तुझी माझी लव्हस्टोरी... - 11 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 11

भाग-११

खुप मोठ्या हॉलवर लग्नची व्यवस्था केली होती....फुलांची सजावट...डेकोरेशन, सगळ अस सूंदर होते त्या जागी.... बाहेर मोठे गार्डन... हिरव्या गार गवतानी आणि रंगीबेरंगी, सुंगंधी फुलानी भरून असे......कृष्णाच्या बाबानी खुप छान सगळ अरेजमेंट्स केल्या होत्या...

सनई वाजु लागल्या आणि मग नवरा मुलगा आला... नवरी मुलगी आली...सिद्धार्थने बघितले तर कृष्णा अजूनच छान दिसत होती...तीच रूप प्रत्येक दिवसाला वेगळ दिसत होत आणि खुप सुंदरही... त्यांच लक्क्ष तिचा कानाकड़े गेला...तिने सिद्धार्थने गिफ्ट केलेले झुमके घातले होते...हे बघून तो खुप खुश झाला...☺️मग लग्न विधी सुरु झाल्या....लग्नतील ते क्षण खरच खुप छान होते सिद्धार्थसाठी....

अंतरपाठामधून लपून छ्पुन कृष्णाला बघने...
एकामेकाना हार घालने...
सौभाग्याच प्रतीक असलेल मंगलसूत्र कृष्णाच्या गळ्यात घालण...
कुंकू तिच्या कपाळाला लावन...
हात धरून सात फेरया घेण..त्याचसोबत सात जन्म साथ देणायची वचन एकामेकास देन..

अस करत त्यांचा विवाह पार पडला.....☺️
आता सगळे जेवणासाठी एकत्र जमले होते.....कृष्णा आणि सिद्धार्थ सुद्धा आले आणि पहिला घास कृष्णाने भरवावा म्हणून सगळे म्हणू लागले......

"चला आता कृष्णा वहिनी sidhu ला घास भरवा😀....हा पण उखाना घेऊन हा😀.......सायली"

"हो हो मग काय😀....रश्मी"

"ताई आई काय ग उखाना काय......"

"बापरे आता पासून बायकोची बाजू घेऊ लागला.... सायली☹️😂"

"ताई ग....."

"सिद्धार्थ मी घेते नाव येत मला....कृष्णा"

"नक्की..."

"ये😀चल पटकन नाव घे पोरी... अग घे ग😀😂....सायली"

"ताई😕"

"बर बाई बोल आता..."

"कोवळ्या कोवळ्या पानांवर पडले सोनेरी उन..
सिद्धार्थ रावांना घास भरवते देशमुखांची सुन..☺️"

मग कृष्णा त्याला पहिला घास भरवते.... आणि सगळे वा वा छान म्हणून टाळ्या वाजवतात....आता सिद्धार्थ वर वेळ होती....पण उखाना त्याला येतच नाही😂😅

"Sidhu चल नाव घे आता तू.... सायली"

"ओके ग थांब..😂"

"पटकन नाही तर कृष्णा उपाशी राहील😂"

"बर एका...."

"कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास कृष्णाला भरवतो गुलाबजामचा घास..."

मग तो कृष्णाला घास भरवतो....सगळी खुप हसतात.....
आता वेळ आली होती निरोपाची...कृष्णा खुप रडू लागली होती...ममता आणि महेश सुद्धा खुप रडत होते...कसबस स्वतः ला त्यांनी आवरल आणि कृष्णाला गाडीत बसवून पाठवनी केली....सिद्धार्थला ते पाहुन रडू आल... डोळ्यात पाणी आल.....

"काय झाल सिद्धार्थ...तू का रडतोयस"

"कृष्णा तुझ्या डोळ्यातून पाणी मी नाही बघू शकत म्हणून...."

तशी कृष्णा हसायला लागली😀😂आणि ते घरी पोहोचले.... रश्मी आणि सगळेच त्यांची वाट बघत होते....आरती ओवाळून झाली आणि माप ओलंडताना पुन्हा नाव घ्या अस सांगितले...

"अरे हे काय पुन्हा नाव घ्यायचा...."

"हो sidhya..... सायली"

"अरे पण"

"रडू नको गप तेवढ्या वेळेत एक उखाना सूचवून ठेव😂"

"बर😏"

"कृष्णा घे नाव"

"जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने..
माप ओलांडून येते आत, सिद्धार्थ रावांची पत्नी या नात्याने.."😊

आणि सगळे आनंदी होतात...आता वेळ होती सिद्धार्थ ची....

"सिधु चल हो सुरु.......सायली🤣"

"चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून..
कृष्णालाच आणली बनवून देशमुखांची सुन.."

वा वा..सगळे म्हणतात😂आणि कृष्णा माप ओलांडते...कुंकवाच्य पावलानी ती आत येते.....सगळे दमलेले असतात.. आणि उद्या पूजा असते म्हणून सगळे आपल्या खोलीत जातात... कृष्णा सायली सोबत झोपायला जाते......सिद्धार्थ मात्र तिला वळून बघत होता..मग तो ही रुममध्ये जाऊन फ्रेश होतो....आणि बेडवर अंग टाकतो.....

आजच्या गोड़ आठवणी तो आठवत होता......
कृष्णाला मात्र वेगळीच धाक धुक लागली होती...काहीच सूचत नव्हतं....सगळ नवीन होत.... बदलनार होत....सिद्धार्थ सोबत नात कस खुलवाव तिला कळत नव्हते......साहजिक आहेच ते...तिला आणि सिद्धार्थ ला झोप काही लागत नव्हती......अशीच रात्र सरली.सकाळ झाली कृष्णा लवकर उठली आणि रूम बाहेर गेली.....अजुन बाकीचे उठले नव्हते...किचन मध्ये रश्मी होत्या...ती घर बघत जातच होती की सिद्धार्थच्या रुममधून आवाज आला....

To be continued............

(सगळे उखाने मी वाचून मग लिहिले आहेत...🙏पुढे वाचत रहा माझी कथा...)