Sparsh - 14 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 14

राहुलचा नंबर स्क्रीनवर झळकू लागला आणि माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच जास्त गतीने वाढू लागले ..कॉल रिसिव्ह करताच राहुल म्हणाला , " सॉरी यार अभि " ..

वाटलं पुन्हा एकदा नशिबाने साथ सोडली ..फोन लगेच खाली फेकून द्यावासा वाटत होता पण राहुल आताही कॉलवर होता त्यामुळे मी शांत होऊन त्याच बोलणं ऐकू लागलो ..पुन्हा तो बोलू लागला , " सॉरी यार अभि ..मला वाटत या जन्मात ती तुझीच असेल ..मी म्हटलं घरचे तरी नकार देतील आणि तुझा पत्ता कट होईल पण अस काहीच झालं नाही ..तू कॅनडाला जॉब करतोस , वेल सेटल आहेस , सॅलरी मस्त आहे हे ऐकून त्यांनी लगेच होकार दिला ..संडेला बोलावलं आहे तुम्हाला "
माझी स्थिती अशी होती की डोळ्यात पानी आणि चेहऱ्यावर हसू ..मी त्याला रागावत म्हणालो , " साल्या गंमत करण्याची पण हद्द असते जीव गेला असता ना माझा .." तो थोडा हसला आणि म्हणाला , " खुशी का मजा गम के बाद ही आता है ..संडेला 12 वाजता बोलावलं आहे सो वेळेवर या ..माझं नाक नका कटवू ..चला मग भेटूया सरळ तिथेच .." दोघाणीही बाय म्हणून फोन ठेवला ..मला तर आनंदाने उड्या माराव्याश्या वाटत होत्या .बाबाही ऑफिसला गेले होते त्यामुळे तो आनंद उघडपणे दाखवायला काहीच हरकत नव्हती .आई त्यावेळी किचनमध्ये होती ..मी तिला मागून जाऊन मिठी मारली आणि वेड्यासारखा डान्स करू लागलो ..ती मला विचारत होती पण मी काहीच बोलायला तयार नव्हतो .डान्स करून मी थकलो आणि ती मला पाणी देत म्हणाली , " आता तरी सांग नेमकं काय झालं आहे ? " .. आणि मी जोर्याने ओरडत म्हणालो , " आई बहुतेक माझं स्वप्न आता सत्य होणार ..मानसीच्या घरून आपल्याला बैठकीसाठी बोलविण्यात आलं आहे ..सो आपल्याला संडेला जायचं आहे .."

" काय सांगतो आहेस म्हणजे माझी सून लवकरच या घरात येईल .." , ती म्हणाली आणि मी थोडा नाटक करत म्हणालो , " पण आई तिला याबद्दल काहीच माहिती नाही ..आणि तुलाही अस दाखवाव लागेल की तिला आपण ओळखत नाही ..म्हणजे काय तर सर्वाना अभिनय करावा लागेल .." आणि ती पून्हा हसून म्हणाली , " बेटा त्याची काळजी नको करू तू ..अभिनयात माझा हात कुणीच पकडू शकणार नाही ..बघच तू कसा करते अभिनय .सर्वच तोंडात बोट टाकून पाहत राहतील ..."

" ड्रामा क्वीन फक्त सर्व काही सांभाळून घ्या म्हणजे मिळविल पण बाबांच काय ..त्यांना जमेल का हे सर्व ..? " , मी म्हणालो आणि त्यावर आई हसत म्हणाली , " त्यांना त्याच वेळी जमलं नाही तर आता काय जमेल बसतील शांत .. "

" त्यावेळी म्हणजे ?? .." , मी तिला हसून विचारलं ..

" मी अस बोलले का चुकून बोलले मग " , ती नजर चोरत म्हणाली

" आई मी तुझाच मुलगा आहे बर ..सांग नेमकं काय झालं होतं .." , मी तिला चिडवत म्हणालो ..आणि तिला बोलणं भाग पडलं , " अभि तू ना काही पण विचारतो ...बर ऐक मग ..तुझ्या बाबांची आणि माझी ओळख कॉलेजमधली ..एकाच कलासला होतो ..हळूहळू बोलणं वाढलं आणि एकमेकांवर प्रेम करून बसलो ....कॉलेजला असताना तस जुळून आल पण तुझे बाबा इतके घाबरट होते की त्यांना त्याक्षणी पण मनातलं सांगणं जमलं नाही ..मी ते मनातलं सांगतील याचीच वाटच पाहत होते पण त्यांना ते जमलं नाही ..एवढंच काय मित्रासमोर माझ्याशी बोलायला देखील घाबरायचे तुझे वडील ...शेवटी मीच पुढाकार घेतला आणि त्यांना मनातलं सांगितलं .आमचं नात हळूहळू वरच्या लेव्हलला जाऊ लागलं ..एकमेकांनी सोबत राहण्याची स्वप्नदेखील पाहायला सुरुवात केली .. पण कॉलेज संपत आलं आणि बाबांनी मला मूल पाहण्यास सुरुवात केली ..मीही जिद्दी होते , मला तुझ्या बाबांशीच लग्न करायचं होतं .त्यामुळे मनाशी याबद्दल बोलले ..त्यांनी सुरुवातीला नकार दिला पण शेवटी तो मानला ..मामा माझा फार जवळ होता मी त्याला सर्व सांगितलं आणि त्यानेच सेटिंग करून तुझ्या बाबांच स्थळ आणलं .सर्व काही आधीच सेट होत मग काय मला फक्त होकार कळवायचा होता ..तो मी कळविला आणि आमच्या प्रेमाला सर्वांची संमती मिळाली..फक्त ते लव्ह मॅरेज होत हे कुणाला माहिती नाही ..तुझ्या आजोबांना पण नाही ..तेव्हा सांगू नको त्यांना .." आणि मी हसत - हसत म्हणालो , " बापरे !! म्हणजे तुझ्यासमोर मी काहीच नाही आणि आजोबांना माहिती झालं तरी काय होईल आता तर माझं लग्न होईल काही दिवसात सो काय घटस्फोट घ्यायला लावणार आहे या वयात .." ती थोडी सिरीयस होत म्हणाली , " प्रश्न विश्वासाचा आहे ..तेव्हा नको सांगू कुणाला .." मी तिला न सांगण्याची हमी दिली आणि तो क्षण तसाच गेला ..
रविवार येण्यासाठी फक्त 3 दिवस उरले होते आणि आई फारच उत्साही होती ..तिने बाबांना सर्व काही समजावून सांगितलं होतं ..आजोबानाही आईने फोन करून कळविल होत आणि ते देखील शनिवारला येणार होते माझे बेस्टीज पण फारच उत्साही होती ..तिने तर साड्यांची शॉपिंग करायला सुरुवात केली होती शिवाय आपल्या मैत्रिनिंमध्ये माझ्या अभिच लग्न होणार असल्याचा दिंडोरा पिटु लागली..इकडे आईला सांभाळणं कठीण होत तर मित्रही काही कमी नव्हते ..त्यांचे लग्नाला काय - काय करायचं तर ड्रेस कोड कोणता ठेवायचा हे सर्व ठरवून झालं आणि मी बिचारा मानसी मला बघून काय रिऍक्ट करेल याच्या चिंतेत पडलो होतो ..मलाही लग्नात खूप काही करायचं होतं पण त्यासाठी आधी मानसीचा होकार येन गरजेचं होतं म्हणून मी माझ्या भावनांवर ताबा ठेवला होता ..सर्व मला हवं तसं घडत होतं ..

