Antahpur - 10 books and stories free download online pdf in Marathi

अंतःपुर - 10

१०. पुनर्जीवन (रि-लाईफ)...

दसरा चौकपासून सुमारे एकशे सत्तर मीटर दक्षिणेला असलेल्या सीपीआरला मिनिटभराच्या अंतराने जतीनची गाडी लागली. त्याने कुणाला न बोलावता, स्ट्रेचरची वाट न बघता मिहीरला हातात उचललं आणि तो सीपीआरच्या मुख्यव्दाराकडे धावला...

तो आत आला. एक डॉक्टर त्याला दिसला. त्याने हाक मारली,
"डॉक्टर!"
डॉक्टर मिहीरला मूर्च्छित पाहून तो लगेच जतीनकडे आला.
"काय झालंय!" डॉक्टरने मिहीरकडे न पाहता जतीनला विचारलं.
"गोळी लागली आहे!"
"ही तर पोलीस केस आहे..." डॉक्टर हात वर करण्याच्या इराद्यात होता...
"ह्यो स्वतः पोलीस आहे! लवकर ट्रीटमेंट चालू करा!" जतीन ओरडला.
"ठीक आहे ठीक आहे." डॉक्टर गडबडला.
त्याने कम्पाऊंडर्सना हाक दिली. कम्पाऊंडर्सना पण तत्परतेने धावत आले.
"यांना ओटीमध्ये घ्या!" डॉक्टर तसदीने बोलला.
कम्पाऊंडर्सनी पण इमर्जन्सी लक्षात घेऊन स्ट्रेचरची औपचारिकता न करता मिहीरला जतीनच्या हातून उचललं व त्याला तातडीनं ओटीमध्ये हलवलं. डॉक्टरने देखील त्यांच्या मागून घाईने केली...

जतीन हॉस्पिटलबाहेर आला. त्याचं काम अजून संपलं नव्हतं.
त्याने व्हॉट्सएपमधून शाहू स्मरकाजवळ मिहीरचा काढलेला फोटो शक्तीला पाठवला...


मेसेज आल्याचं वायब्रेट झालं. गाडी चालवत असलेला शक्ती काय ते समजला. त्याने गाडी क्लबकडे घेतली...

जेसन खाली उतरला. पण शक्ती गाडीत बसूनच होता.
"मी नम्याकडे हॉस्पिटलला जातोय. नंतर येऊन भेटतो म्हणून डॅनियलला सांग!" शक्ती म्हणाला आणि जेसनच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता त्याने गाडी पळवली!

जतीन देखील हॉस्पिटल बाहेर आपली गाडी घेऊन त्याच्या ठिकाणाला लागला होता...

डॅनियल शक्ती बसत असलेल्या सोफ्यावर आपल्या मैत्रिणींसोबत बसला होता. तो स्वतः त्याच्या मैत्रिणींसाठी ड्रिंक्स सर्व्ह करत होता. खूप रात्र झाल्याने इतर कस्टमर्स गेले होते. पण पुढं नाचगाणं डॅनियलने आज तसंच चालू ठेवलं होतं. जेसन पुढं येऊन थांबला, तेव्हा त्याच्यावर नजर पडताच डॅनियलने नाचगाणं बंद करून सोबत बसलेल्या मैत्रिणींना देखील जायला सांगितलं.
क्लब पूर्णतः रिकामा झाला. म्युझिक बारीक आवाजात चालूच होतं. डॅनियलचा शौक क्लबमध्ये माहीत होता.
"हाऊ वॉज इट?" हातातली बाटली टेबलवर बाजूला ठेवत डॅनियलने विचारलं.
"ही फायर्ड् ऑन दॅट एजंट! बट आय डोन्ट ट्रस्ट हिम!" जतीन डॅनियलच्या बाजूला बसत म्हणाला.
"का?" डॅनियलने तडख विचारलं.
"त्याने खूप लांबून फायर केलं. मला चेक सुद्धा करू दिल नाही!" जतीन शंका व्यक्त करत बोलला.
"किती लांबून?" डॅनियलने विचारलं.
"अराऊंड् वन फिफ्टी ऑर टू हँड्रेड् मीटर्स!"
"हॅ! देन नो प्रॉब्लेम! 50 बीएमजीज् रेंज इज सेवन थाऊसेंन्ड् मीटर्स!"
"बट!"
"रिलॅक्स! हॅव अ ड्रिंक!" डॅनियल मागे रेलून म्हणाला.
"पण त्याने मग मला चेक का करू दिलं नाही?" जेसनची शंका दूर झाली नव्हती. त्याने शंकीत विचारलं.
"तुला तो काय बोलला?"
"म्हणाला की मी बॉडीच्या जवळ गेलो तर माझे ट्रेसेस तिथं राहतील..."
"ही वॉज राईट प्रोबॅब्ली!" डॅनियल म्हणाला,
"ही रिअली इज समथिंग आय मस्ट हॅव टू एडमीट!" डॅनियल इम्प्रेस होत म्हणाला.
"हाऊ कॅन यु सो रिलाईबल ऑन हिम? यु आर नॉट लाईक थिस!" जेसन नाराजी व्यक्त करत ओरडला!
"बिकॉज; इफ ही ट्राईज् टू डबल क्रॉस अस, आय विल मेक हिस लाईफ हेल! अँड आय ट्रस्ट मायसेल्फ फॉर दॅट!" डॅनियल आत्मविश्वासाने म्हणाला व एकाच टोस्ट मध्ये त्याने राहिलेलं ड्रिंक संपवलं!


शक्ती नम्याच्या शेजारी बसून होता. तिला मध्यंतरी एकदा नम्या शुद्धीवर आली होती. म्हणून शक्तीला तिच्याजवळ थांबण्याची परवानगी दिली गेली होती.
अचानक त्याला आठवलं. त्याने जतीनने पाठवलेला फोटो पाहिला आणि तो उठून बाहेर गेला.

इकडे पंतप्रधान यांच्या रूममधला फोन घणाणला. रात्रीच्या शांततेत तो आवाज घुमला. पीएमनी तातडीने कॉल रिसिव्ह केला.
जे घडत आहे त्याच्या कल्पनेने त्यांना झोप येत नव्हती. ते काळजीने जागूनच होते...
"सर, कोणी शक्तीसेन आपल्याशी बोलू इच्छितात!" पलिकडून रात्री अपॉईंट असलेली रिसेप्शनिस्ट बोलली.
"जोडून द्या!" पीएमनी परवानगी दिली.
"हॅलो सर!" पुढचा आवाज शक्तीचा होता!
"बोला शक्तीसेन!" पीएम ठामपणे बोलले. पण त्यांची चिंता ओसरली नव्हती.

"सर, मिहीर मेलेली न्यूज चॅनेल्स व न्यूजपेपरला द्यायची आहे!" शक्ती म्हणाला.
तो भिंतीत डोकं खुपसून बोलल्यासारखं वॉर्डमधून बाहेर आल्या आल्या समोरील भिंतीकडे तोंड करून उभारला होता.

"काय म्हणजे तुम्ही खरंच..." पीएम दचकले होते. त्यांना पुढं बोलवलं नाही...
"नाही सर! पण शत्रूंना हे पटायला हवं! म्हणून ही न्यूज जाहीर करावी लागेल! पण सर, त्या आधी एसपीना सांगून मिहीरच्या घरच्यांशी बोलून घ्यायला सांगा. नाही तर हे खरं समजून त्यांना उगाचच याचा त्रास होईल." शक्ती म्हणाला.

"यु आर राईट! मी बोलतो! तू फोटो ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीला मेल कर!" पीएम जरा रिलॅक्स होत बोलले.

"हो सर! पण एक रिक्वेस्ट आहे. सध्यातरी यात अपोजिशनचं नांव घेऊ नका. नंतर तुम्हाला राजकारण करायला खूप वेळ मिळणार आहे!"
"हं!" पलिकडून गंभीर असे पीएम उद्गारले.
"बाय सर!" म्हणून शक्तीने फोन कट केला.
मेल करण्याआधी त्याला आणखी एक काम करणं बाकी होतं. आणखी एकाला आत घेणं गरजेचं होतं!
शक्तीने तो पूर्वी काम करत असलेल्या अँटी टेररिसम सेलला फोन लावला.
"शक्ती बोलतोय! आधार हॉस्पिटल बाहेर पांढरी टाटा नेक्सॉन नंबर एमएच शून्य नऊ एपी सोळा शून्य पाच मध्ये एक व्यक्ती बसून आहे. त्याब्यात घ्या त्याला!" एवढी सूचना देऊन शक्तीने फोन कट केला.
शक्तीची व हिमांशूची प्रत्यक्ष कधी भेट झाली नव्हती. डॅनियलने गोपनीयता म्हणून आपले इम्प्लॉई एकमेकांपासून अपरिचितच ठेवले होते. शिवाय शक्तीवर त्याचा पहिल्या पासून संशय म्हणून त्याने शक्ती व हिमांशूची ओळख मुळी करून दिली नव्हती. तरी शक्तीने हिमांशूला त्याच्या हॉटेल बाहेर, सिराज क्लबमध्ये आणि आता या हॉस्पिटल बाहेर सेम गाडीसोबत अनेकदा पाहिलं होतं. आणि हे शक्तीसाठी पर्याप्त होतं, हिमांशू हा डॅनियलचा हस्तक आहे हे ओळखण्यासाठी!
हिमांशूच्या अटकेच्या तरतूदीचं काम करून मग शक्तीने 'माहिती आणि प्रसारण मंत्रालय' (इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री) ची वेबसाईट शोधून त्यावरून मिनिस्ट्रीचा ईमेल आयडी मिळवला व मिहीरचा दसरा चौकातील बेशुद्ध पडलेला व रक्ताने माखलेला फोटो मेल केला. मेलचा सब्जेक्ट होता, 'पीएम्स् इम्पोर्टन्ट डॉक्युमेंट व खाली मजकूर म्हणून त्याने फक्त आपले नांव लिहिले... 'शक्तीसेन नाईक!'

तो नम्याच्या स्पेशल वॉर्डमध्ये प्रवेशला. जाग आलेली नम्या त्याला आत येताना पाहत होती...
"कसं वाटतंय आता?" शक्ती तिच्याजवळ येत म्हणाला.
"बरी आहे..." नम्याने तोंडावरील ऑक्सिजन मास्क हटवत उत्तर दिलं.
"अजूनही तू डॅनियलशी प्रामाणिक राहणार आहेस?" बाजूच्या स्टूलवर बसत शक्तीने तिला विचारलं.
"तू आहेस कोण?" मागे सरकून बसत नम्याने विचारलं,
"पोलीस आहेस?" स्थिरावून शक्तीच्या नजरेत नजर घालून तिनं प्रश्न केला.
"नाही!"
"मग कोण? आणि हे सगळं का करतोयस?"
"माणूस म्हणून!"
"मला पण वाचवलं ते याच कारणानं?" तिनं विचारलं.
शक्ती नुसता हसला.

'दोन वर्षांपूर्वी मी अँटी टेररिसम सेल, कोल्हापूर पोलीस मध्ये काम करत होतो.'
'आम्ही प्रयत्न करून एक टेररिस्ट ऍक्टिव्हीटी होण्यापासून रोखली होती... काही टेररिस्ट देखील पकडले गेले होते!
'त्या दिवशी जेव्हा मी घरी आलो... गार्गी, माझी बायको खूप चिडली होती... मी काही तरी महत्वाचं विसरलो होतो, म्हणून ती रागावली होती...
'हं! मला अजून आठवत नाही, की मी काय विसरत होतो...
'मग तिचा राग जावा म्हणून मी आऊटिंग प्लॅनिंग केलं...
'रात्री जेव्हा आम्ही घरी परतत होतो; आम्हाला रस्त्यात एबडक्ट् केलं गेलं...'


शक्ती व गार्गीला एका प्रशस्त बंगल्यात आणलं गेलं होतं... आत अंधार होता. ते आत आले तसे लाईट्स लावल्या गेल्या. समोर एक पच्चावन - साठ वर्षांचा इसम सोफ्यावर बसलेला शक्तीला दिसला. सोफेस्टिकेटेड् कपडे घातलेले त्या इसमाचे गुंड त्या श्रीमंतीची व्याख्या करणाऱ्या खोलीत सर्वत्र विखुरले, पेरले गेलेले होते!
तो मस्तवाल इसम हसत शक्तीकडे पाहत होता. गार्गी घाबरली होती... ती शक्तीचा हात पकडून त्याच्या मागे सरकून उभी राहिली.
'आमच्या माणसांना सोडून द्या!' तो शक्तीला बोलला.
भीती दाखवण्यासाठी तो हातातली पिस्टल नाचवत होता.
'हे होऊ शकत नाही! पण त्यांना भेटायची तुला एवढीच इच्छा असेल, तर मी एक करू शकतो; तुला पण त्यांच्यासोबत आत टाकू शकतो!'
'तुम्ही खूप फनी आहेत शक्तीसेन! पण मीही थोडं फन करू शकतो!' तो बोलला.
आणि त्याने शक्ती व गार्गीच्या मागे येऊन उभ्या झालेल्या त्याच्या गुंडाला इशारा केला. तो पुढे झाला आणि त्याने मागून गार्गीचे केस ओढून तिला शक्तीपासून बाजूला केलं. शक्ती विरोध करण्यासाठी पुढे झाला, पण त्याच्या डाव्या बाजूच्या एक गुंडाने शक्तीच्या पोटात गुडघा मारला. शक्ती त्याच्या गुडघ्यांवर आला. शक्तीचे हात मागे ओढून बांधण्यात आले.
'जा! मजा करा!' तो इसम आपल्या गुंडांना बोलला.
रागाने शक्तीचे डोळे मोठे, लालबुंद झाले. तो त्या इसमाच्या बोलण्याचा अर्थ समजला होता...
हे ऐकून त्याचा गुंड गार्गीला आतल्या खोलीत ओढत घेऊन जाऊ लागला...
गार्गीने मग स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रतिकार केला. तिने मागे वळून तिला पकडलेल्या गुंडाचे डोके पकडले व त्याला जोराने खाली वाकवून आपल्या गुडघ्यांवर त्याचे डोके आदळले होते. यात तिच्या केसांना जोरात हिसका बसला होता, पण तिकडे तिने वस्तुत: दुर्लक्ष केलं होतं. शक्तीने तिला सेल्फ डिफेन्स शिकवून ठेवला होता, तो अशा कामी यावा म्हणूनच!
त्या गुंडाला इतक्या जोरात गार्गीचा गुडघा डोक्यात लागला होता, की तो जमिनीवर तोल जाऊन पडला. पण तिचं हे वर्तन त्या सोफ्यावर बसलेल्या इसमाला आवडलं नाही. त्याची पिस्टल चालली! गोळी सुटली...
ती थेट गार्गीचा मेंदू छेदून भिंतीवर आदली.
शक्ती तिच्याकडे पाहत होता... त्या इसमाने त्याच्या समोर गुडघ्यांवर असलेल्या शक्तीची कॉलर पकडली. आपली पिस्टल शक्तीच्या डोक्याला लावली.
'तुझी बायको तर गेली, पण तुझी मुलगी अजून आहे! हा! ती तिच्या आजीकडे आहे हे माहितीये मला!
'नाऊ डू, एज आय से!' तो इसम डोळ्यांत आसवं घेऊन त्याच्या नजरेला नजर देणाऱ्या शक्तीला म्हणाला.
शक्तीच्या डोळ्यांतले पाणी त्या इसमाच्या पायाशी ठिबकले...

"मी त्याच्या पकडलेल्या माणसांना सोडून दिलं...
"पण माझं कर्तव्य मी कसा विसरणार होतो. ट्रॅकिंग डिव्हाईस एकाच्या शरीरात आम्ही इंजेक्ट केलं होतं. त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा त्या माणसासह त्याची पूर्ण टोळी पकडली!
"माझी सर्व्हिस चालूच होती... पण गार्गीच्या आठवणी मला काम करू देईनात... म्हणून मग नंतर मी नोकरी सोडली!"
"तुझी मुलगी?"
"ती अजूनही तिच्या आजीकडे आहे. गार्गीच्या आईकडे! दोन वर्षांत मी इतकी हिंमत नाही जोडू शकलो, की मी माझ्या मुलीला तोंड देऊ शकेन...!" शक्तीने दीर्घ निःश्वास सोडला.
तो निराश बसून राहिला... नम्याला देखील काय बोलावे सुचत नव्हते! पण ते काही क्षण तसेच शांत जाऊ देऊन ती बोलली,
"मी तुला जी माझी कहाणी सांगितली होती, ती खरंच खरं होती... तू कोण आहेस हे मला जाणून घायचं होतं! कारण तूच मला मदत करू शकतोस अशी माझी धारणा होती! मला डॅनियलला संपवायचं होतं! पण तू कोण आहेस हे समजायला काहीच मार्ग नव्हता. म्हणून मी डॅनियलला मदत करत होते. डॅनियलने तुझी खरी आयडेंटिटी शोधून काढली, तर मला तुझी मदत घेता येणार होती..." ती शक्ती पासून नजर दूर ठेवूनच बोलली.
"मग थेट तू माझ्याशी का बोलली नाहीस?" शक्तीने अधीरतेने विचारलं.
"कारण तू कोण आहेस हे माहीत असल्याशिवाय तुझ्यावर विश्वास ठेवून तुला काही सांगणं मला ठीक वाटलं नाही!" नम्याने भूमिका स्पष्ट केली.
"मग आता बोल!" शक्ती तिला आश्वस्त करत म्हणाला,
"हा डॅनियल कोण आहे?" त्याने भाव बदलून ते करडे करत मुद्याला हात घातला.
"खरंच माहीत नाही! पण वाचस्पती यांच्या खुनामागे त्याचा मोठा हात आहे. तोच सगळं घडवून आणत होता!
"कोल्हापूरमध्ये वाचस्पती यांच्या खुनापासून जे काही संबंधित आहे ते डॅनियलशीच!" नम्याने स्पष्ट केलं.
"एवढ्या मोठ्या कॅस्पिरसीची पार्श्वभूमी कोल्हापूरच का?" सक्तीने त्याला भेडसावत असलेली शंका व्यक्त केली.
त्याची ही शंका रास्तच होती. कारण जी घटना भारताच्या बाजूने जागतिक उलथापालथ करण्याची क्षमता बाळगून होती, त्याचा मोठा आणि महत्वाचा हिस्सा कोल्हापूर सारख्या साधारण शहराच्या मधून जात होता...
"वाचस्पती थोडे आजारी होते म्हणून आरामासाठी ते त्यांच्या मूळ गावी इथं कोल्हापूरला आले होते. इथं त्यांना संपवणं हे कोणत्याही इतर ठिकाणापेक्षा सोपं होतं म्हणून हे शहर निवडलं!" नम्याने खुलासा केला.
"नाईट क्लबची काय भूमिका आहे?"
"ते डॅनियलचंच आहे. वाचस्पती यांना मारणाच्या महिनाभर आधी कव्हर म्हणून ते नाईट क्लब खरेदी केलं. सोबत आम्हा मुलींना पण..." नम्याने सत्यासोबत तिच्या मनात सलणारी खदखद शक्तीने न विचारता व्यक्त केली.
"पण डॅनियल तर बिझनेसमन आहे. मग त्याने थेट या सगळ्यांत लक्ष का घातले?"
"कारण कोणतीही गडबड होऊ नये याची त्याला खात्री हवी होती. म्हणूनच तो स्वतः या सगळ्यात उतरला. पण तो काम अलिप्त राहूनच करत होता.
"तू या प्रकरणात गुंतला नसतास, तर त्याची इन्वॉल्व्हमेंट कधी समोर आलीच नसती!" नम्याने शक्तीला त्याच्या कृतींची आठवण करून दिली.
"डॅनियल आणि जेसनची खरी नांवं ही नक्कीच नसतील?"
"नाहीत! त्यांची खरी नांव मलाही माहीत नाहीत, पण त्याचे वडील हे महाराष्ट्रीय होते. म्हणून त्यांना रेफ्युजी म्हणून भारतात प्रवेश मिळवणं शक्य झालं... रादर तो हाफ मराठी आहे म्हणूनच डॅनियलला पाठवणं रिस्की असून ती जबाबदारी अमेरिकेनं त्याच्यावर सोपवली होती. चार - साडेचार वर्षे त्यांचं प्लॅनिंग चालू होतं. दरम्यान सरकारने त्यांचा नवीन बनवलेला डेटा देखील इरेज केला गेला... सरकार मधली काही माणसं त्यांना सामील आहेत. पण ती कोण ते माहीत नाही..." नम्या तिला ज्ञात असलेली माहिती शक्तीला पुरवत होती.
"त्याची चिंता करू नको! काय अमेरिकेशी डॅनियलचा खरंच सबंध आहे?"
"हो! सिराज क्लबचा मॅनेजर, तो एक सीआयए एजंट आहे! डॅनियल घडवत असलेल्या घटनांना सुपरवायझ करणं हे त्याचं काम आहे!"
पुढं शक्तीने काही विचारलं नाही!
"मी या दलदलीतून तुला बाहेर काढेन! माझ्यावर विश्वास ठेव!" म्हणून तो उठला आणि वॉर्ड बाहेर निघाला. अजून बरीच कामं करणं त्याच्यासाठी बाकी होती...


जेसन त्याच्या रूममध्ये अस्वस्थ होता... एक मुलगी त्याच्या बेडवर झोपून होती, पण त्याला यात काहीच रस नव्हता. शरीरी मध्यम बांधा पण गोठीव. असा तो शर्टलेस बेडच्या कोण्यावर आपल्या पिस्टलला हातात घेऊन सिगरेट दातांत दाबून विचार करत बसला होता...
त्याला डॅनियलचा स्टँड मात्र काहीच पटत नव्हता. तो तातडीने उठला. अंगात शर्ट अडकवून तो भव्य अशा बंगल्याच्या बाहेर आला.

फुटपाथवर फिरत त्याने हिमांशूला फोन लावला,
"हिमांशू, इज सोमेश देअर?" त्याने गुश्श्यातच विचारलं. तोंडी सिगारेट असल्याने त्याच्या प्रत्येक शब्दागणिक धुराचा भपकारा त्याच्या तोंडून बाहेर पडत होता...

हॉस्पिटल पार्किंगमध्ये गाडीत बसून असलेला हिमांशू बोलला,
"नाही! तो आला होता, पण काही वेळापूर्वी कुठं तरी निघून गेला!" हिमांशूने माहिती पुरवली.
आणि त्याने वडापावचा तुकडा तोडला. इतक्यात त्याच्या दारावर एका काळा लेदर गल्व्ह्ज् घातलेल्या हातानं नॉक झालं.
हिमांशूनं काचेकडे पाहिलं. समोर टेररीजम सेलचा ऑफिसर उभा होता. हिमांशूने हातातला वडापाव टाकून दिला आणि त्याचा हात त्याच्या कोटातील होलस्टरकडे गेला.
पण गन काढण्याची संधी ऑफिसरने त्याला दिली नाही! त्याने आपली गनहिमांशू वर पॉईंट केली!
"बाहेर ये!" त्याने हुकूम झाडला.
हिमांशूला पर्याय नव्हता. तो बाहेर आला. पाहतो तर त्याला पाच ऑफीसर्सनी घेरलं होतं. त्याच्या दोन गाड्या मागे लावल्या होत्या. ते त्याच्यावर आपल्या गन्स रोखून उभारले होते... हिमांशूची एक चुकीची हालचाल आणि त्याचा जीवन प्रवास तिथंच संपणार होता...
त्याच्या गाडीच्या काचेवर नॉक केलेल्या ऑफिरसरने पुढं होत हिमांशूच्या कोटाच्या आतली गन काढून घेतली.
"यु आर अंडर अरेस्ट!" पुन्हा हिमांशूवर गन पॉईंट करत तो म्हणाला.
हिमांशूचे हात आपसूक हवेत उंचावले गेले. त्याच्या डाव्या हाती मोबाईल होताच. सगळी घटना जेसन तिकडे ऐकत होता!


जेसनला शक्तीबद्दल हीच माहिती अपेक्षित होती. शिवाय पलीकडे काही गडबड झाली आहे हे तो समजून चुकला होता. तो तक्षणी मागे बंगल्यात पळाला!

"सोमेश इज नॉट इन दि हॉस्पिटल!" तो धावत येतच डॅनियलच्या खोलीत शिरला होता.
डॅनियल सावरला. उठून बसला. तो पाणी ओतून घेऊ लागला.
"सो?" डॅनियलने पाणी ग्लासात ओतून घेत विचारलं.
"ही टोल्ड् मी दॅट ही वॉज गोईंग टू द हॉस्पिटल!" जेसनने खुलासा केला.
डॅनियल तरी काही फरक न पडल्यासारखा चेहरा ठेवून होता...
"अँड हिमांशू हॅज बिन अरेस्टेड्!" जेसनने माहितीत मोलाची भर टाकली!
डॅनियलचे कान खडे झाले! त्याने वर जेसनकडे पाहिलं. एक विकट व त्याहूनही क्रूर हास्य त्याच्या ओठी विसावलं...
काहीवेळ परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्याने बॉटल खाली ठेवून समोरच पडलेला आपला मोबाईल उचलला.
एका ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मध्ये जाऊन त्याने स्वतः शक्तीला दिलेला मोबाईल सर्च केला.
लोकेशन दाखवलं गेलं.
"वेअर इज पीएम स्टेअड्?"
"रेनिसांस!"
"गो. किल हिम! यु विल गेट अ सरप्राईज देअर!" डॅनियल जेसनला म्हणाला!
हे ऐकून जेसनच्या आभावर आनंद मावेनासा झाला! त्याला सलत असलेल्या शक्तीला मारण्याची अखेर संधी मिळाली होती!
परंतु लगेच तो शंकेने घेरला गेला.
"बट व्हॉट अबाऊट यो ग्रँड प्रोजेक्ट?" जेसनने डॅनियलला विचारलं.
"आपण आत्ता जर पकडले गेलो, तर ते कधीच पूर्ण होऊ शकणार नाही! त्यापेक्षा मी अजून पाच वर्ष वाट बघायला तयार आहे!" डॅनियल शांतपणे ड्रिंकचा कडू घोट घसाखाली रिचवत बोलला...



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED