tuji majhi lovestory - 10 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 10

भाग-१०

आता उजाडला साखरपुडयाचा दिवस..सगळे खुप खुश होते.... एका मोठ्या हॉलवर Engagement चे नियोजन झाले होते.....देशमुखांची आता घाई चालली होती....

"अरे आवरल का सगळ्यांच......रविंद्र (सगळ्यांना आवाज देत)"

"हो हो.....मी रेडी झाले काका....सायली😁"

"वा वा...मस्त दिसते आहेस सायु...रविंद्र"

"Thanks काका...."

"रश्मीला बग जा बर...."

"हो....अरे काकू आली...."

"मी ही तयार आहे.....☺️नवरदेव कुठे आहेत....रश्मी"

"तयार होतोय....रविंद्र"

"बर सायु...जास्त हालचाल, धावपळ, आणि over excitement दाखवू नकोस जरा...काळजी घे बाळा... तस माझ आणि सागरच लक्क्ष असेलच..पण तरी तू पण...जरा जपून...७ वा महीना लागलाय ना आता बाळा म्हणून....हम्म.....रश्मी"

"हो काकू☺️.... सायली"

"बर सागर हॉलवर डाइरेक्ट येणार आहे....रवींद्र"

"बर.. रश्मी"

"हेय... मी रेडी आहे😀.....सिद्धार्थ"

सिध्दार्थने क्रीम आणि वाइट कलरची Designer शेरवानी घातली होती...केस सेट केलेली...तसा दिसायला हैण्डसम आहेच... आज ही छान दिसत होता.....

"Sidhu छान दिसतोयस..... सायली"

"बर चला आता उशीर नको व्हायला....रविंद्र"

"हो बाळा चल.....रश्मी"

आणि सगळे हॉलवर पोहोचतात..... पोहोचल्यावर ममता सिध्दार्थला ओवाळून त्याला आत घेतात...मुहूर्त जवळ आला आणि कृष्णाला बाहेर बोलावल गेल....

कृष्णा नेहमीपेक्षा आता जास्त सूंदर दिसत होती...हिरवी पैठनी.. त्यावर नथ, चंद्रकोर टिकली...हलकासा मेकअप... तीच सौंदर्य बहरुन आले होते आज....सिद्धार्थ तिचाकडे पाहतच राहीला....त्याच्या मनात तर गाण वाजु लागले होते.....😍

परी म्हणू की सुंदरा....
तिची तर्हां असे जरा निराळी....
तिची अदा करी फिदा....
ही मेनका..ही मेनका..ही मेनका
कुणी जनु निघाली....😍😍

ती त्याच्या समोर येउन उभी रहिली तरी तो तिचाकडे पाहत राहीला...

"ओहो ओहो..(नाटकी खोकत)....sidhu...सायली"

"हआआआ ताई काय झाल...."

"बाळा आजच आहे साखरपुडा...😀"

"ताई😅😅"

आणि सगळे हसू लागले...मग मंत्रपाठ सुरु झाले.....आणि हसत खेळत.... आनंदाने त्यांचा साखरपुडा पार पडला.....सगळ सुखरूप पार पड़ते....ममता आणि महेश याना सुद्धा खुप आंनद होत होता....आता देशमुख कुटुंब घरी परतत.. होते...सगळे एकामेकाना मीठी मारत होते....आणि चौकशी करत होते...तेवढ्यात सिद्धार्थ कृष्णाला बाजूला घेऊन जातो...

"सिध्दार्थ काय झाल.....कृष्णा"

"सॉरी अग तुला अस घेऊन आलो...आज बोलताच नाही आल ना म्हणून...."

"अच्छा... बर पटकन बोला मग...."

"तुला एक गिफ्ट द्यायच होते....देउ का? घेशील?"

"हम्म...हो..."

"हे घे....बग उघडून"

"हा....."

कृष्णा ते गिफ्ट उघडते....त्यात नाजुकसे सोन्याचे..झुमके होते....

"सिध्दार्थ.... आपण घेतलेत ना लग्नामध्ये घालयला झुमके मग...आणि याची खरच गरज नव्हती...."

"अग मी खुप प्रेमाने आनलेत....☹️😔आणि लग्नामध्ये तू घालच अस मी फोर्स नाही करत...."

"Sad नको होऊस...आवडले खर तर मला...छान आहेत... चॉइस छान आहे तुझी...😊"

"हो ते आज पटल मला....."

"कस????"

"उदाहरण माझ्या समोर आहेच...😍"

"कोन... मी..😳"

"हो😍"

कृष्णा थोड़ी लाजते....सिद्धार्थ तर पुरता घायाळ झाला...तीच हे लाजन बघून,😍😳😮मग थोड्या वेळाने सिध्दार्थ आणि त्याची फॅमिली घरी जायला निघाले...

लग्नासाठी आता फक्त १ दिवस उरला होता...सगळ्यांची तयारी चालू होती....आज हळदिचा कार्यक्रम होता...सगळी मंडली.. जमली होती...सिद्धार्थच्या घरुन उष्टि हळद आली तशीच सगळ्यानी कार्यक्रम चालू केला.....गाण म्हणू लागले....

हळद पिवळी.. पोर कवळी.. जपून लावा गाली....
सावळयाच्या चाहूलीने पार ढवळी झाली....
ए गजर झाला दारी..साजनाची स्वारी...
साजनाची स्वारी आली.....
लाज गाली आली.....🥁🎶🎵

रात्रभर नाच गाण झाले...ममता आणि महेश यांचे डोळे नकळत पानावले... कृष्णाच्या डोळ्यात देखील अश्रु वाहत होते....रात्र अशीच गेली....लग्नाचा दिवस आला..
१२/०१/२०१९...
सकाळी सगळ्यांची गड़बड़ चालू झाली....कृष्णा सिद्धा तयारीला लागली होती....सगळ आवरुन झाल होत...

"किशु...झालीस का तयार....ममता"

"हो आई..."

"सगळ समान कपड़े घेतलेस का....महेश"

"हम्म घेतले"

ममता महेश यांच्या डोळ्यात नकळत पाणी आले....😢आपली पोरगी आता दूर जाइल या भावनेने त्याना रडू आल.... कसबस स्वतःला सावरत ते निघाले.....

कृष्णा ने एक नजर घरावर फेरली आणि ती निघाली......


To be continued...........

(बघू आता कृष्णा अणि सिद्धार्थचा सुखी संसार.... कसा होतो)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED