Mahanti shaktipithanchi - 10 books and stories free download online pdf in Marathi

महती शक्तीपिठांची भाग १०

महती शक्तीपिठांची भाग १०

या ५२ शक्तीपीठा व्यतिरिक्त आदि शंकराचार्य द्वारा वर्णित १८ महाशक्तिपीठे आहेत .
यामध्ये काही शक्ती पिठांचा पण उल्लेख आहे ज्यांची माहिती ५२ शक्ती पिठात आलेली आहे .
तरीही यातील काही शक्तीपिठांच्या मंदिरा विषयी विशेष माहिती प्राप्त होते .
त्यांची मंदिरे आणि विस्तृत माहिती अशी आहे ....

१) लंका शक्तिपीठ त्रिन्कोमेली,

श्रीलंका येथे सती आईची कमर पडली होती .

आई येथे “शंकरी” रुपात विराजमान आहे .

याविषयी ची माहिती ५२ शक्तीपीठात सामील आहे .

२)कांची कामकोडी शक्तिपीठ कांची,तामिळनाडु

येथे सती आईच्या शरीराचा मागील भाग पडला होता .

आई इथे “कामाक्षी देवी” रुपात विराजमान आहे .

याविषयी ची माहिती ५२ शक्तीपीठात सामील आहे .

३) प्रद्युम्न शक्तिपीठ पंडुआ, पश्चिम बंगाल

इथे सती आईचे पोट पडले होते .

आई येथे “श्रृंखला देवी” रुपात विराजमान आहे .

पश्चिम बंगाल च्या हुगली नदीच्या तीरावर पंडुआ येथे अति प्राचीन श्रृंखला देवीचे मंदिर आहे .

हे मंदिर देवी दुर्गाला समर्पित आहे.

आदि शंकराचार्यांच्या मतानुसार श्रृंखला देवी शक्तिपीठ सर्व शक्तिपीठा मध्ये दुसर्या क्रमांकावर आहे .

पौराणिक कथेनुसार ..

ऋषि श्रृंग यांनी पंडुआ मध्ये शकुंतलामातेची कडक तपश्चर्या केली, ज्याचे फळ म्हणून त्यांना मातेचा आशीर्वाद मिळाला होता एक दिवस मातेच्या आदेशावरून महर्षि कर्नाटकात श्रृंगेरी नावाच्या ठिकाणी गेले .
शकुंतला माता सुद्धा त्यांच्या सोबत आली होती .
यानंतर ऋषि श्रृंग यांनी श्रृंगेरी च्या डोंगरावर शक्तिरूपी देवी माता श्रृंखला स्थळाची स्थापना केली .
श्रृंखला याचे दोन अर्थ आहेत ..

एक म्हणजे एकात एक गुंतवलेली साखळी किंवा धागा आणि दुसरा म्हणजे गरोदर महिला पोटावर बांधते तो पट्टा.
पहील्या अर्थांनुसार आपल्याशी बंधित किंवा साखळी प्रमाणे जोडलेली आहे .
अर्थात जगत्माता भगवान शिव यांच्या सत्याच्या बंधनात बांधली गेली आहे .
दूसऱ्या अर्थानुसार देवी बालकाची आई आहे अर्थात विश्वातले सर्व प्राणीमात्र तिची बालके आहेत .

४) क्रौन्ज शक्तिपीठ म्हैसूर , कर्नाटक

इथे सती आईचे केस पडले होते .

कर्नाटक राज्यात मैसूर शहरापासून १३ किमी दूर चामुंडी पहाडावर 'श्री चामुंडेश्वरी मंदिर'स्थित आहे .

हे मंदिर माँ दुर्गा (पार्वती) चे एक स्वरुप 'माँ चामुंडेश्वरी' ला समर्पित आहे .

पौराणिक काळात हे स्थळ 'क्रौंच पुरी' म्हणून ओळखले जात होते .

याचमुळे दक्षिण भारतात या मंदिराला 'क्रौंचपीठम' म्हणले जाते .
असे मानतात कि शक्तिपीठाच्या रक्षणासाठी कालभैरव सुद्धा इथे सदैव उपस्थित असतात .
द्रविड़ शैलीत निर्माण केलेल्या या मंदिरात एक मुख्य दरवाजा , चांदीपासून बनवलेले प्रवेश द्वार, नवरंग सभामंडप, अंतराल मंडप, गाभारा आणि प्राकार बनवलेले आहेत .

मंदिच्या दरवाजावर भगवान् श्री गणेश ची प्रतिमा कोरलेली आहे.
चांदीपासून बनवलेल्या द्वारावर आईच्या विभिन्न रूपातल्या प्रतिमा बनवलेल्या आहेत .
मूळ मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात होयसालचे राजा विष्णुवर्धन यांनी केली होती .
या मंदिराचे शिखर १७ व्या शतकात विजयनगरच्या राजांनी बनवले होते .
१३९९ ईसवी सालात मैसूरच्या वोडेयारों ची सत्ता आल्यानंतर या मंदिराचे महत्व वाढले .
माँ चामुंडेश्वरी मैसूरच्या महाराजांची अधिष्ठात्री देवी होती .
या मंदिराच्या जवळच्या पहाडावर महाबलेश्वर मंदिर, नंदी मंदिर आणि देवी कुंड (तलाव ) आहे .

५) योगिनी शक्तिपीठ आलमपुर, तेलंगणा


इथे सती आईचे पुढचे दात पडले होते .
आई इथे योगम्बा देवी रुपात आहे
हे माँ योगिनी मंदिर आहे स्थित पाथरगमा भागात गोड्डा जिल्ह्यात मध्ये झारखंड येथे आहे .
हे जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर बारकोपा येथे आहे.
मां योगिनीचे हे प्राचीन मंदिर तंत्र साधकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
याचा इतिहास खूप जुना आहे.
ऐतिहासिक आणि धार्मिक पुस्तकांनुसार हे मंदिर द्वापार युगातले आहे आणि पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाचा काळ येथे घालवला .
महाभारतातही याचा उल्लेख आहे .
तेव्हा हे मंदिर 'गुप्त योगिनी' म्हणून प्रसिद्ध होते.
तंत्र साधनेच्या बाबतीत जंगलांच्या मध्यभागी असलेले हे मंदिर कामाख्यासारखे आहे .
दोन्ही मंदिरात पूजेची पद्धत समान आहे.
दोन्ही मंदिरांना तीन दरवाजे आहेत.
योगिनी ठिकाणी देहाची पूजा केली जाते. कामाख्यामध्येही देहाची पूजा केली जाते.
असे म्हणतात की पूर्वी येथे नरबलि दिला जात असे.
परंतु ब्रिटीशांच्या कारकिर्दीत तो बंद करण्यात आला.
मंदिरासमोर बटचे झाड आहे.
लोकप्रिय समजुतीनुसार, साधक या चिखलाच्या झाडावर बसून ध्यान साधना करीत असत व सिद्धी प्राप्त करत असत.
मंदिराचा गाभारा आकर्षणाचे विशेष केंद्र आहे.
आईचा गाभारा मा योगिनी मंदिराच्या डावीकडूनउजवीकडे जवळजवळ ३५० पायर्यावर डोंगरावर आहे.
गाभाऱ्यात जाण्यासाठी एका गुहेतून जावे लागते.
या मंदिराकडे बाहेरून पहात असताना आत जाण्याची हिम्मत होत नाही कारण आत पूर्णअंधार आहे.
पण जेव्हा गुहेत प्रवेश होतो तेव्हा उजेड जाणवतो , परंतु तेथे वीज नसते.
बाहेरून गुहेचे अरुंद दरवाजे आणि आतले मोठाले दगड पाहून लोक गुहेत आत जाण्याचे धाडस करू इच्छित नाहीत, परंतु आईच्या आशीर्वादाने अगदी जाड व्यक्तीदेखील सहज त्यामध्ये प्रवेश करू शकते.
गाभाऱ्यात साधू त्यांच्या अभ्यासामध्ये मग्न असतात .
मा योगिनी मंदिराच्या अगदी उजवीकडे टेकडीवरील “मनोकामना मंदिर “आहे. इथे गेल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात .
जे भक्त आई योगिनीला भेटायला येतात, ते या इच्छापुर्ती मंदिरात जायला विसरत नाहीत.

६) श्री शैल शक्तिपीठ श्रीशैलम, आंध्र प्रदेश

इथे आईचा गळ्याचा भाग पडला होता

आईचे रूप “भ्रमरम्बा देवी”आहे .

याची माहिती ५२ शक्तीपीठात आली आहे .

७) श्री शक्तिपीठ कोल्हापुर, महाराष्ट्र

या ठिकाणी आईचे डोळे पडले होते.

इथे आईचे रूप “महालक्ष्मी देवी”आहे .


याची माहिती साडेतीन शक्तीपिठात यापुढे दिलेली आहे .

८) रेणुका शक्तिपीठ माहूर , महाराष्ट्र

या ठिकाणी आईचा डावा हात पडला होता

आईचे रूप “रेणुका देवी” आहे .

याची माहिती यापुढे साडेती शक्तीपिठात दिलेली आहे .

९) उज्जयिनी शक्तिपीठ उज्जैन, मध्य प्रदेश

या ठिकाणी सती आईची जीभपडली .

आई महाकाली देवी हरसिद्धि माता रुपात आहे .

उज्जैनचे हे प्रसिद्ध शक्तिपीठ हर सिद्धि माता मंदिर ,महाकाल ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळच आहे .
या मंदिरात माँ कालीच्या मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस माँ लक्ष्मी आणि देवी सरस्वतीच्या मुर्ती आहेत .
महाकालीची मुर्ती लालभडक रंगात रंगवलेली आहे .
सोबत आईचे “श्री यन्त्र” सुध्धा मंदिर परिसरात बसवलेले आहे .
याच जागेवर महान कवी कालीदासांनी आईबद्दल प्रशंसात्मक काव्य रचना केली होती .
ही देवी राजा विक्रमादित्य याची आराध्य देवता होती .
असे म्हणतात की राजा विक्रमादित्याने आपले शीर तब्बल११ वेळा देवीला दान केले होते आणि प्रत्येक वेळेस देवीने ते शीर परत जोडून दिले होते .
हे मंदिर शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर भेरूगढ़ येथे आहे .
मंदिर सकाळी ४.०० वाजता उघडते व रात्री ११.०० वाजता बंद होते .
मंदिरात भस्म आरती सकाळी ४ ते ६
नैवेद्य आरती ७.३० ते ८.१५
महा भोग आरती १०.३० ते ११.१५
संध्या आरती सायंकाळी ६.३०ते ७.१५
शयन आरती रात्री १०.३०वाजता असते

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED