कादंबरी- जिवलगा -भाग ३५ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा -भाग ३५ वा

कादंबरी - जिवलगा

भाग -३५ वा

----------------------------------------------------------------

शाळेत असताना ,कोलेजच्या असतांना ..त्यातले वार्षिक परीक्षेचे दिवस आठवावेत .

सर्वात कठीण पेपरची मनात भीती असते ..कसे होईल ?

काय होईल ? पास की नापास ? प्रश्नांनी झोप उडवलेली असते ..आणि

मग एक दिवस मनाच्या अशा अवस्थेतच अवघड पेपरचा दिवस उजाडतो,

तो पेपर सोडवला जातो ...मनात जितकी भीती ..त्याच्या उलट परीक्षेच्या दिवशी

पेपरच्या दिवशी घडून जाते ... आरेच्या हा पेपर तर अगदी सोप्पा निघालाय की

आणि या आनंदात ..पेपर सोडवून आपण उड्या मारीत घरी येतो ...!

हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असतो ..

नेहाच्या बाबतीत फार वेगळी गोष्ट नव्हती ..परीक्षा आणि पेपर दोन्ही जवळ आले की

तिच्या मनात अधीरता आणि उत्सुकता असायची ...आणि आपल्या मनाची सेम टू सेम

अवस्था नेहाने नुकतीच अनुभवली ..ती हेमू पांडेच्या आणि तिच्यातील मैत्रीच्या नात्यात .

हेमू पांडे आणि तिच्या प्रेमाची कहाणी ..प्रेम आहे की नाही ?,एकमेकांना आवडलो की नाही ?

सांगायचे तर कसे सांगायचे ..कुणी..कुणाला सांगायचे ?

असे प्रश्न असलेला ..प्रेमाचा पेपर ..नेहाने सोडवला खरा ..पण, या प्रेमाच्या परीक्षेत मेरीट मध्ये

मात्र नेहा नाही ..तर हेमू पांडे पास झालाय ..!

जेवणे आटोपून ..झोपण्या आधी ..अनिता- सोनिया आणि नेहाच्या गप्पा सुरु झाल्या होत्या ,

छान लोळत .आरामशीर मूड मध्ये होत्या तिघी जनी ..सगळ कसे मजेत आणि आनंदात चालू आहे

याची सुखद जाणीव मनाला आनंद देणारी होती.

कारण ..त्यानेच खरी परीक्षा दिली आणि तो पास झाला ..नेहाने काहीच केले नाही..

तिला आयता ..हेमू पांडे मिळालाय .

असे प्रगती-पुस्तक ..सोनिया –आणि अनिता या दोघींनी नेहाला दिले .

अनिता म्हणाली – नेहा मी तुझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठी आहे ..म्हणून आज तुला

काही महत्वाचे सांगते..ते उपदेश म्हणून नाही ..तर एक फ्रेंड म्हणून सांगते आहे .

नेहा बेबी..

आता इथून पुढे ..एकमेकांना समजून घेत ..सोबत करायची ..प्रेमाची परीक्षा पास झालीस .

या परीक्षेत काय कळाले ? तर, आपण एकमेकांना आवडणारे मित्र आहोत ..या मैत्रीचे रुपांतर

प्रेमात आणि पुढे या प्रेमाचे रुपांतर ..लग्नात ..व्हावे असे वाटणार ..म्हणजेच ..एकमेकांचे जीवन-साथी

होण्याच्या दृष्टीनी ..तुमच्या मनाची तयारी नक्कीच झाली आहे.

सोनिया म्हणाली ..नेहा ..इतके दिवस तुमच्या दोघात प्रेमाची आंधळी कोशिंबीर चालू होती .

त्यातली मजा आता संपली.

हेमू पांडे ने दिलेल्या पार्टीला आता आठ दहा दिवस झालेत ..त्या नंतर आता तुमच्या दोघात

कशी ट्युनिंग आहे ?

त्या दोघीकडे पहात ..नेहा सांगू लागली ..

एकमेकांच्या मनातल्या गोष्टीची कबुली दिल्या पासून ..आमच्या दोघात आता एक सहजता आली आहे

हे मात्र नक्की .

नाही तर ..एकमेकाच्या विषयीच्या भावनाना मनात ठेवीत ..त्या दाखवायच्या कशा ?

या संकोचाचे मोठेच ओझे हेमू पांडेच्या मनावर होते...म्हणून तो तसा मोकळेपणाने न वागता एक प्रकारे

फोरमल वागतो आहे असे वाटायचे ..त्यामुळे ..मी सुद्धा तसीच वागायची ..

यामुळे जो पर्यंत आमच्या मनाची कोंडी फुटली नाही ..तो पर्यंत आम्ही दोघांनी अवघडलेल्या मनाने

ऑफिसमध्ये काम केले “असे मला वाटते .

अनिता म्हणाली ..

नेहा ..आतापर्यंत जे झालं ते झालं ..आता या पुढे कसे काय ठरवायचे ? याची जबबदारी तुम्हा

दोघांना घ्याची आहे .

एक लक्षात ठेवा ..

सर्वांच्या विरोधात जाऊन ..प्रेमाच्या जोशात .लग्न करणे ..ही जवानीतली मस्ती असते “ असे माझे

मत आहे. ही मस्ती उतरली की मग..सगळ्यांची किंमत कळत असते .

नेमक्या अशा वेळी ..सगळ्यांचे “इगो “ जागे होतात ..

आणि या इगो- टक्कर “मध्ये सगळ्यांचे मोठेच नुकसान होत असते .

या गोष्टी टाळण्यात खरा शहाणपणा आहे “ असे मी म्हणेन .

तेव्हा तुम्ही दोघांनी समझदारीने आपापल्या घरच्या माणसाना ..राजी करून घ्यावे ..तसे पाहिले तर

तुमच्यापेक्षा तुमच्या परिवारातील लोक जास्त समझदार आहेत “, असे मला वाटते . पण, त्यांना गृहीत धरू नका ..

उलट ..त्यांना न दुखावता आणि विश्वासात घेऊन कल्पना द्या. त्यांना आनंदच होईल हे नक्की .

नेहा म्हणाली ..होय अनिता ..माझे अगदी हेच मत आहे...थोडा वेळ लागला तरी हरकत नाही ..

पण, सर्वाची संमती ..ती देखील आनंदाने मिळवायची आणि मगच ..लग्न ..! तोपर्यंत नाही.

सोनिया –म्हणाली ..एकदम करेक्ट ..नेहा ..!

जियो मेरी बेबी ...!

आपल्या प्रेमाने सर्वांना आनंद व्हावा “ तो झाला पाहिजे “..हे तुझे मत ..हेमू पांडेला आवडले आहे ना ?

नेहा म्हणाली –

यस ..हेमुचे मत अगदी सेम माझ्या सारखेच आहे.

अनिता म्हणाली –

आता एक काम करायचे नेहा तू ..

काय काम करायचे सांगा ? रविवार .पार्टी करायची का ? मी रेडी आहे ..!

तुम्ही हॉटेलचे नाव सांगा ..पार्टीचे बील मी देईन .

हेच पाहिजे ना तुम्हाला ? नेहाने विचारले .

त्यवर सोनिया म्हणाली ...

असे अजिबात नाही..

आम्हाला पार्टी हवी आहेच ..पण.. ती हॉटेल मधल्या जेवणाची नाही .

तर येत्या सन्डेला ..आपल्या रूमवरच पार्टी होईल .

आणि ..दुपारचे मस्त जेवण ..तू बनवायचे ..आहेस ..आमच्यासाठी आणि येणाऱ्या स्पेशल

गेस्टच्या आवडीचे .

नेहा म्हणाली ..अरे वा ..मस्त आयडीया ..

किचन ड्युटी तर माझी सर्वात आवडती आहे. तुम्ही मेनू सांगा ..मी तुम्हाला

“इच्छा –भोजन “ पार्टी देईन .

पण, मला एक नाही कळाले ..की स्पेशल गेस्ट ? ही भानगड काय आहे ?

तुमच्या दोघींची फ्रेंड येते आहे काय ? अचानक आपल्या कडे ?

सोनिया –म्हणाली

ए नेहा ..उगी भोळेपण का ड्रामा मत करो ..! तुला कळले आहे गेस्ट म्हणजे कोण ?

नेहा ..म्हणाली ..तुमच्या दोघींची शप्पत ..

मला कशी कल्पना असेल ,तुमच्या गेस्टबद्दल !

नेहाचे असे बोलणे ऐकून घेत ..अनिताने नेहाच्या पाठीत एक धपाटा घालीत म्हटले ..

ए- डांबिस छोरी.. गेस्ट आमच्या दोघींचा नाहीये ..आपल्या तिघींचा ..कॉमन गेस्ट आहे ..

खरे म्हटले तर..आमचा पण नाही म्हणता येणार त्याला ..,पण..जाऊ दे ..कुणी का असेना गेस्ट ..

तुझे काम ..आम्हाला मस्त पार्टी देणे ..संडे लंच ..हम सब एक साथ ..!

नेहा म्हणाली -ओके ओके....! आता तरी सांगा की बायांनो .

.गेस्ट कोण आहे ?

अनिता म्हणाली ..हेमू पांडे ..तुझा हिरो ..!

त्याने आम्हाला पार्टी दिलीय मग आम्हाला पण त्याला पार्टी दिली पाहिजे ना .

आता योगयोगाने ..आमची पार्टनर तू आहेस..

जी लवकरच हेमू पांडेची लाईफ –पार्टनर होणार आहे.

मग ..तुझ्याकडूनच ही पार्टी दिली जावी ,अशी आमची इच्छा आहे.

सोनिया म्हणाली ..नेहा ..बोल आता ..तुझे काय म्हणे आहे यावर ..?

त्या दोघींच्या कडे हसत पहात ..नेहा म्हणाली ..

तुमच्या बहुमता पुढे ..माझ्या एकटीच्या मताची काय किंमत ?

आप का हुकुम ,आप की फर्माईश हम पुरी करेंगे ..!

अशा रीतीने संडे प्रोग्राम पक्का झाला ..त्याचा विचार करीतच तिघी मैत्रिणीना झोप लागली.

अनिताने शनिवारीच ..हेमू पांडेला संडे पार्टीला येण्याबद्दल सांगितले होते.

तुमच्या रूमवर पार्टी का बरे ? बाहेर गेलो असतो न आपण मस्त ..

तुमच्या रूमवर ..तुम्ही तीन लेडीज .आणि मी एकटा..थोड संकोन्च्ल्या सारखे नाही का वाटणार ?

सोनिया म्हणाली .. हे बघ हेमू ..त्यात संकोच वाटण्या सारखे काय आहे रे ?

आम्ही दोघी तर तुझ्या ओळखीच्या आहोतच ..

आणि ती तिसरी ..नेहा ..ती तर ..

कानामागून आली आणि तिखट झाली “

अशी पोरगी ..ती आमच्या पेक्षा तुझ्याच जास्त जवळची झालीय .

मुकाट्याने दुपारी एक वाजता ये..उशीर लावायचा नाही.

आणि..तुला जेवणात काय आवडते ..त्याची लिस्ट दे..

लिस्ट ? ती कशासाठी ? हेमू ने विचारले ..

त्यावर अनिता म्हणाली ..

अरे वेड्या मुला ..तुझी होणारी बायको सगळा स्वयंपाक तयार करून आपल्याला पार्टी देणार आहे.

तिचीच ऑर्डर आहे ..की आम्ही तुला काय आवडते ..याची लिस्ट तिला द्यावी .

तिने असे म्हटल्यावर ..

आम्हाला तसे वागणे भाग आहे बाबा ..नाही तर तुझ्या नेहा –राणी सरकार

फायर करायच्या ..आम्हाला .

हेमुला आश्चर्य वाटले तो म्हणाला -

काय म्हणता दीदी तुम्ही ? नेहाला सगळा स्वयंपाक येतो ? बाप रे ! खरेच वाटत नाहीये मला .

सोनिया म्हणाली –

हेमू ,तू खरेच फार लकी आहेस ..मधुरिमादीदीने तुझ्यासाठी नेहा सारखी गुणी मुलगी पक्की ठरवली.

बरे ते जाऊ दे..तुझी लिस्ट दे पटकन .आम्हाला घरी जातांना .सगळी शॉपिंग करीत जायचे आहे.

नेहाला आज आम्ही अगोदरच घरी पाठवले .

आजकाल घर आवरतांना ..ते सध्या एकच गाणे म्हणत असते ..

मेरा पिया घर आया ..ओ राम जी ...!

हेमुला मनापासून हसू आले ..! दीदी मी वेळेवर येतो.वाट पहायला लावणे मलाच आवडत नाही.

रविवारची सकाळ कधी उगवते ..! असे नेहाला झाले होते . त्या दोघींच्या अगोदर उठून ..तिने

सगळे घर . आवरण्यास सुरुवात केली होती ..चहा नाश्ता सुद्धा रेडी केला .

अनिता –सोनिया ..हे सगळं पहात नेहाकडे कौतुकाने पहात होत्या ..

किचन मध्ये एकेक काम करतांना ,,नेहा जणू स्वताच्या भावविश्वात ..हरवून गेली होती ..

तिचा हेमू पांडे ..पहिल्यांदा तिच्या घरी येणार होता ..त्याचे स्वागत कसे करू ? किती करू ?

मजेशीर कल्पनेच्या झोक्यावर नेहाचे मन हलके हलके झुलत असणार ..

सोनियाने अनिताला नेहाचे हे गोड रूप दाखवत म्हटले ...

देवाजवळ एकच प्रार्थना .

.या पोरीच्या आयुष्यात नेहमीच सुख..समाधान .आनंद भरभरून असू दे रे बाबा ..!

बरोबर एक वाजता ..हेमू आला ..आणि चौघांच्या गप्पा सुरु झाल्या ..

नेहाने जेवणाची अगदी सुरेख सजावट केली होती ...तयार केलेल्या पदार्थांचा खमंग सुवास

घरात दरवळत होता.

हेमू म्हणाला ..मी सकाळ पासून काही खाले नाही ..आणि इथे इतके सगळं पाहून

मला आता भूक आवरणार नाहीये..

चलो..पहिले खाना ..बाद मे गाना, और आईस्क्रीम माझ्याकडून .

“ लुसलुशीत पोळ्या , खमंग भाजी , चवदार आमटी..वाफालेला भात, कढी, आणि स्वीट म्हणून

बासुंदी ..! असा फक्कड बेत नेहाने बनवला होता.

सगळे या पदार्थावर तुटून पडले ..! नेहा सुगरण आहे..! हे तिघांनी आनंदाने मान्य केले .

सगळे मनापासून खात आहेत ..हे पाहून ..नेहाला तिच्या जेवण बनवण्याच्या श्रमाचे सार्थक झाल्या सारखे

वाटत होते ..!

मस्त हसत खेळत ..जेवणेझाली ..हेमू ने खाली जाऊन नेहाच्या आवडीचे पिस्ता आईस्क्रीम

आणले.. आईस्क्रीम खात खात ..गप्पा चालू होत्या ..

आणि इतक्यात ..हेमूच्या मोबाईलची रिंग वाजली ..

स्क्रीनवर त्याच्या मामाचे नाव बघून ..तो म्हणाला ..मामाचा फोन आहे,मी खाली जाऊन बोलतो ,

लगेच आलो .

दहा मिनिटे झाली ..वीस मिनिटे झाली ..अर्धा तास होऊन गेला ..तरी ..हेमू पांडेच्या मामाचा कॉल काही

संपेचना ..एवढे काय बोलत असेल मामा ?

एकदाचा हेमू पांडे पुन्हा वर आला खरा ..

पण.. जातांना जसा हसरा आणि प्रसन्न होता ..तसा आता वर आल्यावर दिसत नाहीये “हे सगळ्यांना

लगेच जाणवले.

अनिताने विचारले

काय झाले रे ? ..एकदम सिरीयस झालास ? काही प्रोब्लेम आहे का ?

आम्हाला सांगण्यासारखा नसेल तर राहू दे ..!

हेमू म्हणाला ..अहो, प्रोब्लेमच असा झालाय की ..तो कसा सोडवायचा ..हे आता तुमच्या

मदतीशिवाय शक्य नाहीये.

सोनिया म्हणाली ..अरे बाबा .तू काय झाले ते तर अगोदर सांग ..मग कळेल प्रोब्लेम स्वरूप काय आहे.

नेहा ..गंभीर होऊन हेमू कडे पाहत होती ..

तिला आठवले -मागे एकदा मामाचे आणि हेमू पांडेचे फोनवरचे बोलणे

तिने ऐकले होते ..नक्कीच .मामाने काही तरी प्रोब्लेम निर्माण केलाय..

हेमू सांगू लागला ..

काही दिवसापूर्वी ..म्हणजे ..या नेहाने ,मला होकार देण्या अगोदर ..मी मामाला म्हणालो होतो.

तुम्ही माझ्यासाठी मुलगी पसंत करून कार्यक्रम ठरवा ..मग, मला कळवा मी येईनच .

आणि तसेच झाले ..येत्या रविवारी ..माझ्या घरी ..आमचे मामासाहेब त्यांनी ठरवलेल्या मुलीला

घेऊन माझ्या आई-बाबांना दाखवायला येणार आहेत. कारण..त्यांच्या मते मी त्यांना सगळे करण्यास

परवानगी दिली आहे .आता सगळ नोमिनल आहे. मामीच्या माहेरच्या कडची फ्यामिली आहे ही.

मुलीसोबत तिचे आई-वडील ,आणि आमच्या गावातील सगळे नातेवाईक .जमणार आहेत.

आता आली का पंचाईत ?

मामा काही ऐकयला तयार नाहीये .

.त्याचे म्हणे एकच..तू सांगितले म्हणून..मी हे सगळ केले आहे .

तू नाही आलास तर ..मोठी बदनामी होईल, फजिती होईल ..आपल्या सगळ्यांची.

बोला सोनिया दीदी .अनिता दीदी ..आता मी काय करयचे ?

नेहा म्हणाली ..मला चिडवण्यासाठी त्या दिवशी मोठ्या ऐटीत मामला सांगत होतास ..तुम्ही ठरवा ,

मी तुमच्या शब्द बाहेर नाहीये..

घे आता ..! bumrang..तुझ्यावर उलटलाय ..!

अनिता म्हणाली .. हेमू तू शांतपणे जा गावाकडे ...दोन दिवस आधीच जा ..

आणि तुझ्या आई-बाबांना सगळी कल्पना दे, मामांना बोलवून घे ..काही न लपवता सांग..

ते रागावतील , गोंधळ घालतील ..पण.थोड्यावेळाने शांत होतील ..

मग..तुझा प्रोब्लेम नक्कीच सुटेल..पण तो पर्यंत ..टेन्शन कायम असेल हे नक्की ..!

हेमू मोठ्या निराश मनाने त्याच्या रूमकडे नघून गेला . दिवसभराचा आनंद हरवून गेला ..

हेमू परत येईपर्यंत काय ?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -३६ वा लवकरच येतो आहे

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------