कादंबरी- जिवलगा ...भाग-२९ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा ...भाग-२९ वा

कादंबरी – जिवलगा ..

भाग -२९ वा

---------------------------------------------------------

मधुरिमादीदी सतत आपल्याबद्दल किती विचार करीत असते ,हे नेहाला अनिता

आणि सोनियाने सांगितल्याने कळाले . या अशा गोष्टी मनात आपलेपणाची भावना

असल्याशिवाय होत नसतात . आणि मावशीकडे आल्यापासून नेहाला दीदीच्या

स्वभातील आपलेपणाचा हा गुण सतत जाणवत असायचा .

कदाचित .दीदीला स्वतःला नात्यातील कुणाकडून कधीच काही मिळाले नाही ,म्हणून

आता ती सतत सगळ्यांसाठी काही न काही करण्याची मनापासून धडपड करीत असते .

आता जरी परदेशात गेलीय ती पण तिचे लक्ष इकडेच असते .

नेहाला गंमत वाटली की..

दीदीला वाटत असते नेहाला तिचा एक छान मित्र मिळाला पाहिजे ,

आणि या भावनेतून दिदींनी विचारपूर्वकच आपल्याला नव्या सेक्शनमध्ये प्रमोशनवर पाठवले आहे.

आपला बॉस- हेमू पांडे ,आपल्यासाठी त्यांनीच निवडला आहे आणि त्याला समजून घेता यावे ,

जाणून घेता यावे म्हणून डायरेक्ट त्याच्याच सहवासात पाठवून दिले .

दीदीला माहिती आहे ..ही नेहा सहज सहजी ..कुणाच्या प्रेमात-बिमात पडणार नाही ..

आपणच थोडी बळजबरी केली तरच या पोरीचे मन बदलू शकेल .

आणि तिच्या या मोहिमेत ..अनिता आणि सोनिया या दोघींपण सामील झाल्या आहेत .

या तिघींच्या भावना त्यामागचा हेतू वाईट मुळीच नाहीये ..म्हणूनच आपल्याला त्यांचा

राग आलेला नाहीये हे पण तितकेच खरे आहे. या तिघी आपल्यासाठी काही ना काही

करण्यात आनंद आहे असे मानीत असतात .

आज ऑफिसला जाताना ..नेहाला आठवू लागले ..की ..आपल्याला इथे मुद्दाम पाठवले

आहे ..ते आपला बॉस असलेल्या हेमकांत पांडेच्या सहवासात यावे म्हणून .

या तिघीजणींची कल्पना आहे,त्यांना अंदाज आहे ..की .

या सततच्या सहवासाने आमच्या दोघात नक्की काही तरी सुरु होईल ..म्हणजे एकमेकाविषयी प्रेम “

अशा अपेक्षा ठरवून कशा पूर्ण होतील ?

सहवासाने प्रेमच जुळून येईल असे कसे होईल ?

फार फार तर .सहवासाने एकमेकांना आपलेपणा वाटू शकतो ,

एक छान मैत्रीचे नाते होऊ शकते .पण एकदम ..प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम ?

हे कसे शक्य आहे ?

आणि त्यात भर म्हणजे ..

आपल्याकडून अपेक्षित प्रतिसाद अजिबात मिळणार नाहीये ..याची कल्पना मधुरिमादीदीला

तर नक्कीच आहे ..म्हणूनच सोनिया आणि अनिता या दोघींना तिने आपल्या या योजनेत सामील

करून घेतले आहे हे नक्की .

आता एकेक लक्षात येते आहे ..की या सगळ्यांनी मिळून केलेला -

हा एक पद्धतशीर गेम-प्लान आहे फक्त आपण एकटेच असे आहोत

..जिला यातले काहीही माहिती नाहीये.

पण -मधुरिमादिदीचा हा प्लान हेमू पांडेला मात्र पूर्ण माहिती आहे..म्हणून तो समोर जास्त बसत नाहीये ,

नजरेला नजर देत बोलत नाहीये ..!आणि डायरेक्ट बोलायला घाबरतो ..दुसर्याच विषयावर गाडी वळवतो .

हे असे का होते ?

त्यामागचे खरे कारण काय आहे त्याच्या असे वागण्याचे ..?

हे आज आपल्याला कळले आहे .

काय कम्माल आहे ..एक से बढ के एक ..बदमाश आहेत सगळे !

पण आज आणि इथून पुढे ऑफिसमध्ये गेल्यावर एकमेकांच्या समोर बसल्यावर काय होईल आपली स्थिती ?

इतके दिवस कोऱ्या मनाचे होतो आपण .

आणि आज माहिती झाले आहे ..की आपल्या समोर असणार्या हेमू पांडेच्या मनात

आपल्या विषयी एक खास भावना आहे ..आणि त्याला

अजून आपल्या कडून काहीच प्रतिसाद नाहीये ..म्हणून कदाचित हे महाराज ..त्याचे “प्रेम”

जाहीर होऊ देत नाहीत

नेहाच्या मनात गोंधळ सुरु झाला होता ..

म्हणजे ..हेमू पांडेला माहिती आहे ..की .

.मधुरिमादीदीने ..आपल्याला आवडू शकेल अशी एक मुलगी आपली सहकारी म्हणून पाठवली आहे

आणि तो त्याच नजरेतून आपल्याकडे पाहत असेल का ?

काय विचार करीत असेल आपल्याला पाहून ?

नेहाच्या मनात हेमू पांडेचे विचार सुरु झाले होते ..तिच्याही न कळत ...

गेले काही दिवस दोघे सतत सोबत असतो आपण..

भले ही संवाद नसेल आपल्यात ,पण ..त्याच्या मनात तर नक्की काही सुरु असेल का आपल्या बद्दल ?

हा सगळा गोंधळ ..नेहाला खूप काही वेगळा आहे असे वाटू लागले ..

आणि तिच्या मनाने तिला विचारले ..

नेहा ..मधुरिमादिदीचा प्लान , सोनिया आणि अनिताचे यात सामील असणे ..

हेमू पांडेने मोकळेपणाने सांगून सुद्धा टाकले आहे ..-

त्याला नेहा आवडते ..फक्त तुझा प्रतिसाद हवा आहे, जो अजिबातच नाहीये ..

म्हणून तो सोनियाला म्हणतोय की -

मी तर कधी ही बोलायला तयार आहे नेहाशी ,

पण, तिला नाही आवडले तर ..?

उगीच ऑफिसच्या कामात घोळ व्हायला नको ..!

म्हणजे बघा –

या सगळ्यांना सगळं माहिती आहे ..फक्त तुला एकटीला हे माहिती नाहीये ..नेहा हे !

आता तर कळाले आहे ना ?

मग,सांग नेहा

..तुला हेमू पांडे कसा वाटतो ? बॉस म्हणून नाही,

तर एक मित्र म्हणून ..ज्याच्या मैत्रीत प्रेमाचे धागे जुळावे ..

नेहाने आपल्या मनाला दटावले – चुप्प ..आता काही बोलायचे नाही.

थांब थोडे दिवस.

नेहा आठवू लागली ..गेल्या काही दिवसातले काम करतांना तिच्यात आणि हेमू पांडेत

झालेले बोलणे ..ज्यातून त्याच्या मनात आपल्याबद्दल काही असेल ..ते त्यने सांगण्याचा

प्रयत्न केला असेल ..पण,

आपणच त्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता ,

आपल्या मनात ..हेमू पांडे म्हणजे फक्त आपला बॉस “ ही ऑफिसची इमेज होती .

पण आता ती त्याच्या बोलण्याचा अर्थ उलगडू शकेल का या प्रश्नात बुडून गेली ...

यस.. नेहाला एकच काय अनेक प्रसंग आठवू लागले ..

ज्यात हेमू पांडे स्वतहा पुढाकार घेऊन ..नेहाचा सहवास जास्तीत घडवा याचा प्रयत्न करीत होता ,

आणि आपण तितक्याच निर्विकारपणे त्याकडे दुर्लक्ष करीत होतो ..कारण ..

त्याच्या मनात काही सुरु आहे” याचा आपल्याला पत्ताच नव्हता .

एकदा असेच झाले ..

त्यादिवशी .. सिस्टम ऑपरेशन , संबंधित एक अर्जंट सेमिनार सिटी मधल्या एका फेमस

हॉटेल मध्ये होते . नेहाच्या कंपनीतर्फे ..हेमू पांडेसोबत आणखी एक ऑफिसरने जाणे आवश्यक

होते . मोठ्या बॉसने हेमू पांडेवर हे सोपवले ..

तू तुझ्या सेक्शन मधल्या तुला योग्य वाटणार्या कलीगला सोबत घेण जाऊ शकतो .

हे ऐकताच हेमू पांडेने तत्परतेने ..नेहाचे नाव सुचवत म्हटले ..

नेहा मैडम सिस्टीम ऑफिसर म्हणून नव्यानेच या सेक्शनला आल्या आहेत ,

सध्या त्यांचा कलीग -कम -बॉस मीच आहे ,सो ,त्यांना तुम्ही परमीट केले तर बरे होईल सर जी.

नव्या आलेल्या ऑफिसरला हे सेमिनार सर्वार्थाने उपयोगाचे आणि महत्वाचे होते “,त्यामुळे मोठ्या बॉसनी

हेमू पांडेच्या सूचनेला तत्काळ समती दिली .

मिटिंग झाल्यावर ..हेमू पांडे ..नेहाच्या समोर बसत म्हणाला ..

मैडम- उद्या एक महत्वाचे सेमिनार आपल्या दोघांना अटेंड करायचे आहे ..

माझ्या सोबत तुम्हीच असावे “

म्हणून मोठ्या बॉसला खूप रिक्वेस्ट करावी लागली ..तेव्हा कुठे त्यांनी परमिशन दिली .

आय एम सो हैप्पी ..उद्याचे सेमिनार खूप छान असेल ..बघाच ..!

त्या दिवशी रात्री कधी नव्हे तो सोनिया आणि अनिताने ..नेहाला ,तिने सेमिनारला कसे जायचे या बद्दल ,

आणि तयार होण्याबद्दल जरा जास्तच सूचना केल्या होत्या ..

हे नेहाला आता आठवू लागले ..

तरीच .. त्या दोघी म्हणत होत्या ..

नेहा ओपन सेमिनार आहे मस्त .. ऑफिस नियम ,ड्रेस कोड अजिबात नाहीत ..

अगदी हसत खेळत सहभागी हो सेमिनार मध्ये .

तुझ्या बॉसला –हेमू पांडेला मस्त कंपनी दे.

नेहमी नेहमी असे चान्स येत नाहीत ..

इतके म्हणून थांबल्या नव्हत्या ..तर

फिका गुलाबी ड्रेस ..त्यावरचा त्याच रंगाचा डार्क स्टोल ..असे तयार व्हायला लावले होते .

नेहा त्या प्रमाणे तयार होऊन ऑफिसला गेली.

सेमिनारला निघता निघता ....ड्रायव्हरला ऐकू जाणार नाही अशा

हळू आवाजात ..कारचा मागचा दरवाजा उघडीत हेमू पांडे तिला म्हणाले होते ....

नेहा मैडम- यु आर लुकिंग चार्मिंग ..ब्युटीफुल ..!

सो वंडरफुल .हा कलर माझ्या अतिशय आवडीचा आहे.

अनपेक्षितपणे त्यांची ही कॉम्प्लिमेंट ऐकून ..नेहाने आश्चर्याने हेमू पांडेकडे पाहिले फक्त .

ती बोलली काहीच नाही..

दरवाजा बंद केल्यावर हेमू पांडे समोरच्या सीटवर बसले ..पण.समोरच्या आरश्यातून

ते सतत आपल्याकडे पहात आहेत ..हे नेहाला जाणवत होते .

म्हणजे ..हेमू पांडेनी त्या दोघींना चक्क सांगितले होते की..

नेहाने त्यांच्या आवडीच्या कलरच्या ड्रेस मध्ये यावे .

सोनिया आणि अनिता ...पक्क्या बदमाश आहात हं.तुम्ही दोघी ..बघतेच तुमच्याकडे आता .

नेहाला हे आठवले आणि ती स्वतःशी खुदकन हसली ..आहे..

हे जाणवले तिचे तिला ..आज पहिल्यांदा ...!

तिला आठवू लागले ..

नंतर सेमिनारच्या लंच मध्ये तर अजून मज्जा झाली .

नेहाला हेमू पांडेचा नाराज चेहेरा आठवला ..

अरेच्च्या असे झाले होते का ?

त्याचे कारण आत्ता कळाले नेहाला ..!

मोठ्या बुफे हॉलमध्ये लंच व्ययस्था होती ..एकदम बढीया लंच होता .

सेमिनार सेशन ला पुरुष आणि स्त्रिया संख्येने जवळपास सारखेच होते . आपपल्या डीश घेऊन

कुणी ग्रुप करून गप्पा करीत लंच घेऊ लागले . काही सिनियर जेन्ट्स , लेडीज यांनी टेबल-खुर्ची

पाहून बसून लंच घेण्यास सुरुवात केली .

नेहाने ..हेमू पांडेला जेन्ट्स क्यू मध्ये जायचे खुणावले ..आणि स्वतहा लेडीज क्यू मध्ये उभी राहिली ,

आणि भरलेली डीश घेऊन सिनियर लेडीज बसल्या होत्या त्यातल्या एका चेअरवर जाऊन बसली ,

आणि त्या बायकांशी बोलता बोलता लंच करू लागली ..

हेमू पांडेंनी ..दोन डीश भरून घेतल्या आणि एका कोपर्यातल्या दोन खुर्च्या टेबलची जागा पाहून

बसल्यावर ..त्यांची नजर नेहाचा शोध घेऊ लागली ..!

ते तिला आवाज देणार होते ..त्यांच्या शेजारी येऊन बसण्यासाठी .

पण ..हाय रे ! त्यांचे लक अजिबातच चांगले नव्हते ..

नेहा इतर लेडीज सोबत मस्त गप्पा करीत लंच करतांना दिसली ..

तसा हेमू पांडेचा मूड पार गेला ..!

त्यांना वाटले होते ..आज इथे फक्त ते आणि नेहा ..मनासारखे ,मनातले बोलता येईल ..!

छे ! ही नेहा पण न ..काही म्हणजे काही समजत नाहीये या पोरीला ..!

तेच एखादी पोरीगी ..असा चान्स मिळाला असतात तर ..या हेमू पांडेचा फालुदा केला असता ..

आणि ही नेहा ..काय म्हणावे आता हिला !

कधी समजेल या मुलीला कुणास ठाऊक ?

अनिता आणि सोनियाला सांगितले पाहिजे ..

ये वेड्या मुलीला ..प्रेमाची ट्रेनिंगच द्या ..नाही तर माझे काही खरे नाही.

एकूणच उरलेल्या सेमिनार मध्ये हेमू पांडे न बोलताच तिच्या सोबत होते .

नेहा न बोलणारी .आणि नेहाच्या ना –समझीमुळे हेमू पांडेचा मूड-ऑफ झालेला .

हे जसेच्या तसे आठवले नेहाला .

ती मनाशीच म्हणाली ..

त्या दिवशीच्या नाराजीचे कारण ..असे होते तर .

कधी नव्हे ते नेहाला स्वताचा पहिल्यांदा राग आला ..!

कसे व्हावे आपले ?

ती मनाशी म्हणाली ..

हेमू पांडेची नाराजी ..दूर करावीच लागेल ..

त्यांच्या आवडीचा तोच ड्रेस घालून त्यांच्या समोर गेल्यावर नक्कीच खुश होतील माझे बॉस !

दुसर्याच क्षणाला तिला जाणवले ..

हेमू पांडेला ..ती ..आज “माझे बॉस “ म्हणाली आहे ..

ही सुरुवात म्हण्यची का नेहा ?

--------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात ..

भाग – ३० वा लवकरच येतो आहे ..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी .. जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------