भाग-२
दुसऱ्या दिवशी दिव्या आणि कृष्णा सकाळी ऑफिस मध्ये पोहोचतात...
"हाय, गुड़ मोर्निंग दिव्या आणि कृष्णा... मानव त्यांना हात करत म्हणतो.."
"गुड़ मोर्निंग मानव सर...कृष्णा"
"गुड़ मॉर्निंग सर...दिव्या"
"अग तुम्ही दोघीही मला सर नका बोलू...सगळे ऑफिस मध्ये मला नावानेच हाक मारतात.. तुम्ही पण मानव म्हणा☺️"
"ओके मानव"
आणि तिघेही हसू लागतात...मग मानव दिव्या आणि कृष्णा ची ओळख करून देतो सगळ्यांशी.. त्या दोघी लगेच मैत्री करत होत्या सगळ्यांनसोबत..सगळे हसत हसत गप्पा मारत असतात तितक्यात सिद्धार्थ येतो..
येताच कृष्णा च्या हसणयाचा आवाज त्याच्या कानावर पडतो...तिचे ते घायाळ करणारे गोड हसू😍 आणि त्यात आज गुलाबी कुरता आणि Black लेगींज,त्यावर साधासा मेकअप, गोल टिकली, लाइट पिंक लिपस्टिक तिच्या ओंठावर उठून दिसत होती यामुळे ती आज खूप सूंदर दिसत होती...
सिद्धार्थ ही काही कमी नव्हताच... Black Pant, व्हाइट शर्ट, त्यावर Black कोर्ट..दीसायला तो हीरो सारखाच होता..म्हणून काहीहि घातले तरी त्यात तो उठूनच दिसायचा..(तर पुढे...)
कृष्णाचा आवाज कानावर पडताच तो तिचाकडे एकटक पाहू लागला...अचानक गिटार वाजु लागले🎻🎻 आजुबाजुचे सगळे दिसेनासे झाले फक्त कृष्णा दिसत होती...😍 तेवढ्यात मानवच लक्क्ष सिद्धार्थकडे जात...
"हेय.. Sidhu गुड़ मॉर्निंग... केव्हा आलास?.."
"हाय Buddy मॉर्निंग.... हे काय आताच आलो"
"बर कृष्णा देसाई तुझी Personal secretary आणि दिव्या मोरे Accountant दोघीही आलेल्या आहेत मी काम समजवून सांगितली आहेत ओके"
सिद्धार्थच काही लक्क्ष त्याच्या बोलण्याकडे नसत..मग मानव त्याला हलवत...
"Sidhu,यार कुठे लक्क्ष आहे तुझ"
"अअअअअअ सॉरी सॉरी.. मी एकल तू काय बोलास ते....सिद्धार्थ गोंधळत म्हणतो"
"हा ओके"
"बर ऐक ना मानव यार तुला गिटार ऐकू येतात का रे"
"काय गिटार🤔..."
"Sidhu हे काय बोलतोयस तू😂 गिटार आणि आपल्या ऑफिस मध्ये अरे आपल्या आजुबाजुला साधा मच्छरचा आवाज नाही येत तुला गिटारचा कुठून आला..🤣"
"अरे म्हणजे ते ते मी...."
"एक सांगू का गिटारचा आवाज प्रेमात पडल्यावर आणि ज्या माणसावर आपण खुप प्रेम करतो मनापासून त्याना बघितल्यावर ऐकू येत...कोण आहे मग ती...आआआ....मानव त्याला चिडवत बोला"
"गप मानव काहीहि सांगतोस...चला कामाला लागा आणि कृष्णा दिव्याला पण काम सांगा चला जा....सिद्धार्थ नजर चोरत म्हणाला"
आणि केबिनमध्ये निघुन गेला...खुर्चीवर शांत बसून तो हाच विचार करत होता...
"{मनात}..खरच अस असेल का?...🙄मानव म्हणतोय तस खरच कृष्णावर मी इतका प्रेम करतोय मनापासुन?...म्हणजे हे खरच आहे की लव्ह At फस्ट साइट सारख झाल नक्कीच मला पण.. प्रेम असेल का हे कि फक्त आकर्षण???🤔
आकर्षण असेल तर हे योग्य नाहीच...."
तेवढ्यात कृष्णा केबिन बाहर येते.....
"मे आय कमइन सर..."
"आआआ... हो हा ना...म्हणजे या..म्हणजे ये ना प्लिज... सिद्धार्थ गोंधळत बोलतो"
"सॉरी सर चुकीचा वेळी आले नाही ना...नाही म्हणजे तुम्ही वेगळ्या विचारात होता म्हणून..."
"अग अस काहीच नाही बोल ना काय झाल?"
"आ..सर हे बघा आज तुमचा शेड्यूल हा असा आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणजे...आणि या शर्मा इंडस्ट्रीज चा फाइलवर सही हवी होती..."
"ओके दे इकडे...."
"हा शेडयूल बरोबर तयार केलायस....☺️गुड..बर ती फाइल आन इकडे..."
"हा सर...."
"हे घे... ओके ना.."
"हो सर...Thank u"
हाय आणि तिची ती गोड स्माइल😍घायाळ। करणारी होती... आणि कृष्णा तिकडून निघुन जाते..सिद्धार्थ पण सगळे विचार बाजूला सारून कामाला लागतो....
ऑफिस सुटायची वेळ झाली सगळे एकामेकाला बाय म्हणत जाऊ लागले....
"दियु चल झाल का"
"हो किशु झाल चला"
"बाय मानव....कृष्णा"
"बाय मानव..दिव्या"
"बाय कृष्णा अणि दिव्या"
अग दियु सिद्धार्थ सराना बाय म्हणून येउयात चल...आणि दोघी तिच्या केबिन कड़े वळतात...अचानक तो ही बाहेर येतो आणि कृष्णा आणि सिद्धार्थची टक्कर होते....😍
"आआआ आउच....😖...सिद्धार्थ"
"सॉरी सर... I'm really very sorry सर चुकुन झाल...😢😦" आणि कृष्णाच्या डोळ्यातून नकळत पाणी आले...😢
"अग कृष्णा.. अग रडू नकोस ना मी नाही रागावलो तुझ्यावर😧😕अग प्लिज रडू नकोस ना... तुझ्या डोळ्यात मी पाणी नाही पाहू शकत ग.."
नकळत तो काय बोलतो हे नंतर त्याला कळत....
"काय😲🙁....मानव चकित होऊन"
"मममम म्हणजे अग अस कोणाला रडताना बघायला मला नाही आवडत म्हणून मी"
"हो सर...नाही रडत...कृष्णा तीच रडू आवरत"
"हा गुड़😌...बर आता घरी जा वेळ नको व्हायला"
"हो सर...बाय"
"बाय😊"
आणि त्या निघुन जातात... मग मानव ही जातो आणि त्याच्या मागून सिद्धार्थही निघुन जातो...सगळा प्रकार आठवून त्याला जरा हसूच येत होते...तसा तो त्याच्या कार मध्ये बसला आणि घरी पोहोचला.....घरी येताच बघतो तर काय सायली त्याच्या सख्या काकाची मुलगी..एकुलता एक असल्याने मोठी बहिण अशी नव्हती...सायलीच होती.. ती अशी त्याला भेटायला येत असायची.....
"आईएईए सायली ताई😃ताई कधी आलीस तू"
"Sidhu कसा आहेस बाळा😚अरे किती बारीक झालायस खातोस की नाही नीट"
"हो आता तूच सांग सायली त्याला...26 वर्षाचा झालाय पण स्वतः ची काळजी म्हणून घेणार नाही.....रश्मी सिद्धार्थची आई"
"हो ना काकू...Sidhu काय रे हे...अस का वागतोस"
"काय नाही ग ताई मी किती ही खाल तरी आईला कमीच वाटत...."
"ह्म्म्म मला कमी वाटत म्हणे...लग्न केव्हा करणार हा ते विचार सायु😏....रश्मी"
"आई अग काय सारखा तोच विषय काढतेस...नंतर बघू"
आणि सिद्धार्थ रुम मध्ये जातो.....
"सायु समजव ग त्याला आता तू...मी एक मुलगी पाहुन देखील ठेवले पण हा बग न...तू तयार कर त्याला..."
"हो काकू करते...जेवल्यानंतर बोलते.."
●To be continued.....●
【सगळ्यांचे खुप आभार...🙏काही चूक झाली असल्यास माफ करा....असाच Support करत रहा प्लिज🙏माझा हेतु फक्त तुमच मनोरंजन करण इतका आहे🙌 आणि माझी ही कथा खर तर...कृष्णा सिद्धार्थच लग्न होऊन मग पुढे त्यावर आहे..जरा वेगळीच अशी लवहस्टोरी आहे....मी आशा करते तुम्हाला आवडेल पुढे वाचायला....प्लिज काही चूक असल्यास तुम्हाला काही गोष्ट खटकल्यास मला लगेच Massage किंवा Comment करून सांगा....Thank You 🙏】