कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २२ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २२ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

भाग – २२ वा

-------------------------------------------------------------------------

अनुषा आणि अभिजित निघून गेल्यावर ..अजयजीजू आणि रंजनादीदी त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमात

काय बोलायचे कसे बोलायचे ? याबद्दल हे ठरवू लागले .

अनुशाने सुचना केली होती की –

तुम्ही दोघांनी ..सागर देशमुख यांच्याबद्दल बोलतांना त्यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत ..

हे ठीक आहे ,

रंजना दीदी बोलू लागली की –

क्षणभर असे मानूया की..समोरच्या श्रोत्यांना त्याबद्दल काहीच कल्पना नसल्यामुळे ..

त्यांना काही ही फरक पडणार नाही..कारण ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत ..त्या आपल्या

वडीलधार्या व्यक्तीबद्दल आहेत , आपल्याच माणसाबद्दलच्या आहेत ..आणि

त्या अर्थातच ऐकणार्याला छानच वाटणाऱ्या अशाच असणार आहेत , याबद्दल मनात काहीच शंका नाहीये ..

पण .जेव्हा स्वतः सागर देशमुख ही रेकॉर्ड केलेली मुलाखत पाहतील ..

ती पाहून ..अनुषा समोर ते कसे व्यक्त होतील ?

याचा अंदाज करता येणे कठीण आहे..

आणि म्हणूनच मनावर थोडे दडपण आलेले आहे .

रंजनाचे ऐकून घेतल्यावर अजय म्हणाले ..

हे बघ ..तुला तुझ्या बाबांच्या बद्दल चांगलेच बोलायचे आहे , छान असेच सांगायचे आहे..

मग,घाबरतेस कशाला ? उलट धाकधूक तर माझ्यामनात आहे..

कारण ..तुझ्या बाबांनी .. माझ्याशी समक्ष भेटून संवाद साधलेला नाहीये .

.इतर आणि परक्या लोकांच्या कडूनच

त्यांना माझ्याबद्दल काय आणि कशी माहिती मिळाली असेल ..काही कल्पना नाहीये.

त्यामुळे ..ज्या व्यक्तीचा माझा संवाद झाला नाही, सहवास घडलेला नाहीये ..अंदाजे बोलायचे झाले

तरी काय बोलावे मी ? असा प्रश्न मला पडलाय ..

तेव्हा ..रंजना ..आज कसाही विषय निघालाच आहे

तर ..तू मला तुझ्या घराबद्दल , तुझ्या आई-बाबांच्या बद्दल जितके सांगता येईल तितके सांग ..

मला माहिती तर होऊ दे ..

रंजनाच्या मनात विचार आला ..

इतके दिवस अजयने मोठ्या मनाने आपल्याला कधीच काही विचारले नाही , आणि विचारून मनाला

त्रास होईल ..म्हणून हा विषय सुद्धा कधी काढत नव्हते अजय ..

पण..आता ही योग्य वेळ आहे ..आपण त्यांना सांगायलाच हवे आहे..

रंजना सांगू लागली –

माझे बाबा ..सागर देशमुख ..एककल्ली , हेकेखोर , हटवादी , घमेंडखोर , अहंकारी , आहेत

त्यांच्याबद्दल असे समज ,पुढे गैरसमज सगळ्यांनी करून घेतलेत .असे बाबांचे मत आहे ,त्यामुळे

मनातून सार्या जगावर ते रागावले आहेत, आणि आपल्यावर आपल्या माणसांनी फार मोठा अन्याय

केलाय , अडवणूक केली, फसवणूक केली ..

असा पराकोटीचा गैरसमज त्यांनी करून घेत ..त्याच मानसिकतेतून ते जगत आहेत , वागत आले आहे..

अजय म्हणाले –

रंजना –

अशा व्यक्ती बाहेरच्या जगाशी निष्ठुरपणे , कठोरपणे वागतात ..जणू त्यांना बदला घ्यायचा

असतो , हे एक वेळ समजण्यासारखे आहे..

पण, पारिवारिक आयुष्यात तुझे बाबा ..तुझ्या आईशी , तुझ्या भावाशी , आणि तुझ्याशी सुद्धा

अशा कोरड्या मनाने का वागत आहेत ? याचे कारण मला उमजत नाहीये ...

तुझ्या आईवर त्यांचा इतका रोष का आहे ? निदान आयुष्याच्या संध्याकाळी तरी त्यांच्यात एकेमेकाब्द्द्ल

दुरावा नसावा ..उलट एकमेकासाठी आधार आहोत ही भावना त्यांच्या मनात असायला हवी ..

तरच उर्वरित आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगता येईल त्यांना .

माझ्यामते ..पैशाच्या सुखाने ..मन कधीच तृप्त होऊ शकत नाही ..कारण मनाची भूक ही भावनिक

असते .आणि ज्या माणसांचे भावना –विश्व जर अ समाधानी असेल तर असे आयुष्य एक दुखद

प्रवास असतो.

अजयचे बोलणे ..ऐकून घेत रंजना म्हणाली ..

तुम्ही आमच्या आई-बाबांच्या आयुष्याचे अगदी अचूक असेच वर्णन केले आहे ..

हे असे का झाले ? कसे झाले ? दोष कुणाचा ?

याची उत्तरे ..बाबांनी कधीच शोधली नाहीत ..त्यांनी ..या प्रश्नाना आपली शस्त्रे म्हणून वापरली

आणि आपल्या सगळ्या माणसाना सतत जायबंदी करण्यात , दुखावण्यात समाधान मिळवले

असावे असे मला आता वाटते ..

मी विचार करते तेव्हा मला वाटत असते की ..

काही माणसे अशी असतात की –त्यांचे नशीबच त्यांचा मोठा शत्रू असते . भले ही त्यांना सगळे

प्राप्त होते ..पण, ते मिळते त्यात ..त्यांच्या मनाचा कुणी विचार केला नाही “ हा मोठा अन्याय

झाल्याची भावना ..त्यांच्या मनात .दरवेळी खोलवर आघात करीत जाते .

अजय म्हणाले – असे काय घडले तुझ्या बाबांच्या बाबतीत ? की ज्यामुळे ते विक्षिप्त माणूस “

आहेत असे सगळ्यांना वाटू लागले आहे..

रंजना म्हणाली ..

या सगळ्या गोष्टी ..बाबंनी आमच्याशी तर कधीच शेअर केल्या नाहीत .किंवा आठवणी म्हणून

सुद्धा त्यांच्या गत आयुष्याबद्दल काही सांगितले नाही.

आई मात्र ..सागते पुष्कळ वेळा ..कारण ..बाबांच्या वागण्याचा सगळ्यात मोठा फटका तर तिला बसला

आहे.

रंजना –

बाबांच्या बद्दल आईकडून तुला जेजे कळाले आहे ..ते तरी सांग आज ..

हो सांगते ..असे म्हणून रंजना सांगू लागली ..

बाबांचे बाबा म्हणजे माझे आजोबा ..ज्यांना मी पाहिलेले नाही ..यांच्याशी बाबांचे अजिबात पटत

नव्हते ..कारण ..त्यांनी ..दुसरे लग्न केले ..

आणि .या दुसर्या आईने ..माझ्या बाबांची त्या घरातून हकालपट्टी केली

त्यावेळी ..वडील म्हणवणार्या या माणसान..एका शब्दांने थांबवले नाही ..

उलट ..आवारा ,निकम्मा , नालायक ..ठरवीत ..हाकलून देत म्हटले ..

बापाच्या जीवावर किती दिवस जगणार आहेस ...जा चालता हो इथून ..!

रस्त्यवर आलास म्हणजे कळेल तुला ..पैश्यची किंमत ..!

कॉलेजचे दिवस होते बाबांचे .. शिक्षण सुटले नाही हे नशीब ..कारण ..त्यांच्या मित्रांनी ,

कोलेजच्या सरांनी ..”एक हुशार ,मेहनती विदाय्र्थी म्हणून ..वसतिगृहात त्यांची सोय लावून दिली .

शिकता शिकता ..कमवले पाहिजे ..म्हणून नोकरीसाठी बाबा अनेक ठिकाणी फिरत राहिले ,

मिळेल ती नोकरी करण्याची त्यांची तयारी होती ..

आणि एक दिवस त्यांच्या नशिबाने ..त्यांना आणून सोडले ..माझ्या इकडच्या आजोबांच्या दारात .

माझ्या आजोबांचे एक छोटसे युनिट होते , मोठ्या कंपन्यांना उपयोगी पडणार्या वस्तू या ठिकाणी

तयार होत ,व सप्लाय केल्या जायच्या .

एकटे आजोबा ..सगळी कामे करू शकत नव्हती ..त्यामुले त्यांचा व्यवसाय मोठा होणे दूरच ..

दिवसेदिवस उतरणीला लागलेला होता ..

अशावेळी ..बाबांची आणि आजोबांची भेट झाली ..पहिल्याच भेटीत आजोबांना बाबांच्या मध्ये त्यांना

हवा असलेला उमदा माणूस दिसला .

आणि त्यांनी बाबांना नोकरी दिली ..ती एका अटीवर ..

झाडू मारण्यापासून ,ऑफिस चालवण्यापर्यंत सगळी कामे करण्याची तयारी असेल तर ..तू

माझ्या इथे काम करू शकतोस , शिकू शकतोस ..पण ..पगार कमी मिळेल ,कधी मिळणार पण नाही

कारण माझी आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही ..तू इथे काम सुरु कर ,जस जशी परिस्थिती

सुधरेल ..तुझा पगार नक्कीच तसा वाढेल ..हा माझा शब्द आहे ..तुला ..

आणि एक अट..

होस्टेल सोडून ..इथे राहायला यायचे , स्वतः स्वयपाक करून खायचे , तुझ्या कोलेजची फीस ,

परीक्षा फीस मी भरीत जाईन, त्याची तू काळजी करायची नाहीस .

इथे ..रखवालदार , शिपाई , बट्लर , कारकून ..,बँकेचे व्यवहार , रोख रकमा , सगळे काही तुला

करायचे आहे ..कारण..सध्याच्या स्टाफ वर माझा विश्वास उडालेला आहे..

आणि तुला माझा विश्वास कमवायचा आहे...!

आजची रात्र तुझ्या हातात आहे ..

विचार कर ,ठरव ,आणि उद्या सांग मला ..

स्वतःवर कमालीचा विश्वास असलेल्या बाबांनी दुसरे दिवशी माझ्या आजोबांना भेटून ..

यस , मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करण्यास तयार आहे..पण ,माझी पण अट आहे ..

आजोबा म्हणाले ..जरूर संग तुझी अट..

मी इथे कामावर आल्या पासून ..तुमचा शब्द इथे चालणार नाही ..अंतिम शब्द माझा

असेल ..मी तुम्हाला ..विचारनार नाही ..पण जे करीन ते केल्यवर मात्र सांगत जाईन ,

लपवणार नाही आणि हे जे काही आहे ..ते सर्व तुमचे आहे ते तसेच राहील .

पण..इथे जे होईल ते माझ्या इच्छेनेनुसार

आणि माझ्या पद्धतीने होईल .

बोला ..आहे कबुल ?

आजोबांनी क्षणभरही विचार केला नाही ..आणि खुर्चीतून उठत म्हणाले ..

या चाव्या ..आज पासून इथला सगळा तूच असणार .कोण कसा ? काही..काहीही समज .

आणि बाबांच्या सोबत असलेल्या त्यांच्या जुन्या सहकार्यांनी ..बाबांना त्रास देण्यास सुरुवात

केली ..कारण ..या सगळ्या लोकांचे खरे चेहेरे , आजोबांच्या समोर बाबांनी आणण्यास सुरुवात

केली ..,मग कामात अडथळे , कमी उत्पादन , वाढणारा तोटा , माणसाचे सोडून जाण्याचे प्रमाण

,या सगळ्या गोष्टींनी आजोबा परेशान झाले, पण ,चांगल्या माणसांना हाताशी धरून बाबांनी

आजोबांची डबघाईला आलेली छोटीशी कंपनी सावरली ..आणि नव्याने उभारणी केली ..

बाबांच्या व्यक्तीमत्वातला ..जिद्दी , मेहनती , प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर माणूस ..दिवसे दिवस

सगळ्यांच्या नजरेत भरू लागला ..आणि इथेच बाबांच्या मनात अहंकाराने घर करण्यास सुरुवात

केली , इच्छेने महत्वाकांक्षा रूप धारण केले ..बघता बघता परिसरात बाबा लक्षवेधी माणूस झाले.

एक दिवस ..आजोबांनी ..बाबांना घरी बोलावून घेतले ..

ते म्हणाले .. माझे बाहेरचे जग तर तू बदलवून दाखवलेस .. आता माझी कंपनी तुझ्या नावावर

करून द्यावी असे माझ्या मनात आहे ..पण..त्या अगोदर तू माझे आणखी एक काम करायचे आहे ..

तरच ..माझा हा सगळा अफाट व्याप ..जो तुझ्यामुळेच झाला आहे,

पण, अजून तो माझा ,माझ्या नावावरच आहे..

तो तुझ्या फक्त ..एका होकाराने .तुझा होऊ शकतो ..तो कसा ..

हे पण सांगतो , लपवून नाही ठेवणार तुझ्यापासून ..

माझी एकुलती एक मुलगी ..सरिता ..

जन्मली तेच एक व्यंग घेऊन ..मंद बुद्धी अपत्य म्हणून ती लहानाची मोठी झाली ..

ती दिसते भोळी , पण, तशी नाहीये ती ..सगळ व्यास्थित करू शकते ती ..

पण जशी जन्मली तशी ती आई-विनाच वाढली , कारण माझी पत्नी या डीलेव्हारीतच गेली ,

झालेल्या मुलीलाही ती पाहू शकली नाही .

त्यात पुढे सरिताला पोलिओ झाला ..तो बरा झाला ..पण,एक पाय थोडा अधू करून गेला ..

या आघाताने सरिता खचून गेली , मी बाप झालो , पण, आई होणे मला जमले नाही

सागर ..तू मझ्यावर विश्वास ठेव – सरिता ..एक स्त्री म्हणून ,पत्नी म्हणूनअसणार्या

कर्तव्यात कुठेच कमी पडणार नाही. पण, तिची मनोवस्था आणि अधूपणा तुला विसरून

जावा लागेल , सारीताला पत्नी म्हणून स्विकारलेस तर ..माझे हे सगळे उद्योग विश्व तुझे

झाले समज.

काही ही न बोलता बाबा तितून निघून गेले ..आणि दुसरे दिवशी ..पुन्हा आजोबांच्या घरी

आले ..आणि म्हणाले ..

तुमची ऑफर मला मंजूर आहे ...

आजोबा आनंदून गेले ..आणि लगेच ..सागर देशमुख आणि सरिता यांचे लग्न लावून दिले .

आईने आजोबांच्या घराचे नाव “प्रेमालय “ठेवले ..

पण, आई दुर्दैवी ..

तिला पती मिळाला ,पण त्याचे प्रेम नाही मिळाले , स्त्रीला ..मातृत्व –सुख हवे असते ..ते ही

तिला मिळाले .पण, नंतरच्या काळात लौकिक दृष्टीने ते नवरा बायको , मनाने आणि शरीराने

कधीच एकरूप झाले नाही ..कारण ..बाबांनी ठरवून ..तिला दूर केले ..दूर ठेवले ..तिच्या मनात

कायम अपराधी भावना जागती ठेवली ..की

तिच्या बापाने सागर देशमुखला फसवून ..अशी पोरगी गळ्यात बांधली ..

..आजोबांनी जो विश्वास दाखवला ..त्याप्रमाणे बाबा वागत नाहीयेत ..हा धक्का आजोबांना सहन

झाला नाही , सागर देशमुखने आपली इस्टेट ,उद्योग बळकावण्यासाठी ..हे लग्नाचे नाटक केलाय

असा समज आजोबांनी करून घेतला .

बाबा त्यांना म्हणयचे ..

लोकांच्या नजरेत आणि कागदोपत्री ..मी तुमच्या लेकीचा नवरा आहे , आणि नेहमीच राहील ,

त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल काही बोलायचे नाही . नवरा-बायोक्त काय चाललेले आहे ?

यात गोष्टीत नाक खुपसायचे नाही , वय झाले तुमचे , गप्प पडून राहायचे,

तुम्ही माझी फसवणूक केलीय ..मी नाही केली तुमची फसवणूक ..

हेच तर पटवून देत जाईन..तुमच्या मंद बुद्धी पोरीला .

बाबांचे हे वागणे असह्य होत गेले आणि आजोबा या दुखातच जग सोडून गेले .

आई, मी आणि अभिजित ..तिघे ही बाबांच्या अंतर्मनात जागा मिळवू शकलो नाहीत .

अभी बापासार्खाच जिद्दी ..स्वतःच्या पायावर जगून दाखवीन ..पण, तुमच्याशी नाते आहे

असे कधीच कुणाला सांगणार नाही ..आणि निघून गेला ..

मी , तुमच्या सहवासात आले अजय ..आणि माझ्या आयुष्यात प्रेमाची उणीव होती ती तुम्ही

भरून काढली ..

बाबांनी समजून न घेता ..त्यांना मुलगीच नाहीये असे सांगण्यास सुरुवात केली ..

असे असल्यावर ..मी तुम्हाला या माणसाबद्दल काय सांगणार ?

आणि हे सगळे भोग जी भोगत आलेली आहे त्या बद्दल काय सांगणार ..

रंजनाच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून अजय म्हणाले ..

आपण अनुशाला मदत करू या ..

ती तुमच्या आयुष्यात हरवलेल्या प्रेमाला एकत्र आणायचा प्रयत्न करते आहे ..

उद्या बघू काय काय होते ?अनुशाच्या कोलेज मध्ये .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग -२३ वा लवकरच येतो आहे

------------------------------------------------------------

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------

.