kadambari Pramavin vyarth he jeevan Part 17 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १७- वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग- १७ वा

------------------------------------------------------------------------------------

सकाळ झाल्यापासून अनुशाच्या आजच्या दिवसाची सुरुवात अगदी अधिरतेने झाली होती .

टेन्शन नसतांना मनावर एक वेगळेच दडपण आले आहे ज्यात भीती कमी आणि उत्सुकता

जास्त आहे असे तिला जाणवत होते .

तिने लगेच अभिजीतच्या दीदींला फोन लावला ..

दीदींना गुड मोर्निंग करीत ती म्हणाली ..

दीदी ..आज अकरा वाजता मी बाबांच्या ..आय मीन ..मिस्टर सागर देशमुख यांच्या ऑफिसमध्ये

जाते आहे ,इतके दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत सगळी तयारी केली आणि नेमक्या

आजच्या सकाळ पासून मला एक वेगळेच टेन्शन आले आहे ..

काय होईल,कसे होईल ? मला जमेल का ?

या प्रश्नापेक्षा ..हे प्रोजेक्ट जर फेल गेले तर ..?

माझा अभिजित मला कायमचा दुरावला तर कसे ?

ही भीती मला अधिक घाबरवून टाकते आहे.

दीदी तुम्हीच सांगा ..मी कसे करू ?

दिदींनी तिला समजावीत म्हटले ..

अनुषा ..तू जे काही करणार आहेस ..ते तुझ्या प्रेमावर असलेल्या श्रद्धेपोटीच ना ?

तुझा तुझ्या प्रेमावरचा विश्वास असा ढळू देऊ नकोस .

आणि तू हे फक्त तुमच्या दोघांच्या प्रेमासाठी करते आहे ..

असा स्वार्थी विचारतुझ्या मनात नाहीये याची कल्पना आली आहे , ,

आपल्या परिवाराने एकत्र यावे “ हा तुझा उदात्त हेतू या मागे आहे .

अनुषा – मला खात्री आहे ,विश्वास आहे की ..देव तुझी ही इच्छा नक्की पूर्ण करेल..

तू अगदी निश्चिंत मनाने ..

आनंदाने तुझ्या कार्यास आरंभ कर.

तू मनात जसे ठरवले आहेस..त्या प्रमाणे स्टेप बाय स्टेप एकेक पाउल पुढे पुढे टाक.

काही होणार नाही तुला .

गुड लक माय स्वीट -बेबी !

आमच्या दोघांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच.

दीदींच्या या आश्वासक शब्दांनी ,शुभेच्छानी अनुशाला खूप धीर आला.

आता अभिजीतशी बोलू या ..! असे म्हणत तिने अभिला फोन लावला .

तिने काही बोलायच्या आधी .अभिनेच तिला विचारले ..

अनुषा ..झाली का तयारी पेपरची ?

आज पासून परीक्षा सुरु होणार आहे तुझी .

ऐच्छिक –पेपर आहे.. सागर देशमुख – एक व्यक्तिमत्व .”

अगदी निवांतपणे सोडव हा पेपर , खूप वेळ आहे तुझ्या हातात , घाई नको करू ,

उतावीळपणे काही बोलू नको आणि काही अति- उत्साहात खुलासे करीत बसू नको.

आणिक एक महत्वाची गोष्ट तुझ्या लक्षात असू दे...

सागर देशमुख यांचा पी.ए. म्हणजे महादेवापुढचा नंदी ..

त्याला अजिबात शंका येता कामा नये .

उलट त्याला पटवता आले तर ..तुझे काम खूपच सोयीचे होईल .

.पण.हे सुरुवातीला न करता .. शेवटी शेवटी हे करावेस .

म्हणजे त्याला जरी तुझा प्रोजेक्ट बद्दल संशय आला तरी ..

त्यामागचा तुझा हेतू .. त्याला समजला ..तर तो नक्कीच तुला सपोर्ट करील.

ऑल द बेस्ट अनुषा .!

छान काम कर ..! सक्सेस इज युवर्स ..!

मी तुझ्या सोबत आहेच .

अभिजीतचे हे शब्द अनुशाच्या मनापर्यंत पोंचले . तिच्या मनातली भीती एकदम नाहीशी झाली.

तिने घड्याळ पाहिले ..सकाळचे नऊ वाजत आलेले होते , दहा वाजता निघून सागर देशमुख

यांच्या ऑफिसात वेळे आधीच जाऊन बसलेले बरे . ऐनवेळी ट्राफिक प्रोब्लेम झाला तर परेशानी

होण्यापेक्षा ..आरामात तिथे जाऊन बसलेले बरे..

त्याप्रमाणे अनुशा तयारीला लागली.

त्याचवेळी तिच्या सरांचा फोन आला ..ते म्हणत होते ..

हेल्लो अनुषा ..

आजपासून तुझे प्रोजेक्ट सुरु होते आहे. बेस्ट लक टू यु !

मी स्वतहा .सागर देशमुख यांना त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना

त्यांचा एक ओल्ड फ्रेंड म्हणून आणि तुझ्या कॉलेजचा प्रिन्सिपल सर म्हणून जाऊन भेटून, बोलून आलो आहे.

त्यांनी आनंदाने स्वागत करीत म्हटले ..

सर, येउद्या तुमच्या विद्यार्थिनीला , मी तिच्या प्रोजेक्टला फुल सपोर्ट करील ,काळजी नका करू .

अहो मी काय वाघोबा आहे का ? इतके घाबरून जायला ?

माझ्या बद्दल ऐकीव माहितीवरून तुम्ही माझ्या बद्दल काही मते बनवू नका

..आणि तुमच्या student ला सांगा , अगदी टेन्शन-फ्री असावे ..माझ्या सोबत असतांना .

सरांचे हे शब्द ऐकून ..अनुशाच्या मनातली उरली सुरली भीती नाहीशी झाली .

सगळ्यांनी किती घाबरून टाकले आपल्याला , आपल्याला वाटते तितके .हे सागर देशमुख ..

भीती वाटण्या सारखे नक्कीच नाहीत.

आपल्या सरांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवू या.

डार्क कलर कुर्ता , जीन आणि खांद्यावर एक मोठी शबनम ..असा ड्रेस करून अनुशाने आरशात

स्वतःला पाहिले .. परफेक्ट ..पत्रकार वाटत होती.

ओके डन ! असे म्हणून ..

बरोबर दहा वाजता ,स्वतःच्या बाईकवर अनुषा , सागर देशमुख यांच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या दिशेने निघाली.

पंधरा मिनिटे अगोदर ..ती .देशमुख सरांच्या केबिनच्या बाहेर असलेल्या हॉलमध्ये पोंचली होती.

तिच्या अगोदर अनेकजण देशमुखांच्या भेटीसाठी येऊन बसलेले आहेत असे पाहून ..तिला अंदाज

आला की आपला नंबर येण्यास खूप वेळ लागणार आहे.

समोर बसलेल्या स्वागतिका –मैडमला तिने स्वतःबद्दल सांगितले ..

तिचे नाव ऐकून ..त्या मैडमनी लगेच फोन उचलीत अनुषा आली आहे असे सांगितले .

आणि पुढील सुचना ऐकून घेत अनुशाला म्हटले ..

त्या उजव्या कोपर्यातल्या केबिन मध्ये जावे ..साहेबांचे पी.ए तुम्हाला अगोदर बोलतील ,काही ब्रीफ

करतील ,मगच पुढचे ठरणार आहे. प्लीज गो देअर ..!

सर, मे आय कम ईन ?

कामात गर्क असलेल्या खुर्चीतल्या साहेबांना अनुशाने विचारले ..

वर मान करीत त्यांनी ..तिच्या कडे पाहत विचारले ..

मिस ..अनुषा . विदाय्र्थी -पत्रकार ,साहेबांच्या विषयीचा स्टडी –प्रोजेक्ट करणार्या तुम्हीच ना ?

या , बसा ,वेलकम .

बघू तुमची फाईल ..म्हणजे ..मला कल्पना असावी ..की तुम्ही काय आणि कसे करू इच्छित आहात

तुमचे प्रोजेक्ट ?

हो सर, तुमची मदत आणि सहभाग ..असणारच आहे ..फाईल ठेवीत अनुषा म्हणाली.

मिस अनुषा ..माझा परिचय करून देतो ..

मी अविनाश जळगावकर , सागर देशमुख यांचा वयक्तिक आणि कार्यालयीन सचिव ..

गेली अनेक वर्षे इथे काम करतो आहे.

अनुषा ..मला तुमचे कौतुक करावेसे वाटते आहे की ..तुम्ही आमच्या साहेबांच्या संदर्भात

हे प्रोजेक्ट करू इच्छित आहात . या अगोदर कुणी असा प्रयत्न केल्याचे मला तरी आठवत नाही.

अनुषा ..तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी अतिशय योग्य व्यक्तीची निवड केली आहे असे मी म्हणेन.

एक प्रश्न विचारीन तुम्हाला ..

आमचे साहेब..सागर देशमुख यांचीच निवड तुम्हाला का करावीशी वाटली ? हे सांगावे..

अविनाश जळगावकर यांच्या प्रश्नास उत्तर देत अनुषा म्हणाली ..

सर, ते तर मी सांगेनच ..

त्या अगोदर ..एक विनंती करते आहे ..की ..

सागर देशमुख यांना भेटण्याची माझी वेळ ..अकरा वाजताची दिली आहे तुम्ही ,आणि अकरा त रवाजत

आहेत ..निदान तुमच्या साहेबांना ..मी वेळेवर आलेली आहे ..हे तर सांगता की प्लीज...

अनुशाच्या आवाजात थोडासा टेन्शन जाणवले ,जळगावकर म्हणाले ..

डोन्ट वरी ..मिस ..अनुषा , तुम्ही वेळेवर आलेला आहात ..याचा रिपोर्ट देशमुख सरांच्यापर्यंत

गेला आहे.

त्यांची तुमची भेट ..मी आज घडवून देईल ..तुम्ही निश्चिंत राहा.

आता सांगा ..तुम्ही हेच प्रोजेक्ट करायचे हे का ठरवले , इतर हे अनेक पर्याय असतील ना ?

अनुषा सांगू लागली ..

सर, एक तर ..मी मिडिया पर्सन , सहाजिकच ..माझ्या सहकारी पत्रकार आणि न्यूज रिपोर्टर

अशा सहकारी मित्रांच्या कडून सागर देशमुख यांच्या बद्दल थोडेफार ऐकून आहे .

मी या अगोदर अनेक सामाजिक व्यक्तिमत्व , आणि सामन्य नागरिक, महिला अधिकारी ,

महिला कार्यकर्त्या , गृहिणी .अशा लोकांच्याबद्दल पेपर आणि मासिकांच्यासाठी अनेक फिचर केलेले आहेत,

टीव्हीवर सतत इंटरव्ह्यू घेतले आहेत ,

पण एखाद्या उद्योजक व्यक्तिमत्वाचा प्रवास “ अशा स्वरूपाचे प्रोजेक्ट मी केले नव्हते कधी ,

आणि आमच्या कॉलेज मधील कुणा विद्यार्थ्यांनी देखील यासाठी उत्सुकता दाखवली नव्हती.

म्हणून ..मी हे प्रोजेक्ट सबमिट केले ..आणि ते प्रिन्सिपल सरांनी मंजूर केले .

म्हणून मी आज तुमच्या समोर आले आहे.

अनुशाच्या बोलण्यातला सच्चेपणा अविनाशसरांना जाणवला होता ..

ते आनंदित होऊन म्हणाले .. वा .वा ..अनुषा ..खूप छान कल्पना आहे.

आय विल सपोर्ट यू..!

येते तीन महिने ..म्हणजे या प्रोजेक्टच्या काळात ..काय काय आणि कसे कसे

करीत पुढे जायचे ..याचा एक action-plan आपण करू या . आणि त्या प्रमाणे प्रत्यक्ष

कामाला सुरुवात करू या.

तुम्ही रोज सकाळी ११ ते ५ .याच वेळेत जेव्हा साहेब उपलब्ध असतील त्याच वेळेत

साहेबांशी समक्ष बोलून ..तुमच्या नोंदी , लिहून घेत जाणे ..

या वेळेत साहेबांच्याकडे कुणी आले तरी ..तुम्ही उठून बाहेर येऊन बसायचे काही कारण

नाही , साहेब कुणाशी कसे बोलतात , कसे वागतात ..त्यांचे विचार ..हे तुम्हाला पाहता येईल,

थोडक्यात साहेबांना जाणून घेणे ..तुमच्या कामाचा भाग आहे. तो साध्य होईल.

म्हणून तुम्हाला केबिन मध्ये बसून राहण्यास साहेबांनी परमीट केले आहे.

या कामाच्या वेळी तुमच्यासोबत मी नेहमीच असणे बरोबर नाही आणि ते शक्य पण नाहीये.

अविनाश सरांच्या सूचना ऐकून अनुषा म्हणाली ..

सर एक विचारू का ?

अविनाश सर म्हणाले ..हो जरूर विचारीत जावे ..मनात संकोच आणि शंका दोन्ही नकोत.

थांक्यू अविनाश सर. अनुषा म्हणाली ..

सर, तुमच्या या सुचना ऐकून ..मला वाटते ..माझ्या प्रोजेक्ट बद्दल ..तुम्ही तुमच्या साहेबांशी

अगोदरच चर्चा करून खूप काही ठरवले आहे असे दिसते ..

अविनाश सर म्हणाले ..

होय अनुषा .. देशमुख साहेब फारच काटेकोर आणि शिस्तीचे भोक्ते आहेत ..

ते मला म्हणाले ..अविनाश एक लक्षात ठेवा –

एखादी अनोळखी व्यक्ती . जेव्हा स्वतहाहून माझ्या संदर्भात इतके मोठे

काम करू इच्छिते आहे..हा माझा बहुमान होतो आहे “असे मी समजतो .

म्हणून ..या कामात ..या विद्यार्थिनी ..मुलीला ..आय मीन ..व्यक्तीला आपल्याकडून प्रतिसाद

तितकाच सकारात्मक असला पाहिजे.

तुम्ही माझ्यावतीने ..त्या विद्यार्थिनीला सर्वोतोपरी मार्गदर्शन करा ,मदत करा .

अविनाशसरांच्या या शब्दांनी ..अनुशाला ..पहिल्या दिवसाची सुरुवात छान झाली “याचा

आनंद वाटत होता.

अविनाशसर त्यांच्या साहेबांच्या केबिन मध्ये गेले ..म्हणजे .आता थोड्या वेळात आपण

प्रत्यक्ष सागर देशमुख यांच्या समोर असुत ..

कल्पनेने ..अनुशाच्या मनातली धडधड वाढू लागली .

अविनाशसर तिच्या जवळ येत म्हणाले ..चला मिस अनुषा ..

सागर देशमुखसर तुमची वाट पाहत आहेत ..

आणि ..अनुषा ..त्यांच्या केबिन मध्ये गेली ..समोरच्या खुर्चीत बसलेल्या सागर देशमुखकडे ,

तिच्या अभिजीतच्या बाबांच्याकडे पाहत राहिली ..

तिच्या भाव-विश्वात तिच्या परीक्षेस आज पासून सुरुवात झाली होती.

----------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -१८ वा लवकरच येतो आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी ..प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED