सांन्य... भाग १ Harshad Molishree द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

सांन्य... भाग १

" ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्ती सोबत काही संबंध नाही, संबंध आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा..ही कथा फक्त मनोरंजन साठी आहे "......

― धन्यवाद ―

अध्याय पहिला..... "पत्र"

ठक.... ठक, एक माणूस हातात कोयता घेऊन मटण कापत होता, पण कोणाच ????

" सांन्य "..... Born on saturday

सोमवार ७ जानेवारी २०१९ ,मुंबई

सकाळ चे १० वाजले होते, कामिनी ने घराच दार उघडल, दाराच्या समोरच एक कव्हर पडल होत. तिने सहज ते कव्हर उचलुन बघीतलं.. त्यावर कोणाचाही नाव पत्ता दिलेला नव्हता.कामिनी ने कव्हर वरून फाडल आणि त्यातून पत्र काढल.....

पत्र वाचताच कामिनी चे हाथ पाय गारठले, भीती मुळे अंगात काटे उठु लागले,, ती धावत घरामध्ये निघून गेली आणि नवऱ्याला फोन करण्यासाठी जशी ती मोबाईल जवळ आली तेवढ्यात फोन ची रिंग वाजली..... फोन तिच्या नवऱ्याचाच होता...

" कामिनी, राहुल च्या शाळेतून फोन आला होता, त्यांनी आपल्याला लगेच शाळेत बोलवलं आहे, मी कामावरून निघालोय पोहचतो घरी "..... विजय

कामिनी हे ऐकून अजून घाबरली..... विजय घरी आला, बघतोय तर कामिनी समोर बसून रडत होती,

"कामिनी काय झालं रडतेस का, कामिनी बोल काय तरी काय झालं".....

कामिनीने हातातलं पत्र विजय ला दिलं...आणि मोठमोठयाने रडू लागली..

विजय ने पत्र वाचलं, पत्र वाचून त्याला धक्का बसला , पुढे काय बोलावं त्याला बिलकुल सुचत नव्हतं.....

तेवड्यात त्याच्या घरी पोलीसांची गाडी आली.. पोलीस उतरून आतमध्ये आले..

"हॅलो, मी इन्स्पेक्टर अजिंक्य खरात, तुमच्या मुलाची missing complaint त्याच्या शाळेतल्या अध्यापकानी केली आहे मी त्या साठीच इथे आलो आहे".....
तुम्हाला शाळेत बोलवलं होतं, पण कोणीच आलं नाही म्हणून मी स्वतःच आलो, जाऊद्या, राहुल बद्दल थोडं विचारायचं होतं"......
विजय ने काहीच उत्तर दिलं नाही तो तसाच शांत उभा होता....

अजिंक्य ने विजय आणि कामिनीला नीट बघितलं, त्यांना बघून त्याला खात्री झाली की नक्कीच काय तरी गडबड आहे....

"तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलाला लवकरच आम्ही शोधून काढू".... अजिंक्य

विजय काहीच बोलला नाही, त्याने फक्त ते पत्र इन्स्पेक्टर च्या हातात दिल, अजिंक्य आश्चर्यात पडला, त्याने पत्र वाचायला घेतलं....

राहुल, वय १० वर्ष रंग सावळा

तुमचा मुलगा, सॉरी पण मी त्याला कापून खाऊन टाकलं, खूप भूक लागली होती मला आणि खरच त्याचं मटण खूप स्वादिष्ट होतं, मस्त मेजवानी झाली, मसाले वगैरे टाकून शिजवल पण ना यार शिजायला खूप वेळ लागला, पण जेव्हा मी टेस्ट केलं ना तर मग काय सांगू की किती आनंद झालं, मज्जा आली मस्त.......

" सांन्य "...

पत्र वाचून स्वतः इन्स्पेक्टर चे अंगाला काटे उठले.....

पोलीस राहुलच्या आई बाबांना घेऊन पोलीस ठाण्यात गेली, तसेच शाळेतल्या लोकांना ही बोलावून घेतलं....

"राहुल कुठून आणि किती वाजता हरवला"..... अजिंक्य

"सर मी सुनील राहुलचा शिक्षक मी तेव्हा तिथेच होतो, सर मी रात्री हजेरी घेतली तेव्हा सगली मुलं तिथेच होती. नंतर सगळी मुलं आपआपल्या टेंट मध्ये जाऊन झोपली.प्रत्येक टेंट मध्ये चार चार मुलांचा ग्रुप होता सर.. सकाळी जेव्हा मी हजेरी घेतली तेव्हा राहुल नव्हता सर"....

"म्हणजे तो सकाळ पासून गायब आहे".... अजिंक्य

"तुम्ही लोक ५० मुलांना पिकनिक ला घेऊन गेले मग त्यांची काळजी नीट घेता आली नाही का????"... पोलीस

"सर आम्ही १०, १० मुलांचा ग्रुप केला होता आणि प्रत्येक ग्रुप ला एक शिक्षकमॉनिटर करत होता, पण माहीत नाही कसं राहुल गायब झाला, सर प्रत्येक वर्षी आम्ही मुलांना अलिबाग ला घेऊन जातो, with due permission to there parents सर"..... शाळेतील अध्यापक

'Permission, permission my foot, राहुल जिवंत आहे कीं नाही ते पण सांगू नाही शकत आपण, त्याच्या घरी आज सकाळीच हा पत्र आल आहे, ज्यात असं लिहलं आहे की त्याला मारून टाकलं.... त्याचे आई बाबा बाहेर बसले आहेत काय सांगू मी त्यांना???".... अजिंक्य

हे ऐकून सगळे शांत झाले, नुसतीच एक missing report हत्येच्या केस मध्ये पलटली....

तेवद्यात राहुल चे बाबा आत आले..... "सर माझा मुलगा, सर असु शकतं की हे पत्र खोटं आहे, कोणी तरी असच लिहून पाठवलं असेल, सर तुम्ही शोधा ना काय तरी करा ना सर".... विजय रडत होता, मुलाला गमावण्याच दुःख त्याच्या बोलण्यावरून कळत होतं...,
"तुम्ही आधी शांत व्हा मला सांगा, तुमची कोणाबरोबर काही दुश्मनी आहे का...??? किंवा कोणावर तुम्हाला संशय आहे का..??? अजिंक्य

"नाही सर बिलकुल नाही"..... विजय ने पटकन उत्तर दिलं

पोलीसानी वेळ न घालवता कारवाई सुरू केली, अलिबाग चा रेवदांडा बीच जिथं पिकनिक ला ते लोक गेले होते पूर्ण शोधून काढला पण काहीच भेटलं नाही.....

सोबत गेलेले बाकीचे ४९ मूल मुली आणि त्यांचे चारी शिक्षकांसोबत विचारपूस केल्या नंतर सुदधा पोलीसंच्या हाती काहीच लागलं नाही....
तेवढच नव्हे पण पत्रावर सुद्धा राहुल चे आई बाबा आणि इंस्पेक्टर अजिंक्य चे सोडून कोणाचे finger print नाही भेटले..

पोलीसानी केलेली सगळी मेहनत वाया जात होती, त्यांना कुठलाच सुगाव लागत नव्हता राहुल बद्दल, किंवा आता पर्यंत हेही सांगणं कठीण होतं की राहुल खरच मेला आहे की जिवंत आहे.....

ही बातमी मीडिया, रेडिओ वर सगळी कळे आगी सारखी पसरली, एक १० वर्षाच्या मुलाला कोणी कापून खाल्लं ही बातमी ऐकून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली, नेमकं कोण असेल ज्यांनी असलं विचित्र काम केलं.....

राहुल चे आई बाबा अजिबात काही बोलण्या किंवा समजण्याचा अवस्थेमध्ये नव्हतें, राहुल ची आई कामिनी ला अजूनही हे खरं वाटत नव्हतं ती अजून राहुल ची वाट पाहत होती....

हे प्रकरण होऊन चार दिवस झाले पण राहुलचा काहीच पत्ता लागला नाही, ह्या केस ला गंभीरता पूर्वक घेऊन एक स्पेशल पुलिस ऑफीसर ला अप्पोइन्ट केलं..... इंस्पेक्टर शुभम कडवईकर (ऐ. सी .पी)

शुभम ने येताच नव्याने सगळी कारवाई सुरू केली, शाळेत जाऊन विचारपुस केली, व प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन त्याने विचारपुस केली पण एका कडून पण शुभम ला पुरेशी अशी माहिती ऐकायला भेटली नाही..ज्याने तो राहुल पर्यंत पोहचू शकणार होता..

बघता बघता १ अठवडा झाला पण काहीच हाती लागलं नाही.

"कमाल आहे यार ऐकोण पन्नास मुलं चार शिक्षक पण कोणालाच माहीत नाही की मुलगा कुठे गेला, कोणी बघितलं पण नाही, तिथे राहणाऱ्या माणसांना सुदधा काहीच ठाऊक नाही, आणि प्रश्न हा आहे की राहुलच का फक्त".....??? शुभम रागात त्याच्या सोबत काम करणाऱ्या पोलिसांना बोलला.....

सोडणार नाही मी त्याला तो कोण पण असो, फक्त या विचारानेच भीती वाटते, तो पत्र वाचूनच अंगात काटे उठतात, मग असं कोणी केलं असेल"..… शुभम

"सर हा जो कोण आहे तो सायकॉ आहे, नाहीतर असलं विचित्र काम कोण करणार???..... पोलिस मित्र

"काही तरी लिंक असेल ना, anything यार, मला असं वाटत की काय तरी सूटतय, कुठे तरी आपण चुकतोय"..... शुभम

शुभम पोलीस ठान्यात त्याच्या पोलीस मित्रांसोबत राहुल च्या case वर चर्चा करत होता, तेच दुसरी कडे........

सोमवार १४ जनवरी २०१९ मुबई.....

प्रदीप ऑफिसला निघालाच होता तेव्हा त्याला घरच्या gate वर एक कव्हर अडकलेलं दिसलं.....

प्रदीप ने तो कव्हर फाडलं आणि आतून एक पत्र काढल......

----------------------------------------------------- To Be Continued ---------------------------------------------------------------------


रेट करा आणि टिप्पणी द्या

GAVTHI RADE गावठी राडे

GAVTHI RADE गावठी राडे 1 महिना पूर्वी

सर स्टोरी एकदम भारी आहे, अंगावर काटा आला

Priyanka

Priyanka 2 वर्ष पूर्वी

Mansi Tatkare

Mansi Tatkare 3 वर्ष पूर्वी

Janhvi

Janhvi 3 वर्ष पूर्वी

Maneesha Baraskar

Maneesha Baraskar 3 वर्ष पूर्वी