स्पर्श - भाग 19 Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - भाग 19

" खूप सोपं आहे ग मानसी तुझ्या आठवणीत हरवणं पण खरंच खूप कठीण आहे तुझ्याविना राहणं ..मला हा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे ..स्वताची एक वेगळीच दुनिया बनवायची आहे पण राहील ग सर्वच अपूर्ण ..तू भारतातच शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतलास आणि मला इथे एकटच दूर राहावं लागतं आहे ..तू आयुष्यात नव्हतीस तेव्हा खूप जास्त मिस केलं पण आता तू माझी असतानाही हा दुरावा सहन होत नाही " , मी मानसीला फोनवर सर्व सांगत होतो ..तिनेही एकूण सुस्कारा सोडला आणि म्हणाली , " कळतय रे अभि मी चूक केली पण ते होऊन गेल..खूप खूप सॉरी ..तुझंच काय प्रत्येक व्यक्तीला वाटत असत की लग्नानंतर ते सुंदर क्षण एकमेकांसोबत जगावे पण मी ते हिरावून घेतले तुझ्याकडून त्यासाठी सॉरी ..मी खरच खूप दुष्ट आहे .." आणि तिला थांबवतच म्हणालो , " अग ए वेडाबाई !! काहीही बोलतेस का ...तू घेतलेला प्रत्येक निर्णय मला मान्य आहे आणि मला आनंद आहे की तुला सेल्फ इंडीपेंडंट व्हायचं आहे आणि मी खरच खूप खुश आहे तुझ्या या निर्णयावर ..देव न करो आणि उद्या मला काही झालंच तर तेव्हा ..." ती माझ्यावर ओरडत म्हणाली , " अभि काहीही बोलतोस का रे वेड्यासारखं !! जा मला न तुझ्याशी बोलायचंच नाही " ती माझ्यावर रुसली आणि शांतपणे ऐकत बसली , " बर बाबा सॉरी ना !! हो पण तू इथेही पूर्ण करू शकली असती शिक्षण ..तुला तिथे राहणं गरजेचंच आहे का ? " ..ती थोड्या वेळ शांत झाली आणि म्हणाली , " ठीक आहे अभि तुला हवं असेल तर मी येते तिथेच शिकायला ..तू कर सर्व तयारी ." मी तिच्यावर हसलो आणि म्हणालो , " मॅडम मी तुम्हाला वचन दिलं आहे की तुमचा आनंद तोच माझा आनंद ..सो हे काही दिवस मी सर्व काही संभाळून घेईल ..मीही न कधीकधी तुझ्या प्रेमात वेड्यासारखं वागतो .." ती माझ्या बोलण्यावर हसत होती ..रात्रीचे दोन वाजले होते तरीही आमचं बोलणं काही संपत नव्हतं ..मॅडमला सकाळी कॉलेजला जायचं असल्याने मी तिला झोपण्याची परवानगी दिली ..

मानसी आता हळूहळू खुलायला लागली ..आईसोबत राहून तिची चुप्पी तुटली होती तर आमच्या घरी तिच्यावर कुठलंच बंधन नव्हतं ..दररोज आठवणीने एखादा कॉल व्हायचा ..ती रात्री सर्व आवरायची आणि मग आम्ही तासंतास बोलत बसायचो ..ना कुणाच बंधन ना नात्यांची सीमा ..शरीराने जवळ नसलो तरी मन मात्र जुळत होती ..दररोज सकाळी पाच मिनिटांसाठी विडिओ कॉल करायचो ..ती आपली कामे करीत असतानाच माझ्याशी बोलत जायची..मी तिच्याकडे फक्त पाहत असायचो ..तिला पहाटे - पहाटे पाहिलं की खुश होऊन ऑफिसला जायचो आणि मन लावून काम करायचो आणि रात्री तिच्या फोनची पुन्हा वाट पाहू लागायचो ..ती कितीही थकली असली तरी थोडा वेळ माझ्यासाठी नक्कीच काढत असे त्यामुळे तिच्यापासून दूर राहण्याचा त्रास थोडा फार कमी होऊन जायचा ..लग्नाला दोन महिने झाले होते ..ऑफिसच काम पेंडिंग असल्याने मला सुट्टी मिळत नव्हती तर मानसी इकडे यायला तयार नव्हती..आज तिचा कॉल आला आणि तिला म्हणालो , " मानसी माझं तिकडे येन शक्य नाही प्लिज तू तरी एकदा ये ..फक्त काहीच दिवस ..मला तुझ्यासोबत काही क्षण घालवायचे आहेत ..तशीही तू म्हणाली होती की मी लवकरच येईल ..सो प्लिज येणा !! " ती थोडा विचार करत म्हणाली , " अभि फक्त सात दिवस वाट बघ मी माझे सबमिशन्स पूर्ण करते आणि लगेच निघते ..एवढा वेळ तर देऊ शकतोस ना मला ? " मी हसून सहमती दर्शवली ..फोन कट झाला ... तिच्याशी बोलता - बोलता सात दिवस असेच निघून गेले ..आता तिला भेटण्यासाठी फक्त काहीच क्षणाची वाट होती ..

आज मानसी कॅनडाला येणार होती ..सायंकाळी येणार असल्याने मी तिला काम संपवून पीक करायला जाणार होतो ..सकाळी ऑफिसला निघायची तयारी सुरूच होती की सोनालीचा फोन आला ..मी रिसिव्ह करत म्हणालो , " बोला मॅडम काय म्हणता? " , ती थोडी खेचत म्हणाली , " लग्न झाल्यापासून तू तर कॉल करतच नाहीस म्हटलं आम्हीच करून पाहावं " मी त्यावर म्हणालो , " अस व्हय तर !! पण अस म्हण की विकासपासून फुरसद मिळाली नाही तुला ..आणि बिल माझ्यावर फाडते आहेस " ..तीही थोडी हसू लागली आणि सिरीयस होत म्हणाली , " अभि आज मानसी येणार आहे न तिकडे ..मी जर काही बोलले तर तुला राग नाही येणार न ? " , तिचे ओठ थरथरू लागले होते आणि मी तिला सावरत म्हणालो , " मॅडम मी फक्त तुम्हाला नावासाठी ताई म्हणत नाही तर प्रत्यक्षात मानतो मी तुला ..सो तुला जे बोलायच ते बिनधास्त सांग .." मी अस म्हणताच ती थोडी कॉन्फिडन्ट जाणवू लागली , " मी तुला बहीण म्हणूनच सांगत आहे असं समज ..मुली लग्न झाल्यावर जेव्हा मुलांकडे जातात तेव्हा खूप घाबरल्या असतात ..त्यांना जुळवून घ्यायला खूप वेळ लागतो तेव्हा त्यांना गरज असते समजून घेणाऱ्या साथीदारांची ..माझ्याही आयुष्यात विकास होता याचा आनंद आहे ..त्याने कधीच मला शरीरासाठी त्रास दिला नाही ..मनाने जिंकत राहिला आणि मग मीच त्याची झाले ..मानसी आणि तू लग्नानंतर पहिल्यांदा भेटणार आहात तेव्हा ती फार गोंधळली असेल ..एक तर ती आपल्यासारखी जास्त बोलणारी नाही त्यामुळे ती तुला कुठल्याच गोष्टींला नाही म्हणणार नाही पण तिच्या मनावर खूप दडपण असेल ..ते मनावरचं दडपण आधी दूर कर आणि मग बघ ती तुझी व्हायला क्षण लागणार नाही ..तू तिला माझ्यापेक्षा जास्त ओळ्खतोस म्हणून जास्त काही सांगण्याची गरज नाही पण मी एक स्त्री आहे आणि त्या भावना खूप छान ओळखते म्हणून तुला सांगते आहे ..सॉरी जास्त बोलून गेले असेल तर .." एकाच श्वासात ती सर्व बोलून गेली आणि मी तिच्यावर हसत म्हणालो , " वेडी आहेस का सॉरी म्हणायला ..तू म्हणते आहेस ते मी पण अनुभवलं आहे ..ती नाही बोलणार तिला त्रास होत असला तरीही तेव्हा त्या गोष्टी सुरुवातीचे काही दिवस मी नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करेन ..शेवटी आयुष्यभर तिच्यासोबतच तर रहायच आहे मग करून घेऊ सर्व त्यात काय ..आणि हो बर का मॅडम तुम्ही काळजी नका करू मला काहीही प्रॉब्लेम आला तरी मी तुलाच त्रास देणार आहे आणि तुमच्या खास क्षणांच्या वेळीच म्हणजे तू विकासच्या मिठीत असताना .."..ती पुन्हा हसत म्हणाली , " नाही सुधारणार तू कधीच .." मला ऑफिसला वेळ होत होता म्हणून मी बाय म्हणून फोन ठेवून दिला आणि आता वाट होती मानसीची.

मानसी सायंकाळी येणार होती ..मी ऑफीसच्या कामात व्यस्त होतो.काम करताना वेळेचं भानही नव्हतं आणि काम एवढं होत की वेळेकडे लक्षच गेलं नाही ..मी घड्याळीकडे पाहिलं तेव्हा जवळपास सायंकाळचे साडे चार वाजले होते आणि मानसीचा फोन आला , " अभि कुठे आहेस तू ..मला वाटलं आला असशील ..मी इथे केव्हाही वाट पाहते आहे ..मला एकटाच सोडून बसला आहेस तिथे.." ती माझ्यावर येताच भडकली आणि मी तिला शांत करत म्हणालो , " मी निघतोय सॉरी ऑफिसमध्ये काम खूप जास्त होत ..मी लगेच निघतोय ".ऑफिस सुटायला वेळ होता म्हणून सरांकडे परवानगी मागायला जायलाही भीती वाटत होती तरीही नाईलाज होता ..सरांसमोर गेलो आणि त्यांना समस्या सांगितली ..मला वाटलं ते ओरडतील पण ते हसले आणि जायची परवानगी दिली ..अर्धा तास मानसी माझी वाट पाहत होती ..अर्ध्या तासाने तिथे पोहोचलो तेव्हा बाईसाहेब बाहेरच सामान घेऊन उभ्या होत्या ..मी कारमधून धावतच तीच सामान आणायला गेलो पण बाईसाहेब इतक्या रागावल्या होत्या की सामान देखील सोडायला तयार नव्हत्या ..मी कसतरी तिला मनवुन कारमध्ये बसविल आणि कार सुरू केली ..मी तिला सॉरी म्हणत होतो आणि ती तोंड फुगवून बसली ..गाडी घरी पोहोचेपर्यंत ती एक शब्दसुद्धा बोलली नव्हती .तिला या अनोळखी शहरात मी एकटच सोडलं असल्याने ती फार माझ्यावर रागावली होती ...ती गाडीतून उतरणारच तेवढयात म्हणालो , " पण काहीही म्हणा हा फुगलेला चेहरा मला फार आवडतो ..मला वाटत मी पुन्हा नव्याने प्रेमात पडणार आहे माझ्याच बायकोच्या " उपाय कामी आला आणि ती हसत म्हणाली , " काहीही असत हा अभि तुझं .." ..ती शेवटी आतमध्ये आली ..त्यामुळे थोडस टेंशन कमी झालं ..तिने आपले सर्व कपडे बॅगमधून काढून अलमारीत रचले ..मी एव्हाना फ्रेश होऊन बाहेर आलो होतो ..आणि मी आल्यावर ती लगेच फ्रेश व्हायला गेली ..ती फ्रेश होऊन येईपर्यन्त माझा चहा बनवून झाला होता ..ती कपडे चेंज करून बाहेर आली आणि तिच्या जवळ येत तिच्या हातात चहाचा कप दिला .." ती थोडी थकली असल्याने हा चहाच आमच्यात संवादच काम करीत होता .." मग नवरोबा खुश आहात माझ्या येण्याने की आणखी काही फर्माईश आहेत तुमच्या .." मानसी म्हणाली आणि तिला चिडवत म्हणालो , " फर्माईश खूप आहेत हो मिसेस अभि पण सध्या तरी तुम्ही आलात तेच खूप आहे .." सायंकाळच वातावरण त्यातही गारा वारा सुटलेला ..झाळांची पाने वाऱ्याशी हितगुज करत होती ..रस्त्यावर दोन छोटे पप्पी एकमेकांशी खेळत होते आणि मानसी त्या सर्वात हरवली , " किती मस्त आहे न हे सर्व !! मी उगाच यायला उशीर केला .." , मानसी म्हणाली आणि मी शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो ..चहा पिऊन बराच वेळ झाला होता तरीही आम्ही त्याच प्रसंगात अडकून होतो ..ती काहीच बोलायला तयार नव्हती तर मलाही फक्त तिलाच पाहायचं होत ..तिला पाहण्याच्या नादात तिला भूक लागली असेल हे लक्षातच आलं नाही .." हे सॉरी मी विसरलोच जेवणाच विचारायला ..मी खुश असलो की असच होत बघ ..चल मी घेतो स्वयंपाक बनवायला ..ती बालकणीतून किचनकडे जात म्हणाली , " नाही हा आज मी बनवणार ..", मलाही तिला माझ्या हातच भरवायच होत म्हणून मी म्हणालो , " अस कस तू थकून आली आहेस ना सो मीच बनवनार .." आम्ही दोघेही स्वयंपाक बनविण्यासाठी भांडत होतो आणि कुणीच कुणाच ऐकत नव्हतं तेव्हा मीच म्हणालो, " ना तेरी ना मेरी चल मिळवून बनवूया .." हे ऐकून ती देखील तयार झाली , " अभि चल चिकन बनवूया तुला आवडत न " ती म्हणाली आणि मी तिच्यावर रागावत म्हणालो , " आणि तू काय खाणार आहेस दगड ..त्यापेक्षा दोघानाही आवडेल अस काही बनवू या .." मी तिची एवढी काळजी करतोय हे पाहून ती हसली आणि माझ्याकडे पाहू लागली.." अस पाहू नकोस प्रेमात पडशील म्हटल्यावर तिने लगेच मान बाजूला केली .."
आज जेवणात व्हेज पुलाव आणि कढीचा बेत ठरवला होता ..मी तिला सर्व भाज्या चिरून देत होतो तर ती स्वयंपाक बनवत होती ..तिला काही लागलं की मी तिला आणून द्यायचो आणि ती पुलाव उत्तम व्हावा म्हणून जेवणाकडे लक्ष देऊन होती ..काहीच वेळात पुलावाचा खमंग वास सुटू लागला आणि मी ते खाण्यास आतुर झालो ..इकडे दह्याची कढी पण तयार झाली ..मानसी हात धुवून जेवण करायला आली ..मधात एक छोटासा टेबल आणि आम्ही एकमेकांच्या समोर..खर तर मला एकाच ताटात तिच्यासोबत जेवण करायचं होतं पण ती कम्फरटेबल असेल की नाही या शंकेने मी तिला विचारू शकलो नाही ..तिच्याकडे पाहून जेवण करीत असताना ठचका लागला आणि ती स्वतः माझ्या जवळ येऊन पाणी पाजू लागली .तीच हे रूप मी पहिल्यांदाच पाहत होतो आणि तिचाच होऊन जातं होतो ..मी तिच्याकडेच पाहत होतो आणि ती पटापट जेवण करून निघाली ..हात धुवून येत पुन्हा ती म्हणाली, " नवरोबा जरा लवकर करत चला ..नाही तर काही खर नाही तुमचं " ..ती जेवण करून बेडरूमला पोहोचली ..मीही पटापट जेवण आटोपून घेतल आणि बेडरूमला गेलो ..

बेडरूमला पोहोचलो तेव्हा ती बेडवर पडून होती ..मी तिच्याशी बोलायला जावं तेवढयात आईचा फोन आला ..मी नेटवर्क मिळत नव्हत म्हणून आईशी बोलायला गॅलरीत पोहोचलो आणि आईशी बोलू लागलो .आई संपूर्ण वेळ मानसीबद्दल विचारत होती ..शिवाय तिला कुठलाही त्रास न देण्याविषयी मला सांगत होती ..आईच लेक्चर जवळपास 15 मिनिटे चाललं होत ..मी फोन ठेवून रूमला पोहोचलो बघितलं तर मानसी शांत झोपी गेली होती..मीही तिच्या अस वागण्याकडे बघून हसत होतो शेवट लाईट ऑफ करून तिच्या बाजूला जाऊन पडलो ..बाहेरून हलकासा चंद्राचा उजेळ तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि तिचा चेहरा आणखीनच सुंदर भासू लागला ..झोपेत असताना ती फारच शांत होती ..तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते म्हणून मी ते बाजूला केले ..तिला इतक्या जवळून पाहण्याची एक वेगळीच मज्जा होती ..तिच्यावरून माझी नजर हटतच नव्हती आणि ती माझ्या बाजूने वळाली ..अचानक तिचा उजवा हात माझ्या छातीवर आला आणि ती झोपेत मला पकडून होती ..बहुदा तिला थंडी जाणवत होती म्हणून मी तिच्या अंगावर ब्लँकेट ओढली आणि मी तिच्याकडे पाहू लागलो ..वाटत होतं की तिने असच शांत राहावं आणि मला तिला एवढ्या जवळून पाहण्याची संधी मिळावी...

बहोत खुबुसुरत है आंखे तुम्हारी
बना दिजिये इसको किस्मत हमारी
और क्या चाहीये जिंदगी मे
जब मिल गयी हमे मोहब्बत हमारी
सोनालीने म्हटल्याप्रमाणे तीच मन खुलविण्याचा प्रयत्न करीत होतो ..पुन्हा एकदा प्लांनिंग करून तिला रवीवारलाच बोलावून घेतलं होतं ..लेक लुईस बँफ नॅशनल पार्क कॅनडामधल्या सर्वात सुंदर स्थळामधील एक होत ..मी माझ्या कलीगसोबत तिथे एकदा जाऊन आलो होतो त्यामुळे मानसीला तिथे नेऊन सरप्राइज देण्याचा विचार पक्का झाला ..ती सकाळी उठली ..मी तोपर्यंत जिमला जाऊन आलो ..मी फ्रेश होऊन परत येईपर्यंत तिने चहा बनवून ठेवला होता आणि बाहेर येताच तिने लगेच चहा हाती दिला .." अभि आज काही प्लांनिंग आहे का तुझं ? " , मानसी म्हणाली आणि मी तिच्याकडे पाहून विचारलं , " तुला कस माहिती ? " , आणि ती हसत म्हणाली , " आता तू एवढ्या दुरून बोलावलं आहेस म्हणजे काहीतरी केलंच असेल प्लांनिंग म्हणून म्हटलं " ..

" हो केलं तर आहे जा लवकर तयार होऊन बाहेर ये .." , मी म्हणालो आणि चहा घेऊन ती तयार व्हायला गेली ..मी तयारी झाली की नाही पाहायला गेलो ..तर ती साडी लावून तयार होती ..ती साडीवर फारच सुंदर दिसत होती ..मी तिला दारावरून पाहत होतो हे तिच्या लक्षात आलं आणि मी स्वताला सावरत म्हणालो , " हे मान्य आहे की साडीवर सुंदर दिसतेस आणि मलाही आवडत ते पण बाहेर फिरायला साडी कॅरी करणं जमेल का ? ..जा जीन्स वगैरे लावून घे .." ती माझ्याकडे चोरट्या नजरेने पाहत म्हणाली , " मी जीन्स कधीच लावला नाही ..माझ्याकडे आहे पण नाही " , मला ते आधीच माहिती होत आणि मी तिला म्हणालो , " मी आधीच तुझ्यासाठी शॉपिंग केली आहे सो जा बघून घे तिथून .." तिने कपाट उघडलं आणि कपडे पाहू लागली ..मी बाहेर हॉलमध्ये होतो..ती काही वेळात बाहेर तयार होऊन आली ..फुल व्हाइट टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स लावून ती बाहेर आली आणि मी तिच्याकडे पाहत बसलो ..तिने आधी कधीच जीन्स लावला नसल्याने थोडी ऑकवर्ड फील करत होती पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती खुश झाली ..मीही आज सेम ड्रेस लावला होता फक्त वर कथ्या रंगाच जॅकेट चढवल ..ते स्थळ फार दूर असल्याने आम्ही कारणे निघालो ..कारमधून एक - एक झाड मागे जात होतं आणि तो बहरणारा निसर्ग पाहून ती मनोमन खुश होऊ लागली ..पार्कला पोहोचण्यासाठी दोन तीन तासांचा रस्ता सर करावा लागणार होता ..त्यामुळे खान्या पिण्याच्या वस्तू आधीच घेतल्या होत्या ..शिवाय पार्कच्या समोर एक हॉटेल होत तिथेच दुपारचं जेवण करणार होतो ...सर्व काही सेट होत ..हळूच ऑडिओ प्लेअर ऑन केलं आणि 90 च्या गाण्यात दोघेही हरवून गेलो ..एक तर तो बहरलेला निसर्ग आणि त्यात थेट मनापर्यंत पोहीचणारी ती सदाबहार गाणी त्यामुळे वातावरण रोमँटिक झालं होतं .माझं संपूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर होत तर ती खिडकीतून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होती ..सुमारे दोन - तीन तासानंतर आम्ही पार्कला पोहोचलो ..गाडी थांबली आणि धावतच बाहेर निघाली ..समोर जाऊन थांबली आणि त्या नजाऱ्याने तीच लक्ष वेधून घेतलं ..उंच - उंच टेकड्या ढगांशी गुपचूप गप्पा घालत होत्या ..मधातच डच्च पाण्याने भरलेली झिल होती ...त्यातलं संथ पाणी मन मोहून घेऊ लागला आणि आजूबाजूला पसरलेल ते घनदाट जंगल ..त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे ...मधातच पर्यटकांना जाण्यासाठी रस्ता आणि दूरवर कुणीतरी कपल हातात हात घालून चालू लागले होते..मी खाली उतरेपर्यंत ती समोर - समोर चालू लागली ..तिचे पाय क्षणासाठीही थांबायला तयार नव्हते आणि ती या वाटेरून त्या वाटेवर फुलपाखराप्रमाणे दरवळत होती ...ती समोर - समोर चालत होती तर मी तिच्या मागे - मागे ...शेवटी ती एका जागेवर जाऊन थांबली ..थोडीशी मोकळी जागा आणि तिथून डोंगर स्पष्ट दिसत होतं आणि ती मधातच जाऊन जोर्याने ओरडू लागली ..तिचा आवाज संपूर्ण पार्कमध्ये फिरून आमच्यापर्यंत पुन्हा परत येत होता ..ती बेभान होऊन जगत होती आणि मी तिच्याकडे पाहू लागलो ..क्षणात तिच्याजवळ पोहोचत म्हणालो , " मानसी वुड यु लाईक टू डान्स विथ मी .." आणि ती हसत म्हणाली , " नाऊ ..आर यु सिरीयस ..? अँड व्हॉट अबाउट द मुजिक " ,

" हो आताच करशील डान्स ..आणि गाणं गाण्यासाठी मोबाइल आहे की की ..फक्त तुमच्या होकाराची अपेक्षा आहे .." , मी म्हणालो आणि ती लगेच हातात हात देत म्हणाली , " चला होऊन जाऊ द्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या " ..कॉलेज सुटल्यावर पहिल्यांदा तिच्याशी डान्स करत होतो ..तिचा हात हातात आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले ..पुन्हा हाच क्षण जगता येणार होता ..फक्त तेव्हा ती मैत्रीण होती आणि आता माझं सर्वस्व ..तिच्या पायांनी थिरकण्यास सुरुवात केली आणि मी गाणं सुरू केलं ..

ओ जाणे जाना
ओ जाणे जाना
ओ जाणे जाना
है सांस जब तक
तुम्हे मोहब्बत करेंगे जाना
ओ जाणे जाना

करिब आओ तुम्हारी तन्हाइया चुरालू
धडकते दिलं से तुम्हारी बेताबिया चुरालू
तुम्हारे आखो मे सात रंग के ख्वाब रख दु
तुम्हारे ओठो पे चाहतो के गुलाब रख दु ..

तिच्या ओठांजवळ ओठ नेताच ती सैराभैरा फिरू लागली ..मी तिला थांबवत होतो तरी ती दूर दूर पळत होती ..ती दूरवर पळत होती आणि मी तसाच तिला पाहू लागलो ..


ओ जाणे जाना
ओ जाणे जाना
ओ जाणे जाना
है सांस जब तक
तुम्हे मोहब्बत करेंगे जाना
ओ जाणे जाना

बना लो अपना के दूर तुमसे ना रेह सकेंगे
अब इक पल भी गम-ए- जुदाई ना सह सकेंगे ..
निगाहे प्यासी है मुद्दतो की खुमार दे दो
गले लगा के हमे वो पहला सा प्यार दे दो


ओ जाणे जाना
ओ जाणे जाना
ओ जाणे जाना
है सांस जब तक
तुम्हे मोहब्बत करेंगे जाना
ओ जाणे जाना

ओ जाणे जाना..

ती धावत - धावत झिलच्या किनाऱ्यावर पोहोचली..तिथे पर्यटकांना बसण्यासाठी खास व्यवस्था केली होती ..ती माझ्या समोर निघाल्याने मला कुठेच दिसत नव्हती ..झिलकडे नजर गेली आणि ती किनाऱ्यावर बसून दिसली ..मी दम टाकत तिच्या बाजूला जाऊन बसलो ..तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली , " अभि खूप खूप धन्यवाद ..खूप वर्षांनी अस मनमोकळं वागले ..जीवन असही जगता येत हे पहिल्यांदाच समजलं नाही तर एक वेळ अशी होती की घराच्या बाहेर निघालायही दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागायची ..मला आज शब्दातदेखील व्यक्त होता येईना ..धन्यवाद हा दिवस खास बनविण्यासाठी .." पुन्हा एकदा तिच्याकडे पाहत म्हणालो , " बस एवढंच ..मला तर पुन्हा एक सरप्राइज द्यायचं आहे तुला ..पण ते घरी .."

" अभि कुठलं सरप्राइज सांग ना ? " , ती म्हणाली आणि मी हसत म्हणालो , " घरी सांगतो की आताच काय घाईत आहे .."

तो संपूर्ण वेळ मी तिच्यासोबतच होतो ..पहिल्यांदाच ती बोलत होती आणि मी शांत होतो ..थोड्या वेळाने आम्ही पार्कमध्ये फेरफटका करायला निघालो .त्या सुंदर वातावरणात आम्ही केव्हा रुळलो काहीच कळाल नाही..सोनाली म्हणते तस खरच आम्ही लहान मुलासारखे वागायचो ..भांडायचो , मस्त्या करायचो आणि दुखावलो की एकमेकाना जवळ घ्यायचो ..दुपार टळून गेली होती आणि पोटात कावळे काव काव करू लागले ..त्यामुळे निघन भाग होत ..हॉटेलमध्ये पोहोचलो तर तिथे बरीच गर्दी होती ..कशी तरी बसायला जागा मिळाली आणि आम्ही लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो ..जेवण झाल्यावर लगेच घराकडेही निघालो ..सर्व कस स्वप्नासारखं होत ..मी तिच्या मनात घर करू शकत होतो याचा आनंद होता ..

घरी पोहोचलो आणि गाडी पार्क केली ..आतमध्ये जात नाही तोच मानसी म्हणाली , " अभि सरप्राइज कुठे आहे ? " मी तिच्याकडे बघून हसलो आणि हॉलमध्ये ठेवलेली पेंटिंग घेऊन आलो ..ती पेपरने कव्हर केली होती ..पेपर फोडून ती पेंटिंग दिवालीला लावली आणि ती पाहून सरप्राइज झाली , " तुला आठवतंय मानसी ही केव्हाची पेंटिंग आहे " , मी म्हणालो आणि ती मान हलवत म्हणाली , " हो कॉलेजचा पहिला दिवस ..म्हणजे तू मला पाहिलं तेव्हाच पेंटिंग काढली होती न ..काय कला आहे यार तुझ्यात ..माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट गिफ्ट आहे हे..आज माझ्या आयुष्यातील सर्वात भारी दिवस आहे .." म्हणत तिने मला मिठी मारली आणि मीही तिच्या मिठीत सामावून गेलो ..


क्रमशः ..