Sparsh - 13 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 13

रात्र तर मित्रांसोबत कशी तरी गेली होती पण उद्याचा संपूर्ण दिवस काढणं कठीण जाणार होत ..सकाळ झाली आणि सर्वच आपल्या - आपल्या कामावर निघाले ..मी शाश्वतला वेळेवर यायला सांगितलं आणि तोही जॉबवर गेला ..बॉसने आज काही मेल केले होते ..खर तर इच्छा नव्हती पण वेळ जावा म्हणून थोडं काम करून घेत होतो ..शाश्वतला दुपारीच भेटण्याचा पत्ता विचारला होता पण तो मला स्वताच न्यायला येणार होता त्यामुळे ते टेंशन कमी झालं ..राहुलला मी येण्याचं माहिती नव्हतं त्यामुळे त्याने कस रिऍक्ट केलं असत काहीच अंदाजा नव्हता कारण कॉलेज जीवनात आमचं कधी पटलं नव्हतं पण उत्तरासाठी आज मी सर्व काही करायला तयार होतो ..आज माझं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं ..सतत घडीकडे लक्ष जात होतं आणि पुन्हा निराश होऊ लागली ...सायंकाळचे 5 वाजले होते ..शाश्वत ऑफिस मधून निघाला होता व त्याने काही वेळातच घरी येण्याचं सांगितलं ..मी तयारी करून बसलो .कितीतरी वेळ त्याची वाट बघू लागलो पण त्याचीही येण्याची चिन्हे दिसेना ..एखादी तासात तो फ्रेश होऊन घरी पोहोचला.मानसीबद्दल एकूण घेण्यासाठी बेचैनी इतकी जाणवायला लागली होती की त्याला घरात न बोलवताच सरळ बाहेरूनच घेऊन गेलो ..हळूहळू रस्ता सर होऊ लागला ..आणि शेवटी कॅफे ला पोहोचलो ..

शाश्वतने गाडी पार्क केली ..मी त्याची वाट न पाहताच सरळ आतमध्ये गेलो ..कॅफेत इकडे - तिकडे नजर फिरवली पण राहुलचा काहीच पत्ता नव्हता ..मागून शाश्वतदेखील जॉइन झाला ..राहुल अजूनही आला नसल्याने त्याने सरळ राहुल ला फोन लावला ..राहुलने पंधरा मिनिटात येत असल्याचे सांगितले आणि थंडीतही मला उकाडा जाणवू लागला ...माझी नजर आताही दाराकडे होती ..शाश्वतला माझी स्थिती कळून चुकली होती त्यामुळे त्याने खांद्यावर हात ठेवत मला समजावलं ..मी गोड स्माईल दिली पण मनातून स्वताला समजावू शकलो नाही ...आम्ही बेसबरीने त्याची वाट पाहू लागलो आणि तो काहीच क्षणात कॅफेच्या आत येऊन पोहोचला ..तो आंम्हाला शोधत होता आणि त्याची अचानकच आमच्याकडे नजर गेली आणि भीतीने थोडा कापू लागलो .." हाय शाश्वत ..हाय अभि .तू सांगितलं नाहीस अभि पण सोबत येणार आहे .." , हॅन्ड शेक करत तो चेअरवर बसला ..सर्वात आधी आम्ही कॉफीची ऑर्डर दिली आणि थोडं रिलॅक्स झालो ...माझं शरीर घामाने भरलं होत आणि मी रुमालाने चेहरा साफ करत होतो ..शाश्वतने फक्त मीच बोलणार असल्याचं सांगितलं आणि मी त्याच एकूण शांत बसलो शेवटी राहुलनेच बोलायला सुरुवात केली , " खर सांगू खूप दिवसांनी जुन्या मित्राना भेटतो आहे त्यामुळे खूप आनंद होतोय ..जॉब लागल्यापासून आयुष्यात फक्त आणि फक्त कामच उरलं आहे ..साल स्वतःसाठी जगायला वेळच मिळत नाही ..सो भेटून फार मस्त वाटलं तुमच्याशी ..बर असो तू सांग कसा आहेस ? ..आणि कसं कोणतं काम होत ज्यामुळे एवढ्या तातडीने मला बोलवून घेतलंस ? " ..मला त्याची भीती वाटत होती पण त्याच्या एवढ्या बिनधास्त बोलण्याने मी थोडा फ्री झालो आणि खोटंच का असू नये पण चेहऱ्यावर थोडं हसू आलं ..त्यावर शाश्वत म्हणाला , " आम्ही दोघेही मस्त आहोत ..खूप दिवसांनी भेटलो राहुल आपण काम सांगायला भरपूर वेळ आहे ..आधी थोड्या गप्पा मारू मग बघू काय तर आणि कॉफी गार होतेय सो तू ती घे आधी .." आम्ही तिघेही हळूहळू कॉफी घेऊ लागलो .." सॉरी यार नेहाबद्दल एकूण फार वाईट वाटलं ..आताही बोलतोस का तिच्याशी .." , राहुल म्हणाला ..आणि शाश्वत आपल्या बिनधास्त स्टाइलमध्ये म्हणाला , " भावा तिला मुलगा झाला आहे आता मामा म्हणवून घेऊ का स्वताला ..तीही खुश आहे आपल्या लाईफमध्ये ..तस पण जे झालं ते सोडलं कधीचच आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत आणि केव्हापर्यंत तिच्या आठवणीत पडून राहायचं म्हणून मूव्ह ऑन केलं तसही म्हणतात ना की बस , ट्रेन और लडकी एक गयी तू दुसरी आती है म्हणून शोधत आहो दुसरी तुझ्या नजरेत असेल तर सांग बा.." त्याच्या अशा बिनधास्त बोलण्यावर ते दोघंही हसू लागले आणि मी फक्त हसण्याचा दिखावा करू लागलो ..पुन्हा एकदा राहुलला शांत पाहून शाश्वत म्हणाला , " माझं सोड मानसी कशी आहे ? " , ..त्याने लगेच उत्तर दिलं , " ती मस्त तिला काय झालं ..बाईसाहेबांची पी.एच.डी.सुरू आहे नेहमीच खुश असतात ..आपण सर्व कॉलेज लाइफला दुरावलो पण ती आताही फार एन्जॉय करते आहे ..लकी गर्ल!!! .." हे सर्व बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता आणि माझ्या मनात भीती ..पुन्हा एकदा शाश्वत त्याला म्हणाला , " भावा एवढं दूर केलंस आम्हाला की मानसिसोबत लग्न केलं आणि साधं बोलावलंसुद्धा नाही ..एकदा बोलवायचं तर होत .."

आता राहुल त्याच्या बोलण्यावर हसू लागला आणि आम्ही गोंधळात पडलो .." तुला कुणी सांगितलं माझ लग्न मानसिसोबत झालं आहे असं ? " , राहुल हसत - हसत म्हणाला .. आणि आतापर्यंत हिरमुसलेले आम्ही त्याच्याकडे आश्चऱ्याने पाहू लागलो ..

" कोण म्हणजे काय तुझं प्रेम होतं न तिच्यावर म्हणून म्हटलं तिच्याशीच लग्न केलं असशील .." , शाश्वत गंभीर होत म्हणाला ..

आता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले ..वातावरण सतत गंभीर होऊ लागलं ..त्याने कॉफी पिल्यावरसुद्धा पाण्याचा ग्लास एकाच घोटात खाली केला ..रुमालाने चेहरा पुस्तक तो म्हणाला , " एक मिनिटं तुला कस माहिती माझं तिच्यावर प्रेम होतं ..ही गोष्ट फक्त मानसी आणि मलाच माहिती आहे .." राहुल नजर रोखून शाश्वतकडे पाहत होता , शाश्वतला आता काहीच कळत नव्हतं ..तो थोडा रागातच म्हणाला , " आता सांगशील का लवकर " ..शाश्वत थोडा गोंधळून माझ्याकडे पाहू लागला ..मला त्याची होणारी घालमेल जाणवू लागली आणि आता मीच उत्तर द्यायला मधात पडलो , " बर एक मी सांगतो .. ट्रॅडिशनल डे ला मी बाहेर फिरत होतो तेव्हा अचानक लक्ष गेलं आणि मी तुला मानसीला प्रपोज करताना पाहिलं ...पण प्रश्न हा नाहीच.....मुळात हा आहे की तिने तुला होकार कळवल्यावरही मग तू दुसऱ्या मुलीशी लग्न का केलं .." आता तर वातावरण जास्तच तापलं त्यामुळे तो स्वताला सावरत म्हणाला , " म्हणजे तू सर्व लपून पाहत होतास आणि मला तिने होकार केव्हा कळवला . " ..आता माझं डोकं ठणकू लागलं आणि मी म्हणालो , " भावा तिचे शब्द मला आजही आठवतात ती म्हणाली होती की तुला माझं उत्तर आधीच माहीत आहे सो माहीत असलेलं उत्तर सांगण्याची काही गरज आहे का ? ..मी तुझी नेहमी साथ देईल ..आणि तुझ्या मिठीत येऊन शिरली , मग याचा अर्थ नेमका काय ? " ..आता तो जोराजोराने हसू लागला ..मधातच स्वताला आवरण्याचा प्रयत्न करीत होता ..पण त्याला स्वताला सावरन शक्य होत नव्हतं ..मी रागावून म्हणालो .., " सांग की आता ? " तो पुन्हा हसत - हसत म्हणाला , " कुल डाऊन अभि सांगतो आहे ..ही 12 वीला असतानाची गोष्ट आहे ..तिला माझ्यासमोरच एका मुलाने प्रपोज केला ..मी त्यावरून तिला चिडवू लागलो ..त्यादिवशी ती पहिल्यांदा माझ्यावर रागावत म्हणाली ..राहुल माझे बाबा समाजाचा विचार करणारे आहेत .त्यांच्यासाठी प्रथा , परंपरा खूप महत्त्वाच्या आहे..त्यांनी मोकळीक दिली आहे पण ती फक्त शिक्षणासाठी ..तुला विश्वास बसणार नाही पण त्यांनी मला सक्त ताकीद दिली आहे की काहीही कानावर आलं की तुला मारून फेकून देईल ..त्यामुळे मला प्रेम करण्याची मुभा नाही ..मी आवडीने त्यांनी पसंद केलेल्या मुलाशीच लग्न करेल आणि तुलाही सांगते आहे तू मला प्रपोज करण्याची चूक करू नको ..माझं उत्तर कधीच बदलणार नाही .."

" मग आयुष्यभर साथ देईल हे काय होत " , मी पुन्हा विचारलं ..

" मैत्रीची साथही आयुष्यभराची असते तिनेही मला त्याच उद्देशाने म्हटलं होतं .." त्याने बोलणं थांबवलं नाही तेवढ्यात शाश्वत म्हणाला , " मग मिठीच काय ? " ..त्याने पुन्हा एकदा हसत उत्तर दिले .." भावा त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने मला सावरायला मिठी मारली तसही तुम्ही सोनालीला किती वेळ हग केलं आहे म्हणजे एका मिठीने तुमच्यातील नात एवढ्या सहजासहजी बदलत."

त्याच बोलून झालं होतं आणि माझ्या चेहऱ्यावर उदासीचे जाळे पसरू लागले .." म्हणजे माझा गैरमसज झाला ? " ..आणि त्याने लगेच उत्तर दिलं .." हो खूप मोठा गैरसमज .तू अस समजूच कस शकतोस आणि तस वाटलंही तरी एकदा बोलून बघायचं होत माझ्याशी ..हो हे मान्य आहे की तिच्यावर प्रेम होत , होत म्हणण्यापेक्षा आहे पण तिला गमवायच नव्हतं म्हणून प्रेम करूनसुद्धा काहीच करू शकलो नाही ..साल मैत्री करताना कुणीच कास्ट विचारत नाही पण लग्न करताना त्याशिवाय चालत नाही म्हणून ती माझी झाली नाही .हो पण प्रेमही फार मजेदार गोष्ट आहे ..मी जॉबला लागक्यावर तिथल्याच एका मुलीने मला प्रपोज केलं .तीच हृदय तोडण्याची हिम्मत माझी झाली नाही आणि तिला होकार देऊन सुखी संसार जगतो आहे शिवाय मानसिसोबत मैत्रीही तशीच कायम आहे "

आता मला स्वतःवरच राग येऊ लागला होता ..एका गैरसमजामुळे मी तिला आयुष्यातून गमावून बसलो होतो ..एकदा तिला गमतीत विचारलं असत तरी तिने सांगितलं असत पण राहुलवर असणाऱ्या रागाने मनावर ताबा मिळविला आणि मी माझं भान हरपून बसलो ..गेले तीन वर्षे मी तिच्या विरहात जगत होतो आणि फक्त का तर माझ्या चुकीमुळे ..मी विचारात हरवलो आणि राहुल म्हणाला , " बर उशीर होतोय आता तरी सांग कोणतं काम होत तुझं " ..शाश्वत किंचित हसला आणि म्हणाला , " ज्या कामासाठी आलो होतो ते झालं .." आतापर्यंत आम्ही गोंधळात होतो आता तो गोंधळात पडला .." म्हणजे मानसीबद्दल विचारायचं होत का तुला ? ..पण का " , राहुल विचारू लागला

आम्ही एकमेकांकडे पाहून हसू लागलो ...मी त्याला इशारा केला आणि शाश्वत म्हणाला , " तुझ्यासारखच अभि पण मानसीवर प्रेम करतो ..त्याला वाटलं होतं की ती तुला हो म्हणाली म्हणून तिच्यावर रागावून कॅनडाला निघून गेला .." म्हणतात ना प्यार भी बडी कुत्ती चीज है ..साला एक बार इसका नशा चढ जाये तो आदमी सोचने समझने की शक्ती खो बैठता है और यहा तो सभी तरफ आशिक भरे पडे है ..

आता काय तर आम्ही सर्वच हसू लागलो ..पुन्हा एकदा आनंदात तिघांनीही कॉफी मागवली ..आता सर्व क्लिअर झालं होतं...वातावरण थोडं गार होऊ लागलं ..आम्ही एकमेकाकडे पाहून हसू लागलो .." म्हणजे ही एक फुल दो भवरे अशी कथा आहे तर ..छान आहे पण आता माझा पत्ता कट झाला आहे शिवाय तिला मूल पाहणं पण सुरू आहे आणि तीच काहीच दिवसात लग्न पण होऊन जाईल ..सो फार उशीर केला आहेस तू..पण एका गोष्टीचा आनंद आहे की तू तिला मनातलं सांगितलं नाहीस नाही तर तुलाही माझ्यासारखच जगावं लागलं ..एकतर्फी आशिकसारखं .. कारण तिचा प्रेमावरचा विश्वासच नाही आणि त्याने तुला आणखीच जास्त त्रास झाला असता.." आणि त्यावर मी म्हणालो , " तिला प्रेमावर विश्वास नाही ते ठीक आहे पण लग्नावर तर आहे ना ? "

" म्हणजे ? " , राहुल म्हणाला

" भावा ती म्हणाली तिला बाबांच्या मर्जीने लग्न करायचं आहे सो तसच करू फक्त स्थळ माझं असेल..काय म्हणतोस हे तर ठीक आहे न " , मी डोळा मारत म्हणालो , " साले इंजिनिअर भी बडे हुशार होते है कही ना कही से जुगाड कर ही लेते है ..और तू तो ऊन सबमे उस्ताद आहे ..मान गये तुझे ..प्लॅन तर मस्त आहे पण सर्व जुळवून कस आणशील .." शाश्वत आणि मी दोघेही राहुलकडे पाहून हसू लागलो ..त्याला समजलं की बळीचा बकरा मीच आहे , " मी नाही हा अभि ..ये मत भूल की कभी हम दुष्मन हुआ करते थे और दुष्मन की दोस्ती सही नही होती"..

आम्ही काहीच बोलत नव्हतो.. फक्त त्याच्याकडे पाहून हसू लागलो ..शेवटी तोही हसला आणि हसला तो फसला .." ठीक आहे मी करतो तुझं काम पण मला काय मिळेल .." राहुल म्हणाला आणि माझं उत्तर आलं , " भावा आता म्हणशील तर सर्व संपत्ती लिहून देतो तुझ्या नावे .तिच्यासमोर ही शान शौकत सर्वच फिकी आहे...बोल आता करशील माझं काम.." आणि त्याच उत्तर एकूण आम्हाला खूप समाधान मिळाल , " मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यानंतर तिच्यावर कुणी एवढं प्रेम करेल ..तुला पाहून बसला विश्वास ..मी हे तुझ्यासाठी नाही मानसीसाठी करतोय ..मला विश्वास आहे तू तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपशील ..फक्त हा विश्वास तोडू नको .." आमची दुसरी कॉफी पण संपली आणि एकमेकांना हग करून आम्ही घरी निघालो
राहुलला थोड्या वेळासाठी भेटायला गेलो होतो ..पण बोलण्याच भान नाही राहील आणि खूपच वेळ झाला ..शाश्वतने लगेच गाडी सुरू केली आणि आम्ही निघालो ..मी मोबाइल सायलेंट मोडवर ठेवला असल्याने विकासचा फोन येऊन गेल्याच लक्षात आलं नव्हतं ..त्यांचे तब्बल 15 मिस कॉल येऊन गेले होते ..त्यांना लगेच फोन केला ..तेही आमच्यात बोलणं काय झालं हे जाणून घेण्यास उत्सुक होते ..मी त्यांना आनंदाची बातमी दिली आणि त्यांनी तिथेच सेलिब्रेशन करायला सुरुवात केली ..मी भेटल्यावर बोलू म्हणत फोन ठेवला आणि घराकडे जाऊ लागलो ..आज तब्बल तीन वर्षानंतर मी एवढा खुश होतो ..त्यामुळे मला सर्वच कस मस्त वाटत होतं ..शेवटी शाश्वतने गाडी माझ्या घरासमोर थांबवली .मी उतरून जाणारच तेवढयात शाश्वतनर धावत येऊन मिठी मारली आणि म्हणाला , " अभि नेहाच्या प्रसंगातून बाहेर काढण्यास तू खूप मदत केलीस ..खर तर त्यावेळी मी त्याबद्दल कुणाशीच बोलू शकत नव्हतो पण तू स्वतःहून ते सर्व समजून घेतलंस ..माझा हट्ट पुरविलास आणि नेहाला एकदा भेटवून नेहाला फसविण्याचं ओझं पण कमी केलं ..काळजी करू नको धन्यवाद म्हणणार नाही कारण आपला रुल विसरलो नाही दोस्ती मे ने थँकयु नो सॉरी पण सांगायचं होत की तुझं लग्न होईल हे ऐकून मला खूप आनंद होतोय ..आणि मानसिकडून होकार आल्यावर तुझ्या सर्व लग्नाची जबाबदारी मीच घेणार आहे ..मग तू नाही म्हणालास तरीही .." आणि गाडी स्टार्ट करून तो हवेसारखं उडून गेला ..काय मिश्रण होत शाश्वत काय माहीत पण भारीच होता..अगदी जिवलग ..

घरी जाताच फ्रेश झालो ..आईचा स्वयंपाक बनवून झाला होता ..त्यामुळे लगेच जेवायला बसलो ..आज माझा चेहरा फारच खुलून दिसत होता ..आईलाही ते जाणवत होत आणि मला एवढं आनंदी पाहून तीही फार खुश झाली होती ..आज आई वाढत होती आणि मी खात होतो ..आईने बनविलेल सर्व संपलं होत तरीही मी ताटावरच बसून होतो आणि ती हसू लागली ..माझ्या ते लक्षात आलं आणि नजर चोरून मी बेसिनला हात धुवायला निघून गेलो ..आई सर्व आवरू लागली आणि मी बेडरूमला पोहोचलो ..
मानसीच लग्न झालं नाही हे ऐकून मला फारच आनंद झाला होता पण त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम होता ते म्हणजे आईला लग्नाचं सांगणं कारण काही दिवसांपूर्वी मी लग्नाला चक्क नकार दिला होता पण सांगावं तर लागणारच होत ..मी आईचा विचार करत असताना तीच माझ्या रूमला आली , " काय रे अभि आज खूप हॅपी दिसतो आहेस ..काही खास घडलय का " , आई विचारू लागली ..माझ्यासाठी तर ही सुवर्णसंधी होती आणि क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो , " हो तसच काही ..मी खूप विचार केला तेव्हा जाणवलं की तुला खूप त्रास होत असेल कामाला आणि तुझा एकटेपणा ही दूर करता यावा म्हणून ..मी लग्न करायला तयार आहे .." तिला माझा डाव समजला शेवटी मी तिचाच अंश होतो आणि ती म्हणाली , " बेटा नौटंकी नको करू मी पण तुझीच आई आहे ..बर मुलगी तूच ठरवली न मग नाव पण सांगूनच दे ?"

" तूच गेस कर बर " , मी तिच्याकडे बघत म्हणालो

" मानसी ..बरोबर ना ?? " , आई माझ्यावर हसत म्हणाली ..

मी हो म्हणालो आणि ती बाबाला सांगायला जाऊ लागली ..मी तिला थांबवलं आणि मागे घडलेल सर्व सांगितलं ..ती शांत बसून एकत होती ..मी तिला राहुलचा फोन आल्यावर बाबांना सांग म्हणालो आणि ती तयार झाली ..मी आईला सांगून मोकळा झालो होतो तर आईच मानसीला सून बनविण्याच स्वप्न पूर्ण होणार म्हणून तीही खुश होती आणि मला कपाळावर पप्पी देऊन झोपायला निघून गेली ..

राहुल बैठकीबद्दल कॉल करून सांगतो म्हणाला होता पण दोन दिवस झाले तरी त्याचा फोन आला नव्हता ..मी मोबाइलवर लक्ष देऊन होतो पण त्याचाही काही फायदा होत नव्हता ..त्याला फोन करावंसं वाटायचं पण त्याला उगाच वाईट वाटू नये म्हणून मी फोन करण्याचं टाळू लागलो आणि दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याचा फोन आला ..आता त्या फोनवर माझं भविष्य अवलंबून होत ..बैठकीला होकार की नकार ?? ..मानसीला जीवनसाथी बनविण्यासाठी एक पाऊल समोर की सर्वच संपणार होत ..??

क्रमशः .....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED