Tuji majhi lovestory - 6 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 6

भाग-६
कृष्णा ला कळेना की खरच सिद्धार्थ तिचा बॉस... कस शक्य असेल.....असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण होऊ लागले....तसेच सिद्धार्थ ला हसू की रडू झाल होत...

"अरे अस काय बघताय एकामेकाना.....रविंद्र"

"बाबा अहो....ही कृष्णा माझ्या ऑफिसमध्ये काम करते....माझी Secretary आहे....अहो आणि ह्याच मुलीला आपण बघायला आलोय.....बाबा तुम्ही काहीच बोला नाहीत मला...."

"हो मला, रश्मीला, महेशला आणि ममता वाहिनीना हे नंतर समजल होत.... आम्हीच तुम्हाला काही सांगितले नाही....त्यासाठी सॉरी.... पण मग आम्हाला वाटल कदाचित तुम्ही भेटला नसता......रविंद्र"

"बाबा प्लिज सॉरी नका बोलू...ओके "

"हो पिल्लू सॉरी... महेश"

"बाबा...असुदया आता एवढं काय त्यात....कृष्णा"

"बर मग आता सगळा गोंधळ कमी झालाय...आता बोलुयात... ममता"

"हो...किशु जा सिद्धार्थ ला आपल घर दाखव...आणि बोलून पण या तेवढ....महेश"

"ओके बाबा....सिद्धार्थ सर...चला ना..."

"हो....बाबा आलोच..."

"हो जा....."

आणि ते दोघे कृष्णा च्या रूममध्ये जातात.... बोलायला.... दोघांना कळत नव्हतं काय बोलावे...काही वेळ दोघे शांत राहिले....मग शांतता भंग करत..कृष्णा बोलते....

"आआआ....सर...(घाबरत).."

"हा बोल ना कृष्णा...."

"सर हे काय चालले आहे.... म्हणजे आपण दोघे कस..."

"ह्म्म्म समजू शकतो..."

"ह्म्म्म"

"एक बोलू का???"

"हो सर बोला ना.."

"हे बग लग्न हा विषय खुप नाजुक आणि खूपच महत्वाचा आहे....सो तू असा विचार नको करूस की मी तुझा बॉस आहे आणि आता त्यांच्याशी लग्न करायचा विचार कसा करायचा an All तर तो विचार डोक्यातुन काढ़...आपण माणस आहोत..आणि आपल्याला आपला जोड़ीदार निवडण्याची मुभा आहे ....मग तो कोणीही असु शकतो..नाही का..प्लिज हा विचार आधी तू सोड...आणि स्पष्टच बोलतो...तुला जर खरच माझ्याशी लग्न करायच असेल तरच आणि तरच तू होकार दे....जबरदस्ती होकार नको देउसी... एक नॉर्मल मुलगा म्हणून माझा विचार कर...बॉस म्हणून नाही...आणि या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर परिणाम होउ नये अस वाटत मला...

"हो सर...नक्की.."

"ह्म्म्म....आणि निघूया आता बाहेर.."

"हो...चला"
आणि ते बाहेर येउन सगळ्यांसोबत बसतात...

"चला मग आम्ही निघतो...आता जेव्हा मुलांचा होकार आला की ठरवू पुढे......रविंद्र"

"हो नक्की.... महेश"

"चल मग...."

आणि सगळे एकामेकाना विचारून निघतात..... कृष्णा तिच्या बालकनी मधून...त्याला जाताना पाहते... त्यांची लांबूनच नजरानजर होते...आणि सिद्धार्थ व त्याची फॅमिली तिथुन निघुन जातात....

रात्री जेवण आवरुन...सगळे आपापल्या खोलीत जातात.. सिद्धार्थ खोलीत जाऊन हाच विचार करत राहतो...

"(स्वतःशी विचार करत)....काय योगायोग आहे ना..एवढ्या मोठ्या जगात आम्हीच सारखे एकामेकाना भेटतोय... माझ्या कॉलेज लाइफ मध्ये कृष्णा पेक्षा सूंदर मूली होत्या माझ्या मागे...पण या सगळ्यातून मला आवडली मात्र तीच मुलगी जिच्यासोबत माझी गाठ बांधली होती...ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात... तेच खर....पण आता ही गाठ कृष्णा च्या होकारानेच बांधली जाइल...."

आणि मग तो झोपी जातो....इथे कृष्णा सुद्धा तोच विचार करत राहते....

"काय कराव...कळत नाही आहे...सर खरच खुप चांगले आहेत... सगळ्या मुलांपेक्षा अगदी वेगळे.. पण माझ मन तयार व्हायला हव ना...म्हणजे एखाद नातं लगेच स्वीकारता नाही येत मला....वेळ लागणार न..."

तेवढ्यात तिचे बाबा येतात... आणि तिच्या शेजारी येऊन बसतात...

"किशु.. काय विचार करतेस..होकार द्यावा की नकार हेच ना..."

"ह्म्म्म बाबा😑"

"बाळा अग आम्ही जबरदस्ती नाही करत आहोत..पण आमच मत विचारशील तर...सिद्धार्थ आणि देशमुख फॅमिली खरच खुप चांगले आहेत..सिद्धार्थ मध्ये सगळे ते गुण आहेत जे आपण एका चांगल्या मुला मध्ये शोधतो.. बग तुझ्यावर अवलंबून आहे काय करायच ते...."

"हम्म..."

"बर तय आता आराम कर...आपण उद्या बोलू यावर..गुड़ नाइट"

"हम्म...ओके बाबा...गुड़ नाइट"

आणि कृष्णा विचार करत झोपी जाते....दोघांना ही कळत नव्हतं.. काय कराव...कृष्णा च्या होकारावर सगळ अवलंबून होत....


To Be Continued........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED