स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 5 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 5 )


सब कुछ दिया है ए खुदा
तुने मुझे न मांगते हुये भी
बस इस बार जिल्लत भरी जिंदगी से
मुझे मौत से नवाज दे

नित्या अडखळत अडखळत देव्हाऱ्यात जाऊ लागली ..तिला त्याने शरीरावर दिलेल्या वेदना असह्य झाल्या होत्या ..ती कधी छातीवर तर कधी पोटावर हात लावत होती पण वेदना काही कमी होत नव्हत्या ..कशी तरी देव्हाऱ्यात पोहोचत ती खाली बसू लागली आणि शरीरात त्राण नसल्याने ती जमिनीवर तशीच पडली ..तिला तिथे हात धरून उठविणार कुणीच नव्हतं त्यामुळे वेदनेने हुंकार देत ती उठून बसली ..तिला थोड फार लागलं होतं पण थोड्या वेळेपूर्वी मिळालेल्या जखमांसमोर ते काहीच नव्हतं ..तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि स्वतःचा हात देवाऱ्यासमोर आपटत ती म्हणाली , " देवा का केलंस अस ? कोणत्या जन्मीच पाप होत ज्याची फळ तू देत आहेस मला ..लहान असताना आईला हिरावून घेतलंस आणि पोरकी झाले ..वाटलं कधी वडील तरी समजून घेतील पण त्यांनाही आपल्या बायको मुलांसमोर कधीच दिसले नाही आता असा नवरा दिलास ..जो प्रत्येक क्षणी ओरबाडून खातो..जर आयुष्यात आनंद द्यायचा नव्हताच तर जन्म का दिलास मला ?..की तुलाही हेच हवं होतं ..तूही तर निष्ठुर होऊन हे सर्व पाहतच आहेस ..तुला जराही कीव नाही येत का रे माझी ..सांग ना ? का असा दगड बनून बसला आहेस ..की तू खरच दगड आहेस ..सांग ना देवा ..सांग ना ..कोणत्या पापाची शिक्षा देत आहेस मला .."

ती आता देवालाही बोलून थकली होती ..रडून रडून तिच्या अंगात त्राणच उरला नव्हता ..तिला समोर बोलणे देखील जमत नव्हते ..तरीही कशीतरी बेडवर जाऊन पडली आणि तिला केव्हा झोप लागली तिचे तिलाच कळले नाही ..

दुपारची सायंकाळ झाली होती पण नित्या काही उठली नव्हती ..सकाळी बाहेर गेलेले बाबा परत आले आणि चहा टाकण्यासाठी नित्याला आवाज मारू लागले ..10 - 15 मिनिटे आवाज मारून देखील नित्या उठली नव्हती त्यामुळे बाबा थोडे घाबरले आणि तिच्याजवळ गेले ..त्यांच्या लक्षात आले की नित्याचे हात पाय थरथरू लागले आहेत ..त्यांनी तिच्या हाताला स्पर्श करून पाहिला तर तिला फार जास्त ताप चढला होता ..तिच्या अंगावर चादर टाकून त्यांनी नित्याच्या सासूबाईंना बोलावून घेतले ..त्या आल्या आणि मृन्मयला फोन करू लागल्या ..नित्याला ताप चढलाय हे ऐकून मृन्मय जरा घाबरला आणि फोन ठेवताच तो घराकडे निघाला ..गाडीवर असताना देखील त्याच्या डोक्यात एकच विचार सुरू होता की तिला जर काही झाले तर ..आपण दुपारी तिच्याशी तसे वागलो म्हणूनच तिची ही अवस्था झाली आहे हे त्याला कळून चुकलं आणि तो भरधाव वेगाने घराकडे निघाला ..सोसायटीमध्ये आला आणि गाडी पार्क करून तो धावतच घरी पोहोचला .. नित्या समोर थरथरत होती आणि त्याचेही भान हरपले ..आईच्या कणखर आवाजाने तो पुन्हा भानावर आला..ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करू लागला ।.पण नित्याला मात्र उठणे देखील शक्य नव्हते ..तिची ही अवस्था पाहून त्याने सोसायटीमध्ये रिक्षा बोलवून घेतली आणि नंतर तो तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये निघून गेला ..नित्याला बराच ताप असल्याने डॉक्टरने तिला चेकप करण्यात दिरंगाई केली नाही ..चेकप करत असताना मृन्मय थोडा घाबरला होता ..कारण डॉक्टरला तिच्यासोबत काय झालं हे कळलं असत तर ते त्याला बरच काही बोलले असते ..त्यामुळे तो शांतपणे त्यांच्याकडे बघू लागला ..तर डॉक्टर लक्ष लावून तीच चेकप करत होते ..त्यांनी तिला इंजेक्शन दिले आणि त्याच्या जवळ येऊन बसले ।.मृन्मय थोडा घाबरला होता ..डॉक्टर डोळ्यावरचा चष्मा काढत म्हणाले , " मिस्टर मृन्मय घाबरायचं काहीच कारण नाही .. तुमच्या बायकोला ताप जरा जास्तच आहे सो तिला कुठलेही काम करू देऊ नका ..दोन दिवसात ती पुन्हा चांगली होईल ..मी काही औषध लिहून देतो ते तिला द्या ..ती बरी होईल .." असे म्हणत त्यांनी गोळ्यांची चिट्ठी त्याला दिली आणि मृन्मय डॉक्टरांना फिज देत नित्याला घेऊन बाहेर आला ..

मृन्मय घरी आला तेव्हा अंधार पडला होता ..नित्याला काहीच खायची इच्छा नव्हती पण औषध घ्यायच असल्याने तिने ज्यूस घेतले आणि औषध घेऊन ती लगेच पडली तर आज स्वयंपाक बनवावा लागत असल्याने सासूबाई मात्र ओरडत ओरडत स्वयंपाक बनवू लागल्या होत्या ..त्यांचा तोंडाचा पट्टा काही कमी होत नव्हता हे पाहून मृन्मय म्हणाला , " आई किती ओरडशील आणखी ..बस की जरा शांत .." ..त्याच्या आईला वाटलं की हा नित्याच्या काळजीमुळे बोलत होता पण त्याला भीती मात्र वेगळीच होती ..तर आपला मुलगा आपल्यावर ओरडला हे पाहून ती लगेच शांत झाली ..आज कितीतरी दिवसांनी नित्या शांत पडली होती..ती आताही थरथरत होती पण चांगली गोष्ट म्हणजे थोडा ताप कमी होऊ लागला ..सकाळ झाली नि नित्याला थोडा आराम वाटू लागला पण थोडी फार कमजोरी तिला वाटतच होती त्यामुळे ती बिछान्यावरून उठली नव्हती तर रात्रीपासून आपल्याला च काम करावं लागतं असल्याने सासूबाईचा पारा आणखीच वाढला होता ..त्यांनी नित्याला चहा आणून दिला तेव्हाही त्या तिच्याकडे रागाने पाहत होत्या ..अशा अवस्थेत देखील सासू बाई तिला टोमणे मारन सोडलं नव्हतं ....सकाळची पुन्हा सायंकाळ झाली ..नित्याला बर वाटू लागलं होतं शिवाय सासूबाईंच बोलणं नको म्हणून तिने स्वतः काम करायला सुरुवात केली ..त्याच वेळी मृन्मय आत आला आणि जोराने आईवर ओरडत म्हणाला , " आई तुला काही कळत की नाही ..तिची अजून तब्येत बिघडली तर ..दोन दिवस काम केलं तर काय बिघडत .." त्याच्या या शब्दाने नित्या शॉक झाली ..परंतु तिने काम थांबवलं नव्हतं ..तर आई रागाने लाल झाली होती ..असेच दोन तीन दिवस गेले नि नित्या पूर्णपणे बरी झाली ..या दिवसात तो भीतीने तिच्याशी एक शब्द देखील बोलला नव्हता....

त्याचा हा स्वभाव केवळ काही दिवसच राहिला आणि पुन्हा त्याने रुद्र रुप धारण केले ..ती बरी झाल्यावर त्याने पुन्हा एकदा तिचा छळ करायला सुरुवात केली पण यावेळी नित्या हार मानणार नव्हती ती त्याला मर्यादेबाहेर संबंध ठेवायला नकार देऊ लागली त्यामुळे तो दिवसेंदिवस रागीट होत चालला होता ..कधी कधी तिचा नकार एकूण तो असाच निघून जायचा तर कधी तो जबरीने तो तिचा उपभोग घ्यायचा ..ती आता नेहमीच नकार देत असल्याने शंकेचे बीज त्याच्या डोक्यात निर्माण झाले होते आणि तो तिच्या प्रत्येक हलचालिवर लक्ष देऊन असायचा ..तिच्या आयुष्यात कुणीतरी आहे अशी त्याला भीती वाटू लागली होती म्हणून तो सतर्क झाला होता फक्त याबद्दल त्याने नित्याला कळू दिलं नव्हतं ..आणि नित्यालाही त्याच्या मनातले हे भाव कधी लक्षात आले नाही ..

नित्या तशी आस्तिक ..उपवास करणे , देवाची रोज पूजा करणे ह्यात तिला फार आनंद मिळायचा त्यामुळे तिला कितीही त्रास झाला तरीही तिने उपवास कधीच सोडले नव्हते पण मागील काही दिवसांपासून तिचा देवावरचाही विश्वास उडाला होता आणि तिने उपवास करणे बंद करून टाकले ..देवाबद्दल आस्था मनात होती पण त्याची पूजा करणे ह्याकडे तिने आता जाणूनच दुर्लक्ष केले होते.. तिला कळून चुकलं होत की जन्म आपण घेतला आहे तर सर्व काही आपल्यालाच सहन कराव लागेल मग देवाला दोष देऊन तरी काय फायदा ..त्यामुळे ती आलेला दिवस पुढे ढकलू लागली होती ..

आज वटसावित्री ..नित्या नेहमीप्रमाणेच सकाळपासून आपल्या कामात व्यस्त होती ..तिला आज स्त्रियांचा सण आहे हे माहीत असूनही ती कामात कसलीही घाई करत नव्हती ..तेवढ्यात सासूबाईच म्हणाल्या , " ओ महाराणी किती आरामशीर काम करत बसली आहेस ..लवकर तयार हो ..आज पूजेला जायचं नाही का ? की ते पण विसरलीस .."

नित्या हळूच आवाजात म्हणाली , " मी नाही मानत ते सर्व त्यामुळे पूजेला जाणार नाही .."

घरात बॉम्ब फुटावा अशी स्थिती निर्माण झाली ..सासूबाई खेकसतच म्हणाल्या , " हो म्हणा ..तू तर आहेसच नवाबगडची राणी ..तुला कस जमेल हे सर्व ..आमचंच नशीब की तू आमच्या घरी आली आहेस आमच्या घराण्याचा उद्धार करायला ..तुला तुझ्यासमोर आमच्या घराण्याची इज्जत का दिसणार ? ..मग समाज आमच्या तोंडात शेण घालेल तरीही तुला काय फरक पडणार आहे ..तुझ्या घरच्यांकडून आणखी काही अपेक्षा तरी काय करायच्या ..हेच तर संस्कार दिले त्यांनी तुला ।."

ती तेवढं बोलून बाहेर निघून गेली तर घरच्यांचा उल्लेख केल्याने नित्यालाही राग आला होता ..सासूबाई बाहेर गेल्याने नित्या पुन्हा शांत होऊन काम करू लागली पण सासूबाई पुन्हा आतमध्ये येऊन तेच ते एकवू लागल्या आणि नित्याला मनात वाटून गेलं ।." कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच .." पण आज जर मी गेले नाही तर सासूबाई दिवसभर हे सर्व एकवतील म्हणून नित्या काम लवकर आटोपून तयारी करू लागली ..नित्याच काम आटोपलं आणि ती पूजेसाठी बाहेर जाऊ लागली ..तिने काही चुकी करू नये म्हणून सासूबाईंनि सर्व समजावून सांगितलं होतं तर नित्या केवळ मान हलवत होती .त्यांचं प्रवचन एकूण झाल्यावर ती पूजेच्या स्थळी निघाली ..काहीच अंतरावर वडाच झाड होत ..ती तिथे पोहोचली आणि गोळा झालेल्या बायकांना न्याहाळू लागली ..प्रत्येकीचा चेहरा आनंदाने बहरून होता आणि नित्या मनात विचार करू लागली की ह्या स्त्रियांमध्ये कितीतरी नित्या असतील पण आपल्या कुटुंबासाठी मात्र त्यांनी स्वतःच अस्तित्त्व देखील नाहीस केलं ..त्यांना माहिती आहे की हेच जीवन आपल्याला कसेतरी काढायचे आहे तरीही हाच पती भेटावं म्हणून त्या इथे आल्या आहेत ..किती झनींनी काय काय भोगल असेल काय माहिती पण ते सर्व विसरून कुटुंबासाठी चेहऱ्यावर हास्य फुलवून उभी राहणारी व्यक्ती म्हणजे स्त्री ..देवा काय बनवलंस ना तू स्त्रीला !! "

ती विचार करतच होती तेवढयात तिला कुणीतरी आवाज दिला आणि तीही सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे पूजा करू लागली ..ती वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालत असताना पुन्हा एकदा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल आणि ती मनातल्या मनात म्हणाली , " देवा जर एक स्त्री आपल्याला हाच पती सात जन्म मिळावा म्हणून पूजा करत असेल तर मग पुरुषाला नकोय का बायको सात जन्म ? ..तो बोर होत असेल ना एकच बायको ठेवून म्हणून त्याला पूजा करावी लागत नाही ..हो ना ? ..काय किमया आहे रे तुझी ? ..ए पण देवा बर झालं की ही पूजा पुरुष करीत नाही कारण त्याने सात जन्म मला मागितलं असत आणि तू खरच दिलं असतस तर ..उगाच रिस्क नको रे बाबा " तिच्या मनात हा विचार आला नि ती खुदकन हसली तर बाजूच्या स्त्रिया तिला पाहू लागल्या ।.तिने मात्र कुणाकडेच बघितलं नाही ..पण त्या विचाराने तिचा चेहरा मात्र फार खुलला होता ।.ती पूजा आवरून घरी पोहोचली ..सासूबाई रूममध्ये एकट्याच बसल्या होत्या ..त्यांना पाहून नित्या लगेच टोमणा मारत म्हणाली , " वाचली का तुमच्या घराण्याची इज्जत !! " तिचे शब्द एकूण सासूबाईचा चेहरा लाल झाला होता तर नित्या गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे लक्ष न देताच समोर निघून गेली पण त्यांचा तसा चेहरा पाहण्याची संधी मात्र तिने सोडली नाही ..तिने एकदा पुन्हा त्यांच्याकडे बघितलं आणि तिचा चेहरा आंदनाने बहरून निघाला ... तर सासूबाई रागाने ढवळून निघाल्या होत्या ...

नित्या आणि मृन्मयच्या लग्नाला वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला होता ..नित्याच्या आयुष्यात फार काही बदल झाला नव्हता ..त्याचा तो अत्याचार ती दिवसेंदिवस सहन करत होती ..पण शारीरिक संबंधाबाबत तिने त्याला मर्यादेत ठेवायला सुरुवात केली आणि मृन्मयचा एक क्रूर चेहरा तिला पाहायला मिळाला ..तो तिला नेहमीच मारू लागला आणि त्याला थांबवणार कुणीच नव्हतं तर ती जास्त बोलली की कुटुंब तिला उद्धट म्हणू लागल ..पण ती आता इतकी सहनशील झाली होती की ती त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत होती ..एक दिवस घरकाम करत असताना नित्या चक्कर येऊन खाली पडली ..सायंकाळची वेळ असल्याने तो घरीच होता ..त्यामुळे लगेचच तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला ..डॉक्टरांनी तीच चेकप केलं आणि प्रसन्न चेहऱ्याने ते परत आले ..नित्याही मृन्मयच्या बाजूला येऊन बसली ..डॉक्टर आनंदी होत म्हणाले , " अभिनंदन मिस्टर अँड मिसेस मृन्मय तुम्ही आईवडील होणार आहात ..आणि बर का आता हलगर्जीपणा करून चालणार नाही ..तुम्हाला तुमच्या बायकोची जास्त काळजी घ्यावी लागेल .." डॉक्टर बरच काही बोलत होते तर नित्याच पूर्ण लक्ष मृन्मयवर होत ..तिच्या नजरेने वेधून घेतलं की ही बातमी ऐकताना मृन्मयच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता..आणि हा आनंद म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडून येण्याची आशा होती ..त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तीही आनंदी झाली होती ..आणि पून्हा एकदा नव्याने सुखी जीवण्याच्या स्वप्नांत रममाण झाली ..एक नवीन पहाट नित्याच्या आयुष्यात काय घेऊन येणार होती हे नित्यालाही माहीत नव्हतं ..

क्रमशः ...