महती शक्तीपिठांची भाग ९ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महती शक्तीपिठांची भाग ९

महती शक्तीपिठांची भाग ९

४९)विराट- भरतपूर अंबिका शक्तीपीठ

हे शक्तीपीठ राजस्थानमधील विराट नगर, भरतपूर येथे आहे.

राजस्थानची राजधानी जयपुर ,ज्याला गुलाबी नगरी म्हणून ओळखले जाते .

या नगरीच्या उत्तरेस महाभारतकालीन विराट नगराचे प्राचीन विध्वंस झालेले अवशेष आहेत .

त्या जवळ एक गुहा आहे , ज्याला भीम की गुफ़ा म्हणले जाते .

याच विराट गावात हे शक्तिपीठ स्थित आहे .

या ठिकाणी आई सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली .

इथे आईचे रुप “अंबिका”असुन सोबत शिवशंकर “अमृत” रुपात विराजमान आहेत .

जयपुर आणि अलवर या दोन्ही ठिकाणा पासुन विराट ग्राम इथे जाण्यासाठी मार्ग आहेत .

भरतपुरला लोहागढ़ या नावाने ओळखले जाते .

शक्तीपीठ मंदिर येथे विराटनगर च्या बैरत गावात आहे ...

५०)सर्वानंदकारी मगध शक्तीपीठ

बिहारच्या पाटणा येथे माता माता सतीची उजवी मांडी पडली.

हे शक्तीपीठ सर्वानंदकारी म्हणून ओळखले जाते .

इथे आईचे रूप “सर्वानंदकरी “असुन सोबत शिवशंकर “व्योमकेश “रुपात विराजमान आहेत .

५१)कालीघाट कालिका शक्तीपीठ

पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यात हे शक्तीपीठ आहे .

कालीघाट शक्तीपीठ ( बांगला )हा कोलकत्त्याचा परिसर आहे, जो काली माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

रामकृष्ण परमहंस यांची आराध्या देवता मां कालिकाचे हे कोलकत्त्या मधील विश्व प्रसिद्ध मंदिर आहे .

कोलकत्त्या च्या उत्तरेला विवेकानंद पुलाजवळ असलेल्या या मंदिराला दक्षिणेश्वर काली मंदिर म्हणतात .

या पूर्ण परिसराला कालीघाट म्हणतात .

या स्थानावर आई सतीच्या उजव्या पायाचा अंगठा पडला .

या शक्तीपीठातील मूर्तीची प्रतिस्थापना कामदेव ब्रह्मचारी (पूर्वीचे नाव जीया गंगोपाध्याय) यांनी केली .

आज हे स्थान काली भक्तांसाठी सर्वात मोठे मंदिर आहे.

आईची मूर्ती जीवा सोन्याची असून ती बाहेरून आली आहे.

काली मंदिरात कालीच्या भव्य स्वरुपाची मूर्ती स्थापित केली आहे.

या पुतळ्यामध्ये देवी कालीचे भगवान शिवाच्या छातीवर पाय आहेत.

तिच्या गळ्यात नरमुंडांची माळआहे, तिच्या हातात कुऱ्हाड आहे आणि काही नरमुंड हातात आहेत तर काही नरमुंडही तिच्या कमरेला बांधलेले आहेत .

त्यांच्या जिभा बाहेर येत आहेत आणि जिभामधून थेंब थेंब रक्त पडतआहे.

काही पौराणिक कथा अनुसार .....

देवीला एखाद्या गोष्टीचा राग आला आणि त्यानंतर तिने शरसंहार करण्यास सुरवात केली.

जो कोणी तिच्या मार्गात येतो त्याला ती ठार मारू लागते आणि मग तिचा राग शांत करण्यासाठी सर्व देव शिव शंकरांना विनंती करतात .

तिचा राग शांत करण्यासाठी भगवान शिवशंकर तिच्या मार्गात पडलेआहेत .

देवीने रागाने शिवाच्या छातीवर पाऊल ठेवले, त्याच वेळी तिने भगवान शिवाला ओळखले.

तिने ताबडतोब नरसंहार बंद केला .

काली ही हिंदू धर्माची प्रमुख देवी आहे.

कालीची व्युत्पत्ती “काल” अथवा “समय” यापासून झाली आहे .

काली शब्दाचा आणखी एक अर्थ काळा रंग असाही आहे .

मां कालीची चार रूपे आहेत दक्षिणा काली, स्मशान काली, मातृ काली आणि महाकाली

दुर्गा या सुंदर स्वरूपाचा हा सामर्थ्यशाली अवतार आहे, ज्याचा जन्म भुतांना ठार मारण्यासाठी झाला.

बंगाल आणि आसाममध्ये त्यांची विशेष पूजा केली जाते.

आईचे हे रूप म्हणजे नाश करणारेच आहे, परंतु हे केवळ त्यांच्यासाठीच आहे जे दानव आहेत व ज्यांना दयामाया नाही.

हे रूप वाइटावर चांगला विजय मिळविणारे आहे, म्हणून आई काली चांगल्या लोकांची हितचिंतक आहे आणि ती आदरणीय आहे.

तिला महाकाली असेही म्हणतात.

भगवती कालीने दशमविद्येमध्ये पहिले स्थान मिळवले आहे .

काली देवी यांना आद्य महाविद्या असेही म्हणतात.

भगवती कालीचे स्वरूप अत्यंत भयंकर आहे, परंतु देवी त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करतात.

तंत्र ग्रंथांमध्ये भगवती महाकालीच्या अनेक रूपांचे वर्णन आहे.

कोणतीही व्यक्ती आई महाकालीवर विशेष भक्ती आणि अतुट श्रद्धा ठेवून तिची कृपा प्राप्त करू शकते.

सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी काली देवीची पूजा केली जाते.

इथे आईचे “कालिका” रुपअसून सोबत शिवशंकर “नकुशील “रुपात विराजमान आहेत.

कालिकाच्या दरबारात जो एक वेळ जातो तेव्हाच त्याच्याविषयी सर्व माहिती आईला ठाऊक होते .

इथे जसा आशीर्वाद मिळतो तशीच शिक्षाही मिळते असा समज आहे .

आईच्या नावाची ही एक वेगळीच “ओळख “आहे .

५२) कामगिरि- कामाख्‍या शक्तीपीठ

भारतात आसाम च्या गुवाहाटी जिल्यातील कामगिरि क्षेत्रात असलेल्या नीलांचल पर्वता वरील कामाख्या या ठिकाणी

सती आईचा योनिभाग पडला .

इथे आईचे रूप “कामाख्या”असुन सोबत शिवशंकर “उमानंद”रुपात विराजमान आहेत .

या ५२ शक्तीपिठांसोबत आणखी एका शक्तीपिठाचे नाव घेतले जाते ते म्हणजे
गोदावरी बाण शक्तीपीठ किंवा सर्ववेल हे प्रसिद्ध शक्तिपीठ आहे, हे हिंदूंसाठी एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे.
हे मंदिर आंध्र प्रदेशातील राजामंडळ जवळ गोदावरी नदीच्या काठावर कोटिलेश्वर मंदिरात आहे.

गोदावरी बाण शक्तीपीठ हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि मंदिराची वास्तुकला भव्य आणि आश्चर्यकारक आहे. मंदिराचे गोपुरम उंचीवर बांधले गेलेले असल्यामुळे मंदिर खूप प्रशस्त दिसते .
मंदिरात सर्व देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत .
हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे, जी गंगेनंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे.

या मंदिरात शक्ती विश्वेश्वरी आणि राकिणी देवीची उपासना केली जाते आणि भैरवाची वत्सनाभ आणि दंडपाणी म्हणून उपासना केली जाते.
हे सकाळी ६.०० वाजता उघडते आणि संध्याकाळी ७.३० वाजता बंद करा.

येथील मुख्य उत्सव: शिवरात्रि, दुर्गापूजा आणि नवरात्र आहेत .

दर बारा वर्षांनी गोदावरी नदीच्या काठावर पुष्करम मेळा भरतो.
आपल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी लाखो भक्त लोक भारतातील सर्व राज्यातून येतात.

सर्व उत्सव गोदावरी बाणात साजरे केले जातात, विशेषत: शिवरात्र, दुर्गापूजा आणि नवरात्रोत्सवावर विशेष पूजा-अर्चना केली जाते. सणाच्या दिवसात हे मंदिर फुले व दिवे यांनी सजवलेले असते .
या ५२ शक्तीपीठा व्यतिरिक्त आई सतीच्या शरीराचे तुकडे आणखीही अनेक ठिकाणी पडले होते .
ही एकूण शक्तिपीठे १०८ आहेत असे म्हणतात तरीही यातील बरीचश्या शक्तीपीठांची माहिती मिळु शकत नाही .
मात्र अज्ञात ठिकाणी ती आहेत अशी मान्यता आहे .



क्रमशः