Sparsh - 22 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 22

मानसीच्या वागण्याने मी फारच दुखावलो होतो ..मनात तिच्याबद्दल शंका घर करून होती पण तिने त्याबद्दल सांगायला तोंड काही उघडलं नव्हतं ..कधी कॅनडा तर कधी भारत असा माझा प्रवास सुरूच होता त्यात कुठलाच बदल झाला नव्हता ..तिच्याशी बोलणंही तसच सुरू होत पण माझ्या बोलण्यातून ती शंका नेहमीच तिला जाणवत असे.. तरीही ती विषय बदलवून बोलणं सुरू ठेवू लागली ..तिने म्हटल्याप्रमाणे आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा ..कधीही भेटलो की तासंतास बोलत बसायचो ..लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं ..मानसीच्या घरून नातवंडासाठी तिला विचारल्या जात होतं तर आमच्यात या एका वर्षात फक्त 4 - 5 वेळा शारीरिक संबंध झाले होते ..मुळात आम्ही ते क्षण फक्त खास वेळीच जगत होतो ..बाकी वेळेला आम्हाला त्याची गरज वाटत नव्हती ..सर्व कस मस्त चाललं होतं ..तिच्याविषयी तडफड आजही वाटत होती पण ती काहीच बोलत नाही म्हणून चीडही होती . एकदा का तिच्याशी बोलायला लागलो की मग मात्र मला ती सर्व काही विसरायला लावायची ..तशी फारच गोड होती माझी मानसी ..आमचा संसार नव्याने खुलू लागला होता आणि आमच्याकडे बघून सर्वच खुश होते ..सर्वांसाठी तर आम्ही आयडीअल कपल झालो होतो ..

आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं होतं ..मानसीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने ती यावेळी कॅनडामध्ये 1 महिना राहणार होती त्यामुळे मी फारच खुश होतो तर तीही खूप आनंदाने माझ्याकडे आली होती ..तिच्या स्पर्शाची भरपूर ओढ असल्याने यावेळी मी मात्र तीच काहीच ऐकणार होतो ..ती आली आणि यावेळी मी स्वताच तिला शरीर संबंधाबद्दल विचारलं आणि तिनेहीे ते लगेच स्वीकारलंह.. याबाबतीत मीही त्या टिपिकल पुरुषांप्रमाणेच वागलो होतो .
..ती कॅनडाला येऊन एक हफ्ता पूर्ण होत आला होता तरीही तिच्या चेहऱ्यावरचे निराशेचे सावट हटत नव्हते हे बघून मी तिला विचारलं , " मानसी तुला इथे राहणं आवडत नाही आहे का ? नसेल तर तू परत जाउ शकते " आणि ती मला म्हणाली , " नाही तर ..अभि शहर नवीन आहे न माझ्यासाठी म्हणून असेल शिवाय तू दिवसभर बाहेर असतोस ..पण काळजी नको करू माझी पुस्तके आहेत माझी साथ निभवायला ..मी जुळवून घेईल लवकरच या स्थितीशी .." हे सर्व सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता म्हणून मला ते उत्तर लगेच पटलं .नाही तर तिच्या अशा वागण्यावर मी सहसा विश्वास ठेवत नसे ..

अशाच एका दिवशी मी ऑफिसला गेलो ..आज मानसी एकटीच घरी होती ..पुस्तक वाचून - वाचून तिला कंटाळा आला होता ..आणि ती विचारात पडली ..मानसी आरशामसमोर बसली आणि स्वतःशीच बोलू लागली ., " मानसी अभि तुझी खूप काळजी करतो पण काहीतरी आहे जे त्याला खूप त्रास देत ..बहुतेक तो माझ्या विचित्र वागण्याने खुश नसेल ...जीवापाड प्रेम करतो ना म्हणून बोलत नसेल ..आणि अचानक तिला जाणवलं की आरशामधील मानसी तिच्याशी बोलू लागली ." मानसी त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे हे खरं आहे पण तुझ्या डोक्यातही काहीच सुरू नाही , हे कसं शक्य आहे ??..तुला तो स्पर्शाचा येणारा राग ..तू का वागतेस अस त्याच्याशी ज्याने तो दुखावला जातो "..आणि मानसी उत्तर देऊ लागली , " नाही ग मला कळतात त्याच्या भावना पण मी तरी काय करू ..मला त्याचा स्पर्श नाही आवडत हे सांगू का त्याला ..? गेले वर्षभर मी स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करत आहे की मला सर्व काही निभावून न्यायचं आहे पण नाही निभावता येत आहे ग !!...एक सून म्हणून मी सर्व जबाबदाऱ्या पार पाडायला तयार आहे पण त्याचा स्पर्श मला नाही आवडत हेही तितकंच खरं आहे ..तुला आठवत जेव्हा आमच्यात पहिल्यांदा शारीरिक संबंध झाले होते तेव्हा तो किती खुश होता ..पण माझ्यासाठी तो क्षण खास नव्हताच ..मी दिवभर त्याच्यापासून दूर पळत होते ..तो माझ्यावर इतकं प्रेम करतो की त्याला माझ्या मनातलं अगदी सहज समजत म्हणून त्याच्या जवळ जायला भीती वाटाय होती.त्याने माझ्यासाठी एवढं दुःख सहन केल आहे की मला आता त्याला कुठलंच दुःख द्यायचं नाही ..म्हणून शांत आहे ..त्याला वाटत की माझ्या भूतकाळात काहीतरी घडलं आहे पण त्याला कस सांगू हे सर्व वर्तमानातच घडत आहे ..बिचारा तुटून जाईल ग आयुष्यभरासाठी आणि प्रेमावरचा विश्वासही उडेल त्याचा ..तूच सांग कस सांगू हे सर्व त्याला .."

आरशातली मानसी खऱ्या मानसिकडे पाहून म्हणाली , " हो ते ठीक आहे पण केव्हापर्यंत हे सर्व निभावशील ..तुलाही काहीतरी मर्यादा आहेत ..जो स्पर्श तुला आनंदच देत नाही त्याला केव्हापर्यंत सहन करशील .." आणि मानसी म्हणाली , " सहन करेल ग आयुष्यभरासाठी ..त्याने केलंय की माझ्यासाठी दुःख सहन मग मी का माघार घेऊ आणि तुला एक सांगू मला अभिचा स्पर्श आवडला नाही पण मी जेव्हा केनीला मिठी मारली तेव्हा तो स्पर्श हवाहवासा वाटला ..का असेल ग अस ..? मला न काहीच समजत नाहीये अस का होतंय तर " आणि आरशातली तिची प्रतिमा चिंतातुर होऊन तिच्याकडे पाहत म्हणाली , " मानसी तु काय म्हणते आहेस तुला तरी कळत आहे का ? तुझं मुलीकडे शारीरिक आकर्षण म्हणजे तू लेस्बियन आहेस .. ( लेस्बियन म्हणजे ज्या मुलीच शारीरिक आकर्षण पुरुषाकडे नसून स्त्रीकडेच असत ) ..हे ऐकून मानसीला शॉकच बसला .." नाही अस नाही होऊ शकत तू खोट बोलते आहेस मी तशी नाहीये .." , मानसी आपल्या प्रतिमेकडे पाहत म्हणाली आणि प्रतिमा पुन्हा उत्तर देत म्हणाली , " मी का खोट बोलू ? ..मी ही तुझंच रूप आहे ..तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आहे ..म्हणूनच तुला अभि एवढं प्रेम करत असतानाही त्याचा स्पर्श नकोसा होतो..माझं ऐकशील तर सांग त्याला हे सर्व ..तुला कळत नाहीये का तुझा बलात्कार होतोय मानसी ..एकदा सांग त्याला ..चल उठ लवकर "

मानसीला स्वताला आवरण आता शक्यच होत नव्हतं ..तिला हे सत्य मान्यच नव्हतं की ती लेस्बियन आहे ..तीच डोकं चक्राऊ लागलं आणि बाजूला पडलेला फोन तिने आरशावर फेकून मारला ..आरशाचे तुकडे - तुकडे झाले आणि तिची प्रतिमा गायब झाली..आज ती झोपण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला झोप काही येईना ..डोकंही फारच दुखू लागलं होतं ..मानसीने पुन्हा एकदा शॉवर घेतला आणि पेनकिलर घेऊन बेडवर पडली ..तीच डोकं आता शांत होऊ लागलं होतं ..आणि ती आपल्या जीवनाच्या सर्व घटना आठवण करू लागली आणि प्रत्येक घटना तिला याच निष्कर्षावर पोहोचवत होती ..तरीही तिने घाई न करता समजदारीने निर्णय घेण्याचा विचार पक्का केला. आजचा हा क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात भयावह क्षण होता ..तिला स्वतःलाच पडलेल्या प्रश्नाची उत्तरे तिला सापडली होती ..मी सायंकाळी घरी आलो तेव्हा तिला काच फुटयाबद्दल विचारलं तर तिने राग आला म्हणून फोडल्याच मला सांगितलं ..मोबाइलही पूर्णता फुटला होता ..शिवाय तिच्या पायाला काच रुतली होती आणि त्यातून रक्तही वाहू लागल होत ...माझं जस तिच्या पायाकडे लक्ष गेलं मी पाय साफ करण्यासाठी हात समोर केला .माझा जसा तिला स्पर्श झाला तिने पाय मागे घेतला ..मी तरीही जबरदस्ती करून तिच्या पायाची जखम पुसून काढली ..हळूहळू दिवस जात होते ..दिवसेंदिवस आम्ही दोघेही डिप्रेशनमध्ये जाऊ लागलो होतो पण कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हत ..फक्त काय तर दिवसभराच्या गोष्टी एकमेकांशी आम्ही शेअर करू लागलो होतो ..

त्या क्षणानंतर पंधरा दिवस होऊन गेले होते तरीही ती माझ्याशी काहीच बोलली नाही ..आज मी ऑफिसवरून फार थकून आलो होतो ..जेवण करून झोपायला जाणार की ती माझ्यासमोर आली ..माझ्या अगदीच जवळ येत म्हणाली , " अभि आज मला तुझा स्पर्श हवा आहे ..प्लिज मला स्वतात सामावून घेशील .." आमच्यात जितक्याही वेळा शारीरिक संबंध झाले होते त्यासाठी पहल मीच केली होती पण आज तीच हे अस रूप पाहून मी अगदीच शॉक झालो ..माझ्यासाठी तर तिचा स्पर्श हा जादूच होता ..ती आताही माझ्याकडे पाहत होती आणि तिला लगेच बाहुमध्ये उचलून बेडवर नेल ..शरीरावर फक्त एक चादर होती आणि आम्ही तो क्षण जगत होतो ..पहिल्यांदाच अस झालं होतं की ती माझ्याकडे डोळे उघळे करून पाहत होती ..मी तिच्या शरीरावर अधिपत्य गाजवत होतो आणि ती माझ्या डोळ्यात डोळे बघून पाहू लागली ..सुमारे 10 मिनिटे हा खेळ सुरू होता आणि मी बाजूला झालो ..तिचा स्पर्श मिळाला म्हणून पुन्हा एकदा आनंदी झालो तर मानसी आपल्या अंगावर गाऊन चढवून खिडकीकडे पाहू लागली ..मी तिला बेडवरूनच विचारलं , " का ग झोपायचं नाही का आज ? " , आणि ती खिडकीकडे तोंड करत मला म्हणाली , " अभि मी तुला काही सांगू शकते ?..खूप महत्त्वाचं आहे सांगणं ..मला माहित आहे तुला झोप येते आहे पण प्लिज ऐकशील ..कदाचित आज नाही सांगितलं तर नंतर कधीच सांगू शकणार नाही..प्लिज!! एकूण घेशील माझं " मी खर तर याच क्षणांची कित्येक दिवस वाट पाहत होतो त्यामुळे तिला म्हणालो , " तुझ्यासाठी काहीही ..बोल हवं ते मी एकूण घेईल .." आणि मानसी म्हणाली , " ठीक आहे पण मला आधी प्रॉमिस कर की माझं बोलणं झाल्याशिवाय तू एक शब्द काढणार नाहीस आणि ही रूम सोडणार नाहीस ..देतोस शब्द ? "

मी तिला शब्द दिला आणि ती बोलू लागली , " कन्या किती सुंदर नाव ना ..अस म्हणतात ती वडिलांची फार लाडकी असते पण माझ्यासोबत अस काहीच नव्हतं ..जन्म झाला तेव्हापासून प्रथा परंपरा यांच्या नावावर सतत कुठून तरी बंधने येत होती ..त्यामुळे कधी बाहेर फिरावं , मित्र बनवावं अशी इच्छा मनात आलिही नाही ..शालेय जीवन मस्त गेलं ..वडिलांनी मुलाशी संबंध येऊ नये म्हणून मुलींच्या शाळेत टाकलं त्यामुळे फक्त आयुष्यात मैत्रिणीच उरल्या . सर्वाना राजकुमाराची स्वप्न पडायची पण माझ्या स्वप्नातसुद्धा राजकुमार कधीच आला नाही ..राहुल घराजवळ असायचा ..त्याने मागे लागून - लागून शेवटी मैत्री केलीच शिवाय घरचे त्याला ओळखत असल्याने काहीच समस्या झाली नाही ..हळूहळू मी कॉलेजला जाऊ लागले ..ते होत जाणत वय ..मुली मुलांकडे सहज आकर्षिल्या जायच्या ..त्यांच्यासाठी नटून - थटून येन त्यांना फार आवडायचं तर मी तयार होऊन जायचे ते माझ्या मैत्रिणींनि मला विचित्र समजू नये म्हणून ..त्या दिवसभर मुलाबद्दल गॉसिप करत बसायच्या आणि मी मात्र पळवाट शोधायचे ..तसा मुलाशी कधीच संबंध आला नाही त्यामुळे मुलांचं मला आकर्षण का होत नाही हा प्रश्न मला कधीच पडत नव्हता ..बाबांनीही तुला मी निवडलेल्या मुलाशीच लग्न करायचं अस सांगितलं असल्याने मी संपूर्ण वेळ स्वताला अभ्यासात गुंतवून घेऊ लागले ..याच काळात एक किस्सा घडला..तृप्ती माझी खूप जिवलग मैत्रीण ..तिला एका मुलाने चुकीच्या उद्देशाने स्पर्श केला आणि ती रडत - रडत माझ्याकडे आली ..मी तिच्याशी बोलू लागले आणि तिने एक हकीकत सांगितलं ..जी एकूण मी थक्क झाले .तिने मला सांगितलं की मी 10 वर्षाची होते तेव्हाचा हा प्रसंग ..घरचे सर्व बाहेर गेले होते ..मी झोपून असतानाच माझे सख्खे मामा माझ्या रूममध्ये आले ..मी झोपलेली असताना त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि स्वतःच्याच भाचीच्या इज्जतीच्या त्यांनी चिंध्या उधळवल्या ..ती कितीतरी दिवस शांत होती ..पण हिम्मत करून शेवटी तिने आईला सांगितलं आणि आई काय म्हणाली माहिती आहे ..ती म्हणाली बेटा कुणाला हे सांगू नको नाही तर लोक तुला जगू देणार नाहीत आणि आपल्या परिवाराची इज्जत पण जाईल ..तिने मुलीकडून शपथ घेतली आणि ती कितीतरी वर्ष शांत राहिली ..ती ज्यादिवशी मला ते सर्व सांगत होती..ज्या मुलाबद्दल सांगत होती ..ती त्या मुलावर प्रेम करत होती पण त्याचा स्पर्श झाला आणि तिला मामाने केलेला अत्याचार आठवला ..सुमारे सात दिवसांनी तिने कॉलेजच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली ..मी त्यादिवशी तिच्या बाजूलाच उभी होते ..रडावस वाटत होतं पण तेही जमलं नाही आणि त्या दिवसापासून स्पर्शाबद्दल घृणा निर्माण झाली ...माझ्यासोबत अस काही नक्कीच झालं नव्हतं पण ती भीती मनात कोरल्या गेली ती कायमचीच...

तरीही तुला माझ्याबद्दल सतावत असलेल्या प्रश्नाचं उत्तर हे नाही ..खर तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच नव्हतं म्हणून मी शांत बसले होते ..पण गेले काही दिवस मी या प्रश्नाचं उत्तर शोधू लागले आणि मला ते सापडलंच ..तुला आठवतंय मी एकदा तुला विचारलं होत की एखाद्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो पण स्पर्श नाही तेव्हा तू म्हणाला होतास की हे सर्व एकाच स्थितीत होत जेव्हा त्या मुलीला चुकीच्या स्पर्शाचा सामना करावा लागतो ..तुझा तर्क बरोबर होता ..पण तुझीही विचारशक्ती दूरवर पोहोचू शकली नाही ..आजाराची लक्षणे सारखीच होती अभि .. पण आजार मात्र वेगळा होता ..आज मी माझ्या मनातल तुला सर्व काही सांगणार आहे ..त्यात तुझं उत्तरही असेलच ..मी लहान होते तेव्हा मुलींच्या शाळेत होते त्यामुळे मला लहानपणापासूनच मुलीचा स्पर्श व्हायचा..तो स्पर्श मला आनंद देऊन जायचा ..मला मुलाचा कधीच स्पर्श झाला नव्हता त्यामुळे आकर्षण काय असत हे मला कधीच समजलं नाही ..कॉलेजला असताना एकटा मित्र राहुल ..त्याचाही एकदा नकळत स्पर्श झाला आणि मला त्याचा राग आला होता तोही मला सोडून जाईल म्हणून बोलु शकले नाही ...मला तेव्हाही जाणवत होतं की मी काहीतरी वेगळी आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर मला काही सापडलं नाही आणि घरी कडक वातावरण असल्याने मी काहीच बोलू शकले नाही ..मैत्रिणीने आत्महत्या केली तेव्हापासून खूपच तुटले ..आणि एकटीच राहू लागले ..माझ्या मनात लग्नाबद्दल सदैव भीती होती ..की माझं काय होईल काय नाही पण तेव्हाच तुझं स्थळ चालून आल ..दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं असत तर मला पहिल्या दिवसापासूनच शारीरिक संबंधाला सामोरे जावे लागले असते पण तू माझा मित्र होतास त्यामुळे मला सांभाळून घेशील हे माहिती होत ..शिवाय मी तुला ओळखत होते त्यावरून हे सांगू शकत होते की तू माझं म्हणणं समजून घेशील ..लग्न जुडल आणि आपण एकमेकांच्या जवळ येऊ लागलो ..तुझ्याशी बोलता - बोलता मी वेगळ्या जगात हरवून जायचे ..आजपर्यंत जी बंधने माझ्यावर लादण्यात आली होती ..तुझ्यासोबत असताना ती सर्व बंधने कुठेतरी दूरवर फेकल्या गेली ..मी एखाद्या पक्षासारखी हवेत घिरट्या घेऊ लागले ..तुझा सहवास मला हवासा वाटू लागला आणि मी घेतलेला निर्णय मला समाधान मिळवून देऊ लागला ....पण आपण मूवी पाहायला गेलो आणि तुझा मला नकळत स्पर्श झाला ..मी तेव्हा अस काही रिऍक्ट केलं की तू दुखावला गेलास ..ज्या व्यक्तीने मला या बंदिस्त वातावरणातून बाहेर काढलं त्या व्यक्तीला मी दुखावलं म्हणून खूपच दुःखी झाले ..पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलासाठी रडले होते म्हणून रात्रीच तुला धावत येऊन मिठी मारली ..केनीच्या घरी गेलो तेव्हा रिचर्डशी हात मिळवीण असो की पहिल्या शारीरिक संबंधानंतर माझा न खुललेला चेहरा असे कितीतरी प्रसंग तुझ्या मनात घर करीत होते आणि तुला वाईट वाट लागलं आणि नेमकं त्याच वेळी माझ्याही डोक्यात तेच प्रश्न घर करून होते ..तू माझ्यासाठी चिंतीत होता , तुला माझ्याशी बोलायच होत हे सर्व कळत होतं पण माझ्याकडे उत्तरच नव्हतं तर काय उत्तर दिलं असत मी म्हणून वाट पाहू लागले ..

अलीकडे मी इथे कॅनडाला आले ..घरी एकटीच असल्याने मला बरेच प्रश्न सतावत होते .एकदा बसलेली असताना विचार येऊ लागला आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्याचशी लिंक जुळवू लागले आणि मला उत्तर मिळाल ..एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडू शकतो पण स्पर्श नाही हे फक्त चुकीच्या स्पर्शानेच नाही तर जेव्हा एखाद्या मुलीच आकर्षण मुलीकडे असते तेव्हासुद्धा असच होत ..हो ..हो मी लेस्बियन आहे ....मला जेव्हा हे कळलं तेंव्हा स्वतःलाच विश्वास बसत नव्हता ..म्हणून मी रागात मोबाइल आरशाला फेकून मारला ..तरीही मला यावर विश्वास बसत नव्हता म्हणून पुन्हा एकदा तपासून पाहू लागले ..मला माहिती आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस पण माझं शरीर नाही देत रे साद तुला ..माझा तो स्पर्श तुला सुखावून जातो पण मला तोच तुझा स्पर्श किळसवाणा वाटतो हेही तेवढच सत्य आहे ..याच वेळी मी जेव्हा केनिला मिठी मारायचे तेव्हा तो स्पर्श मला सुखावून जायचा ..शरीर देखील काय कोड आहे न त्याला नाही समजत कुठली गोष्ट चांगली आणि कुठली वाईट ?

आता तुला एक प्रश्न पडला असेल की हे तुला कस कळाल नाही ..खर सांगू तर कळत होतं ..पण माझ्या मैत्रिणीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा मी स्वताला हरवून बसले ..तीच तर आकर्षण पुरुषाकडेच होत पण तिच्या मामाणेच तिच्यावर अत्याचार केले ..आणि जेव्हा तिने आईला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या आईला मुलीची स्थिती समजली नाही आणि उलट तिला परिवाराची इज्जत दिसली..घरच्यांनी तिची चूक नसतानाही तिलाच गृहीत धरलं ..त्याच वेळी तीच अस्तित्त्व पणाला लागलं मग मी तर तुमच्यासारखी नाही हे ऐकून माझ्या वडिलांनी मला मारूनच फेकून दिल असतं ..त्यावेळी मला समजत गेलं की या समाजात स्त्रियांच स्थान अतिशय खालावल आहे ..हो पण मी त्यावेळी शोअर नव्हते म्हणूनच तुझ्याशी लग्न करायला होकार कळविला ..जर मला खात्री असती तर मी तुझ्यावर ओझं कधीच बनले नसते ..मला तुझ्याआधी कुणाचाच स्पर्श झाला नव्हता पण जेव्हा तू पहिल्यांदा स्पर्श केलास तेव्हा तो आनंद नव्हता होता ता नकोसा प्रसंग जो मला क्षणाक्षणाला यातना द्यायचा..फक्त तुला वाईट वाटू नये म्हणून सांगण्याची हिम्मत झाली नाही ..गेले कित्येक दिवस हे ओझं मनावर घेऊन जगते आहे ..आज स्वतःहून तुझ्यासमोर यासाठीच आले की मला एकदा पुन्हा पाहायचं होत की तो स्पर्श खरच नको आहे का मला ? ..आणि आजही तो स्पर्श मला किळसवाणा वाटला ..खूप हिम्मत केली आहे रे हे सर्व सांगायला ..तुही इतरांसारख सोडून देशील याची भीती आहे पण त्याहीपेक्षा मला माझं सत्य तुला सांगायचं होत कारण तुला जो आनंद माझ्या चेहऱ्यावर पाहायचा असतो तो कधीच आला नसता आणि नकळत का होईना मी तुला फसवलं असत ..मला माहित आहे तू खूप दुखावला आहेस हे ऐकून की ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं तिलाच माझा स्पर्श आवडत नाही पण तुला दुखवण्यापेक्षाही तुला फसवन मला जास्त बोचू लागलं होतं म्हणून हे सर्व मी तुला सांगते आहे ..आता तुला वाटत असेल तर तू माझं शरीर उपभोगू शकतोस ..किंवा सोडून देऊस शकतोस ..वाटल्यास दोन ..मी तुझ्यावर रागावणार नाही पण हेही तितकंच खरं आहे की मी लेस्बियन आहे आणि मला पुरुषाचा स्पर्श आवडत नाही .."

मी हे सर्व मागे बसून एकत होतो .ती माझ्याकडे पाहत नव्हती तेव्हाच मी डोळे पुसून घेतले ..ती माझ्याकडे पलटली आणि मी शांत होऊन तिच्याकडे पाहू लागलो..

कुठलीही कंमेंट करण्यापूर्वी मी खाली जे लिहिलं आहे ते नक्की वाचावं

क्रमशः ....

( तुम्ही कथा वाचन सुरू केलं त्याला काही दिवसात एक महिना पूर्ण होईल पण मी ही कथा दोन महिन्यांपासून तयार करतो आहे ..त्या सुरुवातीच्या काळात मला खूप भीती वाटत होती हा विषय निवडताना ..मी कुठे माझं नाव तर गमावून बसणार नाही ना ही देखील भीती होती पण मी ठरवलं नाव संपलं तरी चालेल पण हा विषय मांडायचा ..मी नव्याने कथेची तयारी केली ..कमीत कमी दहा ते पंधरा मुलींचे विचार ऐकले ..intreview पाहिले आणि नेटवर चेक केलं तेव्हा जाऊन ही कथा लिहायची हिम्मत गोळा करू शकलो ..नकारात्मक प्रतिक्रिया येतील हे मला आधीच माहिती आहे ..पण ही संपूर्ण कथा समलैंगिकतेवर आधारित नाही ..यात तीन चार सामाजिक विषय लपून आहेत जे कथेच्या शेवटी तुम्हाला माहिती होईल ..ज्यांना फक्त प्रेम कथा वाचायची असेल त्यांनी भाग 21 मध्येच कथा संपली आहे असं समजावं आणि ज्यांना वाटत की या कथेतून impossible to understand आपल्याला काहीतरी नावूं देऊ शकतो त्यांनी ही कथा नक्कीच वाचावी ..तुम्ही हजारो प्रेम कथा वाचल्या असतील त्यामध्ये आणखी एक प्रेम कथा वाचल्याने काहीच फरक पडणार नाही पण स्पर्श ही कथा वाचून तुम्हाला सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या काही घटकाबद्दल माहिती मिळेल ..आता सर्व प्रश्न तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे ..मला हजारो वाचक नसले तरीही चालतील पण 10 असे वाचक हवे आहेत जे मी लिहिलेला विषय समजून घेतील ..बघा निर्णय तुमचा आहे ..आणि हो या भागापासून मी तुमच्या सर्व कमेंटवसवर उत्तर देईल मग त्या नकारात्मक असो की सकारात्मक ..फक्त कंमेंट करताना हे भान असू द्या की कुठल्याही व्यक्तीच्या मनावर तो परिणाम पडणार नाही ..होऊ शकत या वाचकात कुठेतरी एक मानसी लपून बसलेली असेल ..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही कथा अभिची वाटत असली तरीही हिंकथा आहे मानसीची ..प्रेमात पडणारे कित्येक अभि जगत आहेत पण समाजात त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न कुठेच निर्माण झाला नाही ..पण मानसीबद्दल हा प्रश्न निर्माण होतो .तेव्हा मानसीच्या अस्तित्त्वाची ही लढाई तुम्ही नक्कीच वाचायला हवी ..बाकी तुमच्यावर सोडतो..फक्त 4 भाग आहेत त्यानंतर तुम्हाला शेवट भेटून जाईल ..तुम्ही देऊ शकता वेळ या माझ्या छोट्याश्या प्रयत्नाला ?? )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED