कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 24 वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 24 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग -२४ वा

------------------------------------------------------------------------

सकाळी अकरा वाजता अंजय आणि रंजना दोघे ही अनुशाच्या कॉलेज मध्ये कार्यक्रमासाठी

पोंचले . प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जाऊन बसल्यावर आरंभीच्या औपचारिक गप्पा

झाल्या . ते दोघे आलेले आहेत हे अर्थातच अनुशाला माहिती नव्हते .दुपारी एक वाजता कार्यक्रम सुरु होणार त्याधी

तिला मेसेज करायचा असे अगोदर पासून ठरलेले होते. हे प्रिन्सिपलसरांना देखील माहिती

होते.

चहा घेतांना अजय म्हणाले .सर ,

तुमच्या कोलेजच्या परिसरात असलेल्या बागेस मला भेट द्यायची आहे, या कामाशी संबंधित

असलेल्या माळी-काकांची भेट घायची ,त्यांच्याशी बोलायचे आहे, यासाठी माहिती देण्यासाठी मार्गदर्शक

म्हणून तुम्ही कुणी तुमच्या स्टाफ मधील दिलात तर माझे काम खूप सोपे होईल .

आणि ,मी नेमके काय केले आहे ..हे मी दुपारच्या कार्यक्रमात सर्वांच्या समोर जाहीरपणे सांगणार आहे.

थोडक्यात ..हे काम माझ्या वैयक्तिक स्वरूपाचे नसून ..सामाजिक स्वरूपाचे आहे “याबद्दल खात्री बाळगावी “

हे ऐकून प्रिन्सिपलसर म्हणाले ..

अहो अजय सर -असा खुलासा करण्याची काही आवश्यकता नाहीये .

तुम्ही काही वावगे आणि गैर वाटेल असे काही काम करणार नाहीत “ याची मला खात्री आहे.

आणि कोलेजच्या एका स्टाफ मेंबरला सोबत घेऊन -अजय आणि रंजना निघाले .

सोबत आलेले स्टाफ –त्यांनी परिचय करून देत म्हटले मी-..किरण देसाई , मी मास कम्युनिकेशन “

विषयाचा सहायक प्राध्यापक आहे. नुकताच या संस्थेत लागलो आहे.

मला निसर्ग , वृक्ष –संवर्धन , पर्यावरण रक्षण ..या विषयाची आवड आहे ..

अजयसर ,तुमच्या कार्याबद्दल मला प्रिन्सिपल सरांनी कालच सांगितले ,

म्हणून ..तुमच्या सोबत

आज मदतनीस म्हणून सोबत करण्याची परवानगी द्यावी ..”असा मी हट्टच धरला होता.

आणि आमच्या सरांनी तो पूर्ण केला याचा मला खूप आनंद वाटतो आहे.

किरण देसाईचे बोलणे ऐकून अजय म्हणाले –

अरे वा – तुमचा परिचय म्हणजे ..इथे येण्याचा बोनसच मिळाला आहे मला “,

आमच्या संस्थेत तुमच्या सारख्या उमद्या ,तरुण आणि उत्शाही कार्यकर्त्याचे मनापासून स्वागत आहे.

किरण देसाई सांगू लागले –

अजय सर -

कोलेजच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला असलेला ..खूप मोठा परिसर ..ज्याचे रुपांतर आता

एका मोठ्या आणि सुंदर अशा बागेत केले गेले आहे “, याच परिसरात खूप छान असे विश्रामगृह

बांधलेले आहेत . बाहेरहून आलेल्या मान्यवर पाहुणे यांची निवास –सोय ..इथे आवर्जून करावी ,

अशी विनंती आपल्या शहरातील बहुतेक सर्वच संस्थाकडून आमच्या संस्थेला केली जाते .

आणि आम्ही पण अशा पाहुण्यांची व्यवस्था अगदी चोख ठेवतो . यासाठी एक विशेष टीमआहे .

या टीममध्ये माझा पण समावेश आहे.

अजय सर – आता तुम्ही जे सुंदर असे निसर्ग रम्य वातावरण पाहाल , आमचे उद्यान पाहाल ,

ते पाहून ..तुम्ही इथे काम करणाऱ्या ..

आमच्या माळी-काकांचे आणि त्यांच्या परिवारातील लोकांचे कौतुक केल्याशिवाय रहाणार नाहीत.

ते इथेच राहतात ,

ही बाग , इथे वृक्ष –झाडे-पाने –फुले “ जणू त्यांची लेकरे आहेत. कोणत्या जागेत कोणते झाड आहे, रोपटे

आहे ..ते अचूक सांगतात .

हे ऐकून अजय म्हणाले .. किरण सर, आता मी सांगतो तसे करायचे ,आपण दोघांनी मिळून ,

आणि या रंजना –माझ्या मिसेस ..आपल्यावर लक्ष ठेवीत सोबत करतील .

किरण देसाई म्हणाले -हो अजय सर, तुम्ही सांगा ,मी तसेच करीन –

अजयनी त्यांच्या सोबत असलेल्या बैगेतून दोन मोठे कॅमेरे काढले ..एक स्वतःकडे घेत,दुसरा किरणसरांना

देत म्हंटले-

आता एक काम करू या –तुम्ही तुमच्या कॅमेर्यात आणि मी माझ्या कॅमेर्यात ..हा परिसर ,रस्ते ,

झाडे ,फुलझाडे ..यांचे शुटींग करीत फिरायचे , अगदी शेवटी ..कॉलेजचे मेन गेट , तिथून आत आल्यवर

मेन बिल्डींग दाखवायची ..

यात आपण कुणी ही दिसणार नाही आहोत. फक्त हा नितांत सुंदर परिसर दाखवायचा आहे.

किरण सर म्हणाले – ओके सर, तुम्ही सांगितले तसेच मी करेन.

आणि नंतर अर्धा तास अजय सर , किरण सर आणि रंजना दीदी ..सगळा परिसर त्यांच्या कॅमेर्यात

टिपून घेत राहिले.

हे करून झाल्यावर अजयसर म्हणाले –

किरणसर –आपण माळीकाकंना कुठे भेटू शकतो आता या वेळी ?

किरणसर म्हणाले – आता या वेळी ते घरीच असतात ..ते आणि काकू दोघेच असतील ,

त्यांचा मुलगा आणि सुनबाई ..दोघे ही संस्थेच्या ऑफिसात आहेत ..आता ड्युटीवर असतील.

चला किरण सर ..आपल्याला माळीकाकांच्या घरी जायचे आहे..जास्त वेळ नाही लागणार .

किरणसर त्यांना ..माळी-काकांच्या घरी घेऊन गेले ..

आलेल्या पाहुण्याबद्दल किरण सरांनी सांगितले ..

बाहेरच्या मोकळ्या अंगणात .. काकांनी मोठी सतरंजी टाकली , थंडगार पाणी आणून ठेवीत म्हटले –

आमच्या या बागेला आवडीने पहायला येणारे , आम्हाला भेटणारे ..तुम्ही पहिले माणूस आहात ,

फार बरे वाटले बघा आम्हाला .

इथे आतापर्यंत किती तरी जन येऊन गेलेत,राहून गेलेत , सारे पाहून गेलेत ..

पण, कुणाला ..या बागेतल्या झाडाबद्दल विचारावे वाटत नाही , या पानाफुलांना हात लावून

पाहावे वाटत नाही.

राग माणू नका माझ्या बोलण्याचा सर – पण..मनातलं तुमच्याशी बोलतोय असे समजा ..

वृक्ष –वल्ली आम्हा सोयरे ,वनचरे “, हे कितीही खरे असले तरी ..नव्या लोकांना फक्त पिकनिक

साठी बाग असावी वाटते , खा-प्या आणि कचरा करून जा !

अशा लोकांना बागेत येउच देऊ नये ..असा नियम.करता आला तर बरे होईल .

अजय सर माळीकाकांना म्हणाले – लोकांना जोपर्यंत त्यांच्या मनातून काही जाणीव होणार नाहीतो पर्यंत

निसर्ग आणि माणसातले नाते घट्टपणे जुळणार नाही.

