सांन्य... भाग १० - अंतिम भाग Harshad Molishree द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सांन्य... भाग १० - अंतिम भाग

"मला विश्वास होता की येशील तू, विश्वास होता मला"..... अपूर्व (हसत हसत म्हणाला)

"घे मग आलो".... शुभम

"तुला ना एक किस्सा सांगतो".... "एकना समूनद्रा मध्ये मासा होता माहीत नाही का पण त्याला ना समूनद्रा च्या बाहेरची दुनिया बघायची खूप आवड होती, तो रोज त्याच्या बापाला सांगायचा आणि त्याचा बाप म्हणे आज नाही उद्या आज नाही उद्या, पण तुला काल काय झालं माहीत आहे, तो मासा ना स्वप्नयात आला माझ्या म्हणे दुनिया बघायची आहे मला तुमची, मग काय पाण्यातून घेऊन आलो त्याला"..... अपूर्व जोरात हसायला लागला

"या कथेचा निष्कर्ष काय ते माहीत आहे.... जी जागा ज्याच्या साठी आहे ना त्याला तिथंच खुश रहावं".... अपूर्व ने असं म्हणत शुभम वर हमला केला, त्याला एकदम जोरात ढकलून त्याच्या हाताला कोयता त्याने घेतला...

अपूर्व जोरजोरात हसायला लागला....

"इथं ना लोकांना पडलीच नाहीये कसं ही कुठे ही सोडून देतात आपल्या मुलाला..... आठवतं राहुल... रात्रीचा वेळ अनोळखी जागा आणि एकटाच बाहेर निघून आला, अरे आई बाबा ला पडली आहे की नाही.... बिचारा, मग मी त्याला घेऊन आलो".....

"नवीन... माहीत आहे घराच्या बाहेर इतक्या सकाळी एकटा खेळत होता आणि खेळता खेळता कुठे पोचला तो, नशीब त्याचं की मी वेळेवर पोचलो तिथं आणि वाचवलं त्याला"...

शुभम जखमी झाला होता, पण तो खाली पडून शांत पणे सगळं ऐकत होता....

"मग ते २२ मुलं.... अरे हां त्यात तर तुमच्या त्या इन्स्पेक्टर चा पण मुलगा होता, तो ड्राइवर कशी बस चालवतो माहितीये तुला कधी चुकून अकॅसिडेंट वगैरे झालं तर, पण त्यांच्या आई वडिलांना काय पडलीच नाही, बस मध्ये बसवलं मुलांना आणि जाऊ दिलं, मग ते लोक शाळेवर वेळेवर पोचले की नाही मधी काय झालं की काय होणार काहीच पडली नाहीये, मी त्यांना वाचवून घेऊन आणलं..... आणि ह्याच कोयत्याने त्या ड्राइवरला मारलं".... ( अपूर्व हसत हसत म्हणाला )

"मग तो अखिल... दोन वेळा त्याने हॉस्टेल मधून घरी पळून येण्याचं प्रयत्न केला पण त्याचा बापाने काहीच केलं नाही, अरे आपल्याला मुलाला काय हवं काय नाही त्याची जाणीव एक बापाला असली पाहीजेना.... नाही अजिबात नाही, पण मग शेवटी मी घेऊन आलो त्याला"....

"तुला माहीत आहे तू पण तीच चूक केली जी लोकांनी केली, मला वाटलं की तू चांगला आहेस तुला तुझ्या मुलालची काळजी आहे पण नाही, बापाला हे माहीत आहे की एक विकृत व्यक्तीला तो धमकी देऊन आला आहे, कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं, पण ती नशेवली चहा पिऊन झोपला.... तू झोपलास आणि मी तुझ्या मुलाला तुझ्या नजरेसमोरून उचलून घेऊन आलो".... (अपूर्व ची हसी अगदी विकृत होती....)

हे ऐकून शुभम हसायला लागला... शुभम ला असं हसताना पाहून अपूर्व ने त्याच्या डोक्यावर जोरात मारलं, शुभम तरी हसत होता.....

"हसू नकोस.... साल्या हसू नकोस"..... म्हणत अपूर्व ने शुभंला तोंडावर जोराचा फटका मारला आणि शुभम च्या तोंडातून रक्त आलं

"ती चहा पिण्याच्या आम्ही फक्त नाटक केलं होतं"..... अपूर्व हे ऐकून शांत झाला

"अच्छा".... अपूर्व

"माझ्या मुलाला मी मुदाम तुझा सोबत पाठवलं, नाही तर तुझ्या सारख्या हिजड्याच्याची औकात नाही की माझ्या मुलाला हाथ पण लाऊ शकेल".... शुभम अगदी रागात म्हणाल

हे ऐकून अपूर्व ने कोयता एका बाजूला ठेवला आणि शुभम च्या तोंडासमोर येऊन मांडी घालून बसला....

"काय फाटली का कुत्र्या".... शुभम

"हो, साहेब घाबरलो मी..... पण काय, काय उपटून घेतलंस तू हे सगळं करून काय"....?? अपूर्व

"तुला ते नाही कळणार, कारण की जो व्यक्ती काळजी ची बाता करतोय त्याला त्याचाच मुलाची काळजी नव्हती, साल्या साहिल ला तू मारलंस ना.... तुझ्या मुलाला तू मारलंस ना".....

हे ऐकताच अपूर्वला जणू काय झालं पण तो शुभम ला मारत सुटला, अपूर्व शुभमच्या डोक्यावर सारखा हमला करत होता आणि तेच शुभम बेशुद्ध झाला....

काही वेळा नंतर शुभम ने डोळे उघडले, त्याला काय स्पष्ट दिसत नव्हतं... खूप अंधार होतं, शुभम जसा तसा स्वतःला सांभाळून उठला आणि खिश्यातून त्याने lighter काढून पेटवला, त्या उजेळात त्याने जाऊन समोरच बटन दाबला आणि लायनीत light चालू झाली....
समोरचा ड्रीष्य पाहून शुभम आश्चर्यचकित झाला, समोर भरपूर खेळणे पडले होते आणि तेच त्याच्या समोर एक रांगेत दोन्ही बाजूला मोठे मोठे पिंजरे होते....

शुभम हळू हळू... त्या पिंजऱ्या जवळ गेला, बघतोय तर काय प्रत्येक पिंजऱ्यात एका मुलाला रसिने बांधून ठेवलं होतं आणि हेच मुलं होते ज्यांचे अपहरण अपूर्व ने केले होते....

शुभमला प्रत्येक पिंजऱ्यात एक मुलगा दिसला पुढं जाताना त्याला एका पिंजऱ्या मध्ये अमर पण दिसला, पण त्याच्या पुढच्या पिंजऱ्या मध्ये कोण नव्हतं, पण रसी मात्र अडकून होती...

तेव्हाच त्याला पाटून आवाज आला.... " साहिल,माझा मुलगा... खूप एकटा पडला होता तो, कोणच नव्हतं त्याच्या सोबत खेळायला.... माझ्या एक चुकी मुळे तो मेला, मला तो.... माहित आहे मी येडा आहे... मानसिक संतुलन ठीक नाहीये माझं पण मी माझ्या मुलाला नाही मारलं, मी तर खूप प्रेम करतो त्याला, इतकी काळजी आहे मला त्याची जिक्ती कोणाला कुठल्याच आई बाबा ला नाही... पण तो येतो, तु नाही बघितलं ना त्याला म्हणून तुला असं वाटतंय पण तो ना येतो, सांगतो मला पप्पा भूक लागली आहे मला, खेळायचं आहे पण मग मधीच काय माहीत कुठे निघून जातो"....

"तू ना घेऊन जा या सगळ्या मुलांना घेऊन जा, मला विश्वास आहे की तू यांची काळजी घेशील, जा घेऊन जा".... म्हणत अपूर्व ने स्वतःच्या गळ्यावर कोयता फिरवायला गेला, तेव्हाच शुभम ने त्याच्या हाथ झटकला....

कोयता एका बाजूला पडला आणि शुभम ने अपूर्व ला जोरात मुक्का मारला तोंडावर जेच्याने तो खाली पडला.… "काळजी, काळजी.... तुला काय माहीत की इतके दिवस ह्या मुलांचे आई बाबा कशे जगतायेत अरे खात नाहीये.... रडून रडून एक एक क्षण मरत आहेत, आणि तुला एवढी सोपी मौत देऊ"..... शुभम

"तू मला काय मारशील, मी तर त्याच दिवशी मेलो ज्या दिवशी माझ्या मुलाच्या हत्येच्या आरोपात मला सजा झाली"..... अपूर्व

शुभम ने हे ऐकताच अपूर्वला सोडलं, अपूर्व च्या डोळ्यातुन पाणी आलं, तेच शुभम च्या डोळ्यातुन पण अश्रू वाहू लागले, शुभम ला काय चांगलं काय वाईट ह्यातलं निष्पर्ष करता येत नव्हतं... आणि तेच तो ही खाली हाथ जोडून बसला.....

"पण ते म्हणतात ना काळजीपण तितकीच करावी जे पर्यंत ती समोरच्याला घातक नाही वाटत".....

शुभम त्या सगळ्या मुलांना सही सलामत बाहेर घेऊन आला, अजिंक्य इथं त्याची वाट पाहून उभा होता, अजिंक्य त्याच्या मुलाला बघून खुश झाला, त्याला त्याने उचलून घेतलं, हा नजारा मीडिया रेकॉर्ड करत होती, ही बातमी आधीच राणू ने मीडिया मध्ये दिली होती की मुलं सगळे जिवंत आहे.....

अपूर्वच्या मानसिक स्टितीला बघून न्यायालय ने त्याला सुधार गृहात ठेवण्याचा आदेश दिला, सगळे मुलं आपआपल्या घरी त्यांच्या आई बाबांकडे सुरक्षित पोचले, अजिंक्य ला पण त्याचा मुलगा सुखरूप परत भेटला, शुभमला सरकारने त्याची पोस्टिंग परत दिली.... राजश्री, अमर आणि शुभम अगदी खुश खुश होते....

शेवटी ती वेळ पण आली.... "बाय शुभम, काळजी घे विसरणार नाही मी तुला"... म्हणत राणूने शुभंला मिठी मारली आणि गालावर किस केलं... तितक्यात राजश्री अली तिथं

राणू पटकन बाजूला झाली... "You're so lucky dear"..... राणू राजश्री ला म्हणाली आणि मग अमरला भेटून शेवटी राणू निघून गेली.....

सगळं आधी सारखं झालं आणि एक दिवस शुभम अपूर्व ला भेटायला सुधार गृहात गेला.... अपूर्व झोपला होता, शुभम हळूच त्याच्या जवळ जाऊन टेबलवर बसला....

"धन्यवाद...! करायला आलोय तुझा इथं, तू काय पण केलस पण एक चांगला केलं तू की एकाही मुलाला मारलं नाही, जेव्हा forensic lab ची रिपोर्ट आली मला तेव्हाच कळलं होतं की तू कुठल्याच मुलाला मारलं नाहीये, तो मास बकऱ्याचं होतं, forensic test मध्ये हे कळलं होतं, पण मला प्रश्न होतं की तू शेवटी मग मुलांचं केलं काय"....

"हे माहिती करण्यासाठी एक दिवस रात्री मी लपून तुझ्या घरात घुसलो, खूप शोधलं पण काय भेटलं नाही, पण जेव्हा मी तळमजल्यावर गेलो तेव्हा मला, त्या टेबलवर शंका पडली, मी ते बाजूला केलं आणि जेव्हा कालीन खेचून बघितलं तर एक दार होता... खाली जाण्याच्या मार्ग, पण तेव्हाच मला तुझा आवाज आला आणि मी निघून आलो".....

"मला खात्री झाली की त्या दारामागे तू मुलांना ठेवलं आशील... इथून तू एकत्र एवढे मुलांना घेऊन येऊ शकत नाही घरात, पण म तू कुटून घेऊन येतोस मुलांना याची माहिती करण्यासाठी मी त्या ड्रायव्हरचं शव जिथं पडलं होतं तिथं गेलो, तिथं आसपास खूप शोधलं पण पुढे जाऊन मला एक गोदाम दिसलं, जेव्हा आत जाऊन बघितलं तर दिसायला ते नॉर्मल गोदाम होतं, पण तिथं पण मो तसाच कालीन बघितलं जस तुझ्या घरात होतं, जेव्हा ते बाजूला काढला, तिथून आत जाण्यासाठीचा रास्ता होता...
मला हवं असलं असतं तर मी तेव्हाच जाऊन मुलांना वाचवलं असतं, पण मला हे जाणून घायचं होतं की तू हे का करतोय.... म्हणून मग मी अजिंक्य आणि राणू सोबत प्लॅन केला"....

"काळजी, दुःख, एकुलपणा, विचार"...... अपूर्व

शुभम ऐकून दचकला.... अपूर्व ने मान फिरवली आणि शुभम कडे पाहुलागला

" माझा विकृत असलेला तो विचार ज्यामुळे मला मज्जा वाटायची त्या आईबाबांना टेन्शन मध्ये बघून, आनंद भेटायचा मला की जगात मीच असा नाही आहे ज्याने मुलाला गमावलं आहे, मेल्या नंतर पण साहिल मला नेहमी दिसायचा पण मी त्याला कधी स्पर्श करू शकलो नाही, त्याला मिठीत घेऊ शकलो नाही, जेव्हा जेव्हा मी त्याच्या साठी खेळणं घेऊन यायचो तो खुश व्हायचा पण मात्र खेळायला त्याचा सोबत कोण नव्हतं.... मग मी ठरवलं प्रत्येक सोमवारी मी त्याला एक नवीन मित्र आणून दिला तो खूप खुश व्हायचा, त्याची ती हसी बघून मला खूप आनंद भेटायचं"..... अपूर्व बोलला

शनिवार... तो दिवस माझा मुलगा मेला, सांन्य... born on saturday, तो माझ्याकडे परत आला, परत आला तो माझ्याकडे".... अपूर्व

शुभम हे ऐकून बोलला... "मज्जा, तुझी ही मज्जा लोकांसाठी किती मोठी सजा होती तुला काय माहीत, सोड तुला काय माहीत मुलाला गमवण्याचं दुःख".... शुभम

"मुलाला गमवण्याचं दुःख माझ्यापेक्षा अजून कोण चांगलं समजू शकत नाही".... अपूर्व शुभम च्या डोळ्यात बघून बोलला

शुभम ही अपूर्व कडे बघत रहायला आणि पूढे तो काहीच बोलला नाही......

--------------------------------------------------------------------- The End -------------------------------------------------------------------

१. विकृत पणा हे प्रत्येक माणसाच्या स्वभावात असतं, पण कमी प्रमाणात... आपला मित्र पडला तर आपण कधी कधी त्याला बघून हसतो नाकी त्याला लगेच उचलतो, ते ही एक प्रकारची विकृत भावना आहे, पण ती खूप नॉर्मल आहे माणसाच्या जीवनात काही घटना अश्या घडतात की ज्या मुळे, त्याची विचार शक्ती जगण्याचं अर्थ बदलून जातं....

२. आपल्या खुशी साठी कधी लोकांना दुखावू नये...

३. आजार कसा ही असो, पण व्यक्ती ला सोडण्याआधी त्याची इतकी तर काळजी घ्यावी की तो चुकीचा मार्गावर गेला नाही पाहिजे....

४. चूक की बरोबर मार्ग कुठला पकडायचा हे नेहमी आपल्यावर असत, म्हणून आपण जे करू त्याचे जीमेदर आपण स्वतः असतो...

५. कधीही आपल्या आस पास च्या परिसरात लहान मुलं खेळत असतील तर लक्ष द्या, कुठे काही चुकीचं दिसेल तर पटकन विचारा.... आपला एक पाऊल कोणाचा जीव वाचवू शकतो.....

धन्यवाद.....!

― हर्षद मॉलिश्री ―

इथं ही कथा संपत आहे, पण एक नवीन कथा लवकरचं येत आहे..... "जर ती असती "