कादंबरी- जिवलगा ...भाग -४१ वा . Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा ...भाग -४१ वा .

कादंबरी – जिवलगा

भाग – ४१ वा

------------------------------------------------------------

नेहा आणि सोनियाचा रविवार ..सुट्टीचा ,सगळ्या गोष्टी आरामशीर करण्याचा दिवस..

आज तिसरा मेंबर ..अनिता नव्हती ...ती आणि तिचा रोहन दोघे मिळून संसारची तयारी

सुरु करण्याच्या स्वप्नवत कामात गुंतून गेले आहेत. या पुढे अनिता नावापुरती सोबत

असणार हे मानून घेण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.

सोनिया म्हणाली ..

नेहा ..आज तिकडे हेमूच्या गावी देखील ..सगळे जण घाई –गडबडीत असणार .. हेमूच्या

घरी पाहुणे येणार , हेमूच्या मनात काय आहे ? हे आपल्याला माहिती आहे , पण बाकीच्यांना

कुठे काय माहिती आहे ..ते तर आजच्या कार्यक्रमाची वाटच पाहत असणार .

यावर नेहा सांगू लागली ..

तसे नाहीये सोनिया ..

मामाचे आणि हेमुचे सविस्तर बोलणे झाले आहे या विषयावर ..मामाच्या बोलण्यावरून असे

कळते आहे की ..

मुलगी पाहण्याच्या हा सगळा घोळ ..हेमूच्या मामीने घातला आहे.

मामाच्या म्हणन्या नुसार ..मुलीची अपेक्षा ..फार वेगळी असणार आहे..

हेमू आणि त्यामुलीची भेट होईल ..त्यांचे बोलणे होईल ..मगच आपल्याला कळेल ,तो पर्यंत

आहेच टेन्शन .

सोनिया म्हणाली ..ए रडूबाई ..तुला कसे समजत नाही की ..आजच्या या कार्यक्रमात अजिबात दम

नाहीये ..फक्त ठरवले आहे म्हणून हा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे .

नेहा म्हणाली – सोनिया ,असेच व्हावे ..!

त्याच वेळी इकडे ..

हेमूच्या घरी ..मामाने आणि हेमूच्या आईने..दुपारी येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करून

ठेवली होती , आल्याबरोबर चहा-पाणी , आणि मग ..समोरच्या बैठकीत कार्यक्रम सुरु .

तास- दोन तासाचा तर प्रश्न .

मामा म्हणाले – मी काय सांगतो ते तुम्ही तिघेही लक्षात ठेवा -

पाव्हणे .आल्या आल्या ..परतायची घाई सुरु करतील ..तेव्हा ..तुम्ही बरं बर.म्हणायचे फक्त

बाकी काही बोलायचे नाही .

हे ऐकून तिघे ही ठीक आहे म्हणाले .

बरोबर ..दोन वाजता ..मामाचा फोन वाजला ..

पावण्याच्या गाडीचा ड्रायव्हर विचारीत होता –

आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत ..पुढे कसे यायचे ? आणि किती लांब आहे ?

गाडी येईल ना घर पर्यंत ?

मामा म्हणाला –

तुम्ही आहे तिथेच थांबा ..मी आलोच ..तुम्हाला घायला .

दहा मिनिटांनी ..हेमूच्या घरासमोर एक सोळा सीटर गाडी थांबली ..त्यावरचे पब्लिक स्कूलचे नाव दिसत होते

गाडीतून उतरली ती ७-८ माणसेच . इतकी कमी माणसे पाहून ..हेमूच्या आईचा जीव हलका होऊन गेला .

सगळे जण आत येऊन बसले .

लहान गावातील पद्धती प्रमाणे ..बायका आतल्या खोलीत आणि पुरुष बाहेर बसले.

मामाने ओळख करून देत म्हटले ..

हे मुलीचे वडील – दादासाहेब या नावने सगळीकडे यांचा परिचय आहे. मोठ्या पार्टीचे मोठे

नेते आहेत . जिल्ह्यात शैक्षणिक संस्था आहेत दादासाहेबांच्या . इतकी वर्ष राजकारणात

आहेत पण..प्रसिद्धी आणि सत्तेपासून स्वतःला दूर ठेवणारे ..असे दादासाहेब असा दबदबा आहे.

हे त्याचे धाकटे चिरंजीव जिल्ह्याचे भावी नेतृत्व , आणि थोरले चिरंजीव ..दिल्ली दरबारी आहेत.

आणखी हे दोन .पाव्हणे .दादासाहेबांचे दावे-उजवे हात .

दादासाहेबांनी ..मग हेमूच्या बाबांच्या बद्दल जाणून घेतल्यावर म्हटले ..अशा ऋषितुल्य व्यक्तीला

भेटून आनंद झाला .

मामाने हेमुबद्दल सांगितले ..

ते ऐकल्यावर ..दादासाहेब फार खुश झालेले नाहीत ..हे सर्वांना जाणवले ,पण, दादासाहेबांच्या

बोलण्यातून ते जाणवणे शक्य नाही , हे मामाला कळत होते.

दादासाहेबांनी .मामाला सूचना केली ..

आपण ज्यासाठी आलोत ..ते होऊ द्या ..आम्हाला घाई आहे जाण्याची .

आतून मामी ..मुलीला घेऊन आल्या ..

हेमू तिच्याकडे पाहत होता ..

समोर बसलेल्या दादासाहेबांची सेम कॉपी दिसत होती ....

हेमूच्या बाबाला दादासाहेब म्हणाले ..तुम्ही विचारा काय विचारयचे आहे

आमच्या ताईसाहेबाला ..

हेमुचे बाबा म्हणाले ..दादासाहेब ..आपण काय विचारायचे ..मुला-मुलीला बोलून घ्या म्हणावे ,

ते जे ठरवतील ..ते फायनल.

हे दादाशाबे खुश होत म्हाणाले ..अगदी रास्त सुचना केलीत गुरुजी तुम्ही.

मामाकडे पाहत ते म्हणाले ..

मामा..या पोरांना घेऊन जा बाहेर ..आणि या म्हणावे एकमेकांना बोलून..

आणि लवकर या.आपल्याला घाई आहे , लेट झालेला अजिबात चालत नाही आम्हाला .

समोरच थोड्या अंतरावर हेमूच्या बाबांची शाळा आणि ऑफिस होते ...मामा त्या दोघांना घेऊन

तिथे गेला . तिथे बसण्याची सोय होती .

हेमू म्हणाला ..मामा आम्ही येतो ..थोड्या वेळात .

दोघे समोरासमोर बसले ..

तिने बोलण्यास सुरुवात केली ..

मी संजीवनी ..दादासाहेबांची एकुलती एक मुलगी .त्यांचा शैक्षणिक कार्याचा वारसा माझ्याकडे आहे.

माझे दोघे भाऊ राजकारणात आहेत , दादासाहेबांच्या इतर सामाजिक कार्याची जबाबदारी ,

माझ्याकडे आहे.

आम्ही आलोत त्या गाडीवर पब्लिक स्कूलचे नावे आहे न ..त्या संस्थेची मी अध्यक्ष ,चेअरमन

प्रिन्सिपल ..सगळं काही मीच आहे.

तसे पाहिले तर आपल्यात कॉमन वाटावे असे काहीच नाहीये. तुमचे स्थळ तुमच्या मामीनी सुचवले ,

त्या दादासाहेबांच्या जवळच्या नातेवाईक पण दादासाहेब त्यांना आपली बहिण मानतात , म्हणून

आमच्या परिवारात त्यांचा मान ठेवला जातो.

त्यांनी दादासाहेबांना फारच विनवणी केली ..म्हटले ..निदान बघून तर घ्या ..

तुम्ही हो म्हणावे असा अजिबात म्हणत नाहीये मी ..!

पण, मी या घरासाठी काही करू इच्छिते हे मला सगळ्यांना दाखवयाचे आहे.बाकी काही नाही.

हे पहा हेमकांत ..आपले जग वेगळे , उद्देश आणि हेतू वेगळे ..

मला पाहून, माझे स्टेट्स पाहून ..तुम्हाला जर मनात थोडे फार जर अशा करण्यासारखे काही वाटत

असेल तर ..सोरी ..तसे काही वाटून घेऊ नका .मी तुमचा विचार करावा किंवा तुम्ही माझा विचार करावा

असे आपल्या दोन परिवारात काहीच नाहीये.

आता फक्त एक करा ..

सगळ्यांच्या समोर तुम्ही मला नकार द्यावा ..

त्याचे कारण ..लगेच सांगा ..की ..

तुम्ही परदेशात स्थायिक होणार आहेत, आणि त्याच तयारीत आहे.

दादासाहेब पण तुमचा नकार ऐकून नाराज वगरे होणार नाहीत ..

कारण ..दादासाहेब आणि माझे एकमत आहे ..की आपल्याला परदेशी जाणारा मुलगा “असेल

तर त्याला आपला ठाम नकार आहे.

संजीवानीची ही ऑफर हेमुला मनापसून आवडली ..

तो म्हणाला .. हे पहा ..संजीवनी ..

मी माझ्या मर्यादा ओळखून आहे . केवळ मामींनी हा घोळ घालून ठेवलाय ,मामला तो निस्तरणे

भाग पडले , त्यामुळे मला रजा घेऊन यावे लागले.

काही हरकत नाही ..

तुम्ही म्हणल्या तसेच मी सगळ्यांना सांगेन ..पण माझी सुद्धा अट आहे, त्या प्रमाणे

सगळ्यांच्या समोर तुम्ही तुमचा नकार द्यावा मला ..आणि त्याचे कारण सांगावे.

म्हणजे ..मामीचे समाधान होईल , दादासाहेब खुश

संजीवनी म्हणाली ..मला काहीच प्रोब्लेम नाही ..

तुम्ही सांगितले की..मी पण लगेच सांगते , यु डोंट वरी हेमकांत.

दोघे परत आले, सगळ्यात येऊन बसले , त्यांच्कडे पाहत दादासाहेब म्हणाले ..

छान बोलणे झालेले दिसते आहे तुमच्यात , फ्रेश दिसत आहेत तुम्ही दोघं .

मामी आणि हेमूच्या आईंनी सगळ्यांना फराळाचे दिले ..आणि खाता खाता दादासाहेब हेमुला

म्हणाले ..

चला , आपापले मत म्हणा की निर्णय म्हणा .

काय असेल ते स्पष्टपाने सांगून टाका ..

उगीच घोळ घालयचा नाही, आणि तो वाढवत बसायचा नाही , असले काही आम्हाला अजिबात

आवडत नाहीये.

मामा म्हणाले – हेमकांत ,तुम्ही तुमचे सांगा –

हेमू सांगू लागला –

मी सोफ्टवेअर फील्ड मध्ये काम करणारा माणूस ,

दादासाहेब ..तुमचे जग वेगळे ,माझे जग वेगळे ,

येत्या सहा महिन्यात कंपनी मला परदेशात पाठवणार आहे , किती वर्षासाठी ? की कायमचे

हे ठरेल पुढच्या काही महिन्यात . या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी किरकोळ आहेत .

संजीवनी ..त्यांना मैडमच म्हणतो मी ..

त्यांचे फील्ड वेगळे आहे , त्या करिअर करतील त्यांचे ,पण ते इथेच राहून

त्यांना परदेशी जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये .

आणि मी माझी करीयर कशी सोडू ? आणि का सोडू ?

हे लक्षात घेतले तर ..आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर ठेवीत ..निरोप घेणे उत्तम.

त्यांना “नकार “ देणे योग्य नाही होणार , पण “होकार देणे “चुकीचे आहे .

दादासाहेब एकेक शब्द ऐकत होते ..हेमुचे सांगून झाल्यावर ते हेमूचा बाबांना म्हणाले ..

गुरुजी मानले तुमच्या लेकाला ..मनापासून आवडले त्याचे स्पष्ट बोलणे , ऐकणार्याला वाईट वाटणे

दूरच , त्याला मनापासून पटणारे ..कारण “दिले आहे .

मामा आपण तर खुश झालो तुमच्या भाच्यावर .

आमच्या बहिणीला सुद्धा पटेल भाच्याच्या सांगण्याची पद्धत .

लगेच संजीवनी बोलत म्हणाली ..

दादासाहेब ..माझा होकार आहे आणि हेमकांत यांनी तरीही मला नकार दिलाय “असे कुणी समजू नये .

आपण एकमेकासाठी अनुरूप नाही आहोत “ हे लक्षात आणून देत मी माझा नकार “त्यांना सांगितला आहे

आता तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगते ..की ..आम्ही दोघांनी एकमेकांना सपष्ट शब्दात ..

नकार दिला आहे “

आणि अगदी मन मोकळेपणाने आमचे बोलणे झाले आहे. त्यामुळे टेन्शन वगरे काही घेऊ नका .

चहा घेत बोलणे झाले ..घाई घाई करीत दादासाहेब आणि पाव्हणे मंडळी आणि मामी निरोप घेऊन

निघाले ..

घरात ..पुन्हा चौघेजण ..

मामा म्हणाला ..हेमू माफी कर रे मला ..तुझ्या मामीमुळे हकनाक ..हे “नकार प्रकरण घडले “

पण, आता काही घोळ नाही ..गोंधळ होणार नाही . तू तुझ्या मनाप्रमाणे तुझ्यासाठी छान मुलगी

शोधू शकतोस ..

मामा तू उद्या पण थांब , आई बाबांशी बोलताना मला तुझी गरज लागेल ..

काय हेमू ..काही आहे का ?काही स्पेशल ?

मामा ते उद्याच समजेल.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात

भाग – ४२ वा लवकरच येतो आहे .

--------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२