kadambari premaavin vyarth he jeevan Part 19 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 19 -वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग -१९ वा

------------------------------------------------------------------

बाराला दहा मिनिटे कमी असतांना अनुषा अविनाश जळगावकर सरांच्या केबीन मध्ये

आलेली होती .

गुड मोर्निंग करून झाल्यावर .. ते सर म्हणाले ..

अनुषा – तुझे अभिनंदन बरे का !

अनुशाला काहीच कळाले नाही..ती म्हणाली -

का हो .कशाबद्दल करताय माझे अभिनंदन ?

विशेष असे काही घडलेले नाहीये ..मग ?

जळगावकर सर सांगू लागले ..

अनुषा – तू पहिली व्यक्ती आहेस ..जिच्या बरोबर आमचे देशमुख सर इतके नॉर्मल आणि

फ्रेंडली बोलतांना मी पाहतो आहे ..,

माझ्यासाठी हे आश्चर्याचे आहे.

..तू त्यांच्यावर प्रोजेक्ट करते आहेस , या गोष्टीचा ..त्यांच्या इतका मला ही आनंदच

झालेला आहे.... कारण

सागर देशमुख यांचा पी ए ..म्हणून मी इथे गेली अनेक वर्षे काम करतो आहे ..

पण..देशमुखसरांचे प्रोफेशनल व्यक्तिमत्वच मला पहावयास मिळत असते .. आणि ते जाणून घेणे ,

ते पाहणे ..माझ्यासाठी मुळीच कठीण नाहीये ..

कारण त्यांचे प्रोफेशनल जीवन , आणि आयुष्य ..याबद्दल बाहेर काय काय सांगायचे आहे ?

हे माझ्या मार्फतच होत असते ,

ते देखील सरांच्यासोबत चर्चा करून ..आणि त्यांनी केलेल्या सुचनेनुसारच हे होत असते.

पण, तुझ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने ..पहिल्यांदा ..त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल ते व्यक्त होणार आहेत.

का कुणास ठाऊक ,तू जेव्हा याबद्दल त्यांना विचारशील ,तेव्हा सरांचा प्रतिसाद मिळेल ?

बहुदा नाहीच मिळणार ,

त्यांच्या हे सांगण्यास तयारी असेल ? याबद्दल मला खात्री नाहीये .

त्यामुळे त्यांना या विषयावर बोलते करणे ..हे तुझी मोठीच परीक्षा असणार आहे..

कारण ..या विषयावर ते आमच्याशी कधीच काही शेअरिंग करीत नाहीत ..

मग, तुझ्याशी शेअरिंग करण्याची तयारी असणे मला तरी कठीण वाटते .

हे ऐकून अनुषा म्हणाली ..

तुम्ही अजिबात काळजी करू नका ..

मी अगदी काळजीपूर्वक ,आणि सरांचा मूड , रागरंग पाहूनच त्यांना एकेक गोष्ट विचारेन.

जळगावकरांनी घड्याळात पाहिले ..

अनुषा ..तू रेडी आहेस ना ?

सरांचा मेसेज येईलच आता,

आणि तसेच झाले .. देशमुखसरांनी अनुशाला आत बोलावले होते .

जळगावकर सर म्हणाले ..

जा अनुषा – बेस्ट लक ..!

अनुषा आता आली ..

पण,

केबिनमधल्या मेन खुर्चीवर देशमुख बसलेले तिला दिसले नाही ...

तिने काचेपलीकडे पाहिले -

आज..मिटिंग हॉल मध्ये ..,देशमुखसर बसलेले दिसत होते.

सरांनी अनुशाला हॉलमध्येच यावे .

असे हातांनीच खुणावले , तशी ती हॉलमध्ये गेली.

आत एक मोठा टेबल आणि फक्त दोनच खुर्च्या होत्या ,

पैकी एका खुर्चीवर खुद्द सागर देशमुख बसलेले होते ..

समोरच्या टेबलवर अनेक फाईल्स , बरेच अल्बम मांडून ठेवलेले दिसत होते

ये अनुषा –गुड मोर्निंग ..

अगोदर एक गंमत –गोष्ट शेअर करू दे तुझ्याशी ,

मग,आपले काम सुरु करू या ..

ऑफिसला येतांना तुझ्या घरा समोरूनच आलोय .तसा तर हा माझा रोजचाच रस्ता आहे

पण आज मी मुदाम थांबलो आणि तुझ्या घरी जाऊन येऊ या असे ठरवले .

मी ओळखतो तुझ्या आई-बाबांना , खूप जवळचे असे मित्र नसलो तरी ..

आम्ही कमी परिचित मित्र नक्की आहोत कारण एकच ..आमच्या दोघनचे कार्यक्षेत्र निराळे .

त्यांना वेळच वेळ असतो , आणि मला वेळच नसतो ...

पण मी वेळ काढला आज.. आणि तुमच्या घरासमोर गाडी थांबली ..

मला आत येतांना पाहून तुझे बाबा लगेच बाहेर आले ..

सागर देशमुख ..आणि स्वतहा होऊन त्यांच्या घरी ?

त्यांना हे खरे वाटलेले नाहीये ..हे मला त्यांच्याकडे पाहून जाणवत होते.

त्यांना हा एक चमत्कार वाटणे सहाजिक आहे ..

कारण

मी चमत्कारिक माणूस आहे “ हे त्यांना माहिती आहे .

शिवाय माझ्याबाबतीत तरी ..”चमत्कारिक “ या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे.

तो म्हणजे ..

“सागर देशमुख – हा एक चक्रम माणूस आहे “,..माझ्याबद्दल असे मत-प्रवाह सभोवताली आहेत ..

..हे मला माहिती आहे.

एनी वे .. तुझ्या बाबंनी माझे वेलकम अगदी मनापासून केले आहे, हे मला जाणवल्यामुळे

मी सुखावलो , त्याचा आनंद ही वाटला .

बोलतांना मी त्यांना ..त्यांच्या लेकीबद्दल सांगितले ..तुझे कौतुक केले ..

पण अनुषा ..त्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये ..,

याचे फार आश्चर्य वाटले मला .

ते म्हणाले ..

अनुषा ..नक्कीच विसरली असेल आम्हाला सांगण्याचे ..आणि काय आहे ..

तिचे असे प्रोजेक्ट वर्क कायम चालूच असतात , कधी सांगते , कधी राहून जाते ,

आणि तिला तरी काय माहिती असणार ..

की सागर देशमुख यांचासारखा मोठा माणूस “..आपल्या बाबंना मित्र म्हणून थोडाफार

का होईना ओळखतो .

बघ ..अनुषा .. तुझ्या बाबांनी सफाईदारपणे तुझी बाजू घेतली ..पण, मला अगदी हसत हसत

टोमणा मारलाच की नाही ..!

तुला सांगतो अनुषा ..माझ्या बाबतीत हे असे गैरसमज फार आहेत .

ते का आहेत ?

हे प्रश्न मी मला पडूच दिले नाहीत कधी .कारण माझ्यासाठी महत्वाचे काम ..

मी आणि माझ्या स्वप्नांची पूर्ती करीत पुढे जाणे ..आणि मी तेच करीत गेलोय .

आणि हे करीत असतांना ..मी मला हवे असलेले खूप काही मिळवत गेलोय ,

याचा मला अभिमान आहे,

आणि..माझ्या या अभिमानाला सगळेजण ..अहंकारी , गर्विष्ठ , तुसडा ..असे नाव

देतात . आय डोन्ट केअर ..!

काही म्हण अनुषा ..

तुझ्या घरी पहिल्यांदा गेलो ..छान आणि मनापासून स्वागत झाले माझे ..

खूप दिवसांनी असे घरगुती वातावरण अनुभवले आज मी .

रुचकर फराळ आणि फक्कड चहा “ घेऊन दिल भर गया मेरा ..!

अनुषा ..घरी गेल्यावर तुझ्या आई-बाबांना माझे थान्क्स आठवणीने सांग ..

तू विसरलीस सांगण्याचे ..तर ..बाबा म्हणतील ..

सागर देशमुख आहेत ते..

thanks वगरे अपेक्षित नाहीत त्यांच्याकडून ..!

तुझ्या मनात गैरसमज असतील ते अजून पक्के होतील ना अशाने ..!

अनुषा म्हणाली -

असे काही नाही होणार ..सर, तुम्ही निश्चिंत असावे.

तुमच्याविषयी ..माझे गैरसमज वगरे नाहीत ,आणि ते कधी होणार ही नाहीत ..

अनुषा thanks.

तिने हसून ओके ओके म्हटले खरे ..

पण, देशमुखसर आपल्या घरी असे अचानक जातील .!

.याची तिने कल्पनाच केली नव्हती .

माय god...! थोडक्यात वाचले रे बाबा ..

अभिजित आणि आपल्या मैत्रीबद्दल ..आपण काहीच सांगितलेले नाहीये आई-बाबांना ,

आणि अभिजित आणि आई-बाबा अजून तरी एकदा ही समोर समोर आलेले नाहीत “,

हे बरेच झाले आहे म्हणयचे .

नाही तर ..आपल्या उत्साही स्वभावाच्या बाबांनी अगदी निर्मल मनाने ..सांगून टाकले असते ..

अहो..तुमचा अभिजित आणि आमची अनुषा छान मित्र आहेत ..!

हे जर कळाले असते तर ?

बाप रे ..आपण इथे नसतो आता ..

लगेच बाहेर घालवून दिले असते देशमुखसरांनी.

आपल्याला बिलकुल माहिती नव्हते .की .अभिजित हा सागर देशमुख यांचा मुलगा आहे ,

पण, बाबा आणि देशमुख मित्र आहेत म्हटल्यावर ..त्यांना चांगलेच माहिती आहे की.

अभिजित हा सागर देशमुख यांचा मुलगा आहे..!

आज घरी गेल्यावर आपल्या आई-बाबंना सगळ सांगितले पाहिजे .., म्हणजे यापुढे काही

घोळ होणार नाही.

या कल्पनेने अनुषा जरा सावरली.

ती म्हणाली -

सर, मला खूप छान वाटले हे ऐकून ..की तुम्हाला माझ्या घरी जावे वाटले ..

तसे तर कालच आपण पहिल्यांदा भेटलो , आणि कालच्या एक दिवसाच्या मैत्रीमुळे तुम्हाला

माझ्या बद्दल जो आपलेपणा वाटतो आहे ..त्याचा खूप आनंद होतोय मला .

अनुषा ,आजचे प्रास्तविक ..खूपच लांबेल असे आनंदच व्यक्त करीत राहिलो तर ..

आता या टेबलावर ..काही फाईल्स आणि अल्बम्स आहेत ..जे तुझ्या प्रोजेक्टसाठी खूप

कामाचे आहेत . हे सगळे तू तुझ्या घरी घेऊन जाऊ शकतेस ..

त्या अगोदर ..तू हे आता बोलत बोलत नजरे खालून घालीत राहा ,

आणि यातले तुला काय हवे ते ते बाजूला काढून ठेव ..

म्हणजे ..उद्या सकाळी ..माझा माणूस हे सगळे घेऊन तुझ्या घरी येईल ..

ते तू त्याच्या कडून घेशील ..!

चालेल ना असे ?

अनुषा म्हणाली -

काय सर, असे विचारून लाजवू नका हो मला ..!

खरे तर हे सगळे माझेच काम आहे, पण, तुम्ही स्वतः मला काय हवे आहे ?

याचा विचार करून सगळे रेफरन्स रेडी ठेवत आहात , खूप सोप करताय माझे वर्क .!

अनुषा ..

या फायली , आतले कागदपत्र हे सगळे स्कॅन कॉपीज आहेत ..ओरीजनल आणि आणखी कोपिज

आहेत ऑफिस रेकॉर्ड्समध्ये . त्यामुळे कागद खराब झाले तर ?

गहाळ झाले तर ? ,अल्बम मधले फोटो खराब झाले तर ?

अशी भीती आणि विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस , अगदी निश्चिंत मनाने चालू दे तुझे

प्रोजेक्ट वर्क.

फायली आणि अल्माब मधले फोटो ..याची लिंक ..आणि संदर्भ तू लावलेस तर..तुझ्या भाषेत तू

खूप काही मांडू शकतेस ..मी त्या शब्दात बदला –बदली कर असे कधीच नाही म्हणणार .

अनुषा ..तुझ्या या प्रोजेक्ट-वर्क च्या निमित्ताने ..

मला माझेच पुन्हा एकदा विश्लेषण करायचे आहे..

एक व्यक्ती ..एक माणूस म्हणून तू माझे वास्तविक रूप लोकांच्या समोर आणावेस “ अशी माझी इच्छा आहे.

अनुषा देशमुख सरांच्याकडे पाहतच राहिली ..

ते तर तिच्या मनातलेच बोलून दाखवत आहेत असे तिला वाटत होते.

या विचाराने तिच्या मनावरचे ओझे , असलेला तणाव .हळू हळू कमी होतो आहे हे जाणवत होते.

ती म्हणाली ..

सर , तुमचा हा प्रवास , तुमची स्वतहाला एक यशस्वी उद्योजक बनवण्याचे स्वप्न पूर्ण

व्हावे यासाठी ..तुम्ही ..केलेले प्रयत्न ..त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे ..

तुमच्या अधिकारातल्या कंपन्या , अनेक उप-कंपन्या , जगभरात तुमच्या कार्याचा असलेला

दबदबा ..तुमच्या उल्लेखनीय कारकीर्द ..

या सगळ्या गोष्टी ..या फायली मध्ये आणि या फोटोज मध्ये आहेत.. त्या एकत्र केल्यवर तर

नक्कीच हा दस्तावेज खूप काही सांगणारा असेलच.

पण, याही पलीकडे जाऊन .मला ..

सागर देशमुख या उद्योजक –माणसाचे ..मोजकेच आणि महत्वाचे पर्सनल –आयुष्य देखील

शब्दरूपात करायचे आहे..

या प्रोजेक्ट मधला दुसरा भाग .देखील तितकाच महत्वाचा आहे सर.

तिला थांबवीत सर म्हणाले - सॉरी अनुषा .

तूर्तास तरी आपण यावर अजिबातच काही बोलायला नको ,

बघू पुढे ..आत्ताच माझा “होकार “ गृहीत धरू नको ..

पण, मी विचार करीन यावर नक्कीच.

अनुशाने निवडून ठेवलेल्या फायली आणि अल्बम ..स्वतःकडे घेत म्हणाले ..

उद्या तुझ्याकडे हे सगळे घेऊन माझा माणूस येईल.

अनुषा – आजची चर्चा इथेच थांबवू या .

उद्या पुन्हा ठीक बारा वाजता ..भेटू आणि बोलू या ..

आणि बाहेर पडण्यासाठी देशमुख सर खुर्चीत उठून उभे राहिलेले आहेत ..

हे पाहून अनुशाला उठावेच लागले .

त्यांना बाय करून ..अनुषा ऑफिसच्या बाहेर आली..

जाताना तिच्या मनात विचार सुरु होता ..

पर्सनल लाईफ बद्दल ..बोलायचे आहे ..हे विचारण्यात आपण घाई तर नाही ना केली ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या ..पुढच्या भागात

भाग -२० वा लवकरच येतो आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED