सांन्य... भाग ९ Harshad Molishree द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • जर ती असती - 1

    असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून ज...

  • नियती - भाग 33

    भाग 33इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे प...

  • वाटमार्गी

    वाटमार्गी       शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट...

  • परीवर्तन

    परिवर्तन राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भरत्ला होता. शत्रू...

  • स्कायलॅब पडली

    स्कायलॅब पडली                           त्यावर्षी ११ जुनला श...

श्रेणी
शेयर करा

सांन्य... भाग ९

अध्याय ५.... निष्कर्ष

१ फरवरी शुक्रवार २०१९....

शुभम रेस्टॉरंट मध्ये बसून चहा पिट होता, तेव्हाच तिथं अजिंक्य आणि राणू आले, दोघ येऊन शुभम च्या समोर बसले....

"सर जसं तुम्ही सांगितलं होतं सगळं तसच चालय..... our plan is on"... अजिंक्य

"हां शुभम, मी माझ्या चॅनेल वर तुझ्या interview साठीची permission पण घेतली आणि उद्या संध्याकाळी it will be exclusive".... राणू

"Good, अजिंक्य forensic reports बदल कोणाला कळलं नाही ना"... शुभम

"नाही सर कोणालाच नाही कळलं".... अजिंक्य

"शुभम, तसं मला खूप भीती वाटतेय, जर काहीही चूक झाली तर मग hope की सगळं जसं ठरवलं आहे तसच होईल".... राणू

"हां राणू ठरलं आहे तेच होईल"..... शुभम

"राजश्री ला सांगितलं तू".... राणू

"नाही तिला काय माहीत नाही आणि मी काय सांगणार पण नाहीये तिला".... शुभम

"बर lets see".... राणू

शुभम चा प्लॅन रेडी होता.... दिवस असाच निघून गेला, शुभम ने राजश्रीला काहीच सांगितलं नाही आणि interview ची वेळ आली....

२ फरवरी शनिवार २०१९...

"So welcome everybody... नमस्कार मंडळी, मी तुमची दोस्त आणि होस्ट राणू आपलं स्वागत करते आज च्या ह्या Exclusive Interview मध्ये जिथं मुंबई मध्ये होणाऱ्या अपहरण च्या मागे काम करणारे ऑफिसर (ऐ सी पी) शुभम कडवईकर, स्वतः आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील"....

"So please welcome Mr. शुभम कडवईकर"..... शुभम येऊन राणू समोर बसला, interview ची सुरवात झाली, सगळ्यांची नजर आज interview वर होती, अपूर्व पण interview बघत होता...

"तर Mr. शुभम कडवईकर जसं की सगळ्यांना माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पोस्ट वरून suspend करण्यात आलं आहे, पण तरी तुम्ही ह्या केस वर काम केलं आहे आणि इथं आमचे नाही लोकांचे काही प्रश्न आहे ज्याचे उतर तुमच्या कडून भेटेल ह्याची मला अपेक्षा आहे... तर पहिला प्रश्नं".....

"सांन्य... कोण आहे सांन्य, माणूस बाई आखीर आहे कोण" ....??? राणू

"हे जर माहीत पडलं असतं तर आज तो जो कोण आहे जेल मध्ये असला असता"... शुभम ने मुदाम अपूर्व बदल काही सांगितलं नाही

अपूर्वला वाटत होतं की शुभम त्याच्या बदल सांगून टाकले टीव्ही वर पण नेमकं तसं झालं नाही, अपूर्व च्या डोक्यात ही बात घर करुन गेली की शुभम ने त्याच्या बदल काही सांगितलं का नाही, नक्कीच याच्या मागे काय तरी याच्या खेळ असले, प्लॅन असेल ह्याची अपूर्वला खात्री झाली.....

"Ook, that's true".... "Personally सर तुम्हाला काय वाटतं की हा जो किलर आहे तो असं का करतोय".... राणू चा दुसरा प्रश्न

"Ego"... शुभम

"Ego... म्हणजे"...??? राणू

"त्याच्या Ego, किलर चा उद्देश्य फक्त मुलांचा अपहरण करून त्यांना मारणं किंवा कापून खाणं हेच नाहीये, तो लोकांना काय तरी सांगायला इच्छितोय"... शुभम

"सर uhh mean to say की त्याला कायतरी मेसेज पोचवायचं आहे असं, जरा तुम्ही दर्शकांना स्पष्ट कराल का...??? की त्याच्या उद्देश्य काय आहे".... राणू

"काळजी..... त्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलांची नीट काळजी करत नाही".... शुभम

"सर मग तुमचं म्हणणं असं आहे की, ज्या मुलांचं अपहरण झालं आहे त्यांच्या आई बाबांना त्यांच्या मुलांची काळजी नव्हती"... राणू

"नाही पण अस त्याला वाटतं, म्हणून तो त्याच मुलांचं अपहरण करतो".... शुभम

"पण ही कसली काळजी आहे, तो पण तर मुलांना कापून खाऊन टाकतो, i mean की असं करून तो लोकांना काय सांगू इच्छितोय"........ राणू

"त्याच्या हिशोबाने काळजी म्हणजे एक अशी प्रेमाची गाठ जे मृत्यु नंतर पण तुटणार नाही".... शुभम

"अरे ह्यांना काय माहीत की आपल्या मुलाला गमावण्याचं दुःख काय असतं, हे तर इथं काहीही बडबड करत आहे".... दर्शकांन मधला एक व्यक्ती

राणू काय बोलायला जात होती, तेव्हाच शुभम ने तिला बोलताना मधीच अडवलं....

"बोलुड्या त्यांना, काय आहे की बरोबर बोलले तुम्ही"...... "पण मी तुम्हाला वचन देतो की येता सोमवारी मुबई मधल्या कुठल्याच मुलाचा अपहरण होणार नाही"..... शुभम

"सर पण हे तुम्ही एवढा खात्री ने कसं सांगू शकता".... राणू

"कारण की या सोमवारी तो माझ्या मुलाचा अपहरण करणार आहे"..... शुभम

हे ऐकताच सगळे शॉक झाले, अपूर्व पण विचार करू लागला की शुभम नेमकं अस का बोलला, त्याच्या मागचा त्याचं उद्देश्य काय...????

"Are uhh serious सर... म्हणजे त्यानी, I mean त्या किलर ने तुम्हाला पण पत्र पाठवलं आहे का"...??? राणू

"नाही पण त्याच्या माझ्यावर विश्वास आहे आणि मी ते विश्वास तुटू देणार नाही"..... शुभम

शुभमच बोलणं ऐकून सगळे आश्चर्यात पडले, तिथं अपूर्व पण जोर जोरात हसत होता.... शुभम राणू ला घेऊन घरी आला, राजश्री रागात बसली होती, राजश्रीला असं रागात बसून राणू शांत झाली तेच शुभम ने तिला विचारलं.....

"काय झालं राजश्री".... शुभम

"काय झालं, आता interview मध्ये हे काय सांगून आलास तू, शुभू तुला तुझ्या मुलाची काहीच काळजी नाही का त्याला काय झालं तर"...... राजश्री

"ऐक तू शांत हो आधी, शांत हो... अमर माझा पण मुलगा आहे बाप आहे मी त्याच्या मला पण तेवडीच काळजी आहे त्याची".... शुभम

"जर त्याला काय झालं तर"... राजश्री ला खूप भीती वाटत होती तेच अमर ची काळजी पण...

"काही नाही होणार त्याला, मी आहे ना काहीच नाही होऊ देणार मी त्याला".... शुभम राजश्री ला आश्वासन देत म्हणाला

शुभम ने राजश्री ला मिठीत घेतलं आणि शांत केलं, राणू ने पण राजश्री ला आश्वासन दिलं.... रात्र तशीच निघून गेली सकाळ झाली....

२ फरवरी रविवार २०१९....

अजिंक्य पोलीस टीम सोबत शुभम च्या घरी पोचला संरक्षण साठी...

"सर तो येईल ना".... अजिंक्य

"अजिंक्य मला खात्री आहे की तो येईल आणि अमर ला घेऊन जाईल, बस लक्षात ठेव काही झालं तरी जस ठरलं आहे तसच करायचं आहे".... शुभम

"Yess सर".... अजिंक्य

वेळ असा निघून गेला जसं हातातून वाळू.…. रात्रीचा वेळ होता अजिंक्य बाहेर थांबला होता, शुभम राजश्री आणि राणू अमर ला घेऊन बसले होते, गप्पा गोष्टी करत २:३० वाजले... अमर झोपी गेला, शुभमला पण आता झोप येत होती....

"शुभू मी चहा करते.... तुम्ही बोला तो पर्यंत झोपू नका"... म्हणत राजश्री चहा करायला गेली

राजश्री चहा घेऊन आली, तिने सगळ्यांना चहा दिला काही वेळ नंतर शुभमला पण झोप लागली आणि तेच राणू आणि राजश्री पण झोपी गेले....

तेव्हाच अपूर्व वरच्या माळ्यावरून खाली पायऱ्या उतरत आला आणि हळूच शुभम जवळ जाऊन त्याने शुभम च्या खिश्यात एक पत्र ठेवलं आणि अमर ला हळूच उचलून घेतलं, अमर झोपेत होता आणि अपूर्व हळूच मागच्या दाराने निघून गेला....

अपूर्व ने अमर ला गाडीत बसवलं आणि गाडी चालू करून तिथुम निघून गेला.....

जेव्हा गाडीचा आवाज आला तेव्हा शुभम पटकन झोपेतून उठला आणि अजिंक्य धावत घरात आला, बघतोय तर काय अमर नव्हतं... त्याने शुभम कडे पाहिलं त्याला तो पत्र दिसला जो अपूर्व ने त्याच्या शर्ट च्या खिश्यात ठेवलं होतं....

"सर तो पत्र".... अजिंक्य

शुभम ने पत्र काढला आणि वाचायला सुरवात केली.…

अमर वय ६...

बाळा तुला मारण्याच्या माझं प्लॅन नव्हता पण चुकी तुझ्या बापाची आहे, पण जस की मी नेहमी सांगतो मला त्याच्या वर विश्वास आहे.... तर मग काय करू आलो मी, काय सर झालं ना पण काळजी करू नका त्याला कापून जेव्हा मी खाणार ना तेव्हा तुम्हाला विडिओ काढून पाठवेल मी, काय आहे की शेवटी ही संधी पण तर मला तुम्हीच दिली आहे ना.... धन्यवाद खूप खूप आभार...!

" सांन्य "

राजश्री रडायला लागली, राणू चे पण हाथ पाय गारठले की नेमकं पुढं काय होईल आता.... शुभम ने राजश्री ला समजावून शांत केलं....

"अजिंक्य जसं ठरलेलं तू त्या जागेवर पोच"..... शुभम

"हो सर"... अजिंक्य

"राणू हे घे पत्र ठरल्याप्रमाणे मीडिया मध्ये न्युज पसरून ताक".... शुभम

"हो शुभम"... राणू ने तो पत्र घेतला

अजिंक्य आणि राणू पटकन निघाले तिथुन, शुभम पण त्यांच्या मागून निघाला पटकन.....

अजिंक्य ठरल्याप्रमाणे त्याच्या जागेवर पोचला आणि तेच राणू ने मीडिया मध्ये न्युज पसरवून टाकली.... न्युज बघून लोकं आश्चर्यचकित झाले.....

इथं अपूर्व घरी आला, त्याने हळूच घराचा दार उघडला आणि lights लावली, बघतोय तर शुभम समोर हातात कोयता घेऊन बसला होता, शुभम तो कोयता समोर असलेला टेबलवर सारखा मारत होता..... "कट कट कट" असा आवाज ऐकून एकांतर अपूर्व एका क्षणा घाबरला... पण मग त्याने दार बंद केला आणि येऊन शुभमच्या समोर बसला....

"काय मग मित्रा काम झालं की नाही, कापलं त्याला की अजून काम बाकी आहे"..... शुभम

अपूर्व हे ऐकताच जोरजोरात हसायला लागला....

इथं अजिंक्य त्या जागेवर पोचून थांबला होता, मीडिया मध्ये बातमी पसरली होती, शुभम अपूर्व समोर बसला होता पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं अमर कुठे होता.....?????

---------------------------------------------------------- To Be Continued -------------------------------------------------------------------------------------