आज रविवार ..राहुलचे दोन - तीनदा फोन येऊन गेले होते ..आईचीही सकाळपासून ओढाताण सुरू झाली होती ..आजोबा सोबत असल्याने मित्रांना सोबत घेन शक्य नव्हतं तरीही त्यांनी सकाळी कॉल करून शुभेच्छा कळविल्या होत्या ..मी ऑफिसला घालायचो त्याप्रमाणे फॉर्मल कपडे परिधान केले ..हातात घडी आणि डोळ्यावर चष्मा होता .सर्व कस नीटनेटकं ..शेवटी इम्प्रेशनचा प्रश्न होता ...तिचे बाबा साधे राहत असल्यामुळे मी तसाच राहण्याचा प्रयत्न करीत होतो ..आई इतकी उत्साही होती की जस तिचच लग्न होणार होत ..साडे अकराच्या आसपास वाजले होते ..आई एका तासापासून तयारी करत होती तरी ती बाहेर निघायला तयार नव्हती ..मी तिला बोलविण्याचा प्रयत्न करीत होतो तरीही काहीच फायदा होत नव्हता ..तेव्हाच बाबांच्या कानात काहीतरी बोललो आणि आणि बाबा रूममध्ये गेले ... आई दोन मिनिटात बाहेर आली ..बाबांनी तिला सांगितलं की आजोबा रागावले आहेत दोन मिनिटात आली नाही तर तुला सोडून निघून जाऊ अस म्हणाले ते ..आणि ती मागचा पुढचा विचार करता न बाहेर आली ..शेवटी लाडकी सून होती न ती त्यांची ..सर्वांची तयारी झाली होती आणि आम्ही कारने मानसीच्या घरी निघालो ..आई आजोबांकडे मानसीची खूप स्तुती करीत होते आणि ते पण आनंदाने सर्वच एकूण घेत होते..कारमध्ये ते फक्त दोघच बोलते होते बाकी बाबा , मी नेहमीप्रमाणेच शांत होतो ..आजोबांसमोर बोलण्याची हिंम्मत ना त्यांची होती ना माझी ...राहुल मानसीच्या घरी आधीच पोहोचला होता आणि वाट होती ती आमची ..शेवटी तिच्या घरी पोहोचलो ..राहुलला मी सर्वांची ओळखी करून दिली आणि आम्ही मानसीच्या घरात पोहोचलो ..
आम्ही येताच त्यांनी सर्वाना नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली ..मी सासरेबुवावर इम्प्रेशन मारता यावं म्हणून वाकून नमस्कार केला आणि त्यांनीही भरभरून आशीर्वाद दिला ..त्यामुळे पहिली पायरी तर यशस्वी झाली होती ..राहुलने सुरुवातीला दोन्ही कुटुंबाची ओळख करून दिली आणि नंतर बैठकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली ..माझे आजोबा आणि मानसीचे बाबा जाणकार व्यक्ती शिवाय जुन्या विचारांचे असल्याने त्यांच्यात बरच साम्य होत..त्यामुळे फक्त ते दोघेच बोलत होते ..तस आईला शांत राहणं आवडायचं नाही पण आजोबांसमोर तीच काहीच चालत नव्हतं आणि ती देखील आमच्यासोबत शांतच बसून राहिली ..त्या दोघांची बोलणी उच्च थराला पोहोचली होती ..आजोबांना सोबत आणण्याच हेच कारण होत ..मानसीच्या होकाराचा रस्ता म्हणजे तिचे बाबा आणि त्यांना फक्त आजोबांचं सांभाळू शकणार होते आणि खरच त्याचा फायदाही झाला ..तिच्या बाबांना आजोबाच बोलणं पटलं होत आणि ते फार फ्रीली बोलत होते ..आता वेळ होती ती मुलीला पाहण्याची ..मानसी किचनमधून चहा पोहे घेऊन येऊ लागली ..आता खर नाटक सुरू होणार होत आणि त्याचबरोबर सर्वांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार होता फक्त कलाकार खरच दर्जेदार होते का हे विचारू नये .. ..नाटक सुरू होण्यासाठी कुणीतरी ऍक्शन म्हणणं गरजेचं होतं ..तस मी मनात म्हणालो आणि आमचा कार्यक्रम सुरू झाला ..

मानसी डार्क ब्लु कलरची साडी लावून आली होती .तिची नजर खालीच होती त्यामुळे मी तिच्याकडे पाहू शकत होतो ...ट्रॅडिशनल डे ला जितकी सुंदर दिसत होती त्याहीपेक्षा या सिम्पल लुक मध्ये ती फारच सुंदर दिसत होती ..काय तो हलकासा मेकअप होता बाकी सर्व नॅचरल ब्युटी ..ती हळूहळू सर्वाना पोहे देऊ लागली ..आताही तिची नजर खालीच होती बहुतेक तिच्या घरच्यांनी तिला तस सांगितलं होतं ..ती समोर - समोर येत होती ..आता मला पोहे देण्याचा नंबर होता ..तिने मुलगा कसा दिसतो हे पाहावं म्हणून नजर वर केली आणि मला बघून शॉकच बसला ..तिच्या हातातून ट्रे खाली पडणार तेवढ्यातच मी तो सावरुन घेतला ..ती माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली ..मानसी आता जर बाहेर असती तर माझं काही खर नव्हतं पण तिच्या घरच्यांमुळे मी आज वाचलो होतो ..पोहे झाल्यानंतर चहाही देण्यात आला आणि मानसी अगदी माझ्या समोर येऊन बसली ..आधी आजोबांनी तिला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली .आजोबा तिच्या उत्तरानी फारच इम्प्रेस झाले होते ..आता वेळ होती आईची ..आमच्या नाटकाची मुख्य नायिका ..आमच संपूर्ण यश फक्त तिच्यावर अवलंबून होतो आणि आम्ही उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागलो .. वेळ होती ती किती उत्तम अभिनय करते ते पाहण्याची..ती मानसीला अगदी कट्टर सासूबाईसारखे प्रश्न विचारत होती आणि ती हवं तसं उत्तर देत होती ..इकडे मधातच राहुल साइड हिरोचा रोल प्ले करत होता ...मानसीची नजर त्याच्याकडे गेली की मग मात्र काही खर नव्हतं ..तो लगेचच शांत होऊन जायचा ..मी आणि राहुल बाजूला बसून होतो ..खर तर आम्हाला या सर्वाच खूप हसू येत होतं पण दोघंही स्वताला सावरुन बसलो ..खरी मजा होती ती मानसीची ..कारण आईला तिच्याबद्दल सर्व काही माहिती होत तरीही ती आईला सर्वच सांगत होती ..आई आणि मानसीचा चेहराही खूप काही सांगत होता ..पण त्यांनीही स्वताला कसतरी सावरलं होत ..आईचे प्रश्न विचारून झाले होते तर बाबांनी शांत बसनच पसंद केलं होतं ..ती तिथेच बसून होती आणि मी आईला हात लावून इशारा केला ..आणि तिला मला काय म्हणायचं होत ते समजलं ..ती म्हणाली , " मानसीचे बाबा तुम्हाला काही समस्या नसेल तर या दोघांनाही 10 मिनिटे एकट बोलू देऊया का ?? " ..त्यांना जरी मान्य नसलं तरी ते त्यावेळी नकार देऊ शकले नाहीत आणि मानसी मला तिच्या रूमला घेऊन गेली ..

आतपर्यंत आम्ही स्वताला खूप कंट्रोल केलं होतं ..तिच्या रूममध्ये गेलो आणि काही वेळापूर्वी दाबून ठेवलेलं हसू अचानक बाहेर आल ..मीच नाही तर तीही खूपच हसत होती ..थोड्या वेळ मनभरून हसून घेतल्यावर दोघेही शांत झालो आणि ती म्हणाली , " अभि येण्याच्या आधी एकदा सांगायचं तरी होत ..कस सावरलं मी स्वतःला माझं मलाच माहिती ..आणि चुकून हसले असते न सर्वांसमोर माझं काहीच खर नव्हतं .." मी पण हसतच उत्तर दिलं , " अग हे आईच सरप्राइज होत तेव्हा मला पण याची जाणीव नव्हती ..मीही सावरलं आहे की स्वताला .." दोघानाही हसू सावरन कठीण जात होतं आणि पुन्हा एकदा हसू लागलो .." मला नव्हतं माहिती तू पाहायला येणार आहेस फक्त अस सांगण्यात आलं होतं की मुलगा कॅनडाला जॉब करतो .." , मानसी म्हणाली

" हो मी तिथेच जॉब करतो ..काही दिवसांपूर्वीच इथे आलो आणि आई सरळ मुलगी दाखवायला घेऊन आली .." , मी हसत म्हणालो ..

" तीन वर्षे आठवण नाही आली न ..आणि आलास तर चक्क घाबरवून सोडलंस ..बर मग सांगा मुलगी आवडली का तुम्हाला " , ती माझी खेचत म्हणाली ..आणि मीही त्याच स्टाइलमध्ये उत्तर दिलं .., " आई म्हणाली होती की हीच सून हवी आहे ..आज पहिल्यांदा तिने काहीतरी मागितल तेव्हा ही गोष्ट तर तिला द्यावीच लागेल .." , ती पुन्हा खेचत म्हणाली , " आईच लग्न आहे का ..तुला विचारलं मी ..? "

" हो आवडली की ..कुणाशी तर करायचच आहेच लग्न मग मैत्रिणीशीच करायला हरकत नाही " , मी मान खाली टाकून बोलू लागलो ..

" आणि अभि नक्की ना की आईनेच सरप्राइज दिलं तुला की तूच घेऊन आला आहेस तिला इथे " , ती पुन्हा खेचत म्हणाली ..पण यावेळी माझ्याकडे तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं ..मी विषय बदलावा म्हणून म्हणालो , " त्यांनी दिलेला वेळ संपला .नाही तर तुझे बाबा तलवार घेऊन आतमध्ये येतील ..सो चल निघुया .." आणि तीच उत्तर एकण्याआधीच समोर चालू लागलो ..ती मला थांबवत म्हणाली , " माझं उत्तर तर एकूण घे ..( मी तिथेच थांबलो ) ..आईबाबा खूप मागे लागून आहेत लग्नासाठी ..7 - 8 मुलांना नकार दिला पन समोर ते शक्य होणार नाही ..लग्न तर कुणाशी करायचंच.कुणी चांगला भेटला तर ठीक आहे नाही तर भरपूर जुवळून घ्यावं लागेल ..लग्न तर करायचं आहेच मग विचार करतेय तुलाच डोक्यावर बसवाव .आणि माझ्याशी चुकीच वागलास तरी सासू नावाचं हत्यार आहे माझ्याकडे सो तू काहीच करू शकणार नाही ..काय कशी आहे कल्पना आणि शिवाय कुणाच्या तरी आईच स्वप्न पूर्ण होईल यापेक्षा दुसरा आनंद कोणता ..माझा होकार आहे पण बाबा होकार देतील तरच आपलं नात जुळून येऊ शकत ."

खर तर मला त्याक्षणी तिला मिठी मारावस वाटत होतं पण स्वताला कंट्रोल करून बसलो ..तिला त्या क्षणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो पण हाती निराशाच लागली पहिल्यांदा अस झालं होतं की तिचा चेहरा मला वाचता येत नव्हता ..त्यात खुशी तर होतीच पण विलक्षण आनंद नव्हता जो माझ्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता..आमचं बोलून झालं त्यामुळे पुनः एकदा बैठकीत परत आलो ..माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझं उत्तर सांगण्याची गरज नव्हती ..आईने जाताच सरळ होकार कळविला ..पण तिच्या घरच्यांनी आमचं उत्तर नंतर कळवतो म्हटलं त्यामुळे आणखी थोडी वाट पाहावी लागणार होती ..शेवटी नमस्कार करून दोन्ही फॅमिलिनी रजा घेतली होती ..मानसीने होकार कळवल्याने मनाला समाधान मिळालं होतं पण तिच्याहीपेक्षा तिच्या वडिलांचं उत्तर खूप महत्त्वाचं होत ..आजोबांना त्यांचं घर पसंद आलं होतं ..बेस्टीना पण सर्व सांगितलं होतं .आता सर्वानाच वाट होती ती तिच्या बाबांच्या उत्तराची ..ही एक पायरी पार केली असती म्हणजे मानसी संपूर्णतः माझीच झाली असती ...आता वाट होत ती होकाराची ..तिचे खडूस वडील खरच होकार देतील का ??


क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED