Saany - 8 books and stories free download online pdf in Marathi

सांन्य... भाग ८

शुभम ला काहीच कळत नव्हतं की काय चालय....

"सर जर अपूर्व किलर आहे तर मग आता अपहरण कोणी केलं, अपूर्व तर आपल्या समोर होता"..... अजिंक्य

"तेच तर कळत नाहीये अजिंक्य हे झालं कसं".... शुभम

शुभम च्या मनात हा विचार सारखा रमत होता पण आधी ते लोक घटनास्थळी पोचले...

तिथं जाऊन अजिंक्य ने मुलाच्या आई वडिलांसोबत विचारपूस केली आणि पुढे ही हवी ते माहिती जमा केली...

"तुमचा मुलगा अखिल, तो हॉस्टेल मध्ये रहातो ना".... शुभम

"हो सर आणि काय माहित हे सगळं कसं झालं"... निखिल शर्मा रडत रडत म्हणाला

"सर मी हॉस्टेल मधून माहिती काढली, त्यांचं म्हणणं आहे की, शूरकवारी सकाळी निखिल ने स्वता त्याच्या मुलाला आणण्यासाठी गाडी पाठवली होती".... अजिंक्य

"सर पण मी गाडी पटवलीच नाही, मी का गाडी पाठवेल, सर सकाळी सकाळी १०.३० च्या सुमारे डब्बा वाला डब्बा घेऊन आला, मी त्याला विचारलं की इतक्या सकाळी डब्बा कोणी पाठवलं, तर तो बोलला की उजवल शर्मा ने, सर उजवल शर्मा आमचे जवळचे नातेवाईक आहे.... इथं मुंबई मध्येच रहातात, मला वाटलं की पाठवलं असेल, मी डब्बा उघडून टेस्ट केलं पण मला कुठे माहीत होतं की मी आपल्याच मुलाचं".... निखिल रडायला लागला जोरात

"सर जेवण शिळं होत, अगदी वास सुटली होती म्हणून मी बायको ला म्हटलं की फेकून दे भोतेक बिगडलं असेल जाऊदेत पण जेव्हा ती हे फेकत होती तेव्हाच तिला हा पत्र भेटलं".... निखिल

"सर मी क्रॉस चेक केलं त्यांचा नातेवाईकांचं म्हणणं आहे की त्यांनी डब्बा पटवलाच नाही".... अजिंक्य

शुभम विचार करत होता थोडा वेळ शांत उभा होता आणि मग तो बोलला....

"अजिंक्य एक काम कर तो डब्बा आणि ते मास forensic lab ला पाठवून दे, जितकं होईल तितकं लवकर मला रिपोर्ट हवी म्हणा"... शुभम

"Oook सर".... अजिंक्य

सगळी विचारपूस केल्यानंतर शुभम स्टेशन ला आला....

स्टेशनला पोचताच शुभम ला forensic lab मधून फोन आला....
शुभम ने नीट सगळं ऐकून घेतलं आणि बोलला..... "ठीक आहे ह्याची माहिती कोणा पर्यंत पोचली नाही पाहिजे, I repeat कोणाला ही ह्या रिपोर्ट बदल कळलं नाही पाहिजे".... शुभम

"सर काय आहे report मध्ये"....?? अजिंक्य

शुभम ने अजिंक्यला सगळं सांगितलं.....

"सर त्यांनी हे सगळं केलं कसं, काहीच कळत नाहीये".... अजिंक्य

"अजिंक्य त्याने मला चेतावनी दिली होती, की आता तो चावणार आणि त्याने नेमकं तेच केलं, खेळ खेळत होता तो आपल्या सोबत अजिंक्य खूप चालक निघाला तो साला, आपण त्याला underestimate केलं".... शुभम

"सर म्हणजे तुम्हाला अजून वाटतं की हे सगळं अपूर्व ने केलं, पण हे कसं शक्य आहे सर"..... अजिंक्य

"अजिंक्य आपण त्याच्या वर नजर राखून होतो, पण त्याने आपल्याला तेवढच दाखवलं जेवढं त्याला दाखवायचं होतं".... शुभम

"सर म्हणजे".... ??? अजिंक्य

"म्हणजे त्याला माहित होतं की आपण त्याच्यावर नजर राखून आहे, त्याने आधी पासून हे प्लॅन केलं होतं, गुरुवारी सकाळी त्याने निखिल च्या नावाने हॉस्टेल मध्ये गाडी पाठवली नाही, तो स्वतः अखिल ला घेऊन आला आणि कोणाला कळलं पण नाही की मुलाचा अपहरण झालं आहे, आपण त्याच्या वर नजर राखू त्या आधीच त्याने हा खेळ रचून झालं होतं.... त्याच्या प्लॅन च्या हिशोबाने त्याने मग शुक्रवारी रात्री अखिल ला मारून तो डब्बा रेडी केलं आणि मग उजवल शर्माच्या बिल्डिंग च्या इथं जाऊन वॉचमन ला देऊन आला, की सोमवारी डब्बा, डब्बावाला घेऊन जाणार, आणि तेच झालं..... bloody hell"

"पण सर साबळे ने हे बघितलं कसं नाही की तो डब्बा घेऊन तो निघाला घरातून".... ?? अजिंक्य

"सर त्या दिवशी मी सकाळी तुम्ही यायचा आधी नजर राखली होती त्याच्यावर पण मधीच तो कुठे गायब झाला कळलं नाही, लक्ष नाही रहायलं, पण सर तो अर्ध्या तासात परत आला होता".... साबळे

"You fool त्या अर्धा तासात त्याने हे सगळं केलं आणि आता हा अर्धा तास आपल्याला खूप म्हागात पडणर आहे."... शुभम अगदी रागात म्हणाला....

"सर आता पुढे काय".... अजिंक्य

"अजिंक्य आज सकाळी जाताना तो माझ्या जवळ येऊन बोलला होता की... मला तुझ्यावर विश्वास आहे, पण तो अस बोलला का".….?? शुभम

"सर idea नाही, पण नकीच त्या मागे काय तरी कारणअसेल".... अजिंक्य

शुभम विचार करत होता, डोळे झाकून आधी झालेलं सगळं आठवत होता आणि अचानक त्याला आठवलं की सकाळ च्या वेळी अपूर्व ने त्याच्या जवळ एक कोरा पान आणि पेन मांगीतली होती, शुभम ने पटकन डोळे उघडले...

"अजिंक्य... सकाळी अपूर्व ज्या वही मध्ये लिहीत होता ती वही कुठे आहे"... अजिंक्य पटकन ती वही घेऊन आला आतून

शुभम ने ती वही उघडली आणि त्यातला एक एक पान नीट पाहू लागला त्यातल्या एका पाना वर लिहलेलं होतं....

"सर मला खात्री आहे की मी गेल्यानंतर तुम्हाला हा पत्र भेटेन, पण ते पर्यंत खूप वेळ झाली असणार, काय झालं समजलं नाही का म्हणजे अजून फोन आला नाही वाटतं, येईल येईल धीर धरा"...

शुभम ला काहीच कळलं नाही की नेमकं ह्या पत्राचा काय अर्थ आहे, शुभम विचार करतच होता तेव्हाच स्टेशन चा फोन वाजला....

शुभम ने पटकन फोन उचलला.... " (ऐ सी पी) शुभम कडवईकर"....

"Mr. ऐ सी पी, होम मिनिस्टर बोलतोय, खूप चांगलं काम केलं तुम्ही, एक तर खरा आरोपी बाहेर आझाद फिरतोय, अपहरण वर अपहरण करतोय, मुलाना मारतोय आणि तुम्ही एक सध्या माणसाला जो आधीच एक मानसिक रोगी आहे त्याला पकडून टॉर्चर केलं, काय चालय काय नेमकं"....

"सर तो मानसिक रोगीच खरा किलर आहे, सर मला एक चान्स द्या फक्त, तुम्हाला मी प्रॉमिस करतो की त्याच्या confession तुमच्या टेबल वर असेल सर बस एक संधी द्या"....

"Bull shit कसलं confession , u are suspended, आता घरी बसून स्वतःचा confession record करत बसा"..... मिनिस्टर ने फोन ठेवून दिला

"सर आता, सर जर असच चालत रहायलं तर त्याची हिंमत अजून वाढेल".... अजिंक्य

शुभम शांत होऊन खुडचिवर बसून गेला, शुभम ला माहीत होतं को त्याची हार झाली होती, इथं अजिंक्य पण लाचार झाला होता, त्याने त्याच्या मुलाला पण गमवलं आणि सोबतच त्याचं आत्मसमान पण....

इथं सत्य आणि असत्य च्या मार्गात अस वाटत होतं की असत्य जिंकलं, अजिंक्य आणि शुभम दोनीच लाचार झाले होते....

मीडिया मध्ये खबर पसरली की शुभम ला suspend करण्यात आलं आहे, तर मग प्रश्न हा निर्माण झाला होता को नेमकं आता किलरला पकडणार कोण.... हा खेळ असाच चालू रहाणार की...????

शुभम ला suspend होऊन दोन दिवस झाले, या केस मध्येपुढे काहीच update झाली नव्हती, मिनिस्ट्री ने हा केस आता (सी बी आय ) च्या हातात सोपला आणि (सी बी आय ) आता पुढे कारवाई करत होती....

एकाबाजूला जे २५ मुलं गायब होते, त्यांना श्रद्धांजली म्हणून कॅडले मार्च काढण्यात आली,लोक खूप मोठ्या संख्या मध्ये "GATE OF INDIA" च्या जवळ हातात मोबत्ती घेऊन जमा झाले, त्या २५ मुलांच्या फोटो समोर मोबत्ती ठेवून लोकांनी त्यांना श्रद्धांजली दिली....

पण हे पुरेसं होतं का....????

शुभम त्याच्या नाकाम्याबी मुले अगदी डिप्रेस झाला होता, तो काही करू शकला नाही ह्याची त्याच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता, तेच इथं अजिंक्य ह्रिड्यावर दगड ठेवून अजूनही मुलाच्या आस मध्ये काम करत होता....

बघता बघता ३ दिवस निघून गेले.....

३१ जनवरी गुरुवार २०१९ ....

शुभम घरातच बसून सिगरेट पिट होता, तेव्हाच राणू अली तिथं.... शुभम आणि राणू बसून बोलत होते आणि राजश्री चहा करायला गेली...

"शुभम i know पण तू असं हातावर हात ठेवून बशील तर कसं होईल'....राणू

शुभम फक्त गालातल्या गालात हसला, त्याने राणू ला काहीच उत्तर दिलं नाही....

"शुभम तुला झालाय काय....?? शुभम तुला नाही माहीत की मी"....??

"की मी तुला आवडतो, प्रेम आहे तुझं माझ्यावर हेच ना"... शुभम

"आहे नाही शुभम होतं, प्रेम होतं पण आता नाहीये, माझं प्रेम कॉलेज च्या त्या शुभम वर होता जो सगळ्याची मदत करणारा होता, लोकांचं दुःख हे त्याला समजत होतं पण तू... तुला काय पडलीच नाही कारण की तुझा मुलगा सेफ आहे, घरी आहे, तुझ्याकडे आहे पण त्या लोकांचं काय ज्यांचे मुलं... atleast अजिंक्यचा विचार कर".... राणू

"झालं बोलून, संपली किर किर.... मला त्या दिवशीच कळलं होतं जेव्हा तू स्टेशन ला पत्र घेऊन आली होती तो, की मी तुला आवडतो आणि दुसरं मला आता काय करायचं आहे ते मी ठरवलं आहे".... शुभम

"शुभम काय ठरवलं आहेस तू".... राणू

राजश्री ने शुभम आणि राणूचं बोलना ऐकून घेतलं, तिला बघून शुभम आणि राणू शांत झाले पण राजश्री काहीच बोलली नाही आणि चहा ठेवून निघून गेली....

राणू शुभमला सॉरी बोलली जे काय झालं त्यासाठी, शुभम ने सध्या केस ला आणि अपूर्व ला कसं पकडायचं त्याला महत्त्व दिलं नाकी वैयक्तिक जीवन ला....

शुभम ने राणू ला सगळं समजवलं की आता पुढे काय करायचं आहे....

"शुभम यांच्यात खूप मोठी रिस्क आहे, तू त्याला परत uderestimate करतोय".... राणू

"जर तो निर्दोष मुलांना मारण्यासाठी इतकं रिस्क घेऊ शकतो तर मग मी त्यांचा जीव वाचवण्यासाठी रिस्क का नाही घेऊ शकत".... शुभम

"पण शुभम".... राणू

"राणू काही होणार नाही, lets just do it"..... शुभम राणू ला बोलताना मधीच अडवत बोलला

राणू शुभम सोबत बोलून निघाली आणि निघताना ती राजश्री सॉरी बोलली....

"सॉरी नको बोलूस, काय आहे की शुभम आहेच तसा कुठली ही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल पण मला त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे की काही झालं तरी तो मला नाही सोडणार"..... राजश्री

हे ऐकून शुभम पण त्याच्या जागे वरून उठून राजश्री जवळ आला.....

"हो बरोबर बोलीस तू... आणि खरच तो तुला नाही सोडणार"..... राणू

राणू शुभम आणि राजश्री ला बाय म्हणून तिथून निघाली.....

इथं अपूर्व त्याचा वेगळ्याच दुनियेत रमत होता.... हातात कोयता घेऊन तो गाणं म्हणत होतं

" अडगुलं मडगुलं ,सोन्याचं कडगुलं ,रुप्याचा वाळा ,तान्ह्या बाळा ,तीट टिळा"....... आणि मग हसायला लागला.... अस करत तो येऊन एका कोपऱ्यात बसला आणि डोळे बंद करून त्याच्या जुन्या आठवणीत हरवून गेला.....

गाडीचा हॉर्न चा आवाज ऐकून साहिल जोरात ओरडला....

"मम्मी... पप्पा आले".... साहिल

"हो माहीत आहे, बघ लवकर ये हा मग माहीत आहे ना मी काय सांगितलं आहे आज आपण तुझ्या वाढदिवस निमित्त तुझ्या पप्पांना surprise द्याच आहे आणि हो पप्पांना काही सांगू नको".... अंजली

"असं काय आहे जे मला नाही सांगायचं अनु"... अपूर्व

"काय नाय"... अंजली बोलताच होती तितक्यात साहिल पप्पा म्हणत पटकन अपूर्व ला येऊन चिपकला, अपूर्व ने साहिल ला उचलून घेतलं आणि येऊन कार मध्ये बसला....

अपूर्व साहिल ला त्याच्या घरी घेऊन आला, साहिल खूप खुश होता, खुशीने नाचत होता तो...

मग अपूर्व साहिलला बोलला..... "बाळा मला हे खरंच चांगलं वाटत नाही पण काय करू, कसं समजवू तुझ्या आईला"...

"पप्पा don't worry आज सगळं ठीक होऊन जाईल"..... साहिल

"अच्छा तू बोलतोय तर चल"....अपूर्व

अपूर्व साहिल ला घेऊन परत अंजली कडे जाण्यासाठी निघाला, रस्त्यात अपूर्व ने गाडी सिग्नल वर थांबवली तेव्हाच साहिलच लक्ष समोर फुगेवाल्या कळे गेला...

"पप्पा मला फुगगा हवा आहे".... साहिल

"हो बाळा आता सिग्नल सुटणार आहे, आपण पुढून घेऊया फुगगा"....अपूर्व

साहिल हट्टेला पेटला होता, त्याने काय ऐकला नाही नेमकं इथं सिग्नल सुटला, अपूर्व ने गाडी चालू केलीच आणि साहिल गाडीतून उतरून धावत फुगेवाल्या कडे जात होता आणि मधीच त्याला एका गाडीने उडवलं....

अपूर्व ने पटकन गाडी थांबवली आणि तो साहिल जिथं पडला होता तिथं गेला, सगळ्या गाड्या थांबल्या.... साहिल अपूर्वच्या नजरे समोर पडला होता त्याला काहीच सुचत नव्हतं की काय करावं, सगळं अचानक घडलं, अपूर्वला अस वाटत होतं की जणू जग इथंच थांबलं आहे, त्याला सगळं एकदम slow motion मध्ये दिसत होतं, लोकांचं ओरडणं, गाडीतून बाहेर येणं..... पण तेव्हाच अपूर्वचा हाथ कोणी तरी खेचला, अपूर्व ने खाली बघितलं...

"साहिल कुठे निघून गेला होता तू , लागला नाही ना तुला, किती वेळा सांगितलं आहे की अस नको करत जाऊस पण तू काय ऐकत नाही, चल आता आई वाट पाहत असेल".... अपूर्व

साहिल अपूर्व समोर फुगगा हातात घेऊन थांबला होता, अपूर्व ला त्याच्या त्या आजारा मुळे नेमकं अस दिसत होतं, पण त्याला खरं काय आणि खोटं काय यातला अंतर दिसलाच नाही, अपूर्व ने साहिल ला उचलून गाडीत बसवलं आणि तिथून निघून गेला आणि नेमकं साहिलचं शव तिथं रस्त्यावर पडून होतं......

"पप्पा भूक लागली आहे, आज काय आहे जेवण्यात".... आवाज ऐकताच अपूर्व ने डोळे उघडले

"अरे आलास तू साहिल, कुठे गेला होतास, चल मी जेवण वाढतो पटापट जेवून घेऊया"......

--------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------------------


इतर रसदार पर्याय