Saany - 4 books and stories free download online pdf in Marathi

सांन्य... भाग ४

"एकाच वेळी २२ मुलांचं अपहरण, एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं ते पण एकाच वेळी कसं शक्य आहे हे"???....शुभम

"सर हा एकटा नाहीये, ह्याच्या सोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत"..... अजिंक्य

तेव्हाच पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस आला, हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता.....

शुभम ने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला....

"बोला काय झालं" ??..... शुभम

"सर खूप महत्त्वाचे बोलायचं होतं"...... तो माणूस

"हो बोला काय झालं".....?? शुभम

त्या माणसाने खिशातून पत्र काढल आणि ते शुभम ला दिल, शुभम पत्र बघताच शॉक झाला....

"सर अजून एक पत्र"......?? अजिंक्य पटकन बोलला

"नाही सर, माझं मुलगा घरी आहे त्याच्या अपहरण नाही झाल".... तो माणूस

हे ऐकताच अजिंक्य आणि शुभम चक्क नजरेने त्या माणसाकडे आशचऱ्याने बघायला लागले

"हो सर माझा मुलगा घरीच आहे, माझा मुलगा पण त्याच शाळेत आहे पण आज मी त्याला शाळेत पाठवलं नाही, पण जेव्हा सकाळी मी ही बातमी ऐकली तेव्हा मी पण घाबरलो, नशीब माझं की मी त्याला आज शाळेत पाठवलं नाही, पण मग मला ते न्युज मध्ये जे सांगत होते पत्र बद्दल ते आठवलं आणि मी पण घराच्या बाहेर येऊन सगळी कड़े बघितलं तेव्हा मला हे पत्र भेटल सर"....... तो माणूस

अजिंक्य आणि शुभम हे ऐकून एकमेकांकडे बघू लागले, शुभम ने ते पत्र त्या माणसाकडून घेतल.....

"धन्यवाद ! तुमच्या मदतीसाठी, आता तुम्ही घरी जा..गरज पडल्यास बोलवू आम्ही तुम्हाला"..... शुभम

शुभम ने मग ते पत्र वाचल... आणि मग अजिंक्य समोर बघू लागला

"अजिंक्य काय कळलं तुला, अपहरण करण्याच्या आधीच ह्याने बहुतेक काल रात्री सगळ्यांच्या घरी पत्र लिहून पाठवले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनी त्या मुलांचा अपहरण केलं, पण एक मुलगा राहून गेला".... शुभम

"सर म्हणजे त्याने आधी पासून हा प्लॅन केला होता".... अजिंक्य

"Exactly"..... शुभम

अजिंक्य आणि शुभम बोलत होते तेव्हाच, एक ऑफिसर आला...
सर ती बस आणि तो ड्राइवर सापडला गोरेगाव च्या इथं, अजून मुलांबद्दल काहीच पुरावा भेटला नाही आणि सर एक bad news आहे, ड्राइवर जिवंत नाही राहिला"......

शुभम हे ऐकताच अजिंक्यला घेऊन पटकन crime scene वर गेला, तिथं पोचताच शुभम ने बघितलं की ड्राइवर बस च्या इथून १० मीटर च्या अंतरावर पडला होता, त्या ड्राइवर च्या डोक्यावर लागलं होतं आणि खूप रक्त वाहून गेलं होतं.....

बस खाली होती, बस मध्ये कोण नव्हतं, शुभम ने आजूबाजूला सगळी कडे बघितलं पण मुलांचा काहीच पत्ता लागला नाहीं....

शुभम ने तो पूर्ण area seal करून टाकला आणि नाकाबंदी लागु केली.... मुंबई मध्ये सगळीकडे आधीच नाकाबंदी करून झाली होती

"अजिंक्य ह्या वेळीस तो आपल्या हातातून गेला नाही पाहिजे".... शुभम

पूर्ण दिवस निघून गेला आणि तशीच रात्र ही, शुभम काही सुरावा लागेल यासाठी पूर्ण रात्र स्टेशन मध्येच होता आणि अजिंक्य पण घरी गेला नाही शेवटी त्याच्या मुलगा पण बेपत्ता होता...

सकाळ झाली, एक हवालदार ने केबिन मध्ये येऊन शुभम ला उठवलं.....

"सर उठा सर सकाळ झाली"....

शुभम नुसतंच झोपेतून उठला होता तेव्हाच अजिंक्य वृत्तपत्र घेऊन आत आला.....

"सर हे बघा".....

शुभम ने वृत्तपत्र बघितला पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहलं होत....

"जेव्हा पोलीस आपल्याच मुलाला शंभाळू शकत नाही तर ते दुसऱ्या मुलांना कसं वाचवतील"....???

पुढे त्याच वृत्तपत्र मध्ये त्या ड्राइवरच्या मारण्याची बातमी ही होती....
तेव्हाच केबिनचा टेलिफोन वाजला....

शुभम ने फोन उचलला....

"ऐ सी पी शुभम कडवाईकर speaking".....

"Mr. ऐ सी पी.... काय चालला आहे, आधी एक मग परत एक आणि मग लॉटरी एक दम २२ मुलं आणि काहीच अता पता नाही किलर चा, आणि वरुन तो एक पोलीस वाल्याच्या मुलाला उचलून घेऊन गेला आणि तुम्ही काय करतंय बसून"....

"सर आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय".... शुभम

"शुभम मला आता प्रयत्न नकोय परिणाम हवा, दिल्ली वरून pressure येतोय, आधीच मीडिया चा खूप pressure आहे लवकर काय तरी कर नाहीतर ट्रान्सफर ऑर्डर साठी रेडी रहा"....

अस म्हणत सोमरून फोन कट झाला, शुभम ने रागात फोन ठेवला....
सर काय झालं???

"होम मिनिस्टर चा फोन होता, त्यांना वाटतं की आपण इथं बसून टाळ्या वाजवतोय, च्या मायला"... शुभम अगदी रागात बोलला

"ऐ सावरकर कसली बोंबाबोम आहे रे" ??.... शुभम ने हवालदार ला विचारलं

"सर बाहेर मीडिया वाले जमले आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, सकाळ पासून समजवतोय त्यांना पण कोण ऐकत नाहीये"..... हवालदार

"ह्यांच्या आईला असं कसं ऐकत नाही"..... शुभम रागात बाहेर गेला

"सर थांबा सर".... अजिंक्य आणि बाकी शुभम ला थांबवत त्याच्या मागे गेले

शुभम ला बघताच सगळ्यांनी प्रश्नांची एक मोठी माळ जणू शुभम च्या गळ्यात फेकली आणि शुभम एकदमच रागात ओरडला.....

"नाही भेटलं अजून काही, चालू आहे प्रयत्न हे बघताय ना".....
शुभम ने अजिंक्य समोर इशारा केला

"त्याच्या मुलगा पण गायब आहे, रात्र पासून इतःच आहे तो.... आणि तुम्ही लोक नुसतं मजेदार बातम्या साठी"....

"सर ते आमचं काम आहे, किलरला पकडू शकले नाही ह्याचा राग आमच्यावर का काढताय" ??.....रिपोर्ट मधली एक मुलगी बोलली

"कोण बोललं हे समोर येऊन बोल समोर येना"..... शुभम अगदी रागात बोलला

ती मुलगी समोर आली आणि बोलली

"सर नेहमी no comments बोलून उतर देणं टाळणं हे चांगलं आहे, आणि वरुन इथं मीडिया वर ओरडताय तुम्ही ,तुम्ही जे करताय ते तुमचं काम आहे आणि हे आमचं सो इतकं ओव्हर react का करताय".....???

शुभम त्या मुलीला बघून शांत झाला, एक क्षण बस तिला बघतच बसला..... आणि मग बोलला

"राणू तू.....??

"हो सर मी"..... शुभम

शुभम राणू चा हाथ पकडून तिला आत घेऊन आला.....

"शुभम काय करतोय बघताय सगळे"..... राणू

"ते जाऊदे पण तू इथं कशी काय आणि हे काय रिपोर्टर, वाटलं नव्हतं मला की परत भेटशील तू कधी"....???

"हां तुला तर असच वाटेल ना".... बोलताना राणू थोडा रागात बोलत होती

"बर जाऊदे सोड..... मग माधवी कशी आहे".... ??

"माधवी... ??? ती चांगली असेल पण मला का विचारते".... ??

"मग तुला नाहीतर कोणाला विचारू".....?? राणू

"तिच्या नवऱ्याला विचार".... शुभम

"सर ही घ्या चहा", एक हवालदार मधेच शुभमला चहा देऊन गेला....

"ऐक मॅडम साठी पण एक कप आन".... शुभम

"होय आणतो".... हवालदार

"तिच्या नवऱ्याला.... म्हणजे what do you mean, now just don't tell me break up झालं वैगेरे"..... राणू

"काय म्हणतेस, मला एक सांग तुम्हाला खरच वाटायचं का की माझं आणि तिचं काय चालू आहे".... शुभम

"मग काय नेहमी माधवी नुसतं शुभम शुभम करत बसायची, तू पण तर तिच्या मागे फिरत असायचास"....

"बघ मी तिला नेहमी as a मैत्रीणच treat केलं.... infact तुला तर माहीतच आहे की मी कॉलेज मध्ये सगळ्या मुलीन बरोबर friendly होतो"....

हो माहीत आहे..... पोरींचा लाडका"....

"काय काय म्हटलीस तू".....?? शुभम

"बर ते जाऊदे, on a serious note किलर बदल काही माहिती भेटली का"......?? राणू

"काहीच नाही, आणि काही सुचत पण नाहीये, आता पर्यंत २४ मुलांचं अपहरण झालाय, नेमकं कळत नाही की काय करू"....शुभम

"शुभम ह्या किलर ला सोडू नकोस होईल तेवढं लवकर पकड,काय मदत हवी तर मी आहे पण please"....

"हो राणू, सोडणार तर नाही त्याला"....

"बर चल घरी, आलीच आहेस तर माझ्या बायको ला भेटून जा"....

"नको शुभम नंतर कधी"....

"नंतर ला खूप अंतर असत गं चल माझ्या मुलाला पण बघून घे".... शुभम

राणू हे ऐकून शॉक झाली.... "seriuosly means मुलगा पण झाला, जाम fast आहेस यार तू आणि मला सांगितलं पण नाहीस ना तू".... राणू

"तुला सांगायला होतीस का तू जागेवर, ना कधी फोन मेसेज काहीच नाही, तुझा नंबर पण नव्हता कसं कळवू तुला"....?? शुभम

शुभम बोलता बोलता राणू ला गाडी जवळ घेऊन गेला, दोघे गाडीत बसले आणि घरी आले.....

घरी येताच जसा राजश्री ने दार उघडला..... "शुभू काय आहे हे, रात्र भर घरी आला नाही, वरुन फोन बंद करून बसला होता"..... तेवढयात राजश्रीच राणू वर लक्ष गेल आणि ती शांत झाली

"अग माझी राणी आधी बघ तर सोबत कोण आलाय"..... शुभम

राजश्री थोडी लाजली आणि मग राणू ला म्हणाली.... "उममम सॉरी माझं लक्ष नव्हतं"....

"Its oook"..... राणू

शुभम ने दोघींची ओळख करून दिली, शुभम आणि राणू येऊन बसले.....

"मी चहा घेऊन येते"..... राजश्री

"शुभम यार वाह म्हणजे तू खरच राजश्री सोबत लग्न केलंस, हीच ना तुझी प्रीती जिच्या मागे लागला होता"....

"हो हीच".... राजश्री ने जाताना हे ऐकलं

"वाह ग्रेट, बर मुलगा कुठे आहे तुझा"...??

"हम्मम आता तो शाळेत गेला असेल"....

"म्हणजे तो एवढा मोठा झाला की शाळेत जाऊ लागला"....

"हो मग ६ वर्षांचा आहे तो, अमर नाव आहे त्याचा हा बघ त्याचा फोटो"..... शुभम ने अमर चा फोटो राणू ला दाखवला

राजश्री चहा घेऊन आली, तिघांनी एकत्र चहा पिला आणि भरपूर गप्पा मारल्या

"चल मग शुभम मी निघते"....

"थांब मी येतो सोडायला तुला"....

"नको नको दमला आहेस, तू खूप रात्र भर घरी पण नव्हता आला, आराम कर मी जाते"....

"अरे येतो की मी".... शुभम

"अहो ती जाते म्हणतेय ना मग कशाला एवढं force करताय, म्हणजे तुम्ही पण आराम करा ना"... राजश्री

"हो शुभम रेस्ट कर तू मी जाते"..... राणू

"बार ठीक आहे चल बाहेर सोडून येतो".....

शुभम राणू ला सोडून आला, परत घराच्या आत येतच होता की त्याचा फोन वाजला.....

शुभम ने फोन बघितला..... "हा कुणाचा नंबर आहे"....??

तेवढयात राजश्री ने शुभम ला हाक मारली "शुभम चल थोडं झोपून घे"....

"हो थांब आलो".... म्हणत शुभम ने फोन उचलला

"हॅलो"..... शुभम

समोरून कोणाचं काही बोलत नव्हतं.... एकदम शांतता

शुभम पण शांत झाला..... काहीच बोलला नाही तेव्हाच समोरून आवाज आला

"सांन्य"....

हे ऐकताच शुभम शॉक झाला, ज्या किलरला तो शोधतोय त्याने स्वताने समोरून फोन केला....

"बोल"….. शुभम अगदी रुबाबदार आवाज मध्ये बोलला

"अरे तुम्ही तर खूप नॉर्मल बोलताय, मला वाटलं हिरो सारखा थोडा dialouge वगैरे माराल.. पण काय पूर्ण मज्जाच गेली"..... किलर

"ज्या दिवशी तुला मी पकडेन ना तेव्हा दाखवतो तुला खरी मज्जा काय असते".... शुभम

"अहो सर..... रहाउद्या घाबरलो मी घाबरलो ! ... तो किलर फोन वर अस म्हणत हसायला लागले मोठमोत्याने

"हस कुत्र्या हस ज्या दिवशी समोर येईल ना मी, रडता पण नाही येणार तुला"...

"सर सध्या तर तुमची रडायची पाळी आली आहे"....

"असं किती दिवस अजून लपून राहशील"....

"सर लापायचं असतं तर मी फोन का केला असता तुम्हाला, माझी तर इच्छा आहे की तुम्ही पकडा मला, काय आहे की तुमचावर ना मला जास्तच विश्वास आहे, तुम्ही जस तुमचा मुलाला संभाळताय ना तस हे बाकी चे लोक करत नाही सर, आई वडील असूनही नीट काळजी घेत नाही आणि म्हणून मग मी".....????? त्यांनी वाक्य पूर्ण केला नाही आणि मोठं मोठयाने हसायला लागला....

"म्हणून तू त्यांना उचलून घेऊन गेलास, अपहरण केलस त्यांचा त्यानं मारलं"..... हे बोलता बोलता शुभम ची बोबडी वळली

"नाही सर तसही ते मरणार होते, मी त्यांना मारल मग काय चुकीचं केलं का".... ???? किलर

"तुझी चुकी.... तू एकदा समोर ये फक्त मग दाखवतो तुला"..... शुभम अगदी रागात बोलला

"सर, मी ना वाघ आहे माझ्या मर्जी शिवाय शिकार करत नाही आणि गुफामधून बाहेर पडत पण नाही".... किलर

""कसला वाघ साल्या कुत्रा आहेस तू , कुत्रा ज्याला भुंकता येतं फक्त"....

"बर कुत्रा तर कुत्रा, पण समजून घ्या की आता हा कुत्रा पिसाळला आहे आणि आता जे मी चावणार ते तुम्हाला झेपणार नाही".....

एवढं म्हणत त्या किलर ने फोन ठेवून दिला.....

-------------------------------------------------------------- To Be Continued ------------------------------------------------------------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED