Tujhach me an majhich tu..14 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १४

तुझाच मी अन माझीच तू...भाग १४

अमेय आणि राजस च्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता राजस ने अमेय ला लग्न कर हा सल्ला दिला खरा पण त्याचा हा सल्ला अमेय ला मात्र पटेना. त्याचे आधी वेढे घेण चालू झालं.

"लग्न??..मी लग्न करू? जमणार नाही रे राजस!! आणि सध्या नको म्हणालोय ना.. आत्ता नाही वाटत गरज...तुला मी सुखात राहतोय हे पाहवत नाही का रे?" अमेय बोलला.

"तुला वाटत तितक वाईट नसत रे लग्न हे नातं.. प्रेम आणि लग्न हे सगळ्यात सुंदर नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडून तिच्या बरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं... किती थ्रिलिंग!! पण अर्थात, लग्न करण्या आधी तू प्रेमात पडला पाहिजेस.."

"बरोबर बोललास यार... करेक्ट यु आर!! पण माझ कोणाशी आणि कोणाच माझ्याशी पटेल असं मला वाटत नाही.. मी अगदीच साधा आहे रे..आणि हल्ली मुलींना भारी भारी बॉय फ्रेंड्स हवे असतात.. मी त्यांच्या त्या कॅटेगरी मध्ये बसत नाही सो कोणी मला भाव सुद्धा देत नाही.. " थोडासा हसत अमेय बोलला पण हा जोक नाही हे उमजून अमेय भुवया उंचावत राजस कडे पाहत बोलला..

"ओह.. पण तू इतकाही साधा बीधा नाहीयेस अम्या.. उगाच गैरसमजात राहू नकोस.... पण माझ्याकडे असा का पाहतोयास रे?" अमेय ची प्रतिक्रिया न समजल्यामुळे राजस थोडा गोंधळून बोलला.

"हो का.. काहीच नाही कळल? तू आहेसच एकदम आकर्षक राजस!! तुझ्याकडे मुली आकर्षित होतात राजा.. आणि आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही..." अमेय इतक बोलला आणि त्याला त्याच हसू आवरेना... त्याचं बोलण ऐकून राजस जरा विचारात पडला,

"कसल काय घेऊन बसलास अमेय!! सकाळी आभा ने भाव पण नाही दिला.. हव्या त्या लोकांनी भाव दिला नाही तर किती वाईट वाटत यु सी... आणि कसला हर्ट झाला माझा इगो!!"

"मग हीच ती तुझ्यासाठी योग्य असणारी मुलगी आहे!!"

"बाय द वे, अमेय, डोंट चेंज द टॉपिक...खर सांग ह अमेय.. यु रिअली डोंट वॉंट टू मॅरी..?" राजस चा प्रश्न ऐकून अमेय गोंधळून गेला.. त्याने जरा वेळ विचार केला... तोपर्यंत राजस खाण्यात गुंग झाला.. विचार झाल्यावर अमेय बोलायला लागला,

"मे बी येस..मे बी नो!! म्हणजे मला नाही माहिती!! कोणीतरी हवं असत पण मी माझं फ्रीडम पणाला लाऊ शकत नाही.. नात्यात बांधिलकी नसली पाहिजे.. समजतंय का राजस?"

"हो हो.. भा पो.. मिळेल अगदी तुला हवी तशी लाईफ पार्टनर!! आहे माझ्या नजरेत एक.. पण आधी तिच्याशी बोलून पाहतो.. मग भेटा.. वाटल तर गो अहेड.. ऑर लिव्ह इट.." राजस हसून बोलला..

"ए तू काय मला सिरीअसली घेतल का काय? सध्या मी एकटाच बरा आहे.. आत्ता माझ्या आयुष्यात कोणी लुडबुड केलेली मला चालणार नाही... तू तुझ काय होतंय ते पहा. तुला मदत हवी असेल तर सांग..मी आहेच!! आणि तुला खरच आवडली असेल आभा तर डोंट लुक बॅक.." डोळा मिचकवत अमेय बोलला..

"काय यार... ठीके पण.. यु टेक युअर टाईम!! मनापासून वाटत नाही आणि कोणी आवडत नाही तोपर्यंत घाई नाही करायची.. लग्नाचं नातं कसं नेहमीच फ्रेश पाहिजे.."

"येस.. येस.. माहितीये तू फार सिरिअस आहेस आभा बद्दल पण जरा दमानं घ्या साहेब.. उगाच उचकली तर बसाव लागेल तुला बोंबलत... "अति घाई मसणात नेई.." ही म्हण माहितीये ना? आणि तू तिच्या बद्दल सांगितलेल्या वर्णनावरून तर ती एकदम रोख ठोक वाटली.. म्हणजे संथ गतेने जा.. कासवासारखा.. म्हणजे विजय तुझाच!!" अमेय बोलला आणि त्याच्या बोलण्याला होकार दर्शवत राजस ने मान डोलावली.

"हो हो.. म्हणूनच शांत आहे अजून नाहीतर पहिल्याच दिवशी प्रपोज केलं असत तिला.. पण ती वेगळी आहे हे नक्की.. म्हणूनच तिच्या बद्दल विचार थांबवता येत नाहीये.." राजस हसत बोलला

"नशीब तुला अक्कल आली.. आणि तू लगेच प्रपोज बिपोज नाही केलस.. आणि आय कॅन अंडरस्टॅंड तू किती गुंतला आहेस तिच्यात... लगे राहो पण लक्षात ठेव.. गो स्लो! आणि लेट हर नो युअर वर्थ!! सारखा सारखा पुढे पुढे नको करूस.. वैतागतात मुली अश्या वागण्याने.." अमेय बोलला आणि राजस मात्र त्याच बोलण ऐकून हसायला लागला,

"तुला गर्ल फ्रेंड नाही.. तरी तू इतकी कशी रे माहिती मुलींना काय आवडतं आणि काय आवडत नाही?? अगदी प्रो असल्यासारखी माहिती देतोयास.. काय आहे काय हे ह? डोंट टेल मी, तू छुपा रुस्तम आहेस.. आणि यु हॅव्ह अ गर्ल फ्रेंड? मगाशी उगाच नाटक केल न? " थोडा विचार करत राजस बोलला आणि त्याचं बोलण ऐकून अमेय ने डोक्याला हात मारून घेतला..

"नो रे राजा.. गर्ल फ्रेंड नाही मला.. पण मी बरीच पुस्तक वाचतो.. लव्ह स्टोरीज जास्ती आवडतात.. सो आहे आपल थोड ज्ञान.. अर्थात हे सगळ ज्ञान पुस्तकी.. मला कुठे काय अनुभव.." अमेय हसत बोलला पण आता राजस ला त्याच्या वर विश्वास ठेवण अवघड वाटत होत,

"खर सांग रे... कोणी असेल तर मी फ्रेंड शी बोलत नाही मग.."

"मी सांगितलं ना राजस काहीही घाई नाही.. आणि खरच कोणी नाहीये.. तुला सांगणार नाही का.. तू तर आपला खास यार आहेस!! आणि हसलो कारण तुला दाट शंका आहे..पण तसं काहीच नाहीये.. ट्रस्ट मी... सध्या वेळ नाहीये रे कोणासाठी.. "

"बर.. चलो आणि घड्याळ पहा... किती वाजले चेक कर.. इट्स टू लेट.. उद्या एक दिवस काम मग परवापासून २ दिवस सुट्टी..."

"हो ना यार.. सुट्टी किती हवीहवीशी वाटते ना.. म्हणजे भरपूर काम केल की सुट्टीचे महत्व अजूनच कळत.. आणि येस.. निघू आता! बाय द वे, बिल देऊ?" हसू कंट्रोल करत अमेय बोलला...

"दे दे.. तूच दे बिल.. आणि ह्या पुढे नेहमीच! मी पाकीट आणणारच नाहीये आता... कळेल मग कसा आहे राजस!!"

"मला काही प्रोब्लेम नाही बघ.. तसही, गर्ल फ्रेंड नसली की काहीच खर्च नसतात.. पण तू पैसे वाचवायला लाग.. मग एकदम बर्डन नाही येणार बघ.. आपण तयारीत राहायचं..." राजस ची खेचत अमेय बोलला आणि अमेय मग मात्र शांत झाला.. जाता जाता त्याला राजस ला भडकवायचे नव्हते पण त्याने न राहवून शेण खाल्लेच होते.. अमेय ने जीभ चावली... अमेय चे बोलणे ऐकून राजस काहीच बोलला नाही.. पण त्याने फक्त वेटर ला बिल आणायचा सांगितलं..

बिल आल्यावर त्याने पैसे दिले आणि अमेय ला डोळ्यांनीच बाहेर येण्याची खुण केली. अमेय शांतपणे बाहेर आला.. तो बाहेर येतांना एकही शब्द बोलला नाही कारण त्याला राजस चा राग चांगलाच माहिती होता. आणि आत्ता सुद्धा अमेय ला अंदाज आला की आता राजस साहेब भडकले आहेत.. सो तो जास्ती चिडायच्या आधीच अमेय ने बाहेर गेल्या गेल्या बोलायला लागला,

"आज मज्जा आली रे राजस... आपण असेच भेटलो पाहिजे न चुकता.. बर झालं आज तू भेटायचं ठरवलं.." अमेय एकदम सज्जन सारखा बोलला.. आणि त्याने राजस च्या मूड चा अंदाज घेतला. पण राजस अजिबातच चिडला नाही..त्याचे हे वागणे पाहून अमेय जरा आश्यर्यचकित झाला..

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED