Two points - 25 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग २५ ( शेवट )

भाग २५


" म्हणजे " काका आणि आकाश पुर्ण थक्क झाले होते. आपण काय ऐकतोय आणि ऐकतोय ते खरं आहे का हेच त्या दोघांना कळत नव्हतं.

" म्हणजे सोप्या भाषेत सांगतो. विशाखा एक डॉक्टर आहे. बरोबर ?? "

" हो " आकाश आणि काका एकदमच म्हणाले आणि एकदम अवघडले.

" हां, तर ती तीच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ पेशंटस् आणि हॉस्पीटल मध्ये घालवते. "

" हो " काका म्हणाले यावेळी मात्र आकाश गप्प बसला.

" ती रिकाम्या वेळेत काय करते ?? " डॉक्टरांनी प्रश्न विचारल्यावर आकाश आणि काका दोघ एकमेकांकडे बघायला लागले. कारण त्याच उत्तर दोघांकडेही नव्हतं.

" ती रिकाम्या वेळेत हे असं स्वतःच जग बनवते. आपण असं आता reality मध्ये राहतोय तसं ती पुर्ण काल्पनिक जगात राहते. तीने तीच्या स्वतःसाठी एक जग बनवलय ज्यात तीला ज्या गोष्टी प्रत्यक्षात करता येत नाहीत त्या ती तीथेच काल्पनिक जगात करते. " डॉक्टरांच्या बोलण्यावर दोघांनी एकमेकांकडे बघितलं .

" कळालं नाही का ?? " डॉक्टरांनी त्यांचे हावभाव बघुन त्या दोघांना विचारलं.

" हो.... म्हणजे नाही " आकाश चाचरत म्हणाला.

" बरं. सोप्या भाषेत समजावुन सांगतो. विशाखाचा स्वभाव कसा आहे. शांत, रागीट आहे पण खुप mature असल्यासारखी वागते ती. असं मला जाणवलं आत्ता बोलताना. तर सायली कशी आहे, बालिश, बडबडी आणि विशाखाचा राग सहन करणारी. आता विशाखाच्या life मध्ये असं कोणी आहे का की जे तीचा सगळा राग सहन करेल ?? तीला pamper करेल ?? तीची भरपुर काळजी घेईल ?? "

" नाही. " आकाश म्हणाला.

" म्हणून मग तीने तीच स्वतःच असं जग बनवलं की ज्यात ती ख-या जगातल्या विशाखाला विसरून एक नवीन विशाखा होईल. म्हणजे अं...... सांगतो. विशाखा जे तीच्या ख-या आयुष्यात, ख-या जगात करू शकत नाही ते ती काल्पनिक जगात करते. आणि खरं सांगु का हा आजार नाहीये. म्हणजे कोणता मानसिक आजार नाहीये . आणि हे प्रत्येक जण आपल्या आयुष्यात करतच असतो. त्याला Maladaptive daydreaming म्हणतात. म्हणजे आता जर मला आर्मीत जायचे पण मी काही कारणांमुळे जाऊ शकलो नाही तर मी जेव्हा जेव्हा एकटा बसेन तेव्हा हाच विचार करेन सतत, की मी आर्मीत असतो ना तर आत्ता बॉर्डरवर असतो, तिथे माझे हे मित्र झाले असते. मग आम्ही भरपुर मस्ती केली असती. तर हे झालं सगळं ते काल्पनिक जग. ज्याला आपण दिवास्वप्न असं म्हणतो. "

" मग हे विशाखाच ??? " काकांनी विचारलं.

" तर विशाखा ने सतत तेच तेच तेच विचार केल्यामुळे तीला असं वाटायला लागलं की हे सगळं तीच्यासोबत नेहमीच आहे. म्हणजे सायली तुम्हाला दिसण, तुमच आणि सायलीच बोलणं, सायली सतत दावाखान्यात तीला भेटायला येण, सायली सोबत नाईट आऊट करणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त विशाखाच्या बाजूने होत्या. त्या ख-या जगात नव्हत्याच मुळी. आणि हे कळाल असेल तुम्हाला, तुम्ही कधी नोटीस नाही केलं का तीला ??? "

" काय जाणवायचं होत म्हणजे ह्याचे पण काही symptoms असतात का ?? " आकाशने विचारलं.

" Symptoms असं नाही म्हणता येणार पण जाणवत ते. तीच एकटच हसण, एकटं असल्यावर स्वतःशीच बडबड करत राहणं. कितीही एकटं बसलं, हातात फोन वैगेरे न घेता तरी अशा लोकांना बोर अजिबात होत नाही. कारण ते त्यांच्या जगात असतात. जर हे पुर्ण त्यात involve असतील तर मग वेळेचं सुद्धा भान राहत नाही. कितीही वेळ ते एकटं राहु शकतात. पण जर समोर कोणी आलं की पटकन गप्प राहतात. मग त्यांच स्वप्न तिथेच थांबत. ते लोकांसमोर असं स्वप्न नाही बघत जास्त करून तर एकट्यातच. आणि हे खरंच वाईट नाहीये कारण काही काही जण असेही बघितलेत मी की ख-या आयुष्यातले problems असं काल्पनिक जगात कुणाशी तरी discuss करून त्या problme चं solution काढायचा प्रयत्न करतात. पण आपण वेड ज्या लोकांना म्हणतो ना ते असे असतात. त्यांना खरं आणि खोटं यातला कळत नाही. "

" पण मग ती तर आत्ता जागी होती ना तरीही ती सायली सायली बडबड करत होती ?? " आकाशने विचारलं.

" मग तेच ना. विशाखाच स्वप्न बघायचं प्रमाण इतकं वाढलंय की ती आता ख-या आयुष्यात पण ह्या गोष्टी compare करायला लागली आहे आणि हे चुकीचं आहे. जर हे असंच चालु राहील ना तर एक वेळ अशी येईल की तीला खरं काय आणि खोटे काय यातला फरकच कळणार नाही. त्यामुळे हे सगळं लवकरात लवकर थांबवायला हवं आपल्याला. "

" कसं थांबवायचं हे ?? म्हणजे काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल त्यासाठी ?? " आकाशने विचारलं.

" हो आणि त्यासाठी तीला हॉस्पीटल मध्ये ठेवावं लागेल का ?? कारण मला नाही वाटत ती राहील इथे " काकाने विचारल.

" नाही इथे ठेवायची गरज नाहीये. हां ट्रीटमेंट तर करूच आपण सुरू पण एक काम करावं लागेल तुम्हा दोघांना. तीला mentally stable ठेवावं लागेल. "

" कसं ठेवायचं ते ?? " आकाश

" बघ. तीने स्वप्न कसल बघितल जे तीला वास्तविक जगात नाही मिळालं त्याच. मग तुम्ही ते तीला द्या. तीच स्वप्न बघायच आपोआपच कमी होईल. म्हणजे तीची जास्तीत जास्त केअर करा जशी सायली घेते. तीला जास्तीत जास्त pamper करा. तीला ना मन मोकळं करायला लावा. "

" ती बोलतच नाही ना. नाही करत ती मन मोकळं. " काकाने चिडुन सांगितलं.

" असं नसतं. माणसाला प्रत्येकाला मन मोकळं करायला आवडत फक्त एका ऐकणा-याची गरज लागते. पण तो ऐकणारा कसा असावा की आपल्याला समजुन घेईल मग माणुस पटकन मन मोकळं करत. नाहीतर नाही करत. तीचही तसंच झालं असेल. आणि तीला आधीपासून एकटं रहायची सवय होती ना, थोडी चिडचिड करेल ती आधी आधी. तीला कदाचित तीच freedom गेल्यासारख वाटेल ही कारण तुम्ही आता सतत तीच्यावर लक्ष ठेवणार त्यामुळे तीला तीच्या comfort zone मधुन बाहेर यायला वेळ तर लागणार. पण होईल लवकर नीट. आकाश आहे ना तो करेल . करशील ना 😉😁. " डॉक्टरांनी हसत हसत त्याला विचारलं.

" हो " लाजत गालातल्या गालात हसत आकाश म्हणाला.

तेवढ्यात विशाखा उठली.
मग हे सगळं डॉक्टरांनी तीला समजावुन सांगितली पण आधी तर तीला ह्यावर विश्वासच बसला नाही. पण हळु हळु त्यांनी नीट समजावून सांगितल्यावर तीचा विश्वास बसला.

आणि त्या दिवसापासून खरा प्रवास सुरू झाला.
हे सगळं आकाशने घरी येऊन त्याच्या आई - पप्पांना सांगीतलं . आधी जरा आईने नाराजी व्यक्त केली पण समजावुन सांगितल्यावर तीही तयार झाली आणि आकाश विशाखाच्या घरी रहायला आला. तीला रोज morning walk ला घेऊन जायचा स्वतःसोबत, तीच्याशी घरी असला की गप्पा मारत बसायचा. आधी आधी विशाखा जरा चिडली पण मग हळू हळू तीने पण आकाश सोबत फ्रेंडशिप केली. हळुहळु आकाश विशाखाला मैत्री करून स्वतःकडे वळवत होता. विशाखाला पण त्याची भरपुर सवय झाली होती.
आणि तब्बल सह महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर विशाखा पुर्ण बरी झाली.
जसं विशाखा बरी झाली तसं आकाशाची आई त्यांच्या लग्नासाठी त्याच्या मागे लागली. तो काहीतरी कारण काढून नेहमी टाळाटाळ करायचा. कारण विशाखा कडुन अजुनही कन्फर्मेशन मिळालं नव्हतं.

विशाखा काहीतरी काम होत म्हणून बाहेर हॉलमध्ये आली तर तीथे आकाश बसला होता. आज विशाखा ने लक्ष देऊन त्याच्याकडे बघितलं, करड्या रंगाचा टी-शर्ट आणि साधी नाईट पॅन्ट घातली होती ह्याने तरीही कसला भारी दिसतोय हा, विशाखा त्याच्याकडे बघत विचार करत होती.

आकाशने तीच्याकडे बघितलं,
" काही हवंय का ?? "

" अं..... नाही . काही नाही. " म्हणत विशाखा टेरेसवर निघून गेली. तीथे जाऊन शांतपणे आकाशाकडे बघत बसली होती की मागून आकाश आला.

" तु नेहमी असा माझ्या मागे का येतोस रे ?? " विशाखा त्याच्याकडे न बघता म्हणाली.

" मागे म्हणजे ?? " आकाश तीच्या शेजारी येऊन थांबला.

" म्हणजे नेहमी असा मागुनच येतोस. "

" हां. क्युँकी तुम्हारे पीछे चलना चाहते है हम 😉 " आकाश हसत म्हणाला.

" किती flirt करतोस ना 😂 "

" हो मग पटली तर पटु शकते ना. आपण चान्स का सोडायचा 😉 " आकाश तीच्याकडे बघत डोळा मारत म्हणाला.

" वाह वाह. All the best मग पटवण्यासाठी. "

" thank you हां " आकाश तीच्याकडे बघत म्हणाला.

" काय झालं असं बघायला ?? " विशाखा ने विचारल.

" अंहं. काही नाही.‌ " आकाश समोर बघत म्हणाला.

दोघं हि शांत झाले. थोड्या‌ वेळाने विशाखा त्याला म्हणाली,
" तुला मी वेडी वाटते असेल ना रे. हे सगळं असं एकटं बडबडण nd all. " विशाखाने मान खाली घालत त्याला‌ विचारलं.

" नाही अजिबात नाही. कसं असत एकटं बडबड तर सगळेच करतो आपण फक्त तु जास्ती involve झालीस that's it. आणि डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे ना, नॉर्मल आहे हे सगळं. ट्रीटमेंट फक्त नावाला आहे रे. तु नको काळजी करू मी आहे ना. "

" तरी पण... "

" अरे नाही रे. " आकाशने तीच्याकडे बघितलं तर ती मान खाली घालून रडत होती. आकाशने तीला स्वतःकडे वळवलं, तीच्या हनुवटीला धरून मान वर केली तर ती अजुनच मुसमुसुन रडायला लागली. तसं आकाशने तीला मिठी मारली. आणि मिठी मारल्यावर विशाखा जोरात रडायला लागली. कितीतरी वेळ ती रडत होती आणि आकाश शांतपणे तीच्या डोक्यावरून हात फिरवत होता. थोड्यावेळाने शांत झाली तशी तीने मान वर करून आकाशकडे बघितलं तर तो तीला बघत होता. त्याने भुवई वर करून तीला काय असं विचारलं तर ती पटकन बाजुला झाली.

" आयुष्यभर असंच सांभाळशील ?? " विशाखा ने आकाशाकडे बघत त्याला विचारल. त्याला आधी कळलंच नाही तीने काय विचारलं पण नंतर एकदम खुश होऊन म्हणाला ,
" काय ?? काय विचारलं तु 🤩.... "

" मी विचारलं आत्ता ह्या सहा महिन्यांत जसं सांभाळलं तसंच आयुष्यभर सांभाळशील का ?? असंच pamper करत राहशील का ?? तरच होकार देईन मी 😉 "

" ओहो. पण हे कोणी सांगितलं की मी बोलणार आहे 😉😝 "

" कारण तु बोलण्याआधी तुझे डोळे बोलुन जातात." विशाखा त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने हळुच तीच्या हाताला धरलं आणि तीला जवळ ओढल आणि तीला मिठी मारली. विशाखा नेही आपले हात त्याच्याभोवती घट्ट केले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED