Sparsh - 12 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 12

खूप सोपं असत एखाद्यावर रागावून तिला कायमच सोडून जाण पण तेवढच कठीण असत तिच्या संपूर्ण आठवणी पुसून टाकन ..जगलेला प्रत्येक दिवस हे फक्त क्षण नसतात तर त्या आठवणी असतात ज्यांना आठवून कधीतरी रडावस वाटत तर कधी हसावस वाटत ..लाईट ऑफ केला आणि तिचं स्केच बाजूला ठेवलं ..लोक अस म्हणतात की दुःखाच्या रात्री झोप लागत नाही पण आनंदाच्या रात्रीही कुठे झोप लागते ..दुःखाच्या रात्री चिंतेने झोप लागत नाही तर आनंदाच्या रात्री तो क्षण विसरता येत नाही ..कॅनडाला होतो तेव्हा तिच्या आठवणी जगू देत नव्हत्या आणि इथे आल्यावर तिच्या आठवणी हव्याहव्याश्या झाल्या ..मानसी खर सांगू तूच मला प्रेम करायचं शिकवल त्यामुळे थोडा वेळ तुझ्यावर नाराज होतो पण आता नाही आहे ..जर मला नशिबाने एक संधी दिली तर तुला डोळ्यातील आसवासारखं जपेन ..तुझा प्रत्येक अश्रू मी मोती बनवून जपून ठेवेल ..आणि कुठलंही संकट येण्यापूर्वी त्याला आधी माझा सामना करावा लागेल ..हा माझा शब्द आहे तुला फक्त एकदा ये ..आज तिच्या आठवणीने पुन्हा एकदा मला त्या कॉलेज जगात परत न्यायला सुरुवात केली ..मला तिच्याबद्दलचा एक क्षण खूप जास्त आवडतो जो मी कुणासोबतच शेअर केला नाही ..ते छोटंसं पपी.जेव्हा तिने पहिल्यांदा त्याला बिस्कीट भरवलं ते खुश होऊन आपल्या आईकडे गेलं ..त्यानंतर ती जेव्हा केव्हा दिसली ते पपी तिच्याजवळ जाऊन उभं राहायचं ..तिच्याकडे असेल तेवढा वेळ ती त्याच्यासोबत घालवायची आणि रोज आठवणीने त्याला बिस्कीट भरवायची ...जग आपल्यावर हसत आहे याचसुद्धा तिला भान नसायचं ..किती ही निरागसता ..कदाचित याच स्वभावाने तिने माझं मन जिंकल होत....आजच्या रात्री तिची प्रत्येकच गोष्ट मला आनंद देऊन जात होती .फक्त खंत होती ती आयुष्यात नसण्याची ..
तिच्या त्या सुंदर आठवणीत रमलो आणि उशिराच झोपी गेलो...खूप दिवसानंतर इतकी शांत झोप लागली होती ..कॅनडाला असताना रोज जिमला जायचं असल्याने सकाळीच उठायची सवय झाली होती त्यामुळे उशिरा झोपुनही आज पहाटे - पहाटेच झोप उघडली होती ..बाबा झोपूनच होते तर आई नेहमीप्रमाणे लवकरच उठली होते .." हे गुड मॉर्निंग ममा " , म्हणत मी तिला विश केलं ... तीही मला विश करत म्हणाली , " बापरे !! आमचे चिरंजीव आज लवकरच उठले .." आई मस्करी करत होती आणि मी तिच्या बाजूला जाऊन बसलो , " आई आता तिकडे मलाच सर्व करावं लागतं त्यामुळे लवकरच उठाव लागत आणि जिम पण असते ..सो अस म्हणू शकतेस की मी किंचित सुधारलोय .." हे ऐकून तिला थोडं बर वाटल आणि ती म्हणाली , " बर मग चलणार आहेस माझ्यासोबत सैर करायला ..बघ आईसोबत यायला आवडणार असेल तरच चल .."

त्यावर मी म्हणालो , " तू केव्हापासून जातेस फिरायला ? " ..ती हसून म्हणाली , " अरे तू नव्हतास ना तर करमायच नाही मग जाऊ लागले फिरायला ..आता तर तिथे माझ्या मैत्रिणी पण झाल्या आहेत त्यामुळे सकाळ मस्त जाते .." मी नसल्याने ती फार एकटी पडली होती म्हणून बहुतेक मला ती लग्न करण्यासाठी सांगत होती आणि मी तिला नेहमीच टाळत होतो ..तिने काळजीने फोन केल्यावर मी लवकरच बोलून फोन कट करायचो ..खरच ती नसती तर माझी एवढी काळजी कुणी केली असती आणि माझं जग एवढं सुंदर असत का ? ..क्षणात विचारांनी झेप घेतली ..त्यातून स्वताला सावरत म्हणालो , " मातोश्री तुम्ही अभिमान आहात आमचा सो तुमच्यासोबत कुठेही यायला आवडेल ...चला निघुया नाही तर तुमच्या सखी माझा छळ करायला मागे - पुढे बघणार नाहीत .." आईच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आलं आणि आम्ही सैरवर निघालो ..
कितीतरी दिवसांनी घराकडे परतलो होतो ..त्यामुळे ते वातावरण पाहुन जुने दिवस जसेच्या तसे समोर उभे होते ..समोरच्या ग्राउंडवर दिवसभर क्रिकेट खेळून आल्यावर आई ओरडायची ते दिवस असो की पावसाळ्यात चिखलाने भरून येतानाचे क्षण असो की पाणी भरलेल्या खड्ड्यात स्वताच पायाने पाणी उडवन सर्व कस समोर घडत होतं आणि वेड्यासारखं हसू लागलो .. " काय रे का हसतो आहेस अस ? " , आई विचारत होती ..आणि मी हसतच होतो ..आईसोबत आलो असल्याने सर्व कसे माझी विचारपूस करीत होतो ..आई माझा मुलगा कॅनडाला जॉब करतो अस सांगायची आणि समोरून कौतुक झालं की तिला माझा अभिमान वाटायचा ..मी फक्त तिच्या चेहऱ्यावर जाणवणाऱ्या अभिमानावर लक्ष देत होतो ..किती मस्त असत ना !! ..लहानपनी आई - बाबा आपल्याला सतत सोबत घेऊन फिरतात ..आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवून , त्यांचं बोट धरून चालू लागतो ..तेव्हा आपण त्यांच्या नावाने ओळखल्या जातो ... जेव्हा आपल्या नावाने आईवडील ओळखले जातात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच सार्थक होत .. ते वृद्ध होत जातात आणि हळूहळू आपण तरुण होत जातो आणि जाणूनच ते बोट आपण कायमच सोडून वेगळ्या वाटेल निघतो ..मुळात त्यांना त्यावेळी आपण त्यांचं बोट धरावस वाटत असत आणि आपण फक्त लाजेखातर ते सोडून देतो ..मलाही त्या क्षणांची जाणीव झाली आणि समोर जाऊन आईच बोट धरून चालू लागलो , " काय रे काय झालं ? " , ममा म्हणाली .." काही नाही ग बस असच .." हळूहळू आम्ही रस्ता सर करू लागलो ...समोरच एक चहावाला दिसला तिथे बरेच लोक गोळा होऊन होते .." ममा आपण चहा घेऊ चल " म्हणत तिला तिथे घेऊन गेलो .दोन चहाच्या ऑर्डर दिल्या ..आई बाजूच्या बाकावर बसली आणि आम्ही चहा पित गप्पा मारू लागलो ..

" अय्या आज मुलाला घेऊन आलीस तर आम्हाला विसरली वाटत " , जोशी काकू म्हणाल्या ...आई काही म्हणणार त्या आधी मीच म्हणालो , " नाही हो काकू उलट तिने मला तुम्हालाच भेटायला सोबत आणलं आहे .." मी चहा बाजूला ठेवून त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासाठी पण चहा ऑर्डर केला ..आईच्या चार - पाच मैत्रिणी होत्या ..त्यांच्यासोबत ती खूप खुश जाणवत होती ..जोशी काकूंनी बोलायला सुरुवात केली , " वनिता ( माझी आई ) खुप मस्त संस्कार दिले आहेस ह तू अभिला " ..आणि आई हसत म्हणाली , " वर्षा त्याच्या जाळ्यात फसू नकोस तुला पाहून नौटंकी करतोय नाही तर मोठा सैतान आहे तो .." आता आम्ही सर्व हसू लागलो .." तुझं हे असंच असत बघ पण काहीही म्हण मस्त संस्कार दिले आहेस तू..जो मुलगा या वयातही आईच बोट धरून चालतो त्याला कुठल्याच स्तुतीची गरज नाही ..बर असो ए तुझा मुलगा खूप हँडसम दिसतो ..आणि जॉब पण आहे कॅनडाला सो लग्नाचं वगैरे काही बघते आहेस की नाही ..माझ्या भावाची मुलगी आहे म्हणशील तर दाखवते .." काकू अस म्हणाल्या आणि मी आईकडे पाहू लागलो ..मला वाटलं आता गेलो मी पण आई म्हणाली , " आताच तर सेटल झाला आहे काही दिवस जाऊ दे नंतर मीच सांगते तुला मुलगी बघायला ..तस पण आजच्या मुलांचा काय भरोसा केव्हा एखाद्या मुलीला घेऊन येतील आणि सांगतील ही तुझी सून आहे असं ..म्हणून वाट पाहतोय .." आईला माझ्या मनातील सर्व कळायचं ..मी तिला मनातल्या मनात आय लव्ह यु म्हणालो आणि तिने नेमकं त्याच वेळी माझ्याकडे पाहिलं ..याला म्हणतात प्रेम ..बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर आम्ही घरी परतलो होतो ..तिच्या चेहऱ्यावर कधीही न सरणारा आनंद दिसत होता जो मला सदैव तसाच हवा होता ..

घरी परतलो ..अंघोळ वगैरे करून टीव्ही समोर बसलो ..एक - एक चॅनल बद्दलवत होतो पण मनासारखं काहीच सापडत नव्हत..कुठे एखादी मुलगी पडून गेल्याची बातमी होती तर कुठे खून झाल्याची ..मूवीही पाहायला गेलं तर त्याच परत - परत यायच्या त्यामुळे मूड खराब झाला ..टीव्ही लगेच बंद केली ..आता नेमकं काय करू तेच कळत नव्हतं ..घरात बसून - बसून कंटाळलो होतो ..आज ऑफिसला सुट्टी नसल्याने शाश्वत , सोनाली , विकास कुणीच बोलायला नव्हते आणि ते सायंकाळी घरीच येणार असल्याने त्यांना त्रास देन योग्य नव्हतं ..आई आपले काम करण्यात व्यस्त झाली होती ..काय करावं हाच विचार करीत असताना मला भेंडे मॅडमची आठवन झाली ..कॅनडाला असताना त्यांनी मला खूप वेळेस मॅसेज केले होते शिवाय घरी आलास की भेटायला ये अस सांगायला विसरल्या नव्हत्या म्हणून कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला ..दुपारचं जेवण व्हायला वेळ होता आणि लागेच कपडे चेंज करून कॉलेजकडे निघालो ....

कॉलेजच ते गेट ..याच कॉलेजच्या गेटने आमचे प्रत्येक क्षण टिपले होते आणि चार लोफर लोकांना जीवन जगायला शिकविल होत ..फक्त आता परिस्थिती बदलली होती कारण मी त्या कॉलेजचा विद्यार्थी नव्हतो ..गाडी पार्क केली आणि स्टाफरूमकडे जाऊ लागलो ..मला वाटल होत की मी गेल्यावर सर्व काही बदललं असेल पण मी चुकीचा होतो...आजही सर्व तसच होत ..कॅन्टीनवर सर्व मस्त्या करीत होते तर कुठे मूल मुलींना बघून गॉसिप करत होते ..थोड्या समोर गेलो तर मानसी ज्या पपीला बिस्कीट भरवायची त्या पपिला एक पिल्लू झालं होतं ..मानसीला ते आवडायचं म्हणून मीही त्यांच्याशी मैत्री केली होती ..मी त्याच्याजवळ गेलो आणि ती येऊन हाताला चाटु लागली ..किती मस्त ना !! ..आजच्या जगात मानस एकमेकांना विसरतात पण प्राणी कधीच विसरत नाही ..मी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तीच पिल्लू माझ्या जवळ येऊन बसल ..मी लगेच कँटीनला धावत जाऊन बिस्कीट पॉकेट घेऊन आलो आणि ते पिल्लू आनंदाने बिस्कीट खाऊ लागलं ..आजूबाजूचे मला पाहून हसत होते पण मला त्याची पर्वा नव्हती..शेवटी त्या दोघांच्याही पाठीवरून हात फिरवून मी स्टाफरूमकडे गेलो..स्टाफरूमला पोहोचलो तेव्हा मॅडम तिथे नव्हत्या ..घडीकडे पाहिलं तर क्लास सुटायला आणखी दहा मिनिटे वेळ होती..शेवटी मॅडम आल्या ..त्या आता डिपार्टमेंटच्या हेड झाल्या होत्या ..मी त्यांना बघताच नमस्कार केला आणि त्या मला पाहून खूप आनंदी झाल्या ..एवढंच काय मॅडमनि सर्व शिक्षकांना माझ्याबद्दल सांगायला सुरुवात केली ..मी माझ्या फिल्डबद्दल एक पुस्तक लिहिल होत ..पुस्तकाबद्दल त्या सांगायला विसरल्या नाही ..आज माझ्यामुळे माझ्या सर्वात आवडत्या दोन व्यक्ती खुश झाल्या होत्या ..एक तर आई आणि दुसऱ्या भेंडे मॅडम....मॅडमशी काही वेळ बोलणं झालं आणि खूप समाधान मिळालं ..त्यांचा क्लास असल्याने त्या निघून गेल्या आणि मीही समोर जाऊ लागलो ..मी एक - एक कलासरूम समोर जात होतो आणि आपल्या क्लाससमोर पोहोचलो.. तिथे शाश्वत , सोनाली , विकास , मी मस्त्या करताना दिसत होतो ..त्यांना बघून हसलो आणि समोर जाऊ लागलो..आता मानसीच्या क्लासरूम समोर पोहोचलो .. तेव्हा नेहा मानसीच्या केसांना हलवून त्रास देत होती आणि ती नेहाला मारण्यासाठी तिच्या मागे धावत होती ..सर्व कस समोर घडत असल्याचं जाणवत होतं..काहीच अंतरावर पोहोचला ..आणि समोर मानसी कुणाशी तरी बोलताना दिसली म्हणजे बहुतेक भास झाला..तो काळ्या कलरचा सलवार सूट ..ती गोरी असल्याने तिच्यावर काळा ड्रेस शोभून दिसत होता .तिने केसांचा झुपका खुला ठेवला होता आणि ते समोर चेहऱ्यावर येऊन तिला त्रास देत होते व ती वारंवार त्यांना मागे करत होती .मानसी जिच्याशी बोलत होती ती आमची ज्युनिअर होती ..ही तीच जीच्याकडे आम्ही ट्रॅडिशनल डे ला पाहत होतो ..सर्व कस सत्यात घडल्यासारखं वाटत होतं आणि स्वतःच्याच विचारांवर पुन्हा एकदा हसू लागलो .." साल्या अभि तिच्या विचारात एवढा हरवला आहेस की सर्विकडे तीच दिसत आहे "..मी दुसरीकडे पाहावं आणि ती खरच गायब झाली ....मीही आपल्या डोक्यावर एक टपली मारली आणि कँटीनला जाऊ लागलो ..

क्या करू मै इन खयालो का
जीस मे तुम हर पल बसती हो
मै धुंडता नही तुझे इस लोगो भरी महफील मे
और तुम हो के बिन बुलाये चली आती हो ..

स्वतःवरच हसत कॅन्टीनला पोहोचलो ..चहाचा ऑर्डर दिला ..आम्ही कॉलेजला असताना गोंधळ करायचो तसाच गोंधळ आताही तिथे सुरू होता ..फक्त माझ्या ओळखीच कुणीच नव्हतं ..मी एक कोपरा पकडून चहाचा एक - एक सिप घेऊ लागलो आणि समोरून मनप्रीत ( ही तीच जी मला काही वेळेपूर्वी मानसिसोबत दिसली होती ) बसत म्हणाली , " हाय अभि ..बहोत दिनो के बाद दिखाई दे रहे हो .." ..

" हा यार कॅनडा मे था दोन दिन हुये है यहा आये हुये " , मी तिला म्हणालो ..

" क्या नसीब है ना मेरा अभि मानसी दीदी भी मिली थी .." , ती म्हणाली आणि मी थोड्या मोठ्या आवाजात म्हणालो , " मतलब वो सच मे तुम्हारे साथ थी ?" , ..ती उत्तरली , " हा क्यू आपणे देखा था उसको ..? " ...मी स्वतःच्या भावनांवर आवर घालत म्हणालो " नही तो ..बस ऐसेंही कहा ." मग संधी शोधून तिला मानसीबद्दल विचारलं ..तिला जेवढं माहिती होत तेवढं तिने सांगितलं आणि क्लास करायला निघून गेली . मी देखील पैसे पेड करून घरी निघालो ..तिने अस एक सत्य सांगितलं होतं ज्याने मला शॉकच बसला होता ..मानसी आपली पी.एच.डी. पूर्ण करत होती पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तीच लग्न झालं नव्हतं ..मी तिला राहुलबद्दल विचारलं पण ती म्हणाली की तो इतक्यात दिसत नाही ..मनप्रीतच्या शब्दाने थोडा सुखावलो कारण तीच लग्न झालं नव्हतं आणि दुखावलो कारण एक प्रश्न मला सतावत होता ..त्यांचं एकमेकांवर प्रेम होत तर मग लग्न का नाही केलं ? ...घरी पोहोचलो तरी डोकं काही काम करेना ..सतत मनप्रीतचे शब्द आठवत होते ..क्षणाला वाटायचं की विकास शाश्वतला फोन करावा पण सायंकाळी ते येणारच असल्याने हिम्मतही होत नव्हती ..तरीही स्वताला आवर घालत त्यांची वाट पाहू लागलो ..
साडे सहाच्या सुमारास ते तिघेही आले ..मी आईला आधीच सांगून ठेवलं असल्यामुळे तिने तयारी करायला घेतली होती ...सोनाली आली आणि तिने आईसोबत स्वयंपाकाचा चार्ज घेतला ..बाबाना घरी यायला उशीर होणार होता त्यामुळे आम्ही मस्त्या करण्यात गुंग होतो ..आमच्या मस्त्याच्या आवाज बाहेर पर्यंत जात होता आणि त्या दोघीही आम्हामुळे त्रासून गेल्या तरीही आमच्या मस्त्या काही थांबल्या नव्हत्या ..आई आतमध्ये आली आणि बाबा बाहेर असल्याची बातमी मिळाली ..हे ऐकताच सर्व कस शांत झाल ..पटापट रूम आवरून आम्ही शहाण्या बाळासारखे बसलो होतो .आता त्या दोघीही आम्हाला पाहुन हसत होत्या ..बाबा आले आणि आमचा सर्व मूड गेला ..एक तर खूप दिवसांनी भेटलो होतो आणि त्यातही शांत राहणं म्हणजे पापच ..शाश्वतने बाहेर जाण्याची कल्पना सांगितली आणि आम्ही आइस - क्रीम आणण्याचा बहाणा करून बाहेर पडलो ..आज खूप दिवसानंतर तिघेही एकाच स्कुटीवर बसलो होतो ..ज्या - ज्या कट्ट्यावर आमचे मित्र राहायचे त्या सर्व कट्ट्यांना आम्ही भेट देत होतो ..कॉलेजला असताना जे क्षण अनुभवले होते तेच सर्व क्षण पुन्हा एकदा जगायला मिळाले होते ..कुठलाच मित्र जाऊ द्यायला तयार नसताना आम्ही बहाणे करून दुसरीकडे जात होतो ..सायंकाळची वेळ होती ..रस्त्यावर लाइट्स पेटले होते आणि त्याचा मंद असा प्रकाश मनाला सुखावून जात होता .हळूहळू शहर शांत होऊ लागलं .आम्ही घराकडे निघालो तेवढ्यात सोनालीचा फोन आला आणि जेवण तयार झाल्याची बातमी मिळाली ..काहीच वेळात आम्ही आइस - क्रीम घेऊन घरी पोहोचलो ..एव्हाना आईने पान वाढायला घेतली होती ..पोळी , पनीरची भाजी , वांग्याचं भरीत , भात , दह्याची कढी , गुलाब जामुन असा मस्त बेत होता ..आम्ही एकदा सर्वांकडे बघितलं आणि जेवणाला सुरुवात केली ..आई खूपच सुंदर स्वयंपाक बनवीत असे त्यामुळे आम्ही एकदा खायला बसलो की पोट भरल्याशिवाय उठत नसू ..सर्व कसे बकासुरासारखे खाऊ लागलो ..आई आमच्याकडे पाहून हसू लागली .." काकू मी तुमच्याकडेच शिफ्ट होऊन जाऊ का ? " , शाश्वत म्हणाला .

" का रे ? " , आईने त्याला विचारलं .त्यावर तो म्हणाला , " ए काकू तू स्वयंपाकच एवढा सुंदर बनवते की दररोज इथेच खायला आवडेल मला तस पण हा अभि तर असत नाही इथे मग मला तर संधी मिळू दे "..विकास त्याला साथ देत म्हणाला , " हो ना काकू नाही तर मलाही दररोज फिक - फिकच जेवण करावं लागतं ..विकास अस म्हणताच आम्ही सोनलिकडे पाहू लागलो आणि सोनाली म्हणाली , " हो काकू याला पण इथेच ठेवून घ्या ...तू बघच रे तुला नाही उपाशी ठेवलं तर म्हण मग मला .." आता विकासचा डाव विकासवर उलटला आणि तो नमत घेत म्हणाला , " मस्करी केली ग तुझ्याएव्हढ तर काकू पण सुंदर बनवत नाही .." त्याच्या अशा बोलण्यावर आम्ही सर्व हसू लागलो ...खूप दिवसाने आम्ही अस खळखळून हसत होतो ..शेवटी सर्वांचं जेवण आटोपलं आणि आम्ही बेडरूमला गेलो ..
आई - सोनालीसोबत झोपणार होती तर बाबा हॉलमध्ये आणि आम्ही तिघे माझ्या रूम मध्ये ..आमच्या गप्पा मस्त रंगात आल्या होत्या ..त्यात आम्ही सोनालीला फार मिस करत होतो..काही वेळात ती खरच आली .." तू इथे कशी आली आणि आईने कस सोडलं तुला ? " , मी म्हणालो आणि ती त्यावर म्हणाली , " अरे काकूच म्हणाल्या तुलाही गप्पा मारायच्या असतील तर जा फक्त लवकर ये झोपायला म्हणून आले म्हणून आले ..." मी हळूच शाश्वतला डोळा मारला आणि तो म्हणाला , " नाही रे भावा ही आपल्यासाठी नाही आली विकासशिवाय राहणं झालं नसेल म्हणून आली ही ." ...ती नाक मुरडत म्हणाली , " ए अस काहीच नाही हा मी तुमच्यासाठीच आले " ..मीही संधीच्या शोधात होतो आणि म्हणालो , " बर ते सोड सोनाली आम्हाला मामा केव्हा बनविणार आहेस ते सांग ? " शाश्वतने मला टाळी दिली आणि आम्ही हसू लागलो .. " शी बाई काही पण विचारता तुम्ही ..विकास सांग न रे याना काहीतरी " ..विकासनेही डाव पलटला आणि म्हणाला , " तुझे मित्र आहे तू बघ काय करायचं तर ..नाही तेव्हा तर माझे बेस्ट फ्रेंड म्हणत असतेस सो झेल आता त्यांना .." आता तर तिच्यावर सर्वच हसू लागले ..
" बर थांब सोनाली त्यालाच विचारतो काय रे विकास प्लॅंनिंग केलं का नाही .." तो मात्र बिनधास्तपणे उत्तरला , " अभि एकदा मूल आलं की या बाईसाहेबांचा वेळ त्यांचाच असेल म्हणून म्हटलं काही दिवस तर आम्हीच रोमान्स करावा म्हणून थोडे दिवस हा प्लॅन समोर केला..आता कबाब मे हड्डी कुणाला पसंद असेल तूच सांग ..." आता तर सोनाली लाजून पाणी - पाणी झाली होती ..किती मज्जा होती त्या क्षणात ..खूप दिवसांनी अस एकत्र बसून गप्पा मारत होतो ..

" बर एका ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ? " , मी म्हणालो ..सर्व माझ्याकडे पाहू लागले .." अरे आज घरी करमत नव्हतं म्हणून कॉलेजला गेलो होतो तर तिथे मला मानसी दिसली ?."

" काय ? मग बोललास की नाही तिच्याशी ? " , विकास म्हणाला ..

" मला वाटलं मला भास झाला म्हणून लक्ष दिलं नाही पण नंतर मनप्रीत भेटली " माझी गोष्ट अर्ध्यावर कापतच विकास म्हणाला , " मनप्रीत कशी आहे ? .. ती काय भारी दिसायची राव ? " ..आता सोनाली आणि मी दोघेही त्याच्याकडे रागाने पाहू लागलो .." सॉरी सॉरी ..समोर सांग " , विकास म्हणाला ...हो तर मनप्रीत भेटली आणि तिने सांगितलं की तीच लग्न झालं नाही ..ती पी.एच.डी. करते आहे कॉलेजला .
मी केव्हपासून हे सर्व सांगायला आतुर झालो आहे ."

" हो नसेल केलं लग्न पण तुला काय करायचं आहे ? " , शाश्वत म्हणाला ..त्याच्या डोक्यावर टपली मारत विकास म्हणाला , " म्हणजे आताही मानसी आपली होण्याचे चान्सेस आहेत .."

" पण प्रश्न असा आहे की मागील 3 वर्षात त्यांच्यात अस काय झालं की ते लग्न करू शकले नाही.. मला तर काहीच सुचत नाहीये भावा..विचार करून डोक्याचा भुगा झालाय नुसता " , मी म्हणालो ..

" या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकतो ..तो म्हणजे राहुल .." , सोनाली म्हणाली ..

" तुमच्याकडे आहे का नंबर ? " , मी म्हणालो ..

" भावा मी कधी कामी येईल " , शाश्वत हसत म्हणाला ..

" लाव मग कॉल त्याला ..आणि भेटायला बोलावं .." , विकास म्हणाला ..सर्व कस जुळून येत होतं ..आणि सर्व बेस्टी मानसीला पुन्हा माझ्या आयुष्यात आणण्यास आतुर झाले ..

" नंबर नाही आहे पण मित्रांना विचारून काढू शकतो " , शाश्वत म्हणला आणि आम्ही वाट पाहू लागलो ..दोन - तीन लोकांना विचारून झालं पण हाती निराशाच आली ..शेवटी कसातरी नंबर मिळाला ..
रात्रीचे साडे दहा वाजले होते ..हो नाही करत शाश्वतने फोन लावलाच ..समोरून फोन उचलल्या गेला , " हॅलो शाश्वत बोलतोय आपण कोण ? " , राहुल म्हणाला ..इकडून शाश्वत म्हणाला , " सॉरी राहुल इतक्या उशिरा फोन करायला ..मी शाश्वत बोलतोय ..तुझा सिनियर ." त्यावर तो म्हणाला , " बापरे !! किती दिवसांनी फोन केलास काही काम होत का ? " ..त्यावर शाश्वतने रिप्लाय दिला .." हो तसच काही उद्या भेटू शकतो का आपण सायंकाळी ..महत्त्वाचं काम आहे .." ...तो उत्तर देणार होता तेवढ्यात मागून आम्हाला कुणाचा तरी आवाज आला आणि शाश्वत म्हणाला , " बहुतेक आई ओरडत आहे तुला ? " ..राहुल त्याच्यावर हसत म्हणाला , " आई नाही बे बायको आहे ..ठीक आहे उद्या 6 ला भेटू .." शेवटी गुड नाईट विश करून त्याने फोन ठेवला ...आता आमच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते..मणप्रित सांगत होती ते खरं आहे की तो सांगत आहे ते खरं आहे .डोकं चक्रावल होत आणि रूममध्ये जीवघेणी शांतता पसरली ..आता या प्रश्नाचं उत्तर उद्या फक्त राहुलच देऊ शकला असता ..मागील 3 वर्षाच कोड उद्याच सोडवल जाणार होत ..

क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED