दोन टोक. भाग १७ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

दोन टोक. भाग १७

भाग १७

विशाखा कॅब बुक करतच होती की मागुन आवाज आला,
" अरे रडकु तु इकडे "

मागे वळुन बघितल तर समोर आकाश.
" तु काय माझा पाठलाग करत असतोस का रे ?? नेहमी कसा समोर येऊन टपकतोस ?? "

" एक बाई मी का तुझा पाठलाग करेन 🤨. जाताना दिसलीस म्हणून हाक मारली. पण तु काय करतीयेस इथे एवढ्या रात्री ?? "

" मी घरी जात होते पण गाडी बंद पडली म्हणून थांबले. "

" ओह पण गाडी कुठे आहे 🤭. मला तर वाटतंय की तुच माझा पाठलाग करतीयेस. "

" गाडी मेकॅनिक घेऊन गेला. आणि मी का तुझा पाठलाग करू 🤨 ?? "

" ते तुलाच माहिती 😁 "

" बरं झालं. चल मला सोड घरी. " असं म्हणत विशाखा त्याच्या मागे गाडीवर बसली पण.

" अरे हे काय, विचारायची काही पद्धत असते की नाही ?? "

" नसते. तु चल ना. "

" बरं. तु इतक्या रात्री पर्यंत काम करत होतीस ??"

" हो ना. कामाच्या नादात किती वाजले ते कळलच नाही. "

" अवघड आहे. लवकर निघायचं ना. "

" बाय द वे, तु इतक्या रात्री काय करत होतास ?? "

" मला आवडत रात्री फिरायला. शांतता मिळते कानाला आणि सोबत मनाला सुद्धा. "

" काय म्हणालास ?? " गाडीवर मागे बसल्यामुळे तीला ऐकायलाच आलं नाही. त्याने बोललेल ऐकु यावं म्हणून तीने त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि थोडसं पुढे झुकली.

तीच्या तसं पुढे झुकण्याने आकाश जरा गडबडला,

" काय म्हणला तु सांग ना "

" अं..... हा.... मी म्हणलं मला आवडत रात्री फिरायला. "

" मग एवढं ओरडुन सांगायला काय झालं ?? हळु सांग‌ ना "

" मी हळुच सांगितलं होतं तुलाच ऐकु आलं नाही बहिरी 😁 "

" चुप. " त्याच्या पाठीवर जोरात मारल हीने.

" तुला घरचे ओरडत नाहीत का गं एवढ्या रात्री पर्यंत थांबतेस म्हणून ??? "

" आता घरी गेल्यावर तेच ऐकायचयं. काका महाराजांचं प्रवचन 😓 "

" 😁😂 प्रवचन. "

" हां मग काय तर..... एएएएएएएए गाडी थांबव. गाडी थांबव. " बोलता बोलता मध्येच त्याच्या पाठीवर तीने जोरजोरात मारायला सुरु केलं.

" अरे एक मिनिट " गाडी साइडला घेतली त्याने,
" काय झालं ?? असं कोण मारत यार ?? तोंडाने सांगायचं ना 🤨🤨 "

" अरे चहा आहे तिथे "

" मग चहा साठी एवढ मारायचं मला 🥺🥺. थांब म्हणलो असतं तरी थांबलो असतो मी. आणि एक मिनिट घरी जाऊन जेवायचं नाहीये का आता चहा प्यायला ?? "

" आता चहा प्यायल्यावर कशाला जेवणार ना .... "

" अरे पण रात्रीच्या ११ वाजता चहा कोण पीत 🤨"

" मी 😁. आणि बघ ना तो सायकलवरचा चहा आहे. खुप भारी लागतो तो " आणि एकदम असं भारी एक्सप्रेशन देऊन विशिखा‌ त्याला सांगत होती.

आकाश तीच्याकडेच बघत होता, आधी भेटली तेव्हा कशी होती ना एकदम रागीट आणि खडुस. नंतर भेटली तर रडलीच लहान बाळासारखी आणि आता कशी बोलतीये 🤗
" बॉयफ्रेंड बद्दल सांगत असल्यासारखी बोलतीयेस तु तर 😏 "

" हा मग, चहा तर प्रेम आहे माझं 🤗🥰 "

" पण चहाच व्यसन लागल्यासारखं लागतं "

" असुदे ना मग.... मला आवडतो ना तो. मग झालं "

" डॉक्टर असुन माहित नाही का की चहा चांगला नसतो शरीरासाठी 🤨 "

" माहिती आहे पण, वो प्यार ही क्या जो दर्द ना दे 😉. "

" अवघड आहे 🤦🤦. " तो पुढे काही बोलणार तेवढ्यात तीचा फोन वाजला. तीने फोन उचलताना आकाशने त्यावर बघितलं तर स्क्रीनवर नाव लव्ह आणि पुढे ♥️ असा हार्ट शेफ होता.

" हां बोल रे "
" अरे हो जातीये रे घरी "
" अरे रस्त्यात आहे रे मी "
" चहा पितीये मी "
" हां मग, तुझ्यापेक्षा जास्त प्रेम चहावर आहे माहिती नाही का 😉 "
" पाच मिनिटं मग लगेच जाते घरी "
" हो रे बाबा हो. "
" बरं ठेवु का. हां लवकर जाते "
" हां बाबा हां "

विशाखा बोलत होती आणि आकाश तीच्याकडे बघत होता. तीच्या बोलण्यावरून आकाशला वाटलं की विशाखाचा बॉयफ्रेंडच आहे.
विशाखा ने फोन ठेवून त्याच्याकडे बघितल तर तो वेगळ्याच विश्वात होता.
" ओय " तीने त्याला हाक मारली तरी त्याचं लक्ष नव्हतं.
विशाखा ने त्याच्या हाताला धरून हलवलं.

" वेलकम टू इंडिया सर "

" आं....... हां काय झालं ?? "

" तेच मी तुला विचारतीये, काय झालं ?? कुठे गेला होतास ?? "

" कुठे नाही. चल निघायचं का ?? " अस‌ म्हणून तो गाडी कडे गेला पण.

" काय मुलगा आहे, निघायचं का विचारलं आणि उत्तर द्यायच्या आधीच गेला. " पैसे देऊन विशाखा त्याच्या मागोमाग गेली. घरी तीला सोडताना त्याने पत्ता विचारला फक्त बाकी काहिच बोलला नाही. तो डिस्टर्ब दिसतोय म्हणून मग विशाखा ने पण त्याला विचारल नाही.

तीला घराजवळ सोडलं त्यावेळी ११:१५ झाले होते. त्याला Thank you म्हणेपर्यंत तर तो लगेच निघून गेला. दोन मिनिट पण थांबला नाही.
काय मुलगा आहे राव हा, अस म्हणत घरी गेली तर दरवाज्यात काका दत्त म्हणून हजर.

" 🤨🤨 " काका तीच्याकडे फक्त बघत होता.

" काय झालं ?? असा का बघतोय 😒 "

" तेच बघतोय की नेमकं काय चाललंय ?? "

" म्हणजे "

" एवढा उशीर ?? आणि गाडी कुठेय ?? "

" अरे कामाच्या नादात लक्षातच नाही आलं किती वाजले मग सायुचा फोन आला तेव्हा निघाले. आणि मध्येच गाडी बंद पडली म्हणून मग ती मेकॅनिकला बोलवुन रिपेअरींगसाठी दिली. "

" तो कोण होता ?? "

" आता मला असं माहिती असणार मेकॅनिक कोण होता ते..... मी काय त्याची माहिती गोळा करत बसु का ?? "

" अरे मुर्खा, तो घरी सोडायला आलेला कोण होता."

" तो होय.... तो ना.... अं.... तो..... "

" " तेच कोण होता तो ?? "

" अं तो ना तो बघ त्यादिवशी धडकला होता गाडीला तो तोच तो. "

" नाव गाव काहि आहे का नाही त्याला "

" अं..... मला नाही माहिती 🥺 " एकदम लहान चेहरा करत विशाखा म्हणाली.

" आत्ता तर त्याच्या गाडीवर आलीस न मग तुला त्याच नाव नाही माहिती ?? "

" नाही म्हणजे त्याने सांगितलं असेल पण माझ्या लक्षात नाहीये आत्ता 🥺😔 "

" अवघड आहे तुझं. ज्याच्या गाडीवर आलीस त्याचच नाव माहिती नाही म्हणजे खरचं अवघड आहे. "

" अरे आता नाही माहिती तर नाही माहिती . "

" जेवण कि ते पण माहिती नाही 🤨 "

" अं.... ते ना मी आत्ता चहा पिलाय त्यामुळे मला नको जेवण. "

" चहा घेतात गं, जाऊदे पण आत्ता का चहा घेतला ?? जेवणाच्या वेळेला ही कसली थेर ?? "

" सॉरी. नंतर नाही करत. बरं झोपायला जाते मी बाय. " असं म्हणून त्याचं पुढचं बोलणं सुरू व्हायच्या आत तर पळाली पण.

" असंच असंच करा सगळ्यांनी. किंमतच नाहीये मला या घरात 😣😣😣 "

इकडे आकाश तीच्या विचारात कधी घरी आला त्याच तर यालाच कळालं नाही.
आल्या आल्या त्याच्या आईने त्याच स्वागत केलं,
" या साहेब या. झाली का तुमची अंधारासोबतची मिटिंग. "

" 😔 " बिचारा गुपचुप मान खाली घालुन ऐकत होता, असंही हे त्याच्यासाठी रोजचंच होत त्यामुळे त्याला सवय झाली होती 😁.

" असं बारीक तोंड करून काय फायदा ?? रात्री उशीरापर्यंत बाहेर रहायचं, उशीरा घरी यायचं आणि मग जेवण करायचं. मला तर वाटतं ना की मी तु पोटात असताना वटवाघूळाच्या पाया पडले होते म्हणून तु अस करतोस. "

" खरं आई 🤭. तु चक्क वटवाघूळाच्या पाया पडलीस " त्याने हसत हसत तीला विचारल.

" करा, आता मस्करी करा आईची पण बायको येईल ना तेव्हा बघते मी किती मस्करी करतो माझी 🤨 "

" अरे क्युटु तुच माझी राणी आहेस. " तीचे गाल ओढत तीला मस्का मारायचा प्रयत्न करायला लागला.

" जा जा मस्का नको मारू, चल जेवायला. "

" पप्पा जेवले का ?? "

" हो तु तुझ्यासारखे नाहीयेत 😏 "

" टोमणा मारायची गरज आहे का ?? आणि तु ? "

" हो झालंय माझं पण, फक्त तुच राहिलास. चल वाढते."

" अं..... ते.... आई मी ना आत्ता चहा घेऊन आलोय. "

" एवढ्या उशीरा 😲, आणि ते पण तु चहा घेतलास आकाश 😳😳. चक्क तु चहा घेतला.... "

" हां, का मी घेऊ शकत नाही का ?? 😒 "

" वाह !!! प्रगती आहे चक्क चहाला नाव ठेवणारे लोक पण चहा प्यायला लागले. "

" आई 😣😣😣 "

" आणि मग आता जेवण तर करणार नसालच तुम्ही, मग सकाळी सहाला उठून मागे भुणभुण लावता, आई भुक, आई भुक, आई भुक " त्याची अॅक्टींग करत त्याची आई म्हणाली.

" जा बाबा 😒😒. मी जाते झोपायला. " आणि झोपायला गेला. अंथरूणावर पडुन तीचाच विचार करत होता,
कोण असेल ?? एवढं कोणाला बोलत असेल ?? बॉयफ्रेंड ??? नाही नाही नसेल, असं लगेच कसं जज करणार एखाद्याला. मग मित्र ?? पण एवढ्या रात्री कशाला कोणता मित्र फोन करेल ?? मग कोण असेल ?? एक मिनिट, पण मी का तीचा विचार करतोय ?? जाऊदे, अशीही माझी कॉफी राहिलीये, तेव्हा अजुन ओळख होईल मग विचारू शकतो मी.