Sparsh - 18 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 18

ती कारमध्ये बसली ..तरीही तिची नजर मात्र वडिलांकडेच होती ..डोळ्यातुन अश्रू थांबायच नाव घेत नव्हते ..शेवटी रस्त्याला एक असही मोड आल की गाडी टर्न झाली आणि त्यानंतर लॉनमधील कुणीच दिसत नव्हत ..आमची गाडी समोर निघाली त्यामगोमाग सर्व गाड्या निघाल्या ..मामी आमचं स्वागत करण्यासाठी आधीच घराकडे निघाली होती ..कारमध्ये सोनाली , मी , मानसी आणि तिची ताई असे चौघेच होतो ...मला सातव वचन आठवलं आणि सोनलिकडे पाहत म्हणालो , " सोनाली मी चूक केली यार लग्न करून ..म्हटलं मुलगी सुंदर आहे इथे तर मेकअपचा कमाल होता ..बर मेकअपच सही पण रडून तो पण खराब करते ही बाई " , सोनालीने मला लगेच टाळी दिली आणि म्हणाली , " अभि अब भी मौका है भाग ले बैठा .." ..मानसी आता हसू लागली होती ..शिवाय मला पाठीला मारू लागली ..मानसीच्या ताईकडे पाहत म्हणू लागलो , " ताई काही खर नाही माझं ही आताच मारायला लागली मला ..समोर मॅडमचा पी.ए. बनूनच जीवन काढाव लागेल अस दिसत आहे .." आणि ताईही हसत म्हणाली , " मग तुला कुणी सांगितला शहाणपणा मानसीशी लग्न करण्याचा .." आता मानसी डोळे मोठे करून ताईकडे पाहू लागली आणि आम्ही सर्वच हसू लागलो ..काही क्षणात तिच्या डोळ्यातले अश्रू नाहीसे झाले .आम्ही सर्वच एका बाजूने झालो आणि मानसीची गंमत करू लागलो ..तिला आमचा रागही येत होता आणि बिचारी लाजत पण होती ..तिच्या अशा निखळ हसण्याने मलाही आनंद झाला ...घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते ..आमच्या मागे सर्वच घरचे परतले होते ..काही नातेवाईक लग्न करूनच परतले तर मोजके घरी आले होते ..आम्ही दारावर उभे झालो आणि मामीने माप आणून ठेवल ..तिने त्याला अगदी प्रेमाने ओलांडल आणि आम्ही आतमध्ये गेलो ..गेले कित्येक वर्षे या घराणे ज्या लक्ष्मीचे स्वप्न पाहिली होती ती लक्ष्मी या घराला आज मिळाली ..घराच्या भिंतीही आज आनंदाने उजळून निघाल्या होत्या ..घरात जाऊन सर्व काही आवरायला एक - दीड तास गेला ..त्यामुळे लगेच झोपाची तयारी सुरू झाली ..शाश्वत - विकास सोबत नव्हते आणि सोनालीही मानसीसोबत असल्याने मी एकटाच टेरिसवर झोपायला गेलो ..दिवसभराच्या थकव्याने अंथरुणावर पडताच झोप लागली ..

सकाळी सूर्याची किरणे डोळ्यावर पडावी आणि माझी लगेच झोप उघडली ..कसातरी कंटाळा करत मी सर्व आवरलं आणि फ्रेश व्हायला आतमध्ये जाऊ लागलो ..मी फक्त घरात प्रवेश केला आणि मानसी अचानक समोर आली ..फक्त दोघांत काही फुटाच अंतर आणि हार्ट बिट्सची गती फारच वाढली ...कधी मी या बाजूने वळायचो तर तीही नेमक्या त्याच बाजूने वळायची आणि पुन्हा एकमेकांसमोर यायचो ..पुन्हा दुसऱ्या बाजूने वळायचो आणि नेमकी तीही त्याच वेळी वळायची ..ते सर्व पाहून आम्ही हसत होतो ..सोनाली मधातूनच निघत म्हणाली , " आता का असच खेळत बसणार आहात का ..चल हो बाजूला ..वयाने मोठे झालात तरीही लहानच वाटता अजूनही .." आणि मानसीचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागली ..लग्नानंतर ती पहिलीच सकाळ त्यामुळे तिला पुन्हा एकदा पाहण्यात , पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडण्यात एक वेगळीच मज्जा होती ..कॉलेजला असताना तिला बऱ्याचदा पाहिलं होत ..कधी सलवारसूटवर तर कधी साडीवर पण आज काहीतरी वेगळंच होत जे मला पुन्हा तिच्याकडे आकर्षित करत होत ..तिने नेसलेली ती साडी , त्यातही पदर खोचलेला , केसांचा जुळा पाडून ती किचनमध्ये निघाली होती ...शिवाय हळदीचा तो रंग आताही उतरला नव्हता ..तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंग मला तिच्यासोबत राहण्यासाठी विनवणी करत होता तर तिच्या पैंजनाचा आवाज संगीतापेक्षाही सुमधुर भासत होता..

क्या कशीश है तुझंमे
जो तेरी और खिचा चला आता हु
मै याद करता नही वक्त - बे - वक्त तुझे
पर ऐसा है ईश्क की मै तेरा होणे लगता हु

आज माझ्या रूमला मानसी असल्यामुळे मी फ्रेश होण्यासाठी आईच्या रूममध्ये जाऊ लागलो ..एका रूममध्ये गेस्ट होते ... तर केनी कलीगसोबतच कॅनडाला निघाली होती ..मी फ्रेश होऊन हॉलला पोहोचलो ..तेव्हा मानसी सर्वाना चहा देत होती ..आई कुठेतरी बाहेर गेली होती ..ती आतमध्ये येताच म्हणाली , " सोनाली तुला सांगितलं होतं न मानसीला काहीच काम करू द्यायचं नाही ..आता तर आली आहे या घरात कुठे आताच कामाला लावत आहेस तिला .." आणि सोनाली तिच्यावर रागावत म्हणाली , " ए काकू ही तुझी सूनच खूप शहाणी आहे ..मी म्हटलं करते म्हणून तर मॅडमने मला हातच लावू दिला नाही आणि काकू ओरडणार म्हणाले तेव्हा तुझी सून म्हणाली की मी करते आईला हँडल .." आईने मोर्चा मानसिकडे वळविला आणि म्हणाली , " अशी म्हणाली का ग तू मानसी ..मी एवढ्या लवकर तुला पटणार्यातली अजिबात नाही..आणखी खूप पापड बेलावे लागतील तुला .." तिने अस म्हणताच सर्वच हसू लागले ..तिने मानसीच्या गालाना हात लावताच सोनाली म्हणाली , " हे बर आहे काकू तुझं ..सासू सुना एकत्र झाल्या आणि मला उगीच ओरडा खावा लागला .." सोनाली घरात असली की या दोघांची अशीच जुगलबंदी सुरू असायची आणि आम्ही हसून - हसून वेडे व्हायचो ..या सर्वात मात्र मला चहा प्यायला वाट पहावी लागत होती ..चहाचा ट्रे मानसीच्या हातात होता पण आईच्या बोलण्यामुळे तिने मला चहाच दिला नव्हता ..तिच्या ते लक्षात आलं आणि तिने चहा ऑफर केला ..मी तिला गुड मॉर्निंग विश केलं ..तीही मला विश करून लगेच पळाली ..काय सुरुवात होती दिवसाची ....
मला फक्त काहीच दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या ..त्यामुळे मी घरच्यांना रिसेप्शन ठेवण्यास नकार दिला होता ..त्यामुळे हे दोन दिवस तरी मी घरीच राहणार होतो ..रिसेप्शन नसल्यामुळे जवळपास सर्वच घरी परतले होते ..फक्त आजोबा , काका - काकुब, मामा - मामी आणि मूल एवढेच लोक काय तर घरी थांबले होते ..मला काही बिल पेड करायचे असल्याने अंघोळ करून बाहेर जावं लागणार होतं ..शिवाय आईने पाहुण्यांसाठी नॉनव्हेज आणायला सांगितलं म्हणून स्वतःच्या रुम मध्ये जाऊ लागलो ..दारावर पोहोचलोच होतो की सोनाली अडवत म्हणाली , " तुला न मानसिशिवाय राहनच शक्य नाही ..अरे कमीत कमी आम्हाला तरी जाऊ दे मग करा तुमचा रोमान्स ..तुम्हाला कुणी अडवलं आहे ..पण सध्या दोन दिवस तरी इथे आम्हीच राहणार आहोत ..कळलं " ..मी तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणालो , " सोनाली मॅडम काय आहे न माझे कपडे याच रूम मध्ये आहेत सो तेच घ्यायचे आहे आणि राहिला प्रश्न रोमान्सचा तर त्या विकासकडे बघ ..बिचारा नेहमीच म्हणत असतो की तुझी बहीण मला नेहमीच छडते ..तिला जरास आवर माझी इज्जत धोक्यात आहे .." मी अस बोलताच ती मला मारायला माझे मागे धावू लागली ..मी समोर तर ती मागे ..कितीतरी वेळ आम्ही असेच पळत होतो ..पळून - पळून दमायला झालं आणि मी मामीच्या मागे जाऊन लपलो .." मामी बघा ना हा मला खूप त्रास देतो .तुम्ही मारा हा याला ..खूप सतावतो हा मला .." मामीने मला खोटखोट मारताना दाखवलं आणि तिची बाजू घ्यायला लागली ..मी त्यावर म्हणालो , " ताईसाहेब तुम्ही माझी बाजू घ्यायची सोडून दुसऱ्याची घेणार तर मग मलाही असच वागावं लागेल .." तिने शेवटी माझी बाजू घेतली आणि आम्ही दोघेही रूमकडे पोहोचलो ..मानसी आपले कपडे अलमारीत सेट करण्याची वाट पाहत होती .
संपूर्ण अलमारीवर माझ्या कपड्यांचं अधिराज्य होत ..तिला ते बाजूला करायचे होते पण बिचारी एका शब्दाला बोलायला तयार नव्हती ..मी अलमारीसमोर गेलो..तिच्या मनातले भाव मला कळाले होते ..मी माझे संपूर्ण कपडे एका ब्लॉकला शिफ्ट केले आणि एक ड्रेस सोबत घेऊन निघालो .दारावर पोहोचलोच होतो आणि मागे पलटून म्हणालो , " मॅडम लग्न झालं आहे आपलं हक्काने सांगू शकता सर्व ..तुमच्या मनातली प्रत्येकच गोष्ट मला कशी कळणार ? " ..ती हलकेच हसली ..मला वाटलं काहीतरी बोलेल पण अस काहीच झालं नाही ..,मे बी तिला मनातल्या भावना सहज व्यक्त करण जमत नव्हतं..मी लगेच निघालो ..अंघोळ करून बाहेर गेलो ..लॉनची सर्व बिल पेड केली आणि नॉनव्हेज घेऊन घरी परतलो ..तेंव्हापर्यंत घरातल वातावरण शांत होत ..मामी - आई कपडे धुण्यात व्यस्त होत्या ...मला पाहताच सोनालीने आवाज दिला , " अभि कामात आहेस का प्लिज नॉनव्हेज बनवायला थोडी मदत करना .." मला आता काहीच काम नव्हते त्यामुळे हात - पाय धुवून कामाला लागलो ..मानसीची ताई टमाटर कांदे चिरण्यात व्यस्त होती ..तर आम्ही दोघे मसाले बनविण्यात व्यस्त होतो ..मानसीची अंघोळ करून झाली आणि ती लगेच किचनला येत म्हणाली , " मी काही मदत करू का तुमची ?? " ..मला उत्तर द्यायचं होत पण ताई समोरच असल्याने मी शांत बसलो..माझ्या मनातल ओळखत सोनाली म्हणाली , " आज तरी शक्य नाही ..तुला नॉनव्हेज आवडत नाही ना मग इथे काय काम करणार आहेस ..? " आणि मानसीच्या तोंडून पहिला शब्द बाहेर आला , " हो येत तर नाही पण शिकायला आवडेल ..तू शिकवशील मला ? " आणि सोनाली लगेच म्हणाली , " मी नाही पण अभि शिकवेल ..त्याला खूप सुंदर येतो स्वयंपाक आणि विशेष म्हणजे तुझ्या नवऱ्याला आणि घरच्या सर्वाना नॉनव्हेज खूप आवडतं सो लवकरच बनवायला शिक ..तस पण नवऱ्याच्या मनातला रस्ता पोटातूनच जातो ..ये आमच्या बाजूला " म्हणत ती बाजूला सरकली ..आम्ही स्वयंपाक बनवू लागलो ..मी भाजी बनवीत होतो आणि ती त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊ लागली ..तसे या दिवसात नातेवाईकच एवढे असतात की आपल्या बायकोशी साधं बोलताही येत नाही पण स्वयंपाकाच्या बहाण्याने का असू नये पण मला तिच्यासोबत राहण्याची संधी मिळाली होती ..तिला काही समजलं नाही तर मला स्वतः ती विचारत होती आणि मीही सर्व आनंदाने सांगत होतो ..सोनालीने कल्पना काढून आम्हाला दोघांना बोलत ठेवलं आणि ताईला पोळ्या बनविण्यासाठी बाजूला घेऊन गेली ..एकाच रूम मध्ये असलो तरीही त्या खालच्या गॅसवर पोळ्या बनवत होत्या तर वर आम्ही जेवण बनवीत होतो ..तीच संपूर्ण लक्ष स्वयंपाकाकडे होत तर माझं तिच्याकडे ..मधात वाटून जायचं की तिच्या हाताना पकडाव पण कुणी तरी येऊन जाईल या भीतीने तो क्षण जगातच आला नाही ..तिने नॉनव्हेज बनविताना फक्त एकदाच पाहिलं होतं तरी तिला ते बऱ्याच लवकर कळाल .काहीच वेळात आमचं सर्व काम आटोपलं ..आईचेही काम आटोपले आणि सर्वच फ्रेश होऊन जेवायला बसलो ..मी स्पेशली मानसीसाठी पनीरची भाजी बनवली होती ..तिला आवडायची ना म्हणून ..थोड्या गप्पा मारत - मारत जेवणदेखील झालं..
लग्नानंतर सुरुवातीचे ते क्षण मला मानसिसोबत जगायचे होते पण मानसी आपला अभ्यास सोडून येणार नव्हती तर उरलेले हे दोन दिवस नातेवाईक न गेल्याने तिच्यासोबत जगता येणार नव्हते ..नावाला तर ती माझी अर्धांगिनी होती पण तिच्याशी बोलतानाही मला इतरांची परवानगी घ्यावी लागत होती ..दिवसभर कुठल्यातरी कारणाने ती माझ्यासमोर यायची पण तेव्हाही एक शब्द बोलता येईना ..दुपारला शाश्वत विकास जेवायला येऊ न शकल्याने रात्रीच्या जेवणाला आम्ही त्यांना बोलावून घेतलं ..सकाळचच जेवण असल्याने रात्री स्वयंपाक बनविण्याची गरज भासली नाही आणि जेवण करून सर्व झोपायला गेले ..शाश्वत , विकास मी असे तिघेच वर बसलो होतो ..आम्हा तिघांना भरपूर बोर होत होत ..त्यामुळे शाश्वत मुलींना टेरिसवर गप्पा मारायला येणार का म्हणून विचारायला गेला आणि सांगून परत आला ..आम्ही त्यांची वाट पाहू लागलो आणि त्या टेरिसवर आल्या ..बाहेर गार वारा सुटला होता त्यामुळे गर्मी कमी वाटू लागली ..दोन- तीन गाद्या टाकून आम्ही गप्पा मारत बसलो ..सुरुवात मीच केली , " बर सोनाली एक गोष्ट माहिती झाली का तुला ? " ,

" कोणती रे ? ", सोनाली म्हणाली ..

" तुमच्या लक्षात आली की नाही माहिती पण केनिला आपला शाश्वत आवडला ..नेहा जेव्हा शाश्वत सोबत होती तेव्हा ती या दोघांकडेच पाहत होती ..मला तरी वाटत की केनी ह्याच्या प्रेमात पडली .", मी खेचत म्हणालो आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली , " अरे देवा !! म्हणजे मला पुन्हा सुट्ट्या काढाव्या लागणार .."

" सुट्ट्या का ? " , मी विचारू लागलो आणि ती हसत म्हणाली , " तुझं लग्न झालं म्हणून काय आता याने पण करू नये का ? " ..तस मुली खुप जास्त लाजतात पण इकडे उलट होत ..शाश्वत एक शब्दही बोलत नव्हता ..संधी शोधत विकास म्हणाला , " नाही हा सोनाली ..हा एकटा करत बसेल मॅनेज ..आपण फक्त लग्नाला जाऊ ..यांच्यासाठी वेळ कोण वाया घालवणार ? " ..मी विकासला लगेच टाळी दिली आणि शांत असलेला शाश्वत म्हणाला , " साल्यानो तुमच्या दोघांच्याही लग्नाला मी नसतो तर काहीच खर झालं नसत ..आणि तुम्ही मलाच म्हणताय होय .." त्याच्या बोलण्यावर आता सर्व हसू लागले आणि सोनाली म्हणाली , " मतलब आग दोनो तरफ लगी है मेरी जाणं ..सही ना शाश्वत .." ..मानसी जरी शांत असली तरीही ती हे सर्व खूप एन्जॉय करत होती..ती सतत हसत होती ..आम्ही कुणीच कुणाला ऐकणार नव्हतो त्यामुळे एकमेकांची खिचण्यात देखील वेगळीच मज्जा होती ... सोनाली सर्वाना शांत करत म्हणाली , " ए थोडं थांबा ..मानसी लग्नात सर्वांनी तुला काहीतरी दिलं आहे पण यार अभि तू मानसीला काहीच दिलं नाही .." आणि मी म्हणालो , " माझ्या नावासमोर तीच नाव लागलं म्हणजे आता सर्व काही तिचच आहे ..बर तरीही तिने मागाव हवं ते मी देईल .." आता सर्व मानसिकडे पाहू लागले .." मानसी ही संधी सोडू नको ..याच दिवशी तुला काही पण मिळू शकत ? " , सोनाली म्हणाली आणि आतापर्यंत शांत बसलेली मानसी म्हणाली , " मला काहीच नको जे हवंय ते मिळालं आहे .." सोनाली तिला भरपूर हट्ट करत होती पण मानसीच उत्तर काही बदललं नाही ..तिला ऑकवर्ड फील होऊ नये म्हणून मधातच शाश्वत बोलला .., " सोनाली अशी म्हणत आहे म्हणजे तिनेही काहीतरी मागितलं हे नक्कीच ..सोनाली तू काय मागितलं ..? " तीच उत्तर तर मिळालं नाही पण चेहऱ्यावर लाजेचे भाव मात्र स्पष्ट दिसत होते..ती काहीच बोलायला तयार नाही पाहून शाश्वत विकासला म्हणाला , " भावा तू तरी सांग काय मागितलं सोनालीने ? " , तोही शांतच होतो .." ओ आय सी ..समजलं " , शाश्वत म्हणाला आणि आम्ही जोराने हसू लागलो .." तुम्ही म्हणताय तस काही नाही ..ती समजूतदार आहे रे खूप फक्त गालावर पप्पी मागितली होती तिने .." , विकास म्हणाला आणि मग तर काहीच बोलू नका ..शाश्वत - सोनाली काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते आणि आमच्या ओठांवरच हसू काही जाईना ..आज फक्त एकमेकांची खिचाई सुरू होती ..मानसीच्या ताईला झोप येत होती म्हणून त्या तिघीही खाली गेल्या आणि आम्हीही वर शांत झोपी गेलो ..

दुसराही दिवस गेला तरी मानसिशी बोलणं काही होईना ..तिसरा दिवस उजळला .चार वाजताची माझी फ्लाइट होती तर सकाळी मानसीच्या घरचे तिला दोन दिवसासाठी घरी न्यायला आले होते ..त्यामुळे सकाळपासून त्यांच्या जेवणाची तयारी सुरू होती ..मी सकाळीच माझं सर्व सामान बॅगमध्ये भरुन घेतलं होतं ..12 च्या सुमारास सर्वच घरी आले ..मानसीच्या घरच्यांशी बोलणं वगैरे करता - करता बराच वेळ झाला ..दुपारचं जेवण आटोपलं आणि ते मानसीला घेऊन जाऊ लागले .रूममध्ये सोनाली एकटीच बसून होती आणि मी तिच्याशी बोलायला गेलो पण साल नशीब तेव्हाही फुटक निघालं आणि तिची ताई आली ..तिनेही आपली बॅग भरली व आपल्या बाबांसोबत निघाली..मला त्याक्षणी तरी किमान तिच्याशी बोलायच होत पण तेही शक्य झालं नाही ..त्यामुळे थोडा हिरमुसलो ..पण त्यावेळी तीही काहीच करू शकत नव्हती ..ती आपल्या बाबांसोबत गाडीने निघाली ..मीही स्वताला समजावत आपली बॅग भरून निघालो ..बाबांना घरी काही काम असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते तर आई मला सोडायला येणार होती ..मी घरच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा कॅनडासाठी निघालो ..आईने मला ड्रॉप केलं ..आणि माझी जाण्याची वाट पाहू लागली ..आताही माझी नजर मानसीलाच शोधत होती पण ती येणार नाही हेदेखील माहीत होतं ..मी आतमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात अभि म्हणून कुणीतरी आवाज देताना दिसलं ..ती ड्रायवर सोबत मला भेटायला आली ..दम टाकत - टाकत माझ्या जवळ पोहोचली ..थोड्या वेळ दम खात ती म्हणाली , " सॉरी अभि थोडा उशीर झाला ..मला जाणवत होतं की तुला माझ्याशी बोलायच होत पण ते शक्य झालं नाही ..परंतु तू असाच निघून गेला असता तर मला वाईट वाटलं असत म्हणून घरच्यांना कल्टी देऊन तुला भेटायला आले ..आई ताई गाडीतच आहेत ..आणि एक मला वेळ मिळाला तर मी येईल तुला भेटायला सरळ कॅनडा... लवकरच ..आरामशीर जा आणि पोहोचल्यावर फोन कर..मी फोनची वाट बघेन .." ती एका श्वासातच सर्व बोलून गेली ..मला त्याक्षणीच तिला मिठीत घ्यायचं होत पण गाडीतून सर्व पाहत असल्याने मी काहीच करू शकलो नाही ..ती आली तशीच बाय म्हणत पळून गेली ..मी तिच्याकडे बघून हसत होतो आणि माझ्या डोक्यात एकच शब्द आला .." वेडाबाई "....ती माझ्याकडे पाहत पुन्हा निघून गेली आणि मी कितीतरी वेळ पाहतच बसलो ..खरच अजब कोड होती ती ?? ..जे या जन्मात मला तरी सुटणार नव्हतं ..


क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED