Two points - 24 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग २४

भाग २४

आकाश विशाखाला घेऊन निघाला आणि गाडी बरोबर एका मोठ्या हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. त्याने एक नजर विशाखा कडे टाकली तर ती अजुनही गुंगीत होती.

तीच्या जवळ जाऊन तीच्या गालाला हात लावत आकाश म्हणाला,
" सॉरी. तुला इथं आणायला गुंगीचे औषध चहात टाकावं लागलं मला. तुला असं बघवत नाही ना म्हणून हे करतोय bcz I care for u. "

तो बोलणार होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
त्याच माणसाचा मेसेज होता,
" लग्न झालं की आयुष्य भर बोलत बस आता तीला आत घेऊन ये. "

त्या माणसाचा मेसेज वाचुन आकाश लाजला. विशाखाला बघुन हसला आणि तीला परत दोन्ही हातांवर घेऊन आता गेला.

अपॉईंटमेंट आधीच घेतलेली होती त्यामुळे तीला घेऊन डायरेक्ट डॉक्टरांकडे केबीनमध्ये गेला. तीला हळुच तीथल्या कॉटवर झोपवुन जाऊन डॉक्टरांच्या समोर बसला.

" तु तर म्हणाला होतास की एवढ्या लवकर नाही घ्यायचे सेशन मग असं अचानक ?? " डॉक्टर विशाखाकडे बघत आकाशला म्हणाले.

" हो डॉक्टर, म्हणालो होतो. पण आज सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर कसं गप्प राहणार मी 😞. खरंच हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाहीये. माझ्या तर डोक्यावरून जातंय हे. "

" होणारच हे सगळं. थोड्याफार फरकाने सगळीकडे हेच चालु आहे. "

" पण इतकं ???? 🥺 " आकाशचा आवाज जड झाला होता हे विचारताना.

" I can understand. पण हे होतच रे फक्त इतकाच फरक की कांहिच दिसुन येत काहींच दिसुन येत नाही. "

" म्हणजे ?? "

" बघ. आताच्या जनरेशन मध्ये हे प्रमाण खुप वाढलंय. तुम्हाला contact list मध्ये हजार मित्र असतील पण जेव्हा खुप लो फिल होत किंवा असं आतुन तुटल्यासारख होत त्यावेळी सोबत कोणच नसतं. मग अशा वेळी सुरु होतो खरा प्रवास... " डॉक्टर सांगत होते तेवढ्यात विशाखाचा आवाज आल्यासारखा झाला म्हणून पटकन दोघेही तीच्याकडे गेले.

विशाखा ऊठुन बसली. आधी तर तीला कळलंच नाही ती कुठे आहे, नंतर आकाश कडे बघितलं आणि मग डॉक्टर कडे. पण डॉक्टरांना बघितल्यावर तीच्या कपाळावर आठ्या पडल्या. तीने आकाशकडे बघत त्याला विचारल,
" आपण हॉस्पीटलला का आलोय ?? आणि सायली कुठे आहे ?? मी इकडे कसं काय आले ?? शीट ...... हे काय चाललंय ?? "

ती बडबड करत होती की तेवढ्यात केबीनचा दरवाजा उघडला तसं ती बोलायची थांबली आणि बघितलं तर काका आला होता.
ती पटकन कॉटवरून उतरून काकाकडे गेली,
" मला इकडे का आणलय ?? आणि तु पण इकडे कसं काय आला ?? तुला काही झालंय का ?? सायली कुठेय ?? सायलीला काही झालंय का ?? " शेवटचा प्रश्न विचारताना विशाखा चे डोळे पाण्याने भरले.

" कुणाला काही नाही झालंय . आपण इथे तुझ्यासाठी आलोय. " काका तीला खुर्चीवर बसवत म्हणाला.

" मला ??? मला काय झालंय ?? मी तर एकदम ढासु आहे. "

" विशाखा चेकअप करून घे पटकन. "

" पण काही झालंच नाहीये तर उगाच का ?? आणि सायली कुठय ?? कोणी सांगतच नाहीये मला काही. सांग ना. आणि हे कोण आहेत ?? "

" हे मोठे psychiatric आहेत. " आकाश मध्येच म्हणाला.

" Psychiatric ?? आपण इकडे का आलोय मग ?? "

" बघ.‌ शांत ऐकुन घे. ते तुला hypnotise करतील आणि काही प्रश्न विचारतील तर तुला बस त्याची उत्तर द्यायचीत. झालं. " आकाश एकदम लहान मुलासारख तीला समजावत होता.

" मी वेडी वाटते का तुला 🥺🥺 "

" Do u trust me ?? " आकाशने तीच्या डोळ्यात बघत तीला विचारलं.

विशाखा त्याच्या डोळ्यात तशीच बघत राहिली. उत्तर द्यायचच विसरली. त्याने परत तीच्या गालाला हात लावत तीला विचारलं,
" Do u trust me ?? "

" A lot " विशाखा तशीच त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली‌

" मग ऐकणार माझं ?? "

" ह्मह्मममम " लहान बाळासारख तीने मान डोलावली.

तसं डॉक्टर तीला आतल्या रुममध्ये घेऊन गेले. रुम काचेची असल्यामुळे आकाश आणि काकाला सगळं दिसत होतं. डॉक्टरांनी हळु हळु तीला पुर्ण hypnotise केलं आणि बाहेर त्या दोघांकडे बघत थम्ब केलं.

आतला आवाज येत नव्हता पण विशाखा चे हावभाव खुप आनंदी होते. ती खुप खुश होऊन काहितरी सांगत होती.

" मला हतबल झाल्यासारख वाटतंय खुप . " काका खाली बघत म्हणाला.

" It's okk. त्यात तुझा तरी काय दोष आहे. "

" आहे. ती ना मला रात्री रस्त्यावर सापडली होती. एका छोट्याश्या कपड्यात गुंडाळलेली. खुप रडत होती कदाचित भुक लागली असेल. तीला घरी आणेपर्यंत तर रडुन रडुन थकून झोपुन गेली माझ्या हातावर. "

" तुझी बायको ?? वैगेरे कोणी.... " आकाशने चाचरत काकाला विचारलं.

" डिव्होर्स झालाय माझा. त्यामुळे एकटाच होतो पण जसं विशाखा आली ना माझं life एकदम happening झालं. आधी कामावरून कधीही घरी यायचो पण आता तीच्यासाठी लवकर यायला लागलो. म्हणजे मला ना एक मोटीव्ह मिळाला की हा आता सगळं हीच्यासाठी करायचय. पण जसं जसं ती मोठी होत गेली ना तसं तसं कळायला लागलं मला. "

" काय ?? "

" म्हणजे असं नाही की आमचं bond strong नाहीये पण ती ना खुप reserved category मधली आहे. "

" हो, ते तर मला पहिल्या भेटीतच लक्षात आलं. "

" अजिबात म्हणजे अजिबात express होतं नाही. मी तीला आजपर्यंत कधी रडताना बघितली नाहीये. स्वतःवर किंवा स्वतःच्या emotions वर तीचा भरपुर control आहे. मनातलं कधी सांगत नाही. खुप एकटं रहायला आवडत तीला. त्यामुळे शाळेत तीला एकही मैत्रीण झाली नाही. शाळेत नाही की शाळेनंतर नाही. "

" म्हणजे तीला कोणी फ्रेंडच नाहीये ?? " आकाशने आश्चर्याने विचारल.

" नाही. एकही नाही. "

" मग ही सायली ?? "

" अरे नाहीये. तीची सायली नावाची कोणतीच मैत्रीण नाहीये. "

" मग ही सारखी सायली सायली का करते ?? "

" ते आता डॉक्टर बाहेर आल्यावरच कळेल. ती घरी पण सारखी सायली सायली सायली करायची. मग एके दिवशी तु तीला घरी सोडायला आला होतास बघ. त्या वेळी तुझा पाठलाग करुन मी तुला तीच्या मागावर लावल. "

" खरं सांगु. मी भरपुर वेळेस तीच्या आजुबाजुला राहिलोय पण खरचं सायली नावाच कोणच नाही दिसलं मला. "

" असेल तर दिसेल ना. "

" म्हणजे 😲 ?? "

" सायली नावाची तीची कोणतीच मैत्रीण नाहीये. खरंच नाहीये. "

" Euuuuu डोक्याची मंडई झाली राव 😖. नुसता भुगा. काय चाललंय काहीच कळत नाहीये. " तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले म्हणून ह्यांच्या गप्पा थांबल्या.

डॉक्टर बाहेर आले तसं दोघेही उभे राहिले.
" बसा बसा. " त्या दोघांना बसायला सांगत ते स्वतः खाली बसले.

" विशाखा ?? " आकाशने आत तीला बघत विचारलं.

" अजुन hypnotised आहे येईल थोड्या वेळात शुद्धीवर. बरं अं....... मला सांगा हे आश्रम आहे का तुमच ?? " डॉक्टरांनी काकाला विचारल.

" काय 😲?? आश्रम ???? कसलं आश्रम ?? "

" अनाथाश्रम ?? "

" नाही अजिबात नाही. "

" आश्रम नाही म्हणजे मुली पण नाही. "

" कसल्या मुली ?? कोणाच्या मुली. ?? कळत नाहीये काहीच. "

" सांगतो. मी तीला hypnotise करून विचारत होतो की सायली कोण आहे नेमकी , त्यावेळी तीने हे सांगितलं की घरी अजुन ५ मुली आहेत. मग ते सगळे मिळुन दंगा करतात. सायली घरी येऊन गेलीये nd all असं भरपुर काही सांगितलं. "

" नाही. घरात आम्ही दोघेच असतो. मी आणि विशाखा. आता तर विशाखा ने पण तीच स्वतःच घर घेतलय पण तरी ती माझ्यासोबतच राहते. आणि हे असं मुली वैगेरे काहीच नाहीये. " काका पोटतिडकीने सांगत होता.

" ह्मममम. सरळ सांगतो, ती मागच्या काही दिवसात fictional जगात जगत होती‌ "

" म्हणजे " आकाशला तर काहीच कळत नव्हतं. आधीच हे सायलीच प्रकरण काय कमी होत की मध्येच आश्रम आणि कुठल्यातरी मुली आलेल्या.

" म्हणजे काल्पनिक. सायली नावाच कोणी अस्तित्वातच नाहीये पण जे आपल्यासाठी. आणि तीच्यासाठी मात्र तीच जग आहे. "

" 😲😲 " आकाश आणि काका डोळे फाडुन डॉक्टरांना बघत होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED