सांन्य... भाग ५ Harshad Molishree द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • जर ती असती - 1

    असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून ज...

  • नियती - भाग 33

    भाग 33इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे प...

  • वाटमार्गी

    वाटमार्गी       शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट...

  • परीवर्तन

    परिवर्तन राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भरत्ला होता. शत्रू...

  • स्कायलॅब पडली

    स्कायलॅब पडली                           त्यावर्षी ११ जुनला श...

श्रेणी
शेयर करा

सांन्य... भाग ५

अध्याय तिसरा... ओळख

शुभम पटकन जाऊन गाडीत बसला आणि घरातून निघाला, राजश्री त्याला मागून हाक मारत होती पण शुभम ने काही ऐकलं नाही...
गाडी चालवताना शुभम ने अजिंक्य ला फोन केला.…..

"अजिंक्य माझा personal नंबर वर शेवटचा फोन कोणाचा होता त्याची डिटेल मला हवी आहे, पटकन मला exact लोकेशन सेंड कर आणि तू पण पोच तिथं"..... शुभम

शुभम ने एवढं सांगून फोन ठेवला, थोड्याच वेळात अजिंक्यचा मेसेज आला, त्याने लोकेशन पाटवली होती, शुभम पटकन तिथं पोचला पण तिथं कोण नव्हता.....

तेव्हाच अजिंक्य तिथं आला..... "सर काय झालं, इतक्या urgent बोलवलं, तो नंबर त्या किलरचा आहे का".....??? अजिंक्य

"हो अजिंक्य, ज्या माणसाला आपण इतक्या दिवसापासून शोधतोय, च्या मारी आज त्यांनी स्वतःहून कॉल केला होता, वरतून मला challnge केला त्याने, त्याच्या तर आईचा"....????

"सर मी त्या नंबर ची पूर्ण डिटेल्स काढायला लावली आहे, तो फोन शेवट याच लोकेशन ला होता मग deactivate झाला इथंच, सर आपण स्टेशन ला पोचू ते पर्यंत आपल्याला डिटेल्स मिळून जातील"...

"अजिंक्य आधी इथं search टीम लाव..... बघ इथून आपल्याला काय भेटत का".... ???? शुभम

"हो सर मी करतो"..... अजिंक्य

अजिंक्य आणि शुभम स्टेशन ला आले, संध्याकाळ झाली search टीम पण परत आली काहीच सुरावा भेटला नाही, पण तेव्हाच सिम कार्ड ची डिटेल्स आली......

अजिंक्य ते बघून शॉक झाला, अजिंक्य ला अस बघून शुभम ने विचारलं

"काय झालं अजिंक्य, तुझा चेहरा का असा".... म्हणत शुभम ने डिटेल्स बघितली आणि ते बघताच स्वता शुभम ला पण मोठा धक्का बसला....

"अजिंक्य हे कसं शक्य आहे.... मी म्हणजे, अरे माझ्या नावावर कसं काय हा सिम"..... शुभम

"सर आयडिया नाही पण डिटेल्स च्या हिशोबाने तर हे खरंच आहे".... अजिंक्य

शुभम ला काहीच सुचत नव्हतं की नेमकं काय करावं, शेवटी अजिंक्य ने आग्रह केल्या मुले तो घरी आला, रात्र झाली होती शुभम खूप थकला होता, घरी पोचताच तो कोणाशी बोलला नाही, आणि जाऊन झोपला....

सकाळ झाली.... बुधवार २३ जनवरी २०१९

शुभम सकाळ होताच स्टेशन ला आला.....

"अजिंक्य काय update"..... शुभम

"सर simcard ज्या दुकानातून विकला गेला आहे त्याच्या पत्ता लागला पम नेमका कोणी घेतलं ते नाही माहीत, सर आणि अजून हे ही clear नाही झाला की तुमचा नावावर त्याने हा सिम घेतला कसा".… अजिंक्य

"अजिंक्य आज बुधवार आहे, शनिवार पर्यंत मला त्याला काहीही करून पकडायचा आहे".....

"हो सर"....

अजिंक्य salute करून बाहेर जात होता, तेव्हाच....

"अजिंक्य थांब.... वहिनी कशी आहे आता"..???

"आहे सर ठीक आहे आता, सारखा मुलाला आठवत असते, सध्या मी तिला तिच्या आई कडे ठेवला आहे".... अजिंक्य

"अजिंक्य हवा तर सुट्टी घे".... शुभम

"नको सर, जो पर्यंत माझा मुलगा मला भेटत नाही मला सुट्टी नको सर"..... अजिंक्य

शुभम ने अजिंक्यला आश्वासन दिलं आणि शांत केला..... तेव्हाच

"May i come in सर"..... राणू

"अरे राणू.... ये ना" ..... शुभम

"ये ये बस्स"..... शुभम आणि राणू बसले

"शुभम... ऐकायला अस आला की काल तुला त्या किलर ने स्वता कॉल केला".... राणू

शुभम हे ऐकून राणू कडे बघायला लागला....

"राणू, बघ पर्सनल life एकाबाजूला आणि professional life एका बाजूला, बघ हा केस खूप sensitive आणि important आहे, आधीच मीडिया मध्ये खूप चर्चेत आहे, i don't want to leak any single detail about this case so please"... शुभम

"Oook ooook, पण तू चिडतोय का शुभम, मी जस्ट नॉर्मली विचारलं आणि मी इथं तुझी मैत्रीण बनून आली आहे रिपोर्टर बनून नाही so please".... राणू

"बरं, चहा पिशील".... शुभम ने शांत होऊन विचारलं

"शुभम त्याने तुला खरच फोन केला होता"....???

शुभम ने थोडा विचार केला आणि मग बोलला..... "हो केला होता"....

"शुभम तुला एक सांगू का"....???? राणू

"हा बोलना".... शुभम

"हा जो कोण आहे ना त्याच्या उद्देश्य लपून राहण्यात किंवा फक्त मुलांचा अपहरण करून त्यांना मारून खाण्याच्या नाही आहे, he wants to give a message to all त्याला बहुतेक लोकांपर्यत काही तरी पोचवायचं आहे"..... राणू

"तुला म्हणायचं काय आहे"..... शुभम

"हे बघ तुला समजून जाईल"..... राणू ने तिच्या पाकिटातून एक पत्र काडून शुभम ला दिला.....

शुभम ने पत्र घेतला आणि उघडून वाचला.....

नमस्कार मॅडम....

लहानपणी शाळेत पत्र लेखन स्पर्धा मध्ये मला कधी पुरस्कार नाही भेटीला, म्हणून मी आता सारखं पत्र लिहून माझ्या आवडत्या लोकांना पाठवतो, काय माहीत कोणाला माझा पत्र आवडला तर खुश होऊन तो मला पुरस्कार पण देईल.... मग आता तुम्ही सांगणार की मी तुम्हाला पत्र का पाठवला, तुम्ही मला कशे आवडतात, तर सोपं आहे तुम्हाला जो आवडतो तो मला पण आवडतो yess right..... तोच ज्याचा विचार तुमचा मनात आला आता, काल मी स्वतः बोलो त्यांच्याशी पण आता पर्यंत त्यांनी हे शोधून काढला असेल की सिम कोणाचा होता कुटून घेतला वेगेरे वगैरे, हा परत त्याला मी फोन किंवा contact केला असता पण माझा ego मॅडम ego..... ego hurt होईल, आता तो समोरून माझ्याशी contact करत नाही ते पर्यंत मी समोर येणार नाही.... म्हणून तुम्हाला पत्र लहिलं मी हे कळवायला की आज फक्त बुधवार आहे, पण सोमवार चा माझं प्लान ठरलं आहे, मग तुमचा काय प्लॅन आहे.....????

" सांन्य ".....

पत्र वाचतात शुभम चा रागाचा पारा खूप चढला होता, रागाने लालपिवडा झाला तो....

"म्हणून मी इथं आली शुभम, आणि हवं असत तर मी हे पत्र माझ्या ऑफिस मध्ये देऊ शकली असती, पण सध्या मला हे तुला देणं जास्त important वाटलं".....

शुभम ने प्रेमाने राणू सोमोर बघितलं आणि बोलला.... "सॉरी आणि धन्यवाद"..... !

"शुभम ह्याला नक्की हवं काय आहे".....???

"हेच तर समजत नाहीये राणू , ह्याला जर हवं असलं असत तर हा फक्त अपहरण करून गप बसला असता, कोणाला कळलं नसतं पण हा अस पत्र लिहून लोकांना काय सांगायच्या प्रयत्न करतोय"..... ????

"मला एक सांग शुभम, तू हे नाव नीट वाचलं जे पत्र मध्ये लिहलं आहे ते"..... राणू

"काय सांन्य".... शुभम

"हो, तुला ते थोडं विचित्र नाही वाटलं".….

"वाटलं तर पण त्याच्याने काय फायदा आहे".....

"शुभम सांन्य नाव नाहीये, पण आपल्या हिंदू धर्मात शनिवारी जर मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तर त्याला संस्कृत मध्ये आपण सांन्य अस म्हणू शकतो.... It means Born on Saturday"..... राणू

"बहुतेक ह्या नवा मागे काय तरी आहे, बहुतेक त्याला पकडण्याच्या लिंक इथूनच भेटेल, शुभम तो ह्यां नावाने पत्र पटवतोय आणि अपहरण फक्त सोमवारी करतो म्हणजे काय तरी एक लिंक आहे जी आपल्याला भेटत नाहीये"..... राणू

"Exactly राणू..... शनिवार आठवड्यातला शेवटचा working दिवस आणि सोमवार पहिला दिवस".... शुभम

"शुभम ह्यात काय तरी लिंक आहे, बघ तू थोडं डोकं लाव".....

शुभम ह्या संगळ्यांचा विचार करत होता आणि मग त्यानी अजिंक्य ला हाक मारली, अजिंक्य आता आला....

"हो सर बोला".... अजिंक्य

"अजिंक्य मला सांग तुझा मुलाचा जन्म कधी झाला होता, i mean कुटचा वार होता त्या दिवशी".....

अजिंक्य ने थोडा विचार केला मग बोलला... "सर बहुतेक शनिवार होता".....

हे ऐकताच शुभम राणू समोर बघायला लागला आणि राणू शुभम समोर.....

"अजिंक्य एक काम कर मला एक complete रिपोर्ट हवी आहे, जितके पण मुलं गायब आहेत त्यांची जन्माची पूर्ण डिटेल्स मला हवी आहे, तारिक वेळ ठिकाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं वार, त्यांचा जन्म कुठला वारी झाला आहे ते".....

"Oooook सर"....

अजिंक्य पटकन शुभम ने दिलेला काम पूर्ण करण्याचा मागे लागला.....
२ दिवस लागले, अजिंक्या ने खुप मेहनत केली, गायब झालेल्या सगळ्या मुलांचा घरी जाऊन त्यानी हवी ती माहिती घेतली आणि मग एक रिपोर्ट तयार केली...

२५ जनवरी २०१९ शुक्रवार....

पुढचा सोमवार जवळच होता, पण राणू ला भेटलेल्या पत्र नंतर परत काहीच हाल चाल दिसत नव्हती, सगळं शांत झालं होतं असं वाटत होतं काय तरी होणार आहे पण नेमकं काय.... ????

शुभम ने ती रिपोर्ट बघितली.... रिपोर्ट च्या हिशेबाने २४ पैकी फक्त ९ मुलं अशे होते ज्यांचा जन्म शनिवारी झाला होता, हे बघून शुभम चा confidence खाली पडला, हातात आलेला एक सुरावा परत सुटला अस त्याला वाटत होतं....

शुभम विचार करत होता की पुढे काय करावं, तेव्हाच त्याला काय तरी सुचलं आणि तो अजिंक्यला बोलला....

"अजिंक्य मी चूक केली"..... शुभम

"काय सर, काय झालं"...… अजिंक्य

शुभम विचार करत होता सारखा बसून टेबल वर पेन ने टोचत होता, तेव्हाच एकदम त्याने पेन ची नोक तोडली आणि मग उठून बोलला....

"अजिंक्य गेल्या ३ महिन्यात शनिवारी i repeat शनिवारी जे लोकांना मेंटल हॉस्पिटल मधून, सुधार ग्रहातून आणि जेल मधून बैल किंवा सुट्टी मिळाली त्यांची लिस्ट हवी पटकन".... शुंभाम

"अजिंक्य वेळ कमी आहे"..... शुभम

"हो सर".... अजिंक्य

अजिंक्य आणि शुभम दोघ पण कामाला लागले, काम करत करत रात्र झाली, २ वाजून गेले पण शेवटी लिस्ट रेडी झाली.....

एकूण ८ लोक होते, शुभम ने त्यांची पूर्ण डिटेल्स काढली....
अजिंक्य प्रत्येका बद्दल सांगत होता.....

"सर मंगेश पवार.... १७ नोव्हेंबर २०१८ शांविवारी जेल मधून pay role वर बाहेर आला, पण सर पहिला अपहरण झाला त्या त्या आधीच त्याची त्याला परत जेल मध्ये टाकण्यात आलं, आणि आता हा आपल्या काय कामाचा नाही"....

"दुसरा अरुण मोरे... २४ नोव्हेंबर २०१९ शनिवारी जेल मधून कायमचा सुटला, सर हा हाल्फ मडर च्या केस मध्ये आत गेला होता आज सजा पूर्ण करून निघाला, सर वाटत नाही की हा असं काय करू शकतो"....

शुभम ने त्या ८ लोकांचे रेकॉर्ड्स हातात घेतले आणि पाहिले......

"अजिंक्य ह्यांच्या पैकी कोणी वाटत नाही"....

"हो सर"....

"पण एक आहे माझ्याकडे जो बहुतेक अशु शकतो"..... "अपूर्व रानाडे"...
सर नावाने खूप नॉर्मल वाटतो आणि तसा माणूस ही खूप नॉर्मल आहे, सर ८ डिसेंबर २०१८ शनिवारी हा सुधार ग्रहातून सुटला, सर आज पासून ८ वर्षा आधी त्याला त्याच्या ६ वर्षाचा मुलाच्या हत्ये चा आरोपात जेल मध्ये पुरण्यात आलं होतं, काही दिवस जेल मध्ये रहायला नंतर तो वेड्या सारखा वागू लागला, अस म्हणतात की त्याला त्याचा मुलगा दिसायचा आणि तो जेल मध्ये सगळ्यांसोबत त्याच्या मुलासाठी भांडायचा, त्याचे अशे लक्षण बघून त्याला सुधार गृहात टाकण्यात आलं आता गेल्या महिन्यात त्याला सोडलं आहे"..... अजिंक्य

"पण सर महत्वाची गोस्ट ही आहे की त्याला सोडल्यापासून तो रेग्युलर तपासणी साठी हॉस्पिटल मध्ये येत असतो, पण सुटल्यानंतर पासून तो एकटाच रहातो, तो ना कधी त्याच्या आईला भेटायला गेला ना त्याच्या बायकोला".... अजिंक्य

"का भेटायला का गेला नाही हा".... शुभम

"आईला का भेटायला गेला ते माहीत नाही सर पण तसं अपूर्व वर केस करणारी त्याची बायको होती".....

हे सगळं ऐकून शुभम विचारात पडला आणि तो मनातच बोलला..... "अपूर्व , सांन्य" ?????..….

--------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------------------