प्रेम हे..! - 28 - अंतिम भाग प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम हे..! - 28 - अंतिम भाग

.............. तिने डोळे मिटून घेतले... विहान मात्र कितीतरी वेळ तिला किस करत होता....💋 एवढ्या महिन्यांचा विरह आज संपला होता......!!!

निहिरा विहान च्या स्पर्शाने नखशिखांत मोहरली....!
विहान ने एकदा तिच्याकडे बघितलं.. आणि तिला गच्च मिठी मारली...! त्या मिठी मध्ये प्रेम होतं.. विश्वास होता.. ओढ होती.. विरहात सोसलेल्या यातना होत्या... मनाला झालेल्या वेदना होत्या... निहिरा पर्यंत ते सर्व सर्व पोहोचलं होतं..... त्याच्या मिठीमध्ये ती आज स्वतःला खूप भाग्यवान समजत होती.... त्याने मनात आणलं असतं तर कोणतीही मुलगी त्याच्या मागे पुढे करायला एका पायावर तयार झाली असती...! पण त्याने त्याचा निश्चय ढळू दिला नव्हता... तो इतक्या दिवसांनंतरही निहिराच्याच आठवणींत झुरत होता...
निहिरा ला आज स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चात्ताप होत होता... 😑 तिच्यामुळे तो किती दुखावला गेला होता... पण त्याचं तिच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं...❤️

- - - - - - - XOX - - - - - -

"चल.. रेडी हो.. मी ही चेंज करतो... बाहेर जाऊया..." विहान तिला म्हणाला.. तिने मान हलवली आणि ती तोंड वगैरे धुवून फ्रेश झाली... पर्स मधून पावडर ची डबी काढून आरशासमोर उभं राहून तिने पावडर लावली.. रेड कलर ची लिपस्टिक हलकेच ओठांवर फिरवली.... विहान चेंज करायचं सोडून तिच्याचकडे बघत उभा होता..!! ती तिच्याच तंद्रीत ओठांवर ओठ घासून लिपस्टिक सारखी करण्याचा प्रयत्न करत होती...! मध्येच तिच्या गालाला खळी पडत होती.... 😊.. विहान ला तिच्या या हालचाली खूप मोहक वाटत होत्या.... 😍 तिच्या गोर्‍या वर्णावर ती लाल लिपस्टिक अगदीच खुलून दिसत होती... तिचे ते लालचुटूक ओठ परत आपल्या ओठांमध्ये कैद करण्याचा त्याला मोह होत होता.....! एवढ्यात तिने आरशातून त्याला आपल्याकडे बघताना बघितलं.... त्याच्या डोळ्यांमधला मिश्किल भाव तिला कळला... ती लाजली... 🙈

"हे काय विहान... तू अजून चेंज नाही केलंस.. आपल्याला उशीर होतोय... 😕 चल आवर लवकर.. " म्हणत ती मुद्दामच बाहेर जायला निघाली.. 😅😅

विहान ने तिचा हात पकडला...
"थांब ना माझ्याजवळ....."

"विहान काय हे😃... आवर बघू लवकर..."

"असं वाटतंय तुला मिठीत घेऊन बसून रहावं...😘 सोडूच नये... 😁"

" चल.... काहीही काय🙈... तुला माहितीये.... चंद्रशेखर गोखलेजींनी काय म्हटलंय....? असे बेसावध क्षणच सावधपणे टाळायचे असतात .. जवळ येतानाच दुराव्याचे काही नियम पाळायचे असतात ...😅 "

" हो का... मग त्यांनी तर असं पण म्हटलंय.. मिठी या शब्दात किती मिठास आहे.. नुसता शब्द उच्चारला तरी कृतीचा भास आहे.. 😍 आणि आकृती समोर असताना मिठी मारू नये किती हा त्रास आहे??? ☹️"

" विहान... 😂😂😂 हे कोणी म्हटलंय... "निहिरा जोरजोरात हसत म्हणाली...

" हे मीच म्हटलंय 😒🙄" विहान खोट्या नाराजीच्या आविर्भावात म्हणाला...

निहिरा अजूनही खळखळून हसत होती... 😂😂😂

विहान रोमँटिक होत हळूहळू तिच्या जवळ आला...आणि म्हणाला..
" मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ..... 😍😘"

" नाही विहान... स्टॉप... 😂😂😆😆" म्हणत त्याला दूर लोटून हसत हसतच निहिरा बाहेर हॉल मध्ये पळाली .. विहान ही तिच्याकडे बघून हसला😄 आणि चेंज करायला लागला...

थोड्याच वेळात विहान रेडी होऊन बाहेर आला.. त्याने ब्लू टी-शर्ट, ब्लू जीन्स आणि त्यावर डेनिम चं जॅकेट घातलं होतं... निहिरा एक क्षण त्याला बघतच राहिली.. त्याला बघता बघता सहजच तिच्या मनात आलं.. 'आज कितीतरी मुलींना आम्हाला सोबत बघून माझा हेवा वाटेल.. 😅 विहान आहेच तसा.. कोणालाही आवडेल असाच...!'

"हॅलो.. कुठे हरवलीस??... 😮" विहान च्या आवाजाने ती भानावर आली..

"काही नाही.. चल निघूया..." निहिरा हलकेच हसत म्हणाली.. ☺️

दोघेही घरातून बाहेर पडले... विहान ने पार्किंग मधून कार काढली.. निहिरा ही कार मध्ये बसली.. विहान ने कार त्याच्या आवडत्या गार्डन रेस्टॉरंट कडे वळवली... मस्त रोमँटिक सॉंग्स ची सीडी त्याने प्ले केली... कार चालवताना तो अधून मधून निहिरा कडे बघत होता.. निहिरा ही लाजून त्याच्याकडे बघत होती..

"निहू... आठ दिवसांत मी माझं इकडचं काम आवरून घेतो.. तुझी ट्रेनिंग झाली की आपण सोबतच निघू इथून.."

"ग्रुप लिडर सोबत बोलावं लागेल.... 😐 तिकडच्या ऑफिस मध्ये कळवावं लागेल विहान... तिकडून परमिशन नाही देणार...😒 मी जाईन ना सर्वांसोबत.."

"गप्प बस... तुझ्या सरांचं नाव आणि ऑफिस चा नंबर दे.. डॅडी बोलतील त्यांच्याशी.. ते नक्कीच ओळखत असतील एकमेकांना... "

" वेडा आहेस का.. डॅडींना कशाला त्रास देतोयस तेवढ्यासाठी.. आणि चांगलं वाटतं का ते.... काही नाही.. मी येईन ट्रेन ने सर्वांसोबत.. "

" अज्जिबात नाही.. मी एकटा जाणार नाही.. तुला माझ्यासोबत यावं लागेल.... किती बोअर होईल मला एकट्याला... 😟"

" अच्छा म्हणजे तुला बोअर होईल म्हणून मला सोबत नेतोयस😤😤"

विहान हसला... 😄
" नही मेरी जान... आपसे दूर रहा नही जाता अब....क्या करे 😞....... मी काय म्हणतो.. इथून गेल्या गेल्या लगेच लग्नच करूया का.. इतर फॉर्मलिटीज करायची गरज आहे का काही 🤔🤔"

" विहाssssन.... " निहिरा लटक्या रागात म्हणाली...😅

एवढ्यात गार्डन रेस्टॉरंट आलं.. गाडी पार्किंग मध्ये पार्क करून दोघेही खाली उतरले.. दोघेही हातात हात घालून रेस्टॉरंट मध्ये गेले.. बर्‍याच मोठ्या ग्राऊंड वर गवताच्या लॉन वर टेबल्स मांडले होते... आजूबाजूच्या झाडांवर लाईट्स सोडल्या होत्या...चहूबाजूला लाकडी कुंपण होतं.. सगळीकडे मंद प्रकाशाचे दिवे लावले होते.. त्यामुळे वातावरण रोमँटिक तर वाटतच होते.. शिवाय गर्दी असूनही प्रायव्हसी जाणवत होती... मस्त रोमँटिक गाणी लावलेली होती.. प्रत्येकाच्या टेबल जवळ एक छोटा स्पीकर होता... त्यात भरीस भर म्हणून गुलाबी थंडी!!! 😍

दोघेही येऊन थोडा साईड चा टेबल बघून बसले... मेनु कार्ड बघून दोघांनी जेवणाची ऑर्डर दिली... एकमेकांच्या डोळ्यांत बघत... गप्पांमध्ये हरवत दोघेही जेवले... वेटर एका ट्रे मध्ये कोमट पाण्याचे बाऊल्स आणि लिंबूचे काप घेऊन आला..दोघांनीही हात धुतले आणि वॉशरूम ला जाऊन येते सांगून निहिरा हॉटेल च्या आतल्या बाजूला गेली...

विहान ने बिल मागवलं... थोड्याच वेळात वेटर ट्रे मध्ये बिल घेऊन आला.. बिलासोबत आणखी एक कागद होता... वेटर ने तो त्याच्यासाठीच असल्याचं सांगितलं.... त्याने तो कागद उचलला.... त्यात चंद्रशेखर गोखलेंच्या काही ओळी लिहिल्या होत्या .........

'संगीत जुनंच आहे
सूर नव्याने जुळतायत
मनही काहीसं जुनंच
तेही नवीन तार छेडतायत...❤️'

विहान गालात हसला...
"निहू????!!! " तो स्वतःशीच म्हणाला.. त्याची नजर इकडे तिकडे तिला शोधायला लागली.. पण ती कुठेच दिसत नव्हती..

त्याने बिल पे केलं.. आणि तो तिची वाट बघायला लागला.. परत एक वेटर ट्रे मध्ये एक कागद घेऊन आला... विहान ने तोही कागद घेतला आणि वाचलं...

'तुझ्या हातात सारं काही
माझ्या हातात काहीच नाही..
तुझ्याकडे जीव माझा
माझ्याकडे काहीच नाही....❤️'

विहान चेअर वरुन उठला... आज एवढा वेळ निहिरा त्याच्यासोबत होती... तिला उठून जाऊन फक्त काही मिनिटेच झाली होती.. तरीही तो वेड्यासारखा तिला शोधायला लागला.... ती हॉटेलच्याच एका खांबाच्या मागे लपून त्याच्याकडे बघत होती.. 😅 विहान च्या चेहर्‍यावरचे भाव तिला टिपायचे होते... विहान अजूनही तिला इकडे तिकडे बघत शोधत होता....

तेवढ्यात आणखी एक वेटर त्याच्या समोर येऊन उभा राहिला... विहान ने त्याच्या ट्रे मधला कागद उचलला.. त्यात लिहिलं होतं...

'खफा तुमसे, वफा तुमसे..
देख लेना... एक दिन
निकाह भी तुमसे....! ❤️😜'

"कुठे आहेस तू निहूsss... मला एक क्षण ही रहावत नाहीये तुझ्याशिवाय.... प्लीज समोर ये ना... ☹️" तो कावराबावरा होऊन ओरडला..... आजूबाजूचे लोक वळून वळून त्यांच्याकडे बघायला लागले...

निहिरा खांबाच्या आडून बाहेर आली... तिला समोर बघून विहान ने तिच्या दिशेने धाव घेतली.. आणि तिला उचलून तो गोल फिरला... आणि म्हणाला...
" आय अॅम इगरली वेटींग फॉर दॅट डे..!!! 😍"

🎵❤️🎵❤️
दिल का दरिया बह ही गया
इश्क इबादत बन ही गया..
खुद को मुझे तू सौंप दे
मेरी ज़रुरत तू बन गया..
बात दिल की नज़रों ने की
सच कह रहा तेरी कसम...

तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम
तुझे कितना चाहने लगे हम..
तेरे साथ हो जायेंगे ख़तम
तुझे कितना चाहने लगे हम...!!!

निहिरा लाजली.... बसलेल्यांमधून कितीतरी जणांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.... 👏👏👏 तेव्हा कुठे दोघे भानावर आले... निहिरा ला त्याने खाली उतरवले.. दोघांनीही सर्वांकडे बघून एक स्माईल दिली आणि दोघेही त्या वेटर्स ना थँक्स बोलून बाहेर पडले...

दहा वाजून गेले होते... दोघेही हॉटेल बाहेरच्या आईस्क्रीम स्टॉल वर गेले.. दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यांत बघत आइस्क्रीम खाल्ली... विहान तर एक क्षणही निहिरा ला स्वतःपासून दूर करत नव्हता...!

आईस्क्रीम खाऊन झाल्यावर दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन चालू लागले... थंड वारा सुटला होता.. निहिरा ने आपला स्कार्फ स्वतःभोवती गुंडाळून घेतला.. विहान ने तिला स्वतःचं जॅकेट देऊ केलं पण ती नको म्हणाली...
चालता चालताच दोघेही थांबले... रस्त्यात सहसा कुणी दिसत नव्हतं... विहान ने तिला स्वतःजवळ ओढलं..निहिरा ने त्याच्या डोळ्यांत बघितलं... दोघांच्या हृदयाची स्पंदने वाढली...💗💕 विहान ने आपल्या दोन्ही हातांनी तिच्या कमरेभोवती विळखा घातला... आणि तिच्या नाजूक ओठांचं त्याने दीर्घ चुंबन घेतलं... निहिरा ने ही त्याला प्रतिसाद दिला... बराच वेळ दोघे एकमेकांमध्ये हरवून गेले होते... दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले होते...!!

विहान ने दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरला आणि तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला..
"निहू ss"

"ह्म्म्म...." तिने फक्त हुंकार भरला..

"तुला असं नाही वाटत की तू जास्तच जाड झालीयेस..."

निहिरा ला एक क्षण काहीच कळलं नाही.. ती गोंधळून त्याच्याकडे बघतच राहिली...

"बघ ना माझे हात किती दुखायला लागले तुला उचलून.. 😂😂😂" आणि तो हसत हसत पळायला लागला..

आत्ता कुठे तिच्या लक्षात आलं...
" विहाsssन....👊👊👊 😤😤🤣🤣🤣" म्हणून ओरडत ती त्याच्या मागे पळाली...

दोघेही पळता पळता हसत होते.. 😅😅😂😂

आज कितीतरी दिवसांनी निवि असे खुलून हसले होते.. दोघांच्याही हसण्याचा आवाज हवेमध्ये मिसळला...

दूर कुठेतरी गाण्याचे बोल ऐकू येत होते....

🎵❤️
आज इबादत रूबरू हो गयी
जो मांगी थी
उस दुआ से गुफ्तगू हो गयी..

मेरे मौला.... मेरे मौला
तेरा शुक्रिया.....

दर्द के अंधेरों से आ गए उजालों में
इश्क़ के चरागों का नूर है खयालों में..
नज़रों से तेरी चाक
दिल पे रफू हो गयी... दिल पे रफू हो गयी

मेरे मौला... मेरे मौला
मेरे मौला... मेरे मौला तेरा शुक्रिया.....! ❤️❤️

********समाप्त ********