Sparsh - 26 - last part books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 26 - अंतिम भाग

मी तिला बाहूत घेऊन बेडवर नेईल अस तिला वाटत होत आणि नेमकं त्याच वेळी मी तिच्याकडे हसून म्हणालो , " मानसी ..तुला वाटलं की मला स्वतःला सावरन झालं नाही म्हणून मी रूम सोडून आलो तर चुकीची आहेस तू ..एक चूक तू त्याआधी पण केलीस ती म्हणजे जेव्हा पहिल्यांदा स्पर्श किळसवाणा वाटला तेव्हाच तू सांगायला हवं होतं . मला ते तुझं बोलणं आठवल म्हणून मी रूम सोडून आलो ..तुला एकदा स्पर्श करून पुन्हा त्याच अवस्थेत पुन्हा परत घेऊन जाण म्हणजे तुझ्या अस्तित्त्वावर घाला घालणं ..मी मुळात तुला चुकीच समजत नाही कारण तुझ्या जागी मी असतो तर मीही तेच केलं असत पण माझ्या जागी तू असतीस तर खरच पुन्हा एकदा मला त्रास द्यायला आवडला असता तुला ?? ..अजिबात नाही ..तुझंच काय म्हणा इथे सर्वानाच वाटत की प्रेम म्हणजे फक्त मिळविण ..पण दोन व्यक्ती एकत्र राहूनही खुश नसतील तर त्या प्रेमाला काहीच अर्थ नाही आणि दूर राहून जरी त्यांच्या मनात एकमेकांविषयी भाव जपल्या जात असेल तरी प्रेम टिकून राहत ..मला मान्य आहे की तुझा स्पर्श झाला आणि मी तुझ्या प्रेमात पडलो पण केव्हा तुझा मनाने झालो ते सुद्धा कळाल नाही ..आम्ही मुलं पण खूप शहाणे असतो एखादी मुलगी थर्टी सिक्स ट्वेंटी फोर फिगरची दिसली की सतत तिच्याकडे पाहत असतो पण एकदा प्रेमात पडल्यावर त्या मुलीच्या साध्या ओढणीकडे सुद्धा लक्ष जात नाही ..बघ किती ताकद असते प्रेमात ..मानसी मला तुझं शरीर नकोय तुझं मन जपायचं आहे ..आणि तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी मी जपून ठेवतोय ..माझ्या साठी तुझं शरीर दुय्यम आहे ..पुनः अस विचारही मनात आणू नको ..कळलं " ...माझं बोलणं एकूण तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि ती माझ्याकडे पाहत राहिली ..काय असत प्रेम हे तेव्हा तिला नक्कीच कळाल होत ..

त्या प्रसंगानंतर मानसी पूर्णतः बदलली ..झोपायची जागा नक्कीच बदलली होती पण मनातली जागा तशीच कायम होती ..डॉक्टरांनी देखील तिला काम करण्यास अनुमती दिली होती ..मी सरांशी बोलून तिला माझ्याच ऑफिसला लावून दिलं आणि आता तो दिवसभराचा एकाकीपनाही नष्ट होऊ लागला ..तिला जॉब लागली आणि ती मला दुसरं लग्न कर म्हणून मागे लागली ..प्रश्न ती जॉबवर लागण्याचा नव्हताच तर होता तिने जे स्वप्न पाहिल होत ते पूर्ण करण्याचा ..एकदा का तिने आपला लाईफ पार्टनर निवडला असता की मग मी माझ्या जबाबदारीतून पूर्णपणे मोकळा झालो असतो ..त्यामुळे सध्या तरी मला लग्नाचा विचार करायचा नव्हता ..आम्ही दोघाणीही संपूर्ण वर्ष तणावात काढलं होत ..आता कुठे जाऊन सर्व काही ठीक होऊ लागलं होतं ..नावासाठी तर आम्ही नवरा - बायको होतो पण आमच्यासाठी फक्त मित्र ..ती मला सुंदर - सुंदर खायला घालायची तर मी तिला आधार देण्याचं काम करत होतो ..नात जरी बदललं असलं तरी आम्ही दोघे तसेच होतो ..रात्रभर गप्पा मारन असो की बाहेर फिरायला जाण ..सर्व काही तसच होत फक्त नव्हता तो स्पर्श ..तिच्याही आयुष्यात आणि माझ्याही आयुष्यात ..

तिला जॉबवर लागून दोन - तीन महिने झाले होते ..ती घरी असली तरीही तिचे पाय आता घरात थांबत नसत ..डॉक्टरांशीही ती सतत संपर्कात राहत होती ..आज रविवार होता ..मी जिमला जाऊन आलो आणि टीव्ही पाहत बसलो होतो ..मानसी धावत - धावतच माझ्याकडे आली ..मी बसून होतो तेव्हा ती मला उठवून माझ्यासोबत डान्स करू लागली ..मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो पण मॅडम आज एवढ्या खुश होत्या की काहीच बोलत नव्हत्या आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला ..मॅडम मला गोल - गोल घुमवत होत्या..त्यांचा अचानक हात सुटला आणि मी बाजूच्याच सोफ्यावर जाऊन पडलो ..मी रागावून तिच्याकडे पाहू लागलो आणि ती कान पकडून सॉरी म्हणू लागली ..हाउ क्युट ना !! ..आज तिच्यावर रागवायचा मला अजिबात मूड नव्हता ..लहान मुलाला एखादी गोष्ट मिळाल्यावर आनंद मिळतो तितकाच आनंद तिच्या चेहऱ्यावर मला जाणवत होता ..ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि म्हणालो , " बाईसाहेब आता तरी सांगणार आहात का ..काय झालं तर " आणि ती जोराने ओरडत म्हणाली ," अभि माझं स्वप्न पूर्ण झालं ..? ", मी पुन्हा एकदा तिला विचारू लागलो , " म्हणजे ? " आणि ती म्हणाली , " म्हणजे ..म्हणजे वाघाचे पंजे ..कस सांगू तुला ..आज डॉक्टर काका भेटले होते ..त्यांनी मला एका मुलीशी भेटवल ..ती सुद्धा माझ्यासारखीच लेस्बियन आहे ..तीच नाव रोझी ..आज संपूर्ण वेळ आम्ही सोबतच होतो ..तिच्या स्पर्शात काय जादू आहे ..आज कळला मला स्पर्शाचा अर्थ ..आणि हो आता तुझीही चिंता मिटली ..आम्ही दोघेही सोबत राहू आणि आता तुही लग्न करू शकशील .." ती आनंदाने उड्या मारत होती ..मी शुभेच्छा देण्यासाठी समोर केलेला हातदेखील तिला आज दिसला नव्हता ..लग्नाच्या वेळी मी तिला सात वचन दिले होते .त्यातलं सर्व वचन मी पार पाडत होतो ..तिने पाहिलेल स्वप्न पूर्ण झालं आणि मी दिलेलं सहाव वचन पूर्ण झालं ...तिला पार्टनर तर मिळाला होता पण आता वेळ होती घरच्यांशी सर्व बोलण्याची ..माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल आणि लगेच मानसीला म्हणालो , " मानसी मी आज खरच खूप खश आहे पण आता वेळ आली आहे माझ्या घरच्यांना सांगण्याची .." तिच्या चेहऱ्यावर उदासी जाणवू लागली होती ..तिला आणखी दुःख नको होते हे मला जाणवत होते म्हणून मीच म्हणालो , " मानसी काळजी नको करू घरचे काहीच म्हणणार नाहीत आणि म्हणालेही तर सातव वचन पूर्ण करेन संपूर्ण जगाशी लढून तुझी साथ निभावण्याचं वचन ..तुला विश्वास आहे न माझ्यावर ..? " आणि ती म्हणाली .." स्वतापेक्षाही जास्त .."..

आता वेळ होती घरच्यांना सांगण्याची..ही गोष्ट मला त्यांना समोरासमोर सांगायची होती त्यामुळे आई - बाबांना कॅनडाला बोलवून घेतलं ..मागे एकदा माझ्या खास मित्रांची साथ सोडली होती पण यावेळी मात्र मला त्यांच्यापासून काहीच लपवायच नव्हतं..म्हणून आई बाबांसोबत त्या तिघांचेही तिकीट बुक केले होते...त्यांना फक्त फिरायला या म्हणून सांगितलं होतं आणि ते तीन दिवसासाठी यायला देखील तयार झाले ..जेव्हा ते आले मी त्यांना स्वतः रिसिव्ह करायला एअरपोर्टवर गेलो होतो ..मानसी त्यांची वाट पाहत घरीच थांबली होती ..त्यांनी कॅनडाला प्रवेश केला आणि इथेच धुमाकूळ सुरू झाला..शाश्वतला केनीच्या घरी न्यायचं सरप्राइज ठेवलं होतं ..सर्वाना एअरपोर्ट वरून घरी घेऊन आलो ..मानसी आताही त्यांच्याशी नॉर्मलीच वागत होती ..घरी आलो तसच फ्रेश होऊन बाहेर जेवण करायला निघालो ..विकास आणि शाश्वत गोऱ्या मुली पाहण्यात व्यस्त झाले तर बाजूला मी ..आणि सोनाली विकास कडे पाहून त्याला शिव्या घालत होती ..आई बाबा एखाद्या नवीन जोडप्याप्रमाणे आपलं हनिमून एन्जॉय करत होते ..आई इथे एकदा आली होती त्यामुळे ती बाबांना इथेच जवळच्या प्रेक्षणीय स्थळाबद्दल माहिती सांगत होती ..त्यांचा चार लोकांचा ग्रुप तर आम्ही तिघे ..ते आपल्या कामात व्यस्त होते तर आम्ही मुली पाहण्यात ..विकास म्हणाला , " साल्या शाश्वत उगाच लग्नाला घाई केली यार आधी आलो असतो तर इथूनच एखादी घेऊन गेलो असतो .." त्यांनी अस बोलावं आणि सोनाली त्याला तिथेच मारू लागली ..हॉटेलमध्येही तीच अवस्था ..आमचे लोफर कुठे शांत बसतील म्हणजे झालंच ..मॅनेजर परेशान झाला होता ..तरीही हे शांत बसेना ..काही वेळात हे दोघेही मॅनेजर जवळ गेले आणि काय बोलून आले माहीत नाही ..त्या क्षणानंतर मॅनेजर आम्हाला काहीच बोलला नाही ..असे आमचे हे दोन इडिअट्स ..आई म्हणाली , " ए शाश्वत तू अस काय बोलला रे की तो सरळ शांतच झाला " , आणि त्याच उत्तर , " काकू कस आहे ना काही सिक्रेट सांगायचे नसतात ..हो ना हो काकाजी ." बाबांनी मान डोलावली आणि आईने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहावं ..काय भारी जोड्या होत्या आमच्या ..जेवण आटोपून शेवटी घरी आलो ..मला सर्व काही आजच सांगायचं होत म्हणून आज मुद्दाम आइस क्रीमचा बेत आखला होता ..आइस - क्रीम खायला जवळपास सर्वच हॉलला जमा झाले होते .मानसी मात्र फारच घाबरली होती ..मी कस तरी तिला बोलावून घेऊन आलो ..मधात मानसी आणि मी उभे होतो तर बाजूला सर्वच बसून होते आणि मी हिम्मत करून बोलायला सुरुवात केली .." थोडं लक्ष द्याल का ? ..मला खर तर तुम्हाला काही सांगायचं असल्याने मी तुम्हा सर्वांना कॅनडामध्ये बोलावून घेतलं ..विषय थोडा नाजूक आहे त्यामुळे जोपर्यंत माझं बोलणं संपत नाही तोपर्यंत कुणीही काहीच बोलू नका ...तर ऐका ..मी आणि मानसी - घटस्फोट घेतोय ..( सर्वांचे चेहरे आता पाहण्यासारखे झाले होते .) मला माहित आहे तुम्हाला वाटत आहे की तुम्ही सुखचा संसार करीत असताना असताना घटस्फोट का ? .. कारणही त्याला तसच आहे ..ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ..एक दिवस बसलेलो असताना मानसीने मला सांगितलं की ती लेस्बियन आहे ..मला तुझा स्पर्श आवडत नाही ..खर तर माझ्यावरही त्यावेळी दुखाच डोंगर कोसळल पण मी नेहमीप्रमाणे स्वताला सावरुन घेतलं ..मानसीला माझ स्पर्श आवडत नाही हे पचवणं तस सोपं नव्हतं पण तिच्या आनंदासाठी मी तिला सोडण्याचा निर्णय घेतला..तिने आपल्या घरी सांगितलं पण तिच्या घरच्यांनी तिला घरातून काढून टाकल ..ही वेडी तर मरायला निघाली होती ..मला त्यावेळी तुम्हा सर्वांना हे सांगायचं होत पण त्यावेळी आमची दोघांचीही ते सर्व बोलण्याची मनस्थिती नव्हती ..घटस्फोट घेण्याआधी मला आधी तिला कमावत करायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला पार्टनर शोधून द्यायचा होता म्हणून इतके दिवस तुम्हाला सांगायचं टाळू लागलो पण आज तिने रोझी सोबत राहायचा निर्णय घेतला आणि मला हे सर्व तुम्हाला सांगावं लागलं ..मला माहित आहे तुम्ही सर्व दुखावला त्यासाठी सॉरी ..आणि आणखी एक गोष्ट मी तिला वचन दिल की तुम्ही तिच्या विरोधात गेला तरीही मी तिला साथ देईल पण मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तिला साथ द्याल .आई मी बरोबर केलं ना ग "

मी बोलत असताना मानसीच्या डोळ्यात अश्रूंनी घर बनवलं होत ...आई सोफ्यावरून उठली ..ती मानसिकडे गेली ..आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली .., " अभि प्रत्येक आई - वडिलांना त्याचे मुलं खूपच खास असतात पण तू माझा मुलगा आहेस याचा मला खरच अभिमान वाटतो आहे ..आणि मानसी काय घेऊन बसली आहेस समाजाच ..मी तुझ्या बाजूने सदैव राहत आले आहे आणि राहील ..मानसी मला तुझा फार अभिमान वाटतो बेटा ..खूप कठीण असत हे स्वीकारणं की आपल्यावर अत्याचार होतोय आणि त्यापेक्षाही कठीण असत की ते ओरडून सांगणं की हा अत्याचार मला नकोय ..खरच खूप अभिमान वाटतो मला तुम्हा दोघांचाही .." आईच बोलून झालंच होत की बाबा मानसिकडे जात म्हणाले , " बेटा काळजी करू नको तुझ्या आईवडिलांनी जरी तुला स्वीकारलं नाही तरी आम्ही आहोत ना तुझे आई - बाबा ..आणि हो तुम्ही योग्य निर्णय घेतला आहात .." एवढं सिरीयस वातावरण सुरू असताना शाश्वत मला साष्टांग दंडवत घालवत म्हणाला , " जहापणा तुस्सी ग्रेट हो ........करो " त्याच बोलणं ऐकून सर्व हसू लागले ..तेवढ्यातच सोनाली - विकास येत म्हणाले , " अभि आज खरच खूप अभिमान वाटतो तुझा ..जिथे घरच्यांनी तिला नाकारलं तिथे एवढं प्रेम असतानाही तू तिला सोडून दिलं ..साल्या आज खूप मोठा वाटतो आहेस तू .." आणि तिघांनीही मला येऊन झप्पी दिली ..काय सुंदर क्षण होता तो ..मानसी आईच्या कुशीत तर मी माझ्या जीवालग मित्रांच्या सहवासात ..

आणि मी दिलेलं सातव वचनही पूर्ण केलं ..

सर्वांनीच आमच्या निर्णयाला होकार कळविला होता ..आम्ही सर्वच आनंदी होतो ..तीन दिवस राहायचं असल्याने आम्ही कॅनडामधील सर्वच फेमस स्थळांना भेट देत होतो ..आणि मानसिसोबत शेवटचे काही क्षण जगून घेत होतो ..ठरल्याप्रमाणे शाश्वतला केनीच्या घरी घेऊन गेलो होतो आणि तीही आम्हा सर्वांना पाहून फार खुश झाली होती ..विशेषतः शाश्वतला पाहून ..ते तीन दिवस आमच्या आयुष्यातले सर्वात भारी दिवस होते ..मानसी तर रोझीसोबत राहणार होती पण मला आता एकट राहणं शक्य नव्हतं त्यामुळे मी आधीच रिजाइन केलं पण त्यांनी मला भारतात ट्रान्स्फर दिली .मला फक्त आता आपल्या लोकांसोबत राहायचं होत ..त्यामुळे एका वेगळ्या प्रवासासाठी आम्ही पुन्हा एकदा निघालो ..जाताना मानसीची ते पेंटिंग दिसली आणि तिला लग्नानंतरच पहिलं गिफ्ट म्हणून मी देऊन दिली ..आणि आम्ही सर्वांनीच तिला जादूची झप्पी देऊन कॅनडा नेहमीसाठी सोडलं...

3 वर्षानंतर ...


आज आमच्या शाश्वत साहेबांचा साखरपुडा होता ..बऱ्याच प्रयत्नानंतर कॅनडावाली पार्टी राजी झाली होती ..विकास आणि मी दोघेही भाऊ तिसऱ्या भावाच्या साखरपुड्याची तयारी करत होतो....विशेष म्हणजे आज मानसी येणार होती ..या तीन वर्षांच्या काळात काही गोष्टी घडून गेल्या होत्या ..एक म्हणजे माझं शामलीशी लग्न त्यातही मला 8 महिन्याची गोंडस मुलगी होती ..सोनालीला दीड वर्षाचा पहिलवान होता तर इकडे शाश्वत साहेब केनीच्या दारावर आपल्या चपला झिजवत होते ..दिवसभर राबून आम्ही दोन्ही भावांनी साखरपुड्याची जय्यत तयारी केली होती ..विशेष म्हणजे केनी आपल्या फॅमिलीला घेऊन भारतातच आली होती फक्त लग्नवरात मात्र कॅनडाला जाणार होती ..मुलगा - मुलगी दोघेही काही क्षणातच लॉनना पोहोचणार होते ..आम्ही सर्वच तयारी करून बसलो होतो ..आता फक्त वाट होती ती मानसिची ..सोनालीला एअरपोर्ट वर पाठवून बराच वेळ झाला होता पण ती काही मानसीला घेऊन आली नव्हती ..विकासने तिला बरेच फोन केले होते पण एकही फोन रिसिव्ह झाला नव्हता ..इकडे शाश्वत - केनी मंडपात येण्याची चिन्हे दिसू लागली होती आणि त्या दोघींचा काहीच पत्ता नव्हता ..तेव्हाच समोरून माझी कार चमकताना दिसली ..आणि त्यातून मानसी उतरली ..कधीतरी साडी आणि सलवार लावून फिरणारी मानसी आज जीन्स , टी - शर्ट आणि वरून जॅकेट चढवून आली होती ..पोशाख जरी विदेशी असला तरीही सुंदरता मात्र आजही भारतीयच होती ..तिची वाट पाहणाऱ्यात फक्त मी एकटा नव्हतो ..आमचे सर्व मित्रमंडळी तिची आतुरतेने वाट पाहत होते ..तिने लॉन मध्ये जसा प्रवेश केला तसाच प्रत्येक व्यक्ती तिला झप्पी देत होता ..माझ्या बाजूला असलेला विकाससुद्धा तिला भेटायला आधीच निघाला ..मी मात्र तिथेच होतो तिची वाट पाहत ..मागून शाश्वत केनी स्टेजवर चढण्याऐवजी सरळ तिलाच भेटायला आले आणि मगच स्टेजवर चढले ..मी मात्र आताही तिथेच उभा होतो ..गर्दी सारत - सारत ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली ..आणि म्हणाली , " अभि बाबू तुम्हाला नाही भेटायचं का मला ? " आणि माझ्या उत्तराची पर्वा न करताच तिने मला मिठी मारली ..माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणामधील तो क्षण होता .." बाय द वे मॅडम आज खूप भारी दिसत आहेस " , मी म्हणालो आणि ती हसून म्हणाली , " सर्व तुझीच कृपा .." आम्ही समोर बोलू लागलो ..आमच्यावरच सर्वांची नजर होती ..काही चांगल्या नजरेने बघत होते तर काही चुकीच्या ..ते पाहून मी तिला म्हणालो , " मॅडम बघा कसे बघत आहेत आपल्याला सर्व .." आणि ती म्हणाली , " बघू रे दे त्यांनी लेस्बियन मुलगी कुठे बघितली आहे ..आता बघत आहेत तर काहीतरी वेगळं वाटत असेल त्यांना म्हणून व्हय ..तस पण ना अभि मी आता याना घाबरत नाही ..समाज तो नाही जो व्यक्तीच अस्तित्त्व हिरावून घेतो समाज तर तो असतो जो व्यक्तीला जीवन देतो , सुरक्षा प्रदान करतो ..जे आता मला भेटण्यासाठी आतुर होते न तो आहे माझ्यासाठी समाज ..बाकी जलने वाले जलते रहे हमको क्या ? " आणि तिचे ते शब्द एकूण माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं आणि ती हसत म्हणाली , " अभि तुझे हे अश्रू पुसायला मला नक्कीच आवडल असत पण तुझी बायको आली तर काही खर नाही म्हणून शांत बसले आहे " .

" अग पूस ना मग त्यात काय " , शामली मानसीच्या हातात रुमाल देत म्हणाली ..आणि मानसीने ते अश्रू रुमालाने साफ केले ..

" ए मानसी घे ग बाई ही आमची मुलगी ना खूप त्रास देते आम्हाला ..आता फक्त तूच सांभाळू शकतेस त्याला ..मी चालले शाश्वतकडे ...", शामली मानसीला म्हणाली ..

माझी मुलगी मानसीच्या हातात लगेच आली ..विडिओ कॉल वर खूप वेळ शामली मानसीशी बोलल्या होत्या त्यामुळे त्या दोघीही एकमेकांना फार जवळून ओळखत होत्या ..." ए अभि मुलगी तुझ्यासारखिच आहे बर का ..अगदी गोड .जस मला समजून घेतलंस ना तसच मुलीला पण समजून घे ..आणि कधीच बंधन नको घालू तिच्यावर .." मानसी म्हणाली ..आज समोरण वेळ ती तिच्यासोबतच खेळत होती ..

समोरूनच राहुलने मला बघितलं आणि मला मिठी मारली आणि म्हणाला , " अभि यार मानलं पाहिजे ..मी तुझ्या जागी असतो तर हे सत्य कधीच पचवू शकलो नसतो पण तू ते केलंस आणि तिला एक नवीन ओळख निर्माण करून दिलीस ..खरच यार आज गरज आहे तुझ्यासारख्या लोकांची ..प्रेम करणाऱ्यांची ..भाऊ फक्त एकदा चरण स्पर्श करू दे तुझे " म्हणत तो माझे पाय पकडू लागला आणि मी त्याला मिठीत घेत म्हणालो , " आता कळाल न मग ..आता वेळ आहे स्वतःच्या बायकोला समजून घेण्याची ..तिला फक्त शरीरासाठी वापरू नका ..मग बघ तुला अभि स्वतातच सापडेल ." त्याच्या चेहऱ्यावर मला तो आनंद सापडला आणि माझ्यामुळे पुन्हा एक पुरुष स्त्रीला समजून घेऊ शकला याचा आनंद होता..

शेवटी कार्यक्रम सुरू झाला ..एक एक विधी समोर जाऊ लागला आणि शाश्वत केनीचा झाला ..शाश्वतने केनिला अंगठी घातली आणि ती त्याचीच झाली..शाश्वत केणी दोघेही स्टेजवर बसून होते आणि सोनालीने त्यांना डान्स साठी खेचून आणलं..आज विकास - सोनाली , शाश्वत - केणी जोडीने डान्स करत होते ..शामली माझ्या बाजूलाच उभी होती ..मानसी शामली जवळ येत म्हणाली , " शामली तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आज मी अभिसोबत डान्स करू शकते प्लिज " तिने होकार भरला आणि मानसी माझ्या जवळ येत म्हणाली , " अभि वुड यु लाइक टू डान्स विथ मी प्लिज " मी होकार भरला आणि ती माझा हात पकडतच डान्स करायला घेऊन जाऊ लागली ..सोनाली - विकास , केणी - शाश्वतसोबत आम्हीही डान्स करू लागलो ..
आणि पुन्हा एकदा ते शब्द घुमू लागले ..

शोखियो से डुबी ये अदाये
चेहरे से झलकी हुयी है
जुल्फ की घनी - घनी घटाये
शान से ढलकी हुयी है
लेहराता आंचल है जैसे बादल
बाहो मे भरी हो जैसे चांदणी
रूप की चांदणी..

मै अगर कहू तुमसा हसीन
कायनाथ मे नही है कही
की जिनमे तुम हो
क्या तुम्हे मै बता सकू

तुम हुये मेहेरबान
तो है ये दास्तान
हो ..तुम हुये मेहेरबान
अब तुम्हारा मेरा है एक कारवान
तुम जहा मै वहा

मै अगर कहू
हमसफर मेरी
अफसरा हो तुम या कोई परी
तारीफ ये है भी तो सच है कुछ भी नही

तुमको पाया है तो जैसे खोया हु
कहना चाहु भी तो तुमसे क्या कहू
किसीं जबान मे वो लफज नही
की जिनमे तुम हो क्या तुम्हे मै बता सकू ..

मै अगर कहू तुमसा हसीन
कायनाथ मे नही है कही
की जिनमे तुम हो
क्या तुम्हे मै बता सकू ..
सच है कुछ भी नही

पुन्हा एकदा तिची तीच नजर आणि डोळ्यात कुठलीच भीती नाही अशी ही मानसी ..सर्वांचं जेवण झालं आणि मानसि आमच्या सोबत घरी आली ..

बरीच रात्र झाली होती ..आमची मुलगी झोपली पण आम्ही तिघे आताही गप्पा मारण्यात व्यस्त होतो ..मानसी शामलीकडे पाहत म्हणाली , " खूप लकी आहेस यार तू की तुझ्या आयुष्यात अभि आहे ..अभिसारख मन जपन कुणालाच शक्य नाही ..एकाच वेंळी सर्व नात्यानं खुश ठेवण त्याला मस्त जमत ..मी जेव्हा त्याची झाले होते ना तेव्हा खूप मुली जळायच्या माझ्यावर पण काय करू मी त्यासाठी बनलेच नव्हते पण तू ना त्याची कधीच साथ सोडू नको ..एक - एक क्षण त्याला तुटताना मी त्याला पाहिलं आहे आता नको येऊ देऊ ते क्षण पुन्हा ..बाकी तुझं नशीब म्हण की तो भेटला तुला " आणि मी मधातच टांग टाकत म्हणालो , " बघ हा मानसी माझी बायको तुझ्यावर ईर्षा करेल .." आणि ती हसून म्हणाली , " कस आहे ना अभि ईर्षा तुला व्हायला हवी कारण मला तुझ्यात इंटरेस्ट आहेच नाही ..हा पण तुझ्या बायकोत येऊ शकतो .."

तिचे शब्द रूममध्ये घुमू लागले आणि आम्ही मिश्कीलपणे हसू लागलो ..आज ती जुन्या दिवसांबद्दल खूप भरभरून बोलत होती आणि आम्ही तीच सर्व बोलणं ऐकत होतो ..कधीतरी शांत आणि लाजणारी मानसी या जगाच्या शर्यतीत कठोर बनली आणि आता ती सर्वाना भारी पडू लागली हे पाहून फारच आनंद होत होता ..रात्री बऱ्याच गप्पा मारल्यावर ती तिथेच झोपी गेली आणि मी हॉल ला परतलो ..

मानसी आमच्या घरी दोन दिवस होती ..आईसाठी मानसी खूपच खास होती त्यामुळे ती जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबतच राहायची ..दोन दिवस आम्ही कसा धिंगाणा घातला आणि ती निघाली पुन्हा एकदा नवीन प्रवासाला ..मी स्वतः तिला सोडायला गेलो होतो ..तिने शेवटचंच मला हग करत भारत सोडल कदाचित कायमच ..कारण तिला सध्यातरी या देशात कुठेच स्थान नव्हतं ..किती वाईट गोष्ट होती ना की ज्या देशात जिचा जन्म झाला त्याच समाजात तिला कुठलच स्थान नव्हतं ..कदाचित ही परिस्थिती बदलेल तेव्हा ती परत येईलही पण आपल्याच माणसांप्रति असलेली तिची घृणा खरच कमी होऊ शकेल का ? ..मानसी गेली पण सर्वाना विचारात पाडून ..फक्त खुश होतो मी एकटा ..तिला पुन्हा एकदा उडताना पाहून ..

मानसी गेली तीच रात्र ...आमची मुलगी शांत झोपून होती ..मीही शामलीच्या कुशीत बसून जुन्या आठवणींना उजाळा देत होतो ..तितक्यात शामलीचा प्रश्न आला .., " अभि स्पर्श म्हणजे नेमकं तरी काय ? " , मी तिला हसून म्हणालो , " मॅडम याआधी असाच प्रश्न मानसीने विचारला होता ..त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदललं ..तुझाही तर तोच विचार नाही ना ? ..माझं एवढं मोठं मन नाही हा पचवायला .." आणि ती शांत होत म्हणाली , " नाही रे अभि मुळात मानसी आणि तुझ्या वाटा फक्त एका स्पर्शामुळे वेगळ्या झाल्या तेव्हा मला प्रश्न पडतोय ..नेमका स्पर्श म्हणजे काय ..? "

मी तिच्या कुशीतून उठत म्हणालो , " माझी नजर जिथपर्यंत पोहोचते तिथून मला स्पर्श तीन प्रकारचे दिसतात ..

एक स्पर्श ज्यात एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाची फारच ओढ असते पण तो त्यांच्या नशिबात नसतो ..ते होत प्रेम करणाऱ्यांसोबत ..जे कुठल्यातरी जात , वर्ग या कारणांमुळे एकत्र येऊ शकत नाही आणि आपल्या आवडत्या व्यक्तीपासून नेहमीसाठी दुरावले जातात ..याच प्रकारात मानसिदेखील येते ..लोकांना लेस्बियन होणे हा रोग वाटतो पण प्रत्यक्षात हा कुठला रोग नाही ..जस माझं तुझ्याकडे आकर्षण आहे तसच त्यांचं त्याच लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षण असत ..यात चूक ना आईवडिलांची असते ..ना मुलांची ..शेवटी निसर्ग नियम तो ..जर समजा एखाद्या पुरुषाला महिनाभर पुरुषासोबतच शारीरिक संबंध करायला लावले ..आणि जेव्हा तो त्यातून बाहेर येईल तेव्हा त्याला विचारा बलात्कार काय असतो ? ..बिचारा खचून जाईल आयुष्यभरासाठी ..एवढंच काय तर त्याला हे जीवन नकोस होऊन जाईल मग मानसीला स्वीकारताना तो विचार समाजाच्या मनात का येत नाही ?..शातीर आहे ही दुनिया स्वतासाठी वेगळे नियम वापरते आणि दुसऱ्यांसाठी वेगळे नियम ...

दुसरा स्पर्श ..तो म्हणजे जे प्रेम करतात ..कुठल्यातरी कारणाने वेगळे होतात आणि मग कुठल्यातरी एका नवीन व्यक्तीसोबतच आयुष्य घालवू लागतात ..आई- वडिलांच्या भीतीने , समाजाच्या भीतीने ते त्या व्यक्तीपासून वेगळे तर होत नाही पण ती बोच आयुष्यभर कायम राहते आणि त्या व्यक्ती कुणाच्याच होऊ शकत नाहीत दुसऱ्या शब्दात त्या फक्त शरीराने जिवंत असतात ..ज्या शरीरावर समाजमान्य बलात्कार होत राहतो ..

तिसरा स्पर्श ...तो म्हणजे चुकीचा स्पर्श ..हा आजच्या काळातला सर्वात भयावह स्पर्श आहे ..कारण हा स्पर्श मुला - मुलींना अशा वयात होतो जेव्हा त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नसत ..तृप्तीबद्दलही असच झालं होतं ..बिचारी जीवनाला कंटाळली आणि जीवनच सोडून गेली ..कायमची..पण मला त्या आई वडिलांना एक प्रश्न विचारायचा आहे की नेमकी इज्जत कुणाची वाचवली ..कारण ज्या मुलीसाठी तुम्ही देव होता ..तिच्या नजरेत तर तुम्ही कायमचे पडले आहात ..आणि तृप्तीच्या प्रकरणात तिच्या आईने स्वतःच्या भावाला वाचवून काय मिळविल ..मग मला पुन्हा एक प्रश्न पडतो जर तुम्ही घरच्यांच्या चुकीविरुद्ध आवाज उठवू शकत नसाल तर मग खरच समाजाशी भांडण्याची शक्ती तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकाल ..मग कशाला निघता कँडल घेऊन जेव्हा एखाद्या मुलीचा रेप होतो तेव्हा ..तुम्हाला खरच हक्क आहे का ? ..फक्त जन्म देऊन आईवडिलांची जबाबदारी पूर्ण होते ? ..आता कुणीतरी म्हणेल की आम्ही सर्व खर्च करतो मुलांसाठी पण जर ती व्यक्ती आतूनच खुश नसेल तर खरच तुमच्या पैशाने ती व्यक्ती खुश होऊ शकेल ..समाज फारच बदलला आहे .कधीतरी किसिंग सिन पाहताना भीती वाटायची आता मात्र घरचे सर्व बसून बेड सिन पाहतात ..जर एवढेच आधुनिक झाला आहात तर मग आपल्याच मुलीशी चुकीचा स्पर्श काय असतो हे सांगायला काय हरकत आहे ..होऊ शकत सुरुवातीला ती अवघडेल पण तुमचा बिनधास्त स्वभाव पाहून ती तुम्हाला कधीतरी नक्कीच सांगेल ...आणि एक गोष्ट मला त्या मुलींना सांगावीशी वाटते ज्यांच्यावर घरच्यांचं एखाद्या व्यक्तींनी बलात्कार केला आणि ज्यानी अजूनही घरच्यांना सांगितलं नाही ..पण शांत बसून तुम्हाला काय मिळेल ? ..होऊ शकत की तुमचे आई- बाबा ऐकणार नाहीत पण भाऊ , बहीण , मित्र कुणीतरी ऐकणार की आणि नाही एकल तर तुम्हाला समाधान मिळेल की मी प्रयत्न तरी केला ..आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ही गोष्ट घरच्यांना सांगितली नाही आणि समोर जाऊन नवऱ्याने तुम्हाला केवळ व्हर्जिन नसल्याने सोडून दिलं तर हेच घरचे तुम्हाला प्रश्न विचारायला विसरणार नाहीत की बाई कुठून शेण खाऊन आली ? ..मी एकल होत की स्त्रियांमद्ये भरपूर शक्ती असते पण आजच्या काळात तीच कुठेतरी इतकी हरवली आहे की तिच्यावर अत्याचार होतो आहे हेसुद्धा स्वीकारू शकत नाही ..काय मस्त जग आहे न जी मुलगी दोन्ही घरांना सांभाळते तीच आज तणावग्रस्त आहे ..पण आता वेळ आहे उठुन लढण्याची आणि त्या प्रत्येक पुरुषाला सांगण्याची की स्त्री कुठलाही भाजीपाला नाही की तिला रस्त्यावर फेकून द्याल आणि कुणीच काही बोलणार नाही आता तर खरी वेळ आहे ही सांगण्याची की जी स्त्री तुम्हाला जन्म देऊ शकते तीच तुम्हाला नष्टही करु शकते ..

आणि सर्वात भयावह स्पर्श म्हणजे समाजमान्य बलात्कार ..जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या घरी जाते तेव्हा तिच्या खूप साऱ्या अपेक्षा असतात की आपला साथीदार आपल्याला अस जीवन देईल ..हे स्वप्न पूर्ण करील पण तिथे गेल्यावरच तिच्या संपूर्ण अपेक्षा क्षणात नाहीशा होतात ..पुरुष तीच मन समजून घेण्याऐवजी फक्त शरीरावर वार करीत असतो ..पुरुषासाठी स्पर्श म्हणजे शारीरिक संबंध तर स्त्रीला हवं असत मानसिक समाधान ..जेव्हा ते मानसिक समाधान तिला मिळत नाही आणि उलट तिच्याशी पती नियमित शारीरिक संबंध करीत असतो तेव्हा ती मनातून खचत जाते आणि तिला हे जीवन नकोस होत जातं ..ती जगते फक्त आपल्या मुलांसाठी ..पुरुषांना हे कसं समजत नाही की तिलाही शरीर असत ..तिलाही काही भावना असतात ..तिलाही वाटत की आपल्या नवऱ्याने आपल्याशी बोलाव समजून घ्यावं ..पण पुरुषाला कुठे हे समजत ( अपवाद सोडून ) ..त्यांना तर फक्त तिच्या अंगावर अधिपत्य गाजवायच असत ..आणि एखाद्या दिवशी स्त्रीने नकार दिला की मग मात्र आमचा इगो दुखावतो ..आणि तिच्यासाठी तो शरीरसंबंध समाजमान्य बलात्कार बनत जातो ..जिथे शरीर तर तीच असत पण ते कंट्रोल कुणी वेगळंच करत असत ..पुरुषांनी एक गोष्ट समजून घ्यावी ..आज बायको आहे म्हणून वागा हो हवं तसं तिच्याशी पण जेव्हा तुमच्या स्वतःच्या लाडक्या मुलीशी कुणी अस स्वतः वागेल तेव्हा खरच पचवू शकणार हे सर्व .?.ज्या मुलीसाठी तुम्ही कधीतरी आदर्श होता ..तीच मुलगी तुमचा चेहरादेखील पाहणार नाही आणि तुम्ही जगात भरपूर इज्जत कमावून देखील स्वतःच्याच नजरेत हरून जाल ..मग म्हणाल का की नवरा आहे तिचा हवं तसं वापरू दे तेच शरीर ..अहो आपल्या बायकोशी एकदा दोन प्रेमाचे शब्द बोलून बघा ..ती स्वताच तुमच्याकडे येऊन सांगेल की आज मला तुझ्यात सामावून घे ..आणि तोच स्पर्श तिच्यासाठी आनंद होईल ..आणि जर हीच स्त्री स्वतः तणावग्रस्त राहिली तर स्वतःच्या मुलांना योग्यप्रकारे सांभाळू शकेल ??..तिलाही समजत जाईल की जिथे आपलंच काही खर नाही तिथे माझ्या मुलीच काय होईल ..मी हे सर्व मानसीसोबत असताना अनुभवलं म्हणून सांगू शकतो ..नाही तर मीही फक्त त्या शारीरिक संबंधांमध्ये अडकून पडलो असतो ..

आणि आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर ..स्पर्श म्हणजे मन आणि शरीर यांचं मिलन ..जेव्हा एखादी व्यक्ती मनाने खुश असते तेव्हा ती स्वतःहून शरीर संबंधासाठी तयार होते ..पण जेव्हा तिचं मनच खुश राहत नाही तेव्हा फक्त असतो तो समाजमान्य बलात्कार ..मन आणि शरीर या दोन्हीही गोष्टी एकमेकांशी जुळून आहेत ..जेव्हा शरीर खूष असत तेव्हा मनदेखील आपोआप खुश होत आणि जेव्हा मन खुश होत तेव्हा शरीर आपोआप साद द्यायला लागत .स्पर्श म्हणजे दोन्ही व्यक्तीचा आनंद ..त्यातली एक जरी व्यक्ती खुश नसली तरी समोरच्या व्यक्तीला तो आनंद मिळू शकणार नाही .."

आणि शामली पुन्हा एकदा विचारू लागली , " अभि तुला नाही येत का आठवण मानसीची ..शेवटी तू प्रेम केलं आहेस तिच्यावर .." आणि मी हसून म्हणालो , " मॅडम आठवणी विसरता येतात का ?? ...नक्कीच ती आज स्पर्शाने माझी नाही पण मनाने ती आजही इथेच आहे ..खर सांगू तर जेव्हा माझं तीच्याशी लग्न झालं होतं तेव्हा मी जितका खुश होतो त्यापेक्षा जास्त आज आहे ..खूप सोपं असत ग एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर बंधनात बांधून ठेवण पण खूप कठीण असत एखाद्याला मोकळं करून आकाशात उंच उडायला लावणं ..जर दोन व्यक्ती एकत्र राहून खुश नसतील तर ते प्रेमच होऊ शकत नाही ..उलट ते दोन व्यक्ती वेगळे राहूनही एकमेकांविषयी आदर तेवढच प्रेम टिकून राहत असेल तर तेच प्रेम आहे ..कारण ते मनाशी जुळून असत ना की शरीराशी ..मला एक शायरी आठवते बघ

लाखो आशिक खडे है ऊस राह पर
जीनको मनचाहा हमसफर मिला नही ..
फिर भी वो अकसर धुंड लेते है उनको यादो मे
तुम्ही बता दो मेरी जाण क्या वो प्यार नही ??

मानसी माझं पहिल प्रेम आहे तिला दुःखात नाही तर सुंदर क्षणात आठवण करायचं आहे ..

शामलीचा चेहरा आता पडला होता आणि त्यावर मी म्हणालो , " कुणीतरी ईर्षा करत आहे वाटत ? " , आणि ती थोडा आवाज मोठा करत म्हणाली , " जीच्याकडे अभि आहे तिला कसली ईर्षा ..करेल इर्षा संपूर्ण जग ..?

आणि मी लाडात येत म्हणालो , " अस आहे तर !! मग मला मिळेल एक किस्सी ? ", आणि ती माझ्याजवळ येत म्हणाली , " मी तुझीच तर आहे अभि ..घे मला मिठीत आणि दे आनंद आयुष्यभरासाठी .."

तिच्या त्या गुलाबी ओठात मी आताही हरवलो आहे कारण आम्हा दोघांनाही आम्ही नेहमीच हवे असतो .आणि ती ओढ आम्ही कायम जपून ठेवतो ..


स्पर्श दोन अक्षरी शब्द ..कधी असतो जीवन तर कधी किळस ..

ज्या स्पर्शावर संपूर्ण सृष्टी जिवंत आहे तोच स्पर्श खास बनवायचा की आयुष्यभर स्वताला त्रास करून घ्यायच हे आपण ठरवायचं ..मला वाटत आयुष्यभर अत्याचार करण्यापेक्षा एकदा बोलून बघितलेलं बर ..होऊ शकत तुमचे काही प्रयत्न तुम्हाला त्यात यश मिळवून देतील ..माझी आई मानसीला म्हणाली होती की " आपल्यावर अत्याचार होतो हे स्वीकारायला खूप हिम्मत लागते आणि एकदा तो स्वीकारला की मग जगातल्या कुठल्याच व्यक्तीची भीती वाटत नाही .."

आणि राहिला समलैंगिकतेचा प्रश्न ..समलैंगिकता हा सुद्धा एक स्पर्शाच आहे ..माझं शामलीकडे जस आकर्षण आहे अगदी तसच..तो कुठला रोग नाही की औषध घेऊन सुधारता येईल ..म्हणून मानसिकता बदला ..लोकांना विरोध करू नका.. स्वतःभारतीय दंड संहितेच्या कलाम 377 नुसार समलैंगिकता ठेवणे हा गुन्हा होता ..हा कायदा 1860 चा होता ..पण अलीकडे न्यायालयाने कबूल केलं की न्याय देताना आम्हीही चुकलो ..प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि कुठल्याही प्रथा , परंपरा , समाज त्यांच्यापासून हे हिरावून घेऊ शकत नाही पण याहीपेक्षा त्यांना जास्त गरज आहे ती तुमच्या साथीची ..आपण फक्त समाजाच्या भीतीने ती साथ द्यायला विसरतो पण त्या समाजाबद्दल एक खास गोष्ट अशी की ज्यांना आपलं अस्तित्त्व टिकवायच असत ( मग ते चुकीचे असले तरीही) ते तोडफोड करून , ओरडून आपण कसे बरोबर आहोत हे सांगतात आणि चांगले व्यक्ती टीव्हीवर बातमी पाहून शोक व्यक्त करतात ..चांगले मानस असेंचस शांत राहिले तर खरच चांगल्या गोष्टी लवकर संपत जाईल आणि आपण पुढच्या पिढीला काहीच देऊ शकणार नाही .प्रथा , परंपरा , समाज व्यक्तीला सुदृढ बनविण्यासाठी असतो ना की कमजोर ..ही गोष्ट कळली तर आपण स्वताच चुकीच्या गोष्टींना विरोध करू शकतो ..पुरुष जेव्हा एखाद्या .व्यक्तीला साथ देतो तेव्हा तो जग काय म्हणेल याचा विचार करीत नाही पण त्या पुरुषाला बद्दलविण्यासाठी प्रत्येक स्त्रीने एकसंघ व्हायला हवं ..ती जर एका स्त्रीला समजून घेऊ लागली तर दुसरी मानसी कधीच जन्म घेणार नाही हे पक्क..त्यामुळे ती साथ आपण प्रत्येकाने नक्कीच द्यायला हवी ..आणि जर दिली नाही तर त्या प्रत्येक मानसीचा ( गे - लेस्बियन , चुकीच्या स्पर्शाच्या बळी पडलेल्या व्यक्ती आणि लग्न या संस्कारात केवळ बंधन बनून बनून राहिलेल्या स्त्रिया ) समाजमान्य बलात्कार होत राहील आणि त्यासाठी कुठेतरी आपण जबाबदार असू हे नक्की..

मै देखता रहा हर पल
आसमान की बुलंदियो को
पर ये सोच ना सका की
बुलंदिया सोचने से नही
कुछ करणे से हासील होती है ..
समाप्त .....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED