अंतःपुर - 9 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंतःपुर - 9

९. नवीन कारस्थान (अ न्यू कॉन्स्पिरसी)...

शक्तीची कावासाकी (आता शक्तीचीच) एका पेट्रोल पंपला लागली होती...
"साहेब किती?" पेट्रोल भरणाऱ्याने विचारलं.
"फुल करा!" शक्ती म्हणाला.
त्या कर्मचाऱ्याने शक्तीला हवी तेवढी त्याच्या गाडीची टाकी भरली. गाडीत पाच लीटर तेल होते, पण शक्तीला जे काम करावं लागणार होतं, त्यासाठी त्याला किती हिंडावे लागणार हे त्याला देखील माहीत नव्हतं. म्हणून त्याने सतरा लीटरची फ्युल टॅन्क पूर्ण भरण्याचा निर्णय घेतला होता...
"अलीकडे पेट्रोल बरंच महागलंय नाही?" फ्युल डिस्पेन्सरच्या डिजिटल डिस्प्लेच्या आकड्यांवर नजर लावलेला शक्ती पाकिटातून नऊशे साठ रुपये काढून देत त्या कर्मचाऱ्याला म्हणाला.
"होणारच ना साहेब. पेट्रोलच का? सगळंच महागलंय. तिकडं आखाती देशांत युद्धं चालू आहेत, त्याची भरपाई आपण करतोय! या महागाई पायी पुढल्या इलेक्शनला हे सरकार घरी बसतंय का नाही बघा!" कर्मचारी हसत म्हणाला.
"होय!" शक्तीने हसत दुजोरा दिला आणि त्याने गाडी बाहेर काढली.
कर्मचारी दुसऱ्या गाडीची टाकी भरण्यास पुढं सरकला होता...

शक्तीची गाडी शहराच्या मध्य हायवेवर धावत असताना शक्तीला कॉल आला... त्याने बाईक बाजूला लावून कॉल घेतला.
"असाईनमेंट आली आहे. कम फास्ट!" डॅनियल बोलला.
"कुठे?" शक्तीने विचारलं.
"नाईट क्लब!" पलीकडील डॅनियलचा आवाज.
मग शक्तीची बाईक नाईट क्लबच्या दिशेने वळली...

येऊन थांबली ती नाईट क्लबला. तो बाईकवरून उतरला आणि ज्या दोन - चार पायऱ्या होत्या त्या चढून आत गेला.
आत, दरवाजाजवळ एक माणूस थांबला होता. हा या क्लबचा मॅनेजर. दिसण्यावरून तरी ब्राऊन... शक्तीला पाहून त्याने मागून येण्याची त्याला खूण केली आणि तो त्याला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला.

केबिनमध्ये अक्षरशः अंधार होता. डॅनियल स्कॉचचा ग्लास घेऊन खिडकीजवळ उभा होता. त्या खिडकीला रोलर शटर कर्टन्स बंद होते. पण त्यातून डोकावणारा सुर्यप्रकाश फटींतून आत आल्याने तीव्र होत डॅनियलच्या मुखमंडलाला प्रकाशित करत होता. डॅनियल ड्रिंक घेऊन उभा होता, पण त्याने तो एकदाही ओठाला लावला नव्हता. त्याच्यापासून थोडं दूर पण त्याच्याकडे पाहत पीएमला मारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती उभी होतीच.
मॅनेजर मागून शक्ती केबिनमध्ये प्रवेशला. मॅनेजर मग त्याला डॅनियलला सुपूर्द करून केबिन बाहेर पडला. शक्ती थोडं पुढं चालत जात त्याने शोल्डर होलस्टरला लावलेली त्या माणसाची हँडगन काढून त्या माणसाकडे टॉस केली. त्या माणसाने ती झेलली व आपल्या ब्लेझरच्या आत असलेल्या होलस्टर मध्ये खोवली.
ती व्यक्ती तिथं असल्याने डॅनियलच्या त्याला बोलावण्याचा अर्थ शक्ती उमगून होता, पण तरी डॅनियलकडून काही विचारणा होईना. तो रोलर शटरच्या फटींतून बाहेर पाहत ग्लास हातात धरून तसाच उभा होता...
"थँक गॉड! फायनली काम आलं!" शक्ती बोलणं चालू व्हावं म्हणून थोडं पुढं होत म्हणाला.
"यु नो माय फ्रेंड! मी पण पिणं क्विट करायचं म्हणतोय. तुझं म्हणणं बरोबर आहे. कामं मार्गी लावायची असतील, तर शुद्धीत रहाणं गरजेचं आहे!" डॅनियल बाहेर पहातच बोलला. हातातील स्कॉचचा ग्लास उपडा करून त्याने पायांत फ्लोअरवर सांडवली.
केबिन खूप उंचीवर होतं. खालून जाणाऱ्या गाड्या, माणसं लहान लहान भासत होती...
"काय झालंय डॅन? काम काय आहे?" शक्तीने गंभीर होत विचारलं.
"तू प्राईम मिनिस्टरला भेटायला का गेला होतास?" डॅनियलने बाहेर पहात विचारलं.
"नाही सांगू शकत!" शक्ती म्हणाला.
"का?" आवाजात जरब आणत पण बाहेर पहातच डॅनियलने विचारलं.
"मी एक असॅसिन आहे! आणि माझे काही नियम आहेत!" शक्ती ठामपणे म्हणाला.
"आणि ते नियम काय आहेत?"
"तू मला काम देणार असशील तर सांगेन!" शक्ती ठामपणे म्हणाला.
"बोल!" डॅनियल खिडकीतून बाहेर पहातच उद्गारला. तुला काम मिळेल हा त्याचा अर्थ होता.
"ओके! माझा पहिला नियम; मी माझ्या क्लायंट्सचे नांव, त्याचे काम किंवा त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे सिक्रेट शेयर करत नाही! नियम दोन; काही झालं, तरी घेतलेले काम पूर्ण करायचंच! मग त्यासाठी काहीही सॅक्रीफाईज करावं लागलं, तरी चालेल!"
"आणि तिसरा नियम?"
"पहिले दोन्ही नियम पाळणे!" शक्तीने भूमिका स्पष्ट केली.
"म्हणजे तू नाही सांगणार, की तू पीएमला का भेटायला गेला होतास?" शांत स्वरात डॅनियलने विचारलं.
"नाही!" शक्तीचं दृढ उत्तर!
"सो बी विथ इट!" म्हणत डॅनियल खिडकी पासून दूर झाला,
"मिहीर म्हणून एक सिक्रेट एजंट आहे. तो माझ्यापर्यंत पोहोचला आहे!"
"होऊन जाईल!" शक्ती त्याला पुढं काही न बोलू देता म्हणाला.
"गुड! पण तू जर पकडला गेलास, तर काय होऊ शकतं हे तू जाणून आहेस!" डॅनियल शक्तीसमोर त्याच्या नजरेत नजर घालून म्हणाला. रिकामा ग्लास अजूनही त्याच्या हातातच होता.
"यु नो माय मोरल्स! जीव जाईल, पण तुझं नांव बाहेर काढणार नाही!"
"त्याबाबतीत मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. म्हणूनच तुला हे काम देतोय!"
"त्याचा फोटो?"
"मिळेल! आणि हा तुझ्यासोबत जाईल!" खोलीतील त्या तिसऱ्या माणसाकडे ग्लास असलेल्या उजव्या हाताने निर्देश करत डॅनियल शक्तीला म्हणाला. तोच ज्याच्या पासून शक्तीने पंतप्रधानांना वाचवलं होतं.
"तुझा माझ्यावर अजून विश्वास बसत नाही तर?!" शक्तीने नाराजी स्मित करत डोळे खाली करत विचारलं.
"अशा कामात स्वतःवरही विशावस ठेवू नये!" डॅनियल बोलला,
"याचा तुला बॅकअप म्हणून उपयोग होईल!" डॅनियल पुढं शक्तीला म्हणाला.
"हा!" शक्ती कीव करत हसला!
रागाची तीव्र रेषा त्या माणसाच्या चेहऱ्यावर उमटली. तो शक्तीला मारण्यासाठी पुढं झाला, पण डावा हात मधे घालून डॅनियलने त्याला थांबवलं. त्या माणसाला डॅनियलचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. किंबहुना तो समोर असताना तर नाहीच! तो माणूस थांबला. मागे झाला.
"का? काय झालं?" डॅनियलने शक्तीच्या डोळ्यांत रोखत विचारलं.
"तुला याने ही चुगली तर केली, की मी पीएमला भेटलो. पण याने तुला हे सांगितलं, की तो तिथं काय करत होता?" शक्तीने पथेटिक हसत त्याने डॅनियलला विचारलं.
"त्याला मीच पीएमच्या मागे पाठवलं होतं!" डॅनियल म्हणाला.
"फक्त एवढंच?" शक्तीने विचारलं.
आणि डॅनियलच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने त्या माणसाकडे पाहिलं,
"व्हॉट डीड यु डू देअर?" डॅनियलने कठोर शब्दांत विचारलं.
"तो बोलेल असं वाटतं तुला? माणसाला दुसऱ्याच्या चुका दिसतात, पण आपले मोठे गुन्हे सुद्धा दिसत नाहीत!" शक्ती हसतच होता.
"म्हणजे? काय केलंय यानं?" डॅनियल चिडून म्हणाला.
"ही ट्रायड् तू किल द प्राईम मिनिस्टर!" शक्तीने त्या माणसाची कृती विदित केली.
"व्हॉट?" डॅनियल अक्षरशः किंचाळलाच!
"तुला काय वाटतं, त्याची गन माझ्याकडे कशी आली असेल? आणि याचा चेहरा कसा सुजला असेल?" शक्तीने स्मित ओसरू न देता विचारलं.
"तू अडवलंस त्याला?"
"हो!"
"तुमचं काय चाललं आहे, मला माहित नाही! मला ते जाणूनही घ्यायचं नाही! पण याला एवढीही अक्कल नाही, की याने जर पीएमला मारलं असतं, तर काय झालं असतं! आणि हा मला बॅकअप देणार! रेहने दो!" शक्ती पुन्हा हसला.
"आणि म्हणून तू त्याला रोखलंस!"
"याप्!" शक्ती उच्चारला.
"मॅनेजर!" डॅनियल शक्तीच्या डोळ्यांत डोळे घालून चिडून ओरडला!

मॅनेजर काय ते समजला होता. कारण येताना तो नम्याला केबिनमध्ये सोबत घेऊन आला होता!
नम्या अस्वस्थ वाटत होती. तिच्या तोंडातील लाळ सुखली होती. तिची नजर कमजोर व अंधुक झाली होती. शरीरी कृश दिसत होती. अंगावर पुरळ उठले होते. शिवाय तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते... रक्तदाब वाढला होता. कोणत्याही क्षणी ती तोल जाऊन पडेल अशी तिची अवस्था होती. डोळे उघडे ठेवण्याचा ती मोठ्या कष्टाने प्रयत्न करत होती. मॅनेजरने तिला दरवाजाला लागूनच असलेल्या खुर्चीवर बसवलं आणि तो निघून गेला.
शक्ती गोंधळून तिच्याकडे पाहत होता.
"पूर गर्ल! नेहमी डिप्रेशन मध्ये असते. म्हणून तिला अँटीडिप्रेसन्ट घेण्याची सवय आहे. तिने आज जरा ड्रग बदलून बघितलं. ट्रायसिक्लीक अँटीडिप्रेसन्ट! याचा ओव्हरडोस खूप फेटल असतो! तू येण्याच्या काही मिनिटं आधीच ही डोस घेऊन बसली आहे... तिच्याकडे फक्त ट्वेन्टी मिनिट्स आहेत!" डॅनियल रिस्टवॉचवर नजर टाकत थंडपणे पण धमकीच्या सुरात म्हणाला.
शक्ती अगदीच विचलित होऊन तो नम्याकडे पाहत उभा होता.
डॅनियलने ग्लास जमिनीवर सोडून दिला. शक्तीच्या व त्याच्या पायांच्या मध्ये पडून तो फुटला. डॅनियलने शांतपणे आपली पॅन्टेत खोवलेली 'ग्लॉक 19' बाहेर काढली आणि नम्याकडे डोळ्यांत आसवं घेऊन पहात उभ्या शक्तीच्या डोक्याला लावली!
"नाऊ स्पीक! आदर व्हाईस शी विल लूज द चान्स ऑफ लिविंग!" डॅनियल शक्तीला म्हणाला.
शक्ती अहाय्यपणे नम्याकडे पाहत होता...
"बोल! तू पीएमला भेटायला का गेला होतास?" शक्तीच्या डोक्यावर लावलेली गन त्याच्या डोक्यावर रूतवून डावीकडे उजवीकडे फिरवत डॅनियलने विचारलं!
"ही इज माय क्लायंट!" शक्तीच्या डोळ्यांतले पाणी क्षणार्धात सुखले आणि डोळे पुन्हा राकट झालेलं होते.
"काय काम आहे त्याचं?"
"मी नाही सांगू शकत! क्लायंटची आयडेंटिटी रिव्हील करून मी एक रूल मोडला आहे. दुसरा नाही मोडणार!"
"आय नो, यु डू नॉट स्केअर् ऑफ डेथ! पण तू जर बोलला नाहीस, तर पीएम मरेल! आय नो यु डोन्ट वॉन्ट हिम टू डाय सिन्स ही इज युअर क्लायंट! बट नाऊ; ही विल, इफ यु रिमेन क्वाईट! सो ओपन योर् माऊथ!" डॅनियलने भुवया उडवत उपकार केल्यासारखी क्रूरतापूर्वक ऑफर दिली.
डॅनियलने धमकी देऊन शक्तीने तोंड उघडलं नाही! तो फक्त डॅनियलच्या डोळ्यांत जळजळीत नजरेने पाहत राहिला.
"स्पीकअप बॉय! यु हॅव टू सेव योर् गर्ल अलसो! सो स्टॉप वेस्टिंग टाईम!" कुटील स्मिताची लकेर ओठावर खेचत डॅनियल शक्तीला म्हणाला. त्याची ग्लॉक अजूनही शक्तीच्या डोक्याला होतीच!
"जर मला तुझं म्हणणं पटलं, तर मी तुला माफ करेन!" डॅनियल पुढं शक्तीला म्हणाला.
शक्ती काही न बोलता शांतच राहिला... दोन-तीन मिनिटं अशीच गेलीत...
मग डॅनियलनेच त्याची गन खाली घेतली!
"आय रिस्पेक्ट युअर ओर्डीनन्स्! टेक हर् अँड लिव!" डॅनियल शक्तीला म्हणाला.
शक्ती थोडावेळ थांबला. डॅनियल सत्य बोलतोय का ते त्याला पडताळून पहायचं होतं, पण डॅनियलने काहीच हालचाल केली नाही. म्हणून तो खरं बोलतोय याची त्याला खात्री पटली.
आणि तो नम्याकडे धावला.
"तो तिला खुर्चीवरून उभा करत असतानाच...
"सोमेश!" डॅनियल ओरडला.
शक्तीने त्याच्याकडे पाहिलं. डॅनियलने त्याच्या बीएमडब्ल्यूची चावी खिशातून काढून त्याच्याकडे फेकली.
"जॉईन मी लेटर्!" तो म्हणाला.
शक्तीने चावी झेलली होती. त्याने नम्याला हातामध्ये उचलून घेतलं आणि तो केबिन बाहेर पडला...
तक्षणी डॅनियल त्या माणसाकडे वळला. डॅनियलच्या रागाची सीमा नव्हती! डोळे लाल भडक झाले होते! त्याने त्या माणसाला पोटात जोराचा गुद्दा मारला. तो माणूस डॅनियलच्या हातावर वाकला! डॅनियलने त्याच्या कॉलरला धरून त्याला वर केलं. तो माणूस वेदनेने विव्हळत होता!
"तुला मी पीएमवर फक्त नजर ठेवायला सांगितली होती! मग का त्याला मारण्याचा प्रयत्न केलास?" त्या माणसाला अगदी तोंडाजवळ घेऊन डॅनियल ओरडला.
"मी मारणार नव्हतोच! पण तिथं या सोमेशला पाहिलं आणि मला वाटलं हा आणि पीएम मिळून आपल्याला संपवतील. म्हणून..." तो माणूस खजील होत बोलला.
"मग याला का नाही उडवलास? पीएमला टार्गेट करण्याची काय गरज होती?" डॅनियल पुन्हा ओरडला.
"पीएमला मारलं असतं, तर विषयच संपला असता! म्हणून..."
"पुन्हा 'म्हणून'! स्वतःचं डोकं चालवणं बंद कर!" डॅनियल त्या माणसाच्या तोंडावर थुंकी उडवत ओरडला.
"पण जर पीएम मेला असता, तर संसदेत त्याचं कॅबिनेट डिसॉल्व्ह् झालं असतं! अशा परिस्थितीत त्यांचे एमपीज् खरेदी करून आपण सत्तेत येऊ शकलो असतो!" तो माणूस म्हणाला.
"डू यू रिअली थिंक थिस इज दॅट सिंपल?! यु आर् सच अ मोरॉन!" असं म्हणत डॅनियलने त्या माणसाच्या बुद्धीची तुलना सात वर्षांच्या बालकाशी केली होती!
डॅनियलने त्या माणसाची वाढलेली केसं दोन्ही मुठीत आवळली आणि ती डोक्याच्या मागे खेचली. त्याबरोबर त्या व्यक्तीचं डोकं डॅनियलने लावलेल्या जोरामुळे मागे गेलं... तो माणूस कळवळला. शरीराने कणखर असलेल्या त्याच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. वेदनेने त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्यामुळे ते पाणी त्याच्या पापण्यांच्या कडांनी बाहेर छलकलं आणि कनपट्टी पासून खाली ओघळलं!
"तेवढा वेळ नाही आपल्याकडे! विसरू नको! प्रेसिडेंट त्यांच्याच पक्षाचा आहे! तो त्यांचीच आयडीऑलॉजी पाळतो! त्याने एमिडीएट्ली एक्टिंग प्राईम मिनिस्टर अपॉईंट केला असता आणि त्यावेळी त्या मेम्बरला आपली मेजॉरीटी इन्स्टंट्ली प्रुव्ह करणं शक्य झालं असतं! नंतर त्यांनी वेळ न लावता मेबी फुलटाईम प्राईम मिनिस्टर सुद्धा अपॉईंट केला असता! बट अदरव्हाईज, देअर इज ओन्ली फ्यू मंथ्स् लेफ्ट फॉर दि न्यू इलेक्शन्स्, केअर टेकर प्राईम मिनिस्टर वुड हॅव हँडल्ड् दि गव्हर्नमेंट टिल दि नेक्स्ट इलेक्शन्स!
"अँड आबाऊ ऑल; तू म्हणतोयस तसं झालं असतंच, तरी पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा इलेक्शन्स लागतील. अशावेळी प्रामाणिक नसलेल्या उमेदवाराला कोण पुन्हा निवडून देईल? पुढील पाच वर्ष आपली वाया गेली असती. आणि आपण जे घडवून आणलं आहे त्याला काही अर्थ राहिला नसता! पुन्हा आपली सत्ता यायला अनेक वर्षे वाट पहावी लागली असती! म्हणून तू म्हणतोस ते करून काही उपयोग नाही! त्यामुळेच तर पीएमला जिवंत ठेवून आपण पुढील इलेक्शन्ससाठी पार्श्वभूमी तयार केली होती! कळलं???"
डॅनियलने अजूनच जोर लावून त्याची केसं खेचली. तो 'कळलं' हे खूप मोठ्याने किंचाळला होता. जेणे करून तो जे बोलतोय ते त्या माणसाच्या मनावर व पर्यायी बुद्धीवर कोरलं जावं!
"पुन्हा आपलं डोकं चालवू नको! जेवढं सांगितलं जातंय तेवढंच करायचं! मला माझा कोणताही माणूस या प्रकरणात कुठेही अडकू द्यायचा नाही! फॉर् मी, टाईट सिक्ररी इज दि बेस्ट हाईड आऊट! अँड डोन्ट यु डेअर् टू र्युन इट!
"म्हणून तर मी प्रत्येक रिस्की कामासाठी बाहेरील माणसं अपॉईंट करतोय!"
डॅनियलने त्या माणसाला मागे ढकललं. त्याचं आधीच मागे वाकवलेलं डोकं दानकन् त्याच्या मागील भिंतीवर आदळलं!
"यु आर माय स्टेप ब्रदर् अँड फॉर दॅट रिजन, थिस टाईम आएम लेटिंग यु गो! पुन्हा चूक केलीस, तर जिवंत ठेवणार नाही!" डॅनियल लायटरने सिगार जाळत म्हणाला.


बाहेर डॅनियलची कन्वर्टीबल उभी होती. त्याचे छत उघडेच होते. शक्तीने नम्याला पॅसेंजर सीटवर बसवलं. दार बंद केलं आणि तो ड्रायव्हिंग सीटकडे आला. त्याची खूप गडबड होत होती... तो दार न उघडताच उडी मारून गाडीत बसला आणि ती गाडी वेगाने हॉस्पिटलच्या रस्त्याला धावू लागली... त्याचा वेग मोजण्याच्या पलीकडे होता...
फक्त ४.९ सेकंदात शून्य ते शंभर किमी प्रती तास गाठणाऱ्या त्या लाल बीएमडब्ल्यू सिरीज - 'झी 4' मॉडेल - 'एम 40 आय' चा प्रचंड वेग रस्त्यावरील बघणाऱ्यांच्या दृष्टी समोरून क्षणार्धात ती गाडी अदृश्य करून गेला...
गाडी असिमीत वेगाने ट्रॅफिक मधून वाट काढत धावत होती. शक्ती डायव्हिंगमध्ये इतका प्रवीण होता, की एकाचवेळी तो नम्याकडेही लक्ष देत होता आणि त्या भाऊगर्दीतून गाडी देखील काढत होता...
त्याला विचलित म्हणता येणार नाही, पण तो थोडा चिंतित नक्कीच होता...

ती बीएमडब्ल्यू हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांना लागली. शक्ती उडी मारुनच गाडीतून उतरला आणि नम्याच्या साईडला गेला.
एक कंपाऊंडर तिथून बाहेर येत होता.
"तुम्ही इथं गाडी पार्क करू शकत नाही!" त्याने ओरडून शक्तीला सूचना केली.
"हिला पोयजनिंग झालंय!" शक्ती दार उघडून नम्याला हातांत उचलून घेत शक्ती झिटीने ओरडला.
आणि नम्याला उचलून घेऊनच तो हॉस्पिटलमध्ये पळाला. मागून तो कंपाऊंडर आत आला. त्याला ज्या कामासाठी जायचं होतं ते त्याने लांबणीवर टाकलं होतं. तो शक्तीच्या पुढं जाऊन एक स्ट्रेचर घेऊन आला. त्याच्या सोबत आणखी एक कंपाऊंडरला तो घेऊन आला होता...
शक्ती पाशी येऊन त्यांनी स्ट्रेचर थांबवलं. शक्तीने गडबडीने नम्याला ट्रेचरवर ठेवलं. स्ट्रेचर ओ.टी.कडे धावू लागले. शक्ती कंपाऊंडर्स सोबत त्या स्ट्रेचरला ढकलत होता...
"तू जा डॉक्टर साहेबांना घेऊन ये!" स्ट्रेचर घेऊन आलेला कंपाऊंडर सोबत आलेल्या कंपाऊंडरला म्हणाला.
तो कंपाऊंडर स्ट्रेचर सोडून डॉक्टरच्या केबिनकडे धावला...
ऑपरेशन थिएटर बाहेर शक्तीला कंपाऊंडर थांबवले. आणि तो एकटाच ते स्ट्रेचर ढकलत आत घेऊन गेला.

काही वेळात डॉक्टर त्यांना बोलवायला गेलेल्या कंपाऊंडर सोबत आले. विचलित शक्ती ओ.टी.कडे पाहत उभा होता. डॉक्टरनी त्याला हाक मारली,
"एक्स्क्यूज मी!"
शक्ती त्याच्याकडे वळला.
"काय झालंय पेशंटला?"
"अँटी रिलॅक्सटंटचा ओव्हर डोस झालाय!"
"ओके! काउंटरवर जाऊन प्रोसिजर पूर्ण करा."
शक्ती जागीच खिळला होता.
"जा. मिस्टर नाईक. आम्ही आहोत काळजी घ्यायला. घाबरू नका. जा!"
शक्ती तेथेच थांबला. डॉक्टरला समजलं, की त्याला काही महत्वाचं बोलायचं आहे. सो हे समजून डॉक्टरने सोबतच्या कंपाऊंडरला ओ.टी.त जायला इशारा केला.
"शिर्के. आत तयारी करा जा!" डॉक्टर कंपाऊंडरला बोलला.
कंपाऊंडर ऑपरेशन थिएटरमध्ये आत पळाला.
"पोलिसांना इंफॉर्म करावं लागेल?" कंपाऊंडर गेल्याचं पाहून मग शक्तीने विचारलं.
"मी तुम्हाला ओळखत नाही का? त्याची काही गरज नाही. पण या आहेत कोण?"
"महत्वाच्या साक्षीदार आहेत. मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकणार नाही! पण प्लिज माझी खरी ओळख पेशन्टला किंवा इतर कोणालाही कळू नये ही विनंती आहे." शक्तीने याचना केली.
"नाही कळणार!" डॉक्टरने आश्वस्त केलं.
"थँक्स!" शक्ती कृतदनतेने म्हणाला,
"आणखी एक विनंती होती..." तो संकोचत बोलला.
"बोला ना."
"मी रिजाईन केलं असलं, तरी आता पोलिसांसाठीच काम करतोय. पण पोलीस इथं आले, तर माझा एक मोठा प्लॅन खराब होईल म्हणून पोलिसांना इथं प्रोटेक्शनसाठी मी बोलवू शकत नाही. प्लिज तुम्ही देखील पोलिसांना काही कळवू नका. फक्त तुमच्या सिक्युरिटीला सावध रहायला सांगा!" शक्तीने विनंतीचा सुरात सूचना केली.
"तुम्ही निश्चिंत रहा नाईक!" डॉक्टरने शक्तीला आश्वासन दिलं.
व शक्तीची नकळतच मान डोलली आणि त्याचे पाय रिसेप्शनकडे वळले...

रिसेप्शन काऊंटरवर शक्तीला दिलेले काही पेपर्स सोमेश राजमाने म्हणूनच त्याने साइन केले. सोमेशच्या नांवे बनवलेल्या कार्डने पेमेंट केलं. पेपर्स रिसेप्शनिस्टला परत करत असतानाच शक्तीचा फोन घणाणला.
"फोन नॉट अलाव्हड्!" रिसेप्शनिस्ट पेपर्स गोळा करत हळू आवाजात दटावत म्हणाली.
"सॉरी!" म्हणत शक्तीने मोबाईल पाहिला डॅनियलने दिलेल्या मोबाईलवर डॅनियलचा फोन आला होता. त्याने वॉल्युम बंद करून फोन चालूच ठेवला...
"लवकरात लवकर पोलिसांत रिपोर्ट करा!" रिसेप्शनिस्ट शक्तीला म्हणाली. तिचे हात पेपर्स फाईलला सेट करत होते.
"हो!" म्हणून शक्ती बाहेर पडला.

बाहेर येऊन शक्तीने डॅनियलचा कॉल घेतला...
"टाईम फॉर द जॉब!" त्या बाजूने डॅनियल बोलला.
"प्रॉमिस मी तू नम्याला काही करणार नाहीस!" शक्ती त्याला म्हणाला.
"तिला काही करायचं असतं, तर मी तुला तिला वाचवूच दिलं नसतं..." डॅनियल उच्चारला.
शक्ती तसाच गाडीत बसला. आणि गाडी क्लबकडे परतीला लागली...

पंतप्रधान पुनीत चिंतपल्ली यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी बिपीन शुक्ला यांची पंतप्रधान यांच्या रूमला लागूनच असलेल्या अलीकडील रूममध्ये सोय केली होती.
त्याचा उजवा कान मोबाईलला लागला होता.
"आय विल ट्राय! बट कान्ट गॅरंटी यु!" तो म्हणाला आणि विचार करू लागला...
त्याला काही सुचलं. तो उठला आणि खोली बाहेर पडला...

कोरिडॉरमध्ये डावीकडे काही अंतर चालून तो पीएमच्या खोली समोर उभारला. त्याला पाहून काही न बोलता इजंट्स कडून दार उघडलं गेलं.
तो खोलीत प्रवेशला. पीएम लाईव्ह कॉन्फरन्समध्ये होते. ते पाहून तो थबकला. पीएमची त्याच्यावर नजर गेली. त्यांनी हात करून 'पाच मिनिटं' असं दर्शवून तोच हात सोबतच्या सोफा चेअरकडे केला. हा बसण्यास निर्देश होता.
'वाट बघतो!' अशी शुक्लाने पीएमला खूण केली आणि तो दारापाशीच मागे हात बांधून उभारला. मग काही महत्वाचं जाणून,
"आईल् जॉईन यु लेटर्!" म्हणत पीएम यांनी लाईव्ह कॉन्फरन्स कॉल कट केला.
"आओ बैठो। बोलो!" पीएम शुक्लाला म्हणाले.
पीएमच्या आग्रहावरुन शुक्ला त्यांच्या बाजूला जावून बसला.
पण तो काही बोलला नाही.
"बोलो शुक्ला। कोई दिक्कत है?"
"एक्चुअली सर, आय थिंक वी मस्ट टेक एन आय न दॅट एजंट!"
"व्हाय? यू डोन्ट ट्रस्ट हिम्?"
"मुझे वह थोड़ा डाउटफुल लगा!"
"क्यों? ऐसा क्यों लगा तुम्हे?"
"वह नया है! फिर भी, उसका कोई तो रेकॉर्ड होना चाहिए! पर आप ने कहाँ, की उसका कोई रेकॉर्ड है ही नहीं! इसलिए..."
"वह इसलिए, की मैंने ही आयबी को उसका कोई रेकॉर्ड न बनाने के लिए कहा था! ताकि मैं उसका स्टेल्थली उपयोग कर सकूं!"
"पर फिर सर, क्रॉस चेकिंग तो करनी पड़ेगी!"
"तुमको इतना क्यों उसपर संदेह हो रहा है?"
"क्योंकि उसने लिंक्स अमेरिका से जुड़ रहे है ऐसा कहा, पर कोई प्रमाण नही दिया, जो उसकी बातों का समर्थन करते हो।"
"जब तुम यह कह रहे हो; मुझे भी ऐसा लग रहा है..." पीएम विचार करत म्हणाले,
"तो तुम करना क्या चाहते हो?" त्यांनी शुक्लाला विचारलं.
"मैं उसकी थोड़ी जानकारी इकट्ठा करना चाहता हूं!"
"तो करो! पर तुम यह करोगे कैसे?"
"प्रायव्हेट इन्वेस्टिगेटर को हायर करना होगा!"
"पर क्या तुम यहाँ किसी को जानते हो?"
"नहीं! पर मुंबई मैं पहचान हैं! उसे मैं बुला सकता हूं! पर इसके लिए मुझे उस नए आयबी ऑफिसर का फोटो चाहीए होगा। पर उसका तो कोई रिकॉर्ड ही नहीं हैं।!"
"यह तो कोई समस्याही नहीं हैं! तुम वह बात छोड़ो! फोटो तुम्हे मिल जाएगा! जाओ आराम करो!"
"ठीक है सर!"
शुक्ला उठून गेला.
दार नीट लागल्याचं जागेवरूनच कन्फर्म करून पीएमनी एसपी सारंग गोखलेला एसपी ऑफिसमध्ये कॉल केला.
"हॅलो एसपी, पीएम बोलतोय."
"जय हिंद सर."
"जय हिंद! तुमचा तो ऑफिसर... मिहीर! त्याला कॉलवर घ्या!"

"हो हो सर!" एसपी गडबडीत बोलला आणि त्याने जाग्यावरूनच हाक मारली,
"मिहीर!"
त्याचा आवाज मिहीर पर्यंत गेला, की नाही माहीत नाही, पण एक कॉन्स्टेबल आत आला.
"मिहीरला बोलाव. अर्जंट आहे म्हणावं!" एसपी गडबडीतच.
"हो साहेब!" कॉन्स्टेबल बाहेर पळाला.

कॉन्स्टेबल मिहिरच्या डेस्कपाशी आला.
"एसपी साहेबांनी बोलावलंय" तो कामात व्यस्त मिहीरला म्हणाला.
"का?" फाईल पाहतच मिहीरने विचारलं.
"अर्जंट आहे म्हणाले. चला लवकर!" कॉन्स्टेबल त्याला बोलला.
मिहीरने वर पाहिलं, पण कॉन्स्टेबलकडे नाही. काही तरी त्याला स्ट्राईक झालं असावं. तो तक्षणी उठला आणि त्याने एसपीच्या केबिनकडे कूच केली.

केबिनच्या दार उघडून,
"मे आय?" फोन धरून बसलेल्या एसपीला मिहीरने विचारलं. तो बोलतोय असं वाटून त्याने हळू आवाजात विचारलं होतं.
"ये! तुझा कॉल आहे!" एसपी लँडलाईनचा हँडसेट मिहीरकडे समोर करत म्हणाला.
मिहीर प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन रिसिव्हर घेतला,
"हॅलो?" तो पुढे कोण आहे याचा अंदाज घेत म्हणाला.
"पीएम बोलतोय!" पलिकडून आवाज!
"जय हिंद सर!" मिहीर तशातशी सल्युट करत एक्सायटेड्ली म्हणाला.

"जय हिंद! आपली योजना वर्क होते आहे. जरा शक्तीसेनला कॉन्फरन्स वर घेता?" पीएम म्हणाले.

"हो सर! लगेच घेतो!" म्हणत मिहीरने रिसिव्हर मोबाईल खिशातून काढला आणि शक्तीचा मोबाईल शोधू लागला.
शक्तीचा मोबाईल नंबर सापडल्यावर त्याने मोबाईल डेस्कवर ठेवला आणि मोबाईलमध्ये नंबर बघून त्याने लँडलाईनचा डायल पॅड खटकवला...

शक्ती नाईट क्लबकडे ड्राइव्ह करत होता... त्याचा स्वतःचा मोबाईल वाजला...
त्याने मोबाईल काढून पाहिला... कोल्हापूर एसपी हेडकॉर्टरचा नंबर त्याला अनोळखी नव्हता.
त्याने लगेच गाडी बाजूला लावली. कॉल रिसिव्ह केला.
"हॅलो?" तो मोबाईलमधून बोलला.

"सर, मिहीर बोलतोय. दुसऱ्या लाईनवर पीएम आहेत!" मिहीर शक्तीला म्हणाला.

"गुड इविनिंग सर!" शक्ती थेट पीएमशी संवाद साधू लागला.

"गुड इविनिंग! मिस्टर शक्ती, तुम्ही तुमचा पॉईंट प्रुव्ह केला आहे. शुक्ला परपेट्रेटर्संना मिळाला आहे! काय तुम्हाला अजून हे कंटीन्यू ठेवायचं आहे? कारण तो मला मिहीरचा फोटो मागतोय! कशासाठी ते मी तुला सांगण्याची गरज नाही!" पीएम गंभीरपणे म्हणाले.

"हो सर! कारण एका मुलीचा जीव धोक्यात आहे! तिला मी कुठे सेफ जागी पण पोहोचवू शकत नाही, कारण ती आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे... वी हॅव टु डू थिस! सॉरी मिहीर, पण आपल्याला आपल्या प्लॅनला मूव्हऑन करावं लागेल..." फुटपाठच्या कडेला लागलेल्या गाडीत बसून शक्ती बोलत होता.

"काहीच प्रॉब्लेम नाही सर! मला तुमच्यावर विश्वास आहे!" मिहीर धाडस दाखवत म्हणाला.

"मला तुला खरंच हिट करावं लागेल!" शक्तीने त्याला विचार बदलण्याची एक संधी दिली.

"मी पुन्हा तुम्हाला हेच सांगेन सर, आय ट्रस्ट यु!" मिहीरने शक्तीला चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न केला.

"ठीक आहे तर मग मला फोटो पाठवून दे!" पीएम मध्येच बोलले.

"तुला लोकेशन पण सांगावं लागेल. एक काम कर, फोटो पाठवून लगेच तूच पीएम सरांच्याकडे जा. त्यांना सांग, की त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या माणसाच्या तुला काही लिंक्स मिळाल्या आहेत आणि त्या आधारावर तू सिराज नाईट क्लबवर त्याची शहनिशा करायला जाणार आहेस!" शक्ती त्याला म्हणाला.

"पण का सर?" मिहीरने विचारलं.

"त्यांचं काम सोपं करतोय! नाही तर तुला शोधायला त्यांचा वेळ जाईल आणि पर्यायाने आपलाही!" शक्ती म्हणाला.

तिकडे पीएम शक्तीच्या या अघोरीपणावर अक्षरशः चिंतित होत चालले होते,
"थांब शक्ती! तू असं काही करू नको! आपण शुक्लाला ताब्यात घेऊ. त्याच्या थ्रू आपण सगळ्या कुलघातकांपर्यंत पोहोचू!" काळजीत पडलेले पंतप्रधान शक्तीला थांबण्यास सांगत होते...

"ते तर करायचं आहेच सर! पण शुक्ला तर एक पॉन आहे! सो डज दॅट डॅनियल! एक मोठं चित्र आपल्या समोर खुलं व्हायचं असेल, तर आपल्याला मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावं लागेल. आपल्याला अंदाज आहे या मागे कोण असू शकतात, पण त्यांच्या आयडेंटिटीज् रिव्हील झाल्याशिवाय आपल्याकडे फ्रुफ्स् असणार नाहीत. आणि प्रूफ शिवाय आपण काही करू शकणार नाही! ते मिळवण्यासाठी मला डॅनियलच्या गुडबुक्समध्ये रहावं लागेल. आणि यासाठी मला त्याचा विश्वास मिळवायला हवा. हे करणं गरजेचंच आहे. म्हणून घाई करून चालणार नाही!" शक्ती पीएमना समजावत होता.

मग पीएम देखील हतबुद्ध झाले,
"डु एज यु विश्! मिहीर, हॉटेलच्या नंबरवर फोटो फॅक्स करा!" पीएमनी फोन कट केला.

"मिहीर, फोटो पाठव! आपला एग्झेक्युशन पॉईंट असेल, दसरा चौक! रात्री एक वाजता!" शक्तीने इन्स्ट्रक्शन देऊन कॉल ठेवला आणि गाडी परत मार्गावर पळू लागली...

मिहीरने सेकंदाचा वेळ न लावता मोबाईलमधून त्याचा फोटो शोधला. आणि त्याने एसपीच्या प्रिंटरशी मोबाईल ब्लुटूथने कनेक्ट करून प्रिंट काढली. दरम्यान त्याने पंतप्रधान उतरलेल्या हॉटेलच्या वेबसाईटवर जाऊन हॉटेलचा फॅक्स नंबर घेतला आणि जशी प्रिंट निघाली, तशी एसपीच्या फॅक्समशीन वरूनच ती प्रिंट फॅक्स केली.
वास्तविक मेल थ्रूही तो फॅक्स करू शकला असता, पण काही पुरावा मागे रहायला नको म्हणून पंतप्रधान यांनी हा मार्ग अवलंबला होता...
एसपी नुसता बघत होता, मिहीर काय काय करतोय... जे चाललेलं त्यात एसपी कुठे खिजगणतीतही नव्हता. मिहीरने देखील अनावधानानेच त्याची परवानगी न घेता सगळं काम पार पडलं होतं. आणि एसपी बोलणार तरी काय होता... स्वतः पंतप्रधान यांचा फोन येऊन ते मिहीरशी वैयक्तिक बोलल्यानंतर... तो बिचाऱ्यागत फक्त पाहत होता.
काम पूर्ण झाल्यावर मिहीरने निघण्याची परवानगी घेण्यासाठी त्याने एसपीला सल्युट ठोकला, तेव्हा कुठे एसपी मिहीरच्या बुटाच्या आवाजाने भानावर आला...
"हं!" तो एवढंच हुंकारला.
तशी मिहीरने केबिन सोडली. एसपी पाहत होता फक्त...

प्राईम मिनिस्टरनी रिसेप्शनला फोन घुमवला.
"हा, एक फॅक्स येईल तो माझ्या रूममध्ये आणून द्या!" ते सूचना देत म्हणाले.

काऊंटरवर असलेली रिसेप्शनिस्ट कॉडलेसवर बोलत होती. तिचं लक्ष प्रिंट होणाऱ्या फॅक्सवरच होतं.
"हो सर एक फॅक्स आली आहे. पाठवते." पलिकडून गोड आवाजात रिसेप्शनिस्ट म्हणाली.
"थँक्स!" पलिकडून पीएम बोलले आणि फोन कट झाला.
रिसेप्शनिस्टने कॉडलेस रिप्लेस केला आणि जवळून एका पॅसेंजरचे लगेज घेऊन जाणाऱ्या बेलबॉयला हाक मारली.
"रवी!" लगेज नेणारा बेलबॉय आवाजाने थबकला.
"जी मॅम?"
"रूम पंधरामध्ये ही प्रिंट देऊन ये!" ती बेलबॉय सोबतच्या नव्या गेस्टकडे वळली,
"सॉरी सर फॉर इंकविनियन्स, इट्स अर्जंट आयल् गेट यु अनादर हेल्पर!"
"इट्स ऑल राईट!" तो गेस्ट हसून म्हणाला. त्याची संमती मिळताच रवी या वेलबॉय ने "सॉरी!" म्हणत त्याचे सामान खाली ठेवले व ती प्रिंट घेऊन पळत लिफ्टमध्ये शिरला.
रिसेप्शनिस्टने जवळील बेल वाजवली. तो आवाज ऐकलेला आणखी एक बेलबॉय तिच्यासमोर हजर झाला.
"साहेबांचं समान त्याच्या खोलीत पोहोचवा!"
"होय मॅडम!" म्हणत त्याने वाटेतच पडलेलं सामान उचललं.
"या साहेब!" तो म्हणाला आणि दुसऱ्या लिफ्टकडे गेला.
तो काय म्हणाला ते गेस्टला समजलं नसलं तरी बेलबॉयची कृती पाहून तो समजला होता. तो त्याच्या मागून गेला.

लिफ्ट येऊन थांबली, रवी नांवाचा तो बेलबॉय लिफ्टमधून बाहेर आला तो थेट पंधरा नंबरच्या खोली जवळ.
"अंदर के साहाब को देना है।" तो बाहेर तैनात एजंट्सना म्हणाला.
"त्याने समोर धरलेली प्रिंट एका एजंटने हाती घेऊन पाहिली. तो त्या प्रिंटवर छापलेल्या माणसाला ओळखत होता. पीएम यांना तो भेटून गेला होता ना... एजंटने ती प्रिंट ठेवून घेतली आणि रवीला जाण्यास खूण केली.
रवीची लिफ्ट खाली गेल्याचं पाहून प्रिंट घेतलेल्या एजंटने दार उघडलं.

"मे आय सर?"
बातम्या पाहत पीएमनी त्या एजंटला आत येण्याची मानेनेच खूण केली.
"बेलबॉय आस्क्ड् मी टु गिव्ह इट टू यु!" एजंट म्हणाला.
"येस आय वॉन्टेड दॅट!" पीएम त्याला म्हणाले.
एजंटने पुढं होऊन ते प्रिंट पीएम यांच्या हाती सोपवलं, ज्यावर मिहीरचा फोटो होता.
"और जरा शुक्ला को बुला लो!" फोटोवर नजर टाकत पीएम एजंटला म्हणाले.
"येस सर!" म्हणून तो बाहेर गेला.

पीएम पाहत असलेल्या बातम्या मोठ्या विचित्र होत्या...
बातमी देणारी वार्ताहर बोलत होती,
"आमच्या हिंदी माध्यमांच्या हाती आलेल्या सूत्रांनुसार पंतप्रधान अचानक कुठेतरी गायब झाले आहेत! अटकेला सामोरे जायला लागू नये म्हणून त्यांनी पलायन तर केलं नसेल..."
आणि असं बरंच काही ती वायफळ बडबड करत होती...
"कालपर्यंत ही आणि हिचं चॅनेल माझ्या प्रत्येक निर्णयाचं कौतुक करत होती आणि आज मलाच बदनाम करत आहेत. वारं उलटं व्हायला लागलं, की पक्षी देखील वाट बदलतात हेच खरं..." पीएम तेलगूमध्ये स्वतःशीच हसत म्हणाले.

कोरिडॉरमध्ये एजंट खोलीबाहेर पडला तसा तो खोली नंबर चौदाला गेला. त्याने दारावर नॉक केलं. काहीवेळाने दरवाजा उघडला गेला. समोर शुक्ला.
"पीएम सर इज् एक्स्पेक्टिंग यु सर!" तो शुक्लाला म्हणाला.
"कमिंग!" शुक्ला म्हणाला.
आणि त्याने एजंटला पुढं होण्यास खुणावलं. ते बघून एजंट त्याच्या जागी परतला.
शुक्ला त्याच्या रूमबाहेर आला व दार लावून घेऊन तो पीएमच्या रूमसमोर उभारला. त्याच्यासाठी दार उघडलं गेलं.
तो आत प्रवेशकर्ता झाला.

"आओ शुक्ला; आओ! ये रही तुम्हारी तस्वीर! अब करो जो इन्वेस्टीगेशन करना है! पर मैं तुम्हे बता दूँ; लड़का वफ़ादार है।"
"वह तो मैं भी मानता हूँ सर, पर इस सिच्युएशन में एतियात तो बरतनी ही पड़ेगी!" पीएम समोर टेबलवर पडलेली प्रिंट घेत शुक्ला म्हणाला.
"सही है। जो करना है जल्दी करो. ये थोडी देर मे मिलने आने आनेवाला हैं! मुझे इन्वेस्टीगेशन में देरी नहीं चाहिए! अगर ये रुक गया तो इन्वेस्टीगेशन रुक जाएगा!" पीएम चेहऱ्यावर खरंच गंभीरता आणत म्हणाले.
"जी सर!" गंभीरता लक्षात आल्याचा आव आणत शुक्ला बोलला.
"और एक बात; मैं कहा हुँ किसी को पता ना चले इसलिए ये काम तुम्हे बता रहा हूँ!
"हमारे बारे में जो भी चॅनेल्स अफवाह फैला रहे हैं, उन्हें इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री से कहके अन्सर्टन डेज् के लिए अर्जंट ब्लॅक आऊट करावा दो!" पीएमनी फर्मान काढलं.
"पर सर, थिस इज नॉट गुड़ फ़ॉर डिमॉक्रेसी! हम ऐसा नहीं कर सकते!" शुक्ला तात्काळ संभ्रमित होत बोलला.
"चॅनेल्स खरीद सकते थे? खरीदे थे ना? चार साल हमारे गुनगान गाते थकते नहीं थे ये मीडियावाले. शुक्ला, अब इन्हें दिख रहा है, ये अपनी तरफ़ से हमारे लिए कितना भी जोर लगा ले; हम नहीं रहनेवाले! इसीलिए इनकी बोली बदल गयी!" पीएम दात ओठ खात म्हणाले.
"पर सर हमने ऐसा किया, तो सब समझेंगे कि वे लोग जो बोल रहे है, वो सच है!" शुक्ला पुन्हा समजावत बोलला.
"शुक्ला, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर से अगर तुम बात नहीं करना चाहते, तो मैं करता हूँ! मैं इस तरफ जूठ फैलने नहीं दे सकता!" असं धमकावत पीएमनी रिसिव्हर तातडीने कानाला लावला.
"नहीं सर मैं देखता हूँ!" शुक्लाने इच्छा नसताना पीएमनी सांगितलेलं काम आता हाती घेतलं.
पीएमनी रागाने आपटत फोनचा रिसिव्हर रिप्लेस केला. शुक्लाने आपली रूम गाठली.

शुक्लाच्या रुममध्ये, त्याने प्रिंटचा फोटो काढला आणि तो डॅनियलला व्हॉट्सएप केला. एवढंच करून तो थांबला नाही. त्याने डॅनियलला फोन केला,
"डॅनियल आय हॅव सेंट द फोटो ऑफ दॅट आयबी ऑफिसर! प्लिज लूक अफ्टर् हिम." त्याने डॅनियलच्या उत्तराची वाटही न पाहता कॉल कट केला.

इथं, पीएम यांच्या खोली बाहेर मिहीर येऊन थांबला होता. आता त्याला अडवण्याचा प्रश्नच नव्हता. एजंट्सनी दार उघडून त्याला डायरेक्ट एक्सेस दिला.

आत तो सल्युट करून उभा राहिला.
"एक मिनिट!" पीएम समोर उभ्या मिहीरला म्हणाले.
त्यांनी ते बसलेल्या सोफ्याच्या साईड टेबलवर असलेला कॉडलेस उचलला व रिसेप्शनिस्टला कॉल लावला...
"रूम नंबर चौदाला जोडा!" काही क्षण थांबून मग...
"शुक्ला जरा मेरे रूम में आओ!"

थोड्यावेळाने जेव्हा दरवाजा उघडला जातोय असं लक्षात आल्यावर पीएम मिहीरला बोलले,
"तो तुम्हे पक्की ख़बर है?"
"हाँ सर, एकदम पक्की! आप पर हमला करनेवाला जेसन गार्सिया नाम का आदमी हैं! यह इसका असली नाम तो नहीं हैं, पर अभी वह इसी नाम से ऑपरेट होता है!"
"क्या वह अब भी यहाँ कोल्हापुर में हैं?"
"यकीनन! वह रात साढ़े नौ - दस के दरम्यां सिराज नाइट क्लब में होगा ऐसी पक्की इंफॉर्मेशन है! रातभर वह वही रेहनेवाला हैं! सो मैं देढ़ बजे वहाँ रेड करूँगा! उसे और उसके कम्पॅनियन्स को वही ख़त्म कर दूँगा!"
शुक्लाला शब्द अन् शब्द कळावा यासाठी पीएम व मिहीर यांनी मुद्दाम हिंदीत संवाद साधला होता! पण ही गोष्ट शुक्लाच्या लक्षात आली नाही. कारण तो गुन्हेगारांना मिळालेला आहे असा यांना त्याच्यावर संशय आहे हे शुक्लाला माहीत नव्हते. म्हणून त्याने गाफील रहात याकडे लक्षही दिले नव्हते, की आधीच्या भेटीत 'मराठी'त बोलणारे दोघे आत्ता 'हिंदी'त बोलत होते...
"ठीक आहे तू येऊ शकतोस, पण जे करशील ते जीव सांभाळून!" पीएमनी मिहीरला ताकीद दिली!
"येस सर!" तो सल्युट करून निघाला.
मागे शुक्ला उभा होता. करड्या नजरेने मिहिरकडे बघत होता. तो समोरच असल्याने मिहिरने त्याला ग्रीट केलं...
"गुड नाईट सर!" मिहीर स्मित करून म्हणाला.
"गुड नाईट!" शुक्ला बेरकीपणे नजरेनेवरच्या कडांनी पाहत म्हणाला.
ही शुभेच्छा त्याने कशा संदर्भात दिली होती हे मिहीरच्याही लक्षात आलं होतं, पण तो तसं चेहऱ्यावर न दाखवता मुखावरचं स्मित तसंच ठेवून शुक्लाला क्रॉस करून बाहेर गेला.
"आओ शुक्ला!" मिहीरकडे मागे पाहत असलेल्या शुक्लाला बसल्या जागेवरून पीएम म्हणाले.
"आपने बुलाया सर?" समोर पीएमकडे पाहत चेहऱ्यावरील भाव बदलत शुक्लाने विचारलं.
त्यावेळी जर एखादा कमिलियन सरडा तिथं असता, तर शुक्लाला पाहून त्यालाही शरमल्यासारखं झालं असतं...
"जरा टॅक्सेस् के बारे में हम जो नया बिल लाने की सोच रहे है, उसके जरा अपडेट्स देख लो। हमारे सारे इकॉनॉमिकल एडव्हाईजर्स ने बिल पढ़कर कुछ सुचनाएँ दी हो, तो वह मुझे पढ़ने को दो. और एक बात, अपोजिशन के नारायण चटोपाध्याय जी से भी मैंने उसपर राय मांगी थी। क्या उन्होंने कुछ टिपण्णी की है क्या वो भी जरा चेक कर के बताना!"
"ठीक है सर!" शुक्ला जाण्यास वळला.

"क्या तुमने पर्सनल आय से कॉन्टॅक्ट किया?" जाणाऱ्या शुक्लाला पीएमनी चाचपण्यासाठी विचारणा केली.
"जी सर!" परत पीएमकडे वळत शुक्ला म्हणाला.
तो खोटं बोलतोय हे माहीत असून पीएम त्याला गाफील ठेवण्यासाठी बोलले,
"उसे सीक्रेट्ली काम करने को बोलो. मैं कोई फसाद नहीं चाहता!"
"कोई प्रॉब्लम नहीं होगी सर! आप बेफिक्र रहिए!" शुक्लाने लटकं आश्वासन दिलं.
"जाओ!" पीएमनी शुक्लाला जाण्यास परवानगी दिली.
शुक्लाने ओठ थोडे लांबट करत पण भाव न बदलता स्मित केलं आणि त्याने पीएमची रूम सोडली.
शुक्ला गेला तसे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर खरं खूप भावणावश झाले... शक्तीच्या खेळापाई मिहीरचा जीव धोक्यात गेला होता... आणि हे माहीत असून ते हे थांबवू शकत नव्हते... यात काही हस्तक्षेप करू शकत नव्हते... कारण हे एक अनोफिशियल मिशन होते... ज्याचे सगळे निर्णय शक्ती घेणार होता...!
'कोणी दिला होता त्याला हा अधिकार... आपण? त्याने स्वतःसाठी हे अधिकार आपल्याकडून काढून घेतले. आपल्याला त्यासाठी बाध्य केले... कोण आहे हा... का आपण यांच्यासमोर इतके हतबल झालोय...'
असे अनको प्रश्न पंतप्रधान यांना सतावत होते... पण त्यांना त्याचे उत्तर एकच मिळत होते... शक्ती जे काही करेल... योग्य करेल... कोठून आला त्यांना या तरुणाबद्दल इतका विश्वास?
'पहिल्यांदाच आपण भेटलोय याला...? मग यांच्याबद्दल एवढा विश्वास का वाटतोय आपल्याला...? यानं आपल्याला वाचवलंय म्हणून...? तो आत्ताही एका मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणून...? पण तिला वाचवण्यासाठी हा दुसऱ्या एकाचा जीव धोक्यात घालतोय याचं काय...? का हा आपल्या स्वार्थ आहे हे प्रकरण कसंही करून लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी...? याचसाठी आपण त्याला हवं ते करू देतोय का...?'
मिळालेल्या उत्तराचं मंथन करण्यात पीएमनी इतका वेळ खर्च केला, की त्यांना पुन्हा असंख्य प्रश्नांनी घेरलं...

शक्ती गाडी चालवत होता... त्याचं गंतव्य त्याचं त्याला तरी माहीत होतं, नव्हतं की काय असं झालं होतं... का तो कुणी दुसरीकडे चालला होता...?
डॅनियलने त्याला दिलेला फोन वाजला... शक्तीने यावेळी गाडी चालवतच कॉल रिसिव्ह केला...

"फोटो पाठवलाय! बघून घे!" डॅनियल क्लबच्या केबिनमध्येच होता.

शक्तीची गाडी शक्तीने हे ऐकताच कचकन जागेवरच थांबली. जणू गाडीच्या टायर्स रस्त्यात अचानक रुतल्या असाव्यात...
शक्तीने डॅनियलला काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फोन कट केला. शक्तीने फोन सायलेंट करून वायब्रेट मोडवर टाकला. आणि डॅनियलने पाठवलेला फोटो पाहिला. तो फोटो मिहीरचा होता!...

डॅनियलने पुन्हा शक्तीला फोन फिरवला, पण यावेळी शक्तीने तो उचलला नाही. फोन वाजताच राहिला...
डॅनियल अस्वस्थ झाला...
"वाय ही इज नॉट रिसिव्हींग द कॉल?" तो वैतागत पुटपुटला.
अजून दोन - तीनदा यत्न करून मग त्याने शक्तीचा नाद सोडून हिमांशूला फोन केला.
"हिमांशू! नम्याच्या हॉस्पिटल बाहेर आहेस?" डॅनियलने रागाची शिकन तोंडावर आणत विचारलं.

"हो!" हिमांशू गाडीत बसूनच हॉस्पिटलकडे पहात ग्वाही देत म्हणाला.

"तिथंच रहा! माझ्या फोनची वाट बघ!" शक्ती जर परतला नाही, तर डॅनियल नम्याला मारण्याच्या तयारीत होता.

"हो! बॉस!" हिमांशूने फोन कट केला आणि पुन्हा त्याने हॉस्पिटलकडे नजर टाकली.

दुसरीकडे शक्तीची गाडी एका वेअर हाऊसला लागली. बाहेरून ती गंजलेल्या पत्र्यांची शेड मोडकळीला आल्यासारखी वाटत होती... पण तरी ती मजबूत होती!
शक्ती त्या शेडकडे चालत गेला. बाहेरून असलेलं लॉक त्याने गोळी घालून तोडलं. आणि पत्र्याचं दार उघडून तो आत गेला.
त्या शेडच्या मागे एक बिल्डिंग होती. ती पण जर्जरीत वाटत होती... शक्ती भिंतीला लागून असलेल्या काँक्रीट पायऱ्या चढून वर गेला.
वर एक रूम होती. शक्तीने दाराचं नॉब फिसवून पाहिलं. त्याला ते उघडंच मिळालं. तो आत गेला. त्याने दार बंद केलं.

"या साहेब!" एक मशीनगन असेंम्बल करत असलेला जतीन शक्तीला म्हणाला.
शक्ती चालत त्याच्या उजव्या बाजूला आला आणि समोर भिंतीला अधांतरी अटॅच अशा या कडेपासून त्या कडेपर्यंत असलेल्या जाडजूड मेटल शीटच्या टेबलवर शक्ती तिथल्या पसाऱ्यात काही शोधू लागला...
"लॉक तोडायची काय गरज होती. बोलावला असतास मला!" जतीन त्याला थोड्या झिटीने म्हणाला.
"माझ्याकडे तेवढा वेळ नाही!" शक्ती त्याला हव्या त्या वस्तू गोळा करून एकत्र ठेवत म्हणाला.
"काय गडबड चालल्या तुझी? सगळं विस्कटतोयस तू!" हातातील काम सोडून तो शक्तीकडे पाहत म्हणाला.
"इथं व्यवस्थित काय आहे? मी विस्कटायला?" शक्ती वस्तू गोळा करतच होता.
"इज्जत काढायला आला आहेस का?"
शक्ती काहीच बोलला नाही! त्याने खिशातून बुलेट्स काढून टेबलवर विखुरल्या. त्यात त्याच्या 'केल-टेक 30' हँडगनच्या '.22 विंचेस्टर मॅग्नम रिमफायर' राउंड्स, काही 50 बीएमजी रायफलसाठी, तर 50 कॅलिबर शक्तीच्या स्वतःच्या '500 बी अँड डब्लू मॅग्नम'साठी!
शक्तीने डोळ्याला फायबर ग्लासचा चष्मा चढवला आणि आपल्या कामाला लागला.
शक्तीने आधी '.22 कॅलिबर' बुलेट घेऊन ती बारीक हतोड्यासारख्या दिसणाऱ्या फायबर 'बुलेट पुलर'च्या त्या साईझच्या गोल इन्सर्टमध्ये अडकवली व ते पुलरमध्ये स्क्रू सारखं फिरवून पुलर टाईट केला. तो पुलर मग त्याने त्या मेटल टेबलवर आदळून बुलेट व कार्टेज केस वेगळे केले. त्या पुलरमध्ये अडकली बुलेट, गन पावडर आणि कार्टेज केस त्याने बाजूला काढली. हीच क्रिया त्याने '50 बी अँड डब्ल्यू कॅलिबर' व '50 बीएमजी' याच्या बुलेट्स सोबत केली. दोन्हीतील गनपावडर्स त्याने कागदावर ओतल्या.
मग त्याने .22 कॅलिबरमधील गनपावडरचे वजन केले व डिजिटल वजनकाट्यामध्ये '.22' कॅलिबर बुलेटसाठी लागणारी '1.6' ग्रॅम गन पावडर मोजून त्याने '50 बीएमजी' केसमध्ये फनेलच्या सहाय्याने मोजलेली गनपावडर क्रमाने भरून त्यांना ल्युब्रिकंट लावलं, यामुळे गनमधून गोळी स्मुद्ली सुटण्यासाठी मदत होईल. मग त्याने गन पावडर भरलेली 50 बीएमजी मास्टरप्रेसला अटॅच करून लिव्हर खाली ओढून जोरात प्रेस केलं. बुलेट पूर्ववत फिक्स झाली.
हीच क्रिया त्याने '500 एस अँड डब्लू' (50 कॅलिबर) बुलेटसोबत केली. त्या त्या बुलेट्सच्या मेजरमेंट्स नुसार तसे तसे इक्विपमेंट्स वापरले होते. त्या दोन्ही बुलेट्स उठून त्याने खिशात घातल्या.
शक्तीला अंदाज होता, की त्याला देखील एक तर एम 107 वापरावी लागेल, किंवा मग त्याची स्वतःची 50 स्मिथ अँड विल्सन मॅग्नम तरी वापरवी लागेल म्हणून त्याने या दोन्हीच्या बुलेट्स पेनिट्रेट केल्या होत्या...
कोणी त्या बुलेट्सना पाहून म्हणू शकणार नव्हतं, ती त्यांच्यातील गन पावडर कमी करून शक्तीने त्या बुलेट्सच्या पावर्स रिड्यूस केल्या आहेत... हा! एखादा खूपच एक्सपर्ट असता तर त्याला त्या हाती घेतल्यावर वजनावरून ते लक्षात आलं असतं. पण शक्ती थोडीच त्या दोन बुलेट्स कुणाच्या हाती देणार होता...
"मला कळू शकेल साहेब काय करत आहेत?" शक्तीचा चाललेला खेळ संपलेला पाहून जतीनने विचारलं.
"शक्तीने टेबलवर विस्कटलेल्या इतर बुलेट्स उजव्या हाताने गोळा करून खिशात भरल्या.
"रात्री करेक्ट एक वाजण्याआधी शाहू स्मारक जवळ येऊन थांब." गॉगल काढून टेबलवर ठेवत शक्ती म्हणाला.
"का?"
"मी एका ऑफिसरला मारणार आहे! त्याला तू वाचवायचं आहेस!"
"भुलायस काय?" जतीन स्वतः कितीतरी इल्लीगल कामं करत असून त्याने पोलिसाला मारण्याचा कधी विचारही केला नव्हता. 'इल्लीगल' कामं पण 'इथिकली' करावयची हा त्याचा शिरस्ता होता. त्यामुळे शक्तीचा प्लॅन ऐकून त्याच्या अंगावर काटा आला!
"ऑफिसर कोण आहे?" जतीनने विचारलं.
"डीवायएसपी मिहीर देशमुख!" शक्ती निवांत पण गंभीर चेहऱ्याने बोलला.
जतीनला स्वतः भुलल्यासारखं झालं.
"आईची... तुझ्या सोबत तू मला पण मारशील!" जतीन वैतागत ओरडला.
पण शक्तीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सूचना चालू ठेवली...
"एक - दीड इंच टायटेनियमची प्लेट असेल अशा एक बुलेट प्रूफवेस्टची अरेजमेंट कर." शक्तीने शांतपणे सूचना केली.
"अरे अडाणी! एक दीड इंचने या बुलेट्स रोखल्या जाणार नाहीत आणि जरी वेस्टने बुलेट अडवली, तरी या बुलेट्सनी तयार होणारी फोर्स त्या माणसाला मारल्याशिवाय राहणार नाही!" जतीन ओरडला.
"मला माहित आहे! म्हणूनच बुलेट्स मधली गन पावडर कमी केली आहे. इफेक्टिव्ह रेंजच्या बाहेर राहूनच मी गोळी चालवणार आहे. माझ्या सोबत एक व्यक्ती असेल. सो, ऑफिसर मेलाय असं वाटण्यासाठी थोडं तरी रक्त यायलाच हवं. म्हणून फक्त फोर्स कमी करायला टायटेनियम शीटची गरज आहे मला. म्हणूनच टायटेनियम शीट कमी जाडीची हवी आहे. काही प्रॉब्लेम होणार नाही याची फक्त आपण आशा करू शकतो!" शक्ती थंडच होता...
जतीनला काय बोलावं कळत नव्हतं. जतीनने फक्त भुवया उंचावून डोळे मिटून मान हलवली.
"ही बुलेटप्रूफ जॅकेट पोलीस हेडकॉर्टरला जाऊन मिहीर देशमुखच्या हाती दे. जाताना व्यवस्थित पॅक करून ने. कुणाला काही कळता काम नये!" शक्तीच्या इन्स्ट्रक्शन्स.
"तू या ऑफिसरला मारल्यानंतर तुझ्याबरोबर असणाऱ्यांनं हात लावून किंवा जवळ जाऊन पाहिलं तर?" जतीनने शंका व्यक्त केली.
"म्हणूनच हे प्रिपरेशन आहे. पण यात वेळ वेळ व मिहीरचा जीव धोक्यात येईल. सो, त्याची काळजी मी घेईन. मला तेथून सोबतच्या व्यक्तीला घेऊन लवकर निघावंच लागेल त्याशिवाय तू मिहीरला वाचवू शकणार नाहीस."
"तू हे का करतोयस?" जतीनेने निर्णायक विचारलं. त्याला थोपवण्याचा जतीनचा हा शेवटचा प्रयत्न होता... जर त्याने ऐकले नाही, तर आहेच त्याच्या मागून जाणे...
"आएम रिलाईंग ऑन यु ब्रदर्!" शक्ती जतीनच्या प्रश्नाला उत्तर टाळत त्याला नाराजीचा सुरात म्हणाला.
आणि त्याने जतीनची जागा त्यागली. दरम्यान त्याला डॅनियलचे खूप कॉल झाले होते. ते त्याने उचलले नव्हते. फोन फक्त वायब्रेट होत होता...

त्याची गाडी आता क्लबच्या दिशेने पळत होती...

क्लबच्या मॅनेजरच्या केबिनमध्ये मॅनेजरच्या खूर्चीत चिंतित बसलेला डॅनियल खूपच अस्वस्थ झाला होता, पण समोर त्याचा सावत्र भाऊ जेसन असल्याने आपल्या चेहऱ्यावरचे टेन्शन तो दाखवून देत नव्हता. परंतु शक्ती फोन उचलत नाही याने त्याला चांगलेच विचलित केले होते. तो काय करत असेल या विचाराने त्याला हैराण केलं होतं...
शक्ती नक्की कोण हे माहीत जरी नसलं, तरी तो साधारण व्यक्ती नाही हे डॅनियल आता ओळखून होता. आणि यामुळेच तो चिंताक्रांत होता. डॅनियलच्या आज्ञेनुसार जर शक्तीने मिहीरला मारले, तरच शक्ती हा पोलीस किंवा इंटेलिजन्सचा माणूस नसून खरंच तो एक असॅसिन किंवा कॉन्ट्रॅक्ट किलर आहे, ज्याला आपल्या कामाशिवाय कोणाशी कसलेच सोयर - सुतक नाही हे डॅनियलला स्पष्ट होणार होतं.
पण काम स्वीकारलेला शक्ती कामाची वेळ आली तरी अजून पोहोचला नव्हता. तो डॅनियलला टाळत होता का...? असं असेल, तर तो इंटेलिजन्सचा माणूस आहे हे डॅनियलला नक्की होतं!
पण याच्यासाठीही डॅनियलकडे एक हुकूमी इक्का होताच. त्याने नम्याच्या हॉस्पिटल बाहेर असलेल्या हिमांशूला फोन लावला...

वायब्रेट होणारा मोबाईल घेऊन हिमांशूने कॉल रिसिव्ह केला. कॉल कोणाचा होता हे स्पष्ट होतं म्हणून त्याने हॅलो म्हणण्याची तसदी घेतली नाही. पुढून काय आदेश येतोय याची तो वाट पाहत होता...
"हिमांशू, गो फॉर इट!" फोन कट झाला.
हिमांशू हसला! आजपर्यंत जिला तो संरक्षण देत होता; तिलाच आज मारायची त्याच्यावर वेळ आली होती. पण हिमांशू गडबडणारा माणूस नव्हता. त्याला या फालतू भावनिक गोष्टींनी काही फरक पडणार नव्हता. आधी नम्याला संरक्षण देणं हे त्याचं काम होतं, ते तो करत होता. आता तिला मारायचं काम आहे, तेही तो इमाने-इतबारे करणार होता... याच्या नंतर कदाचित त्यालाही आता त्याचं जीवन त्यागावं लागणार होतं हे तो नक्कीच जाणून होता. आणि ते प्राक्तन तो नाकारणारही नव्हता!
आपली '.45 कॅलिबर' 'रुगर एसआर 1911' त्याने बाहेर खेचली. त्याला स्प्रेसर स्क्रू सारखं फिट केलं आणि पार्किंगमध्ये लागून असलेल्या त्याच्या पांढऱ्या टाटा नेक्सॉनमधून तो उतरला. त्याने आपली पिस्टल कोटात लपवली आणि तो हॉस्पिटलकडे चालत गेला. आपल्या कामात प्रोफेशनल हिमांशूने सिक्युरिटीला संशय येऊ नये याची त्याने आपसूक काळजी घेतली होती.

हॉस्पिटलमध्ये तो रिसेप्शनिस्टपाशी आलं.
"एक्स्क्यूज मी, नम्या म्हणून एक लेडीज पेशंट आहे. त्या कोणत्या वॉर्डमध्ये आहेत सांगू शकाल? मी भाऊ आहे त्यांचा." हिमांशूने विचारलं.
रिसेप्शनिस्टने आपला कॉम्प्युटर चेक केला. व ती हिमांशूकडे पाहत म्हणाली,
"सॉरी सर, त्या अजून शुद्धीवर आल्या नाहीत. तुम्ही त्यांना भेटू शकत नाही."
"मी त्यांना त्रास देणार नाही. बाहेर बसून राहीन. प्लिज मॅम!" हिमांशू डोळे ओले करत खोट्याने म्हणाला.
"ठीक आहे! तिसरा मजला. वॉर्ड नंबर सतरा! पण बाहेरच बसा. आत जायचं नाही!" रिसेप्शनिस्टने विचारांती परवानगी दिली.
"होय... होय मॅम. थँक्यू मॅम!" हिमांशू म्हणाला आणि लिफ्टमध्ये शिरला.
लिफ्टमध्ये, त्याचे लक्ष वर जाणाऱ्या अकड्यांकडे होते. तो लिफ्टमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहणं मुद्दाम टाळत होता. पण तसं तो भासवत देखील नव्हता. त्याचं सगळं वागणं अगदी सहज होतं... नम्या असलेला मजला जवळ येईल तसं तो स्वतःचे मनोधैर्य अधिकच सज्ज करत होता.
तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट उघडली. तो बाहेर पडला. आणि त्याचे पाय नम्याच्या रूमकडे चालत सुटले.

काही पावले चालून तो नम्याच्या खोलीजवळ उभा होता. रिसेप्शनिस्टला दिलेलं वचन तो नक्कीच पाळणार नव्हता. दार उघडून तो आत गेला. नम्या व्हेंटिलेटरवर होती. त्याने आपली गन बाहेर काढली. त्याने थोडावेळ विचार केला.
त्याला लक्षात आले, की सप्रेसर असूनही पिस्टलचा आवाज होणार, म्हणून त्याने आपला विचार बदलला. नम्याला मारायचा नाही, तर तिला मारण्याच्या पध्दतीचा...
तो तिच्याकडे चालत गेला. तो तिचा इंहेलिंग मास्क काढणार इतक्यात त्याचा मोबाईल वायब्रेट झाला...
फोन डॅनियलचा असणार हे तो समजला. त्याने नम्याच्या मास्कवर हात ठेवूनच फोन घेतला. तिचा मास्क काढल्यानंतर नम्या तडफडून मरेपर्यंत हिमांशू तिथंच उभा राहणार होता... तिला मरताना पहात... आपण केलेलं काम पूर्ण यशस्वी होतंय की नाही हे बघणं पण त्याचंच काम होतं...
तरी त्याच्या नजरेत नम्या बद्दल कुठेतरी करुणा भासत होती... पण तो ती भावना आत... आत खोल दाबत होता, कारण सोपवलेलं काम त्याला पार पाडायचं होतंच!
"रिट्रीट!" पलिकडून डॅनियलने ऑर्डर दिली.
हिमांशूने नम्याच्या मास्कवरील हात झटक्यात बाजूला घेतला. फोन कट करून खिशात सारत तो नम्याच्या खोलीतून बाहेर पडला. त्याने नम्याकडे पाहण्याची पर्वा केली नव्हती.


इकडे शक्ती मॅनेजरच्या केबिनचे दार पकडून उभा होता. त्याच्या बाजूला जेसन उभा. कदाचित याने दार उघडले असावे, किंवा शक्तीला पाहून तळपायाची आग मस्तकात जाऊन तो ताडकन उठून शक्तीवर चालून आला असावा... शक्तीला पाहूनच डॅनियलने नम्याला मारायचा प्लॅन कॅन्सल (पुढे ढकलायचा निर्णय) केला होता...
नम्याला मारल्यानंतर शक्ती स्वतः त्याला शोधत आला असता याबद्दल त्याला खात्री होती; मग तो असॅसिन असो वा कोणी पोलीस... म्हणून डॅनियलने नम्याला मारण्याचा घाट घातला होता. पण तूर्तास तरी आता ते करण्याची गरज नव्हती...
"एवढा वेळ का?" डॅनियलने रागात मोबाईल खाली करत विचारलं.
"टार्गेटची माहिती काढत होतो!" शक्ती म्हणाला.
"आणि काय कळालं?"
"तो इथल्या पोलीस हेडकॉर्टर्स सोबत पण रिलेशन ठेऊन आहे!" शक्तीने उत्तर दिलं.
"याचा अर्थ तो खरंच डेंजरस आहे!"
"जर त्याने सुशेन आणि तुझी लिंक शोधून काढली, तर सगळं संपलं!" शक्तीने माहितीत भर घातली!
"टेक केअर ऑफ हिम!" डॅनियलने ठाम निर्णय सुनावला.
"ओके!" शक्तीने प्रपोसल मान्य केलं.
"पण लक्षात आहे ना? तू पकडला गेलास, तर..." डॅनियल आठवण करून देत बोलला होता.
पण त्याला शक्तीने वाक्य पूर्ण करू दिल नाही.
"तूही लक्षात ठेव! मी माझ्या क्लायंट्सची नांवं जीव गेला तरी डिस्क्लोज करणार नाही!" शक्ती म्हणाला.
"आय ट्रस्ट यु. टोल्ड यु जस्ट फॉर दि रिमाईंडर!" डॅनियल म्हणाला.
"नो वरी! माझी 500 बी अँड डब्ल्यू मॅग्नम त्याला माझी ओळख पटवायला जिवंत ठेवणार नाही!" शक्ती आपली मासिव्ह रिव्हॉल्व्हर शोल्डर होलस्टरमधून बाहेर काढत म्हणाला.
"नाही!" डॅनियल म्हणाला.
आणि तो उठून शक्तीसमोर आला. त्याने जवळच असलेल्या जेसनच्या होलस्टरमधली त्याची 'ट्रिपल एक्शन थंडर' खेचली. आणि शक्तीच्या अंगावर फेकली. शक्तीने झेलली.
"युज थिस!"
"अँड यु से यु स्ट्रस्ट मी!" शक्ती चेहरा विक्षिप्त करून डॅनियलच्या नजरेत रोखत म्हणाला.
डॅनियल निर्लज्जासारखा नुसता हसला. शक्तीने त्याच्याकडे एक डिस्गस्टिंग लूक दिला. त्याने आपली रिव्हॉल्व्हर पुन्हा होलस्टरमध्ये खोवली व जेसनची गन त्याच्या हाती आदळून तो बाहेर पडला. डॅनियलने जेसनला शक्तीला फॉलो करण्याचा इशारा केला. जेसन शक्तीच्या मागून बाहेर पडला...


या बाजूला जतीनची आपली धांदल चालू होती...
बुलेटप्रूफ वेस्टच्या पुढील पॉकेटमध्ये त्याने टायटेनियम शीट सरकवली. आणि जतीनने ते पॉकेट सील केलं.
बुलेटप्रूफ वेस्ट तर रेडी झालं होतं. आता हे पोहोचवायचं होतं ते मिहीरपर्यंत...
दुसऱ्या कोणावर हे काम सोपवण्याचा वेळ नव्हता म्हणून जतीन स्वतः ते बुलेटप्रूफ वेस्ट घेऊन बाहेर पडला. डोक्यावर कुरियर बॉय सारखी टोपी घातली होती. एक लांब बंदाची बॅग देखील त्याने तिरकी लटकटी घेतली होती.
पण त्या आधी त्याने ते एका बॉक्समध्ये ते वेस्ट नीट रॅप केलं होतं. त्याच्यावर त्याने शक्तीचं नांव लिहिलं.
कारण हे पॅकेट थेट जाणार होतं, पोलीस हेडकॉर्टर्सला. अनोळखी व्यक्तीने दिलेलं पॅकेज मिहीरने ओळखण्यास नकार दिला असता, तर ते चेक होण्याची मोठी शक्यता होती. आणि स्पष्टीकरण देण्याइतपत वेळ नव्हता. म्हणून शक्तीच्या नावाने तो धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार होता...

ते पॅकेज घेऊन जतीन पायऱ्या उतरून खाली आला. शेडमध्ये असलेली आपली स्कुटर त्याने आपलं स्थूल शरीर सांभाळत बाहेर काढली. टोपीवरच त्याने स्कुटरच्या हँडलवर लटकेलं ओपन फेस हेल्मेट घेऊन घातलं आणि त्याची स्वारी निघाली...


इकडे शक्ती जेसनला आपल्या रूमवर घेऊन आला होता!
"किती वेळ झालं मी विचारतोय, तू मला इथं का घेऊन आला आहेस?" जेसन शक्ती मागून खोलीत प्रवेश करत शक्तीवर ओरडला.
शक्ती विकट हसला,
"नॉट फॉर मेकिंग लव अफकोर्स!" शक्ती मस्करी करत म्हणाला.
त्याच्या या वाक्यावर जेसन खिजला गेला. चिडून त्याने शक्तीला मागे वळवून त्याची कॉलर पकडली!
"मी शेवटचं विचारतोय!" तो ओरडला.
शक्तीने शांतपणे त्याचे हात बाजूला केले, पण हे करत असताना त्याने थोडा जोर लावून जेसनचे हात दाबले होते.
"आपलं काम रात्री एक वाजता आहे. तोपर्यंत काय रस्त्यावर बसणार आहेस?" शक्ती त्याला म्हणाला.
"पण तुझा प्लॅन काय आहे? तू त्याला कुठं आणि कसा मारणार आहेस?"
"बघशील तू!" एवढंच बोलून शक्ती बाथरूममध्ये गेला.
जेसनला मुसक्या आवळून वाट बसण्याशिवाय आता पर्याय नव्हता...

बाथरूममध्ये शक्तीने शॉव्हर खाली काही काळ सगळ्या गोंधळाचा, विचारांचा निचरा करण्याचा प्रयत्न केला...
तो बाहेर आला तसा जेसन उठून उभारला...
"चल!" तो म्हणाला.
शक्तीने अंगात कपडे चढवले आणि तो खोली बाहेर पडला...

आला तो खाली हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये. त्याने ऑर्डर दिली.
"आर यु किडींग मी?" जेसन चांगलाच चिडला.
"तुला माझा मार्ग योग्य वाटत नसेल, तर जाऊ शकतोस. मी माझं काम माझ्या पद्धतीने करेन!" शक्ती बोलला.
"डॅनीमुळे तुझ्याबरोबर रहावं लागतंय. नाही तर...!" तो चिडून बोलला.
त्याच्याकडे दूर्लक्ष करून शक्ती आलेलं अन्न खाण्यात गुंतला...
खाणं हा त्याचा मोठा विरंगुळा होता... बरेच जण खाण्यासाठी जगतात. हा जगण्यासाठी खातो! म्हणून हवं तेवढं आणि मोजून मापून... पण या धकाधकीत त्याला इतक्यात तेवढं देखील खाणं झालं नव्हतं. वेळ होता म्हणून मग तो हा वेळ सत्कारणी लावत होता...
जेसन त्याच्याकडे वैतागाने चेहऱ्यावर असिमीत राग घेऊन पाहत होता.
शक्तीने त्याला अजून डिवचण्यासाठी तोंडात घालत असलेला घास पुढं करून 'हवं का' विचारलं. असं करून त्याने जेसनच्या क्रोधात भरच टाकली...
जेसनला चिडवायला शक्तीला मजा येत होती...

इथे जतीन कोल्हापूर पोलीस हेडकॉर्टर्स, बावडाला पोहोचला होता. त्याची बाईक गेटला लागली, तोच मिहीर त्याची फोर व्हीलर घेऊन गेट बाहेर पडला. त्याची इथली ड्युटी संपली होती आणि तो आता दुसऱ्या 'ड्युटी'वर निघाला होता...
संध्याकाळ होती, अजून बराच वेळ होता... पण कदाचित त्याला मनाची तयारी करायची असावी... त्याची कामाची वेळ संपली होती आणि तो इथं थांबून काही करूही शकत नव्हता... सो तो हेडकॉर्टर्स मधून बाहेर पडला होता...
जतीनने मिहीरला कधी पाहिलं नव्हतं. शिवाय गाडीत कोण आहे हे पहायला त्याला वेळ नव्हता. त्याला त्याचं काम पूर्ण करायचं होतं.
तो स्कुटर गेटवर ठेवूनच पायात ठेवलेलं पॅकेट घेऊन आत जाऊ लागला, पण एका कॉन्स्टेबलने त्याला काही पावलं चालून गेल्यावरच अडवलं.
"काय? कुठं?" कॉन्स्टेबलने जतीनला विचारलं.
"पार्सल हाय!" जतीन म्हणाला.
"मग दारात गाडी लावून कुठं?"
"साहेब जरा अर्जंट हाय. मिहीर म्हणून कोण हायत, त्यांना त्यांना हे द्यायचं हाय!" जतीन म्हणाला.
"कुणी पाठवलंय?"
जतीनने उगाचच पॅकेजवरील नांव वाचायचं नाटक केलं.
"शक्ती... नाईक... म्हणून कोण आहेत!" नांव वाचून पुढील वाक्य जतीन कॉन्स्टेबलकडे पाहून बोलला.
"अरे खरंच अर्जंट दिसतंय!"
"होय!"
"हे मिहीर कुठं भेटतील?"
"ते काय आत्ता त्यांचीच गाडी गेली की!" कॉन्स्टेबल गडबडीत म्हणाला.
त्याचं पूर्ण वाक्य ऐकायला देखील जतीन थांबला नाही. तो गर्रकन् मागे वळला आणि स्कुटर त्याने गाडी ज्या दिशेला गेली तिकडे घेतली...

काही अंतर स्कुटर पळवल्यावर जतीनला त्याच्या समोरून गेलेली गाडी दृष्टीगोचर झाली...
जतीनने स्पीड वाढवली. त्याने स्कुटर ड्रायव्हिंग सीट जवळ नेली. जतीनची स्कुटर मिहीरच्या फोर व्हीलरच्या समकक्ष धावत होती...
त्याने वर असलेल्या खिडकीच्या काचेवर नॉक केलं.
गाडीत, मिहिरने शंकीत नजरेनं बाहेर त्याच्या सोबतच स्कुटर हाकणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं. जतीन त्याच्याकडेच पहात होता. त्याने मिहीरला काच खाली करायला खूण केली.
जशी काच खाली झाली, जतीनने पार्सल खिडकीतून आत मिहीरच्या मांडीवर सरकवलं आणि न थांबता तो वेग वाढवून पुढं निघून गेला.
पण गाडीत पार्सल मांडीवर पडल्या पडल्या मिहीरने ब्रेक लावला होता आणि गाडी जागीच थांबली होती.
असं अचानक अनपेक्षित घडल्यानं भीती वाटणं सहाजिक होतं... पण पार्सलवर शक्तीचं नाव बघून मिहीर रिलॅक्स झाला.
त्याने तातडीने ते पॅकेज फोडून पाहिलं. आत बुलेटप्रूफ जॅकेट! याचे काय करावयचे हे त्याला सांगण्याची गरज नव्हती.
आता तो पूर्ण आश्वस्त व निर्धास्त झाला!

रात्री बाराच्या पुढे... शक्ती जेसनला घेऊन दसरा चौकपासून पूर्वेला शाहू थिएटरजवळ थांबला होता. दसरा चौक पासून सुमारे ४५० मीटर (साधारण १४७७ फूट), पूर्व. त्याच्या कानात ब्लुटूथ लागलेला होता.
सहाजिक कॉन्फरन्सवर मिहीर आणि शाहू स्मारकाच्या मैदान पार्किंगमध्ये आपल्या गाडीत बसून असलेल्या जतीनशी तो कनेक्टेड् होता.

एक वाजायला काही मिनिटं होती... शक्तीने जेसनकडून त्याची गन घेतली. त्यात 50 बीएमजी बुलेट लोड केली आणि ती पिस्टल स्वतःच्या रिकाम्या शोल्डर होलस्टरमध्ये ठेवून घेतली.
सुदैवाने जेसनच्या गनमध्ये देखील एम 107 रायफलसाठी वापरली जाणारी बुलेटच वापरली जात असल्याने शक्तीला अपेक्षा नसताना भलतीच गन बदलावी लागली असली, तरी ते त्याच्या पथ्यावरच होतं. की शक्तीला याचा अंदाज होता... काही असलं, तरी शक्तीचा प्लॅन वर्क होईल याची शक्तीने तरतूद करून ठेवली होती...
शक्तीने डॅनियलने दिलेल्या बीएमडब्ल्यू रेज केली आणि तो शाहू स्मारकाकडे निघाला...
त्याच्या वेगाला सीमा नव्हती... समोरून आसपास त्याच वेगात मिहीरची गाडी येताना तो आणि बाजूला असलेला जेसन देखील पाहत होता.
छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या १२० मीटर अलीकडेच शक्तीने गाडी झर्रकन आडवी करून ब्रेक मारला. गाडी हॉरीझोन्टल ड्रीफ्ट होऊन थांबली. चाकांतून धुराचा लोट उडाला.
समोरून आलेल्या मिहीरच्या गाडीला पण थांबवणे क्रमप्राप्त होते. शक्ती गाडीतून उतरला होता. त्याने शोल्डर होलस्टर मधून पिस्टल बाहेर काढली. पिस्टलवर स्कोप लावला. इतक्यात जेसन त्याच्या बाजूला येऊन उभारला होता. शक्तीने स्कोपमधून लक्ष साधलं. जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब वरून येत असलेल्या मिहीरच्या गाडीला शक्ती काही काळ पाहत होता...
आणि शक्तीने फायर केलं. तीक्ष्ण टोक असलेली बुलेट वाऱ्याला चिरत १२० मीटर (सुमारे ३९४ फूट) दूर असलेल्या व शक्तीच्याच दिशेने प्रवास करत असलेल्या मिहीरच्या गाडीच्या बॉनेटवर आदळली. बॉनेट भेदलं गेलं. इंजिन खराब झालं होतं. त्यातून धूर बाहेर पडू लागला...
छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून पाच एक मीटर पुढं आल्यावर मिहीरची गाडी थांबली...
शक्तीने जेवढी गनपावडर बुलेट कार्टेजमध्ये भरली होती, तेवढी ११४ मीटर पर्यंतच कार्यकुशल ठरणार होती. म्हणून मिहीर फक्त १ मीटरने का होईना, पण डेंजर झोनच्या बाहेर होता.
मिहीरची गाडी पण व्हर्टिकली जरा पुढं घसटत गेली होती. गाडीला कंट्रोल करण्याचा मिहीरने प्रयत्न केला होता व स्टेअरिंग त्याच्या डावीकडे वळवली होती. त्याची मारुती सुझुकी हॉरीझोन्ट थांबली होती.
गाडी अशी अचानक गोळी लागून थांबल्याने तो तिरिमिरीतच गाडीतून उतरला. त्याने गाडीचं बॉनेट पाहिलं. गोळीचे छिद्र स्पष्ट दिसत होतं.
इकडे शक्तीने खास तयार केलेली '50 बीएमजी' बुलेट 'ट्रिपल थंडर' पिस्टलमध्ये मागून नळीत सारली व ती सिंगल शॉटगन रिलोड केली. जसा मिहीर बॉनेट पासून वळला आणि त्याचं तोंड शक्तीकडे झालं, शक्तीला तो लांबून गन उंचावून उभारलेला पाहत होता. त्याने त्याची पिस्टल बाहेर काढण्यासाठी आपला हात होलस्टरकडे नेला. पण शक्तीने त्याला तेवढा वेळ दिला नाही. त्याने मिहीरवर शूट केलं!!!
रस्ता पूर्ण मोकळा असल्याने ते दूर वरून एकमेकांना सहज पाहू शकत होते...
शक्तीने चालवली बुलेट सरळ रेषेत प्रवास करत मिहीरला छातीवर हिट झाली! मिहीर मागे ढकलला गेला. तो आदळल्याने उघडा दरवाजा झाकला गेला आणि तो दारावर घसटतच खाली पडला!
ट्रिपल एक्शन पिस्टलने फायर केल्याने गोळीच्या ती जबरदस्त फोर्स झेलावी लागल्यामुळे मिहीर तक्षणी बेशुद्धावस्थेत गेला होता.

शक्तीला आपल्या कामावर पूर्ण विश्वास होता. म्हणून त्याने स्कोप असलेली पिस्टल जेसनला हँडओव्हर केली आणि स्कोपमधून पहायला सांगितलं.
जेसनने पाहिलं. दूरवर असलेला मिहीर त्याला स्कोपमधून अगदीच जवळ भासत होता. रक्तस्राव चालू झालेला होता... तो त्याला निपचित पडलेला सहज पाहत होता!
तरी जेसनचं समाधान झालं नव्हतं. मिहीर खरंच मेलाय की नाही हे त्याला खात्रीशीर जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्याने शक्तीला क्रॉस करून बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हिंग सीटकडे पावलं टाकली, पण शक्तीनं मागे वळून ड्रायव्हिंग सीटपाशी पोहोचलेल्या जेसनचा हात धरून त्याला अडवलं.
"मला चेक करू दे!" मागे पाहत जेसन ओरडला.
"इथं थांबणं योग्य नाही! तू त्याच्या जवळ गेलास, तर तुझे काही ना काही ट्रेसेस त्याच्या जवळ राहतील! शिवाय फायरिंगचा एवढा मोठा आवाज झाल्यामुळं लोक सतर्क झाले असतील!" शक्तीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
"पण तो मेलाय की नाही हे बघायला पाहिजे!"
"तो मेला नसला, तरी ब्लड लॉसने मारला जाईल! तू त्याची काळजी करू नको! त्याच्या मरणाची न्यूज फोटो सकट तू उद्या पाहशील!"
"मी चेक करणारच!" म्हणत जेसनने शक्तीचा हात झटकला.
"तू माझ्याकडे पर्याय ठेवला नाहीस!"
म्हणत शक्तीने खिशातून जेसनच्या पिस्टलमध्ये आणखी एक 50 बीएमजी लोड केली; यावेळी खरी! कोणतीही छेडछाड न केलेली!
"तुझी पिस्टल माझ्याकडे आहे हे विसरू नको!" पिस्टलचा रिअर भाग लॉक करून शक्तीने वर जेसनकडे नजर टाकली व त्याच्यावर ती पॉईंट देखील केली!
"इतक्या जवळून तुझ्या चिंध्या पण राहणार नाहीत!" शक्ती जेसनला धमकावत बोलला.
शक्ती वेडा माणूस आहे हे जेसन आत्तापर्यंत जाणून चुकला होता. तो झिटीने पाय आपटत त्याच्या जागी जाऊन बसला.

शक्ती पण मग ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी मागे शाहू थिएटरकडे म्हणजे जिथून आली होती तिकडे पळवली.

इकडे तिथे शाहू स्मारकाला लागून असलेल्या मैदानात पार्किंगमध्ये लागलेल्या गाडीत बसून जतीन हे सगळं पाहत होता. जशी शक्तीच्या गाडीचा आवाज अगदी दूर गेलेला त्याला जाणवला, तसा जतीन आपल्या कार मधून उरतून धावत मिहीर जवळ आला...
पण मिहीरला मदत करण्यापूर्वी प्रथम त्याने आधी मिहीरचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला. कारण शक्तीने 'न्यूज' व 'फोटो' संदर्भात दिलेला संकेत त्याने जाणला होता. हे काम त्यालाच करावं लागणार हे तो ओळखून होता!
आणि मग मिहीरला स्वतःच्या गाडीत मागच्या सीटवर घालून जतीनने गाडी सिपीआरकडे पळवली!

गाडीत मागे मिहीरकडे पाहत जतीन टेन्शनमध्ये गाडी पळवत होता... मिहीरच्या गाडीचा प्रवास दक्षिणेला सीपीआरकडे चालला...
"सन ऑफ अ ##! साला रिजाईंड् आहे दोन वर्षांपासून! पण मेंदूला अजून गंज लागला नाही साल्याच्या! मुद्दाम त्याने दसरा चौक निवडला. कारण इथून सीपीआर फक्त एका मिनिटाच्या अंतरावर आहे! इफेक्टिव्ह रेंजची पण परफेक्ट जुळवणी इथं झाली! मला पण यानं माझ्या वजनामुळंच निवडलं!" आ##ला!" जतीनला शक्तीच्या बुध्दीचं कौतुक वाटत होतं.
पण त्यांच्या 'लव-हेट' रिलेशनमुळे तो शक्तीची प्रसंसाही शक्तीला शिव्या घालून करत होता... त्याशिवाय त्याला मुखशुद्धी झाल्यासारखं वाटलं नसतं... तिकडे नक्कीच शक्तीला उचक्या लागत असणार...

पण तसं काही नव्हतं! शक्ती एकदम लांबट व भावनारहित चेहरा ठेवून गाडी चालवत होता...