कादंबरी- जिवलगा -भाग - ४० वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा -भाग - ४० वा

कादंबरी – जिवलगा

बाग -४० वा

---------------------------------------------------

माणसाच्या स्वभावाची एक गंमत असते ..’त्याच्या मनातल्या ..त्याने ठरवून ठेवलेल्या गोष्टी

ज्या अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या असतात ,..’ नेमक्या अशा गोष्टी कितीही ठरवून ठेवलेल्या असल्या तरी

त्या पूर्ण होण्यासाठी ..त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मोठ्या माणसांची ,त्यांच्या परवानगीची गरज असते

कारण या अशा गोष्टींना एक विशेष असे सामाजिक स्थान असते.

तुमच्या लक्षात आले असेल ..त्य गोष्टी म्हणजे ’लग्न , विवाह ,या संदर्भात आहेत . या गोष्टी आपल्या

एकट्याच्या इच्छे-प्रमाणे करताच येत नाहीत असे नाही. त्यासाठी बहुतेक वेळा विरोध होत असतो , त्या

विरोधाला न जुमानता आपल्या मना प्रमाणे लग्न करणारे आपण पाहत असतो ,

या बंडखोरीमुळे अनेक कुटुंबात मोठे कठीण प्रसंग उद्भवतात आणि असलेले नाते सबंध, नव्याने होणारे नाते सबंध यात

निर्माण झालेली कटुता निवळण्यासाठी फार मोठा काळ जावा लागतो.

“प्रेम करणार्या जीवांच्या वाट्याला .हमखासपणे या प्रसंगातून जावे लागते . आपण सक्सेसफुल लव्ह-

स्टोरी ‘पाहतो ..पण या प्रेमवीर जोडीच्या पुढील आयुष्याचे काय झाले / याच्याशी आपल्याला काही-

देणे –घेणे नसते ‘ ,

अशावेळी ..दुनिया म्हणजे ..दुसरे तिसरे कुणी नसून ..आपल्या सारखे परिचित लोक .

.दोन्ही बाजूनी काही ना काही भले –बुरे असे म्हणत असतात “,

आणि लोग तो कहेंगे . लोगो का काम है कहना

छोडो बेकार की बातो को ..

असे दुर्लक्ष करीत ..आपल्या प्रेमाचा विजय साजरा करणारे बह्द्दार ही आपण पाहत असतो.

प्रेम “या शब्दातली जादू मोठी विलक्षण आहे. सगळ्यांना प्रेम करणे जमत नसते , सगळ्यांना हवेतसे प्रेम

मिळत नसते , मिळालेले प्रेम टिकवणे जमत नसते ..अशा या नाना तऱ्हा प्रेमात पडलेल्यांना अनुभवाया

लागत असतात .

इश्क हर घडी ..लेती ही इम्तेहान ..! असे कवी आणि शायर म्हणतात ते काही खोटे नाही..

आता हेच बघा ना.आपल्या लव्ह-स्टोरीचे हिरो-आणि हिरोईन .. हेमकांत आणि नेहा दोघे ही सध्या

मोठ्या पेचात पडलेले आहेत.. तो तिकडे ..परेशान ..आणि ही इकडे परेशान ..

आपण प्रेमात पडलेलो आहोत ..पण..आपल्या घरी तर दुसरेच काही विचार सुरु आहेत ..

या वादळात आपल्या प्रेमाची नाव ..तरेल की बुडेल ?

नेहा मनातून खूपच घाबरून गेलेली पाहून ..सोनिया तिला धीर देत होती ..

काळजी नको करू नेहा

हेमू त्यच्या गावाकडची परिस्थिती अगदी काळजीने पार पाडेल.

तरी नेहा म्हणाली ..सोनिया ..उद्याचा रविवार नीट जावा ..मगच खरे काय ते कळेल ..

आता रात्र झालीय ..

हेमू त्याच्या मामाबरोबर बोलला असेल ..ते ऐकून ..मामाला हेमूचा राग न येवो ..

आता काय चालू असेल तिकडे ?

इकडे ..

काय झाले ..पाहू या ..

संध्याकाळी ..मामा आला, चहा-पाणी झाले .. हेमू म्हणाला ..

चल , आपण बाहेर फिरून येऊ ..थोडे बोलायचे आहे , काही सांगायचे आहे..

मामा म,म्हणाला – अरे हेमू ..मी तुला हेच म्हणणार होतो ..

की चाल, बाहेर फिरून येऊ ..मला काही सांगायचे आहे ..जे सगळ्यांच्या समोर नाही सांगता येणार .

मामाचे हे शब्द ऐकून ..हेमू जरा गोंधळूनच गेला ..

आता हा मामा ..काय सांगणार आहे कुणास ठाऊक ?

आधी त्याचे ऐकून घेऊ या ..मग, आपली कहाणी सांगू..असे मनाशी ठरवीत .मामा आणि हेमू बाहेर

पडले ..

छोटेसे गाव ..काही अंतर चालून गेले की ..सगळीकडे अगदी शांत शांत..गर्दी नाही गोंगाट नाही

हेमू म्हणाला ..मामा , किती शांत वाटते आहे ..नाही तर आमच्या अवती भवती नुसती आवाज,

आवाज गर्दी आणि गोंधळ ..किती वेगळे आहे इथे सगळे..

मामा काही न बोलता ..बसत म्हणाला ..

मी सांगतो ते ऐकून घे..आणि मग ,यातील माझी बाजू समजून घे म्हणजे तुझा गैरसमज नाही होणार .

हे ऐकून हेमू म्हणाला –

अरे मामा ..तू सांग अगोदर .काय आहे ते..मग आपण ठरवू त्याबद्दल..

मामा म्हणाला - त्याचे असे आहे हेमू ..

तुझ्यासाठी तुझी मामी जी मुलगी घेऊन येते आहे ..ती एका मोठ्या पोलिटीकल फैमिलीतली आहे..

तिचे जग तुझ्या जगाशी कुठेच मेळ खात नाहीये..हे मला माहिती आहे..

पण, तुझ्या मामीच्या डोक्यात का आणि कोणत्या दृष्टीकोनातून

या मुलीचे स्थळ तुझ्यासाठी मस्त आहे ,हे खूळ शिरले आहे हे कळत नाही.

आणि ..ही मुलगी ..उद्या नक्की तुझ्याशी बोलेल .

.ते ऐकून घे ..घाईने निर्णय घेऊ नको ..

आणि तिला जे सांगायचे आहे..ते तिने नंतर सगळ्यांच्या समक्ष सांगावे ..”अशी तू तिला कंडीशन टाक ..

हेच असे कर तू उद्या , हे सांगायचे आहे तुला .

मामाच्या बोलण्याने हेमुला काही कळाले नाही ..उलट मनातला गोंधळ वाढला ..पण.यातून आशेचा एक

अंधुकसा किरण दिसतो आहे “असे त्याला मनातून वाटत होते .

तो म्हणाला ..ठीक आहे मामा ..

तू म्हणतोस तसेच होईल .

एक काम मात्र तू करायचे आहेस ..मामी आणि पाहुणे गेल्यावर तू जायचे आहेस . त्यांच्या सोबत परतण्याची घाई करू नकोस .

उद्या तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे मला .

हेमुचे ऐकून घेत मामा म्हणाला ..

तू तुझ्या मनात एक खुणगाठ पक्की बांधून ठेव हेमू ..

हा मामा नेहमीच येईल तुझ्या कामा ...!

बाहेरून फिरून आलावर ..जेवणे खाणे झाले ..उद्या येणाऱ्या पाहुण्याबद्दल जुजबी बोलणे झाले .

हेमुचे आई-बाबा म्हणाले ..

तुम्ही दोघे बाहेर गेला.तेव्हा काय ठरवले तुम्ही.आम्हाला कळले पाहिजे ..

उद्या पाहुण्यांनी आम्हाला आमचे मत विचारले तर ..उडवा-उडवीची उत्तरे देणे बरे दिसणार नाही.

हेमूच्या बाबांची समजूत घालीत ..मामा बोलू लागला ..

दाजी ..तुम्ही अजिबात काही फिकीर करायची नाही ..फक्त पाहत राहयचे ,काय काय होते ते..

तुम्हा दोघांना सांगतो ..हा कार्यक्रम व्हावा असे माझ्या मनात अजिबात नाहीये .

पण, आमच्या बायकोने अगदी हट्टाला पेटून ..हा सगळा घोळ घालून ठेवलाय ..

तो निस्तरणे आहे आपल्याला .

हेमूच्या आई-बाबांच्या चेह्रेयावरचा ताण हे ऐकून एकदम कमी झाला आहे ..ते पाहून मामा जरा

निचींत झाला .

हेमूच्या मनावरचे दडपण कमी होऊ लागले .. मामाच्या बोलण्यातून एक सूर असा ही निघतो आहे

की ..समोरच्या पार्टीच्या मनात ..वेगळा विचार असू शकतो ..आणि हे विचार जर जुळले नाही तर ?

तर काय ?

आपली यातून आपोआपच सुटका होऊ शकते ..पण ..

त्यासाठी उद्या हे सगळे घडू द्यावे लागणार ..ते तर टाळणे आता कुणाला शक्य नाही..

या गोष्टीने हेमूच्या मनाला घोर लागला होता .

उद्याची दुपार ..काय होईल ?

आणि हेमुला आठवले ..तिकडे ..आपली नेहा ..वाट पाहत असेल आपल्या मेसेज्ची ..

आज संध्याकाळी ..मामाबरोबर काय काय बोलणे झाले असेल ?

हेमूने टाईम पाहिला ..रात्रीचे अकरा वाजले होते ..इथे मध्यरात्रीची निरव शांतता जाणवत होती ..

पण ..तिकडे ..जशी रात्र होते ..जणू दिवस उजाडतो ..असे वातावरण असते .

हेमूने पाहिले .. त्याचे आई-बाबा आणि मामा मधल्या खोलीत अंथरुणे टाकून झोपायच्या तयारीत

आहेत ..या तिघांना उशिरा पर्यंत जागण्याची सवय नव्हती .

बाहेरच्या खोलीत ..हेमू एकटाच बसला होता ..तो हळूच बाहेरच्या अंगणात आला ..

बाहेर अंगणात येऊन तो फिरू लागला ..

असा ,इतका निवांत वेळ त्याला खूप खूप दिवसांनी मिअला होता ..

मधुरिमादीदी आणि रणधीर यांनी या अगदी दुर्गम परिसरात ..त्यांची संस्था सुरु केली ..

शाळा सुरू केली ..आणि ही जबाब्दारी हेमूच्या आई-बाबाना द्यावी ..ही सूचना रणधीरच्या काकां

आजोबांनी केली होती ..काही वर्षापूर्वी हेमुचे आजोबा आणि रंधीरचे हे काका आजोबा ..वकिलीचे

शिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला सोबत होते .निझामी राजवटीतील या भागातील लीकांना हैद्राबाद

सोयीचे असे, विदर्भ ..मराठवाडा , आणि या सीमेलगत असलेला आदिवासी परिसर ,होता .

नंतरच्या काळात ..हेमुचे आजोबा ,रणधीरचे आजोबा यांनी या भागात समाजकार्य करण्याचे ठरवीत

अनेक संस्था सुरु केल्या , कार्यकर्ते जमवले ..

आणि ज्यावेळी या संस्था आकारास येत गेल्या ..तेव्हा ..हेमूच्या बाबा सारखे निस्पृह कार्यकर्ते

त्यांच्या कार्यात येऊन मिळाले ..पुढे ..मधुरिमा आणि रणधीर दोघांनी हेमूच्या बहिणींचे शिक्षण

केले ..त्यांचे संसार सुरु करून दिले ..पुढे ..हेमुचे उच्च शिक्षण , त्याची नौकरी ..या सगळ्या गोष्टी

मधुरिमा आणि रणधीर यांनी केला ..जणू ..हेमूच्या आई-बाबांनी त्यांचे सारे जीवन रणधीरच्या

कार्याला अपर्ण करून टाकले ..त्याची भरपाई ..मधुरिमा आणि रणधीरने या सगळ्यांची पालक

होऊन जबादारी पार पाडणे हे कर्तव्य स्वीकारले .

हेमुला हे सगळे आठवले .. याच मधुरिमादीदीने ..नेहाची निवड केली आहे ...दोघांना एकत्र आणले आहे .

आपल्या परिवारासाठी नेहा किती योग्य आहे “ हे तिने विचारांती ठरवले असणार ..म्हणूनच

सोनिया आणि अनिता या दोघींना तिने मदतीसाठी नेहासोबत ठेवले आहे.

आणि या मधुरिमादीदीला ..नेहाने आणि आपण ..दोघांनी एका शब्दाने सांगितले नाही ..

ही आपण चूक तर नाही ना केली ..?

आता उद्याच्या कार्य्क्रमानानातर परत गेल्यावर मधुरिमादीदीला सांगायला हवे ..

हेमूने नेहाला कॉल लावला ..

ती वाटच पाहत होती ..

काय काय झाले हेमू ? अगोदर सांग मला ..

शांतपणे हेमू सांगू लागला ..

नेहा ..आपण काळजी करावी , गोष्टी बिघडून गेल्या “ अशी भीती वाटावी असे काही ही अजून घडलेले नाही .. .

उद्या संध्याकाळी आलेले पाहुणे गेल्या नंतर सगळे चित्र स्पष्ट होईल .

तू टेन्शन घेऊ नकोस नेहा .

त्याच वेळी नेहा विचार करीत होती ..

आपल्या आईने केलेल्या फोन बद्दल हेमुला आत्ताच सांगावे का ?

आणि सांगितले तर .आधीच तो उद्याच्या टेन्शन मध्ये ..त्यात या गोष्टी ऐकून तो अधिकच परेशान

होऊन जाईल , जाऊ दे ..तो इकडे आलाय्वर सांगितलेले बरे.

हेमू म्हणाला ..नेहा .. घाबरून जाण्यासारखे काहीच झालेले नाही.

आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ..मामाशी जे बोलणे झाले, त्या वरून मला थोडा थोडा अन्द्नाज

आलाय की ..केवळ मामीच्या हट्टामुळे ..उद्याचा कार्यक्रम होतो आहे ..

माझ्या मामीच्या बळजबरीने समोरची पार्टी ..म्हणत असेल –

इतका आग्रह आहे आपल्या बहिनीचा .तर .काय हरकत आहे ..बघून तर घेऊ ..पोरगा !

..अशा उद्देशाने येत असावेत .

हे ऐकून नेहा म्हणाली ..

अरे हेमू ..नेमक्या याच्या उलट घडले तर ? मग कसे..?

तुला पाहिल्यावर , भेटल्यावर , बोलणे झाल्यावर त्या मुलीचे मन बदलले तर ?

मला याचीच भीती वाटते आहे हेमू .

तुला पाहिल्यावर .ती मुलगी नाही म्हणायची शक्यता मला फारच कमी वाटते .

बघ बाबा ..मला काय वाटते ते मी तुला सांगितले ..काळजी तर तुला घायची आहे.

मी इकडे परेशान होऊन बसण्य शिवाय काही करू शकत नाही..

सारखी प्रार्थना करते ..नवस बोलते ..माझ्या रेनुकामातेला .. ,आई,अंबाबाई .आमच सगळ

सुखरूप पार पडू दे ..जोडीनी येऊ गडावर तुझ्या दर्शनाला .

नेहाची ही मनोवस्था पाहून .हेमुला हसू आले ,पण तिला काही बोलणे बरे नाही. म्हणून तो गप्प

राहत म्हणाला ..

चल ,बाय कर .. उद्याचा दिवस मोठा कठीण आहे, आपल्या प्रेमाच्या परीक्षेचा आहे .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -४१ वा लवकरच येतो आहे.

-------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------