भाग १६
विशाखा घरी आली तसं काका तीच्या मागे - पुढे करत होता. ती घरात येऊन चावी जागेवर ठेवुन बसेपर्यंत त्याने तीच्यासमोर प्रश्नावली उघडली होती.
काय झालं ?? काय म्हणले तुला ते ?? तु त्यांच्या बोलण्याच टेन्शन नाही घेतलं ना ?? आणि निघाली तर मगाशीच होती मग किती वेळ लावला ?? कुठे होती एवढा वेळ ?? सांगितलं होतं ना नको जाऊ तरी का नाही ऐकलं माझं ?? मी कधीचा फोन करत होतो, उचलला का नाही ?? सायलीचे पण फोन नाही उचलले तु. ठीक आहेस ना तु ??
" का.....का..... " एकदम मोठा सुर लावत विशाखा म्हणाली.
" मी ठीक आहे पण आता तु अजुन एक जरी प्रश्न विचारला तर मात्र आजारी पडेल मी 😱. किती ते प्रश्न. जरा दम खा "
" इथं मी एवढी काळजी करतोय आणि तु मस्करी करत माझी 😒. किंमतच नाही राव माझी "
" ओह माझी ड्रामाक्वीन " अस म्हणतं विशाखा ने काकांचे गाल ओढले.
" मी क्वीन 😯😲 "
" हां माझी लाडाची क्वीन " असं म्हणुन परत त्याचे गाल ओढुन विशाखा आत झोपायली गेली आणि काका थक्कच झाला.
ही अशी काय वागतीये, गाल काय ओढतीये माझे, चक्क क्वीन म्हणाली मला 😯, येताना डोक्यावर नाही ना पडली ही. काहीच कळत नाही बाबा हिच. काका तीचा विचार करत करत झोपायला गेला.
परत रोजच रूटीन सुरू झालं. विशाखा आणि तीच हॉस्पिटल. सायलीने आता फोन नाही केला तरी विशाखा चिडत नव्हती.
आणि आता तर काका आणि सायली ने मिळुन नवीनच काहीतरी सुरू केलं होतं. ती घरी आली की तीच्या समोर मुद्दाम लग्नाचं बोलणं, तीला लग्नाचं महत्व पटवुन देण न. हे काय कमी होत की काकाने तीला जेवण बनवायला शिक म्हणून डोकं खायला सुरुवात केली.
आख्खा आठवडा कामात आणि ह्या दोघांच्या डोक खाण्यात कस जायचा ते कळलच नाही.
विशाखा हॉस्पिटलला निघाली तसं जाताना काका म्हणाला,
" आज घरी लवकर ये काय ... "
" का ?? आज काय आहे 🙄 " विशाखा ने हातात घड्याळ घालता घालता विचारलं.
" शनिवार आहे ना म्हणून "
" म्हणून मी लवकर यायचं. हे काय लॉजिक आहे 😒 "
" अरे जरा घरी पण रहाव ना. सारखं काय ते पेशंट आणि तो गोळ्यांचा वास 🥴. "
" ओह मला आवडत ते. atleast तिथे कोण तुला स्वयंपाक येतो का बनवायला असं नाही विचारत. 😁 "
" तु मस्करीच कर माझी 😡😡 "
" आता तुझी नाही तर काय त्या सायलीच्या पप्पाची करू 😁 "
" हां म्हणजे परत त्यांचा ओरडा ऐकुन रडत बसायला का 😏🤭 "
" ए मी रडत नाही हां 😠. तो पण रडकी म्हणतो तु पण आता तेच म्हणं. "
" तो , तो कोण ?? 🤨 "
" तोच तो मुलगा. आधी अकडु म्हणायचा आणि त्या दिवशी रडकी म्हणाला. 😣 "
" ओह मुलगा 🤨🧐. कोण गं मुलगा 🤔 "
" कोण नाही. मी निघते. " घाईघाईत आपण फुटलो हे बघुन ती पळ काढायला निघाली तेवढ्यात मागुन सायली आली.
" कोण मुलगा हां. काका जीजु आणला वाटत आपल्यासाठी 🤪 " सायली ने काकांकडे बघत डोळा मारला.
" एक मिनिट, जीजु तुझ्यासाठी, माझा तर जावई आहे तो 😍😍. " काकाने सायलीचा इशारा बघुन धावत्या गंगेत हात धुवून घेतले.
" ए असं काही नाहीये. तो माझ्या गाडीसमोर आला होता म्हणून माहितीये लगेच काय जीजु 🤨 "
" ओह बघा काका, जावयाची भेट तर किती फिल्मी आहे, गाडीसमोर आला म्हणे 😉 " सायली मुद्दाम विशाखाला चिडवत होती.
" अरे असं काही नाहीये, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही दोघं 😡. तो फक्त दोन - तीन वेळेस काय भेटला तुम्ही डायरेक्ट लग्नापर्यंत जाऊन पोहोचलात 🥴🥴 "
" बघा बघा, माझा जावई दोन - तीन वेळेस भेटलाय. वा !! वा !! "
" चुप काहीपण बडबडताय 😤😤. "
" बरं जीजुंच नाव तर सांग😉. "
" चुप असं काहिच नाहीये. काय जीजु लावलय काय माहिती 😡. बाय मी चालले " आणि ती तशीच हॉस्पीटलला निघाली.
ती गेल्यावर सायली ने काकाला विचारलं,
" काका हे सगळं असं खरंच झालं तर ??? म्हणजे तो मुलगा आणि विशाखा....... "
" झालं तर चांगलंच आहे ना. तुला वाटतं का आपण बघुन दिलेल्या मुलाशी ती लग्न करेल. लग्न खुप लांब, नीट बोलणार पण नाही. बरं आहे तेवढंच तीला बाहेरच जग कळायला लागेल. "
विशाखा हॉस्पिटलमध्ये आली. आल्या आल्या पंडितला केबीनमध्ये बोलावलं.
" आज शेड्युल कसं आहे माझं. "
" मॅम मी आज नेहमीपेक्षा कमीच अपॉईंटमेंट घेतल्यात. "
" का ??? "
" अं............ ते........ माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचंय मला " पंडित एकदम लाजत लाजत म्हणाला.
" तुला बोर नाही होतं का रे 🤨. सारखं सारखं काय जातोस "
" नाही होतं. उलट भेटलं नाही की मन लागत नाही 😔"
" अवघड आहे. पण मी रात्री पर्यंत थांबणार आहे. तशा अपॉईंटमेंट घेऊन ठेव माझ्या. "
" का ?? म्हणजे असं अचानक ते पण एवढा वेळ 🙄 "
" घरी लवकर गेलं की डोक खात बसतेत त्यापेक्षा इथं बसलेलं बरं. " विशाखा स्वत:शीच बोलली. पण ते पंडितला ऐकायलाच गेलं नाही.
" काही म्हणालात का मॅडम ?? "
" काहि नाही. जसं सांगितलंय तसं कर. "
" पण मॅम मी काय म्हणत होतो........ "
" तु लवकर गेलं तरी चालेल. नो प्रॉब्लेम. " विशाखा ने त्याच पुढे काही न ऐकता त्याला परवानगी देऊन टाकली.
दिवसभर विशाखा कामात होती, संध्याकाळ झाली तसं पंडित तीला सांगुन निघुन गेला. सात वाजले होते तरी विशाखा तिथेच बसुन होती. बाहेर प्रीती मात्र चुळबुळ करत होती, तीला घरी जायचं होतं पण विशाखा बसलीये मग कसं जायचं म्हणून तसंच बसली होती.
आठ वाजायला लागले. आता मात्र प्रीती तीच्या केबीनमध्ये आली,
" मॅम तुम्ही कधी जाणार ?? आठ वाजायला आलेत. "
" अरे तु एवढा वेळ का थांबली ?? जायचं ना मगाशीच घरी. "
" हां ते तुम्ही....... "
" नको थांबु माझ्यासाठी. जा तु. मी लॉक करते हॉस्पिटल don't worry. "
" Are you sure mam ?? "
" Yup. Just go ahead and ping me whenever reached. "
" Ok mam. " असं म्हणून प्रीती निघुन गेली.
सगळे पेशंटस् मगाशीच चेक करून झाले होते मग करायचं म्हणून बाकीच्या पेशंटचे रिपोर्ट चेक करत बसली होती. किती वेळ गेला तीच तीलाच कळालं नाही. कामात पुर्ण गुंग होऊन गेली की तेवढ्यात सायलीचा फोन आला.
" काय करतीयेस branches. जेवण झालं का तुझ, काका काय करतोय. "
" काम करतीये "
" काम 🙄. आता कसलं कामं ?? "
" अरे माझं नेहमीच काम. हॉस्पिटलचं. "
" एक मिनिट, म्हणजे तु अजुन हॉस्पीटल मध्ये आहेस ?? "
" हो. का गं 😐 " विशाखा तीला फोनवर बोलता बोलता काम करतच होती.
" मुर्ख, बावळट, काही अक्कल आहे का ?? जरा घड्याळात बघ, दहा वाजलेत. तु ऊठ आधी पटकन उठ आणि घरी निघ. "
" अरे थोडचं राहिलय तेवढ करून मग जाते "
" नाही. बाकीचं नंतर करत पण आत्ता उठ तिथुन तु.
" अगं ऐक तर. खुप म्हणजे खुप थोडं राहिलय. "
" तु उठतेस की मी येऊ तिकडे "
" अरे ऐक तर ...... "
" मी काय म्हणलं, तु उठतेस की मी येऊ तिकडे. " सायली जरा जोरात म्हणाली.
" ओके ओरडु नको. जाते मी घरी. "
" लवकर निघायचं आणि गेल्या गेल्या मला फोन करायचा. "
" हो नक्की करते. आता ठेवते आणि लॉक करून निघते मी घरी. "
" लगेच निघायचं हां. फोन ठेवुन परत काम नाही करत बसायचं. "
" अरे माझ्या डोक्यातच आलं नाही, तु स्वत:च आयडिया दिली मला 😉 "
" चुप. लवकर घरी जा. "
" हा जातीये बाई. " फोन कट करून, हॉस्पीटलला लॉक लावुन विशाखा घरी जायला निघाली.
साडे दहा वाजायला आले होते, कोणच नव्हतं रस्त्यावर.
" शी यार, आज कार आणायला पाहिजे होती, हे स्कुटी उगाचंच आणली. मस्त गाणे ऐकत तरी जाता आलं असतं मला " असं म्हणेपर्यंत गाडी अचानक डुगुडुगु डुगुडूगु हलायला लागली आणि गचके खात बंद पडली.
गाडी थांबवुन उतरली,
" नेहमी बंद पडायचं असतं का हिला " आणि जोरात गाडीला रागात लाथ घातली तर गाडी आडवी झोपुन गेली.
परत गाडीला उचलुन स्टॅण्डवर लावली आणि मेकॅनिकला फोन करून सांगितलं की गाडी बंद पडलीये, येऊन घेऊन जा. थोड्याच वेळात तो आला आणि गाडी घेऊन गेला.
खाली मोबाईल मध्ये बघुन कॅब बुक करतच होती की तीला मागुन आवाज आला........