सांन्य... भाग ६ Harshad Molishree द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सांन्य... भाग ६

शुभम ने अपूर्व बद्दल ची सगळी माहिती नीट ऐकून घेतली आणि मग शुभम बोलला...

"अजिंक्य हा आपला आता पर्यंत चा पहिला suspect आहे, जे पर्यंत खात्री होत नाही आपण त्याला पकडू शकत नाही"....

"सर exactly"....

"एक काम करा अपूर्ववर नजर राखा, किती वाजता उठतो कुठे जातो सगळी माहिती काळा"....

"Oook सर"....

त्यांचं discussion होई पर्यंत सकाळ झाली, शुभम आणि अजिंक्य बाहेर चहा पिट होते तेव्हाच राणू आली....

"Hiii... शुभम, hiii अजिंक्य कसा आहेस, आणि वहिनी कश्या आहेत आता".... राणू

"ठीक आहेत एक दम"... अजिंक्य

शुभम राणू आणि अजिंक्य तिघे पण गप्पा मारत होते, तेव्हाच अजिंक्य ला कोणाच्यातरी फोन आला म्हणून तो बाजूला गेला तेव्हाच राणू ने विचारलं....

"शुभम काही update... आज गुरुवार आहे, माहीत ना का पण वादळ यायच्या आधीची शांतता वाटते ही मला, अस वाटतंय की काय तरी होणार आहे".... राणू

"एक खरं सांगू तर भीती माझ्या मनात पण आहे but lets see, hope for the best".... शुभम

तेव्हाच अजिंक्य आला, " सर लिंक भेटली".... अजिंक्य

"चल मग वाट काय बघतोय".... शुभम

"राणू sorry but emergency आहे, I'll catch you later"... शुभम

शुभम अस म्हणत पटकन तिथून निघाला, शुभम अजिंक्य आणि त्याच्या टिमला घेऊन स्टेशन वरून निघाला....

"सर अपूर्व ची बायको कुठे रहाते त्याचा पत्ता लागला आहे, कळवा ला रहाते सर ती, अपूर्व जेल मध्ये गेल्या नंतर पासून ती तिथं एकटीच रहाते , एक Care to child नावाचा N.G.O मध्ये काम करते, सावरकर ने माहिती काढली आहे आता ती आपल्याला घरीच भेटेल".... अजिंक्य

शुभम अपूर्व च्या बायकोच्या घरी पोहचला, अजिंक्य ने बेल वाजवली, तेच तिने दार उघडला, समोर पोलिसांना बघून ती घाबरली....

"सर काय झालं".... अपूर्व ची बायको (अंजली रानाडे)

"घाबरू नका, बस्स थोडी सी माहिती हवी तेवढच, आत येऊ शकतो का आम्ही".... शुभम

"हो याना सर"....

अजिंक्य आणि शुभम आत आले, दोघ येऊन बसले....

"मी पाणी आणते सर".... अंजली

शुभम आणि अजिंक्य ने बसून सावकाश पाणी पिलं.....

तेव्हाच अंजली ने विचारलं.... "सर काय माहिती हवी"

"तुम्ही अंजली रानाडे ना".... अजिंक्य

"हो सर".... अंजली

"सो Mrs. रानाडे आम्हाला अपूर्व रानाडे बदल माहिती हवी आहे".... अजिंक्य

"अच्छा, मग म तुम्ही इथं का आले सर, जेल मध्ये जाऊन चौकशी करा आणि तसही माझा त्या माणसासोबत काहीच संबंध नाही आहे"..... अंजली

"तुम्हाला खरच माहीत नाही"....???? अजिंक्य

"म्हणजे".... ??? अंजली

"म्हणजे की अपूर्व जेल मधून सुटला, एक महिना झाला त्याला बाहेर येऊन".... शुभम

"मग तर चांगला आहे, त्यालाच जाऊन भेटा जी माहिती हवी ती त्याला विचारा".... अंजली

"बघा Mrs. रानाडे आम्हाला अशी शंका आहे की मुंबई मध्ये होणाऱ्या अपहरण च्या मागे तुमचा नवऱ्याचा हाथ आहे, so please co operate करा"....अजिंक्य

हे ऐकताच अंजली ला धक्का बसला, अंजली रडायला लागली....

"बघा हे रडायचा time नाहीये, तुम्हाला काही काय माहीत असेल अपूर्व बदल तर सांगा, बघा असही अशु शकतं की आमचं काय चुकतंय, जस आम्ही म्हटलं की आम्हाला शंका आहे पण तरी, सध्या prime suspect अपूर्व आहे".... शुभम

"करू शकतो सर अपूर्व, जर स्वतःच्या मुलालाचा अपहरण करताना काय वाटलं नाही त्याला तर दुसऱ्यांच्या मुलांबदल का काही वाटेल".... अंजली

"बघा हे आम्हला ही माहिती आहे की त्यांनी त्याच्या मुलाचं अपहरण केलं होतं, पण प्रश आहे की का.....???? काय गरज पडली त्याला अशी की त्यांनी असा पाऊल उचचला".... शुभम

अंजली ने तिचे डोळे पुसले, शांत होऊन पाणी पिलं आणि मग एक लांब श्वास घेतला.....

Love marraige होतं आमचं, कॉलेज च्या वेळ पासून त्याचे ते imagination , त्या कविता, शायरी अगदी त्याच्या त्या जगात मी हरवून जायची, कॉलेज संपल्या नंतर घरच्यांची परवानगी घेऊन आम्ही लग्न केलं, सगळं मस्त चालू होतं आयुष्यात काहीच कमी नव्हती पण एक दिवस मी अपूर्वला मी रात्री च्या वेळीस कोणसाबत तरी बोलताना ऐकला जेव्हा बेडरूम मधून बाहेर जाऊन मी पाहिलं तर तो एकटाच बडबड करत होता, जेव्हा मी विचारलं तर तो बोलला की तो माझा मित्र आहे पण त्या दिवसा नंतर सगळं बदललं, ज्या imaginary world मध्ये मला त्याच्या सोबत रहायला आवडायचं तेच imagination ने आता मला भीती वाटत होती, अपूर्व ला अशे लोक दिसायचे ज्यांचा काही अस्तित्व नाही आहे, तो रात्र रात्र भर त्यांच्या सोबत बोलायचं, एक दिवस मी त्याला डॉक्टर कळे घेऊन गेली, टेस्ट वगैरे केल्यानंतर हे कळलं की त्याला Bipolar disorder आहे, त्याची ट्रीटमेंट सुरू झाली,पण ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पासून तो खूप aggresive झाला, कधीच एकदम शांत होऊन जायचं तर कधी खूप बडबड करायचा तर कधी सेक्स साठी.....

अंजली बोलता बोलता रडायला लागली, सर मी खूप कंटाळली होती पण मग एक दिवस मला कळलं की मी प्रेग्नंट आहे आणि ते ऐकल्या नंतर पासून अपूर्वच्या हालत मध्ये पण सुधार येत होता, पण तेव्हाच एक दिवस.....

मला पाहिल्यांड्या असं पोटात फिल झालं की मला बळाने लात मारली, आणि मी खूप खुश होती....

"नालायक, बाबापा सारखा नको हौस तुझ्या, हम्मम लाट मारतो आईला".... अस म्हणत प्रेमाने मी पोटावर हलकासा फटका मारला पण नेमकं ते अपूर्व ने बघितलं....

"अंजली माझ्या मुलाला मारतेय तू"..... तो जोरात ओरडला माझ्यावर, मी त्याला समजवत राह्यली पण ते पर्यंत त्यांनी मला हाथावर इतक्या जोरात मारलं की माझा हात fracture झाला, माझी सहनशीलता चा धागा तुटला,मला बस झालं होतं सगळं आणि मी divorce घेऊन आई बाबा सोबत रहायला लागली....

जेव्हा साहिल चा जन्म झाला, अपूर्व आला होता त्याला बघायला, खूप खुश होता तो त्यानानंतर पासूम कोर्ट काढून त्या फक्त महिन्यातून एकदा साहिल ला भेटायची परवानगी भेटली होती आणि तो फक्त एकदाच साहिल ला भेटायचं महिन्यातून, साहिल ला खूप आवडायचं अपूर्व सोबत खेळणं बोलणं, तो एकांतर वाट बघायचा की कधी तो दिवस येईल जेव्हा मी पप्पा ला भेटेन, आता मलाही अस वाटत होतं की सगळं चांगलं चाललं आहे, भोतेक साहिल मुले मी आणि अपूर्व परत एक होऊ पण नाही नशिबात काय वेगळच होतं....

त्या दिवशी साहिल चा वाढदिवस होता आणि अपूर्व ला भेटण्याची तारिक पण, मी पण खूप खुश होती कारण की मी आज परत अपूर्व ला म्हणणार होती की सगळं विसरून एकत्र रहाऊया आणि एक नवीन सुरवात करूया, अपूर्व साहिल ला सोबत घेऊन गेला होता बाहेर तेव्हाच खबर आली की माझा साहिल....

अंजली खूप रडत होती....

साहिल रस्त्या वर पडला होता आणि अपूर्व चा काहीच पत्ता नव्हता, साहिल च्या मेळ्याच्या १ आठवड्या नंतर अपूर्व स्वता घरी आला, मला त्या माणसाचा थोबाड पण बगावसं वाटत नव्हतं, बाबांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस अपूर्व ला घेऊन गेली, त्याला गैरजवाबदारी आणि हत्या च्या आरोपात ७ वर्षाची सजा झाली....

शुभम ने अंजली ला आश्वासन देऊन शांत केलं.....

"ठीक आहे आम्ही निघतो, thanks for your coperation"..... शुभम

अजिंक्य आणि शुभम निघताच होते, तेव्हाच शुभम मागे फिरला आणि त्याने अंजलीला विचारलं...

"By the way Mrs. रानाडे तो कुठला दिवस होता जेव्हा अपूर्व साहिल ला भेटला, i mean कुठला वार होता, जर तुम्हाला आठवत असेल तर".... शुभम

"मला चांगलं आठवतं, त्या दिवशी साहिल चा वाढदिवस होता.... २९ डिसेंबर, शनिवार"..... अंजली

हे ऐकताच अजिंक्य शुभम समोर बघायला लागला....

"Oook Mrs. रानाडे thanks a lot"..... शुभम

अजिंक्य आणि शुभम तिथून निघाले स्टेशन साठी....

"सर हा तोच आहे".... अजिंक्य

शुभम ने काहीच उत्तर दिलं नाही....


इथं अपूर्व घरात बसला होता एकाबाजूला, हातात एक छोटा आरसा घेऊन तो आरसात बागून सारखा बोलत होता....

थप्पा..... ऐ ऐ ऐ.... थप्पा

आणि असं करत जोर जोरात हसायला लागला..... आणि मग एकदमच शांत होऊन बोलला

"कल्पनाशक्ती हीच खरी शक्ती आहे".....

--------------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------