माळीकाका ..

मी आणि माझी “निसर्ग –मित्र “ही संस्था .आम्ही हेच काम करतोय .

तुमच्याबद्दल मी ऐकले आहे ,म्हणून आज तुमचे दर्शन घायला आलो .खूप छान वाटले,

माळीकाका हे ऐकून खूप संकोचून गेले ..ते म्हणाले –

असे काही नाही ..मी मनापासून सेवा करतो ..आणि हा निसर्ग ती आवडून घेतो , त्याचे हे फळ

आहे तुमच्या समोर..

माळीकाका बोलू लागले –

अजयसर , तुम्हाल एक विनंती करतो ..

आमच्या या किरण सरांना तुमच्या संस्थेच्या कार्यात सहभागी करून घ्यावा , तुम्हाला एक

तळमळीचा माणूस मिळेल .

हे ऐकून अजय सर म्हणाले –

माळीकाका – तुम्ही सांगण्याच्या आधीच तुमची इच्छा पूर्ण झाली , किरणसर या पुढे माझे मित्र म्हणून

आमच्या सोबत नेहमीच असणार आहेत.

माळीकाका –तुम्हाला अजून एक विनंती ..

आज दुपारी एक ते तीन .आमचा कार्यक्रम आहे कोलेजच्या होल मध्ये ..तुम्ही आणि काकूंनी

यावे “अशी मी विनंती करतो आहे .

हे ऐकून आनंदच्या स्वरात माळीकाका म्हणले ..

जी सर, आम्ही दोघेही बरोबर एक वाजता हॉल मध्ये हजर असुत.

रंजनाने आठवण करून देत म्हटले ..

चला साडेबारा वाजत आहेत ..आपल्याला ऑफिसमध्ये हजर असायला पाहिजे .

अजय सर म्हणाले – किरण सर ..तुम्ही पुढे जाऊन ..अनुशाला सुचना करा..

की स्क्रीन आणि प्रोजेक्टार आणून रेडी ठेव.. तुमच्या लक्षात आलेच असेल..

आपल्याला आपण केलेले शुटींग दाखवायचे आहे..

..सगळ्यांना एक आश्चर्य –भेट असेल.

किरणसर पुढे निघून गेले..

अजय सर आणि रंजना प्रिन्सिपलसरांच्या ऑफिसमध्ये येऊन बसले .

अजय सांगू लागले ..तुमच्या कॉलेजमध्ये येऊन आजचा माझा दिवस

आगदी सार्थकी लागल्याचे समाधान मला मिळाले आहे. तुम्ही फिरून येण्याची परवानगी दिलीत

खूप खूप आभारी आहे.

पावणे –एक वाजला .वेळ झाली आणि अनुषा ऑफिसमध्ये येत म्हणाली ..

चला ,कार्यकम सुरु करू या ..

आजच्या कार्यक्रमास हॉल फुल झालेला पाहून मला आनंद तर झालाच ,त्यापेक्षा आश्चर्य

वाटते आहे..की ..

अजयसर ..यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या विद्यार्थी मित्रांना आहे.

सगळे मिळून ..हॉल मध्ये आले.

व्यासपीठ आणि हॉलची फुलांची सजावट माळीकाकांच्या मुलाने आणि सूनबाईनी केलेली आहे “

हे किरणसरांनी हळूच अजयच्या कानात सांगितले .

अजयसरांनी हॉलभर नजर फिरवली ..मागच्या रांगेत माळीकाका आणि काकू दोघे ही येऊन बसलेले

आहेत हे पाहून ..अजय सरांना आनंद झाला .

अनुशाचे शो प्रसारित करणारी वाहिनी आणि त्यांची टीम हजार होती ..

त्यांच्या वाहिनीवरून या कार्यक्रमाचे लाइव्ह- प्रसारण ह्णार होते ,आणि नतर हा रेकॉर्डेड कार्यक्रम

सागर देशमुख यांना अनुषा त्यांच्या ऑफिसमध्ये दाखवणार “ हे सगळं लक्षात ठेवून .

अनुषा कार्यक्रमाची सगळी सूत्र सांभाळीत होती.

प्रास्तविक ..पाहुण्यांचा परिचय ..स्वागत आणि सत्कार ..या गोष्टीं पार पाडल्या आणि अनुषाने जाहीर

केले की.आता अजयसर आणि रंजनादीदी यांच्या थेट संवाद –भेट सुरु होणार आहे...

तिची घोषणा पूर्ण होऊ देत ..मग स्वतहा अजयसर माईकजवळ घेत म्हणाले ..

आमच्या भेटीपेक्षा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम मी तुमच्या समोर आता सदर करीत आहे..

आमच्या थेट मुलाखतीच्या कार्यक्रमातील भागच आहे ..त्यामुळे वाहिनीच्या टीमने त्यांच्या शुटींगला

सुरुवात करावी ..सुरुवातीची फक्त काही मिनिटे मी घेईन ..

अजयसरांनी किरणसरांना मदतीसाठी व्यासपीठावर बोलवले ..आणि समोर ठेवलेला प्रोजेक्ट सुरु करण्यास सांगिते

..आणि ते स्वतहा निवेदन करू लागले..

सर्वांना माझा नमस्कार ,

आता तुमच्या सामोर आम्ही काही फोटो दाखवणार आहोत , ते तुम्ही पहायचे आहे ..आणि .मी जे प्रश्न

विचारीन ..त्याची उत्तरे द्यायची ..एक छान गेम आहे असे समजा ..

हॉलमध्ये उपस्थित ..यात सहभागी होतील ..कारण मी कुणाला ही प्रश्न विचारीन..

करू या का सुरुवात ?

सगळ्यांनी ..एका आवाजत ..हो, हो, करा सुरुवात ..म्हणत सहमती दाखवली .

अनुशाला हे काहीच माहिती नसल्यामुळे ..ती सुद्धा विचार करू लागली ..

हे अचानक काय ठरवले आहे अजयसरांनी ? असो, पाहावे तर लागणारच.

आणि काही क्षणात समोरच्या स्क्रीन वर ..

अप्रतिम सुंदर अशी निसर्ग प्रतिमा दिसू लागल्या , इतकी सुंदर ,बहरलेली बाग नक्कीच परेदेशातली

असणार असे सगळ्यांचा मनात येत होते.

निळेशार आकाश ,छोटा स्वच्छ तलाव , फुलपाखरांचे थवे , उंच उंच झाडावर पक्षांची घरटी ,

मुक्तपणाने उडणारे पक्षी ..

वा ,वा किती छान , सुंदर ,वाव ब्युटीफुल , असे उद्गार उपस्थितांच्या तोंडून सहजपणे बाहेर पडत

होते .

शेवटी ..एक गेट , पण त्यावरची कमान चित्रात आलेली नव्हती .. त्यातून पुढे आल्यावर दिसणारा जो रस्ता

होता .त्याच्या .दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची आणि त्यांच्या पानांची विविध आकृती मध्ये केलिली कटाई

पाहीन सगळ्यांनी ..टाळ्या वाजवल्या ..

आणि अजय सरांनी ..फोटो दाखवणे थांबवीत ..विचारले

सांगा बरे..हे सगळे सीन पाहून ..तुम्हाला कोणत्या ठिकाणी आहोत असे वाटते आहे ?

अजय सरांच्या या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर ..कुणीच देऊ शकले नाही ..कारण सगळ्यांनी खूप वेगळ्या

वेगळ्या ठिकाणची ही फोटो आहेत असे खात्रीनी सांगितले .

अजय सर म्हणाले –

मी विचारलेल्या ..प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आत दिसेल बघा ..

आणि किरण देसाईसरांनी ..पुन्हा कॅमेरा सुरु केला ..

गेटच्या मधून कॅमेरा पुढे सरकत सरकत ..कोलेजच्या बिल्डींगवर आला ..

आणि त्यात समोर उभे असलेले ..

प्रिन्सिपलसर , किरण देसाई सर आणि माळीकाका आणि काकू दिसत होते ..

अजय सर म्हणाले ..

मित्रांनी ..इतका वेळ तुम्ही पाहिलेले सगळे फोटो ..तुमच्या कोलेज परिसरातीलच होते ,

पण तुम्ही कधी तुमच्या मनाच्या नजरेने हे पाहिलेच नाही ..म्हणून तुम्हाला ओळखता आले नाही ,

ही बाग , हा निसर्ग तुमच्या भवती आहे ,पण, तुम्हाला त्याची जाणीव नाही, हे खूप वाईट आहे..

आता या पुढे तरी तुम्ही याकडे लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो.

शेवटी फोटोत दिसणारे .. माळीकाका आणि काकू आहेत न.. ते तुमच्यातील खरे निसर्ग –रक्षक ,

निसर्ग-मित्र आहेत . त्यांच्या या निसर्ग प्रेमाबद्दल मी ऐकून होतो ..म्हणून आजच्या निमित्ताने मी

मुद्दाम त्यांचा परिचय तुम्हाला व्हावा म्हणून पूर्व सुचना न देता हा सगळा खटाटोप केलाय..

तो या साठी की-

आमच्या
निसर्ग –मित्र “ या संस्थेच्या वतीने ..आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थित ..माळीकाका आणि काकू

त्यांचा मुलगा आणि सुनबाई ..यांना आम्ही
निसर्ग –मित्र “ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहे .

आणि एक ..

तुमचे सर – किरण देसाई हे सुद्धा “पर्यावरण चळवळ “मधले कार्यकर्ते आहेत. त्यांना ही

निसर्ग-मित्र “पुरस्कार आम्ही देतो आहोत .

आणि हे सगळे या कॉलेजचे आहेत ..म्हणून ..संस्था विषयक ..निसर्ग पुरस्कार “साठी आम्ही तुमच्या

कोलेजची निवड केली आहे. प्रिन्सिपल सरांनी कोलेजच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी विनंती

करतो..

अजय सरांच्या या घोषणेने ..हॉल अक्षरशा भारावून गेला ..आणि आनंदाने टाळ्यांचा गजर सुरु झाला .

माळीकाका –काकू दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते ,आपल्या सोबत आपल्या लेकरांचे कौतुक

केले ,अजय सरंना आम्ही आशीर्वाद देतो असे माळीकाका म्हणाले.

प्रीन्सिपाल सरांनी संस्थेला पुरस्कार देऊन बहुमान केल्याबद्दल अजयसर आणि त्यांच्या संस्थेचे

आभार मानले.

अनुषा नि:शब्द होऊन भरवलेल्या मनाने हे सगळे डोळ्यात आणि मनात साठवत होती .

कार्यक्रम लाइव्ह असल्यामुळे ..हजारो प्रेक्षकांना हे भावस्पर्शी सोहोळा अनुभवता येत होता.

अजयसरांनी आजचे हे पुरस्कार देऊन ..मनाच्या मोठेपणाचे जणू दर्शन घडवले होते.

स्वताच्या मुलाखती विषयी ते अजिबात अधीर नव्हते की उत्सुक आहेत असे नव्हते , उलट त्यापेक्षा

दुसर्यांची दाखल घेणे , त्यांचा बहुमान करणे ..या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना हे सुचणे
अजय सर खूप आगळे –वेगळे व्यक्ती आहेत “ हे जाणवून अनुषा त्यांना मनोमन सलाम करीत होती.

आणि रंजनादीदी ..एकदम सही सही ..साथीदार आहे अजय जीजुंची .

सागर देशमुख नक्कीच प्रभावित होतील.हे पाहून.

नंतर ..अनुषा ,अजय सर आणि रंजनादीदी यांची संवाद भेट झाली ..

ती ऐकत असतांना अजय सर ,रंजना दीदी यांनी खूप आठवणी सांगितल्या ..

वेळेच्या आत कार्यक्रम संपला ..

उद्या सागर देशमुख हा सगळा कार्यक्रम पाहणार , तेव्हा काय होईल ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग -२५ वा लवकरच येतो आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------