Tujhach me an majhich tu..15 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १५

तुझाच मी अन माझीच तू...भाग १५

अमेय ने हॉटेल बाहेर पडतांना राजस ला चिडवले होतेच पण राजस अजिबातच चिडला नाही हे पाहून अमेय मात्र विचारात पडला होता. अमेय ला राजस कसा आहे हे चांगलेच माहिती होते. पण अमेय ला वाटले होते तसा राजस वागलाच नव्हता. आता राजस काय करणार ह्या बद्दल ची त्याची उत्सुकता ताणली गेली होती. पण राजस एकदम थंडपणे बोलला,

"हो रे.. मजा आली आज.."

"ह? तू अजिबातच नाही चिडलास राजस... मला वाटल आता माझं काही खर नाही.. आज अचानक इतका बदल कसा झाला रे तुझ्यात?"

"करेक्ट.. आज मी खूप चिडलो होतो..मी आधी सारखा असतो तर तुझ काय खर नव्हत. पण मी आत्ता थोडा बदल करणारे स्वतः मध्ये... आता माझी एम्स वेगळी आहेत.. सो आता चिडून उपयोगाच नाही... आता मला स्वतःमध्ये थोडे बदल करावे लागणार आहेत.. त्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो माझा राग... रागावर नियंत्रण मिळवण गरजेच आहे... कारण मी आभा बरोबर बोलतांना एकदम चिडलो तर ते परवडणार नाही न...सो विचार केला का नाही तुझ्यापासून बदलला सुरु करू..." राजस चेहऱ्यावर हसू आणत बोलला..

"अरे वा.. ही तर माझ्या साठी गुड न्यूज आहे साहेब!! एक मुलगी पूर्ण आयुष्य बदलू शकते हे काही चुकीचे नाही हे मला आज कळतंय!! आणि ऑल द बेस्ट रे.. फक्त सांगितलेलं लक्षात ठेव... उगाच अति डेस्पो आहेस ते कळून नको देऊस.." अमेय अजुनही चेष्टेच्या मूड मध्ये होता.. खर तर त्याला आज जरा जास्ती मजा येत होती पण त्याला ह्यातलं गांभीर्य कळत नव्हत..

"हो हो अमेय..यु आर सेफ नाऊ..येस, तू सांगितलेल लक्षात ठेवतो.. आणि करत राहतो तुला अपडेट.. छान वाटत बघ असं कोणी सतत मनावर राज्य करत राहत तेव्हा.. इतक्या कमी वेळात कोणाबद्दल इतक कसं वाटायला लागत रे...इतकी जादू? आणि माझ्या आयुष्यात असं काही होतंय ह्यावर माझा अजिबातच विशास नाही रे.. " राजस परत आभा च्या विचारात हरवून बोलला.. त्याच्याकडे पाहून आता मात्र अमय चिंतातूर झाला.. आपला मित्र इतका बदलला हे पाहून त्याला आधी थोडा धक्का बसला पण त्याने थोडा विचार केला आणि तो बोलायला लागला.

"आवर आवर राजस... कोणाच्या इतक्याही अधीन होऊ नकोस की स्वतः ला विसरशील.. मनावर कंट्रोल कर थोडा.. आणि इतकाही बदलू नकोस की तुला स्वतःला ओळखण अवघड होऊन जाईल..तू नेहमीसारखा वाग.. आणि तू जसा आहेस तसाच आभा ला आवडलास तर ते खर प्रेम.." अमेय थोडा सिरिअस होऊन बोलला.. त्याचे बोलणे राजस लक्षपूर्वक ऐकत होता.. त्याला जाणवत होते आपण विनाकारण आभा मध्ये गुंतत आहोत... त्याला अमेय चे म्हणणे पटत होते.. काही झाल तरी अमेय राजस चा एकदम खास मित्र होता.. आणि अमेय बद्दल त्याला संपूर्ण खात्री होती.. अमेय काही चुकीच सांगणार नाही हे राजस ला माहिती होते.. आणि अमेय ने सांगितलेले अजिबातच चुकीचे नव्हते. राजस ला कळून चुकले की अति घाई काही कामाची नाही.. आतेताईपणा करून काही फायदा नव्हता.

राजस ने दीर्घ श्वास घेतला आणि अमेय ला उत्तर द्यायला लागला,

"साल्या... तू कसा रे इतका संयमी? आणि बरोबर आहे रे.. कळतंय पण वळत नाहीये.. पण आता पूर्ण कंट्रोल ठेवणारे भावनांवर आणि वागण्यावर सुद्धा.. मी असा कधीच नव्हतो.. पण एक मुलगी मला इतक बदलू शकते?" राजस चे बोलणे ऐकून अमेय ला स्वतःचे हसू आवरता आले नाही..

"होशील तू पण तयार.. मी आहे ना.. आणि कोणत्याही गोष्टीला वेळ द्यायला शिक राजस... मनात आलं की लगेच होत नसत..मी तुला २-३ उपाय सांगतो ज्याने सारखी सारखी आभा तुझ्या मनात आणि विचारात येणार नाही.."

"अरे वा.. हे पण माहितीये तुला.. कसं काय रे अम्या? तू पण असाच कोणाच्या विचारात अडकलास होतास आय थिंक.." अमेय च्या पोटात गुद्द घालत राजस बोलला...

"नो रे.. कोणात अडकलो बिडकलो नव्हतो. हा माझा स्वतःचा अभ्यास आहे.. सगळ्या साठी तयार राहायचं ना.. आयत्यावेळी धावपळ नको.. उगाच देवदास बनून मी राहू शकत नाही... सो आधीच तयारी करून ठेवलीये... नाहीतर आपल मन.. आपल्या म्हणजे आपल्या सारख्या मुलाचं मन किती कोवळ असत.. चहुबाजूंनी आपल्यावर कोणा ना कोणाचा हल्ला होत असतो.. पण आपण शांत राहायचं..समोरून काही रीस्पोंस येतो का पाहूनच मग पुढच ठरवायचं.. मग ब्रेक अप ऑर हार्ट ब्रेक पासून वाचता येत.." अमेय स्वतःला शहाणा समजून बोलला आणि राजस तोंडावर हात ठेऊन हसायला लागला...

"अमेय तू तर PhD केलीस रे.. बर बर आता ह्यावेळी तू माझा गुरु.. तू सांग आणि ये बंदा तुम्हारी सब बाते मानेगा.. आता उपाय सांग.. मग सुटू आपण आपापल्या घरी.."

"येस.. इट्स लेट.. १ उपाय सांगतो.. तो ट्राय कर.. आणि मग पुढच्यावेळी अजून उपाय सांगतो.."

"बोल पटापट.. घरी जाऊन झोपून उद्या परत ऑफिस आहे.."

"मला पण.. सो ऐक, विसरून जा तू आभा ला भेटला आहेस.. ऑफिस च्या कामात आणि ऑफिस च्या इतर लोकांबरोबर राहा.. नॉर्मल राहा.. आभा शी सुद्धा अगदी नॉर्मल वाग.. ती फक्त तुझी कलीग आहे... बाकीच्या लोकांशी वागता बोलतांना तू डीस्टंस ठेवतोस ना.. तसच आभा शी सुद्धा ठेव.. तू तर ओळखत सुद्धा नाहीस मग त्च्यात जास्ती गुंतायचं प्रश्न नाहीये.. " अमेय बोलत होता आणि राजस मान हलवून होकार देत होता.. "कळतंय ना?"

"ह हो.. येस.. आता ठरलं.. डीस्टंस ठेवायचं.. नॉर्मल वागायचं.. लेट आभा अप्रोच मी.. तिला कळल पाहिजे राजस कसा वेगळा आहे.. किप काम राजस.." राजस बोलला

"येस.. हाच खरा राजस.. पण गरज लागली आभा ला तर आखडू नकोस!! गो अँड हेल्प हर!"

"डन.." दोघांनी एकमेकांना हाय फाईव दिली आणि घरी जाण्यासाठी आपापल्या गाड्यांकडे गेले..

राजस ने गाडीला किक मारली आणि अमेय ला बाय करून तो निघाला.. आता राजस एकदम मोकळा झाला होता. अमेय त्याचा जिवाभावाचा मित्र आणि तो नेहमीच राजस साठी असायचा.. आपल्या जीवाभावाच्या मित्र ला भेटून राजस ला एकदम हलके वाटायला लागले होते. आता तो क्लिअर होता.. त्याला आभा त्याच्या आयुष्यात हवी होती पण तो कसलीही घाई मात्र करणार नव्हता.. शांतपणे सगळं होऊ देणार होता राजस...

राजस घरी पोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याचे आई बाबा झोपले होते.. राजस सुद्धा पाणी पिऊन त्याच्या खोलीत गेला आणि बेड वर पडता क्षणी त्याला झोप लागली.. पण उद्याचा दिवस खास असणार होता. ह्याची अर्थात राजस ला काहीही कल्पना नव्हती.. दोघांची लव्ह स्टोरी चलू होणार तर होतीच पण त्यासाठी काही दिवस जावे लागणार होते.. पण काही दिवसातच दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडून जाणार होते. पण हे होण्यासाठी मध्ये बऱ्याच घटना घडून जाणार होत्या. आणि त्यानेच दोघांचे प्रेम घट्ट होणार होते.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED