अंतःपुर - 8 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंतःपुर - 8

८. लोकशाहीची मूलभूत तत्वे (फंडामेंटल्स ऑफ डिमॉक्रसी)...

हॉटेल बाहेर शक्ती सांगत असलेली सूचना समजून घेऊन मिहीर पंतप्रधानांच्या रूमसमोर येऊन उभारला.
"मिहीर. पीएम सरने बुलाया हैं।" मिहीर बाहेरील एजंट्सना म्हणाला.

एजंटने आत जाऊन कन्फर्म केलं.
"सर, एक आदमी आया हैं। कह रहा है आपणे बुलाया हैं! नाम मिहीर!"
"भेज दो!" पीएसोबत डायनिंग टेबलवर जेवण करणारे पीएम काट्याने घास घेत म्हणाले.

एजंट बाहेर आला.
"जाईए!" दार उघडच ठेवून तो मिहीरला म्हणाला.
मिहीर रूममध्ये प्रवेशला.
"मिहीर देशमुख रिपोर्टिंग सर!" तो सल्युट करत म्हणाला.
तो पंतप्रधानांना तो जेवताना पाहत होता.
"सॉरी सर. बाद मे आऊँ?" त्याने संकोच करत विचारलं.
"नाही! थांब!" नॅपकिनला हात पुसत पीएम खुर्चीतून उठले.
मिहीरकडे आले.
"आह! शुक्ला, मिट आवर् न्यू रिक्रुट फ्रॉम आयबी! मिहीर, नो वन नोज् अबाऊट! सो ही कॅन वर्क अनॉनमस्ली! अँड आय अशोर यु! ही इज डुईंग ग्रेट वर्क." त्यांच्याकडे येणाऱ्या शुक्लाला पीएम प्रसन्न मुखाने म्हणाले.
शुक्ला नाटकी हसला. चेहरा थोडा टेंस्ड् झाला होता.
"मिहीर हे माझे प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि अत्यंत जवळचे मित्र बिपीन शुक्ला!" पीएमनी पुढं एड केलं.
"हॅलो!"शुक्ला छद्मी स्मित करत मिहीरला म्हणाला.
"हॅलो सर!" मिहीर स्मित करत त्याला म्हणाला.
"काही इन्फॉर्मेशन?" पीएमनी मिहीरला विचारलं.
"येस सर!" सल्युट करून मिहीर पीएमना म्हणाला,
"सर, सगळ्या लिंक्स अमेरिकेशी जाऊन मिळतायत!"
मराठी जास्त कळत नसलं, तरी 'अमेरिका' आणि 'लिंक्स' यावरून शुक्लाला काही अंदाज बांधणं सोपं होतं. आणि ते त्यानं केलं देखील होतं.
"गुड!" पीएम म्हणाले.
"सॉरी सर, मुझे लगता है आपकी ये बाते गोपनीयता के चलते मुझे नही सुननी चाहिए। और वैसे भी इमरजेंसी में मैं घर इन्फॉर्म किए बिना ही आया था! कॉल करके आता हूं!"
"पर खाना?" पीएम त्याला म्हणाले.
"आपका डिस्कशन हो जाए, साथ मे खाएगें।" शुक्ला हसत म्हणाला,
"आता हूं!" खिशातून मोबाईल काढत घाईनेच तो बाहर गेला.
हे पाहून शक्तीच्या म्हणण्यात काही तथ्य आहे ही पीएम यांची शंका बळावत गेली.
त्यांनी मिहीरकडे पाहिलं. मिहीर देखील त्यांना काय म्हणायचंय ते समजला, पण तो गप्प राहिला.
परंतु पीएमनी तत्काळ मन:स्थिती बदलली.
"तू खूप धाडसी आहे. खूप उत्कर्ष करशील आयुष्यात! आणि तुझ्यामुळे आपला देश!" पंतप्रधान त्याच्या खांदा थोपटत म्हणाले.
"थँक्यू सर!" मिहीर आनंदाने उसळत म्हणाला.
पंतप्रधान पुनीत चिंतपल्ली त्याच्यासाठी आदर्श होते. आणि आज शक्तीमुळे आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या कर्तव्यपारायणतेमुळे, प्रामाणिकपणामुळे आज तो स्वतःच्या मेंटॉर समोर उभा होता. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हतं...
"आय एम ए बिग फॅन ऑफ यु सर! मी मागच्या इलेक्शन्सला माझं मत आपल्यालाच दिलं होतं!" मिहीर उत्साहाच्या भरात बोलून गेला.
"मला? पण मी तर या मतदार संघात उभारलो नव्हतो!"
"नाही. पण मी माझं मत आपल्याला पाहूनच केलं होतं. म्हणून म्हणालो!" मिहीरने आपली चूक सुधारली.
पंतप्रधान पुनीत हसले.
"मला माहित नव्हतं आपल्याकडे प्रेसिडेन्शियल इलेक्शन्सला सुरवात झाली आहे!" त्यांनी हे बोलून मिहीरची अजूनही होत असलेली चूक शुधारण्याचा प्रयत्न केला.
मिहीर चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन उभा होता. पीएम काय बोलतायत, म्हणजे त्यांचा नेमका रोख काय आहे हे त्याला समजत नव्हते.
"माय बॉय आपण 'पार्लमेंटरी इलेक्शन्स्' भरवतो. मग तू मला डिरेक्ट मत कसं देऊ शकतोस?"
"म्हणून तर मी इथे आपल्या पक्षातल्या उमेदवाराला मतदान केलं." मिहीर अजूनही आपला मुद्दा स्पष्ट करत म्हणाला.
पंतप्रधान पुन्हा हसले. त्यांचा मुद्दा अजूनही मिहीरच्या लक्षात आला नाही म्हणून त्यांची ही प्रतिक्रिया होती.
"आणि तुम्ही त्यांच्या कामापासून खूष आहात?"
मिहीर गप्प राहिला. पंतप्रधानासमोर त्यांच्याच पक्षाच्या नेत्याबद्दल वाईट कसं बोलणार होता. त्यांचा कुचकामीपणा तो कसं सांगू शकत होता. ते चुगली केल्यासारखं झालं असतं. आणि बहुदा पंतप्रधानांना ते आवडलंही नसतं...

तिकडे कॉरिडॉरमध्ये एकदम शेवटी जाऊन एजंट्सना ऐकू येऊ नये असा त्याने फोन लावला...
"शुक्ला स्पिकिंग! आयबी एजंट अपॉईंटेड बाय पीएम, नोज् दॅट अमेरिका इज बिहाईंन्ड् थिस कॉन्स्पिरसी. ऍज पर माय जजमेंट, ही विल रिच यु सून!" एजंट्स त्याच्यापासून बरेच लांब असून तो खुसपुसल्यासारखा मोबाईलमध्ये बोलला.

"हाऊ डू यु नो दॅट?" क्लबात एका रूममध्ये बसलेल्या डॅनियलने खात्री करून घेण्यासाठी विचारलं.
"आय हॅव हर्ड् इट मायसेल्फ!" शुक्ला बोलला.
"व्हॉट आर् यु डुईंग इन कोल्हापूर शुक्ला?" रागावलेला डॅनियलने स्वर थंड ठेवून विचारलं.
"पीएम वॉन्टेड् सम क्लोथिंग, सो ही आस्क्ड् टू ब्रिंग!" शुक्लाने स्वत:ला खरं वाटणारं कारण सांगितलं.
"ओके. बट बी अलर्ट!" डॅनियललाही ते पटलं. तरी तो इतका सावध होता की त्याने शुक्लाला देखील सावध रहायला सांगितलं!

"येस! आय विल इंफॉर्म यु टाईम टू टाईम. बाय!" शुक्लाने फोन कट केला.

इकडे आत खोलीत मिहीर व विद्यमान पंतप्रधान यांचा संवाद चालूच होता... पीएमनी विचारलेल्या प्रश्नावर, की 'मिहीर त्याने मत दिलेल्या खासदाराच्या कामाने संतुष्ट आहे?' यावर मिहीर गप्प राहिला होता... पीएम त्याच्या चुप्पीवरून काय ते समजले होते.
"मला तुझं उत्तर मिळालं!" विचारात मग्न मिहीरला पंतप्रधान म्हणाले.
"म्हणूनच मी म्हणालो. एखाद्या पक्षाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे बघून कधीच मतदान करू नका! आपल्या विभागात कोण चांगलं काम करू शकतं याचा विचार करून मतदान करा!
"आपल्या भागातील प्रत्येक उमेदवाराचं चारित्र्य पहा, त्याची निष्ठा पहा. कामाबद्दल, जनतेबद्दल आत्मियता किती आहे, त्याला लोकांबद्दल मग ते कोणत्याही जाती, धर्म, वर्ण, कोणत्याही आर्थिक स्थितीतील असोत त्यांच्याविषयी समान प्रेम वाटतं का ते पहा. मग मतदान करा. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. जनसेवा करण्यासाठी तेच उत्तम आहेत!
"पंतप्रधान निवडण्याचं काम जनतेचं नाही. ते काम जनतेनं निवडून दिलेल्या खासदारांचं आहे. तेच तुमचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान निवडतात. जर तुम्ही इथं योग्य प्रतिनिधी निवडलात, तर तो योग्य प्रधान निवडेल. जो पुन्हा कर्तव्य समाजसेवा म्हणून करेल! म्हणून कधीच पंतप्रधानाचा किंवा मुख्यमंत्रीचा चेहरा बघून मतदान करू नका! कार्यकर्ता म्हणून पक्ष, व्यक्ती यांबद्दल निष्ठा ठेवण्यापेक्षा नागरिक म्हणून देशाविषयी निष्ठा ठेवा. समजलं!" चेहऱ्यावरची प्रसन्नता लोपू न देता माननीय विद्यमान पंतप्रधान मिहीरला लोकशाही व्यवस्था संक्षेपमध्ये समजावून सांगत होते.
"ह... हो सर!" आपली चूक लक्षात येऊन मिहीर कचरत बोलला.
मग पंतप्रधानांनी एका मित्राच्या खाद्यांवर हात ठेवावा तसा हात ठेवला आणि ते त्याला म्हणाले,
"आणखीन एक लक्षात ठेव, कधीच कुणाचा फॅन बनू नको! अशाने आपण आपली सारासार विचार करण्याची क्षमता गमावतो आणि आपल्या आवडत्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मग ती चुकीची का असेना दुर्लक्ष करत जातो, किंबहुना ती बरोबरच मानून स्वतःच त्याचं समर्थन करू लागतो. ती व्यक्ती सोडून आपण दुसरं काही बघतच नाही. मग कुणी त्या व्यक्ती विरुद्ध योग्य टीका जरी केली, तरी आपण टीका करणारा किती बरोबर आहे हे न बघता टीका करणाऱ्यावर राग धरतो.
"आणि हे स्वतःसाठीही आणि समाजासाठीही पोषक नसतं. जरुरीचं नाही तुम्ही कुणामागे गेलंच पाहिजे. मत देताना पक्ष, व्यक्ती बघू नका. तो योग्य आहे का याची चाचपणी करा. मग मतदान करा. जर तुम्ही निवडलेल्या लोकप्रतिनिधीकडून काही चुकत असेल तर त्याला प्रश्न करण्याचा अधिकार तुम्हाला आहे! त्याच्या चुकीच्या निर्णयाची आलोचना करण्याचाही अधिकार तुम्हाला आहे! नोरण्यात त्रुटी असतील त्याला सूचना करण्याची जबाबदारी तुमची आहे! स्वतःच त्या चुकांवर पांघरून घालू नका.
"त्यामुळे तुमच्या प्रतिनिधींना तपासत रहा. स्वतःला तपासत रहा. मत दिलं म्हणजे आपलं काम संपलं. आता पुढंची पाच वर्षे मी निवडलेला व्यक्ती काय ते बघून घेईल आशा भ्रमात राहू नका. सरकार कुचकामी ठरत असेल, तर जनतेला सूत्रे हाती घ्यावी लागतात. सो, नेहमी डोळस रहा. विवेकबुद्धी जागी ठेवा!" पंतप्रधान मिहीरला सामान्यज्ञान देत होते.
मिहीर आता खरंच डोळस होऊन ते ग्रहण करत होता.
"तुझ्या जवळच्या जेवढ्या लोकांना हे सांगू शकशील तेवढ्या लोकांना सांग! त्यांना सजग कर!" ते मिहीरला म्हणाले.
आणि ते हसले,
"चूक आपल्या लोकांची नाही! आपल्याकडे नागरिकशास्त्रच इनमिन पाच दहा मार्काला आहे. शिवाय आपले विद्यार्थी फक्त मार्कांसाठीच तर अभ्यास करतात. काही नवीन शिकण्यासाठी नाही! आणि म्हणून आपण शिकून अडाणी राहतोय!
"ज्ञान मिळवणं ही खूप रसभरीत आणि सूंदर गोष्ट आहे, पण हा आनंद आपले विद्यार्थी गमावतात. आपले शिक्षक सुद्धा त्यांना हे समजावून सांगत नाहीत आणि जागतिक स्पर्धेला घाबरलेल्या पालकांबद्दल तर न बोललंच बरं..." पंतप्रधान हसत बोलत होते, पण देशाच्या भविष्यच्या चिंतेने आलेली निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ते पुढं म्हणाले,
"आपल्याला हवं आहे, आधी उत्तम चरित्र निर्माण करणं! वैयक्तिक स्वार्थातून दूर झाल्याशिवाय आपण एक महान राष्ट्र नाही बनू शकत!"
"पण सर? बरेच लोक देशाची काळजी आहे म्हणूनच तर त्यांना योग्य वाटणाऱ्या पंतप्रधानपदाचा उमेदवार पाहूनच त्याच्या पार्टीला मतदान करतात. त्यांना स्वार्थी कसं म्हणता येईल?" मिहीर थोडा विचलित झाला होता.
"तू त्यातला आहेस!" पीएम हसत म्हणाले.
मिहीर काहीच बोलला नाही. त्याला लाजल्यासारखं झालं...
"देतो. या प्रश्नांचं पण उत्तर देतो. बघ मी यांना स्वार्थी किंवा मूर्ख म्हणत नाही. मी यांना इनोसंट म्हणतो. पण माझ्या दृष्टिकोनात असे लोकच समाजासाठी जास्त घातक असतात. आणि आपल्या समजांना ज्ञान समजून ते घमेंडी व उद्धट पण झालेले असतात. आणि पुन्हा तेच; त्यांना जर खरंच समाजाची चिंता आहे ना, तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागातला योग्य उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवडावा. कारण तुमचा तुमचा विभाग डेव्हलप झाला, तर पर्यायाने देशच डेव्हलप होईल, एकटा पंतप्रधान काहीच करू शकत नाही. त्याला तितक्याच चांगल्या व काम करणाऱ्या सहकाऱ्यांची गरज असते म्हणून असे सहकारी संसदेत पाठवा. विधायक योग्यतेचे असतील, तर ते आपला नेता देखील तितकाच योग्य निवडतील!"
मिहीरला पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टी समजल्या तर होत्या, पण तो आश्चर्यचकित होता. कारण देशाच्या इतिहासात तो पहिल्यांदाच असा पंतप्रधान पाहत होता, जो 'मला मत देऊ नका' असं म्हणत होता!
पण यामुळे मिहीरच्या मनात पुनीत चिंतपल्ली यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच वाढला व त्यासोबतच 'फॅन' असण्याची भावना मात्र लोप पावली...
"सॉरी सर! आणि थँक्यू!" मिहीरने दोन्ही भावना एकदमच व्यक्त केल्या. पूर्वी अंधपणाने मतदान केल्याने माफी मागितली आणि आत्ता पुढील मतदानासाठी स्वतः पंतप्रधानांकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आभार!
"तुला पाहून एक कल्पना सुचली!" पंतप्रधान चमकल्यासारखे एक्साईट होत म्हणाले.
"काय सर?" मिहीरने न राहून विचारलं.
"मी विचार करतोय, शाळेत संविधान शिकवणं कम्पल्सरी करावं!" पीएमनी सुचलेली कल्पना बोलून दाखवली.
"हो पण त्यावर परीक्षा घेऊन मार्क्स देवू नका. नाही तर मुलं पुन्हा मार्क्ससाठी ते वाचतील आणि मूळ उद्देश बाजूलाच राहील!" मिहीर स्मित करत म्हणाला.
आणि आपण हे बोलून प्रमाद केलाय हे अचानक त्याला उमगलं तसा तो कचरला.
पण हे पाहून पंतप्रधानच खळखळून हसले. कारण मिहीरचं बोलणं रास्त होतं! त्यांचं हसणं मिहीरची सूचना त्यांना पटल्याचं चिन्ह होतं.
"बरं ये आता. सांभाळून रहा!" पीएम त्याची पाठ थोपटत म्हणाले.
"हो सर!" मिहीर सल्युट करत म्हणाला.
आणि त्याने दार उघडले. आपला फोन संपवून पीए शुक्ला बाहेर दरवाजासमोर येऊन उभा राहिला होता. मिहीरने स्मित करून त्यांचाही निरोप घेतला.
शुक्ला देखील हसला, पण त्याच्या नजरेत बेरकीपणा होता.
मिहीर लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट बंद झाली, तसा शुक्ला पीएमच्या खोलीत शिरला आणि आतून दार लावून घेतलं.