स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 7 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 7 )

हर बंदिश हर औरत की
एक जैसी कहाणी है
सीचे लहू पसिने से जिंदगीभर
फिर भी समाजने औलाद तो मर्द की ही मानी है .


अनु एका वाटेने तर नित्या दुसऱ्या वाटेने निघाली होती ..नित्याने मेन रोडवर येताच रीक्षा केली आणि घराकडे जाऊ लागली ..रिक्षातही ती एकटीच होती ..आजूबाजूला गाड्यांचा घोंघाट सुरू असतानाही पुन्हा एकदा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल ..." खरच स्त्री हे कोड नक्की काय आहे ? ...लहानपणापासून तिच्यावर कितीतरी बंधने लादली जातात आणि तिथूनच तिला मनासारखं जगता येत नाही ...विचार केलाय का कधीतरी , ती स्वतःची आवड म्हणून स्वयंपाक बनविण्यापेक्षा सासरच्या लोकांनी काही बोलू नये म्हणून बळजबरीने ती सर्व शिकू लागते...खरच स्त्री नक्की काय कोड असते ? ...थोडी मोठी झाली की मग येतात बंधन ...पहिलं बंधन ..म्हणजे लग्न .. इच्छा सो वा नसो तिला तव स्वीकारावं लागत...नंतर येत आई नावाचं बंधन ..जी ती स्वतःहून स्वीकारते ..त्या छोट्याशा गोळ्याला सजवते , आकार देते आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मात्र तिच्या मतांचा कुठेच विचार केल्या जात नाही .. आपल्याच घामाने मोठ्या केलेल्या मुलावर ती निर्णय घेऊ शकत नाही ..खर्च स्त्री नक्की काय कोड आहे ? ..

मी अनुला बोलून तर गेले की मला फक्त मुलगाच हवा आहे पण त्यामागच कारण काय असेल हे कुणीच समजून घेतलं ..किती वेदना झाल्या असतील तस बोलताना ते तिला खरच कळलं असेल का ?..त्यालाही ही पुरुषच जबाबदार होते ...अगदी लहानपणापासूनच कधी वडिलांनी कधी आजोबांनी माझ्या आयुष्याचे निर्णय घेतले ..तर आता नवरा घेतो ..माझं वागणं असो की बोलणं त्यावर सर्वांची निगा असते आणि जेव्हा मला त्रास होतो तेव्हा मात्र ते माझं कर्तव्य म्हणून मला सांगितल्या जात आणि पुन्हा कायमच बंधनात जीवन जगाव लागत ..त्यामुळे स्वतःच्याच मुलीचे असे हाल मला बघवणार नाहीत ..फक्त हे तिला सांगायला जमलं नाही..( पुन्हा क्षणभर विचार करत ) पण नित्या अनु म्हणाली तशी मुलगी झाली तर ..सासूबाई तर आधीपासूनच मुलाचा हट्ट करून बसल्या आहेत आणि मृन्मयलाही तसच वाटत असेल तर या निरागस बाळाला पोटातच कस मारून टाकायचं ..किती पाप लागेल मला आणि या पापाच ओझं मी खरच मिटवू शकेन का ? "

ती विचारचक्रात हरवली होती तेव्हाच रिक्षा चालक म्हणाला ," मॅडम आपका स्टॉप आ गया है ."

नित्या भानावर आली आणि पैसे देऊन पुन्हा चालू लागली ..जर मृन्मयला मुलगी नको असेल तर हा विचार तिच्या डोक्यात आला आणि ती मनातून फारच खचली ..मृन्मय अजून तरी अस काहीच बोलला नव्हता पण त्याची शक्यता नाकारता येत नव्हती ..आईच्या हट्टासमोर तो हरू शकतो हे नित्याने जवळून पाहिलं होतं त्यामुळे तिला त्याच्यावर विश्वास नव्हता ..म्हणूनच तिने त्याच्या मनातलं काढायच हा विचार पक्का केला ..ती विचार करत करतच घरी आली ..समोर सासूबाई बसून होत्या तिला पाहताच त्या म्हणाल्या , " काय ग महाराणी तुझ्या घरच्यांनी तुला एक दिवस पण घरी ठेवलं नाहीं की काय .." अस म्हणत त्या स्वतःच जोराने हसू लागल्या ..पण नित्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होत ..तिने त्यांच्या हसण्याकडे लक्ष दिलं नाही आणि बाथरूममध्ये जात चेहऱ्यावर पाण्याचे थबके मारले ..दोन तीन वेळा चेहऱ्यावर पाणी मारल्यावर ती थोडी शांत झाली ..पोटात बाळ असल्याने ती आता फार हालचाल करन शक्य नव्हतं म्हणून हळूच ती बाजूला येऊन बसली ..काही क्षण असेच गेले ..नित्याच घड्याळावर लक्ष गेलं तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते ..घरचे सर्व ओरडतील म्हणून ती लगेच कामाला लागली ..आज नित्या स्वतःच्या घरी जाऊन आल्याने सासूबाई तिला फारच टोमणे मारत होत्या ..पण नित्या आताही कुठेतरी हरवली होती ..जणू तिला कशाचचं भानच नव्हतं ..रात्रीला 10 च्या सुमारास त्यांचं जेवण आटोपलं ..आईबाबा बाहेर फिरायला गेले होते ..मृन्मय देखील आपल्या मित्रांना भेटायला जाणार होता तेव्हढ्यात नित्या त्याला थांबवत म्हणाली , " मृन्मय एक ना मला जरास महत्त्वाचं बोलायच आहे तुझ्याशी .." त्याने मोबाईलकडे लक्ष दिलं नि नंतर तिच्याकडे वळून पाहिलं ..त्याला काय वाटलं माहिती नाही पण तिचा चेहरा पाहून तो म्हणाला , " हा पटकन बोल .."

तिनेही आपलं मन घट्ट केलं ..थरथरत्या हातांची मुटठी आवळली आणि अडखळत बोलून गेली , " मृन्मय आई म्हणते की आपल्याला फक्त मूलच व्हायला हवं तुलाही तसच वाटत का म्हणजे मुलगी झाली तर !!.."

तिने प्रश्न विचारताच त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले ..डोळे अचानक मोठे झाले आणि त्याचा चेहरा अधिकच भयंकर दिसू लागला ..तो तिच्या बाजूने येऊ लागला ..त्याचे ओठ तो काहीतरी बोलणार आहे हे सांगत होते तेवढ्यात त्याचा फोन वाजला ..मृन्मयने तो उचलला आणि लगेच येतो म्हणून तिच्याकडे घृणास्पद नजर टाकून तो घराबाहेर पडला ..तो जवळ आल्याने नित्या फार घाबरली होती ..काळीज वरखाली होऊ लागलं होतं ..तो गेला नि नित्याने स्वतःला शांत करून घेतलं ..लगेच किचन मध्ये जाऊन पाण्याचे दोन ग्लास पोटात रचले ..तिला आता थोडं बर वाटू लागलं होत ..आणि शांत होत ती अंथरुणावर जाऊन पडली ..कितीतरी वेळ ती तशीच पडून होती ..तिच्या विचारांनी तिची साथ अजूनही सोडली नव्हती ..तास भर झाला तेव्हा आईबाबा येऊन बाजूला पडले तर नित्या केवळ डोळे लावून पडली होती ..ते आले नि बोलता बोलता झोपी गेले पण नित्याच्या मनात एकच प्रश्न होता ..त्याने मुलीसाठी नकार दिला तर ? आणि तीच काळीज पुन्हा वर खाली होऊ लागलं ..रात्री 1च ह्या सुमारास मृन्मय दारू पिऊन घरी आला होता ..पण नित्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही ..तिला झोपताना पाहून तोही बेडवर जाऊन पडला ..पण नित्या आताही तिथेच हरवली होती

त्या दिवसांनंतरही नित्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायच ठरवलं पण ते शक्य झालंच नाही ..तो अलीकडे कामात व्यस्त असायचा नि रात्री उशिरा यायचा..कामाचा ताप बहुतेक जास्त झाल्याने तो पिऊनच घरी यायचा ..कधी कधी लवकर आला तरीही आईबाबा घरी असल्याने त्यांच्या समोर सर्व काही विचारण्याची तिची हिम्मत झाली नाही ..रविवारी तो घरी असायचा ..पण त्यादिवशी तिने बोलण्याचा प्रयत्न केला की काय तुझी खटखट म्हणून तो उठून निघून जायचा किंवा मग एकच दिवस मिळतो म्हणून तिच्या शरीरावर तुटून पडायचा त्यामुळे त्याच्याशी बोलणं राहूनच गेलं ..

नित्याच बाळ आता हळूहळू मोठं होऊ लागलं लागलं होतं ..त्यामुळे तिला स्वतःला सावरून काम करणं अवघड जात होतं ..अस म्हणतात की स्त्रियांना डोहाळे लागले की त्या आपल्या आवडीचं खायला मागतात पण नित्याच्या बाबतीत अगदी उलटंच घडून येत होतं ..तिला साधं पाणी सुद्धा पचवणं जड जाऊ लागलं ..सतत मळमळ होऊ लगल्याने नित्याच कुठल्याही कामात मन लागत नव्हत ..तीच शरीरही फार कमजोर होऊ लागलं होतं त्यामुळें तिला फक्त बेडवर पडून राहावंसं वाटत होतं तर सासूबाई मात्र स्वतःहून कुठलंच काम करत नव्हत्या त्यामुळे त्याही स्थितीत ती नाईलाजाने काम करत होती ..सासूबाईंना कुणी काही बोललं की म्हणायच्या , " आम्ही कधी बाळांना जन्म दिलाच नाही होय ..थोडा फार त्रास सहन करावा लागतोच स्त्रीला आणि जितका जास्त त्रास होईल तितकं बरच रे बाबा !!..पुन्हा तिला बाळाच्या जन्मवेळी त्रास सहन करायचा आहेच मग त्याची सवय आताच करून घेतलेली बरी .." इतकं बोलून त्या कामापासून स्वतःला वाचवून घेत होत्या ..नित्या तशी काम करत होती पण एखाद्या वेळी राहवलं नाही की बेडवर जाऊन पडायची आणि मग पूर्ण दिवसभर आईला काम करावं लागायच त्यामुळे त्यांना नित्याचा आणखीच राग येत होता ..नित्याला आता दिवसेंदिवस हा त्रास सहन होत नव्हता ..बाळ केव्हा एकदाच बाहेर येईल याची ती आतुरतेने वाट पाहू लागली ..

आणखी 3 - 4 महिन्याचा कालावधी उलटून गेला ..नित्याचा गर्भ आता 6 महिन्याचा झाला होता आणि पोटात बाळ हालचाल देखील करू लागल होत ..पोटाचा आकार वाढू लागल्याने तिला घरच काम आवरण कठीण जात होतं पण तरीही तिच्यावर कुणालाच दया येत नव्हती ..याही अवस्थेत ती घराचं सर्व आवरत होती ..आज डॉक्टरने नित्याला अपॉइंटमेंट दिली होती ..त्यामुळे सकाळचा स्वयंपाक आवरून ती डॉक्टरकडे जाणार होती ..मृन्मयलाही ऑफिस मध्ये काम असल्याने तो धावपड करत होता ..त्याची घाई तिला कळत होती तरीही ती त्याच्या जवळ जात म्हणाली , " मृन्मय तुला आठवण आहे ना आज चेकपसाठी जायच आहे .." त्याने तिच्याकडे बघितले आणि डोक्याला हात मारला ..तिच्याकडे बघत तो म्हणाला , " सॉरी नित्या आज महत्त्वाची मिटिंग आहे सो नाही येऊ शकत तू आईसोबत जा ना !! "

आईसोबत जा ऐकताच नित्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसली ..त्यालाही ते जाणवलं आणि तो विचार करत म्हणाला , " बर एक गोष्ट होऊ शकते ..मी स्पेशल रिक्षा करतो ..इकडून जाताना तुला हॉस्पिटलला सोडतो आणि मग तू त्याच रिक्षाने परत ये .."

आईसोबत जाण्यापेक्षा तिला हा पर्याय बरा वाटला ..तिनेही त्या गोष्टीसाठी होकार दिला ..तो तिला तयार व्हायला सांगून खाली रिक्षा आणायला गेला . मृन्मय परत आला तेव्हा नित्याची तयारी झाली होती ..नित्याने फाइल सोबत घेतली तर मृन्मय आपली बॅग हातात घेत घराबाहेर पडले ..तिची अशी अवस्था असताना तिच्यासोबत कुणी येऊ नये याच तिला वाईट वाटत होतं त्यामुळे ती मृन्मयकडे पाहत होती तर ऑफिसला जायला उशीर होत असल्याने तो आपल्या घड्याळाकडे पाहत होता त्याला तिच्या भावना क्षणभरदेखील कळाल्या नव्हत्या ..रिक्षात शांत वातावरण होत आणि सुमारे पाऊण तासानंतर रिक्षा हॉस्पिटल समोर थांबली ..त्याने तिला आतमध्ये नेऊन बसवले आणि एक शब्दही न बोलता तो धावतच बाहेर निघून गेला तर रिक्षा चालक तिची वाट पाहत बाहेर बसला ..नित्याच्यासमोर आणखी काही लोक होते त्यामुळे तिला वाट पाहणं गरजेचं होतं ..त्या अनोळखी वातावरणात ती एकटीच बसून होती आणि तीच लक्ष बाजूला असलेल्या लहान मुलांच्या पोस्टरकडे गेलं .त्यांचे ते हसरे चेहरे पाहण्यात ती स्वतःच हरवून गेली ..आपणही आपल्या बाळासोबत हे करायचं ते करायचं म्हणत ती स्वतःच गालातल्या गालात हसू लागली ..सुमार अर्धा तास झाला नि नित्याचा नंबर आला ..नित्या पावले मोजत मोजत डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचली ..डॉक्टरांनी तिला बसायला सांगितले ..समोरच्या खुर्चीवर बसताच डॉक्टर म्हणाल्या , " काय ग नित्या एकटीच आली आहेस ...घरून कुणीच आलं नाही .."

डॉक्टरांच्या अशा प्रश्नाने तिचा चेहरा थोडा कोमेजला आणि ते त्यांच्या लक्षात यायला वेळ लागले नाही ..डॉक्टरांनी स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि म्हणाल्या .., " काही हरकत नाही ..आपण चेकप करू .." आणि नित्याला चेकप करण्यासाठी नेण्यात आले ..डॉक्टर पूर्ण लक्ष केंद्रित करून तिला चेक करत होते आणि पोटावर हात ठेवत म्हणाल्या , " बाळ त्रास तर नाही देत ना ग तुला जास्त .."

तसच नित्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती लगेच म्हणाली , " त्रास तर देतच त्याला आपल्या आईला शांत बसू देणं आवडत नाही बहुतेक .."

नित्याच्या अशा बोलण्याने दोघेही हसले ..चेकप झाल्यावर डॉक्टरांनी नर्सला बोलावून घेतले आणि ती नर्स नित्याचा हात पकडून दुसऱ्या रूम मध्ये जाऊ लागली ..नित्या त्यांना कुठे चाललो आहे हे विचारत होती तर डॉक्टर हसून उत्तर देणे टाळत होत्या ..काही क्षणात त्या नित्याला एका विशेष रूम मध्ये घेऊन गेल्या ..नर्सने तिला बेडवर झोपवलं आणि डॉक्टर काहीतरी करू लागल्या ..नित्या थोडी घाबरली होती आणि नित्या अडखळत म्हणाली , " काय झालं डॉक्टर आता तरी बोला ना ? " ..

डॉक्टर बाई तिला हसून म्हणाल्या , " अग हो ..हो ..थांब.. किती ही घाई !! तू मागे आली होती तेव्हा म्हणाली होती ना की तुला जाणून घ्यायचं आहे की तुला मुलगा होणार आहे की मुलगी तर एक ते रिपोर्ट्स आले आहे ..खर तर ते कायद्याने चुकीच होत पण तुझी स्थिती पाहून मी तयार झाले ..आणि आता एक तुला तुंह्यासारखीच सुंदर आणि गोड मुलगी होणार आहे .."

हे ऐकून नित्या विचारात पडली होती तेवढ्यात पुन्हा डॉक्टर म्हणाल्या , " आणि हो मी तुला इथे आणायच कारण म्हणजे आज पहिल्यांदा मी तुला तुझ्या मुलीचे हार्ट बिट एकवणार आहे ..तुला आवडेल ना .."

डॉक्टरांचे शब्द एकूण ती आनंदी झाली ..आणि मागच सर्व काही विसरून गेली ..डॉक्टरांनी तिला बाळाचे हार्ट बिट ऐकवले आणि तिचे डोळे आंदनाने भरून आले ..तिला वाटत होतं की त्याक्षणी तरी मृन्मय तिच्या सोबत असावा ..तिने त्याला एकदा आठवण केले आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात अश्रू आले ..तरीही आज ती खूप खुश होती ..डॉक्टरांनी परत तिला केबिनला नेले आणि काही औषध लिहून तिला घरी जाण्यास परवानगी दिली ..नर्सने तिला सर्व औषध घेऊन दिले आणि रिक्षामध्ये नित्याला बसवून ती परत आली ..नित्या रिक्षामध्ये बसली होती ..तिला आपल्याला मुलगी होणार आहे याचा आनंद तर होताच पण घरचे हे ऐकल्यावर काय म्हणतील याची चिंता होती ..एकीकडे तिला वाटत होतं की घरच्यांना सांगावं तर दुसरीकडे वाटत होतं की तिच्याशी काहीच बोलू नये ..कारण मुलगी होणार आहे हे त्यांना आवडलं नाही तर ..ती एका विचित्र संकटात सापडली होती आणि त्याच वेळी रिक्षा घरासमोर येऊन थांबली ..ती पैसे देत घराकडे जाऊ लागली ..तिचा चेहरा भीतीने कोमेजला होता तर हात थरथर कापू लागले होते आणि तिने घरात प्रवेश केला...


क्रमशः ...