वा चिंध्यांचा असो ,-तो असतो फक्त –एका आईच्या मायेचा पदर , आईच्या प्रेमाचे उबदार पांघरूण.

या लेखाच्या निमित्ताने माझ्या आईच्या आठवणी सांगतो ..

निझामी राजवटीतल्या -मराठवाड्यातील - परभणी जिल्ह्यात .जिंतूर जवळ ..वसा , हे छोटेसे गाव आहे ..

हे आईचे माहेर .

माझ्या आज्जीने ..अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितिशी लढत .. माझ्या दोन मामांना आणि आईला मोठे केले .

ती पिढीच सोशिक आणि चिवट मानसिकतेचे होती .. कोणत्याही परिस्थितीत "हार न मानता "

आयुष्याची लढाई जिंकणारी .माझी आज्जी ..

माझ्या आईची -आई ", ही मी पाहिलेली ,सर्वश्रेठ आई ".आहे.

आईचे माहेरचे नाव - द्वारका , परभणीच्या लोहगावकर देशपांडे घरात ती सुनबाई होऊन आली ..तेव्हा तिची ओळख

रुक्मिणी विठ्ठल देशपांडे अशी झाली . त्याकाळी दुसरी -तिसरी पर्यंतच्या शिकलेल्या या बाईने प्रखर इच्छाशक्तीच्या

बळावर .. कला असो ,संगीत असो ,साहित्य असो या गोष्टी शिकून घेत इतरांना शिकवल्या .

माझे वडील बँकेत ऑफिसर झाले ,मनेजर झाले .. त्यानंतर ..आईसाहेब -म्यानेजरीनबाई कधी झाल्या आम्हाला सुद्धा कळाले नाही.

"पाणी रे पाणी तेरा रंग कैसा ", याप्रमाणे सगळ्यात कमालीच्या सहजतेने मिसळून जाणर्या आईने तिच्या परिवारातील

सगळ्यांना आपलेसे करून घेत ,स्वतःची एक स्वंतंत्र अशी भावनिक -प्रतीसृष्टीच उभारली ज्याची ती तहहयात सम्राज्ञी होती .

रसिक माणसे स्वतहा आनंदी असतात म्हणून इतरांना आनंदी ठवू शकतात , ही गोष्ट,

माझ्या आईच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाने अनुभवली , अनेकांनी

आचरणात आणून स्वतःला आनंदी केले.अशी अनेक माणसे आमच्या परिवारात आहेत.

आम्ही तिचे पाच मुलगे आणि एक मुलगी -- "

तिच्यातील आईला अतिशय सुखावणारी गोष्ट होती . तिचा हा मायाबाजार तिच्या सगळ्या माणसांनी,

लेकांनी -सुनांनी , लेक -जावयांनी ,नातू -नाती -पणतू आणि पणती "यांनी गजबजून गेलेला असे.

तिच्या प्रेमाचा ,मायेचा खजाना सदा खुला होता . पोरे -बाळे सगळे, या आईच्या -आजीच्या प्रेमात अखंड भिजून निघालीत.

आजच्या निमित्ताने नवी कविता -

कविता - आई

---------------------------------

दोन रूपं जरी

एकच रूप यांच

आई आणि बाई

बाई असते आई ..

लहानगी ताई

मोठी झाली की

होते एक बाई

होते लेकरांची आई

घराची अब्रू बाई

दुखः लपवी आई

घराचे सुख बाईत

घरपण ही बाईत

आईत असते

हो एक बाई

बाईच असते

हो एक आई

------------------------------------------------

पूज्य -साने गुरुजींच्या -शामच्या आई " या पुस्तकाने ..आपल्याला ..आईचे " दर्शन घडवले ,.

आपल्या मनाला मानवतेची दृष्टी दिली .

मातृप्रेमाचे लोभस , करुणामयी , शास्वत जीवन-मुल्यांचे -खोलवर असे भावनिक संस्कार होत आले आहेत .

आज आपण पाहतो तसे आधुनिक जीवनमान , मर्यादित कुटुंब साठ- सत्तर वर्षापूर्वी अजिबात नव्हते.

लहान खेड्यात , लहान गावात बहुसंख्य परिवार असायचे . शिकलेले -सावरलेले पुरुषच जिथे कमी ,तिथे

शिक्षण घेतलेल्या स्त्रियांची " ही कल्पना करणे एक दुर्लभ असे स्वप्न होते.

पोरवयातील मुलींचे लग्न व्हायचे , अजाण अबोध अशी बालिका .संसारिक बाई व्हायची आणि या बाईची -आई .झाल्यावर

आयुष्यभर तिच्या हाती ..चूल-भाकरी , आणि पाळण्याची दोरी " यायची.

याच रुपात आयुष्य जगलेल्या अनेक "आई"ला मी खूप जवळून पहिले माझ्या मनात हे रूप पक्के ठसले. ते रूप आजही असेच आहे –

आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याची अविरत धडपड करणारी आई ,आपल्या पोटच्या पोरांना ,स्वतः उपाशी राहून

त्यांना घास भरवणारी आई ",

दारिद्र्यात राहण्याची वेळ नशिबाने आणली तरी , कुणापुढे लाचार न होता ,

मानाने जगणारी आई , आयुष्याची लढाई लढणारी एक मानिनी "आई ".

स्वतःच्या इच्छा , स्वतःची आवड , स्वतःची स्वप्न " मनात खोलवर दडवून ,

कर्त्याबाईचा आणि आईचा "खरा मुखवटा " चढवून

आयुष्यभर ..अपमान ,घोर उपेक्षा , अवहेलना , सोशीत सुख देणारी आई-आणि बाई " आपल्या

अवती-भवती नाहीयेत " ,

असे म्हणू शकतो का ?

विचार करा बरे .

स्त्रीच्या -मातृरुपास ही शब्दांजली अर्पण करतो.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दोन ललित लेख-

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED