स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 17 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 17 )







जायज भिड का मै
एक नाजायज हिस्सा हु
मानने को तो सब साथ है
पर वक्त आतेही ही सब धुवे समान उड जाते है

नित्याच्या आयुष्याने पुन्हा एकदा वळण घेतले होते ..तिच्या जीवनात आनंद येता - येता दूर पळाला होता ..अनु म्हणजे नित्याचा जीव होता ..पाच वर्षाआधी तिची अनुसोबत भेट झाली ..त्या दिवसानंतर दोघे मित्र झाले आणि नंतर बेस्ट फ्रेंड ..नित्या आणि अनु कॉलेजमध्ये कायम सोबत असत शिवाय दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे दोघेही प्रेमापासून पळत असत ...अनु थोडी जाड असल्याने सहसा तिला कुणी प्रपोज करत नसे पण त्याच तिला कधीच वाईट वाटलं नव्हतं ..नित्या आणि अनुची कॉलेज लाइफ फार सुंदर होती ..जरी त्या इतरांशी फारस बोलत नसल्या तरी एकमेकांसोबत फारच खुश असत ..नित्याला तिचे बाबा घरून फक्त प्रवासाचे पैसे देत असत तेव्हा बाहेर खायची वेळ आली की अनुच तीच सर्व काही करायची ..याच काळात मयूर तिच्या आयुष्यात आला ..तो बहुदा पहिलाच होता ज्याने तिला प्रपोज केले होते ...नित्याही त्यावेळी सोबत होती ..मयूरने प्रपोज केल्यावरही नित्याने त्याला होकार दिला नव्हता ..नित्या कधी कधी त्याच्याबद्दल विचार करायला सांगायची पण अनु ती गोष्ट उडवून टाकू लागली ..हळूहळू दिवस जाऊ लागले ..मयूर कुठलीही अपेक्षा न ठेवता तिच्यावर प्रेम करत होता म्हणूनच कदाचित अनुने त्याला होकार दिला ..त्यांचं नात खूपच घट्ट झालं होतं ..मनानेच काय तर अनु मयूरची शरीराने देखील झाली होती ..त्यावेळी मयूरला घरच्यांची आठवण झाली नाही पण जेव्हा घरच्यांसमोर तिची बाजू घेण्याची वेळ आली तेव्हा तो घरच्याना समजावू शकला नाही किंबहुना प्रयत्न त्याने पण केला नाही ..कसे असतात ना लोक त्यांना प्रेम तर करायच असत पण लग्न मात्र घरच्यांच्या मर्जीनेच करायचं मग प्रेम करताना घरच्यांची परवानगी का घेत नाहीत ? ..नित्याच्या मनात विचारांची चलबिचल सुरू होती आणि नित्या मनातच म्हणाली , " अनु तू अस स्वार्थी होऊन निर्णय घ्यायला नको हवं होतं ..संकटात तू कायम माझ्यासोबत होतीस आणि तूच जगायला धीर दिलास पण तूच अस मला एकट सोडून जशील अस मला वाटलं नव्हतं ..नित्या बऱयाच वेळ विचार करत होती आणि केव्हा डोळे लागले तिचे तिलाच कळले नाही ...

दुसऱ्या दिवसानंतर नित्याच आयुष्य पून्हा एकदा बदललं होत ..नौकरी करण्याचा विचार देखील तिच्या मनातून कुठेतरी दूर पळाला होता जणू अनुच्या जाण्याने तिचा आत्माच हरपला होता ..ती दिवसभर काम करत असायची पण तिला तिचच भान नव्हतं ..आई बाबा तिच्या नावाने मृन्मयकडे जा म्हणून सतत ओरडत असायचे पण तीच त्यांच्यावर लक्षही नसायचं ..ते घर ते शहर आता तिला खायला धावू लागलं होतं ..अनु जिवंत असताना नित्या एकट फील करू लागली की सतत तिच्याशी बोलत असायची ..अनुच्या गमतीदार बोलण्याने नित्या केव्हा हसायला लागायची ते तिलाच कळायचं नाही पण आता अनुही नव्हती ना होत तीच दिलखुलास हसन ..होत्या त्या फक्त आठवणी ..

एकीकडे संध्या तर दुसरीकडे नित्याची आठवण आल्याने तिच्या डोळ्यात अश्रू येत असत ..दोघांनाही भेटण्याची तिची मनोमन इच्छा होती पण एक असूनही भेटत नव्हती आणि दुसरीपर्यंत नित्या पोहोचू शकत नव्हती ..त्या दोघांच्या आठवणीने हैराण करून सोडलं की नित्या बाजूला असलेल्या पार्कमध्ये जाऊन बसायची ..अलीकडे एक बदल झाला होता तो असा की त्या छोट्या मुलीशी नित्याची ओळख झाली होती आणि तिची आई अगदी त्याच वेळी पार्कला येत असे .सोनूशी खेळताना नित्या सर्व काही विसरून जायची त्यामुळे ती न विसरता रोज पार्कला जाऊ लागली ..तिच्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करण्यात नित्याला समाधान मिळत होत ..सोनूही नित्याशी ओळखी असल्याप्रमाणेच वागत होती पण नित्या घरी आली की मात्र पुन्हा एकटी पडायची जणू तिने जगण्याची आशाच सोडून दिली होती फक्त अनुसारखा तिला स्वतःचा जीव घेता येत नव्हता बस एवढा काय तो फरक ..

अनु जाऊन तीन महिने उलटून गेले होते ..घरच्यांची किटकीट एकूण ती कंटाळली होती ..तिला शांतता हवी होती तर दुसरीकडे एकटी असल्याने तिला जुन्या गोष्टी त्रास देऊ लागल्या होत्या ..त्या सर्वातून सुटका करून घ्यायची म्हणजे नौकरी करणे गरजेचे होते पण यावेळी विद्या ताईला कॉल करणं तिला योग्य वाटलं नव्हतं म्हणून स्वतःच तिने काही मित्रांकडून चौकशी करायला सुरुवात केली ..रोज कुणाला तरी ती विचारायची पण कुणाकडून काहीही बातमी आली नव्हती ..अशाच एका संध्याकाळी नित्याला एक कॉल आला ..नित्याने मोबाइल हातात घेतला तेव्हा तिच्या लक्षात आले की कॉल विद्या ताईचा आहे ..तिने लगेच कॉल घेतला आणि मृदू आवाजात म्हणाली , " कशी आहेस ताई ? "

विद्या हळूच बोलत म्हणाली , " मी आहे ठीक ..अनु गेल्यापासून कशातच मन लागत नाही ..आई पण रोज कॉल करत असते ..आम्ही नाशिकला राहत असल्याने तिकडे रोज येन परवडत नाही ग ..आईची खूप काळजी वाटते मला .."

नित्या शांतपणे सर्व ऐकत होती तीच बोलणं झाल्यावर नित्या पुन्हा म्हणाली , " हो ताई कळत आहे ..अनुच अस जाण कुणालाच आवडलं नाही ..पण ताई आता स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही ..तेव्हा स्वतःलाही सावरा आणि आईना पण सावरा ..आता फक्त आपण तिला आठवणीतच ठेवू शकतो .."

विद्या गंभीर मुद्रेने उत्तर देत म्हणाली , " हो बरोबर आहे तुझं ..आता ते करावंच लागेल ..सॉरी ..मी माझंच घेऊन बसले तू सांग कशी आहेस आणि काय करत आहेस ? "

नित्या किंचित हसत म्हणाली , " आलेला दिवस ढकलत आहे बघ पुढे ..घरात बसून पण कंटाळा आलाय म्हटलं मग बघू जॉब तरी जॉब ..तर मित्राना सांगून ठेवल आहे.. बघू येईल कुणाचा तरी कॉल "

विद्या डोक्यावर हात मारत म्हणाली , " किती वेंधळट ना मी विसरूनच गेले बघ ..अनुच्या जाण्याने इतकं दुःख झालं की तुझ्या जॉबच विसरूनच गेले बघ !! हरकत नाही आताही उशीर झालेला नाही ..तू लवकरात लवकर ये इकडे निघून ..मलाही थोडा आधार मिळेल तशीही तू जवळ असलीस की बर वाटेल बघ .."

नित्या आवाज कमी करत म्हणाली , " नको ग ताई तुला त्रास !!..मी बघते ना इकडेच काही ..तू काळजी नको करू .."

नित्याच्या बोलण्याने बहुतेक विद्या दुखावली गेली आणि तिच्यावर रागावत म्हणाली , " तू परकी आहेस का आम्हाला तस पण अनुने सांगितलं होतं मला त्याबद्दल आता ती नाहीये तर मी तुला कस एकट सोडू ..तेव्हा लवकर ये मी वाट पाहतेय .."

नित्यानेही थोड्या वेळ बोलून फोन ठेवून दिला ..आज खूप दिवसांनी नित्याच्या चेहऱ्यावर थोडा आनंद पाहायला मिळाला होता ..

नित्यासाठी ते घर म्हणजे बंदिस्त वातावरण होत तेव्हा तिला लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं होत ..तिने कागदपत्र आधीच गोळा केले होते ..त्यामुळे त्याच टेन्शन नव्हतं पण घरच्याना सांगणं तिला फार कठीण जाणार होत परंतु सर्वाना सांगणंही गरजेचं होतं ..त्या रात्री सर्वांचं जेवण आटोपलं ..सर्व आतमध्येच बसले होते ..संधी शोधून नित्या बाबाना म्हणाली , " बाबा विद्या ताईचा फोन आला होता ..ती म्हणाली नाशिकला नौकरीसाठी ये..राहणं खान सर्व तिच्याकडेच करेन ..सर्व कागदपत्र मी आधीच गोळा केले आहेत सो उद्या जाईन म्हणतेय नाशिकला .."

तिच्या शब्दांनी घरात शांतता पसरली ..तिची आई तिच्या बाबांकडे पाहत होती आणि बाबा जोराने ओरडत म्हणाले , " तुला कोण सांगत हा शहाणपना करायला ..आमच्या घरात मुली नौकरी करत नाहीत तेव्हा चुपचाप बसून रहायच ..आम्ही केव्हाच नवऱ्याकडे जा म्हणतोय ते तुला ऐकू येत नाही पण बाहेर जायला मोठी घाई झाली आहे तुला ..अजिबात जायचं नाही कुठे .."

नित्याला बाबा अस काही बोलतील हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे नित्या त्यांच्यावर भडकत म्हणाली , " बाबा सर्व काही तुमच्या मर्जीने घडणार नांही ..मी आतापार्यंत सर्व तुमच्या मर्जीने करत आले आहे पण आता नाही जमणार मला ..तस पण ह्या घरात माझा जीव गुदमरू लागलाय सो मी जाणार आहे म्हणजे जाणार आहे ..तुम्हाला फक्त कळवाव म्हणून सांगते आहे .."

नित्याच्या बोलण्याने आणखीच घरातल वातावरण बिघडलं आणि बाबा पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाले , " जणू तू मोठयांच न ऐकण्याचा चंगच बांधला आहेस ..पण मीही तुझा बाप आहे!! ..बघतोस तू इथुन कशी जातेस ..तू जाणार फक्त मृन्मय कडे नाही तर कुठेच नाही .."

नित्याही फार रागात होती त्यामुळे तीही ठामपणे म्हणाली , " तुम्हीही बघा मी इथून कशी जाते ते .."

नित्या पाय आपटत आपल्या खोलीत जाऊन बसली ..तिने पुनः एकदा कागदपत्र नीट आहेत की नाही ते बघून घेतलं ..स्वतःचे कपडे मोठ्या बॅग मध्ये भरून घेतले ..कागदपत्रे नीट तपासून बॅगमध्ये भरले आणि आपली जाण्याची इच्छा किती मजबूत आहे हे तिने बाबाना दर्शविल..

दुसरा दिवस उगवला ..सकाळचे 11 वाजले होते ..नित्या आपली सर्व तयारी करत होती तर बाबा- आई शांतपणे तिला पाहत होते ..ते काहीच कसे बोलत नाहीत म्हणून ती शॉक होती पण तरीही त्या गोष्टीचा तिला आनंद होता ..सर्व वस्तू भरल्या होत्या पण काही कपडे काही वस्तू तिला बाजारातून आणाव्या लागणार होत्या त्यामुळे बॅग घरीच ठेवून ती मार्केटला गेली ...काही कपडे आणि लागणार साहित्य घेऊन ती तासाभराने परत आली ..नित्या घराच्या दारावर पोहोचली ..तेव्हा तिला घरातून धूर निघताना दिसला ..तिच मन जोराने धडधड करू लागल होत ..ती लगबगीने घरात पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आई बाबा एका लोखंड्याच्या वाट्यात हात शेकत होते ..नित्याच्या जीवात जीव आला ..पुढच्याच क्षणी तिने त्यांना जवळून न्याहाळून पाहिलं ..त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होत जणू त्यांनी कसला तरी विजय मिळविला होता ..नित्याच्या डोक्यात विचारांनी धाव घेतली आणि धावतच जाऊन आपली बॅग बघू लागली ..तिने बॅग मधील सर्व सामान काढलं पण तिचे कागदपत्र तिला दिसले नाहीत ..ती इकडे तिकडे शोधत होती पण त्यांचा काही पत्ता। नव्हता तिला त्याच क्षणी बाबांचा तो हसरा चेहरा आठवला आणि ती त्यांना परत एकदा बघू लागली ..माझ्या माघारी काय झालंय हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि ती बाबांवर ओरडत म्हणाली , " बाबा तुम्ही माझी आयुष्यभराची कमाई जाळून टाकली .."


क्रमशः ....