kadambari premaavin vyarth he jeevan Part 13 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग-१३

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

भाग-१३ वा

-----------------------------------------------------------------------

सक्सेस स्टोरी ऑफ ए कॉमन मैन “ या प्रोजेक्टला स्वतहा सागर देशमुख यांनी परवानगी

दिल्याचे प्रिन्सिपलसरांनी सांगितले म्हणून या गोष्टीवर अनुशाचा विश्वास बसला आणि

तिच्या मनात हे प्रोजेक्ट कसे करायचे ?

याचे विचारचक्र सुरु झाले होते

..पण नेमकी सुरुवात कशी करावी ?

याचा मोठाच गोंधळ तिच्या मनात सुरु झालेला होता .

कॉलेजमध्ये सिनियर फ्रेंड्सना तिने याबद्दल चर्चा केली ,यातून थोडे फार उपयुक्त पडणारे

पोइंटस तिला मिळाले खरे ..पण, तिचे फारसे समाधान होत नव्हते .

हे काम सुरु करयचे तर आपल्याला अभिजितची मदत घ्यावीच लागणार ,आणि तो हे सगळ

ऐकून घेतल्यावर ..नक्कीच काही तरी बोलणार ,

हे असले आगाऊ उपद्व्याप करण्याआधी मला थोडी तरी कल्पना द्यायला हवी होती अनुषा ..!

असे नाराज होऊन म्हणाला तर ?

आपला हा उद्योग त्याला आवडला नाही तर ?

त्याला हे सारे सांगावे की नाही सांगावे ?

अनुषाला नक्की ठरवता येईना .

अभिजितचा लंच टाईम दोन वाजता असतो ..त्याला आज म्हणूया

संध्यकाळी रोजच्या ठिकाणी भेटू या ,

महत्वाचे बोलायचे आहे ..

म्हणजे ..तो काही कारण न सांगता .हो , म्हणेल.

या अशा कल्पनेने अनुषाचे मन जरा सावरले .

तिच्या मनात .करावयाच्या कामाची जुळवाजुळव सुरु झालेली होतीच ..हे सर्व कागदावर

उतरवल्याशिवाय तिला बरे वाटणार नव्हते .

एक नवे कोरे मोठे रजिस्टर .अनुशाने टेबलावर आणूनच ठेवले होते . ते उघडीत त्यावर

आपल्या नियोजित .उपक्रमाचे ..नाव लिहिले .. माझा जीवन प्रवास –आत्मकथन “-सागर देशमुख

त्याला -सक्सेस स्टोरी ऑफ ए कॉमन मैन- सागर देशमुख “ असे इंग्लीश टायटल दिले.

तिने डोळे मिटून मनोमन देवाची प्रार्थना करतांना म्हटले ..

हे कार्य सफल संपूर्ण होऊ दे देवा .. !

अभिजित आणि त्याच्या घरातील ..हरवलेले ..प्रेम ,दुरावलेली माणसे , त्यांचा आनंद

सारे काही ..माझ्या या प्रयत्नाने परत येऊ द्यावे..

हा उपक्रम –हे कार्य ..त्यासाठीचे एक छान निमित्त म्हणून मी हाती घेतलेले आहे.

आणि अनुशाने ..आता या पुढे ..काय काय करायचे आहे ?

त्याची क्रमवारी लिहून काढली ..आणि आपल्या मनाने जे ठरवलेले आहे .ते पूर्ण करण्याचा

अक्षर –श्रीगणेशा केला .

सागार देशमुख ..या व्यक्तीला तिने अजून पर्यंत पाहिलेले नव्हते ..

आणि

अनुषा नावाच्या या मुलीला त्यांनी कधी पाहिले असण्याची शक्यता नव्हती ..

फक्त एक शक्यता होती ..ती म्हणजे ..

टीवी वरच्या मुलाखती , पेपर आणि मासिकातून तिने घेतलेल्या मुलाखती त्यांच्या पहाण्यात

आणि वाचण्यात आल्या असतील तर मात्र ..

आपल्याला पाहिल्यावर - आपल्या बद्दल थोडीफार माहिते आहे असे ते म्हणू शकतात .

पण,याची शक्यता फार जवळपास नाहीच ..असे अनुशाला वाटत होते ..

कारण ..इतका मोठा माणूस ..अनुषा सारख्या मिडिया मधील विद्यार्थी पत्रकारास ओळखतो “,

असे बोलून दाखवणे , सहजशक्य नव्हते .

हे काम पूर्ण होई पर्यंत ..अभिजित आणि आपल्या मैत्रीबद्दल या सागर देशमुखांना काहीच

समजू द्यायचे नाही “ याची पुरेपूर काळजी घ्यावी लागणार होती .

चुकून जरी ही गोष्ट सागर देशमुख यांना समजली ..तर ..

इथून त्याच क्षणी आपली हकालपट्टी होईल ..”

याची जाणीव अनुशाला पदोपदी ठेवावी लागणार होती.

एरव्ही ..सामान्य परिस्थिती असती तर ..म्हणजे ..अनुषा आणि अभिजित यांची मैत्री नसती

तर ..

हे प्रोजेक्ट साधी सरळ कामगिरी झाली असती .

अनुशा मनाशी म्हणाली –

हे प्रोजेक्ट करण्याचे खरे कारणच ..मुळी.

आपली आणि अभी ची मैत्री ,त्याच्याशी असलेलेले आपलेप्रेमाचे नाते आहे.

या नात्यानेच तर आपल्याला प्रेरणा दिली आहे ..की ..

अभिच्या ..”प्रेमालय “घरात . खऱ्या अर्थाने ..पुन्हा प्रेम ..आले पाहिजे ..

सागर देशमुख यांना ..जाणवून द्यायचे आहे की ..

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

फोनची रिंगटोन वाजली .

.अरेच्या ..!

अभिचा फोन ..!

बरे झाले .आपला फोन करण्याचे वाचले ..

अनुशाने फोन कानाला लावत..म्हटले ..

बोल ,अभी , तुझा कॉल ,असा अचानक ?

ठीक आहे ना रे सगळ ?

ऐक अनुषा , मी ऑफिसमधून निघतो आहे ,तुझ्या घराच्या गेट बाहेर येऊन कार थांबवतो ,

तू पटकन बाहेर ये ..आपल्याला ..माझ्या ताईकडे जायचे आहे..

काळजीचे कारण नाहीये ,.

.पण..मला तुझी मदत लागणार आहे आज.

ताईकडे जातांना रस्त्यात सांगतो तुला ..काय कारण आहे ते ..

लवकर रेडी हो ..दहा मिनिटात ..माझी गाडी तुझ्या गेट समोर असेल.

बाय ..

हे काय नवीन ? अनुषा विचार करू लागली ..

फोनवर बोलताना अभिचा आवाज नॉर्मलच होता , म्हणजे सिरीयस असे काही नाहीये

हे तर पक्के ..

अभिने सांगितले आहे..म्हणजे त्याला “मी येऊ शकत नाही” ,असे बोलण्याचा प्रश्नच नव्हता .

अभिच्या ताईला .तिने अजून पाहिले नव्हते ..आणि अभिने आपल्याबद्दल त्याच्या ताईला

काही सांगितले आहे की नाही ? याची कल्पना नव्हती .

पण, ज्या अर्थी आज अभी आपल्याला सोबत घेतो आहे ,म्हणजे ..थोडीफार कल्पना तर नक्कीच

दिलेली असणार , त्याशिवाय अभी असा त्याच्या ताईकडे आपल्याला सोबत घेऊन जाणार नाहीये .

ताईकडे जायचे आहे म्हणजे .., आता ड्रेस की साडी ? कारण जीन विथ top..

त्यांच्या घरी पहिल्यांदा ,सिम्पल दिसेल असेच आपण तयार व्हावे हे बरे

असे वाटून ..शेवटी .लाईट कलरचा ड्रेस आणि त्यावर शोभणारा दुपट्टा ..हे ठीक ..असे ठरवून

अनुषा रेडी झाली .

गाडीचा हॉर्न वाजला ..तिने खिडकीतून बाहेर पाहिले ..अभिची कार बाहेर उभी होती .

घरात आईला सांगून ..अनुषा बाहेर आली..

गेट लावून घेत ..कार जवळ उभी राहिली .

फिक्या यलो कलरचा पंजाबी ड्रेस ..त्यवर लाल रंगाची ओढणी ..!

अभी त्याच्या सुंदर अनुशाकडे पाहतच राहिला ..

अभिच्या नजरेतील आनंदाने ..तिचा ड्रेस त्याला खूप आवडलाय “याची तिला पावती मिळाली .

कारचा दरवाजा उघडीत ..समोरच्या सीटवर ..त्याच्या शेजारी बसत अनुशाला म्हणाली ..

तुझ्या ताईकडे पहिल्यांदा घेऊन जातो आहेस ..

म्हटले .एकदम जीन वगेरे नकोच ..म्हणून

अशी साधीसुधी रेडी झाले बघ. पण कलर तुझ्या आवडीचाच ..हवा

हे लक्षात ठेवले बरे का !

ग्रेट ..तू पक्की मनकवडी आहेस अनुषा .

तू मला कशी दिसायला आवडतेस ?

हे तुला आता मी सांगण्याची गरजच राहिली नाहीये.

आणि खरे सांगू का .

.आपले प्रेमाचे माणूस नजरे समोर आले की ते सुंदर दिसते

आणि तू तर अशी सुंदर आहेस आणि तशी ही सुंदरच आहेस..

अभिच्या नजरेत चमक आणि आवाजतला गोडवा ..अनुशाला सुखावून गेला .

तिने विचारले ..पण काय रे अभी ..

आज दिवसा ..या वेळी ऑफिस सोडून ताईकडे निघालोत ,त्यात तुझ्या सोबत मी .

मला सांग तरी ..नेमके काय आहे..आपण दोघे मिळून ..ताईकडे जाण्याचे ?

तू सांगितलेस तर माझे टेन्शन कमी होईल अभी ...

ऐक तर मग अनुषा .अभी सांगू लागला ..

आज माझ्या ताईचा वाढदिवस तर आहेच ..

शिवाय ..ताई आणि जीजुंच्या लग्नाचा वाढदिवस आहे..

सो, मी ठरवलंय ..ताईला ..तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ..एक छान गिफ्ट द्यायची .

तुझ्या आणि माझ्या मैत्रीची ..आणि आपल्या होणार्या नात्याबद्दल तिला सांगायचे आहे..

माझी निवड कशी आहे ?

ताई कडून ऐकण्यास मी खूप आतुरलो आहे.

हे ऐकून ..अनुषा ..एकदम अचंबित झाली ..आणि तिला आनंद ही झाला ,

पण ती म्हणाली ..

अरे अभी ..आपले ठरले होते ना ..की मी माझ्या मनात जे ठरवले आहे ,ते पूर्ण झाल्यावर

आपण सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल सांगणार आहोत ..

मग, हे मध्येच ..तू कसे काय ठरवले आहेस ..ताईंना सांगायचे ?

अभी म्हणाला ..

ताईला ..आणि जीजूना हे सांगणे .आपल्यासाठी योग्य आहे ,

त्याच बरोबर ..तू जे काय ठरवले आहेस..

.त्यात ताईची मदत झाली तर .छानच होईल ना .!

हे ऐकून ..अनुषा म्हणाली ..

ग्रेट ..!

अभी हे तर आपोआपच माझ्यासाठी खूप महत्वाचे आणि सोयीचे होणार असेच आहे की .

ऐक तर ...

आज मी पण एक सरप्राईज देईन सगळ्यांना .

मी तसे तर इतक्यात नव्हते सांगणार ,

पण, आता ही योग्य वेळ आहे सांगण्यासाठी .

अभी म्हणाला , मला आता संग, तू काय करणार आहेस ते, मला पण उत्सुकता आहे ऐकण्याची .

अनुषा त्याला म्हणाली

नो ,आता नाही अभी ..ताईकडे जाईपर्यंत तुझी उत्सुकता तशीच राहू दे.

बरे, एक सांग ..ताईंचा वाढदिवस आहे , त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ,मग, त्यांच्यासाठी

काही गिफ्ट वगेरे घेतलीस ..की घायची राहिली ?

अभी म्हणाला ..ते सगळे राहिलंय ,आता जाता जाता आपण काही छान गिफ्ट घेऊ या

तुझ्या आवडीने .

अनुषा म्हणाली ..

एक सजेशन देऊ का अभी ..

हो दे की ..तू जरूर तुझ्या आयडीया सांग ..

अभी, मला वाटते ..

ताईसाठी छान सिल्क साडी , जीजू साठी झब्बा –कुर्ता तर घेऊ या ..

पण त्यांच्या संस्थेला आपल्या तर्फे ..अकरा हजार देणगी म्हणून दिलीस तर

मला ते जास्त आवडेल.

अभी अनुशाकडे पाहत म्हणाला ..

क्या बात है..इतक्या छान सूचनेला ,नाही म्हणे शक्यच नाही.

आपण हे जरूर करू या .

अनुषा .किती छान विचार करतेस ग तू नेहमी ..

तुझे हे भावनिक रूप पाहिले की .मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.

लव्ह यु डियर ..!

अरे ओ ..मेरे मजनू ..राजा ..आता जास्त रोमान्स मूड मध्ये येऊन उपयोग नाही.

खूप कामे आहात आपल्याला . बघ ते मार्केट आलाय .

ताई आणि जीजूसाठी गिफ्ट घेऊ या.

झटपट गिफ्ट खरेदी करून झाली ,सोबत मिठाई –बॉक्स पण घेतले ..

अभिजित ..अनुशाच्या लगबगीकडे पहात होता ..प्रत्येक गोष्ट मनापासून आणि

आपलेपणाने करण्याची तिची सवय किती छान आहे.

अनुषामुलळे आपल्या आयुष्यात आता सुखाचे दिवस आपणहून आनंदाने येण्यास तयार होतील

असा विश्वास त्याला वाटू लागला .

ताईचे घर येताच ..अभिने गाडी उभी केली ,त्याला आलेला पाहतच .ताई आश्चर्याने दरवाजात

येऊन उभी राहिली .

आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या सुंदर तरुणीला पाहून तिला कळेना .

.ही कोण येते आहे बरे ?

अभी आणि अनुषा आत येऊन बसले ..

ताईने काही विचारण्याच्या आत .

अभी म्हणाला ..

ताई ..तुझ्यासाठी माझ्याकडून हे बर्थ डे- सरप्राईज..

तुझी पसंदी सांग ..मग ,हे आपल्याकडेच कायमचे असणार आहे.

अरे वा –असे आहे काय ..चोरीचा मामला ..!

.ताईने अनुशाला जवळ बसवून घेत म्हटले –

अभी ..थांक्यू रे.. तुझी गिफ्ट सर्वांना आवडेल अशीच आहे

..सुंदर ..नाजूक ..देखणी ..!

चहा –फराळ राउंड सुरु झाला .

अभिने अनुशाब्द्दल आणि त्या दोघांच्या नात्याबद्दल सांगत .ताईला म्हटले ..

ताई ..तुझ्या आशीर्वादाने हे सगळं पार पडू दे , जीजू पण आमच्या पाठीशी असतीलच .

अभी आणि अनुषा .तुम्ही दोघे ही ..निर्धात रहा ..

तुम्हारी जोडी सलामत रहेगी ..

अनुषा म्हणाली ..

ताई आणि अभी ..

आता मी काय सांगते नीट ऐका .आणि मला समजून घेत ..

यासाठी माझ्यासोबत भक्कम आधार होऊन उभे रहा ..

त्या दोघांना काहीच कळेना ..अनुषा असे खूप काही वेगळे असे काय सांगणार आहे ?

ताई म्हणाली .अनुषा ..तू सांग तर खरे ..

हो ताई ..सांगते ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचू या पुढच्या भागात ..

भाग -१४ वा लवकरच येतो आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी .प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED