भाग-४
सगळे झोपायला जातात... सिद्धार्थला मात्र झोप येत नव्हती..तो पलंगावर पडून विचार करत होता...
"{मनात}...हे काय चालय माझ्या आयुष्यात...कृष्णावर खुप प्रेम करायला लागलोय मी आणि आता दुसऱ्या मुलीला पाहायला जाण जमल तर लग्न कसा शक्य आहे हे...पण आता बाबांना आणि बाकीच्याना कोण सांगणार नाही म्हणजे ते एकतील सुद्धा माझ पण... उद्या त्या मुलीला बघायला जायच हे ठरलय आणि नाही गेलो तर...नको अस नको करायला...जायला तर हव...
इथे ही कृष्णाच काही वेगळ नव्हतं...तिहि विचार करत बसली होती.....
"काय होतय हे मला नाही म्हणजे... सिद्धार्थ सरांन बद्दल आज मला वेगळ्याच भावना जानवल्या... अस का..नाही म्हणजे सर आहेत चांगलेच... पण मला त्यांच्या विषयी अजुन काय वाटत नाही आहे...आणि तस ही आता आई बाबानी एक मुलगा पहिलायच So...जाउदे..(मनात).."
"किशु ए बाळा.... अग एकतेस का......ममता आवाज देत म्हणतात...ममता कृष्णा ची आई"
"हो आई मी रूम मध्ये आहे"
"अग बाळा तुझे उद्या काही Plans नाहीत ना...असतील तर Cancle कर"
"नाही तस काही नाही, उद्या काय रविवार आहे मग आराम करेन..का ग??"
"अग,तुला बाबानी त्या एका मुलाच स्थळ आलय अस म्हणत होते बग,तर ते उद्या तुला संध्याकाळी ६ वाजता बघायला येतात..."
"ओहह...बर ठीके ग आई...😊"
"बर बाळा आता झोपा हम्म"
"हो आई"
तेवढ्यात महेश कृष्णाचे बाबा येतात.....
"किशु बाळा...महेश.."
"हो बाबा या ना.."
"बाळा आईने तुला उद्याच सांगितले असेलच ना"
"बग किशु....तू आता 25 वर्षाची आहेस बाळा जास्त नाही पण जरा उशीर होतोय ना ग तुझ्या लग्नासाठी... बाळा हा मुलगा माझ्या मित्राचा मुलगा आहे...खुप छान आहे हा मुलगा अग..खुपच छान आहे तो...तुला सुखात ठेवेल याची खात्री आहे मला...हा पण तुला आम्ही जबरदस्ती नाही करत उद्या तुम्ही एकामेकाना बघा...मग जरा बोला मग ठरवू आपण..."
"हो बाबा नक्कीच"
"बाळा मला अस वाटत नवरा आणि बायको हे नेहमी एकामेकांचे मित्र असावेत...एकामेकाना पूरक असावेत...खुप विश्वास असावा त्यांच्यात..प्रेम असाव...समजून घेण..थोडासा रुसवा फुग्वा...अस नात असाव आणि ते तू निर्माण कर.."
"हो बाबा"
"तुझ्या मनात दूसर कोणी आहे का?"
"नाही बाबा...असत तर मी सांगितले असते ना"
"खर आहे बर चला झोपा आता हम्म्म्म..गुड़ नाइट"
"हो गुड़ नाइट आई बाबा"
मग महेश आणि ममता रुम मधून जातात... आणि कृष्णा सुद्धा झोपी जाते...
इथे सिद्धार्थ काही झोपत नाही...आता मात्र त्याला टेंशन येत होत.....त्यान ठरवले आता सायली ताई ला जाऊन सांगायचं......आणि तो त्याच्या रूम मधून निघुन सायली च्या रूमकडे वळतो.... आणि जाऊन सायली ला हळू आवजात बोलतो...
"सायु ताई...."
सायली मात्र झोपेत ओरडते😅....
"अम्म कोण आहे..."
"सायु ताई अग उठ...अग तुला जोराजोरात हलवू पण नाही शकतं... अग उठ ना मी Sidhu ग..."
"कोण Sidhu...प्लिज झोपु दया मला🤤😤😴😴😴."
आता मात्र तो जरा जोरात आवाज देतो...
"सायु ताईईई......😤"
"हा हा हा हा कोण कोण....अरे Sidhya बाळा काय झाल"
"अरे वा बाळा म्हणजे तुला आठवतय ना मी कोन ते... झोपेत तर ओळख पण नाही दिलीस तू...😢"
"सॉरी बाळा बर बोल काय झाल..."
मग सिद्धार्थ सगळ मनातल सायली जवळ बोलतो...
"ह्म्म्म Sidhya समजू शकते मी... पण आता काय करायच.."
"तेच तुला विचारतोय ना सायु दी😢"
"ह्म्म्म....आठवल😀"
"काय काय"
"अरे उद्या जाऊ आपन आणि मुलगी बघून येऊ..तस ही काका काय तू नाही बोलास तर त्या मुलीशी जबरदसती नाही करणार 😀"
"अरे हो कि...थैंक्यू ताई...टेंशन मध्ये कधी काय समजत नाही बग"
"हम्म ठरल मग..."
"हो😀बर जातो मी झोपायला......तू पण झोप हम्म...बाय"
"बाय"
आणि आता मात्र सिद्धार्थ जाऊन झोपतो निवांत.....
(आता बघू पुढे यांच काय होत.....☺️आणि तुम्ही सगळ्यानी खुप Support केला त्यासाठी सगळ्यांचे खुप आभार मानते मी.... असच Support करा...काही न आवडल्यास नक्की सांगा....🙏🙏)