कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २५ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २५ वा

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग- २५ वा

--------------------------------------------------------------------------

अजयजीजू आणि रंजनादीदी यांचा कार्यक्रम कल्पनेपेक्षा जास्त छान पार पडला ,याचे

भरभरून समाधान मिळवता आल्याचा आनंद अनुशाच्या मनाला होत होता . त्यात जास्त

कौतुकास्पद असा भाग ..ठरला होता तो. अजयसरांनी केलेला कॉलेजातील माणसांचा गौरव.

पाहुणे निघून गेल्यावर प्रिन्सिपलसरांनी त्यांच्या भावना .अनुशाला सांगतांना म्हटले -

अनुशा ..हा कार्यक्रम आयोजित करण्याचा तुझा उद्देश ..वेगळा आहे, हे मला माहिती आहे .

तो किती सफल झाला आणि तो किती सफल होईल ..?

याचे उत्तर तर तुला हा कार्यक्रम सागर देशमुख पाहतील तेव्हांच कळेल ,

पण, माझ्या भावना तुला सांगतो ..

अनुषा -तसे पाहिले तर.

आजचे हे व्यासपीठ ..हा कार्यक्रम अजय सरांच्या मुलाखतीसाठीचे होते.

एका अर्थाने ..स्वतःचे कौतुक ,स्वतःच्या कार्याबद्दल मोठेपणाने बोलणे ..दुसर्या शब्दात

सांगायचे तर ..”स्वतःची टिमकी वाजवून घेण्याची सोनेरी संधी त्याना तू दिली होतीस..


पण..किती आश्चर्य ,असे काहीच घडले नाही ...आणि जे घडले किती वेगळे घडले ते आपण सगळ्यांनीच पाहिले ..

आतापर्यंत केलेल्या कार्याचे.. श्रेय ..अजयसरांनी स्वतःकडे अजिबात घेतले नाही , ते श्रेय ..त्याचे माप

भरभरून आपल्या सहकार्यांच्या पदरात टाकले ..याला म्हणतात मोठ्या मनाचा माणूस.

आपल्या कुणाच्या ध्यानीमनी नसतांना –या माणसाने ..असे काही करून दाखवले की.

हॉलमध्ये उपस्थित प्रत्येकाला “ फोटो मध्ये दिसलेला निसर्गरम्य परिसर हा आपण जिथे रोजच

असतो.त्याच कोल्जेचा आहे हे अजय सरांनी दाखवून देणे ..म्हणजे ..”डोळे असून आपण पाहत नाही “,हेच

दाखवून ..आपण असे कसे वागतोय “याची जाणीव करून दिली ..आपली आपल्यालाच लाज वाटावी “

असे हे आहे .

..जो पर्यंत मनाने समरस होत नाहीत ..तो पर्यंत डोळ्यांने पाहून काही होत नसते .त्यांचे हे उद्गार

अगदी योग्य आणि पटणारे आहेत.

अनुषा ..प्रिन्सिपल म्हणून, कोलेजच्या वतीने मी तुला खूप धन्यवाद देतो. कारण..अजयसरांच्या

संस्थेने केलेल्या गौरवाचे क्षण थेट रिले मुळे सिटी मधल्याच नव्हे तर ,जिथे जिथे हे chanal दिसते

तिथ पर्यंतच्या हजरो लोकांनी पाहिले , उद्याच्या पेपरमध्ये याचे फोटो आणू बातम्या प्रसिध्द होतील ..

कोलेजच्या गौरवाचे हे क्षण आम्हा सगळ्यांना तुझ्या या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे मिळाले .

सरांचे हे बोलणे ऐकून अनुषा संकोचून गेली ..ती सरांना म्हणाली ..

काय हे सर, असे काही नाही .

.मी वेगळ्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला ,तुमचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे .

अजयसर आणि रंजना दिदींनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केलेल्या भावना “ मला हव्या आहेत त्या अगदी तसाच आल्या आहेत .

पण त्या अगोदर अजयसरांनी कॉलेजचा आणि आपल्या व्यक्तींचा जो गौरव केला “ त्याबदाल तर मला

काहीच माहिती नव्हते .कल्पना सुद्धा नव्हती.

खरेच हे खूपच आनंददायक झाले ..माझ्या उद्देशाला अधिक प्रभावीपणे सफल करण्यासाठी हे उपयोगाचे

ठरणारे आहे.

प्रिन्सिपलसरांचा निरोप घेऊन ..अनुषा घराकडे निघाली .घरी गेल्यावर पुन्हा एकदा रेकॉर्डे केलेला

कार्यक्रम पाहून .नेमके काय ठेवायचे ? काय डिलीट करायचे ? हे तिला ठरवायचे होते .

गेल्या दोन चार दिवसात .सागर देशमुख सरांच्या ऑफिसात जाऊन ..त्यांच्याशी बोलण्यास वेळच नव्हता .

लागोपाठचे हे दिवस खूप बिझी गेले..पण, या दिवसात आपण जे ठरवले ..ते कसे पार पडेल ?

याचे खूप टेन्शन सतत आपल्या मनावरती होते . पण. म्हणतात ना ..मन आणि हेतू निर्मल –स्वच्छ असेल तर

कार्य निर्विघ्न पार पडत असते “, याचा अगदी सही सही अनुभव आपण घेतलाय.

तिच्या कानात अजून ही अजय सर आणि रंजनादीदींचे शब्द घुमत होते ..

मुलाखती मध्ये अनुशांने दोघांना भावनिक नात्यांच्या बद्दल आणि त्यांच्या आई-बाबांच्या बद्दलच्या

भावना व्यक्त कराव्या असे सुचवले होते ..त्याप्रमाणे -

रंजनादीदी बोलतांना म्हणाल्या ..भावनिक नाते , आपसातील नाते ..ही जपायची असतात ,

ज्यांना ही जपणूक जमत नाही.. ती माणसे माझ्या मते खुप कमनशिबी असतात .

लौकिक दृष्ट्या ते भले ही श्रीमंत असतील , पण, त्यांचे भावनिक विश्व भकास असते ,उजाडलेले

असते .

आपल्याला वयक्तिक दुखः भोगावे लागणे ..याची शिक्षा .इतरांना भोगायला लावणे “ हे चुकीचे

असते “ पण काही लोकांना त्यात आनंद मिळतो , हा स्वभाव दुखात भर टाकणारा असतो “

त्यांना स्वतःच्या स्वभावाबद्दल हे माहिती नसते असे मुळीच नाही .तरी हट्टीस्वभावाची माणसे -

वरकरणी कठोर ,कोरडे आणि रुक्ष मनाने राहून ,आनंदात आहोत दाखवायचा प्रयत्न करीत जगात राहतात .

मित्रांनो ,माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर ..मी सांगू इच्छिते की ..आम्हाला आमच्या वडीलधार्या

माणसांनी एका ही शब्दाने कधी दुखावले नाही , त्या जखमा दिल्या नाहीत.

लेकीचा सुखाचा –समाधानाचा संसार पाहायला माझ्या आईने , बाबाने कधीपण यावे ..

बाबाना इतकीच आठवण देते .की .लेकीच्या घरी येण्यास निमंत्रण येण्याची वाट पहायची नसते ..

बाबाची लाडकी लेक .कधीची रस्त्याकडे नजर लावून बसली आहे ..की तिचा बाबा नक्की येईन

तिच्याकडे स्वतःहून ..

आणि अजयजीजू म्हणाले –

मित्र हो – माझ्या निसर्ग –प्रेमामुळे ..त्याच्या सतत सहवासात राहून..मला एक गोष्ट शिकायला मिळाली

आहे ..आपले मन गगन समान विशाल हवे . निर्मल आणि निरभ्र आभाळा सारख्य मनात .गैर समजाचे ढग कधीच जमू देऊ नये ,

याने नात्यातील प्रदूषण उगीचच वाढते ..ज्यामुळे नात्यातील मायेचा आणि जिव्हाळ्याचा

प्रवाह जातो.

मित्र हो ..आई-वडिलांचे प्रेम दुर्दैवाने .मला मिळाले नाही .पण, त्याची उणीव मला कधीच भासली नाही ,

ती भासू दिली नाही .माझ्या पत्नीच्या आयुष्यात तिला लाभणारी .तिच्या बाबांची –आईची लाभत

असलेली प्रेमाची सावली “ पाहिली की मी भरून पावतो.

आजकाल..पत्नीच्या आई-वडिलांना ..सासू-सासरे .या नात्यात बघण्यपेक्षा ..

ती आपले आई-बाबांसारखेच आहेत असे,फक्त समजूनच नाही तर ..त्यांना आपले मानून त्यांच्याशी

प्रेमाचे नाते असते “असे मानून राहणारा मी एक व्यक्ती आहे.

आपल्या माणसांना आपण कधी ही दुरावता कामा नये .कारण ..

नात्यांचे बंध हे भावनांनी घट्ट बांधलेले असतात , जे कधीही तुटू शकत नाहीत

. दुराव्ण्याच्या दुखापेक्षा ..नाते असण्याचा आनंद ,आपले जगणे

अधिक भले आहे “ हे समजून घेणारी माणसे मला अधिक प्रिय आहेत.

रंजना दीदी आणि अजय जीजू .यांचे हे शब्द ..व्यक्त होताना त्यांची भावना अनुषा पुन्हा

स्क्रीनवर पाहत राहिली .

हे शब्द ऐकून आपले मन भावनिक होते आहे..तर जेव्हा सागर देशमुख स्वतः हे सगळ पाहतील ,

ऐकतील ..तेव्हा ..त्यांना हे शब्द .अनेक जाणीवा करू देणाऱ्या ठरतील का ?

उद्या सकाळी ..सागर देशमुख यांच्या ऑफिसात गेल्यवर या सगळ्या प्रश्नांची उतारे मिळणार होती ,

तोपर्यंत वाट पाहणे ..सध्या तरी हाच उपाय आपल्या हातात आहे ,असे अनुशाला वाटत होते.

तिने ..अभिजितला फोन केला ..

भेटू या का रे आपण आज ?

तुला कार्यक्रमाबद्दल सांगायची उत्सुकता आहे.. तू तुझे काम आटोपून ये नेहमीच्या ठिकाणी ..

भेटू संध्याकाळी .बाय डियर अभी ..

रंजनादीदी आणि अजयजीजू कार्यक्रम आटोपून घरी आल्यावर घरी बोलत बसले होते ..

अजय म्हणाले ..

अनुषा किती मनापसून काम करते आहे , तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आज आपली

मुलाखत घेतली तिने ..आपण दोघे जे काही बोललो ते समोरच्या सगळ्यांना खूप आवडले ,हे तर आपल्याला कार्यक्रमा नंतर आवर्जून सांगितले.

पण यातली खरी गंमत काय आहे ? हे फक्त ..तुला मला आणि अनुशाला माहिती आहे

की आपण जे काही बोलालो ते सारे शब्द तुझ्या बाबंना उद्देशून आहेत ..त्यांनी या भावना ऐकाव्या

आणि आपल्यातील दुराव्यावर विचार करावा ? आणि हे घडावे ..हा अनुशाचा उद्देश आहे.

रंजना दीदी म्हणाली –

अजय –

बाबांचे आपल्या बद्दलचे मत एक वेळ बदलेल ,पण, मला वाटते आहे की ..सगळ्यात आधी

आई आणि बाबा यांच्या नात्यातील दुरावा नाहीसा झाला पाहिजे , अभिजितच्या मनातील कडवटपणा

गेला पाहिजे ..तरच ..त्यांच्या घरात ..एक मोकळेपणा आणि जिवंतपणा येईल ..

माझ्यामते ..अनुशाने ..त्या दृष्टीनी सुद्धा जास्त विचार केला पाहिजे ..

आपण दोघे ही आता सेटल आहोत “आपली काळजी करण्याची गरज नाही “ याचे समाधान आईच्या ,

बाबांच्या मनात नक्कीच आहे” हे मला माहिती आहे .

पण..बाबांच्या स्वभावामुळे ..ते काही झाले तरी ते बोलून व्यक्त करणार नाहीत.याचे मला वाईट वाटते .

तुम्हाला एक सांगते अजय..

तुमच्याबद्दल ,माझ्या बद्दल .बाबांना काहीच माहिती नाहीये ?, माहिती नसेल ? असे होऊच शकत नाही.

त्यांना सगळ माहिती असणार ..फक्त ..त्यांच्या मनाविरुद्ध आपण वागलो आहोत ..त्याची शिक्षा ते आपल्याला भोगायला लावत आहेत .

रंजनाचे बोलणे ऐकून घेत ..अजय म्हणाले ..

मला पण कधीकधी वाटते रंजना ..की ..

आपली पण जरा चुकीचे वागलो आहोत . बाबांचा आपल्या प्रेमाला विरोधच असणार ,हे गृहीत धरून

आपण, त्यांना एका शब्दाने कधी कल्पना दिली नाही की ,त्यांना सांगितले नाही ..,

“मी काही विरोध नसता केला तुम्हाला “ असे जर ते आता म्हणाले तर ?

चुकीचे कोण वागले ? आपण दोघे ? की तुझे बाबा ?

आता याची सफाई देण्यापेक्षा ..मला वाटते ..आपण त्यांची मुले आहोत , त्यांची क्षमा मागण्यासाठी

जाऊन ,त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे म्हणेन मी.

रंजनाला .अजयच्या या बोलण्याचे ..आश्चर्य वाटले ..

ती म्हणाली –अजय , काय म्हणताय तुम्ही हे .. याचा विचारच नव्हता केला मी .

आपण आपला विचार बदल करून ..तुम्ही म्हणता तसे केले तर ? नक्कीच हा प्रश्न सुटेल .

अजय म्हणाले ..रंजना ..या साठी सुद्धा ..आपण अनुशाची मदत घेऊ या..

म्हणजे ..बाबांच्या मनात तिच्या विषयी अधिक आपलेपणा निर्माण होईल ..जो आपल्यासाठी पण

तितकाच छान आहे..

अजयचे विचार ऐकून .रंजना खूप सुखावली ..

ती म्हणाली ..यस .आपण असेच करू या ..अनुशाला हे ठरव ..आणि करवून घे असे सांगू या.

त्याच वेळी इकडे ..

अभिजितच्या भेटीसाठी .अनुषा .रोजच्या ठिकाणी आलेली होती ..काही वेळेतच अभिजित पण

पोंचला .

आल्याआल्या त्याने ..अनुशाला ..शाबासकी देत म्हटले ..

तुझ्या कोलेजात्ला कार्यक्रम .माझ्या अख्या ऑफिसने पाहिला ..ग्रेट जॉब अनुषा .

उद्या घरी जाऊन मी आईला पण हा कार्यक्रम दाखवणार आहे.

अनुष खूप खुश झाली.. अजय जीजू ,रंजना दीदी आणि आता तिचा अभिजित या कार्यक्रमास

पाहून खुश झाले होते ..आता फक्त ..स्वतः सागर देशमुख राहिलेत.

उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार ..अनुषा विचार करीत राहिली..

-------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी-पुढच्या भागात

भाग -२६ वा लवकरच येतो आहे

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------